reviews-feed
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121feeds-for-youtube
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121instagram-feed
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121publisher
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ‘इसिस’च्या युद्धात (इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेव्हंट) मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातलगांच्या उदरनिर्वाहासाठी हवालामार्फत निधी पोहोचविण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) नाशिक न्यायालयात केला. भारतातून दुबईत हवालामार्फत पैसे पोहोचल्याचे सांगत केंद्रीय यंत्रणांकडेही यासंदर्भातील चौकशी सुरू असल्याचे एटीएसने सांगितले. त्यामुळे ‘मनी ट्रेल’ प्रकरणात अटकेत असलेल्या नाशिकच्या संशयिताच्या कोठडीत न्यायालयाने […]
The post हवालामार्फत चालायचं फंडिंग; ISIS प्रकरणात नाशिकच्या संशयिताला ६ दिवस कोठडी, काय आहे प्रकरण? first appeared on TEJPOLICETIMES.
]]>काय आहे प्रकरण?
संशयित हुसैफ शेख हा इंजिनीअर असून, त्याचे कुटुंब उच्चशिक्षित आहे. नाशिकसह इतरत्र एक्सपोर्टसह कृषी मालासंदर्भात कंपन्या आहेत. त्याने सीरिया येथील राबिया उर्फ उम्म ओसामा नामक महिलेच्या बँक खात्यावर वेळोवेळी पैसे पाठविले आहेत. नाशिकच नव्हे, तर महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि बिहार राज्यातूनही त्या महिलेला फंडिंग झाले. दरम्यान, इसिसमार्फत सन २०१९ मध्ये झालेल्या कारवायांमध्ये ‘बॅटल ऑफ बाबूज’ असे युद्ध झाल्याची माहिती ‘एटीएस’ तपासात समोर आली.
एटीएस तपासातून…
– १२ मुद्द्यांवर न्यायालयात युक्तिवाद
– संशयिताला ६ वर्षांची मुलगी; ७ महिन्यांचा मुलगा
– संशयिताची पहिली पत्नी मृत; दुसरी पत्नी उच्चशिक्षित
– साडेसात ते ६५ हजारांपर्यंत निधी पाठवला
– १५ हजार पानांचा पंचनामा कोर्टात सादर
– संशयिताचे ९ सोशल मीडिया खाते; ४०० एमबी डेटा संशयास्पद
– व्हॉट्सॲप, सिग्नल, फेसबुक, टेलिग्राम, इन्स्टाग्रामचा समावेश
– सोशल मीडियावर ८,५७० संशयास्पद चॅट्स; टोपण नावांचा वापर
– संशयितासह भागीदार व नातलगांची २६ बँक खाती; १३ बँक खात्यांची तपासणी पूर्ण
– यूके, दुबई, मलेशिया, कतारमध्ये सातत्याने कॉलिंग
– दुबईच्या हवालासंदर्भात केंद्रीय यंत्रणांकडे चौकशी
व्हिडीओ, ऑडिओचा पुरावा
एटीएसने एक महत्त्वाचा व्हिडीओ कोर्टात न्यायाधीशांना दाखवला. यासह संशयित व त्याच्या सहा वर्षांच्या मुलीमध्ये झालेल्या संवादाचे ‘व्हाइस रेकॉर्डिंग’चा पुरावाही जोडण्यात आला. दोघांमध्ये धार्मिक मुद्द्यांसह लग्नासंदर्भात चर्चा झाल्याचा दावा एटीएसने केला. तसेच हैदराबाद येथील अब्दुल रउफ नावाच्या व्यक्तीला संशयिताने प्रेरित करून त्याच्यामार्फत सीरियातील महिलेला पैसे पाठविल्याचेही एटीएसने कोर्टात सांगितले. यासह सीरियातील महिला व संशयितामध्ये पडघामध्ये झालेल्या ‘एनआयए’च्या कारवाईसंदर्भात आक्षेपार्ह चॅटिंग झाले आहे.
‘दिहरम’मध्ये हवाला
संशयितासह इतरांनी दुबईच्या ‘दिहरम’ करन्सीत हवालामार्फत पैसे पाठविल्याचा दावा एटीएसने केला. त्यानुसार भारतातील ६५ हजार म्हणजे, दुबईतील २८७४.६८ दिरहम आतापर्यंत बँक खात्यातून पाठविण्यात आले आहेत. मात्र, मोठी रक्कम हवालामार्फत सीरियातील महिलेपर्यंत पोहोचल्याने त्याच्या तपासाकरिता एटीएसने संशयिताची कोठडी वाढवून घेतली.
The post हवालामार्फत चालायचं फंडिंग; ISIS प्रकरणात नाशिकच्या संशयिताला ६ दिवस कोठडी, काय आहे प्रकरण? first appeared on TEJPOLICETIMES.
]]>म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ‘इसिस’च्या युद्धात (इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेव्हंट) मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातलगांच्या उदरनिर्वाहासाठी संकलित होणाऱ्या पैशांमध्ये नाशिकमधूनही ‘मनी ट्रेल’ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सीरियातील एका महिलेला ‘इसिस’साठी २०१९पासून फंडिंग करणाऱ्या शहरातील संशयिताला दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) तिडके कॉलनीतून अटक केली आहे. हुसैफ अब्दुल अजीज शेख (वय ३०, रा. […]
The post नाशिकमधून इसिसला फंडिंग; तिडके कॉलनीतून तरुणाला अटक, सीरियातील महिलेशी कनेक्शन first appeared on TEJPOLICETIMES.
]]>एटीएस तपासातून उघड बाबी
– अटकेपूर्वी तीन दिवस कसून चौकशी
– व्हॉटसॲप चॅटिंगद्वारे संशयिताची संबंधित महिलेशी ओळख
– चॅटिंगमध्ये सावध चर्चा; मेसेज व आर्थिक व्यवहारांचे पुरावे सादर
– सात मोबाइल हस्तगत; त्यापैकी चार सुरू, तीन बंद
– तीन सिमकार्ड, एक पेनड्राइव्ह, एक लॅपटॉप, पासपोर्ट जप्त
– एसबीआय, पंजाब नॅशनल, फेडरल, ॲक्सिस, आयसीआयसीआय बँकेत खाते
– श्रीलंका, दुबई, चेरा, तेहरान येथे आरोपीचा प्रवास
‘बॅटल ऑफ बाबूस’
इसिसमार्फत सन २०१९ मध्ये झालेल्या कारवायांमध्ये ‘बॅटल ऑफ बाबूस’ असे युद्ध झाल्याची माहिती ‘एटीएस’कडे आहे. या कारवाईत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातलगांना आर्थिक मदतीसाठी इसिसमार्फत निधी संकलित केला जातो. त्यासाठी संशयिताला हेरण्यात आले. त्याच्याशी सोशल मीडियावरुन चॅटिंग करून निधी संकलित करण्यात आल्याची माहिती तपासात समोर येत आहे.
… असे झाले फंडिंग
संशयिताने सीरिया येथील राबिया उर्फ उम्म ओसामा नामक महिलेच्या बँक खात्यावर विविध खात्यांतून वेळोवेळी पैसे पाठविले आहेत. फक्त नाशिकच नव्हे; तर राज्यातील इतर ठिकाणांहून; तसेच कर्नाटक, तेलंगण आणि बिहार राज्यातूनही फंडिंग झाले. एटीएसच्या माहितीनुसार कर्नाटकातील भटकल येथून फंडिंग झाल्याचा संशय आहे. त्यामुळे यामध्ये ‘इंडियन मुजाहिद्दीन’ संघटनेचाही हात असल्याचा संशय आहे. त्यानुसार पथक देशातील विविध ठिकाणी तपास करीत आहे.
कोण आहे संशयित?
संशयित हुसैफ शेख हा तिडके कॉलनीतील रहिवाशी आहे. त्याचे कुटुंब उच्चशिक्षित असून, संशयित इंजिनीअर आहे. त्याच्या नावे नाशिक व इतरत्र चार-पाच कंपन्या असल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यापैकी काही कंपन्यांत संशयित भागीदार आहे. ॲग्री आणि एक्स्पोर्ट संदर्भातील या कंपन्यात आहेत. पत्नी व मुलांबरोबर तो नाशिकमध्ये राहतो.
The post नाशिकमधून इसिसला फंडिंग; तिडके कॉलनीतून तरुणाला अटक, सीरियातील महिलेशी कनेक्शन first appeared on TEJPOLICETIMES.
]]>