Kolhapur Rain Update: संपूर्ण जिल्ह्यात पूर सदृश्य परिस्थिती, पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट; शाळा,महाविद्यालयांना दोन दिवस सुट्टी

कोल्हापूर (नयन यादवाड) : कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगेने धोका पातळी ओलांडली असून जिल्ह्यात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. यात भर म्हणजे राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले असून याबद्दल मोठा पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. यामुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली असून या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना 26 आणि 27 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष अमोल येडगे यांनी आज सुट्टीचे आदेश पारित केले आहेत.

कोल्हापूर जिल्हा आठवडाभरापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. परिणामी जिल्ह्यातील सर्वच नद्या ओसंडून वाहत असून कोल्हापूरची मुख्य नदी असलेल्या पंचगंगेने आज सकाळी 8 वाजता धोका पातळी ओलांडली असून रात्री आठ वाजता पंचगंगेची पाणी पातळी 43 फूट 6 इंचांवर गेली आहे. परिणामी जिल्ह्यातील अनेक मार्गांवर पाणी आले असून जिल्ह्यातील 70 हून अधिक मार्ग प्रभावित झाले असून वाहतूक खोळंबली आहे. Kolhapur Rain : कोल्हापूरला महापुराचा विळखा घट्ट, पंचगंगेने धोका पातळी गाठली; राधानगरीचे ५ स्वयंचलित दरवाजे उघडले
अनेक विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात येण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे याचा फटका आता शिक्षण विभागाला देखील बसू लागला असून शिवाजी विद्यापीठाने आधीच सर्व परीक्षा स्थगित केल्या असून नवीन तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
Solapur News: वृद्धाश्रमात मयत झालेल्या वडिलांच्या मृतदेहाकडे मुलांची पाठ; बाप म्हणायला लाज वाटते;निष्ठुर मुलांचा निरोप
अशातच पुढील दोन दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असल्यामुळे आणि राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत आणखी वाढ होऊ शकते. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर केली असून सुट्टीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. 26 व 27 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर जाहीर करण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांना जरी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आले असले तरी मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मात्र शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे काम करण्याचे आदेश ही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

सांगली जिल्ह्यात सुट्टी जाहीर

सांगली जिल्ह्यातील मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांना उद्या २६ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी हा निर्णय घेतला आहे. सांगलीत कृष्णा नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याने तसेच वाळवा आणि शिराळा तालुक्यात वारणा नदीला पूर आल्याने प्रशासनाचा हा निर्णय घेतला. दरम्यान शाळांना सुट्टी देण्यात आली असली तरी शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी शाळांमध्ये हजर राहून आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहेत.

Source link

flood situation in kolhapurholiday for schools and collegeskolhapur orange alertkolhapur rain latest news updatekolhapur rain updateकोल्हापूर ताज्या बातम्याकोल्हापूर पाऊस अपडेटकोल्हापूर पाऊस बातमीकोल्हापूर शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टीराधानगरी धरण
Comments (0)
Add Comment