Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121
Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121
Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121
Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121
Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89
Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8 एमपीएससी परीक्षा - TEJPOLICETIMES
https://tejpolicetimes.com
तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाजMon, 02 Dec 2024 01:33:10 +0000en-US
hourly
1 https://wordpress.org/?v=6.8https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpgएमपीएससी परीक्षा - TEJPOLICETIMES
https://tejpolicetimes.com
3232Nashik News: MPSC च्या परीक्षेला आले अन् आई-बाबा झाले!, पेपर सुरु असतानाच महिलेला प्रसूतीकळा
https://tejpolicetimes.com/?p=110896
https://tejpolicetimes.com/?p=110896#respondMon, 02 Dec 2024 01:33:10 +0000https://tejpolicetimes.com/?p=110896
Nashik Woman Give Birth To Child During MPSC Exam: परीक्षेसाठी परीक्षाकेंद्रावर पोहोचल्या, पेपरही सुरु झाला. पेपर सुरु होताच परीक्षार्थी महिलेला प्रसूतीकळा सुरु झाल्या. महाराष्ट्र टाइम्स नाशिक: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी एक दाम्पत्य नाशिकमध्ये रविवारी आले. दोघांची केंद्रे वेगळी होती. परीक्षा केंद्रात पोहोचल्यानंतर महिला परीक्षार्थीला प्रसूतीकळा सुरू झाल्या. त्यातच रक्तस्रावही झाल्याने नियतीने […]
Nashik Woman Give Birth To Child During MPSC Exam: परीक्षेसाठी परीक्षाकेंद्रावर पोहोचल्या, पेपरही सुरु झाला. पेपर सुरु होताच परीक्षार्थी महिलेला प्रसूतीकळा सुरु झाल्या.
महाराष्ट्र टाइम्सनाशिक: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी एक दाम्पत्य नाशिकमध्ये रविवारी आले. दोघांची केंद्रे वेगळी होती. परीक्षा केंद्रात पोहोचल्यानंतर महिला परीक्षार्थीला प्रसूतीकळा सुरू झाल्या. त्यातच रक्तस्रावही झाल्याने नियतीने एकाचवेळी दोन्ही बाजूंनी ‘परीक्षा’ घेतली. पण, प्रशासकीय यंत्रणेसह पोलिसांच्या तत्परतेने सारंकाही निभावलं. त्वरित उपचारांमुळे त्या परीक्षार्थीने मुलीला जन्म दिला. युगंधरा गोरख गायकवाड (वय २६, रा. मालेगाव) यांच्या कन्येच्या जन्माची ‘परीक्षा’ सुखरूप निभावल्याचा प्रत्यय आला.
स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत अधिकारी होण्याचे स्वप्न डोळ्यांत साठवून मालेगावहून युगंधरा व पती गोरख हे रविवारी (दि. १) नाशिकमध्ये परीक्षेसाठी पोहोचले. युगंधरा यांचा कॅनडा कॉर्नर येथील व्ही. एन. नाईक महाविद्यालयात, तर गोरख यांचा रमाबाई आंबेडकर कन्या शाळेत परीक्षेचा बैठक क्रमांक होता. युगंधरा यांना परीक्षा केंद्रावर पोहोचवून गोरख त्यांच्या केंद्रावर पोहोचले. सकाळी नऊ वाजेपासून परीक्षा केंद्रात बसलेल्या युगंधरा यांना पेपर सुरू झाल्यानंतर दहा वाजेच्या सुमारास प्रसूतीकळा सुरू झाल्या. त्यातच रक्तस्रावही सुरू झाला. त्यामुळे पर्यवेक्षक आणि परीक्षार्थींची धांदल उडाली.
केंद्र प्रमुखांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यावर सरकारवाडा पोलिस ठाण्याचे हवालदार जयंत जाधव व महिला अंमलदार रोशनी भामरे यांनी धाव घेतली. दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता केंद्रावरील शासकीय वाहनातून युगंधरा यांना उपचारार्थ पंडित कॉलनीतील रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक तपासणीनंतर त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील वेद मंदिराजवळील खासगी रुग्णालयात युगंधरा यांना दाखल करण्यात आले. तेथे त्यांनी मुलीला जन्म दिला. दरम्यान, युगंधरा या गट ब वर्गातील अधिकारीपदाची परीक्षा देत होत्या. त्यांनी बीएस्सी ॲग्री पदवी संपादित केली असून, वर्षभरापूर्वीच त्यांचे लग्न झाले. प्रसूतीची माहिती मिळताच त्यांच्या आई सरला शेवाळे व कुटुंबाने रुग्णालयात धाव घेतली.
आई अन् बाळ सुखरूप
पंडित कॉलनीतील रुग्णालयात पोहोचल्यावर युगंधरा यांची तब्येत अधिक खालावली. नऊ महिने होण्यापूर्वीच प्रसूतीकळा सुरू झाल्याने शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगत डॉक्टरांनी मोठ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. अंमलदार जाधव यांनी तातडीने दुसऱ्या रुग्णालयात फोन करून घटनेची माहिती दिली. त्यामुळे दुसऱ्या रुग्णालयात युगंधरा पोहोचण्यापूर्वी त्यांच्या शस्त्रक्रियेसाठीची संपूर्ण तयारी केली होती. दरम्यान, परीक्षा केंद्रावरील यंत्रणा व दोन्ही पोलिस अंमलदारांनी तातडीने मदत केल्याने महिलेसह बाळ सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गायकवाड दाम्पत्याच्या नातलगांनीही पोलिसांनी आभार मानले.
Nashik News: MPSC च्या परीक्षेला आले अन् आई-बाबा झाले!, पेपर सुरु असतानाच महिलेला प्रसूतीकळा
युगंधरा यांना रुग्णालयात दाखल केल्यावर दोन्ही पोलिसांनी त्यांचे पती व चुलत बंधूंचा मोबाइल क्रमांक मिळवला. त्यावेळी पती गोरख हेदेखील परीक्षेसाठी नाशिकमध्ये असल्याचे समजते. मुंबईनाका पोलिसांना ‘कॉल’ देत गोरखपर्यंत निरोप पोहोचविण्यास सांगण्यात आले. मुंबईनाका पोलिसांनी रमाबाई आंबेडकर शाळेत पर्यवेक्षकांद्वारे गोरख यांना ‘गोड बातमी’ कळवली. पहिल्या सत्राचा पेपर संपताच गोरख यांनी रुग्णालय गाठून नवजात बाळासह पत्नीची भेट घेतली.
लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा
]]>https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=1108960विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश, MPSCची परीक्षा पुढे ढकलली, फडणवीसांची शिष्टाई फळाला
https://tejpolicetimes.com/?p=103027
https://tejpolicetimes.com/?p=103027#respondThu, 22 Aug 2024 07:46:51 +0000https://tejpolicetimes.com/?p=103027
पुणे : IBPS परीक्षा आणि MPSCची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात पुण्यात MPSCच्या विद्यार्थ्यांकडून आंदोलनाला मोठं यश आलं असल्याचं समोर आलं आहे. MPSCच्या आज गुरुवारी झालेल्या बैठकीत २५ ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. २५ ऑगस्ट २०२४ […]
पुणे : IBPS परीक्षा आणि MPSCची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात पुण्यात MPSCच्या विद्यार्थ्यांकडून आंदोलनाला मोठं यश आलं असल्याचं समोर आलं आहे. MPSCच्या आज गुरुवारी झालेल्या बैठकीत २५ ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेची दिनांक लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल, असं ट्वीट करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ही घोषणा करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले…
काल MPSC अध्यक्षांना मी विनंती केली होती. या विनंतीला मान देत विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांचा अत्यंत आभारी आहे.
MPSC Exam Postponed: ‘एमपीएससी’ची परीक्षा अखेर पुढे ढकलण्याचा निर्णय; पुढील तारीख कोणती?
विद्यार्थ्यांची अजून एक मागणी
लोकसेवा आयोगाने पुढे ढकलण्यात आलेल्या परिक्षेत कृषी विभागाच्या २५८ जागांचा देखील समावेश करावा. या २५८ जागांसाठी परिक्षा घेण्याचे नोटीफिकेशन काढावे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय आहे. कृषी विभागाच्या जागांबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे.
मी स्वतः आंदोलनात सहभाी होईल
दरम्यान, या आंदोलनात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सहभागी झाले होते. तर शरद पवार यांनीही राज्य सरकारला इशारा दिला होता. ”पुण्यात MPSCच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणे सरकारचे कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाही. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही. तर मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरेन”, असा इशारा शरद पवार यांनी दिला होता.
]]>https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=1030270चारवेळा लष्कर भरती परीक्षा नापास, सलून चालवत रात्रभर अभ्यास, पाचव्या प्रयत्नात मैदान मारलं
https://tejpolicetimes.com/?p=80079
https://tejpolicetimes.com/?p=80079#respondWed, 24 Jan 2024 10:33:12 +0000https://tejpolicetimes.com/?p=80079
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कजगाव येथे राहणारा निलेश नेरपकर हा एका गरीब कुटुंबात जन्माला आला. घरची परिस्थिती हलाखीची असताना जेमतेम बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. चार वेळा भारतीय लष्कराची परीक्षा नापास होऊन सुद्धा हार न मानता पाचव्या प्रयत्नात त्याने मैदान मारले.निलेश हा तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ. आई वडील यांची इच्छा नसतानाही निलेशने सैन्य […]
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कजगाव येथे राहणारा निलेश नेरपकर हा एका गरीब कुटुंबात जन्माला आला. घरची परिस्थिती हलाखीची असताना जेमतेम बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. चार वेळा भारतीय लष्कराची परीक्षा नापास होऊन सुद्धा हार न मानता पाचव्या प्रयत्नात त्याने मैदान मारले. निलेश हा तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ. आई वडील यांची इच्छा नसतानाही निलेशने सैन्य दलात भरती व्हायचे ठरवले होते. निलेशच्या आईने त्याला सैन्य दलात भरती नको होऊस, तिथे खूप हाल होतात, जेवण वेळेवर मिळत नाही, साधेसे काम कर, कुठे सैन्य दलात भरती होतोस, अशी विनवणी केली होती. परंतु जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर निलेश हा सैन्य दलात भरती झालाच.
निलेश हा अभ्यासात तसा मागे होता. कधी काळी अजिबात अभ्यास न करणारा निलेश आज सैन्य दलाची परीक्षा पास होऊन भरती झाला. निलेशशी संपर्क केला असता त्याने संगितले की, मला अभ्यास करायचा कंटाळा येत होता. मी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. मी भडगाव येथे बीएला प्रवेश घेतला, मी परीक्षा दिली आणि चार विषयात नापास झालो. बारावीनंतर नापास झाल्याने मी दोन वर्षांपूर्वी एक सलून व्यवसाय सुरू केला आणि आई वडिलांना हातभार लावू लागलो. दुकान सांभाळून मी रात्री दोन वाजेपर्यंत अभ्यास करायचो. माझी मोठी बहीण मला म्हणायची तू शाळेत असताना कधी अभ्यास केला नाही आणि काय सैन्य दलात भरती होणार आहे.
मी बारावी पास झाल्यानंतर पुन्हा बाराखडी व पाढे आणि स्पेलिंग पाठ करायला लागलो. कारण मला काहीच येत नव्हते. भडगाव येथे तीन महिन्यासाठी क्लास लावले. त्यानंतर मी स्वतः घरीच अभ्यास करू लागलो. मला माझ्या मित्रांनी प्रोत्साहन दिले आणि मी भारतीय लष्करात भरती झालो, याचा सर्वात मोठा आनंद माझ्या आई वडिलांना झाला. ज्या दिवशी मी भरती झालो, सर्वात आधी आईला फोन करून सांगितले, तुझा मुलगा देश सेवेसाठी भरती झाला आहे. आईला त्याच क्षणी डोळ्यात पाणी आले. आमच्या भाऊबंदकीमध्ये मीच पहिल्यांदा सैन्यात भरती झालो.
मित्रांनी जल्लोष केला
आपला मित्र सैन्य दलामध्ये भरती झाल्याचा आनंद मित्रांना गगनात मावेनासा झाला होता. निलेश गावात दाखल होताच त्याच्या मित्रांनी त्याला खांद्यावर उचलून डीजेच्या तालावर मिरवणूक काढून आनंद उत्सव साजरा केला.
एमपीएससी सोडून गावाला निघालो होतो, मित्रांचं ऐकून शेवटचा प्रयत्न केला आणि पोस्ट निघाली
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
]]>https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=800790एमपीएससीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २८ एप्रिलला
https://tejpolicetimes.com/?p=71792
https://tejpolicetimes.com/?p=71792#respondFri, 10 Nov 2023 13:31:40 +0000https://tejpolicetimes.com/?p=71792
MPSC Exam Timetable 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) येत्या २०२४ वर्षात होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले असून, त्यानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २८ एप्रिलला होणार आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा १४ ते १६ डिसेंबर या कालावधीत नियोजित करण्यात आल्याची माहिती एमपीएससीने दिली आहे.स्पर्धा परीक्षांची तयारी उमेदवारांना योग्य रितीने करता येण्यासाठी, […]
MPSC Exam Timetable 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) येत्या २०२४ वर्षात होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले असून, त्यानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २८ एप्रिलला होणार आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा १४ ते १६ डिसेंबर या कालावधीत नियोजित करण्यात आल्याची माहिती एमपीएससीने दिली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी उमेदवारांना योग्य रितीने करता येण्यासाठी, परीक्षांचा अंदाज येण्यासाठी एमपीएससीकडून दरवर्षी संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. त्यानुसार २०२४ मध्ये एमपीएससीतर्फे १६ परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहे. सरकारकडून संबंधित संवर्ग किंवा पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल, या गृहितकाच्या आधारे संभाव्य वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
शासनाकडून वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल परीक्षेद्वारे भरावयाच्या पदसंख्येबाबतचा तपशील अधिसूचना, जाहिरातीद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. हे वेळापत्रक संभाव्य असून त्यामध्ये बदल होऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे. असा बदल झाल्यास त्याबाबतची माहिती वेबसाइटवर देण्यात येणार असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले. त्यामध्ये महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा अशा परीक्षांचा समावेश आहे. संभाव्य वेळापत्रकात परीक्षेचे स्वरुप, जाहिरात प्रसिद्ध होण्याचा महिना नमूद करण्यात आला आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी एमपीएससीच्या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांच्या संभाव्य तारखा :
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ष पूर्व परीक्षा – १७ मार्च
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २८ एप्रिल
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त सेवा पूर्व परीक्षा – १६ जून
राज्यसेवा मुख्य परीक्षा – १४ ते १६ डिसेंबर
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – २३ नोव्हेंबर
अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा – ९ नोव्हेंबर
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा -२३ नोव्हेंबर
महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा -२३ नोव्हेंबर
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा – २८ ते ३१ डिसेंबर
]]>https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=717920MPSC New Pattern:एमपीएससी पॅटर्नला न्यायालयात आव्हान, विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती
https://tejpolicetimes.com/?p=61887
https://tejpolicetimes.com/?p=61887#respondFri, 24 Mar 2023 07:29:38 +0000https://tejpolicetimes.com/mpsc-new-pattern%e0%a4%8f%e0%a4%ae%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%8f%e0%a4%b8%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%85%e0%a4%9f%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगरराज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) दीर्घोत्तरी प्रश्नपत्रिका परीक्षा पद्धती २०२३पासून लागू करण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने संबंधित निर्णय बदलून २०२५पासून लागू करण्याचे निश्चित केले आहे. या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे आठ महिन्यांपासून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात न्या. रवींद्र घुगे व […]
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) दीर्घोत्तरी प्रश्नपत्रिका परीक्षा पद्धती २०२३पासून लागू करण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने संबंधित निर्णय बदलून २०२५पासून लागू करण्याचे निश्चित केले आहे. या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे आठ महिन्यांपासून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात न्या. रवींद्र घुगे व न्या. संजय देशमुख यांनी प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.
राज्य लोकसेवा आयोगाने स्वत:च्या नियमावलीची पायमल्ली केल्याचे याचिकेत नमूद केले आहे. आयोगाने २०२५पासून दीर्घोत्तरी पद्धती लागू करण्याचा निर्णय घाईत आणि दबावाखाली घेतला आहे. त्यामुळे आयोगाला प्रमाण मानून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यातून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, असे राज्याच्या वतीने सांगण्यात आले.
परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार नाही आणि विद्यार्थ्यांनी अशा प्रकारची मागणी केल्याचे सांगण्यात आले. यासंबंधी २४ जून २०२२ रोजी काढलेला आदेश रद्द केला. यासाठी काही राजकीय नेते व आंदोलन करणाऱ्यांच्या मागण्यांना बळी पडून २०२५पर्यंत दीर्घोत्तरी पॅटर्न पुढे ढकलण्यात आल्याचे याचिकेत म्हटले आहे. या निर्णयास दत्ता बाबुराव पौळ यांनी अॅड. अजित काळे व अॅड. भगवान साबळे यांच्या वतीने आव्हान दिले आहे. प्रकरणात नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.
एमपीएससी अंतर्गत भरती
एमपीएससीकडून ८१६९ पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. महाराष्ट्र अराजपत्रित ग्रुप बी आणि ग्रुप सी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा तपशील डाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा ३० एप्रिल २०२३ रोजी राज्यातील एकूण ३६ परीक्षा केंद्रावर होणार आहे.
एमपीएससी अंतर्गत पुढील संवर्गातील पदे भरली जाणार आहेत. यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारीची ७८, राज्य कर निरीक्षकची १५९, पोलीस उप निरीक्षकची ३७४, दुय्यम निबंधकची (मुद्रांक निरीक्षक) ४९, दुय्यम निरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क)ची ६, तांत्रिक सहाय्यकचे १, कर सहाय्यकची ४६८ आणि लिपिक टंकलेखकची ७०३४ पदांचा समावेश आहे.
सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक आणि दुय्यम निबंधक-मुद्रांक निरीक्षक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ३८ हजार ६०० ते १ लाख २२ हजार ८०० रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.
दुय्यम निरीक्ष, राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील गृह विभागासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा३२ हजार ते १ लाख १ हजार ६०० रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.
MPSC: व्हॅलेंटाईन डे हा तरुणांचा उत्साहवर्धक असा दिवस असतो. याच दिवशी अनेक तरुण-तरुणी आपल्या आयुष्याची स्वप्ने रंगवत असतात. एमपीएससी करणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अचानक परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तब्बल आठवडाभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे एमपीएससीने तरुणांसाठी दिलेलं हे खास गिफ्ट असल्याची समाज माध्यमावर सध्या चर्चा सुरू आहे.७ […]
MPSC: व्हॅलेंटाईन डे हा तरुणांचा उत्साहवर्धक असा दिवस असतो. याच दिवशी अनेक तरुण-तरुणी आपल्या आयुष्याची स्वप्ने रंगवत असतात. एमपीएससी करणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अचानक परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तब्बल आठवडाभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे एमपीएससीने तरुणांसाठी दिलेलं हे खास गिफ्ट असल्याची समाज माध्यमावर सध्या चर्चा सुरू आहे. ७ फेब्रुवारीपासून तर १४ फेब्रुवारीपर्यंत सध्या देशभरात व्हॅलेंटाईन डे विक मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज शेवटचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे आणि याच दिवशी आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त सेवा परीक्षेसाठी मुदतवाढ जाहीर करण्यात आल्याची सूचना काढण्यात आली.
दिनांक २० जानेवारी रोजी संयुक्त सेवा परीक्षा म्हणजेच कम्बाईनसाठी जाहिरात काढण्यात आली होती. परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख १४ फेब्रुवारी होती. दरम्यान आज अचानक आयोगाने परीक्षा फॉर्म भरण्यासाठी २१ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ दिली आहे. आज व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे आयोगाने विद्यार्थ्यांना हे गिफ्ट दिलं असल्याची समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
एका व्हायरल मजेशीर पोस्टमध्ये असे म्हटले आहे की ‘अभ्यासू पोरं व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात बिझी असल्यामुळे आयोगाने मुदतवाढ दिली आहे, तरी सर्वांनी व्हॅलेंटाईन डे साजरा करून झाल्यावर संधीचा लाभ घ्यावा’ अशा प्रकारचे अनेक मिम्स समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. आजच्या दिवशी आयोगाने मुदतवाढ दिल्याने हे गिफ्ट तर नव्हे ना? अशा गप्पा सुरू आहेत.
]]>https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=606670मराठा उमेदवारांना ‘ईडब्ल्यूएस’ संधी नाही; सरकारी नोकर भरतीकडे डोळे लावून बसलेल्यांना धक्का
https://tejpolicetimes.com/?p=59323
https://tejpolicetimes.com/?p=59323#respondFri, 03 Feb 2023 04:23:36 +0000https://tejpolicetimes.com/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%89%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%a6%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%88%e0%a4%a1%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b2/
मुंबई : ‘सरकारी नोकर भरतीत मराठा उमेदवारांना पूर्वी मराठा आरक्षण कायद्यांतर्गत जागा राखीव करून संधी दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्या कायद्याला स्थगिती दिली आणि नंतर तो कायदा रद्द केला म्हणून त्या उमेदवारांना भरती प्रक्रियेच्या मध्यातच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या (ईडब्ल्यूएस) आरक्षणाची संधी पूर्वलक्ष्यी प्रभावाने खुली करण्याचा राज्य सरकारचा निर्णय बेकायदा आहे’, असा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने […]
मुंबई : ‘सरकारी नोकर भरतीत मराठा उमेदवारांना पूर्वी मराठा आरक्षण कायद्यांतर्गत जागा राखीव करून संधी दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्या कायद्याला स्थगिती दिली आणि नंतर तो कायदा रद्द केला म्हणून त्या उमेदवारांना भरती प्रक्रियेच्या मध्यातच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या (ईडब्ल्यूएस) आरक्षणाची संधी पूर्वलक्ष्यी प्रभावाने खुली करण्याचा राज्य सरकारचा निर्णय बेकायदा आहे’, असा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) गुरुवारी दिला. मात्र, त्याचवेळी ‘भविष्यातील सरकारी नोकर भरतींमध्ये मराठा समाजातील पात्र उमेदवारांना राज्यघटनेच्या अनुच्छेद १४, १६(४) व १६(६) अन्वये असलेल्या तरतुदींप्रमाणे ईडब्ल्यूएसचे आरक्षण खुले असायलाच हवे’, असेही ‘मॅट’च्या अध्यक्ष न्या. मृदुला भाटकर व सदस्य मेधा गाडगीळ यांच्या खंडपीठाने आपल्या ६० पानी निर्णयात स्पष्ट केले.
सार्वजनिक बांधकाम विभागातील १११ पदे, वन विभागातील दहा पदे व राज्य कर विभागातील १३ पदे अशा एकूण १३४ पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) सन २०१९मध्ये जाहिराती देऊन निवड प्रक्रिया केली होती. त्यात मराठा उमेदवारांनी मराठा आरक्षणाखाली अर्ज केले होते, तर ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी पात्र उमेदवारांनी त्याअंतर्गत अर्ज केले होते. ‘या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा व मुलाखती होऊन निवड प्रक्रिया पूर्ण झालेली असतानाही मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर २०२० रोजी स्थगिती दिल्यामुळे राज्य सरकारने मराठा उमेदवारांना २३ डिसेंबर २०२०च्या जीआरद्वारे पूर्वलक्ष्यी प्रभावाने ईडब्ल्यूएस आरक्षणांतर्गत संधी खुली केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा ५ मे २०२१ रोजी रद्दबातल ठरवले असतानाही राज्य सरकारने ३१ मे २०२१च्या जीआरद्वारे मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएसचा पर्याय घेण्याची मुभा दिली. हे दोन्ही निर्णय बेकायदा व मनमानी आहेत’, असा दावा करत ‘ईडब्ल्यूएस’ गटातील अनेक उमेदवारांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते, सबिहा अन्सारी, सय्यद तौसिफ यासीन यांच्यामार्फत आक्षेप घेतला होता. गांधीभूमीत आजपासून ९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; मात्र वादांची परंपराही कायम
‘यापूर्वी महावितरणच्या भरती प्रक्रियेत मुंबई उच्च न्यायालयाने याच मुद्द्यावरील याचिकांवर निर्णय देताना राज्य सरकारचा निर्णय मनमानी व बेकायदा असून ईडब्ल्यूएस आरक्षणाने आधीच हक्क निर्माण झालेल्या ईडब्ल्यूएस गटातील उमेदवारांचे नुकसान करणारा असल्याचा निर्णय दिला आहे. त्याविरोधातील अपीलही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले आहे’, असेही ‘मॅट’च्या खंडपीठाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले. तसेच ‘सरकारचा २३ डिसेंबर २०२०चा जीआर हा आपल्याच १२ फेब्रुवारी २०१९ व २८ जुलै २०२० या दोन्ही तारखांच्या जीआरशी विसंगत आहे. निवड प्रक्रियेत अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होऊन ती नावे एमपीएससीने सरकारला कळवली असताना अचानक मध्येच मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएस आरक्षणाची संधी खुली केल्याने गुणवत्ता यादीत आधी निवड झालेले उमेदवार मागे पडले. आता त्या ईडब्ल्यूएस उमेदवारांना सुपरन्युमररी पदे देऊ करण्याचा सरकारचा निर्णयही बेकायदा आहे. सुपरन्युमररी पदे द्यायचीच असतील तर ती मराठा आरक्षण गटातून ईडब्ल्यूएस गटात आलेल्यांना द्यायला हवी. त्यामुळे मूळ गुणवत्ता यादीप्रमाणेच ईडब्ल्यूएस उमेदवारांच्या नावांच्या शिफारशीचा सरकारने विचार करावा. ईडब्ल्यूएस उमेदवारांच्या मूळ गुणवत्ता यादीप्रमाणेच अंतिम निवड यादी तयार करून एमपीएससीने चार आठवड्यांच्या आत सरकारला शिफारस करावी. ईडब्ल्यूएस उमेदवारांची निवड यादी वगळता अन्य निवड याद्यांना कोणतीही आडकाठी नसेल’, असे ‘मॅट’ने आदेशात स्पष्ट केले. तसेच सरकारचा २३ डिसेंबर २०२०चा जीआर बेकायदा ठरवून रद्दबातल ठरवला. विशेष म्हणजे, महावितरणसह सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग आणि राज्य कर विभागातील भरती प्रक्रिया साधारण एकाच कालावधीत झाली होती. मात्र त्यावेळी महावितरणच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.