Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
देवेंद्र फडणवीस बातम्या - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Thu, 05 Dec 2024 01:52:39 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg देवेंद्र फडणवीस बातम्या - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 तांबड्या मातीला भगवा ‘शेला’, VIP व्यक्तींसाठी गुबगुबीत सोफे, शपथविधीसाठी आझाद मैदान सजले https://tejpolicetimes.com/?p=111275 https://tejpolicetimes.com/?p=111275#respond Thu, 05 Dec 2024 01:52:39 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111275 तांबड्या मातीला भगवा ‘शेला’, VIP व्यक्तींसाठी गुबगुबीत सोफे, शपथविधीसाठी आझाद मैदान सजले

Devendra Fadnavis Chief Minister Oath Ceremony: फॅशन स्ट्रीटच्या बाजूला एक मोठा मंच उभारण्यात आला आहे. फॅशन स्ट्रीटसमोरील फाटकातून महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवेशाची सोय करण्यात आली आहे. हायलाइट्स: तांबड्या मातीला भगवा ‘शेला’ शपथविधीसाठी आझाद मैदान सजले पोलिस बंदोबस्तात आझाद मैदान महाराष्ट्र टाइम्सदेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शपथविधी मुंबई : क्रिकेटपटूंच्या धावपळीने, आंदोलकांच्या पायांनी दरदिवशी उसळणारी तांबडी माती दोन दिवसांपासून […]

The post तांबड्या मातीला भगवा ‘शेला’, VIP व्यक्तींसाठी गुबगुबीत सोफे, शपथविधीसाठी आझाद मैदान सजले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
तांबड्या मातीला भगवा ‘शेला’, VIP व्यक्तींसाठी गुबगुबीत सोफे, शपथविधीसाठी आझाद मैदान सजले

Devendra Fadnavis Chief Minister Oath Ceremony: फॅशन स्ट्रीटच्या बाजूला एक मोठा मंच उभारण्यात आला आहे. फॅशन स्ट्रीटसमोरील फाटकातून महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवेशाची सोय करण्यात आली आहे.

हायलाइट्स:

  • तांबड्या मातीला भगवा ‘शेला’
  • शपथविधीसाठी आझाद मैदान सजले
  • पोलिस बंदोबस्तात आझाद मैदान
महाराष्ट्र टाइम्स
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शपथविधी

मुंबई : क्रिकेटपटूंच्या धावपळीने, आंदोलकांच्या पायांनी दरदिवशी उसळणारी तांबडी माती दोन दिवसांपासून हिरव्या-पांढऱ्या गालिच्याखाली दडली आहे. मैदानात उभारलेल्या भव्य मंडपाच्या बाह्य पांढऱ्या कपड्याला आतून भगवे अस्तर देत या तांबड्या मातीला साजेसा भगवा ‘शेला’ मैदानावर चढला आहे. महत्त्वाच्या व्यक्तींसाठी गुबगुबीत सोफे आपली जागा घेऊन आहेत. आझाद मैदानात सगळी सज्जता झाली असून आता प्रतीक्षा आहे ती फक्त आज, गुरुवारी होणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची! या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीने उपस्थित राहणार असल्याने या सर्व तयारीला सुरक्षेचे कणखर कवचही लाभले आहे.विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महायुतीची सत्ता येणार हे स्पष्ट झाले. या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण, याची चर्चा काही काळ रंगली. विद्यमान आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले गाव गाठल्याने या चर्चेला रंग चढला. मात्र, या सगळ्या राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवरही आझाद मैदानात शांतपणे तयारी सुरू होती.

फॅशन स्ट्रीटच्या बाजूला एक मोठा मंच उभारण्यात आला आहे. फॅशन स्ट्रीटसमोरील फाटकातून महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवेशाची सोय करण्यात आली आहे. पुद्दुचेरी येथे आलेल्या चक्रीवादळमुळे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचा विचार करत संपूर्ण मंडप आच्छादित करण्यात आला आहे. या मंडपाचे छत आतून भगव्या रंगाच्या कपड्याने सजवले आहे. त्याशिवाय खाली पांढऱ्या-हिरव्या रंगाचे कापडही घातले आहे.
फडणवीसच मुख्यमंत्री! मुंबईत आझाद मैदानावर आज महायुतीचा शपथविधी सोहळा, मंत्रिमंडळात संधी कोणाला?

आंदोलक मैदानाबाहेर

आझाद मैदानातील एक कोपरा आंदोलकांसाठी राखून ठेवलेला आहे, मात्र गुरुवारी शपथविधी होईपर्यंत त्या कोपऱ्यात एकही आंदोलक दिसणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. ज्या ठिकाणी आंदोलन होते, ती जागा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्याशिवाय जिथे आंदोलक बसतात, त्या ठिकाणी पोलिस पथाऱ्या पसरून बसल्याचेही चित्र होते.

आझाद मैदानात चोहूबाजूंनी कडेकोट पोलिस बंदोबस्त आहे. शपथविधीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी महापालिकेसमोरील मार्ग आणि इतर मार्ग उपलब्ध असतील. मात्र, बुधवारी या सर्व मार्गांवर, आझाद मैदानात मोठ्या प्रमाणावर पोलिस होते. मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यातील बहुतांश कर्मचाऱ्यांना आझाद मैदानात ड्युटी लावल्याचे काही पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या श्वान पथकातील स्फोटके शोधणारे दोन श्वानही या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. काही पोलिस गुरुवारच्या मुख्य कार्यक्रमाआधी आराम करत होते. वरिष्ठ अधिकारी काही पथकांना सूचना देत गुरुवारच्या कार्यक्रमाची रूपरेषा, सुरक्षेची व्यवस्था आदींबाबत सांगत होते.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

The post तांबड्या मातीला भगवा ‘शेला’, VIP व्यक्तींसाठी गुबगुबीत सोफे, शपथविधीसाठी आझाद मैदान सजले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111275 0
Jitendra Awhad: मुंब्रा बदनाम करु नका, जागा-परवानगी द्या; मी पुतळा उभारतो, आव्हाडांचं फडणवीसांना प्रतिआव्हान https://tejpolicetimes.com/?p=107559 https://tejpolicetimes.com/?p=107559#respond Wed, 06 Nov 2024 10:57:36 +0000 https://tejpolicetimes.com/?p=107559 Jitendra Awhad: मुंब्रा बदनाम करु नका, जागा-परवानगी द्या; मी पुतळा उभारतो, आव्हाडांचं फडणवीसांना प्रतिआव्हान

Edited byनुपूर उप्पल | Authored by विनित जांगळे | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 6 Nov 2024, 4:27 pm Jitendra Awhad On Devendra Fadnavis: मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारुन दाखवा असं आव्हान देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना दिलं होतं. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांना प्रतिआव्हान दिलं आहे. महाराष्ट्र टाइम्स ठाणे: देवेंद्र फडणवीस यांना कदाचित […]

The post Jitendra Awhad: मुंब्रा बदनाम करु नका, जागा-परवानगी द्या; मी पुतळा उभारतो, आव्हाडांचं फडणवीसांना प्रतिआव्हान first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Jitendra Awhad: मुंब्रा बदनाम करु नका, जागा-परवानगी द्या; मी पुतळा उभारतो, आव्हाडांचं फडणवीसांना प्रतिआव्हान

Edited byनुपूर उप्पल | Authored by विनित जांगळे | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 6 Nov 2024, 4:27 pm

Jitendra Awhad On Devendra Fadnavis: मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारुन दाखवा असं आव्हान देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना दिलं होतं. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांना प्रतिआव्हान दिलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स

ठाणे: देवेंद्र फडणवीस यांना कदाचित कुणी सांगितले नसेल पण जिथून मुंब्र्याचा रस्ता सुरू होतो. तिथेच राजमाता जिजाऊ, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले , राजर्षी शाहू महाराज , डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीमाई फुले यांचे मोठे चित्रशिल्प आणि महाराष्ट्राचा नकाशा आपण उभारला आहे. आता निवडणुकीत भाषणे ठोकून मुंब्र्याला बदनाम केले जात आहे. फडणवीस यांनी मला पुतळा द्या; सरकारची परवानगी द्या, मी तुम्हाला मुंब्र्यात पुतळा उभारून दाखवतो, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा मुंब्रा- कळवा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रतिआव्हान दिले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांना आव्हान देताना मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचे आव्हान दिले होते. त्यावर डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीस यांना प्रतिआव्हान दिले.

डाॅ. आव्हाड म्हणाले, मुसलमानांना कायम वाईट नजरेतून पहायचे, ही छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत औरंगजेबाच्या दरबारात गेलेला मदारी मेहतर हादेखील मुसलमानच होता. तेव्हा, उद्धव ठाकरे यांना जे आव्हान दिले आहे ते आपण स्वीकारतो. तुम्ही मला पुतळा आणि सरकारी परवानग्या द्या, आपण पुतळा उभारतो आणि पुतळ्याचे अनावरण करायला उद्धव ठाकरे यांना बोलावतो. पण, कृपा करून मुंब्र्याला बदनाम करू नका. मुंब्र्याला बदनाम करण्याची जी सवय लागली आहे; ती दूर करण्यासाठी बदलले मुंब्रा एकदा बघायला या. मुंब्र्यात तुमचे स्वागतच होईल, हेही मी तुम्हाला सांगतो.
Donald Trump: १९ गोल्फ कोर्स, ५८ बेडरुमचं घर, आलिशान विमान अन् गाड्या; ट्रम्प यांच्या संपत्तीत घसघशीत वाढ
मी कळवा – मुंब्र्याचे प्रतिनिधित्व करतो जिथे ५० टक्के मुस्लिम आहे ५० टक्के हिंदू आहेत. पण, कृपया मुंब्र्याला बदनाम करू नका ! मुंब्र्यात कुणीही छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोधक रहात नाही. मतांसाठी हिंदू – मुस्लीम तुष्टीकरण करू नका, असेही डाॅ. जितेंद्र आव्हाड म्हणाले.

राम मंदिराच्या उभारणीत भ्रष्टाचार झाल्यानेच आता छत गळत आहे. मी देखील २८ मंदिरे बांधली आहेत. पण, त्याचा गाजावाजा करीत नाही. मुंब्रा स्टेशनच्या बाजूला सुंदर मंदिर बांधले आहे. लोकांकडून वर्गणी गोळा करून तुळजाभवानीचे मंदिर बांधत आहे. देव हृदयात असावा लागतो. त्याचे प्रदर्शन करायचे नसते. मी हिंदू आहे. पण, मंदिरांच्या नावावर द्वेष पसरविणारा नाही.

संविधानाबाबत त्यांना छेडले असता जे राहुल गांधी यांनी संविधान दाखवले होते; त्याचा रंग लाल का आहे, याचा अर्थ त्यांनी यावेळी समजून सांगितला. लाल रंगाचा अर्थ प्रेम , हृदय , क्रांतीचा रंग लाल आहे, असे ते म्हणाले. आमचं रक्त सळसळत आहे. कारण तुम्ही संविधान बदलणार म्हणून, हृदयाचा रंग लाल आहे त्याचा काय नक्षलवाद्यांशी संबध आहे का, लहान पोरांसारखे खेळ करतात. राज ठाकरे म्हणाले होते की, मदरशांमध्ये मशिनगन मिळतील; पण, आजही माझे म्हणणे आहे की, मदरशांमध्ये वस्तराही मिळणार नाही. तुम्हाला हिंदूंना मुसलमानांच्या नावाने भडकवायचे आहे, असेही ते म्हणाले.

बारामतीचा विकास शरद पवारांनी केला

अजित पवार यांनी जाहीर केलेल्या अहवालात बारामतीचा विकास आपण केला असा उल्लेख केला आहे, यावर आव्हाड यांना विचारले असता बारामतीचा विकास शरद पवार यांनी केला असल्याचे त्यानी स्पष्ट केले. अजित दादांचे योगदान नाकारत नाही, मात्र शरद पवार मायनस म्हणजे बारामती काहीही उरत नाही असेही ते म्हणाले. अजित पवार म्हणत आहेत की, “कधी नव्हे एवढा निधी त्यांनी बारामतीत आणला आहे”. या वाक्यातून त्यांच्या मनातील पराभवाची भीती प्रतित होत आहे. मी कळवा – मुंब्र्यात अद्ययावत रूग्णालय उभे केले आहे. पैशाशिवाय उपचार ही अरविंद केजरीवाल यांची संकल्पना मी माझ्या मतदारसंघात राबविली आहे. आता अजित पवार कॅन्सर हॉस्पिटलची घोषणा करीत आहेत. पण, त्यांना सांगतो की, मी उभारलेल्या हाॅस्पीटलमध्ये कँन्सरसंबधीत सर्व उपचारांची यंत्रणा सज्ज आहे. अगदी केमोथेरपी, रेडियशन यांचीही व्यवस्था आहे. जे मी केले ते गेली ३० वर्षे मंत्री असलेले अजित पवार आता करीत आहेत. यावरून ते पराभवाच्या भीतीने पछाडले आहेत, हे दिसून येत आहे, असेही डाॅ. जितेंद्र आव्हाड म्हणाले.

शरद पवारांनी संन्यास घ्यावा, असे अजित पवार म्हणाले. त्यावर, संसदीय निवडणूकीतून शरद पवार माघार घेतील पण राजकारणातून त्यांना माघार घेता येणार नाही, असेही ते म्हणाले. राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय आम्हाला विचारल्या शिवाय ते घेणार नाहीत, असेही डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

Jitendra Awhad: मुंब्रा बदनाम करु नका, जागा-परवानगी द्या; मी पुतळा उभारतो, आव्हाडांचं फडणवीसांना प्रतिआव्हान

लाडकी बहिण कोणाची आहे अजित दादांची आहे , मुख्यमंत्र्यांची आहे की देवा भाऊंची आहे की प्रत्येकाची एक- एक आहे अशी खिल्ली त्यांनी उडवली. लाडक्या बहिणींची महागाईतील दिवाळी कशी गेली हे या तिघांनीही विचारलेले नाही. मतांच्या नादात तिजोरीवर भार वाढला आहे. इथे पोलिसांचा पगार झाला नाही, पुढच्या महिन्यात शासकीय नोकरांच्या पगार होईल की नाही ते सांगता येत नाही केवळ घोषणांचा पाऊस पडायला काय लागत असा सवाल त्यांनी केला.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

The post Jitendra Awhad: मुंब्रा बदनाम करु नका, जागा-परवानगी द्या; मी पुतळा उभारतो, आव्हाडांचं फडणवीसांना प्रतिआव्हान first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=107559 0
Chitra Wagh : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होवो! भाजपच्या चित्रा वाघ यांचे गणपतीला साकडे https://tejpolicetimes.com/?p=104667 https://tejpolicetimes.com/?p=104667#respond Sat, 07 Sep 2024 17:53:25 +0000 https://tejpolicetimes.com/?p=104667 Chitra Wagh : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होवो! भाजपच्या चित्रा वाघ यांचे गणपतीला साकडे

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 7 Sept 2024, 11:23 pm maharashtra election 2024 : अमोल मिटकरी यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा बाप्पाकडे व्यक्त केली आहे. अशातच आता भाजपच्या चित्रा वाघ यांनी देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई : राज्यासह संपूर्ण देशभरात गणपती उत्सव […]

The post Chitra Wagh : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होवो! भाजपच्या चित्रा वाघ यांचे गणपतीला साकडे first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Chitra Wagh : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होवो! भाजपच्या चित्रा वाघ यांचे गणपतीला साकडे

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 7 Sept 2024, 11:23 pm

maharashtra election 2024 : अमोल मिटकरी यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा बाप्पाकडे व्यक्त केली आहे. अशातच आता भाजपच्या चित्रा वाघ यांनी देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुंबई : राज्यासह संपूर्ण देशभरात गणपती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. सर्वसामान्य जनतेपासून तर अगदी राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनी बाप्पाकडे मागणं मागितले आहे. अमोल मिटकरी यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा बाप्पाकडे व्यक्त केली आहे. अशातच आता भाजपच्या चित्रा वाघ यांनी देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

चित्रा वाघ काय म्हणाल्या?

चित्रा वाघ म्हणाल्या की, ” देवेंद्र फडणवीस हे एक व्हिजन असणारे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने विकासकामांमध्ये आणि प्रगतीमध्ये एक नंबर गाठला आहे. जात पात बाजूला ठेऊन काम करणारा आमचा नेता आहे. त्यामुळे आगामी विधानसभेमध्ये भाजपच्या जास्तीत जास्त जागा निवडणून येऊ द्या. आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर काम करण्याची संधी बाप्पाने द्यावी अशी इच्छा आमची आहे. असं मागणं चित्रा वाघ यांनी बाप्पाकडे मागितले आहे.

अमोल मिटकरींनी अजित पवारांसाठी व्यक्त केली इच्छा

चित्रा वाघ यांच्या अगोदर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा गणपतीकडे व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, ”सालाबाद प्रमाणे याही वर्षी माझ्या घरी गणपतीचा उत्सव आहे. सर्व धर्म समभाव जपणारा आमचा गणपती आहे. सर्व समाजाची मुलं आमच्या गणपती उत्सवात सहभागी होतात. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहाव्यांदा राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. त्यामध्ये महिलांसाठी ई -पिंक रिक्षा योजना आहे. मोफत शिक्षणाची सुविधा आहे. शेतकऱ्यांना मोफत विजबील आहे. आणि सर्वात महत्वाची लाडकी बहिण योजना राबवण्यात आली आहे. याच योजनेच्या भरवश्यावर 2024 ची विधानसभा निवडणूक जिंकून अजितदादा पुढच्या वर्षी मुख्यमंत्री होतील आणि बाप्पाची पूजा करतील.असं मिटकरी म्हणाले आहेत.

दरम्यान, थोड्याच दिवसांत राज्यात विधान सभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरून दावे प्रतीदावे सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

अजित भाबड

लेखकाबद्दलअजित भाबडअजित भाबड, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. अजित यांनी आबासाहेब गरवारे कॉलेजमधून पत्रकारितेची मास्टर्स पदवी मिळवली आहे. त्यांना राजकीय, सामाजिक, अंतरराष्ट्रीय तसेच कृषी क्षेत्रातील विश्लेषणात्मक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

The post Chitra Wagh : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होवो! भाजपच्या चित्रा वाघ यांचे गणपतीला साकडे first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=104667 0
Indapur : हर्षवर्धन पाटील थांबणार की फडणवीसांचे पालकत्व फुसके ठरणार, असं आहे समीकरण https://tejpolicetimes.com/?p=104212 https://tejpolicetimes.com/?p=104212#respond Tue, 03 Sep 2024 11:40:33 +0000 https://tejpolicetimes.com/?p=104212 Indapur : हर्षवर्धन पाटील थांबणार की फडणवीसांचे पालकत्व फुसके ठरणार, असं आहे समीकरण

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 3 Sept 2024, 5:10 pm maharashtra election 2024 : अजित पवारांनी अप्रत्यक्षरीत्या दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आणि हर्षवर्धन पाटील यांच्या गटामध्ये मोठा गदारोळ उडाला. पुढे जाऊन हर्षवर्धन पाटलांचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी मेळावा घेत थेट तुतारीकडे जाण्याचा आग्रह धरला. हर्षवर्धन पाटलांचे कार्यकर्ते संतप्त होण्यामागे […]

The post Indapur : हर्षवर्धन पाटील थांबणार की फडणवीसांचे पालकत्व फुसके ठरणार, असं आहे समीकरण first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Indapur : हर्षवर्धन पाटील थांबणार की फडणवीसांचे पालकत्व फुसके ठरणार, असं आहे समीकरण

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 3 Sept 2024, 5:10 pm

maharashtra election 2024 : अजित पवारांनी अप्रत्यक्षरीत्या दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आणि हर्षवर्धन पाटील यांच्या गटामध्ये मोठा गदारोळ उडाला. पुढे जाऊन हर्षवर्धन पाटलांचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी मेळावा घेत थेट तुतारीकडे जाण्याचा आग्रह धरला. हर्षवर्धन पाटलांचे कार्यकर्ते संतप्त होण्यामागे केवळ अजित पवारांच्या सभेचा संदर्भ नव्हता, तर अजित पवारांची सभा आणि दुसरीकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले एक वक्तव्य कारणीभूत ठरले होते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
दीपक पडकर, इंदापुर : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाची जन सन्मान यात्रा इंदापुरात आली. इंदापुरात त्यांची भव्य दिव्य सभा देखील झाली. नंतर हीच सभा महायुतीच्या इंदापुरातील वाटचालीत मोठा मिठाचा खडा टाकणारी ठरली. कारण या सभेमध्ये अजित पवारांनी अप्रत्यक्षरीत्या दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आणि हर्षवर्धन पाटील यांच्या गटामध्ये मोठा गदारोळ उडाला. पुढे जाऊन हर्षवर्धन पाटलांचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी मेळावा घेत थेट तुतारीकडे जाण्याचा आग्रह धरला. हर्षवर्धन पाटलांचे कार्यकर्ते संतप्त होण्यामागे केवळ अजित पवारांच्या सभेचा संदर्भ नव्हता, तर अजित पवारांची सभा आणि दुसरीकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले एक वक्तव्य कारणीभूत ठरले होते. एकीकडे अजित पवारांनी संकेत दिले आणि दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी अचानकच या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटलांना जायचे असेल तर जाऊ शकतात असे थेट मत व्यक्त करून इंदापुरातील भाजपच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का दिला. यामुळे कार्यकर्ते आणखीनच चिडले.

आता या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीतील घटक पक्ष म्हणून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मध्ये झालेले मनोमिलन आता औटघटकेचेच ठरले आहे. हर्षवर्धन पाटलांनी मात्र अजून ही संयमाची भूमिका ठेवली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी काही भूमिका व्यक्त न करताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट मत व्यक्त केल्याने हर्षवर्धन पाटील देखील दुखावले आहेत. आपण भाजपमध्ये काही मागण्यासाठी गेलो नव्हतो. आपला जो अनुभव होता, त्या अनुभवाचा फायदा भाजपने करून घ्यायला हवा होता. अशा शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी थेट नाराजी व्यक्त केली. संपूर्ण राज्यात इतर कुठेच काही घडत नाही, मात्र प्रत्येक वेळी इंदापूरच्या जागी बाबत तिढा निर्माण होतो अशा शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या स्वपक्षाला देखील फटकारले.
Maharashtra BJP: लोकसभेला कामगिरी दमदार; भाजपनं विदर्भात उतरवले २९ पैकी २९ जागा जिंकणारे ४ शिलेदार

येत्या दोन तीन दिवसात निर्णय जाहीर करणार

हर्षवर्धन पाटलांनी येत्या तीन ते चार दिवसांमध्ये आपण प्रमुख पदाधिकाऱ्यांशी गावागावातील नेत्यांशी बोलून निर्णय जाहीर करणार आहोत असे सांगितले आहे. एकंदरीत हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा कल हा हर्षवर्धन पाटलांनी अपक्ष उमेदवारी जाहीर करावी अथवा थेट तुतारी हातात घ्यावी अशा स्वरूपाचा आहे. अर्थात तुतारीकडेच जाण्याकडे सर्वांचा कल आहे. त्याला कारण असे की, जर अपक्ष उमेदवारी जाहीर केली. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील इंदापुरात स्वतःचा उमेदवार उभा करू शकतो. अशा पार्श्वभूमीवर मतांचे विभाजन होऊन हर्षवर्धन पाटलांना फटका बसू शकतो. हा फटका टाळायचा असेल तर तुतारीकडे जाण्याशिवाय पर्याय नाही असेच मत प्रमुख पदाधिकाऱ्यांचे आहे. सध्या तरी हर्षवर्धन पाटील यांनी वेट अँड वॉच ची भूमिका घेतली असून ते देवेंद्र फडणवीस यांना देखील भेटणार आहेत. अर्थात दोन दिवसापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील आमचे नेते आहेत. इंदापूरचा तिढा निर्माण झाला आहे. आमच्या समोर पेच आहे, मात्र तो चर्चा करून सोडू असे वक्तव्य केले आहे. खरोखरच देवेंद्र फडणवीस यांना हा तिढा सोडवता आला तर भाजपमधील इतरही पदाधिकाऱ्यांचे आउटगोइंग फडणवीस थांबवू शकतात.

मात्र, जर हर्षवर्धन पाटील इतरत्र गेले, तर त्याचा मोठा फटका भाजपला बसू शकतो, कारण हर्षवर्धन पाटील हे मोठे नेते आहेत. त्यांच्या जाण्याने भाजपचे मोठे नुकसान होऊ शकते. अगोदरच मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेले आहेत. हर्षवर्धन पाटील जर पुन्हा त्याच मार्गाने गेले तर भाजपमध्ये यापूर्वी 2014 ते 19 च्या दरम्यान आलेले काँग्रेसचे अनेक नेते पुन्हा आपापल्या पक्षात परतू शकतात.

या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटलांचे जाणे भाजपला परवडणार नाही, याचीही जाणीव भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला आहे. मात्र जिंकणाऱ्याची जागा हे गृहीत आणि महायुतीतील जागा वाटपाचे गणित मेळात धरले तर इंदापूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्याच पक्षाला द्यावी लागेल. अशा वेळी देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेच्या निवडणुकी वेळी अजित पवारांसोबत मनोमिलन करण्यासाठी हर्षवर्धन पाटलांच्या उपस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांना दिलेले पालकत्वाचे आश्वासन फुसके ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील येत्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेले तर नवल वाटायला नको.

अजित भाबड

लेखकाबद्दलअजित भाबडअजित भाबड, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. अजित यांनी आबासाहेब गरवारे कॉलेजमधून पत्रकारितेची मास्टर्स पदवी मिळवली आहे. त्यांना राजकीय, सामाजिक, अंतरराष्ट्रीय तसेच कृषी क्षेत्रातील विश्लेषणात्मक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

The post Indapur : हर्षवर्धन पाटील थांबणार की फडणवीसांचे पालकत्व फुसके ठरणार, असं आहे समीकरण first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=104212 0
फलटणला २३ वर्षांनी हक्काचं पाणी मिळतंय, पाणी चोरणाऱ्यांना आम्ही पकडणार: देवेंद्र फडणवीस https://tejpolicetimes.com/?p=78859 https://tejpolicetimes.com/?p=78859#respond Wed, 17 Jan 2024 14:14:09 +0000 https://tejpolicetimes.com/?p=78859 फलटणला २३ वर्षांनी हक्काचं पाणी मिळतंय, पाणी चोरणाऱ्यांना आम्ही पकडणार: देवेंद्र फडणवीस

सातारा : फलटण तालुक्याला २३ वर्षांनी हक्काचं पाणी मिळतंय, अनेक प्रकारच्या चोऱ्या पाहिल्या, पण पाण्याची चोरी पाहिली नव्हती. मी राज्याचा गृहमंत्री असल्यानं चोरी केलेल्याला पकडण्याचं काम माझ्या खात्याचं आहे. त्याला आम्ही पकडूच, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांनी केली. सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नीरा देवघर उजवा कालव्याचे बंदिस्त पाईप लाईन कामाचा […]

The post फलटणला २३ वर्षांनी हक्काचं पाणी मिळतंय, पाणी चोरणाऱ्यांना आम्ही पकडणार: देवेंद्र फडणवीस first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
फलटणला २३ वर्षांनी हक्काचं पाणी मिळतंय, पाणी चोरणाऱ्यांना आम्ही पकडणार: देवेंद्र फडणवीस

सातारा : फलटण तालुक्याला २३ वर्षांनी हक्काचं पाणी मिळतंय, अनेक प्रकारच्या चोऱ्या पाहिल्या, पण पाण्याची चोरी पाहिली नव्हती. मी राज्याचा गृहमंत्री असल्यानं चोरी केलेल्याला पकडण्याचं काम माझ्या खात्याचं आहे. त्याला आम्ही पकडूच, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांनी केली. सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नीरा देवघर उजवा कालव्याचे बंदिस्त पाईप लाईन कामाचा शुभारंभ प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

पश्चिम महाराष्ट्राच्या एका नेत्यावर फडणवीसांनी ही टीका केली. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या पवारांवर टीका केली? शरद पवार की अजित पवार…,याची चर्चा मात्र सुरु झाली. २३ वर्षानंतर फलटण तालुक्याच्या हक्काचे पाणी या तालुक्याला मिळाले आहे.
नेहमी लोकं उन्हात आणि नेते सावलीत असतात पण आज नेते आणि लोकं दोन्ही उन्हात आहेत.
तरुणी झोपेत असताना घरात शिरला; चाकूने वार, नंतर स्वत:चं जीवन संपवण्याचा प्रयत्न, तरुणाच्या कृत्यानं गावात खळबळ
ज्याला दुष्काळी म्हटले त्याचा डाग मिटण्याचे काम करणार आहोत. आज हक्काचे पाणी मिळणार आहे. आज फलटणमध्ये रामायणाचा नवा अध्याय सुरू करत आहोत. येत्या काळात नवीन भारत आणि महाराष्ट्र उभा राहणार आहे. अनेक प्रकारच्या चोऱ्या ऐकल्या होत्या, पण पाण्याची चोरी पाहायला मिळाली नाही. गृहमंत्री मीच आहे. जो कुणी चोरली त्याला दंड करण्याची जबाबदारी आमची आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज २३ वर्षांनी पाणी तुम्हाला मिळत आहे. हे काम जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पैशाची चणचण भासणार नाही.
वेध लोकसभा निवडणुकीचा : शिर्डीत महायुतीची ताकद पण पवार-ठाकरेंना मोठी सहानुभूती, लोकसभेला काय होऊ शकतं? वाचा…
लोकांचे वय वाढते, पण शहाजी बापूचे वय कमी व्हायला लागले. ते स्मार्ट दिसायला लागले आहेत, अशी मिस्कील टिप्पणी करत शहाजी बापूंचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले.
HDFC बँकेच्या गुंतवणुकदारांना १ लाख कोटींचा झटका, शेअरमध्ये ३ वर्षातील सर्वात मोठी घसरण
लोकांचे वय वाढते, पण शहाजी बापूचे वय कमी व्हायला लागले. ते स्मार्ट दिसायला लागले आहेत, अशी मिस्कील टिप्पणी करत शहाजी बापूंचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले.

आपण गेल्या १३ महिन्यात ८ योजनांना मान्यता दिलीय. मीही विदर्भ या दुष्काळी भागातून येतो. त्यामुळे याचे दुःख मला माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदींना भेटून सांगितले, की आमच्या शेतकऱ्यांना योजना द्या. त्यांनी बळीराजा योजना दिली, असेही फडणवीस यांनी सांगितले.

दुष्काळ संपवण्यासाठी शेतीच्या बांधावर पोहचवणार आहे, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. या भागात तरुणांना रोजगाराच्या संधी प्राप्त करण्यासाठी उद्योग आणण्याचे काम करत आहे. जे काम करतात, त्यांना आशीर्वाद द्या. आम्ही या नेत्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. आपल्या जिल्ह्यात नवीन कॉरिडॉर होत आहे. त्यामुळे येथील तरुणांना रोजगार येणार आहेत, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

पुराचे पाणी कुणाच्या मालकीचे नाही म्हणून आम्ही योजना करण्याचे आखली. हे पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळवले, तर मोठा फायदा येथील जनतेला होईल. हा ३३०० कोटींचा प्रकल्प आहे. त्याला केंद्र सरकारने तत्वतः मान्यताही दिली आहे. पुराचे पाणी शहरात घुसणार नाही त्याचा फायदा दुष्काळी भागातील १० लाख कुटुंबातील लोकांना होणार आहे. त्यामुळे चार लाख लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, अशी फडणवीस यांनी शेवटी सांगितले.

Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

The post फलटणला २३ वर्षांनी हक्काचं पाणी मिळतंय, पाणी चोरणाऱ्यांना आम्ही पकडणार: देवेंद्र फडणवीस first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=78859 0
‘लव्ह जिहाद’च्या कायद्यासाठी अभ्यास सुरू, देवेंद्र फडणवीसांची माहिती https://tejpolicetimes.com/?p=52347 https://tejpolicetimes.com/?p=52347#respond Sat, 10 Dec 2022 00:23:03 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%b2%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8/ ‘लव्ह जिहाद’च्या कायद्यासाठी अभ्यास सुरू, देवेंद्र फडणवीसांची माहिती

नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’चा कायदा आणायचा की नाही याबाबत अद्याप आमचा निर्णय झालेला नाही. आम्ही पडताळणी करीत आहोत. वेगवेगळ्या राज्यांनी काय कायदे केले याचा अभ्यास करीत आहोत’ अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर भेटीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि काही नियोजित कार्यक्रमांच्या निमित्ताने फडणवीस शुक्रवारी नागपुरात […]

The post ‘लव्ह जिहाद’च्या कायद्यासाठी अभ्यास सुरू, देवेंद्र फडणवीसांची माहिती first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘लव्ह जिहाद’च्या कायद्यासाठी अभ्यास सुरू, देवेंद्र फडणवीसांची माहिती

नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’चा कायदा आणायचा की नाही याबाबत अद्याप आमचा निर्णय झालेला नाही. आम्ही पडताळणी करीत आहोत. वेगवेगळ्या राज्यांनी काय कायदे केले याचा अभ्यास करीत आहोत’ अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर भेटीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि काही नियोजित कार्यक्रमांच्या निमित्ताने फडणवीस शुक्रवारी नागपुरात आले होते. विमानतळावर पत्रकारांनी त्यांना ‘लव्ह जिहाद’बाबत छेडले. येत्या हिवाळी अधिवेशनात आपण ‘लव्ह जिहाद’ संदर्भात कायदा आणणार आहात का? असा प्रश्न केला असता, त्यांनी अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगतानाच, पडताळणी आणि अभ्यास सुरू असल्याचे स्पष्ट केले. महाविकास आघाडीच्या खासदारांनी गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली भेट ही चांगली गोष्ट आहे. ‘राज्याच्या विकासाचे प्रश्न घेऊन ते भेटले असतील तर चांगलेच आहे.’ असे फडणवीस म्हणाले. या भेटीचे निमंत्रण देऊनही शिंदे गटाचे खासदार गेले नव्हते, असे निदर्शनास आणून दिले असता, ‘ शिंदे गटाचे खासदार त्यांना नेहमीच भेटत असतात’ असे उत्तर त्यांनी दिले.

मुंबई-अहमदाबाद ‘बुलेट’चा मार्ग मोकळा; खारफुटीच्या सुमारे २२ हजार झुडपांची होणार कत्तल
आघाडीने रखडविले नागपूरचे प्रकल्प

‘नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्प आणि मेट्रो टप्पा दोन या दोन्ही प्रकल्पांचे प्रस्ताव आम्ही २०१९पूर्वी केंद्राकडे पाठविले होते. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. या प्रकल्पाच्या बाबतीत केंद्र सरकारने काढलेल्या छोट्या-छोट्या त्रुटींची पूर्तता आघाडी सरकारने दोन अडीच वर्षे केली नाही. त्यामुळे हे प्रकल्प रखडले होते. आम्ही त्रुटी दूर केल्यानंतर अवघ्या २७ दिवसात केंद्राने त्यांना मंजुरी दिली. या दोन्ही प्रकल्पाने नागपूरच्या विकासाला गती मिळेल. गेम चेंजर ठरणारा समृद्धी, नाग नदी, मेट्रो या तिन्ही प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे हा ऐतिहासिक दिवस येतो आहे, असे फडणवीस म्हणाले.

Source link

The post ‘लव्ह जिहाद’च्या कायद्यासाठी अभ्यास सुरू, देवेंद्र फडणवीसांची माहिती first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=52347 0