सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याप्रमाणे शाळेतील त्या वर्गात कोणीच नव्हते. याचा फायदा घेत तो तरुण वर्गात शिरला आणि विद्यार्थीनीसोबत अश्लील कृत्य केले. एवढ्यात त्या मुलीने आरडाओरडा करताच त्या नराधमाने तेथून काढता पाय घेतला. तो सध्या पसार झाला असल्याचे समजते. धक्कादायक बाब म्हणजे संस्थाचालकांनीही या सर्व प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.Akshay Shinde Case: संयमाचा अंत पाहू नका, CIDची पुन्हा कानउघाडणी, उच्च न्यायालयाचा इशारा
पोलिसांनीही संस्थाचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केल्याचे वृत्त आहे. मात्र मनसेने याप्रकरणी पोलिसांनी जाब विचारताच संस्थाचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण आरोपी अद्याप फरार आहे. सीसीटीव्हीत फुटेजमुळे ही धक्कादायक घटना समोर आली आहे.