Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
छगन भुजबळ - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Tue, 03 Dec 2024 11:24:01 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg छगन भुजबळ - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्याचं कारण समोर; शिंदेंचं टेन्शन वाढणार, भुजबळांनी ‘हिशोब’ काढला https://tejpolicetimes.com/?p=111078 https://tejpolicetimes.com/?p=111078#respond Tue, 03 Dec 2024 11:24:01 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111078 अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्याचं कारण समोर; शिंदेंचं टेन्शन वाढणार, भुजबळांनी ‘हिशोब’ काढला

Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत नेत्रदीपक विजय मिळवणाऱ्या महायुतीनं सत्ता स्थापनेची तयारी सुरु केलेली आहे. त्यासाठी बैठकांचं सत्र सुरु आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस राज्यातच असताना अजित पवार मात्र दिल्लीत पोहोचले आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: विधानसभा निवडणुकीत नेत्रदीपक विजय मिळवणाऱ्या महायुतीची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. त्यासाठी बैठकांचं सत्र सुरु आहे. काळजीवाहू […]

The post अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्याचं कारण समोर; शिंदेंचं टेन्शन वाढणार, भुजबळांनी ‘हिशोब’ काढला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्याचं कारण समोर; शिंदेंचं टेन्शन वाढणार, भुजबळांनी ‘हिशोब’ काढला

Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत नेत्रदीपक विजय मिळवणाऱ्या महायुतीनं सत्ता स्थापनेची तयारी सुरु केलेली आहे. त्यासाठी बैठकांचं सत्र सुरु आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस राज्यातच असताना अजित पवार मात्र दिल्लीत पोहोचले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: विधानसभा निवडणुकीत नेत्रदीपक विजय मिळवणाऱ्या महायुतीची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. त्यासाठी बैठकांचं सत्र सुरु आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस राज्यातच असताना अजित पवार मात्र दिल्लीत पोहोचले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीसाठी अजित पवार दिल्लीला पोहोचल्याचं समजतं.

राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेटच्या आधारावर मंत्रिपदं वाढवून हवी आहेत. त्यासाठीच अजित पवार दिल्लीला शहांच्या भेटीसाठी गेले आहेत. पण अद्याप तरी त्यांची भेट झालेली नाही. महायुतीच्या नव्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेइतकीच खाती मिळावीत यासाठी पक्ष आग्रही आहे. हीच बाब अजित पवार शहांना सांगणार आहेत.
Chandrakant Patil: एकच दादा, बाकींना वादा? चंद्रकांत पाटलांमुळे भाजप आमदारांची धाकधूक वाढली, कारण काय?
विधानसभा निवडणुकीत आमचा स्ट्राईक रेट चांगला राहिला आहे. त्यामुळे आम्हाला अधिकची मंत्रिपदं देण्यात यावीत, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रसेचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सविस्तर भाष्य केलं. ‘अजितदादांच्या अध्यक्षतेखाली आमची बैठक झाली. त्यात आम्ही लढवलेल्या आणि जिंकलेल्या जागांचा हिशोब केला. शिवसेनेला जास्त जागा लढवायला मिळाल्या, त्यामुळे त्यांचे जास्त उमेदवार निवडून आले. आम्हाला त्या मानानं फार कमी जागा मिळाल्या. त्यामुळे आमचे कमी उमेदवार निवडून आले. पण स्ट्राईक रेटच्या बाबतीत आमच्यात भाजप १ नंबरला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या, तर शिवसेना तिसऱ्या स्थानी आहे,’ असं भुजबळ म्हणाले.
Eknath Shinde: मी तुमच्या जागी असतो तर…; उप होण्यासाठी शिंदेंना ‘वरुन’ आग्रह; परिणामांची दिली कल्पना
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ५७, तर राष्ट्रवादीचे ४१ उमेदवार विजयी झाले. नव्या सरकारमध्ये शिवसेनेला १२ ते १३ मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला ८ ते ९ मंत्रिपदं मिळू शकतात. पण राष्ट्रवादीला आता स्ट्राईक रेटच्या आधारे अधिकची मंत्रिपदं हवी आहेत. एकनाथ शिंदे बैठकांपासून दूर राहत त्यांची बार्गेनिंग पॉवर कायम ठेवत असताना आता राष्ट्रवादीनं अधिकच्या मंत्रिपदासाठी व्यूहरचना आखली आहे. भाजप शिवसेनेला गृहमंत्रिपद सोडण्यास तयार नाही. त्यामुळे सेनेकडून अर्थमंत्रिपदाची मागणी होऊ शकते. हीच शक्यता विचारात घेऊन अजित पवारांनी दिल्ली गाठली आहे.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्याचं कारण समोर; शिंदेंचं टेन्शन वाढणार, भुजबळांनी ‘हिशोब’ काढला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111078 0
पोलीस विकले गेलेत! निकालापूर्वी भुजबळांचा प्रचंड संताप; सरकारला घरचा आहेर, प्रकरण काय? https://tejpolicetimes.com/?p=109738 https://tejpolicetimes.com/?p=109738#respond Fri, 22 Nov 2024 15:36:01 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109738 पोलीस विकले गेलेत! निकालापूर्वी भुजबळांचा प्रचंड संताप; सरकारला घरचा आहेर, प्रकरण काय?

Chhagan Bhujbal: विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आता अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. महायुती सत्ता टिकवणार की महाविकास आघाडी सत्तांतर घडवणार याकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम नाशिक: विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आता अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. महायुती सत्ता टिकवणार की महाविकास आघाडी सत्तांतर घडवणार याकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे. […]

The post पोलीस विकले गेलेत! निकालापूर्वी भुजबळांचा प्रचंड संताप; सरकारला घरचा आहेर, प्रकरण काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पोलीस विकले गेलेत! निकालापूर्वी भुजबळांचा प्रचंड संताप; सरकारला घरचा आहेर, प्रकरण काय?

Chhagan Bhujbal: विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आता अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. महायुती सत्ता टिकवणार की महाविकास आघाडी सत्तांतर घडवणार याकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नाशिक: विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आता अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. महायुती सत्ता टिकवणार की महाविकास आघाडी सत्तांतर घडवणार याकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे. गेल्या पाच वर्षांत घडलेल्या अभूतपूर्व घटना पाहता मतदारांचा कौल कोणाला मिळणार ते पाहणं औत्सुक्याचं असेल. निकालाच्या पूर्वसंध्येला मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. पोलीस विकले गेल्याचा, ते दबावाखाली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भुजबळांचा आरोप सरकारसाठी घरचा आहेर मानला जात आहे.

छगन भुजबळ यांनी मतमोजणीच्या पूर्वसंध्येला मनमाडला भेट दिली. निकाल काय लागू शकतो याबद्दल त्यांची कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. नांदगावात दोन दिवसांपूर्वी, मतदानाच्या दिवशी शिवसेना आमदार सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. कांदे यांनी तर आज तुझा मर्डर फिक्स म्हणत भुजबळांना थेट धमकी दिली. कांदे, भुजबळ यांच्यात झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली. यानंतर आता भुजबळांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.
Maharashtra Election 2024 Exit Poll: महायुती ११२, मविआ १०४ अन् तब्बल ६१ जागा…; नव्या एक्झिट पोलनं सत्ताधारी, विरोधकांना धडकी
पोलीस प्रेशरखाली आहेत आणि विकले गेलेले आहेत. अनेक कार्यकर्त्यांच्या घरी, काऊंटिंग एजंटच्या घरी जाऊन पोलीस चौकशी करत आहेत. पोलिसांना काय करायचंय? त्यांनी काऊंटिंग एजंट म्हणून उद्या जायचंय की नाही, ते तरी पोलिसांनी सांगावं. पोलिसांनी पोलिसांचा धर्म पाळावा. २४ तास तर असे निघून जातील. काऊंटिंगला जाणाऱ्या एजंट्सना पोलिसांनी त्रास देऊ नये, असं भुजबळ माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
Maharashtra Election 2024: निकालाआधी धमाका, सर्वात हॉट मतदारसंघात ठाकरेंचा भाजपला धक्का; महत्त्वाचा नेता शिवबंधनात
येवल्याच्या निकालाची चिंता वाटत नाही. तिथून मी ६० ते ७० हजारांच्या फरकानं विजयी होईन, असा विश्वास भुजबळांनी बोलून दाखवला. ‘मी नांदगावात समीर भुजबळांची भेट घेतली. त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना धमक्या देण्यात आल्या आहेत. मतदान प्रतिनिधींची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. अनेकांना मारहाण केली जात आहे. कार्यकर्ते डोळ्यांत अश्रू आणून त्यांची आपबिती सांगत आहेत. पोलीस प्रेशरखाली आहेत. ते विकले गेले आहेत,’ अशा शब्दांत भुजबळांनी त्यांचा संताप व्यक्त केला.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post पोलीस विकले गेलेत! निकालापूर्वी भुजबळांचा प्रचंड संताप; सरकारला घरचा आहेर, प्रकरण काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109738 0
भुजबळ, मुंडे, वळसे मतदारसंघातच अडकले; पुण्यात १२ जागांवर अजित पवारांची पळापळ https://tejpolicetimes.com/?p=109270 https://tejpolicetimes.com/?p=109270#respond Tue, 19 Nov 2024 04:16:12 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109270 भुजबळ, मुंडे, वळसे मतदारसंघातच अडकले; पुण्यात १२ जागांवर अजित पवारांची पळापळ

Maharashtra Election : छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना मंतदारसंघातच अडकून पडावे लागले. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी सर्व ठिकाणी सभा घेऊन नेहमीप्रमाणे प्रचाराची सांगता बारामतीमध्ये केली. महाराष्ट्र टाइम्सअजित पवार मुस्तफा आतार, पुणे : मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार बाहेर पडले आणि पक्ष व चिन्ह […]

The post भुजबळ, मुंडे, वळसे मतदारसंघातच अडकले; पुण्यात १२ जागांवर अजित पवारांची पळापळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
भुजबळ, मुंडे, वळसे मतदारसंघातच अडकले; पुण्यात १२ जागांवर अजित पवारांची पळापळ

Maharashtra Election : छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना मंतदारसंघातच अडकून पडावे लागले. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी सर्व ठिकाणी सभा घेऊन नेहमीप्रमाणे प्रचाराची सांगता बारामतीमध्ये केली.

महाराष्ट्र टाइम्स
अजित पवार

मुस्तफा आतार, पुणे : मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार बाहेर पडले आणि पक्ष व चिन्ह घेऊन ते यंदा पहिल्यांदाच स्वतंत्रपणे विधानसभेला सामोरे जात आहेत. या कालावधीत त्यांनी पक्षाध्यक्ष म्हणून एकट्याने किल्ला लढविला असून, जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी सर्व ठिकाणी सभा घेऊन नेहमीप्रमाणे प्रचाराची सांगता बारामतीमध्ये केली. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना मंतदारसंघातच अडकून पडावे लागले.

महायुतीत सत्तेत सहभागी झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या गटाला चांगलाच धक्का बसला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला ५८ जागांवर उमेदवार उभे करण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी ‘स्टार प्रचारक’ म्हणून अजित पवार यांनाच पळावे लागले. स्वतःच्या मतदारसंघात प्रचाराच्या शुभारंभाची सभा झाल्यानंतर अजित पवार यांना सर्व ठिकाणी फिरावे लागले.
Documents for Voting : मतदार यादीत नाव कसं शोधावं? कोणती १२ ओळखपत्र मतदानाला चालणार? सात मुद्दे वाचायलाच हवेत
अजित पवार यांच्या स्थानिक स्तरावरील पक्षाच्या यंत्रणेने मात्र झोकून देत काम केले. स्थानिक सर्व आमदारांनी त्यांची सर्व शक्ती पणाला लावली; तसेच काही ठिकाणी महायुतीतील इतर घटक पक्षांनी हरतऱ्हेची मदत केली. पुणे जिल्ह्यातील शिरूर वगळता इतर सर्व ठिकाणचे आमदार अजित पवार यांच्यासोबतच राहिल्याने सर्वांनीच तगडी प्रचार यंत्रणा राबवत कुठेही कमी पडणार नाही, याची काळजी घेतली.

Ajit Pawar : भुजबळ, मुंडे, वळसे मतदारसंघातच अडकले; पुण्यात १२ जागांवर अजित पवारांची पळापळ, दादांची रणनीती काय?

दादाच ठरले स्टार प्रचारक

गेल्या वेळी विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी एकत्रित असताना प्रचारासाठी अजित पवार यांच्यासह शरद पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, जयंत पाटील आदी नेते सभा घेत होते. मात्र, उमेदवारांसाठी जिल्ह्यात दादांशिवाय खासदार सुनेत्रा पवार, अमोल मिटकरी, पार्थ पवार, जय पवार, तसेच रुपाली चाकणकर यांच्याशिवाय अन्य नेते फिरकू शकले नाहीत. मुंडे, भुजबळ यासारखी मुलुखमैदानी तोफ असलेल्या नेत्यांना त्यांच्याच मतदारसंघात अडकून ठेवण्यात विरोधकांना यश आले आहे.
Nashik News : काट्या मारुती चौकात काही जण पैसे वाटतायत, प्रचार संपताच पोलिसांना टिप, मिट्ट काळोखात धाड मारली, अन्…
‘राष्ट्रवादी’चे पुणे जिल्ह्यातील २०२४ मधील उमेदवार – १२
मतदारसंघ – बारामती, इंदापूर, शिरूर, जुन्नर, आंबेगाव, पिपरी, वडगाव शेरी, हडपसर, खेड, मावळ, भोर, पुरंदर
विद्यमान आमदार – पक्षफुटीपूर्वी १०. तर पक्षफुटीनंतर नऊ

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

The post भुजबळ, मुंडे, वळसे मतदारसंघातच अडकले; पुण्यात १२ जागांवर अजित पवारांची पळापळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109270 0
आमच्याशी लढा, घरातील महिलांवर आरोप नकोत, सुप्रिया सुळे फडणवीसांवर भडकल्या https://tejpolicetimes.com/?p=107793 https://tejpolicetimes.com/?p=107793#respond Fri, 08 Nov 2024 06:16:39 +0000 https://tejpolicetimes.com/?p=107793 आमच्याशी लढा, घरातील महिलांवर आरोप नकोत, सुप्रिया सुळे फडणवीसांवर भडकल्या

Supriya Sule Slams Devendra Fadnavis: राजदीप सरदेसाई यांच्या एका पुस्तकाने महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप आला आहे. यामध्ये अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. यात भाजपने कशा प्रकारे पक्ष फोडले, याचाही उल्लेख करण्यात आला आहे. हायलाइट्स: राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात मोठे दावे सुप्रिया सुळे देवेंद्र फडणवीसांवर भडकल्या सुनेत्रा पवारांचं नाव आल्याने सुप्रिया सुळेंचा संताप महाराष्ट्र टाइम्स.कॉम पुणे: […]

The post आमच्याशी लढा, घरातील महिलांवर आरोप नकोत, सुप्रिया सुळे फडणवीसांवर भडकल्या first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आमच्याशी लढा, घरातील महिलांवर आरोप नकोत, सुप्रिया सुळे फडणवीसांवर भडकल्या

Supriya Sule Slams Devendra Fadnavis: राजदीप सरदेसाई यांच्या एका पुस्तकाने महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप आला आहे. यामध्ये अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. यात भाजपने कशा प्रकारे पक्ष फोडले, याचाही उल्लेख करण्यात आला आहे.

हायलाइट्स:

  • राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात मोठे दावे
  • सुप्रिया सुळे देवेंद्र फडणवीसांवर भडकल्या
  • सुनेत्रा पवारांचं नाव आल्याने सुप्रिया सुळेंचा संताप
महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुणे: २०२४: द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया पुस्तकाने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या पुस्तकात अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. यावर आता सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलीच आगपाखड केली. यावेळी सुप्रिया सुळे चांगल्याच संतापलेल्या पाहायला मिळाल्या. या पुस्तकात अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. त्यावरुन सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना ऐकवलं आहे. त्यांनी पत्रकारांशी बोलताना वृत्तपत्रात आलेल्या या पुस्तकाच्या बातमीचा उल्लेख करत सांगितलं की, राजदीप सरदेसाई यांनी हे पुस्तक लिहिलंय, त्यात एक मोठा दावा केला आहे. हा एक गंभीर विषय आहे, ज्याबद्दल मी नेहमी बोलत आली आहे. यंत्रणांचा वापर करुन विरोधा पक्ष फोडणे, घरं फोडणे हे पाप आणि असंवैधानिक गोष्टी सातत्याने अदृश्य शक्ती करत आहेत. हे मी वारंवार बोलते आहे.
Sanjay Raut : योगींना चार भाऊ पण ४० वर्षात एकत्र आले नाहीत, वडिलांच्या अंत्यविधींना गेले नाहीत, तिथेही बटेंगे; संजय राऊत यांचा हल्लाबोल
कश्मीर-कन्याकुमारी ९५ टक्के केसेस ईडी, आयटी आणि सीबीआयच्या विरोधी पक्षावर आहेत. त्याचा उल्लेख या पुस्तकात केला आहे. ज्या लोकांवर आरोप केलेत त्याच लोकांना वॉशिंग मशीनमध्ये टाकून भाजप सत्त स्थापन करते, हे या पुस्तकातही म्हटलं गेलं आहे.

या पुस्तकात अनेक गोष्टी आहेत. मला दु:ख एकाच गोष्टीचं झालं. यात पुरुषांचा उल्लेख झाला, पण त्यात महिलांचाही उल्लेख झाला. अदृश्य शक्ती ही फक्त पुरुषांच्याच नाही तर महिलांच्याही मागे आहे. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे माझ्या तीन बहिणींवर आयटीची रेड. पाच दिवस ही रेड चालली. रजनी इंदुलकर, मीता पाटील आणि विजया पाटील या तिघींच्या घरी रेड टाकली.

छगन भुजबळ, संजय राऊत, नबाव मलिक, अनिल देशमुख यांचे कुटुंब कशातून गेले हे मला माहिती आहे. मला फडणवीसांना विचारायचं आहे की, जेव्हा आर आर पाटलांवर आरोप झाले त्या फाइलवरील फायनल इन्क्वायरी कोणी लावली. तर ती फडणवीसांनीच लावली. त्यांची मुख्यमंत्री म्हणून सही आहे. त्याच केसमध्ये, त्याच फाइलवर ज्यांच्या विरोधात फडणवीस होते, त्या अजित पवारांना बोलावून ती फाइल दाखवली. हा गुन्हा आहे, त्यांच्यावर खटला भरला पाहिजे. त्यांनी राज्याला फसवलं आहे.

फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना ज्यांच्यावर आरोप केले. ज्यांच्यावर चौकशी सुरु केली, मुख्यमंत्री असताना चौकशी सुरु केली. मग त्यांना घरी बोलावून घेतलं. एकतर फाइल घरी आणली कशी, आणली तर ज्यांच्यावर आरोप केले त्यांना दाखवली कशी याची उत्तरं फडणवीसांना द्यावं लागेल.

Supriya Sule: सरदेसाईंच्या पुस्तकाने भूकंप; सुनेत्रा पवारांचं नाव कशाला, सुप्रिया सुळे भडकल्या, फडणवीसांवर आगपाखड

या पुस्तकात सुनेत्रा पवारांचंही नाव आहे. यात सुनेत्रा पवारांचं नाव आणायची काय गरज होती. यात महिलांना का आणताय. तुमची लढाई राजकीय आहे तर आमच्याशी लढा आमच्या घरातील महिलांवर का आरोप करताय. आमच्या घरातल्या महिलांवर हल्ले करताय, असं म्हणत सुप्रिया सुळे चांगल्याच संतापलेल्या दिसल्या.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

The post आमच्याशी लढा, घरातील महिलांवर आरोप नकोत, सुप्रिया सुळे फडणवीसांवर भडकल्या first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=107793 0
खोला ते! शिंदेंचा आमदार खोका घेऊन जरांगेंच्या भेटीला; पाटलांनी लगेच उघडायला लावला अन् मग… https://tejpolicetimes.com/?p=107107 https://tejpolicetimes.com/?p=107107#respond Sat, 02 Nov 2024 11:00:21 +0000 https://tejpolicetimes.com/?p=107107 खोला ते! शिंदेंचा आमदार खोका घेऊन जरांगेंच्या भेटीला; पाटलांनी लगेच उघडायला लावला अन् मग…

Manoj Jarange Patil: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना सेनेचे आमदार सुहास कांदे अंतरवाली सराटीत पोहोचले. तिथे त्यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. महाराष्ट्र टाइम्स.कॉम जालना: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांचे दोन विरोधक भेटले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि शिंदेसेनेचे आमदार सुहास कांदे यांची अंतरवाली […]

The post खोला ते! शिंदेंचा आमदार खोका घेऊन जरांगेंच्या भेटीला; पाटलांनी लगेच उघडायला लावला अन् मग… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
खोला ते! शिंदेंचा आमदार खोका घेऊन जरांगेंच्या भेटीला; पाटलांनी लगेच उघडायला लावला अन् मग…

Manoj Jarange Patil: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना सेनेचे आमदार सुहास कांदे अंतरवाली सराटीत पोहोचले. तिथे त्यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

जालना: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांचे दोन विरोधक भेटले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि शिंदेसेनेचे आमदार सुहास कांदे यांची अंतरवाली सराटीत भेट झाली. या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जरांगेंची भेट घेताना कांदेंनी जरांगेंना एक महागडा बॉक्स दिला. जरांगे यांनी कांदेंना तो खोका तातडीनं उघडायला लावला.

आमदार असलेल्या सुहास कांदे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा उमेदवारी दिली आहे. पण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी बंडखोरी केल्यानं कांदे अडचणीत आले आहेत. समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदांचा राजीनामा देत अपक्ष अर्ज भरला आहे. त्यांच्या उमेदवारीनं कांदे यांची गोची झालेली आहे. त्यातच सुहास कांदे नावाचा अपक्ष उमेदवार रिंगणात आल्यानं शिंदेसेनेच्या आमदाराच्या समस्यांमध्ये भर पडली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर कांदेंनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचा भेट घेतली.
Ajit Pawar: दादांनी किस्सा सांगितला; फडणवीस, मोदींसह संपूर्ण भाजप गोत्यात; सेल्फ गोल्फनं आयतं कोलीत
भुजबळांचे दोन कट्टकर विरोधक भेटत असल्यानं कांदे आणि जरांगेंची भेट चर्चेत राहिली. कांदे यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी जरांगे यांना नमस्कार केला. त्यानंतर कांदेंनी त्यांच्या खांद्यावर भगवी शाल देत सत्कार केला. मग पुष्पगुच्छ देण्यात आला. सर्वात शेवटी कांदे जरांगेंना एक खोका द्यायला गेले. हा खोका सर्वात लक्षवेधी ठरला. खोका पाहताच जरांगेंनी हात जोडले. त्यांनी तो नाकारला.
Maharashtra Election 2024: कोणाचं सरकार येणार? ७५ जागा सत्ताकारणाचा फैसला करणार; CMपदाचा विषयही मार्गी लागणार
हारतुरे, सत्कार सन्मान झाल्यावर जरांगेंनी खोक्याकडे पाहत खोला ते म्हटलं. त्यानंतर कांदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून तो खोका उघडला. कांदेंनी आणलेला खोका महागडा दिसत होता. तो उघडण्यात आला, तेव्हा त्यात ड्रायफुट्स होते. ते पाहून जरांगे यांच्यासह सगळेच उपस्थित हसले. यानंतर जरांगे आणि कांदे शेजारी बसले. त्यांच्यात काही वेळ चर्चा झाली.

Manoj Jarange Patil: खोला ते! शिंदेंचा आमदार खोका घेऊन जरांगेंच्या भेटीला; पाटलांनी लगेच उघडायला लावला अन् मग…

२०१९ मध्ये सुहास कांदेंनी सेनेच्या तिकिटावर लढताना राष्ट्रवादीच्या समीर भुजबळांचा पराभव केला होता. आता महायुतीकडून शिंदेसेनेचे सुहास कांदे, ठाकरेसेनेकडून हेमंत धात्रक मैदानात आहेत. तर समीर भुजबळ अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. विशेष म्हणजे हे तिघेही ओबीसी समुदायातून येतात. त्यामुळे ओबीसी मतांची फाटाफूट होणार आहे. अशा परिस्थितीत मराठा मतं निर्णायक ठरतील. त्यांचीच जुळवाजुळव करण्यासाठी कांदेंनी जरांगेंची भेट घेतली का, अशी चर्चा रंगली आहे.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post खोला ते! शिंदेंचा आमदार खोका घेऊन जरांगेंच्या भेटीला; पाटलांनी लगेच उघडायला लावला अन् मग… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=107107 0
भडकले कांदे, महायुतीचे वांदे; नाशकात ठिणगी, शिंदेंचा आमदार भुजबळांना नडणार, २ जागांवर लढणार https://tejpolicetimes.com/?p=106090 https://tejpolicetimes.com/?p=106090#respond Fri, 25 Oct 2024 15:31:34 +0000 https://tejpolicetimes.com/?p=106090 भडकले कांदे, महायुतीचे वांदे; नाशकात ठिणगी, शिंदेंचा आमदार भुजबळांना नडणार, २ जागांवर लढणार

लोकसभा निवडणुकीसारख्याच घडामोडी महायुतीत पुन्हा एकदा घडू लागल्या आहेत. नाशिकमध्ये महायुतीत ठिणगी पडलेली आहे. कांदे विरुद्ध भुजबळ असा वाद उफाळून आलेला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉमछगन भुजबळ, एकनाथ शिंदे, सुहास शिंदे नाशिक: लोकसभा निवडणुकीत नाशिकच्या जागेवरुन महायुतीमध्ये कित्येक दिवस चर्चेचं गुऱ्हाळ सुरु होतं. राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ नाशिकची जागा लढण्यास उत्सुक होते. पण विद्यमान खासदार शिंदेसेनेचा असल्यानं […]

The post भडकले कांदे, महायुतीचे वांदे; नाशकात ठिणगी, शिंदेंचा आमदार भुजबळांना नडणार, २ जागांवर लढणार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
भडकले कांदे, महायुतीचे वांदे; नाशकात ठिणगी, शिंदेंचा आमदार भुजबळांना नडणार, २ जागांवर लढणार

लोकसभा निवडणुकीसारख्याच घडामोडी महायुतीत पुन्हा एकदा घडू लागल्या आहेत. नाशिकमध्ये महायुतीत ठिणगी पडलेली आहे. कांदे विरुद्ध भुजबळ असा वाद उफाळून आलेला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, सुहास शिंदे

नाशिक: लोकसभा निवडणुकीत नाशिकच्या जागेवरुन महायुतीमध्ये कित्येक दिवस चर्चेचं गुऱ्हाळ सुरु होतं. राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ नाशिकची जागा लढण्यास उत्सुक होते. पण विद्यमान खासदार शिंदेसेनेचा असल्यानं त्यांनी अखेरपर्यंत नाशिकवरील दावा सोडला नाही. त्यामुळे अखेर नाशिकची जागा शिंदेसेनेलाच सुटली. पण प्रचाराला कमी वेळ मिळाल्यानं शिंदेसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा पराभव झाला. आता विधानसभेत महायुतीत पुन्हा एकदा शिंदेसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा वाद नाशिकमध्ये सुरु झाला आहे.

नाशिकच्या नांदगाव मतदारसंघाचे सेना आमदार सुहास कांदे यांना पक्षानं विधानसभेसाठी पुन्हा उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना नांदगावातून निवडणूक लढायची होती. पण इथला आमदार सेनेचा असल्यानं महायुतीत ही जागा सेनेकडे गेली. त्यामुळे समीर भुजबळ यांनी बंडखोरी केली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आमदार सुहास कांदे यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे.
Uddhav Thackeray: तातडीनं मातोश्रीवर या! साळवींना ठाकरेंचा फोन; सभा सोडून निघाले, वेगवान घडामोडी सुरु
समीर भुजबळ नांदगावमधून २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भुजबळ थेट नांदगावातून येऊन कांदेंना आव्हान देणार असल्यानं मग कांदे समर्थकही इरेला पेटले आहेत. त्यांनी थेट येवल्यातून कांदे यांचा उमेदवार अर्ज दाखल केला आहे. कांदे समर्थकांनी येवल्यात अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे कांदे यंदा दोन मतदारसंघांमधून लढणार आहेत. येवल्यात ते थेट मंत्री छगन भुजबळ यांना आव्हान देतील.

भडकले कांदे, महायुतीचे वांदे; नाशकात ठिणगी, शिंदेंचा आमदार भुजबळांना नडणार, २ जागांवर लढणार

भुजबळ विरुद्ध कांदे वाद नाशिककरांसाठी नवा नाही. भुजबळ यांचे पुत्र २००९ आणि २०१४ मध्ये नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. दोन्हीवेळा त्यांनी सेनेच्या उमेदवाराचा पराभव केला. २०१४ मध्ये पंकज भुजबळांनी सुहास कांदे यांना मात दिली होती. कांदे १८ हजार ४३६ मतांनी पराभूत झाले होते. पण २०१९ मध्ये कांदे यांनी भुजबळांना १४ हजार मतांनी पराजय करत विधानसभा गाठली. तर छगन भुजबळ येवल्यातून २००४ पासून सलग चारवेळा निवडून आले आहेत. सगळ्या निवडणुकांमध्ये त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांचा मोठ्या फरकानं पराभव केला आहे.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post भडकले कांदे, महायुतीचे वांदे; नाशकात ठिणगी, शिंदेंचा आमदार भुजबळांना नडणार, २ जागांवर लढणार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=106090 0
Nandgaon Vidhan Sabha: अपक्ष लढणार समीर भुजबळ, महायुतीतही “सांगली पॅटर्न”ला बळ https://tejpolicetimes.com/?p=106016 https://tejpolicetimes.com/?p=106016#respond Fri, 25 Oct 2024 01:22:25 +0000 https://tejpolicetimes.com/?p=106016 Nandgaon Vidhan Sabha: अपक्ष लढणार समीर भुजबळ, महायुतीतही “सांगली पॅटर्न”ला बळ

Sameer Bhujbal Nandgaon Vidhan Sabha: महाविकास आघाडी सरकार असताना कांदे विरुद्ध भुजबळ असा संघर्ष रंगला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या वादाला नवीन फोडणी मिळाली आहे. महाराष्ट्र टाइम्सbhujbal kande म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : अन्न व नागरी पुरवठामंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी पक्षाच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाचा […]

The post Nandgaon Vidhan Sabha: अपक्ष लढणार समीर भुजबळ, महायुतीतही “सांगली पॅटर्न”ला बळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Nandgaon Vidhan Sabha: अपक्ष लढणार समीर भुजबळ, महायुतीतही “सांगली पॅटर्न”ला बळ

Sameer Bhujbal Nandgaon Vidhan Sabha: महाविकास आघाडी सरकार असताना कांदे विरुद्ध भुजबळ असा संघर्ष रंगला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या वादाला नवीन फोडणी मिळाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स
bhujbal kande

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : अन्न व नागरी पुरवठामंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी पक्षाच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत, थेट नांदगावमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. नांदगावमध्ये महायुतीकडून आमदार सुहास कांदे यांची उमेदवारी जाहीर झाली असताना, भुजबळ यांनी कांदेंविरोधात शड्डू ठोकले आहे. त्यानंतर ‘गद्दार हा शब्द भुजबळांसाठीच आहे,’ अशी तोफ आमदार कांदे यांनी डागली आहे, तर ‘मतदारसंघ भयमुक्त करण्यासाठी रिंगणात उतरलो आहे,’ असा दावा समीर भुजबळ यांनी केला आहे. त्यामुळे नांदगावची लढाई लक्षवेधी ठरणार आहे.

राज्यात महायुतीत भाजप, शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी यांचा समावेश आहे. आता, नाशिकमध्ये मात्र महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात आता मिठाचा खडा पडला आहे. यापूर्वी पंकज भुजबळ यांनी दोन वेळा नांदगाव मतदारसंघाचे नेतृत्व केले. परंतु, गेल्या वेळी कांदे यांनी त्यांचा पराभव केला. त्याचा वचपा काढण्यासाठी समीर भुजबळ यांनी कांदे यांच्या विरोधात शड्डू ठोकल्याने ‘भुजबळ विरुद्ध कांदे’ वाद विकोपाला गेला आहे. महाविकास आघाडी सरकार असताना कांदे विरुद्ध भुजबळ असा संघर्ष रंगला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या वादाला नवीन फोडणी मिळाली आहे.

गद्दार हा शब्द भुजबळांसाठी असून महायुतीत भुजबळ गद्दारी करत आहेत. भुजबळ कुटुंबाने दोन हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असून त्याविरोधात मी सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे. हा खटला मागे घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जात आहे. मी येवल्यातून निवडणूक लढण्यास तयार आहे.– सुहास कांदे, आमदार

मतदारसंघात भयभीत वातावरण आहे. मी कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीला उभे राहावे, अशी लोकांची इच्छा आहे. त्यामुळे मी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.– समीर भुजबळ, अपक्ष उमेदवार, नांदगाव

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post Nandgaon Vidhan Sabha: अपक्ष लढणार समीर भुजबळ, महायुतीतही “सांगली पॅटर्न”ला बळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=106016 0
पवारांची उमेदवार यादी आली; दादांच्या २ मंत्र्यांविरोधात ‘तुतारी वाजवणारा माणूस’ नाही https://tejpolicetimes.com/?p=105957 https://tejpolicetimes.com/?p=105957#respond Thu, 24 Oct 2024 14:18:38 +0000 https://tejpolicetimes.com/?p=105957 पवारांची उमेदवार यादी आली; दादांच्या २ मंत्र्यांविरोधात ‘तुतारी वाजवणारा माणूस’ नाही

NCP SP Candidate List: विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये ४५ जागांचा समावेश आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉमअजित पवार विरुद्ध शरद पवार मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे. या यादीत ४५ जणांची नावं आहेत. बारामतीमधून शरद पवारांनी त्यांचा नातू युगेंद्र पवार यांना […]

The post पवारांची उमेदवार यादी आली; दादांच्या २ मंत्र्यांविरोधात ‘तुतारी वाजवणारा माणूस’ नाही first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पवारांची उमेदवार यादी आली; दादांच्या २ मंत्र्यांविरोधात ‘तुतारी वाजवणारा माणूस’ नाही

NCP SP Candidate List: विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये ४५ जागांचा समावेश आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
अजित पवार विरुद्ध शरद पवार

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे. या यादीत ४५ जणांची नावं आहेत. बारामतीमधून शरद पवारांनी त्यांचा नातू युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आव्हान आहे. त्यामुळे बारामतीत काका विरुद्ध पुतण्या असा सामना पाहायला मिळेल.

लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी त्यांचा राजकीय अनुभव पणाला लावत अजित पवारांना शह दिला. बारामतीत अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना तिकीट दिलं होतं. त्यामुळे बारामतीच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. पण शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना निवडून आणलं. अजित पवारांसाठी हा जबर धक्का मानला गेला. रायगडची जागा वगळता अजित पवारांच्या पक्षाला अन्यत्र यश मिळालं नाही.
NCP SP Candidate List: शरद पवारांच्या पक्षाकडून पहिली उमेदवार यादी जाहीर; अजित पवारांविरोधात शिलेदार ठरला
आता विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी तोडीस तोड उमेदवार दिले आहेत. लोकसभेच्या निकालानंतर शरद पवारांच्या पक्षाकडे नेत्यांचा ओढा वाढला. तुतारी हाती घेण्यासाठी इच्छुकांच्या रांगा लागल्या. त्यामुळे दादा गटाच्या आमदारांविरोधात शरद पवारांनी फिल्डींग लावली. शरद पवारांनी मॅन टू मॅन मार्किंग करत अजित पवारांच्या आमदारांना रडारवर घेतलं. उमेदवारांच्या पहिल्या यादीत याची झलक दिसली आहे. कागल, इंदापूर, कळवा मुंब्रा, तुमसर, कोपरगाव, उदगीर, आंबेगाव, अहेरी, हडपसरमधून शरद पवारांनी उमेदवार दिले आहेत.
Eknath Shinde: …तर शिंदेंच्या मतदारसंघात उमेदवार देऊ! भाजपचा थेट इशारा; ठाण्यात महायुतीत वाद पेटला
अजित पवारांची साथ देत महायुती सोबत गेलेल्या आणि सरकारमध्ये मंत्री झालेल्या छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्याविरोधात मात्र शरद पवारांनी उमेदवार दिलेले नाहीत. पवारांच्या पहिल्या यादीत भुजबळांच्या येवला आणि मुंडेंच्या परळीचा समावेश नाही. मुंडे आणि भुजबळ यांच्याविरोधात शरद पवारांना अद्याप तुल्यबळ उमेदवार सापडलेला नाही. त्यामुळे पुढील यादीत या मतदारसंघांमध्ये उमेदवार जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

NCP SP Candidate List: पवारांची उमेदवार यादी आली; दादांच्या २ मंत्र्यांविरोधात ‘तुतारी वाजवणारा माणूस’ नाही

लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी बीडमध्ये मुंडेंना मोठा धक्का दिला. महायुतीकडून पंकजा मुंडे यांना तिकीट मिळताच शरद पवारांनी डाव टाकण्यास सुरुवात केली. अजित पवार गटात नाराज असलेल्या बजरंग सोनावणेंना त्यांनी पक्षात घेतलं. त्यांच्या मागे पूर्ण ताकद उभी केली. मराठवाड्यात जरांगे पाटील यांच्या आरक्षण आंदोलनामुळे वातावरण तापलं होतं. मराठा मतं भाजप उमेदवारांच्या विरोधात जाणार याची जाणीव असल्यानं पवारांनी सोनावणेंना उमेदवारी दिली. त्यांनी अटीतटीच्या लढतीत मुंडे यांचा पराभव केला. हा निकाल धनंजय मुंडे यांच्यासाठी धक्का मानला गेला. पंकजा यांच्या प्रचाराची धुरा धनंजय मुंडे यांच्याकडेच होती.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post पवारांची उमेदवार यादी आली; दादांच्या २ मंत्र्यांविरोधात ‘तुतारी वाजवणारा माणूस’ नाही first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=105957 0
मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री आज नाशिकमध्ये; महिला सशक्तीकरण महाशिबिराचं आयोजन, ५० हजार महिला उपस्थित राहणार https://tejpolicetimes.com/?p=103116 https://tejpolicetimes.com/?p=103116#respond Fri, 23 Aug 2024 01:44:35 +0000 https://tejpolicetimes.com/?p=103116 मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री आज नाशिकमध्ये; महिला सशक्तीकरण महाशिबिराचं आयोजन, ५० हजार महिला उपस्थित राहणार

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महिला सशक्तीकरण महाशिबिराच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह अर्धा डझन मंत्री आज, शुक्रवारी (दि. २३) नाशिकमध्ये येत आहेत. त्यामुळे शहरात व्हीआयपींची मांदियाळी राहणार आहे. दरम्यान, हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला असल्याने वाहतुकीसह सुरक्षा यंत्रणांवर ताण येण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने […]

The post मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री आज नाशिकमध्ये; महिला सशक्तीकरण महाशिबिराचं आयोजन, ५० हजार महिला उपस्थित राहणार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री आज नाशिकमध्ये; महिला सशक्तीकरण महाशिबिराचं आयोजन, ५० हजार महिला उपस्थित राहणार

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महिला सशक्तीकरण महाशिबिराच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह अर्धा डझन मंत्री आज, शुक्रवारी (दि. २३) नाशिकमध्ये येत आहेत. त्यामुळे शहरात व्हीआयपींची मांदियाळी राहणार आहे. दरम्यान, हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला असल्याने वाहतुकीसह सुरक्षा यंत्रणांवर ताण येण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेच्या प्रचारानिमित्त शुक्रवारी तपोवनातील मोदीम मैदानात आज, शुक्रवारी दुपारी दोन वाजता महिला सशक्तीकरण महाशिबिर होत आहे. या मेळाव्यात जवळपास ५० हजार महिला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत.

९०० बस धावणार

तपोवनातील सिटीलिंक बस डेपोच्या बाजूच्या मैदानावर सुरू असलेल्या या मेळाव्याच्या तयारीवर प्रशासनाने गुरुवारी अखेरचा हात फिरवला. ५० हजार ‘लाडक्या बहिणीं’ना घेऊन येण्याकरिता ९०० बस धावणार असून, सकाळपासूनच महिला मेळाव्याच्या ठिकाणी दाखल होणार आहेत.

वॉटरप्रूफ मंडपची सोय

विधानसभा निवडणुकीनिमित्त राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या वतीनेही जिल्ह्यात मेळाव्यांद्वारे शक्तिप्रदर्शन सुरू आहे. लाडकी बहीण योजनेचे ब्रँडिंग सुरू असून, लाभार्थींचे मेळावे घेतले जात आहेत. शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पाऊस होण्याची शक्यता गृहित धरून वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे. ५० हजार व्यक्ती बसू शकतील अशी आसनव्यवस्था करण्यात आली आहे. उपस्थित महिलांना शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती मिळावी याकरिता ठिकठिकाणी फलक लावण्यात आले असून, आरोग्य तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलद्वारे स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. बसह वाहन पार्किंगची व्यवस्था आणि वाहतुकीचे नियोजनही करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शिबिरस्थळावर जाऊन तयारीची पाहणी केली. मान्यवरांची बैठकव्यवस्था, वीजपुरवठा, जनरेटर्स, महाशिबिरास येणाऱ्या महिला व अन्य लाभार्थींची वाहतूक व्यवस्था, कार्यक्रमस्थळाची स्वच्छता, स्वच्छ पेयजल, पार्किंग व्यवस्था, मोबाइल स्वच्छतागृहे, वैद्यकीय व्यवस्था, प्रथमोपचार, रुग्णवाहिका, अग्निशामक वाहने, सांस्कृतिक कार्यक्रम, एलईडी स्क्रीन्स आदींबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला.

…असे आहे नियोजन

-मेळाव्याच्या ठिकाणी जर्मन तंत्रज्ञानाचा वॉटरप्रूफ मंडप
-व्यासपीठापर्यंत जाण्याकरिता लाकडी रस्ता
-४० बाय १५० मीटरचा मुख्य मंडप
-मुख्य मंडपाव्यतिरिक्त इतर दोन मंडप
-दिव्यांग बांधवांसाठी रॅम्पची सोय
-बचतगटाचे स्टॉल्स, शासकीय स्टॉल्सची उभारणी
-सिटीलिंकच्या २००, तर एसटी महामंडळाच्या ७०० बसची व्यवस्था

वाहतूक मार्गात बदल

तपोवनात होणारा महिला सशक्तीकरण मेळावा, तुपसाखरे लॉन्समध्ये काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठका या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून बंदोबस्तासह वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार असल्याने परिसरात सुमारे ८०० पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार आहे. तपोवनातील लक्ष्मीनारायण मंदिर चौफुलीपासून साधुग्रामकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांना प्रवेश बंद केला आहे. मिरची हॉटेल सिग्नलकडून गोदावरी लॉन्स या मार्गापर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदची अधिसूचना वाहतूक शाखेने काढली आहे. काँग्रेसच्या कार्यक्रम स्थळाभोवतीही पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहे. सकाळी नऊपासून सायंकाळी कार्यक्रम संपेपर्यंत वाहतूक मार्गात बदल राहणार आहे.

Ladki Bahin Yojana : ”बुरी नजरवाले तेरा मुह काला”, लाडकी बहिण योजनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका
पर्यायी मार्ग…

-लक्ष्मीनारायण पुलापासून पुढे उत्तरानगरकडे जाणारी वाहने, तसेच विरुद्ध दिशेने तपोवनाकडे येणारी वाहने मारुती चौफुलीपासून (नासर्डी नदी पूल) वळण घेऊन काठे गल्लीमधून पुणे महामार्गावरून पुढे मार्गस्थ होतील.

-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून अवजड वाहने सरळ सिद्धिविनायक चौकातून मार्गस्थ होत पुढे नांदूर नाक्याच्या दिशेने जातील. ही वाहने मिरची सिग्नल येथून गोदावरी लॉन्सकडे वळण घेणार नाहीत

एसटी बससाठी पार्किंगस्थळे

-येवला, नांदगाव, मालेगाव, निफाड, देवळा, बागलाण, चांदवड, कळवण, सुरगाणा, दिंडोरी, पेठ या भागांमधून येणाऱ्या एसटी बस नीलगिरी बागेच्या मैदानात थांबतील
-मिरची हॉटेल सिग्नलजवळील जेजूरकर मंगल कार्यालयासमोरील मैदानात नाशिक तालुक्यातून येणाऱ्या एसटी बस थांबतील
-सिन्नर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यांमधून येणाऱ्या बस ‘मारुती वेफर्स’च्या पुढे असलेल्या जागेत थांबतील

Source link

The post मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री आज नाशिकमध्ये; महिला सशक्तीकरण महाशिबिराचं आयोजन, ५० हजार महिला उपस्थित राहणार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=103116 0
Manoj Jarange: राज्यात दंगली घडविण्याचा डाव; जरांगे यांचा फडणवीस, भुजबळांवर नाशिकमध्ये हल्लाबोल https://tejpolicetimes.com/?p=102134 https://tejpolicetimes.com/?p=102134#respond Wed, 14 Aug 2024 00:44:47 +0000 https://tejpolicetimes.com/?p=102134 Manoj Jarange: राज्यात दंगली घडविण्याचा डाव; जरांगे यांचा फडणवीस, भुजबळांवर नाशिकमध्ये हल्लाबोल

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू नये यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस षडयंत्र आखत आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि प्रवीण दरेकरांच्या आडून ते आरक्षणाला विरोध करीत आहेत. भुजबळ, फडणवीसांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असा हल्लाबोल मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी नाशिकमध्ये केला. मराठा […]

The post Manoj Jarange: राज्यात दंगली घडविण्याचा डाव; जरांगे यांचा फडणवीस, भुजबळांवर नाशिकमध्ये हल्लाबोल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Manoj Jarange: राज्यात दंगली घडविण्याचा डाव; जरांगे यांचा फडणवीस, भुजबळांवर नाशिकमध्ये हल्लाबोल

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू नये यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस षडयंत्र आखत आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि प्रवीण दरेकरांच्या आडून ते आरक्षणाला विरोध करीत आहेत. भुजबळ, फडणवीसांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असा हल्लाबोल मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी नाशिकमध्ये केला. मराठा आणि ओबीसी समाजात कुठलाही वाद होऊ देऊ नका. राज्यात काहीही झाले तरी आपण शांतता राखायची आहे. तसेच, निवडणूक लढवायची, की पाडायचे हे ठरविण्यासाठी येत्या २९ ऑगस्टला अंतरवाली सराटीत या, असे आवाहनही त्यांनी समाजबांधवांना केले.मराठा आरक्षण मागणीच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी राज्यात काढलेल्या शांतता रॅलीचा समारोप मंगळवारी (दि. १३) नाशिकमध्ये झाला. याप्रसंगी व्यासपीठावरून जरांगे पाटील यांनी भुजबळ, फडणवीस यांना लक्ष्य केले. सत्ताधारी आणि विरोधक मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी प्रयत्न करीत आहेत. निवडणुकीपूर्वी आरक्षण मिळाले नाही, तर विरोध करणाऱ्या सर्वांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करा. फडणवीस मराठा समाजबांधवांमध्ये वाद निर्माण करून फोडाफोडीचे राजकारण करीत आहेत, असे असले तरी त्यांना आणखी काही दिवस संधी देण्याची गरज आहे. याकाळातही ते सुधारले नाहीत, तर निवडणुकीतूनच त्यांना प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला.

फडणवीस सांगतात, भुजबळ बोलतात

फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच भुजबळ बोलतात. ऐकले नाही, तर ते पुन्हा तुरुंगात टाकतील, अशी भुजबळांना भीती वाटते. त्यांची पंचाईत झाली आहे, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला. फडणवीसांनी राजकारणात अनेकांचा कार्यक्रम केला; मात्र त्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणारा मी एकटाच वस्ताद त्यांना भेटलो असेल. कोणी कितीही डावपेच केले, षडयंत्र आखले तरी ओबीसीतूनच मराठा आरक्षण मिळवून देऊ, असे आश्वासन जरांगे यांनी दिले.

भुजबळांना येवल्यातून पाडायचे

छगन भुजबळांनी शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवला. त्यामुळे फडणवीस भुजबळांच्या नादी लागल्यास भाजपही संपेल, असा इशारा देतानाच, भुजबळांच्या रुपाने नाशिक जिल्ह्याला लागलेली साडेसाती संपवायची आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. लोकसभा निवडणुकीत आपण अनेकांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला. ‘एक’ तर नाशिकमध्ये उभाच राहिला नाही, असे सांगत त्यांनी भुजबळांवर हल्लाबोल केला. येवला पवित्र करायचे असल्याने, येत्या निवडणुकीत भुजबळांना पाडा, असे आवाहनही जरांगे-पाटील यांनी केले.
राज्यातील सर्व २८८ जागा लढणार, आमचंच सरकार येणार, नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील यांची डरकाळी
नारायण राणेंविरोधात बोलू नका

भाजप खासदार नारायण राणेंचा मी सन्मान करतो. राणे यांचे समाजाप्रति असलेले योगदान आणि त्यांच्या वयाचा विचार करता, त्यांच्यावर खालच्या भाषेत टीका करू नका, असे जरांगे यांनी सांगितले. अर्थातच, राणे यांनी टीका करण्याची मर्यादा ओलांडली आणि वारंवार सांगूनही त्यांना आपला सन्मान ठेवला नाही, तर त्यांचे काय करायचे, ते मी पाहून घेईल, असा इशाराही त्यांनी दिला.

२९ ऑगस्टला अंतरवालीला या

मराठा आणि कुणबी एकच असल्याचे सिद्ध झाले आहे. दहा टक्के आरक्षण मागितले नव्हते. आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवे आहे. ईडब्ल्यूएसचा लाभ माझ्यामुळे गेल्याचा खोटा प्रचार केला जात आहे. येणाऱ्या निवडणुकीत भावनाशील होऊन नेत्यांच्या नादाला लागू नका. तसे केले तर आरक्षण परत कधीच मिळणार नाही. निवडणूक लढवायची, की निवडणुकीत पाडायचे हे ठरविण्यासाठी येत्या २९ ऑगस्टला अंतरवाली सराटीत या, असे जरांगे-पाटील म्हणाले. निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनी २० ऑगस्टपर्यंत माहिती पाठविण्यासही त्यांनी सांगितले.

मराठा आणि कुणबी एकच असल्याचे सिद्ध झाले आहे. दोन्ही समाजात कुठलाही वाद होऊ देऊ नका. राज्यात काहीही झाले तरी आपण शांतता राखायची आहे.– मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षणाचे नेते

Source link

The post Manoj Jarange: राज्यात दंगली घडविण्याचा डाव; जरांगे यांचा फडणवीस, भुजबळांवर नाशिकमध्ये हल्लाबोल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=102134 0