Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
पालघर बातम्या - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Mon, 18 Nov 2024 07:52:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg पालघर बातम्या - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 बोईसर विधानसभेत बविआसमोर मोठे आव्हान; सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, कोण मारणार बाजी? https://tejpolicetimes.com/?p=109144 https://tejpolicetimes.com/?p=109144#respond Mon, 18 Nov 2024 07:52:15 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109144 बोईसर विधानसभेत बविआसमोर मोठे आव्हान; सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, कोण मारणार बाजी?

Boisar Assembly constituency : बहुजन विकास आघाडीला बोईसरची जागा टिकविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहे. तर उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराचे व एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवाराचे भवितव्य त्यांच्या मित्र पक्षांच्या सहकार्यावर अवलंबून असणार आहे. महाराष्ट्र टाइम्सbhoisar पालघर : जिल्ह्यातील बोईसर विधानसभा मतदारसंघात एकूण सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून मुख्य लढत बहुजन विकास आघाडी, शिवसेना उद्धव ठाकरे […]

The post बोईसर विधानसभेत बविआसमोर मोठे आव्हान; सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, कोण मारणार बाजी? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
बोईसर विधानसभेत बविआसमोर मोठे आव्हान; सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, कोण मारणार बाजी?

Boisar Assembly constituency : बहुजन विकास आघाडीला बोईसरची जागा टिकविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहे. तर उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराचे व एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवाराचे भवितव्य त्यांच्या मित्र पक्षांच्या सहकार्यावर अवलंबून असणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स
bhoisar

पालघर : जिल्ह्यातील बोईसर विधानसभा मतदारसंघात एकूण सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून मुख्य लढत बहुजन विकास आघाडी, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यात दिसून येत आहे. विशेष म्हणजे बहुजन विकास आघाडीला बोईसरची जागा टिकविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहे. तर उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराचे व एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवाराचे भवितव्य त्यांच्या मित्र पक्षांच्या सहकार्यावर अवलंबून असणार आहे.

पालघर आणि वसई तालुक्यात पसरलेल्या या मतदारसंघात एकूण ४ लाख ११ हजार मतदारसंख्या आहे. बोईसर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव पाड्यातील मतदारापर्यंत पोहोचणे उमेदवारांना आव्हानात्मक ठरत आहे. निवडणुकीचा प्रचार संपण्यास अवघे काही तास उरले असून सोमवारी सायंकाळी पाच वाजता प्रचार संपणार आहे. त्यामुळे या उरलेल्या काही तासांत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढावा लागणार आहे. बोईसर विधानसभा मतदारसंघात बविआचे राजेश पाटील, उद्धव ठाकरे गटाचे डॉक्टर विश्वास वळवी आणि एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे विलास तरे या तीन उमेदवारांमध्ये मुख्य लढत होण्याची शक्यता असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पक्ष तसेच जिपकास पक्ष यांचे उमेदवार रिंगणात आहेत. येथील मतदान टक्केवारी विजयाचे समीकरण ठरणार आहे.
भरलेल्या बॅगा मातोश्रीत, रिकाम्या बॅगा बाहेर निघतात; ठाकरेंच्या बॅग तपासणीवरुन शिंदेंचा टोला
महायुतीचे उमेदवार विलास तरे यांच्या प्रचारासाठी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोर येथे जाहीर सभा घेतली. मात्र सभेसाठी आलेल्या नागरिकांमध्ये उत्साह दिसला नाही. तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी मुख्यमंत्र्याच्या जाहीर सभेमध्ये सामील होण्याचे टाळल्याने महायुतीमधील वाद उघड झाला आहे. त्यामुळे हा बेबनाव मतदान संपेपर्यंत राहिल्यास वेगळे गणित निवडणुकीत दिसून येऊन त्याचे निकाली वेगळे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
MBBSच्या १८ वर्षीय विद्यार्थ्याचा रॅगिंगमुळे मृत्यू; तीन तास अघोरी शिक्षा, कॉलेजमध्ये खळबळ
पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व महायुतीचे जिल्ह्यातील नेते प्रकाश निकम यांनी विक्रमगड मतदारसंघातील महायुतीमधील भाजपचे अधिकृत उमेदवार हरिश्चंद्र भोये यांच्याविरोधात बंडखोरी केल्याने त्याचे पडसाद संपूर्ण पालघर जिल्ह्यात आजही उमटत आहेत. तर पालघर विधानसभेचे व बोईसर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनुक्रमे जयेंद्र दुबळा व डॉ. विश्वास वळवी यांच्यासाठी बोईसर येथे प्रचारसभा घेतली असून बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्व हितेंद्र ठाकूर हे कॉर्नर मीटवर राजेश पाटील यांच्यासाठी भर देताना दिसून येत आहेत.
Maharashtra Election 2024: प्रचाराच्या तोफा आज थंडावणार; उरले फक्त काही तास, छुप्या प्रचारावर करडी नजर
पाटील हे मात्र स्वतः प्रचारफेरीच्या माध्यमातून घरोघरी जाऊन मतदाराची थेट संपर्क साधत आहेत. त्याने मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा आढावा असून मतदान करण्याचे आवाहन करताना दिसून येत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपचे डॉ. हेमंत सावरा यांना १ लाख ०४ हजार ४३९ मतदान झाले होते.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post बोईसर विधानसभेत बविआसमोर मोठे आव्हान; सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, कोण मारणार बाजी? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109144 0
Palghar Explosion: मध्यरात्रीच्या सुमारास भीषण स्फोट, भिंती कोसळल्या, चौघे जखमी, बोईसरमध्ये नागरिकांत घबराट https://tejpolicetimes.com/?p=106866 https://tejpolicetimes.com/?p=106866#respond Thu, 31 Oct 2024 09:17:50 +0000 https://tejpolicetimes.com/?p=106866 Palghar Explosion: मध्यरात्रीच्या सुमारास भीषण स्फोट, भिंती कोसळल्या, चौघे जखमी, बोईसरमध्ये नागरिकांत घबराट

Boisar Unknown Object Blast: बोईसर येथे एका घरात भीषण स्फोट झाला. या स्फोटात चार जण जखणी झाल्याची माहिती आहे. तर घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. Lipi नमित पाटील, पालघर: बोईसर येथे एका चाळीत अज्ञात वस्तूचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या भीषण स्फोटात चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी तात्काळ खासगी […]

The post Palghar Explosion: मध्यरात्रीच्या सुमारास भीषण स्फोट, भिंती कोसळल्या, चौघे जखमी, बोईसरमध्ये नागरिकांत घबराट first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Palghar Explosion: मध्यरात्रीच्या सुमारास भीषण स्फोट, भिंती कोसळल्या, चौघे जखमी, बोईसरमध्ये नागरिकांत घबराट

Boisar Unknown Object Blast: बोईसर येथे एका घरात भीषण स्फोट झाला. या स्फोटात चार जण जखणी झाल्याची माहिती आहे. तर घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Lipi

नमित पाटील, पालघर: बोईसर येथे एका चाळीत अज्ञात वस्तूचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या भीषण स्फोटात चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

एका खोलीत भीषण स्फोट, चार जखमी

पालघर तालुक्यातील बोईसर परिसरातील अवधनगर येथे असलेल्या दुबे चाळीतील एका खोलीत हा भीषण स्फोट झाल्याची घटना घडल्याची माहिती आहे. अचानक स्फोट झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आणि परिसरात सर्वत्र घबराट पसरली. बुधवारी रात्री साडे अकरा-पावणेबारा वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य हाती घेण्यात आले. या स्फोटात दोन मुले, एक पुरुष, एक महिला असे एकूण चार जण जखमी झाल्याची माहिती आहे.
Devendra Fadnavis: भाजपचा मुख्यमंत्री होणार; फडणवीसांनी मित्राचं वक्तव्य खोडलं, म्हणाले – राज ठाकरेंचे आभार पण…
जखमींना उपचारासाठी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र, या स्फोटामुळे चाळीतील खोलींच्या भिंती कोसळल्या आहेत. तसेच, आजूबाजूच्या घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि घटनास्थळाची पाहणी केली. तसेच, श्वान पथकाला देखील सदर ठिकाणी पाचारण करून त्यामार्फत देखील तपास करण्यात आला आहे. त्याशिवाय, फॉरेन्सिक टीम मार्फत देखील घटनेता तपास करण्यात येत आहे.

Palghar Explosion: मध्यरात्रीच्या सुमारास भीषण स्फोट, भिंती कोसळल्या, चौघे जखमी, बोईसरमध्ये नागरिकांत घबराट

सिलेंडर फुटल्याने हा भीषण स्फोट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, चाळीतील एका खोलीतील कपाटातील संशयास्पद वस्तू किंवा फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने वर्तवला आहे. तरी, या भीषण स्फोटाचे खरं कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिसांमार्फत सुरू आहे. तरी, नागरिकांमध्ये या घटनेने घबराट पसरली आहे.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

The post Palghar Explosion: मध्यरात्रीच्या सुमारास भीषण स्फोट, भिंती कोसळल्या, चौघे जखमी, बोईसरमध्ये नागरिकांत घबराट first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=106866 0
Palghar News: आदिवासींच्या मिठाईची परदेशवारी; खव्वयांची रसना भागवणार मोहाचे लाडू https://tejpolicetimes.com/?p=106764 https://tejpolicetimes.com/?p=106764#respond Wed, 30 Oct 2024 09:02:30 +0000 https://tejpolicetimes.com/?p=106764 Palghar News: आदिवासींच्या मिठाईची परदेशवारी; खव्वयांची रसना भागवणार मोहाचे लाडू

Edited byकिशोरी तेलकर | Contributed by हुसेन मेमन | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 30 Oct 2024, 2:32 pm Palghar News: शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचा स्तुत्य उपक्रम साकारला आहे. याच उपक्रमाद्वारे पालघर तसेच, अन्य आदिवासी जिल्ह्यांतील आदिवासींनी तयार केलेली मिठाई परदेशवारीला निघाली आहे. महाराष्ट्र टाइम्सpalghar sweet जव्हार : जंगलात राहणारा आदिवासी जनसमुदाय ऋतूमानानुसार उपलब्ध […]

The post Palghar News: आदिवासींच्या मिठाईची परदेशवारी; खव्वयांची रसना भागवणार मोहाचे लाडू first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Palghar News: आदिवासींच्या मिठाईची परदेशवारी; खव्वयांची रसना भागवणार मोहाचे लाडू

Edited byकिशोरी तेलकर | Contributed by हुसेन मेमन | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 30 Oct 2024, 2:32 pm

Palghar News: शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचा स्तुत्य उपक्रम साकारला आहे. याच उपक्रमाद्वारे पालघर तसेच, अन्य आदिवासी जिल्ह्यांतील आदिवासींनी तयार केलेली मिठाई परदेशवारीला निघाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स
palghar sweet

जव्हार : जंगलात राहणारा आदिवासी जनसमुदाय ऋतूमानानुसार उपलब्ध होत असलेल्या रानमेव्यातून आपली गुजराण करतो. विशेष म्हणजे यातील पोषणयुक्त भाग तथा औषधी, सुगंधी वनस्पतीचा समावेशही आहारात करून आरोग्यसंपन्न जीवनपद्धतीचा अवलंब करतो. हीच आदिवासींची जीवनपद्धती आणि त्यांच्या पदार्थांपासून तयार झालेले विविध मेनू इतर नागरिकांच्याही आहारात यावेत, यासाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचा स्तुत्य उपक्रम साकारला आहे. याच उपक्रमाद्वारे पालघर तसेच, अन्य आदिवासी जिल्ह्यांतील आदिवासींनी तयार केलेली मिठाई परदेशवारीला निघाली आहे.

आदिवासींचा कल्पवृक्ष म्हणजे ‘मोहू’. जंगलात आपोआप उगवणाऱ्या या वृक्षाचे अनेक फायदे आहेत. या मोहाच्या फुलांपासून बनवलेली मिठाई, अनेकविध फुलांपासून तयार झालेले मध, धान्यांची भाकरी वा पापडच नव्हे, तर मधुर चवीचे लाडू खवय्यांची रसना भागवण्यासाठी सज्ज झाले आहेत. आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या हस्तकृतींसह खास रानाची चव असणाऱ्या खाद्यपदार्थांना नवे रूप देत दीपोत्सवाचे औचित्य साधत आदिवासी मिठाईचा गोडवा जगभर पोहोचवण्यासाठी ‘शबरी नॅचरल्स’चे प्रयत्न सुरू आहेत.

बांबूपासून बनवलेल्या प्रकाशाच्या माळा असोत, थेट शेतातील तांदूळ, विविध फुलांपासून तयार झालेले मध असो वा ज्वारी, नागलीपासून तयार केलेले लाडू, इतकेच नव्हे तर जिभेला अगदी नव्या चवीची अनुभूती देणारे मोह फुलापासून बनवण्यात आलेले लाडू…. असे कितीतरी प्रकार शबरी नॅचरल्सच्या माध्यमातून अवघ्या जगाला मिळणार आहेत.आदिवासी संस्कृतीला जागतिक व्यासपीठावर नवी ओळख करून देण्यासाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाने पावले उचलली आहेत.

‘शबरी नॅचरल्स’ ही शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांची संकल्पना. राज्यभरातून आदिवासी बांधवांनी हस्तकलेच्या माध्यमातून बनवलेल्या उत्कृष्ट उत्पादनांना जागतिक व्यासपीठ मिळवून आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावतानाच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे प्रयत्न शबरी नॅचरल्सच्या माध्यमातून सुरू आहेत. या महामंडळाच्या वतीने राज्यभरातील आदिवासी बांधवांच्या शेतकरी उत्पादक संघटनांना वित्तपुरवठा केला जातो. ‘शबरी नॅचरल्स’ या नव्या ब्रँडखाली बाजारपेठेत उत्पादने दाखल होत आहेत. ही सारी उत्पादने बहुतांश सर्वच ई-मार्केट प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.
भाजपचे पराग शहा ठरले राज्यातील सर्वांत श्रीमंत उमेदवार; संपत्ती ५ वर्षांत दहापट वाढ, एकूण संपत्ती किती?
शबरी नॅचरल्स ब्रँडच्या माध्यमातून पौष्टिक अन्नपदार्थ ग्राहकांना उपलब्ध होत आहेत. या ब्रँडचे देशभरासह विदेशातही मार्केटिंग करून त्याला जागतिक दर्जा प्राप्त करून दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आम्ही ४० लाखांचे उद्दिष्ट ठेवले असून, लवकरच हा व्यवसाय कोट्यवधी रुपयांचा टप्पा गाठेल. – लीना बनसोड, व्यवस्थापकीय संचालक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ
मोठी बातमी! पश्चिम रेल्वेचा नवा नियम, आता ट्रेनमधून अधिक सामान नेल्यास होणार कारवाई
जंगलात बाराही महिने रानमेवा उपलब्ध असतो, मात्र, यातून रोजगार उपलब्ध होऊन आर्थिक लाभ होईल, याचा स्वप्नातही विचार केला नव्हता, मात्र शबरी महामंडळाच्या माध्यमातून आमच्यासारख्या आदिवासी महिला व पुरुषांना रोजगाराची एक चांगली संधी मिळाली आहे. –दिपाली दोधाड, लाभार्थी महिला

शबरी’च्या माध्यमातून आदिवासींची कला, वस्तू व जंगलात उपलब्ध होणाऱ्या जिन्नस लाभाच्या कशा आहेत, याबाबत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून आर्थिक सुबत्ता मिळण्यास मदत झाली. – सेवा नडगे, लाभार्थी महिला

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post Palghar News: आदिवासींच्या मिठाईची परदेशवारी; खव्वयांची रसना भागवणार मोहाचे लाडू first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=106764 0
‘स्थानिकां’चा वरचष्मा की युती-आघाडीला संधी? सेनेचा बालेकिल्ला पालघर विधानसभेची स्थिती काय? https://tejpolicetimes.com/?p=106191 https://tejpolicetimes.com/?p=106191#respond Sat, 26 Oct 2024 08:35:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=106191 ‘स्थानिकां’चा वरचष्मा की युती-आघाडीला संधी? सेनेचा बालेकिल्ला पालघर विधानसभेची स्थिती काय?

Palghar Vidhan Sabha: मागील निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र होते. ‘बविआ’सोबत असलेला काँग्रेस-राष्ट्रवादी (शप)आता महाविकास आघाडीमघ्ये आहे. महायुती आणि महाविकास आघाडी रिंगणात असणार आहे. महाराष्ट्र टाइम्सpalghar vote वैष्णवी राऊत/नरेंद्र पाटील/मच्छिंद्र आगिवले/अनिरुद्ध पाटील, पालघर : जिल्ह्यातील वसई, नालासोपारा आणि बोईसर या तीन मतदारसंघांत बहुजन विकास आघाडीचे (बविआ) आमदार असून, पालघरमध्ये शिवसेनेचे श्रीनिवास वनगा, विक्रमगडमध्ये शरद पवार गटाचे सुनील […]

The post ‘स्थानिकां’चा वरचष्मा की युती-आघाडीला संधी? सेनेचा बालेकिल्ला पालघर विधानसभेची स्थिती काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘स्थानिकां’चा वरचष्मा की युती-आघाडीला संधी? सेनेचा बालेकिल्ला पालघर विधानसभेची स्थिती काय?

Palghar Vidhan Sabha: मागील निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र होते. ‘बविआ’सोबत असलेला काँग्रेस-राष्ट्रवादी (शप)आता महाविकास आघाडीमघ्ये आहे. महायुती आणि महाविकास आघाडी रिंगणात असणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स
palghar vote

वैष्णवी राऊत/नरेंद्र पाटील/मच्छिंद्र आगिवले/अनिरुद्ध पाटील, पालघर : जिल्ह्यातील वसई, नालासोपारा आणि बोईसर या तीन मतदारसंघांत बहुजन विकास आघाडीचे (बविआ) आमदार असून, पालघरमध्ये शिवसेनेचे श्रीनिवास वनगा, विक्रमगडमध्ये शरद पवार गटाचे सुनील भुसार आणि डहाणू मतदारसंघात विनोद निकोले आमदार आहेत. स्थानिक पक्ष असूनही ‘बविआ’ने या मतदारसंघावर आपला वरचष्मा ठेवला आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत इथे हेमंत सावरा निवडून आल्याने भाजपचे या मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रात स्वारस्य वाढले आहे. ‘बविआ’साठी ही अस्तित्वाची लढाई आहे, तर युती-आघाडी पालघर जिंकण्यासाठी जोर लावणार आहे. त्यामुळे मतदार इथे कुणाला संधी देणार, हे महिनाभरात स्पष्ट होणार आहे.

स्थानिक मतदार निर्णायक
वसई

वसई हा जवळपास तीन लाख ५१ हजार मतदार असलेल्या मतदारसंघ असून, तो नायगावपासून वसई ते अर्नाळा असा मुख्यतः पश्चिम पट्ट्यात पसरला आहे. या मतदारसंघात पूर्वीपासून राहणाऱ्या स्थानिक मतदारांची संख्या मोठी आहे. या भागात कोळी, आगरी, वाडवळ, भंडारी, ख्रिस्ती, मुस्लिम आणि गुजराती असे विविध जाती-धर्मांचे मतदार असून, त्यांची मते निर्णायक आहेत.

वसई मतदारसंघ हा ‘बविआ’चा बालेकिल्ला समजला जातो. पक्षाध्यक्ष तथा विद्यमान आमदार हितेंद्र ठाकूर हे या मतदारसंघातून १९९०पासून निवडणूक लढवत आहेत. सातपैकी सहा वेळा पक्षाने हा मतदारसंघ हातात ठेवला आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर, ‘ही माझी शेवटची निवडणूक असेल’, असे ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. मात्र २०२४च्या निवडणुकीआधी पुन्हा निवडणूक लढवणार असल्याचे सांगत ते रिंगणात उतरले आहेत. वसईतून महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे विजय पाटील पुन्हा इच्छुक आहेत. मागील निवडणुकीत ते शिवसेनेत होते. तेव्हा त्यांचा ठाकूर यांनी जवळपास २६ हजार मतांनी पराभव केला होता. आता महायुतीतर्फे भाजपचे मनोज पाटील, रामदास मेहेर अशा संभाव्य उमेदवारांचेदेखील आव्हान असणार आहे. मागील निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र होते. ‘बविआ’सोबत असलेला काँग्रेस-राष्ट्रवादी (शप)आता महाविकास आघाडीमघ्ये आहे. महायुती आणि महाविकास आघाडी रिंगणात असणार आहे. शिंदे गटदेखील सक्रिय झाला आहे. त्यामुळे येथील स्थानिक मतदार नेमके कोणाला साथ देतात, यावर या मतदारसंघाचा निर्णय ठरणार आहे.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपींनी सांगितलं धक्कादायक कारण, भाईसाठी केलं…
बविआ’ गड राखणार?
नालासोपारा

नालासोपारा जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे जवळपास पाच लाख ९८ हजार मतदार असलेला मतदारसंघ आहे. वैतरणापासून ते बरफ पाडा, विरारमधील समेळपाडा, बोळींज, तुळींज, वलई पाडा, मनवेलपाडा अशी याची हद्द आहे. या मतसंघात परप्रांतीय मतदार सर्वाधिक असून, त्यांची संख्या ४६ टक्क्यांच्या घरात आहे. तेथील समस्यांवर ‘बविआ’कडून नेहमी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो. शिवाय महापालिकेमध्ये सत्ता असल्यामुळे या भागातील प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा या पक्षाकडून केला जात असल्याने इथे ‘बविआ’ला मानणारा मोठा वर्ग आहे.

२००९मध्ये वसई मतदारसंघ विभागून तयार करण्यात आलेल्या नालासोपारा मतदारसंघात आतापर्यंत ‘बविआ’चेच वर्चस्व राहिले आहे. पक्षाचे क्षितिज ठाकूर सलग तीन वेळा निवडून आले असून यंदाही ते रिंगणात आहेत. २०१९च्या निवडणुकीत सेना-भाजप युती होती. नालासोपारा हा भाजपने बांधलेला मतदारसंघ होता. पक्षाचे राजन नाईक त्यावेळी इच्छुक असताना शिवसेनेने नालासोपारा आपल्या पदरात पाडून घेत उत्तर भारतीय मतदारांच्या जोरावर चकमकफेक अधिकारी प्रदीप शर्मा यांना उमेदवारी दिली. त्यावेळी भाजपची नाराजी ‘बविआ’च्या पथ्यावर पडली क्षितीज ठाकूर ४३ हजार मतांनी निवडून आले. परंतु आता शिवसेनेकडून हा मतदारसंघ भाजपने पुन्हा मिळवला आहे. यामध्ये महायुतीतर्फे भाजपने राजन नाईक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतर्फे पंकज देशमुख रिंगणात असण्याची शक्यता आहे. तर माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी राजकीय पुनरामन केले असून, स्वराज्य अभियानाची स्थापना केली आहे. तेही या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. यातच मनेसेने विनोद मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे ‘बविआ’ हा गड राखणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Chhagan Bhujbal: सगळ्या पुतण्यांचा डीएनए सारखाच; भुजबळांकडून थेट अजित पवारांचे उदाहरण
अटीतटीची तिरंगी लढत!
बोईसर

साधारण चार लाखांहून अधिक मतदार असलेला पालघर जिल्ह्यातील बोईसर हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघाचा निम्मे म्हणजेच ५० टक्के भाग हा वसई-विरार महापालिकेमध्ये, तर अर्धा भाग पालघर जिल्ह्यात मोडतो. वसई पूर्वेच्या गोखिवरे, वालीव नालासोपारामधील संतोष भुवन, पेल्हारपासून मांडवीपर्यंतचा भाग, तर पालघरमधील सफाळे, मनोर आणि बोईसर शहराचा समावेश या मतदारसंघात होतो. यात उत्तर भारतीय मतदारांची संख्या २५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. बोईसर हा औद्योगिक पट्टा आहे. येथील बहुतांश कामगार वर्ग हा उत्तर भारतीय आहे. तर मनोर, तारापूर हा मुस्लिमबहुल भाग आहे.

या मतदारसंघात २००९पासून ‘बविआ’चाच आमदार निवडून येत असून यंदाही पक्षातर्फे विद्यमान आमदार राजेश पाटील हे रिंगणात आहेत. २०१९च्या निवडणुकीत राजेश पाटील यांचा निसटता विजय झाला होता. यंदा महायुतीसोबत महाविकास आघाडीचेही आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. २०१९मध्ये सेना-भाजप युतीमधील शिवसेनेच्या विलास तरे यांचे आव्हान त्यांच्यासमोर होते. मात्र तेव्हा भाजपतर्फे तिकीट न मिळाल्याने संतोष जनाठे यांनी बंडखोरी केली होती. ही बंडखोरी ‘बविआ’च्या पथ्यावर पडली होती. राजेश यांना ७८ हजार ७०३, तर तरे यांना ७५ हजार ९५१ मते मिळाली होती. बंडखोर जनाठे यांना ३० हजार ९५२ मते पडली आणि त्यामुळे पाटील यांचा अवघ्या दोन हजार ७५२ मतांनी विजय झाला होता. पण येत्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरीची तशी शक्यता नाही. याशिवाय महायुती आणि महाविकास आघाडीचेही आव्हान पाटील यांच्यापुढे असणार आहे. महाविकास आघाडीतर्फे डॉ. विश्वास वळवी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. लोकसभा निवडणुकीत आघाडीचे समीकरण इथे यशस्वी ठरले आहे. लोकसभेत चांगली मते मिळाल्याने आघाडीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघातही तिरंगी लढत बघायला मिळणार आहे.
शिकण्यासाठी जाल, शवपेटीतून याल; माजी उच्चायुक्तांचा कॅनडाबाबत विद्यार्थ्यांना गंभीर इशारासेनेपुढे बालेकिल्ला राखण्याचे आव्हान
पालघर

एकेकाळी समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला असणारा हा मतदारसंघ दोन वेळा काँग्रेस आणि त्यानंतर अविभाजित शिवसेनेकडे आला. त्यामुळे आत्तापर्यंत हा सेनेचा बालेकिल्ला असून, तब्बल पाच वेळा या पक्षाचे अविनाश सुतार, मनीषा निमकर, कृष्णा घोडा, अमित घोडा आणि श्रीनिवास वनगा हे प्रत्येक वेळी भरघोस मतांनी निवडून आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून शिवसेना (उबाठा) पक्षाकडून लोकसभेतील पराभूत उमेदवार भारती कामडी, तसेच जिल्हा परिषदेतील गटनेते जयंत दुबळा, काशिनाथ चौधरी व दिनेश तारवी इच्छुक होते. मात्र, उमेदवारीची माळ दुबळा यांच्या गळ्यात पडली आहे.

या मतदारसंघात २०१९ मध्ये श्रीनिवास वनगा निवडून आले. मात्र महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर ते शिवसेनेच्या शिंदे गटासोबत गेले. त्यावेळी शिंदे यांनी त्यांना विधानसभेत तिकीट देण्याची ग्वाही दिली होती. मात्र वनगा यांना तिकिटासाठी शिंदे आणि भाजपकडे धावपळ करावी लागत आहे. त्याआधी काँग्रेसचे राजेंद्र गावित हे निवडून आले होते. गावीत यांनी मंत्रिपद भूषवून आपला मतदारसंघ सांभाळून ठेवला होता. मात्र त्यांनी ऐनवेळी पक्ष बदलून शिवसेना-भाजप अशा कोलांट्या उड्या मारल्या व त्यांना पराभव पत्करावा लागला. ते यावेळीही शिंदे गट आणि भाजपकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष वैदही वाढाणसुद्धा इच्छुक असून पालघर अथवा बोईसर विधानसभेत शिंदे गटाकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे जवळपास २७ इच्छुकांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही या मतदारसंघावर दावा करत आहे. भाजपतर्फे संतोष जनाठे, तसेच अमित घोडा इच्छुक आहेत. मनसेने मात्र अद्याप या मतदारसंघात कोणाला तिकीट देणार, ते जाहीर केलेले नाही. पालघर विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांमध्ये ॲड. विराज गडग अपक्ष किंवा कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवतील. गेल्या निवडणुकीत त्यांना १२ हजार मते मिळाली होती. ठाकरे गटातर्फे पिंटू गहला इच्छुक आहेत. ते डहाणू पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती आहेत.
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावाला पकडण्यासाठी १० लाखांचे बक्षीस जाहीर; NIAची मोठी घोषणा
उमेदवारीसाठी रस्सीखेच
विक्रमगड

विक्रमगड विधानसभा मतदारसंघ राजकीय पटलावर फारसा दिसत नसला तरी येथील राजकीय गणिते वेगाने बदलत आहेत. विधानसभेत खरी लढत दुहेरी होत असली तरी सध्या येथे सर्वच पक्षांची उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. अशात शरद पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील भुसार यांचे तिकीट निश्चित मानले जात असून, ते प्रचारालादेखील लागले आहेत. महायुतीमार्फत विक्रमगडची जागा कुणाच्या पारड्यात पडते याची मात्र सर्वांना उत्सुकता आहे.

या मतदारसंघात कुपोषण, बेरोजगारी या मुद्द्यांवर निवडणूक लढवली जात असून, यात जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटांचा समावेश आहे. जवळपास तीन लाख १७ हजार मतदार या क्षेत्रात असून मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुनील भुसारा ८७ हजार ४४२ मते मिळवून विजयी झाले होते. भाजपच्या हेमंत सवरा यांचा त्यांनी २१ हजार मतांनी पराभव केला होता. विद्यमान आमदार व मंत्री दिवंगत विष्णू सावरा यांच्या नाराजीचा लाभ भुसारा यांना झाला होता. मात्र सध्या या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. राष्ट्रवादी (शप) पक्षाकडून भुसारा यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असून, भाजपसह शिवसेना, अजित पवार गटही विक्रमगडसाठी आग्रही आहेत. भाजपला मागील निवडणुकीत पराभवाची धूळ चाखावी लागली असली तरी पराभूत उमेदवार हेमंत सावरा सध्या विद्यमान खासदार असून विक्रमगड विधानसभा क्षेत्रातून त्यांना घसघशीत मते मिळाली आहेत. भाजपला मतदारांचा वाढता पाठिंबा बघता भाजप ही जागा हातून सोडणार नाही, असे बोलले जात आहे. पक्षाकडून हरिश्चंद्र भोये व माजी जिल्हापरिषद अध्यक्षा सुरेखा थेतले यांची नावे चर्चेत आहेत.

शिंदेंच्या सेनेकडून विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम उमेदवारीसाठी आग्रही असून, त्यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांच्या आधारे मतदारांचा भक्कम पाठिंबा मिळवला आहे. जिजाऊ संघटना आपला उमेदवार उभा करण्याची चाचपणी करीत असून, भिवंडी लोकसभा क्षेत्रात निलेश सांबरे यांनी मिळवलेली मते भाजप उमेदवाराला मारक ठरली होती. विक्रमगड विधानसभेत ‘जिजाऊ’ने उमेदवार उभा केला तर राजकीय चित्र पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.
राहुल नार्वेकरांपेक्षा आशिष शेलार श्रीमंत, पाच वर्षांत संपत्तीत किती वाढ? जाणून घ्या
माकप, युतीचा उमेदवार गुलदस्त्यात
डहाणू

डहाणू विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. २००९ साली मतदारसंघ पुन:रचनेत डहाणू आणि तलासरी तालुक्यांचा समावेश झाला. हा मतदारसंघ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून माकपचे विद्यमान आमदार विनोद निकोले यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. तर महायुतीकडून भाजप की शिवसेना शिंदे गट हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

२००९च्या निवडणुकीत माकपने विजय मिळवला. तर, गुजरात सीमेलगतच्या या मतदारसंघात मोदी लाटेमुळे २०१४मध्ये भाजपने बाजी मारली. २०१९ला काही पक्ष माकपच्या बाजूने आले. त्यांनी आघाडी स्थापन करून कॉम्रेड विनोद निकोले यांना निवडून आणले. ‘माकप’चे राज्यातील ते एकमेव आमदार झाले. लोकसभा निवडणुकीत पालघर मतदारसंघात भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले, तरी सहापैकी डहाणू विधानसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तेव्हापासून निकोले यांची विधानसभेसाठी उमेदवारी पक्की समजली गेली. माकपच्या राज्य समितीने त्यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीने त्याला पाठिंबा दिला. महायुतीकडून हा मतदारसंघ अद्याप कोणत्याही पक्षासाठी जाहीर झालेला नाही. परंतु भाजपचे तलासरी तालुका अध्यक्ष विनोद मेढा यांचे नाव चर्चेत आहे. मागील दोन्ही निवडणुकांत त्यांनी पक्षाकडून डमी अर्ज दाखल केला होता. ते तिसऱ्यांदा तालुका अध्यक्ष बनले आहेत. माजी आमदार अमित घोडा हेसुद्धा इच्छुकांच्या यादीत आहेत, तर शिवसेनेकडे उमेदवारी गेल्यास श्रीनिवास वनगा हे इच्छुक असल्याची चर्चा आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post ‘स्थानिकां’चा वरचष्मा की युती-आघाडीला संधी? सेनेचा बालेकिल्ला पालघर विधानसभेची स्थिती काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=106191 0
पालघरमधील आई-वडील लेकीच्या हत्येचं गूढ अखेर उकललं, मारेकरी निघाला जवळचाच https://tejpolicetimes.com/?p=104427 https://tejpolicetimes.com/?p=104427#respond Thu, 05 Sep 2024 10:14:38 +0000 https://tejpolicetimes.com/?p=104427 पालघरमधील आई-वडील लेकीच्या हत्येचं गूढ अखेर उकललं, मारेकरी निघाला जवळचाच

Palghar Triple Murder : पालघरमधील नेहरोली गावात आई व मुलीचा मृतदेह बंद पेटीत, तर वडिलांचा मृतदेह बाथरुममध्ये सापडला होता. महाराष्ट्र टाइम्स.कॉम पालघर : एकाच कुटुंबातील तिघा जणांची हत्या झाल्याच्या प्रकरणाचे गूढ अखेर उकलले आहे. ज्याला आसरा दिला, त्या भाडेकरुनेच घर मालकाच्या कुटुंबाचा खून केल्याचे समोर आले आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील नेहरोली गावात राहणाऱ्या राठोड […]

The post पालघरमधील आई-वडील लेकीच्या हत्येचं गूढ अखेर उकललं, मारेकरी निघाला जवळचाच first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पालघरमधील आई-वडील लेकीच्या हत्येचं गूढ अखेर उकललं, मारेकरी निघाला जवळचाच

Palghar Triple Murder : पालघरमधील नेहरोली गावात आई व मुलीचा मृतदेह बंद पेटीत, तर वडिलांचा मृतदेह बाथरुममध्ये सापडला होता.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
पालघर : एकाच कुटुंबातील तिघा जणांची हत्या झाल्याच्या प्रकरणाचे गूढ अखेर उकलले आहे. ज्याला आसरा दिला, त्या भाडेकरुनेच घर मालकाच्या कुटुंबाचा खून केल्याचे समोर आले आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील नेहरोली गावात राहणाऱ्या राठोड कुटुंबातील आई-वडील आणि मुलीचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आढळून आल्याने खळबळ माजली होती. आई व मुलीचा मृतदेह बंद पेटीत, तर वडिलांचा मृतदेह बाथरुममध्ये सापडला होता.

मूळचे गुजरात येथील असलेले राठोड कुटुंब नेहरोलीतील बोंद्रे आळीत गेल्या २० वर्षांपासून राहत होते. कुटुंबात मुकुंद बेचरदास राठोड (७५), पत्नी कांचन मुकुंद राठोड (७२) आणि मुलगी संगीता मुकुंद राठोड (५२) होते. त्यांची दोन्ही मुलं नोकरीनिमित्त बाहेरगावी राहतात. जवळपास दहा-बारा दिवसांपासून आई-वडिलांसोबत कुठलाच संपर्क होत नसल्याने त्यांचा मुलगा गावात आला.
जयदीप आपटे घरी येणारे, बायकोनेच दिली पोलिसांना टीप, निशिगंधांची इच्छा होती की…

दार उघडताच तिघांचे मृतदेह

१८ ऑगस्टपासून कुणाशी संपर्क होत नसल्याने राजकोट येथे फॅब्रिकेशन व्यवसाय करणारा त्यांचा मुलगा सुहास शोध घेण्यासाठी गावी आला. घराला बाहेरून कुलूप असल्याने कुटुंब आजारी असल्याच्या चिंतेने सुहासने आजूबाजूचे सर्व दवाखाने पालथे घातले. तरीही कुठेच त्यांचा शोध लागत नसल्याने अखेर घरातील काही कागदपत्रे काढण्यासाठी त्याने कुलूप फोडले, तेव्हा घरात अंगाचा थरकाप उडवणारे दृश्य दिसले. अनेक दिवसांपासून मृतदेह पडून असल्याने ते कुजले होते. मृतदेहांची दुर्गंधी बाहेर जाऊ नये, यासाठी मृतदेहांवर जाड गाद्या टाकण्यात आल्या होत्या.
प्रेयसीच्या मुलाने उलटी केल्याचा राग, प्रियकराच्या मारहाणीत चिमुकल्याचा मृत्यू, पुण्यात खळबळ

कसा झाला उलगडा?

मुकुंद राठोड यांनी नेहरोलीत एक जागा घेऊन इमारत बांधली होती. या इमारतीत ते कुटुंबासह राहत होते आणि भाडेकरुंनाही त्यांनी जागा दिली होती. यापैकी आरिफ हा मूळचा उत्तर प्रदेशातील असलेला भाडेकरु घटना उघडकीस आल्याच्या दिवसापासून गायब होता. त्यामुळे त्याच्यावर संशय व्यक्त केला जात होता.

पालघरमधील आई-वडील लेकीच्या हत्येचं गूढ अखेर उकललं, मारेकरी निघाला जवळचाच

एकामागून एक तिघांची हत्या

राठोडांच्या घरात पैशांचं घबाड मिळण्याच्या हव्यासातून त्याने आधी मुलगी संगीता आणि नंतर तिच्या आईवर लोखंडी रॉडने वार करुन हत्या केली. त्यानंतर दोघींचे मृतदेह पत्र्याच्या पेटीत ठेवले. घटनेच्या वेळी मुकुंद बाहेर होते. त्यामुळे आरिफ घरातच त्यांची वाट पाहत होता. ते घरात शिरताच दबा धरुन बसलेल्या आरिफने त्यांच्यावरही रॉडने हल्ला चढवला. त्यांचा मृतदेह बाथरुममध्ये तसाच फेकून त्याने पोबारा केला. वाडा पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी पाच पथकं रवाना केली होती. मूळगाव उत्तर प्रदेशातून त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

The post पालघरमधील आई-वडील लेकीच्या हत्येचं गूढ अखेर उकललं, मारेकरी निघाला जवळचाच first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=104427 0
Ladki Bahin Yojana: पालघर जिल्ह्यातील ‘लाडक्या बहिणीं’चे ४२ हजार अर्ज रद्द; छाननी करताना आढळल्या त्रुटी https://tejpolicetimes.com/?p=101601 https://tejpolicetimes.com/?p=101601#respond Fri, 09 Aug 2024 07:56:56 +0000 https://tejpolicetimes.com/?p=101601 Ladki Bahin Yojana: पालघर जिल्ह्यातील ‘लाडक्या बहिणीं’चे ४२ हजार अर्ज रद्द; छाननी करताना आढळल्या त्रुटी

नरेंद्र पाटील, पालघर : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये पालघर जिल्ह्यातील बहिणींनी २ लाख ९६ हजार अर्ज दाखल केले असून, त्यापैकी ४२ हजार ४६७ अर्ज रद्द झाले आहेत. अर्जांची छाननी करताना त्यात अंशतः त्रुटी आढळून आल्यामुळे ते रद्द करण्यात आले आहेत. या त्रुटी ३१ऑगस्टपर्यंत दूर केल्यास संबंधित लाभार्थ्यांना मागील दोन महिन्यांचा लाभ मिळण्याची […]

The post Ladki Bahin Yojana: पालघर जिल्ह्यातील ‘लाडक्या बहिणीं’चे ४२ हजार अर्ज रद्द; छाननी करताना आढळल्या त्रुटी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Ladki Bahin Yojana: पालघर जिल्ह्यातील ‘लाडक्या बहिणीं’चे ४२ हजार अर्ज रद्द; छाननी करताना आढळल्या त्रुटी

नरेंद्र पाटील, पालघर : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये पालघर जिल्ह्यातील बहिणींनी २ लाख ९६ हजार अर्ज दाखल केले असून, त्यापैकी ४२ हजार ४६७ अर्ज रद्द झाले आहेत. अर्जांची छाननी करताना त्यात अंशतः त्रुटी आढळून आल्यामुळे ते रद्द करण्यात आले आहेत. या त्रुटी ३१ऑगस्टपर्यंत दूर केल्यास संबंधित लाभार्थ्यांना मागील दोन महिन्यांचा लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच दुसरीकडे २ लाख ४५ हजार अर्ज मंजुरीच्या टप्प्यात असून, त्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे.

पालघर जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज वसई तालुक्यातून दाखल करण्यात आले आहेत. त्याखालोखाल पालघर तालुक्यातील असून सर्वात कमी अर्ज मोखाडा तालुक्यामधून आले आहेत. अर्जांतील त्रुटींमुळे रद्द झालेले सर्वाधिक अर्ज डहाणू तालुक्यातील आहेत. त्याखालोखाल वसई तालुक्यातील अर्ज रद्द करण्यात आले असून मोखाडा तालुक्यातून सर्वात कमी अर्ज रद्द झाले आहेत. सर्वात जास्त स्वीकारलेले अर्ज वसई तालुक्यातील आहेत. त्याखालोखाल पालघर तालुक्यातून व सर्वात कमी अर्ज मोखाडा तालुक्यातून मंजूर करण्यात आले आहेत.

४२ हजारांहून अधिक अर्जांमध्ये विविध प्रकारच्या तांत्रिक त्रुटी आढळल्याने ते अंशतः रद्द करण्यात आले आहेत. ज्या मोबाईलवरून हे अर्ज दाखल करण्यात आले आहेत त्याच मोबालचा तपशील देण्यात आला आहे. मोबाइलवरून त्रुटी दूर करणे शक्य होणार असल्याचे महिला बालविकास विभागाकडून यावर सांगण्यात आले. या योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांनी आवश्यक कागदपत्रे पुराव्यांसह ३१ ऑगस्टपर्यंत त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत असे सूचित करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हास्तरावर येणाऱ्या अर्जांची पडताळणी सुरू असल्याने या योजनेसाठी नव्याने नोंदणी करण्याच्या संकेतस्थळावर मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे नव्या नोंदणी करण्याची प्रक्रिया काही काळ स्थगित ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना येत्या १५ ऑगस्ट रोजी योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्णत्वास आली असल्याचे सांगण्यात येत आहे,
रक्षाबंधनपूर्वीच बहि‍णींना मिळणार ओवाळणी! लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता ‘या’ तारखेला मिळणार
जिल्ह्यात एकूण अर्ज दाखल
तालुका/ एकूण प्राप्त अर्ज /स्वीकार / अंशतः रद्द

१) जव्हार / २२४२२/ १९४४६/ २९०६
२)मोखाडा/ १५३३७/ २५२७०/ ९९२
३) डहाणू/ ४७६४१/ ३१५९७/ २२३८४
४) पालघर/ ६२१४१/ ५३२९५/ ८४८९
५)तलासरी / २७१२०/ २४३०२/ २७९३
६) वसई/ ८९९८२/ ७४५६९/ १०९७५
७)विक्रमगड/ १८४०६/ १७०५४/ १०९७५
८) वाडा/ २२९५६/ २०२१०/ १३३९
एकूण / २९६००५/ २४४७४३/ ४२४६७

Source link

The post Ladki Bahin Yojana: पालघर जिल्ह्यातील ‘लाडक्या बहिणीं’चे ४२ हजार अर्ज रद्द; छाननी करताना आढळल्या त्रुटी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=101601 0
पुन्हा हिट अँड रन! भरधाव स्कॉर्पिओची दुचाकीला धडक, तरुणाने जीव गमावला, पालघरमध्ये संताप https://tejpolicetimes.com/?p=101597 https://tejpolicetimes.com/?p=101597#respond Fri, 09 Aug 2024 06:38:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=101597 पुन्हा हिट अँड रन! भरधाव स्कॉर्पिओची दुचाकीला धडक, तरुणाने जीव गमावला, पालघरमध्ये संताप

पालघर: राज्यात सध्या हिट अँड रनच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुणे पोर्शे प्रकरण, मुंबई वरळी प्रकरणासारख्या भीषण घटनांनंतरही वाहन चालकांच्या वेगावर नियंत्रण आलेलं नाही. पालघरमध्येही अशीच एक घटना घडली आहे. येथे भरधाव स्कॉर्पिओ कारच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मनोर येथील गणेशघाट परिसरात ही घटना घडली आहे. हिट […]

The post पुन्हा हिट अँड रन! भरधाव स्कॉर्पिओची दुचाकीला धडक, तरुणाने जीव गमावला, पालघरमध्ये संताप first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पुन्हा हिट अँड रन! भरधाव स्कॉर्पिओची दुचाकीला धडक, तरुणाने जीव गमावला, पालघरमध्ये संताप

पालघर: राज्यात सध्या हिट अँड रनच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुणे पोर्शे प्रकरण, मुंबई वरळी प्रकरणासारख्या भीषण घटनांनंतरही वाहन चालकांच्या वेगावर नियंत्रण आलेलं नाही. पालघरमध्येही अशीच एक घटना घडली आहे. येथे भरधाव स्कॉर्पिओ कारच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मनोर येथील गणेशघाट परिसरात ही घटना घडली आहे.

हिट अँड रनचा हा संपूर्ण प्रकार असून अपघात झाल्यानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून सागर गजानन पाटील (वय २७) असे मृत दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे.
Chandrapur Crime: लहानपणी ज्याला जपलं, त्याच लहान भावावर कुऱ्हाडीचे वार, चंद्रपुरात कुटुंबासमोरच हत्येचा थरार

भरधाव स्कॉर्पिओची समोरुन दुचाकीला धडक, तरुण दुरवर फेकला गेला

२७ वर्षांचा तरुण सागर पाटील हा हेरिटेज फूड प्रॉडक्ट या कंपनीत कामाला होता. आपली ड्युटी संपवून तो त्याच्या दुचाकीवरून घरी परतत होता. याचदरम्यान मनोरनजीक हात नदी लगत असलेल्या गणेशघाट परिसरात समोरून आलेल्या भरधाव स्कॉर्पिओ कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीसह दुचाकीस्वार सागर दूरवर फेकला गेला. या अपघातात दुचाकीस्वार सागर पाटील याचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर, अपघात झाल्यानंतर कारचालक अपघातात जखमी झालेल्या सागरची कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच मनोर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून त्यांनी सागरचा मृतदेह ताब्यात घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात.

वाहन चालकाला अटक

या अपघात प्रकरणात मनोर पोलीस ठाण्यात हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तपासाला सुरुवात केली. मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेलच्या पार्किंगमधून अपघाताला कारणीभूत असलेली पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ कार पोलिसांनी हस्तगत केली आहे. पहाटेच्या सुमारास आरोपी कारचालक सचिन सुरवसे (वय ३२) ताब्यात घेण्यात आले आहे. कारचालकाची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून अधिक तपास मनोर पोलीस करीत आहेत. पण, या कारचालकाच्या बेजबाबदारपणामुळे एका घरचा आधार हिरावला गेला आहे.

Source link

The post पुन्हा हिट अँड रन! भरधाव स्कॉर्पिओची दुचाकीला धडक, तरुणाने जीव गमावला, पालघरमध्ये संताप first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=101597 0
मोबाईलमध्ये अश्लील फोटो दाखवले, गुरुजींचे विद्यार्थिनीशी अश्लील चाळे, पालघरमधील घृणास्पद प्रकार https://tejpolicetimes.com/?p=80051 https://tejpolicetimes.com/?p=80051#respond Wed, 24 Jan 2024 07:52:42 +0000 https://tejpolicetimes.com/?p=80051 मोबाईलमध्ये अश्लील फोटो दाखवले, गुरुजींचे विद्यार्थिनीशी अश्लील चाळे, पालघरमधील घृणास्पद प्रकार

पालघर : विद्यार्थिनीला मोबाईलमध्ये अश्लील फोटो दाखवून शिक्षकाने दृष्कृत्य केलं. अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गुरुजींनी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे घडला आहे. या प्रकरणी तारापूर पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर जनमानसातून संताप व्यक्त होत आहेपालघर तालुक्यातील तारापूर पोलीस ठाणे हद्दीतील शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत अश्लील चाळे केल्याचा […]

The post मोबाईलमध्ये अश्लील फोटो दाखवले, गुरुजींचे विद्यार्थिनीशी अश्लील चाळे, पालघरमधील घृणास्पद प्रकार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मोबाईलमध्ये अश्लील फोटो दाखवले, गुरुजींचे विद्यार्थिनीशी अश्लील चाळे, पालघरमधील घृणास्पद प्रकार

पालघर : विद्यार्थिनीला मोबाईलमध्ये अश्लील फोटो दाखवून शिक्षकाने दृष्कृत्य केलं. अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गुरुजींनी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे घडला आहे. या प्रकरणी तारापूर पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर जनमानसातून संताप व्यक्त होत आहे

पालघर तालुक्यातील तारापूर पोलीस ठाणे हद्दीतील शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार घडकीस आला आहे. तारापूर पोलीस ठाणे हद्दीतील भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर (बीएआरसी) भागात हा प्रकार घडला आहे.

एरिअल शोवेळी स्टेज अंगावर कोसळला, कंपनीच्या वर्धापन दिनीच संस्थापक संजय शाहांचा चिरडून अंत
शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला मोबाईलमधील अश्लील फोटो दाखवत या शिक्षकाने तिच्यासोबत अश्लील चाळे केले. त्यानंतर याबाबत विद्यार्थिनीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पीडित विद्यार्थिनीने पालकांसोबत तारापूर पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दाखल केली.

लोढांना ९ वर्ष जुन्या गाडीने येताना पाहिलं, अन् माझा निर्णय बदलला, सत्यजीत तांबेंचा किस्सा
विद्यार्थिनीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनंतर तारापूर पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरोधात कलम ३५४ सह पोक्सो व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तारापूर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

पती पत्नीनं बनावट स्क्रीनशॉटद्वारे तब्बल ४०० जणांना घातला गंडा, सापळा रचून पोलिसांनी केली अटक

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

Source link

The post मोबाईलमध्ये अश्लील फोटो दाखवले, गुरुजींचे विद्यार्थिनीशी अश्लील चाळे, पालघरमधील घृणास्पद प्रकार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=80051 0
Palghar: नववर्ष स्वागतासाठी पालघरचे किनारे सज्ज, पर्यटकांसाठी रिसॉर्टही सजले https://tejpolicetimes.com/?p=74172 https://tejpolicetimes.com/?p=74172#respond Tue, 26 Dec 2023 06:13:16 +0000 https://tejpolicetimes.com/?p=74172 Palghar: नववर्ष स्वागतासाठी पालघरचे किनारे सज्ज, पर्यटकांसाठी रिसॉर्टही सजले

म.टा.प्रतिनिधी, पालघर : पालघर जिल्ह्यात ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी व नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्याची शक्यता गृहीत धरून, जिल्ह्यातील न्याहारी-निवास सुविधा, हॉटेले आणि रिसॉर्टचालकांनी पर्यटकांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. अनेक ठिकाणी तंबूची विशेष सोय करण्यात आली आहे. दरम्यान, वर्षअखेरीस पर्यटन सुविधांमध्ये ६० ते ७० टक्के बुकिंग पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.पालघर जिल्ह्याला १२० किमी […]

The post Palghar: नववर्ष स्वागतासाठी पालघरचे किनारे सज्ज, पर्यटकांसाठी रिसॉर्टही सजले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Palghar: नववर्ष स्वागतासाठी पालघरचे किनारे सज्ज, पर्यटकांसाठी रिसॉर्टही सजले

म.टा.प्रतिनिधी, पालघर : पालघर जिल्ह्यात ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी व नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्याची शक्यता गृहीत धरून, जिल्ह्यातील न्याहारी-निवास सुविधा, हॉटेले आणि रिसॉर्टचालकांनी पर्यटकांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. अनेक ठिकाणी तंबूची विशेष सोय करण्यात आली आहे. दरम्यान, वर्षअखेरीस पर्यटन सुविधांमध्ये ६० ते ७० टक्के बुकिंग पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.

पालघर जिल्ह्याला १२० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. नववर्ष स्वागसाठी अनेक पर्यटक सहकुटुंब केळवे समुद्रकिनारी येत असतात. यावर्षी जोडून सुट्ट्या आल्याने पर्यटकांचा प्रतिसाद मोठा आहे. जिल्ह्यात समुद्रकिनाऱ्यावरील केळवे, माहीम, टेम्भी, वडराई, शिरगाव, सातपाटी, उसरणी, भादवे, दांडा, खटाळी, एडवण, कोरे, दातीवरे, मुरबे, आलेवाडी, नवापूर, उच्छळी, दांडी, उनभाट, तारापूर, चिंचणी, वरोर, धाकटी डहाणू, डहाणू, चिखला, घोलवड, बोर्डी, झाई, अर्नाळा, नायगाव, वसई याचबरोबर जंगलपट्टी भागातील तलासरी, डहाणू, पालघर, वाडा, जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यांतील हॉटेल व रिसॉर्टचालकांनी जय्यत तयारी केली आहे.

ठाकरेंना अयोध्येतील राममंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण का दिले नाही? महाजन म्हणाले, फक्त VVIP लोकांनाच….
सरकारी, निमसरकारी आणि खासगी क्षेत्रातील अधिकारी-कर्मचारी यांना सलग तीन-चार दिवस सुट्टी असल्याने जिल्ह्यातील किनारपट्टी तसेच जंगलपट्टी भागातील हॉटेले, न्याहारी-निवास सुविधा आणि रिसॉर्ट यांचे बुकिंग मोठ्या प्रमाणात झाले आहे. डिसेंबरच्या २८, २९ तारखेपासून पर्यटकांच्या आगमनाला सुरुवात होणार आहे. यातील बहुतेकांनी एक जानेवारीपर्यंतचे बुकिंग केले आहे. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा लोंढा या संपूर्ण किनारपट्टीसह जंगलपट्टीमध्ये पाहावयास मिळणार आहे.

पर्यटकांचा हिरमोड होऊ नये, या दृष्टीने पोलिस प्रशासन तसेच उत्पादन शुल्क विभाग आणि पर्यटन विभागाने सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आपली यंत्रणा राबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

केळवे बीच हे जिल्ह्याचे ‘टुरिझम मॉडेल’ समजले जाते. नितांतसुंदर किनारे, टुमदार गावे, सुरूच्या झाडांचे बगीचे, पर्यटकांच्या निवासासाठी विशेष सुविधा, पारंपरिक जेवण यांमुळे दरवर्षी हजारो पर्यटक केळवेला भेट देतात. अनेक पर्यटक वर्षातून अनेकदा केळव्याला भेट देतात. सरकारने पर्यटन विकासासाठी येथील पायाभूत सुविधांना बळ दिल्याने रोजगारालाही चालना मिळाली आहे.

अन्य किनाऱ्यांचाही विकास व्हावा

पालघर जिल्ह्यातील अन्य समुद्रकिनारेही निसर्गरम्य असून केळवेच्या धर्तीवरच या पर्यटनस्थळांचा विकास होणेही गरजेचे आहे. तिथे स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. पालघर जिल्ह्यात सद्यस्थितीत अनेक विकास प्रकल्प होऊ घातले आहेत. विरारला पालघर तालुक्याशी जोडणाऱ्या प्रस्तावित पुलामुळे मुंबईतून येण्याच्या पर्यटकांना पालघर जिल्ह्यातील किनाऱ्यावर येणे सुलभ, सोयीस्कर होणार आहे. भविष्यात पर्यटकांच्या लोंढ्यांचा विचार करून सरकारने आतापासून या पर्यटनस्थळांच्या विकासाचा आराखडा तयार करणे गरजेचे आहे. या ठिकाणी भविष्यात पर्यटन हाच मुख्य व्यवसाय राहणार असल्याने सरकारने त्यादृष्टीने प्रशिक्षण केंद्रे उभारणे, तरुणांमध्ये जनजागृगी करून त्यांना रोजगारासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. मूलभूत सुविधांबरोबर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी म्युझियम, मत्स्यालय, ग्रामीण भागातील संस्कृती दाखवणारी केंद्रे, स्थानिक फळे, शेतीमाल, व ग्रामीण मालाच्या विक्रीसाठी व्यावसायिक बाजारपेठ निर्माण करणे, स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी नृत्य यांना प्रोत्साहन देणे, पर्यटन महोत्सव आयोजनासाठी चालना देणे, स्वयंरोजगार निर्मितीसाठी आवश्यक परवानग्या सुलभरीतीने देणे गरजेचे आहे, याकडे लक्ष वेधण्यात येत आहे.

पालघर या निसर्गरम्य जिल्ह्यात यावर्षी अतिशय आल्हाददायक वातावरण आहे. येथील निसर्गरम्य ठिकाणे आणि चोख व्यवस्था यांकडे पर्यटक आकर्षित होत आहेत. जिल्ह्यात यावर्षी ३१ डिसेंबर व नववर्षाचे स्वागत जोरदार होणार आहे.

– आशीष पाटील, माजी अध्यक्ष, केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघ

लोकसभा निवडणुकीत कोणाची सरशी? सर्व्हेतून चकित करणारी आकडेवारी समोर, एक विभाग निकाल फिरवणार

Source link

The post Palghar: नववर्ष स्वागतासाठी पालघरचे किनारे सज्ज, पर्यटकांसाठी रिसॉर्टही सजले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=74172 0