Raigad Rain: तरुण नदीच्या पाण्यात पडला अन् पुरात वाहून गेला, बचाव पथकाला पाचारण, वाचवण्यासाठी धडपड नंतर…

अमुलकुमार जैन, रायगड: प्रवाहाच्या विरोधात पोहणाऱ्याचा निभाव लागत नाही असं म्हणतात. मात्र कर्जत तालुक्यात एक तरुण उल्हास नदीच्या पुराच्या पाण्यात पडला. प्रवाहात तो वाहत जात असताना देखील त्याने वाचण्यासाठी प्रवाहाच्या विरोधात पोहत राहिला. एका ठिकाणी अडकून पडला. तेव्हा प्रशासनाने अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी बचाव पथकाला पाचारण केले. पथकाने पुराच्या पाण्यात उतरत या तरुणाला सुरक्षित बाहेर काढले आहे. या तरुणासाठी हे बचाव पथक देवदूत ठरले आहे.
Nashik Rain: नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम; भावली धबधबा परिसरात दरड कोसळली, लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत मुद्रे येथे राहणारा महेंद्र पवार हा २८ वर्षीय तरुण आज उल्हास नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात पडला. याच दरम्यान वावे बेंडसे भागात पुराचे पाणी बघायला आलेल्या काही तरुणांना महेंद्र दृष्टीस पडला. त्यांनी महेंद्रला हाक मारत आपल्याकडे येण्यास सांगितले. मात्र प्रवाह प्रचंड असल्याने महेंद्र प्रवाहात वाहून जात होता. मात्र अशाही परिस्थितीत आपला बचाव करण्यासाठी त्याने प्रवाहाच्या विरोधात पोहणे सुरू ठेवले. काही झालं तरी हरायचं नाही हे जणू त्याने ठरवलं होत. अशातच एका क्षणी त्याला वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या मुलांनी देखील आशा सोडली.मात्र तेवढ्यात महेंद्र एका झाडांच्या झुडपाजवळ पोहचला. त्याने कसेबसे झाड पकडत त्या पुराच्या पाण्यात त्याला आधार मिळाला. त्यामुळे तिथे असलेल्या तरुणांनी प्रशासनाला याची माहिती दिली. माहिती मिळताच प्रशासनाने खोपोली येथील अपघातग्रस्तांचा मदतीला या बचाव पथकाला पाचारण केले. काही वेळात बचाव पथकाचे गुरुनाथ साठेलकर, राजेश पारठे, अमोल कदम, सौरभ घरत, निलेश यादव, निलेश कुदळे, भक्ती साठेलकर, संकेत पाटील, सुमित गुरव, हनीफ करंजीकर, अक्षय गुप्ता, महेश भोसले, विकास पाटील, जयेश ठक्कर, पंकज बागुल, मेहबूब जमादार, कर्जत अग्निशमन दलाचे दिनेश हिरे, प्रदीप हिरे, मारुती रोकडे, सोनू परदेशी, भरत भोईर आदी बेंडसे येथे पोहचले.

बचाव पथकाने आपले साहित्य सोबत घेत सुरक्षेची काळजी घेत महेंद्र पवारला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. उल्हास नदीच्या पाण्याच्या प्रवाह प्रचंड होता. तरीही दोन तासांच्या थरारक प्रयत्नानंतर बचाव पथकाने महेंद्र पवार याला सुरक्षित बाहेर काढले. बचाव पथक महेंद्र याला घेऊन येताना उपस्थित गावकऱ्यांनी एकच जल्लोष करत बचाव पथकाचे आभार मानले आहेत. तर महेंद्रने देखील बाहेर आल्यावर गुरुनाथ साठेलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

Source link

flood youth rescuedmaharashtra rain newsraigad newsraigad rain newsतरुण वाहून गेलामहाराष्ट्र पाऊस अपडेटमुंबई पाऊस अपडेटरायगड पाऊस अपडेट
Comments (0)
Add Comment