परभणी जिल्हा हा शिवसेने पाठवा राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील बालेकिल्ला आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांसोबत परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे बहुतांश नेते गेले होते. आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह त्यांचे सर्व समर्थक अजित पवार गटात सहभागी झाले होते. पण विधान परिषदेला आमदार दुर्राणी यांना विधान परिषदेवर पुन्हा एकदा उमेदवारी अजित पवार यांनी नाकारली. त्यामुळे मागील काही दिवसापासून आमदार बाबाजानी दुर्राणी हे नाराज असल्याचे दिसत होते. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये अल्बेल असल्याचेही दिसून येत होते. त्यातच राजेश विटेकर यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांना आमदार केल्याने देखील राष्ट्रवादीत दुफळी निर्माण झाल्याचे दिसून येत होते.
त्यातच आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील परभणी जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. जयंत पाटील यांनी परभणी जिल्ह्यात प्रवेश करतात सर्वात प्रथम त्यांनी अजित पवार गटाच्या आमदार बाबाजानी दुरानी यांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांच्यासोबत माजी आमदार विजय भांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. जयंत पाटील यांनी स्वतः बाबाजानी दुर्राणी यांच्या घरी जाऊन भेट घेतल्याने पाथरी शहरासह जिल्हाभरामध्ये मात्र सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
आमदार बाबाजानी दुरानी हे आपल्या समर्थकांसह अजित पवारांची साथ सोडून पुन्हा एकदा शरद पवारांनी यांच्यासोबत जातील का? असा प्रश्न आता सर्वांनाच निर्माण झाला आहे. शरद पवार गटांसोबत बाबाजानी दुर्रणी यांच्या वाटाघाटी यशस्वी झाल्या तर अजित पवार गटाला परभणी जिल्ह्यामध्ये मोठे खिंडार पडणार आहे.
परभणी जिल्ह्यात आमदार बाबाजानी दुर्राण यांना म्हणणारे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत. त्यामुळे जर बाबाजानी दुर्राणी हे शरद पवार गटात गेले तर अजित पवार गटाला प्रचंड नुकसान सहन करावे लागणार आहे.