लॅपटॉपचे सर्व फीचर्स
या लॅपटॉपमध्ये 15.6 इंचाचा 4k डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे पिक्सल रिजोल्यूशन 1920 x 216 आहे. या लॅपटॉपमध्ये 13th Gen Intel Core i7 प्रोसेसर देण्यात आला आहे. लॅपटॉप NVIDIA GeForce RTX 4050 GPU सह येतो. व्हिडीओ कॉलिंगसाठी लॅपटॉपमध्ये USB HD कॅमेरा देण्यात आला आहे. यात बिल्ट-इन HD वेबकॅम मिळतो. या डिव्हाइसमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी HDMI 2.1 port, USB Type-C port with Thunderbolt 4 आणि Wi-Fi 6 चा समावेश करण्यात आला आहे.Lenovo Legion Tab: लेनोवो लीजन टॅब भारतात लाँच; 6,550mAh बॅटरी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
एसरनं म्हटलं आहे की नवीन अस्पायर 3डी 15 स्पॅशियललॅब्स एडिशन लॅपटॉपमध्ये डिस्प्लेवर ऑप्टिकल लेन्स देण्यात आली आहे. सेन्सर आय ट्रॅकिंग टेक्नॉलॉजी आणि रियल टाइम रेंडरिंगच्या मदतीनं स्टीरियोस्कोपिक 3D डिस्प्ले टेक्नॉलॉजी युजर्सना एक अशी सिस्टम देते जिथे फोटोज युजर्सच्या डोळ्यांच्या हरकतीनुसार बदलतात. अस्पायर 3डी 15 स्पॅशियललॅब्स मॉडेल व्यूअरसह क्विक 3डी व्ह्यू मिळतो. तसेच, रियल 3डी गेमिंग एक्पीरियंससाठी एसरनं म्हटलं आहे की लॅपटॉप अॅडव्हान्स अॅप्लिकेशन सोल्युशन आणि नेक्स्ट जेनरेशन शेडर टेक्नॉलॉजीचा वापर करतो. या लॅपटॉपमध्ये आणखी अनेक शानदार फीचर्स देण्यात आले आहेत.
नवीन एसर लॅपटॉपची किंमत
एसर अस्पायर 3डी 15 स्पॅशियललॅब्स लॅपटॉपची किंमत 1,49,999 रुपयांपासून सुरु होते. याची विक्री रिटेल स्टोर्सच्या माध्यमातून सुरु झाली आहे. त्यामुळे याची गणना प्रीमियम लॅपटॉपच्या कॅटेगरीमध्ये करता येईल. या सेक्शनमध्ये आधीच बरंच कॉम्पिटिशन आहे परंतु या लॅपटॉपच्या युनिक फीचर्सच्या जोरावर हा आपले स्थान निर्माण करू शकतो का ते पाहावं लागेल.