Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
पिंपरी चिंचवड - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Fri, 22 Nov 2024 05:12:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg पिंपरी चिंचवड - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 पिंपरीत मतदान कमी, भोसरीमध्ये कुणाला यशाची हमी? पुण्यात चर्चा रंगल्या, पैजांमध्ये कोण भारी? https://tejpolicetimes.com/?p=109674 https://tejpolicetimes.com/?p=109674#respond Fri, 22 Nov 2024 05:12:52 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109674 पिंपरीत मतदान कमी, भोसरीमध्ये कुणाला यशाची हमी? पुण्यात चर्चा रंगल्या, पैजांमध्ये कोण भारी?

Maharashtra Election : पिंपरी मतदारसंघातील कमी मतदान आणि भोसरी मतदारसंघातील सर्वाधिक मतदान महायुतीला तारक ठरणार की मारक, याबाबत चर्चा रंगली असून, पैजा लागल्या आहेत. महाराष्ट्र टाइम्स पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवडमधील १६ लाख ६३ हजार मतदारांपैकी सुमारे नऊ लाख १५ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ही टक्केवारी ५५ टक्के आहे. पिंपरी […]

The post पिंपरीत मतदान कमी, भोसरीमध्ये कुणाला यशाची हमी? पुण्यात चर्चा रंगल्या, पैजांमध्ये कोण भारी? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पिंपरीत मतदान कमी, भोसरीमध्ये कुणाला यशाची हमी? पुण्यात चर्चा रंगल्या, पैजांमध्ये कोण भारी?

Maharashtra Election : पिंपरी मतदारसंघातील कमी मतदान आणि भोसरी मतदारसंघातील सर्वाधिक मतदान महायुतीला तारक ठरणार की मारक, याबाबत चर्चा रंगली असून, पैजा लागल्या आहेत.

महाराष्ट्र टाइम्स

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवडमधील १६ लाख ६३ हजार मतदारांपैकी सुमारे नऊ लाख १५ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ही टक्केवारी ५५ टक्के आहे. पिंपरी मतदारसंघातील कमी मतदान आणि भोसरी मतदारसंघातील सर्वाधिक मतदान महायुतीला तारक ठरणार की मारक, याबाबत चर्चा रंगली असून, पैजा लागल्या आहेत.

भोसरी

शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांत अनुक्रमे ५१.२९, ५६.७३ आणि ६१.१४ टक्के मतदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरी भागात (पुणे आणि पिंपरी-चिंचवड मिळून) सर्वाधिक ६१.१४ टक्के मतदान भोसरी मतदारसंघामध्ये झाले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. वाढलेले मतदान तारक ठरणार असल्याचा दावा ते करीत आहेत. आमदार महेश लांडगे विरुद्ध अजित गव्हाणे यांच्या लढतीवर कार्यकत्यांमध्ये पैजा जडत आहेत.
Maharashtra Election : सर्वात आधी विजयाचा गुलाल कोण उधळणार? पहिला निकाल कुठे? इंटरेस्टिंग माहिती समोर

चिंचवड

सर्वांत मोठ्या चिंचवड मतदारसंघातील ६ लाख ६३ हजार ६२२ मतदारांपैकी किती मतदार लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होतात, याकडे लक्ष लागले होते. त्यापैकी ३ लाख ७६ हजार ४७२ जणांनी मतदान केले. हे प्रमाण ५६.७३ टक्के आहे. ते गेल्या निवडणुकीच्या तुलनेत (५३.६६ टक्के) काहीसे जास्त असले तरी जिल्ह्याच्या सरासरी मतदानाच्या (६१.०५ टक्के) तुलनेत कमी आहे. शंकर जगताप विरुद्ध राहुल कलाटे लढतीकडे लक्ष लागले आहे. अपक्ष भाऊसाहेब भोईर समर्थकांना चमत्काराची अपेक्षा आहे.
Axis My India Exit Poll : जनतेने ठरवला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा; शिंदे, फडणवीस, ठाकरे, दादा की नाना? सर्वाधिक पसंती कुणाला? चक्रावणारे आकडे

पिंपरी

पिंपरी मतदारसंघातील ५१.२९ टक्केवारी शेवटच्या तासात वाढलेली आहे. त्यामुळे सायंकाळच्या सत्रातील मोठ्या प्रमाणात झालेले मतदान कोडे न उलगडणारे आहे. गेल्या २०१९च्या तुलनेत यंदाच्या मतदानामध्ये एक टक्का वाढ झाली आहे. त्यामुळे मागील निकालाचा अंदाज यंदाही लागू पडेल, अशी अपेक्षा महायुतीला आहे. कार्यकर्त्यांचे बळ विजयासाठी उपयुक्त ठरेल, असे आमदार अण्णा बनसोडे म्हणत आहेत. मतदारांनी निवडणूक हाती घेतल्याने ते बदल घडवतील, असा विश्वास डॉ. सुलक्षणा शिलवंत-धर यांना आहे.

खडकवासल्यात लाखांच्या पैजा

लाडक्या बहिणींनी काय केले. ‘व्होट’ ते ‘नोट’ जिहाद, मतांचे धर्मयुद्ध झाले का; तसेच वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला, अशा काही मुद्द्यांसह ‘एक्झिट पोल’मध्ये दाखविलेल्या विधानसभेच्या जागांच्या अनुषंगाने शहरातील चौकाचौकांत, कट्ट्यांवर, अमृततुल्यांमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार चर्चा रंगल्या आहेत. या चर्चामध्ये शहरातील काही जागांवर हजारो रुपयांच्या पैजाही लावण्यात येत असल्याचे चित्र गुरुवारी पाहावयास मिळाले.

पुणे शहरातील खडकवासला, कसबा पेठ, शिवाजीनगर, पुणे कैटोन्मेंट, वडगाव शेरी आणि हडपसर विधानसभा मतदारसंघांत कोण विजयी होणार, यावर आता जोरदार चर्चा झडत आहेत. कुटुंबातील, मित्रांच्या; तसेच वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर निवडणुकीच्या विजयाचे दावे-प्रतिदावे करताना वादाच्या ठिणग्या पडू लागल्या आहेत. बहुतांश ‘एक्झिट पोल’मध्ये महायुतीचे सरकार येण्याचे संकेत दर्शविल्याने या वादाची धारही वाढल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पुण्यातील मतदारसंघांमध्ये सर्वाधिक पैजा या खडकवासला आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात लागल्या असल्याची चर्चा आहे.

खडकवासल्यातील पैजेच्या रकमा या काही लाखांत असल्याने या ठिकाणची लढत अत्यंत चुरशीची झाल्याचे चित्र दिसत आहे. मतदानाची आकडेवारी आल्यानंतर कट्ट्यांवरील चर्चामध्येही चुरस जाणल्याची प्रतिक्रिया राजकीय कार्यकर्ते धीरज महाडिक यांनी व्यक्त केली.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

The post पिंपरीत मतदान कमी, भोसरीमध्ये कुणाला यशाची हमी? पुण्यात चर्चा रंगल्या, पैजांमध्ये कोण भारी? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109674 0
मोठी बातमी! पुण्यात पाण्याची टाकी कोसळली, पाच कामगार अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु https://tejpolicetimes.com/?p=105906 https://tejpolicetimes.com/?p=105906#respond Thu, 24 Oct 2024 03:55:09 +0000 https://tejpolicetimes.com/?p=105906 मोठी बातमी! पुण्यात पाण्याची टाकी कोसळली, पाच कामगार अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु

Pune Water Tank Collapse: पिंपरी-चिंचवड येथे पाण्याची टाकी कोसळून भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत ५ कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हायलाइट्स: पुण्यात पाण्याची टाकी कोसळून भीषण दुर्घटना पिंपरी-चिंचवड येथील भोसरीतील घटना पाच कामगार अडकल्याची भीती महाराष्ट्र टाइम्स.कॉम पुणे: पिंपरी-चिंचवड येधील भोसरी परिसरात एक मोठी दुर्घटना घडली आली आहे. येथे आज सकाळच्या सुमारास […]

The post मोठी बातमी! पुण्यात पाण्याची टाकी कोसळली, पाच कामगार अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मोठी बातमी! पुण्यात पाण्याची टाकी कोसळली, पाच कामगार अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु

Pune Water Tank Collapse: पिंपरी-चिंचवड येथे पाण्याची टाकी कोसळून भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत ५ कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

हायलाइट्स:

  • पुण्यात पाण्याची टाकी कोसळून भीषण दुर्घटना
  • पिंपरी-चिंचवड येथील भोसरीतील घटना
  • पाच कामगार अडकल्याची भीती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुणे: पिंपरी-चिंचवड येधील भोसरी परिसरात एक मोठी दुर्घटना घडली आली आहे. येथे आज सकाळच्या सुमारास पाण्याची टाकी कोसळ्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत पाण्याची टाकी कोसळून पाच कामगार त्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. भोसारी परिसरातील सदगरू नगर परिसरत ही घटना घडल्याची माहिती आहे. लेबर कॅम्पमध्ये राहणाऱ्या कामगारांवर ही पाण्याची टाकी कोसळून भीषण दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली असून कामगारांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. यावेळी स्थानिकांनी घटनास्थळी मोठ्याप्रमाणात गर्दी केल्याचं दिसून आलं.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात…

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

The post मोठी बातमी! पुण्यात पाण्याची टाकी कोसळली, पाच कामगार अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=105906 0
Sculptor Anil Sutar : पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला तडे? शिल्पकार अनिल सुतारांनी सगळंच सांगितलं https://tejpolicetimes.com/?p=104238 https://tejpolicetimes.com/?p=104238#respond Tue, 03 Sep 2024 16:55:13 +0000 https://tejpolicetimes.com/?p=104238 Sculptor Anil Sutar : पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या  पुतळ्याला तडे? शिल्पकार अनिल सुतारांनी सगळंच सांगितलं

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 3 Sept 2024, 10:25 pm sambhaji maharaj statue : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला चिरा पडल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. महाविकास आघाडीने पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेऊन पुतळ्याच्या काही भागाला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. हे आरोप पुतळा बनवणारे प्रसिद्ध शिल्पकार […]

The post Sculptor Anil Sutar : पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला तडे? शिल्पकार अनिल सुतारांनी सगळंच सांगितलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Sculptor Anil Sutar : पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या  पुतळ्याला तडे? शिल्पकार अनिल सुतारांनी सगळंच सांगितलं

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 3 Sept 2024, 10:25 pm

sambhaji maharaj statue : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला चिरा पडल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. महाविकास आघाडीने पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेऊन पुतळ्याच्या काही भागाला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. हे आरोप पुतळा बनवणारे प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे पुत्र अनिल सुतार यांनी फेटाळून लावले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
अभिजीत दराडे, पुणे : मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटना घडल्यामुळे राज्यभरात संतापाचे वातावरण आहे. अशातच आता पिंपरी चिंचवडमधील भोसरी गावात उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला चिरा पडल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या संदर्भात महाविकास आघाडीने पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेऊन पुतळ्याच्या काही भागाला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. हेच आरोप पुतळा बनवणारे प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे पुत्र अनिल सुतार यांनी फेटाळून लावले आहेत. महाराष्ट्र टाईम ऑनलाइनशी बोलताना अनिल सुतार यांनी पुतळ्यासंदर्भात सर्व टेक्निकल गोष्टी समजून सांगितल्या आहेत.

आरोप चुकीचे आहेत

अनिल सुतार म्हणाले की, पिंपरी चिंचवड येथे उभारण्यात येणारा छत्रपती संभाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळ्याचे काम अजूनही पुर्ण झालेले नाही आहे. जे आरोप करण्यात आले आहेत. ते एकदम चुकीचे आहेत. कारण एखाद्या पुतळ्यांचं काम सुरू होतं. त्यावेळी पहिल्यांदा त्या पुतळ्याचं पूर्ण स्ट्रक्चर डिझाईन केलं जातं. या पुतळ्यासंदर्भातही सर्व स्ट्रक्चर झिझाईन करण्यात आलं आहे. त्यात आयडीएने दिलेल्या मार्गदर्शनामुळे ब्रॉंझ हा धातू वापरण्यात आला असून सरदार वल्लभ पटेल यांच्या पुतळ्यात देखील C903 हा धातू वापरण्यात आला आहे.

पुतळा एकाच वेळी ट्रकमधून नेणे शक्य नाही

अनिल सुतार पुढे म्हणाले की, ”छत्रपती संभाजी महाराज यांचा १०० मीटरचा पुतळा एकाच वेळी ट्रकमधून नेता येत नाही. या प्रवासादरम्यान ट्रकमध्ये नेत असताना पुतळ्याचे काही भाग डॅमेज होतात. परंतु हे डॅमेज झालेले भाग तेथे नेऊन पुन्हा त्याला फिनिशिंग लाईन दिली जाते. त्यामुळे आपण त्याचे काही एक एक भाग जवळपास दीड हजार किलोमीटरचा रस्ता कापून घेऊन जात आहोत. त्यात काही भागांना क्रॅक आले आहेत. परंतु त्या पुतळ्याचं पुर्ण काम अजूनही झालेले नाही. पुतळ्याचे सर्व भाग आपण त्याठिकाणी नेऊन तो जोडून त्याला पुन्हा वेल्डिंग करतो आणि त्यावर फिनिशिंग करतो. असेही त्यांनी सांगितले.
Jayant Patil : मी सांगत होतो पवारांना डावलून जाऊ नका मोठं लफड होईल, जयंत पाटलांची फटकेबाजी

पुतळ्यातील फरक कळत नसेल तर त्याला आम्ही काही करू शकत नाही

पुतळ्याला दोन वर्षेही झाले नाही तरी गंज लागला आहे असा आरोपही होत आहे. त्यावर अनिल सुतार म्हणाले की, ज्यांना लोखंड आणि ब्रॉंझमधील फरक समजत नसेल तर त्यावर आम्ही काहीही करू शकत नाही. हा पुतळा पुर्णपणे ब्रॉंझ या धातूचा बनविण्यात येणार आहे. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या सर्व ऋतुंचा विचार करून पुतळा बनवितांना त्याची संपूर्ण काळजी घेतली जाते. त्यानुसार आयडीएने दिलेल्या मार्गदर्शनामुळे ब्रॉंझमधील C903 हा धातू वापरण्यात आला आहे. सरदार वल्लभ पटेल यांच्या पुतळ्यात देखील C903 हा धातू वापरण्यात आला आहे. यात ज्यांना वाटतयं त्यांनी पुण्यातील स्पेक्ट्रो कंपनीला घेऊन जाऊन त्याची टेस्ट करू शकता. असे आवाहनही त्यांनी केले आहे.

राम सुतार यांच्या नावाने या पुतळ्याचं कंत्राट दिले नसून धनेश्वरच्या माध्यामातून ऑर्डर देण्यात आली असल्याचाही आरोप होत आहे. त्यावर बोलतांना अनिल सुतार यांनी सांगितले आहे की, माझे वडिल राम सुतार यांनी १९४७ पासून पुतळे बनवित आहेत. आतापर्यंत आमचे संसदेत चार तर साडेचारशे शहरात पुतळे लागले आहेत. जगभरासह संपुर्ण भारताचा विचार केल्यास प्रत्येक प्रांतात किमान दोन तरी पुतळे आम्ही तयार केलेले बसवण्यात आले आहेत. हैदराबाद, बंगलोर, लखनऊ या शहारांसाठीही पुतळ्यांचं काम सुरू आहे. पुतळ्याचं कामासंदर्भात ऑर्डरही एका माणसालाच दिली जाते. त्याची संपूर्ण जबाबदारी त्या माणसाची असते. आम्ही आतापर्यंत अशाच पद्धतीने काम केले आहे. अनेक कंत्राटदारांच्या माध्यमातून आम्हाला तसं काम करावं लागतं. असेही ते म्हणाले.

दुर्घटना घडली तर आम्ही जबाबदार राहणार

अनिल सुतार पुढे म्हणाले की, ”पुतळ्यासंदर्भात काहीही घटना घडली तर त्याला आम्ही जबाबदार राहणार आहोत. परंतु काही वेळेस नैसर्गिक आपत्ती आल्यास किंवा इतर आपत्ती आल्यास त्यावेळेस आपल्याला जबाबदार धरता येत नाही. यातर माझ्या वडिलांनी कधीच दुसऱ्याकडे काम मागण्यासाठी गेले नाहीत. स्वत: व्यक्तीच आमच्याकडे येऊन तुमच्याकडून आम्हाला पुतळा बनवायचा असल्याचे सांगतात. आता जे काही राजकारण सुरू आहे. त्यावर आम्हाला काहीही बोलायचं नाही. परंतु जरी कुणाला काही वाटत असेल तर त्यांनी ग्राऊंडवर जाऊन टेक केले पाहिजे. त्यानंतर त्यांनी बोललं पाहिजे. मालवण पुतळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत एक व्हि़डीओ बैठक पार पडली. त्यावेळी सर्व नेव्हीचे अधिकारीही होते. त्यांनी आम्हाला पुतळ्यासंदर्भात काही बाबी विचारल्या आहेत. तो पुतळा कसा काय पडला किंवा पुढचा पुतळा उभारतांना काय केले पाहिजे? त्यासंदर्भातही सांगितले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अजित भाबड

लेखकाबद्दलअजित भाबडअजित भाबड, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. अजित यांनी आबासाहेब गरवारे कॉलेजमधून पत्रकारितेची मास्टर्स पदवी मिळवली आहे. त्यांना राजकीय, सामाजिक, अंतरराष्ट्रीय तसेच कृषी क्षेत्रातील विश्लेषणात्मक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

The post Sculptor Anil Sutar : पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला तडे? शिल्पकार अनिल सुतारांनी सगळंच सांगितलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=104238 0
गव्हाणेंच्या खाद्यांवर बंदूक… लांडगेंची ‘गोळी’ अन्‌ विलास लांडे यांची ‘राजकीय खेळी’ https://tejpolicetimes.com/?p=102825 https://tejpolicetimes.com/?p=102825#respond Tue, 20 Aug 2024 13:44:03 +0000 https://tejpolicetimes.com/?p=102825 गव्हाणेंच्या खाद्यांवर बंदूक… लांडगेंची ‘गोळी’ अन्‌ विलास लांडे यांची ‘राजकीय खेळी’

पुणे (अभिजित दराडे) : पिंपरी चिंचवड मधील भोसरी विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून राजकीय भूकंप काही थांबायचं नाव घेत नाहीत. आधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का देत अजित गव्हाणे यांनी तुतारी हाती घेतली तर आता भाजपला मोठा धक्का देत ठाकरेंनी रवी लांडगे यांना गळाल लावल. मात्र भोसरीत होत असलेल्या या राजकीय भूकंपाच्या पाठीमागे नक्की कोण आहे? […]

The post गव्हाणेंच्या खाद्यांवर बंदूक… लांडगेंची ‘गोळी’ अन्‌ विलास लांडे यांची ‘राजकीय खेळी’ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
गव्हाणेंच्या खाद्यांवर बंदूक… लांडगेंची ‘गोळी’ अन्‌ विलास लांडे यांची ‘राजकीय खेळी’

पुणे (अभिजित दराडे) : पिंपरी चिंचवड मधील भोसरी विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून राजकीय भूकंप काही थांबायचं नाव घेत नाहीत. आधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का देत अजित गव्हाणे यांनी तुतारी हाती घेतली तर आता भाजपला मोठा धक्का देत ठाकरेंनी रवी लांडगे यांना गळाल लावल. मात्र भोसरीत होत असलेल्या या राजकीय भूकंपाच्या पाठीमागे नक्की कोण आहे? याच्या चर्चांना आता उधाण आला आहे.

अजित दादांची साथ सोडणाऱ्या अजित गव्हाणेंच्या खांद्यावर ‘बंदूक’ आणि त्यामध्ये भाजपला रामराम ठोकनाऱ्या रवि लांडगे यांची ‘गोळी’… अन् या दोघांच्या रणनितीमागे विलास लांडे यांची ‘राजकीय खेळी’ असल्याची चर्चा सुरु झाली आहे. पिंपरी-चिंचवडमधील राजकारणातील मातब्बर नेता असलेले माजी आमदार विलास लांडे हे स्वतः महायुतीत असल्याचे भासवून त्यांची महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्याच्या तयारी असल्याच्या चर्चांना आता पेव फुटला आहे.
Pune Crime News: बदलापुरनंतर आता पुण्यात संतापजनक प्रकार; नामांकित शाळेतच अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, १९ वर्षीय विद्यार्थ्याला अटक

२०१७ मध्ये भाजपाच्या तिकीटावर बिनविरोध निवडून आलेले रवि लांडगे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. महापालिकेत स्थायी समिती सभापती पद मिळाले नाही म्हणून स्थानिक नेते आणि त्यातही भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यावर ते नाराज होते. नगरसेवकपदाचा कार्यकाळ संपत आला त्यावेळी ही नाराजी अधिक उफाळून आली. महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतर रवि लांडगे यांनी तत्कालीन एकसंध राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी जवळीक साधली. दोन वर्षांपूर्वीच त्यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे अधिकृतपणे पाठवला होता.

सध्यस्थितीला रवि लांडगे भाजपाच्या कोणत्याही पदावर किंवा प्राथमिक सदस्य देखील नाहीत. त्यामुळे रवि लांडगे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षात प्रवेश केल्याने भाजपाला फटका बसेल अशी सुताराम शक्यता नाही. महायुतीविरोधात किंबहुना भाजपाविरोधात ही निवडणूक लढवायची असल्यामुळे दोनवर्षांपूर्वी राजीनामा दिलेल्या रवी लांडगे यांचब्या बंडामुळे भाजपाला फटका बसेल, असे शक्यता फार कमी आहे.

विलास लांडे यांचा परिवार शरद पवारांच्या मंचावर

विलास लांडे हे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. त्यांच्या सौभाग्यवती माजी महापौर मोहीनी लांडे आणि मुलगा माजी नगरसेवक विक्रांत लांडे हे जाहीरपणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या व्यासपीठावर दिसत आहेत.इतकंच नाही तर अजित पवारांची साथ सोडताना अजित गव्हाणे यांनी आपण हे सगळं आपले राजकीय गुरु विलास लांडे यांना विचारूनच करत असल्याचं म्हंटल होतं. त्यामुळे लांडे हे प्रथमदर्शनी महायुतीत दिसत असले तरी त्यांची रणनिती महाविकास आघाडीसाठी सुरू आहे का? अशी चर्चा आता शहराच्या राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरु झाली आहे.

दरम्यान, रवि लांडगे यांचा १५ ऑगस्ट रोजी वाढदिवस निमित्त अभिष्ठचिंतन कार्यक्रम झाला. त्यावेळी विलास लांडे यांनी केलेले वक्तव्य राजकीय संकेत देणारे आहे. ‘‘सध्या अजित आणि रवि दोघेही सक्षमपणे काम करीत आहेत. हे दोघे तयार आहेत, म्हणून मी थांबतो असे म्हटले. पण, मी अजून काही म्हातारा झालो नाही’’ हे वाक्य भोसरीसह पिंपरी-चिंचवडच्या राजकारणाची दिशा निश्चित करणारे आहे.

विलास लांडे शरद पवार यांचे विश्वासू

दरम्यान, विलास लांडे यांनी शरद पवार यांचा फोटो आपल्या देव्हाऱ्यात ठेवला आहे. याचा उल्लेख त्यांनी जाहीरपणे अनेकदा केला आहे. त्यामुळे ८० वर्षांच्या पवारांशी निष्ठा असल्याचे सांगणारे विलास लांडे राजकारणातून निवृत्ती घेतील, असे म्हणणे हे आज मितीला घाईचे ठरेल.

विलास लांडे महाविकास आघाडीचा चेहरा, पवारांची न उमजणारी खेळी?

त्यामुळे शरद पवार यांच्यावर निष्ठा असणारे विलास लांडे हेच भोसरीतून निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडीकडून उतरू शकतात आणि महाविकास आघाडीला पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वाधिक प्रभावी चेहरा मिळू शकतो. हाच शरद पवार आणि त्यांचा निकटवर्ती नेत्याचा ‘मास्टर प्लान’ असू शकतो. तोपर्यंत अजित गव्हाणे आणि रवि लांडगे यांच्यासह ठाकरे गटाच्या सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट ही मंडळी महायुतीविरोधात रान पेटवण्याचे काम करीत राहतील यात शंका नाही.

Source link

The post गव्हाणेंच्या खाद्यांवर बंदूक… लांडगेंची ‘गोळी’ अन्‌ विलास लांडे यांची ‘राजकीय खेळी’ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=102825 0
मोदी सरकारकडून पुणेकरांना मोठं गिफ्ट! आता तासांचा प्रवास मिनिटांत; २,९५४ कोटींच्या मेट्रो प्रकल्पाला मंजुरी https://tejpolicetimes.com/?p=102444 https://tejpolicetimes.com/?p=102444#respond Sat, 17 Aug 2024 03:36:52 +0000 https://tejpolicetimes.com/?p=102444 मोदी सरकारकडून पुणेकरांना मोठं गिफ्ट! आता तासांचा प्रवास मिनिटांत; २,९५४ कोटींच्या मेट्रो प्रकल्पाला मंजुरी

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे मेट्रोच्या टप्पा-१ चा विस्तारित मार्ग स्वारगेट ते कात्रज दरम्यानच्या भुयारी मेट्रोला शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या ५.४६ किमीच्या मार्गासाठी २,९५४ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, पुढील पाच वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’ला (महामेट्रो) दिले आहे. ‘महामेट्रो’च्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो […]

The post मोदी सरकारकडून पुणेकरांना मोठं गिफ्ट! आता तासांचा प्रवास मिनिटांत; २,९५४ कोटींच्या मेट्रो प्रकल्पाला मंजुरी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मोदी सरकारकडून पुणेकरांना मोठं गिफ्ट! आता तासांचा प्रवास मिनिटांत; २,९५४ कोटींच्या मेट्रो प्रकल्पाला मंजुरी

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे मेट्रोच्या टप्पा-१ चा विस्तारित मार्ग स्वारगेट ते कात्रज दरम्यानच्या भुयारी मेट्रोला शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या ५.४६ किमीच्या मार्गासाठी २,९५४ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, पुढील पाच वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’ला (महामेट्रो) दिले आहे.

‘महामेट्रो’च्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो ‘मार्गिका-१’चा विस्तार अनुक्रमे निगडी आणि कात्रजपर्यंत करावा, अशी मागणी सातत्याने केली जात होती. त्यापैकी पिंपरी-चिंचवड ते निगडी दरम्यानच्या विस्तारित मार्गाचे काम नुकतेच सुरू झाले आहे. स्वारगेट-कात्रज दरम्यानच्या मार्गाच्या मंजुरीची प्रतीक्षा होती. केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता गृहीत धरून महामेट्रोने काही दिवसांपासून या मार्गावर माती परीक्षणाचे (सॉइल टेस्टिंग) काम सुरू केले होते. मंत्रिमंडळाच्या शुक्रवारच्या बैठकीत मेट्रोच्या या विस्तारित मार्गिकेला मान्यता देण्यात आली.

हा मार्ग का महत्त्वाचा?

— कात्रजहून स्वारगेट, मध्यवर्ती शहर, कोथरूड, रामवाडी असा सर्व भाग जोडला जाणार
— कात्रजच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना पिंपरी-चिंचवड, निगडीपर्यंत जाणे शक्य
— हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर त्याचा फायदा कात्रजच्या नागरिकांना होणार

पुढील प्रक्रिया काय?
— भुयारी मार्गासाठी महामेट्रो निविदा मागविणार
— त्याद्वारे कंत्राटदाराची निवड करून टनेल बोअरिंग मशिनद्वारे (टीबीएम) मेट्रोसाठी बोगद्याचे खोदकाम
— स्टेशन्स आणि इतर पूरक कामे यासाठीचे बांधकाम त्यासोबतच केले जाणार
‘ठाणे अंतर्गत मेट्रो’ला केंद्र सरकारची मान्यता, मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश
प्रस्तावित स्टेशन्स

— मार्केट यार्ड (गुलटेकडी)
— पद्मावती
— कात्रज

स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रोचे अंतर

५.४६ किमी
२,९४६ कोटी रुपये
या मार्गासाठी अपेक्षित खर्च
२०२९

मार्ग कार्यान्वित करण्यासाठी मुदत

स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाला केंद्र सरकारने दिलेली मंजुरी पुण्याच्या विकासाबाबत मोदी सरकारची कटिबद्धता सिद्ध करणारी आहे. या मंजुरीमुळे कामाला वेग येणार असून दक्षिण पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत होणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यावर कात्रज ते निगडी हे दोन महत्त्वाची टोके मेट्रोने जोडली जाणार आहेत. – मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री

Source link

The post मोदी सरकारकडून पुणेकरांना मोठं गिफ्ट! आता तासांचा प्रवास मिनिटांत; २,९५४ कोटींच्या मेट्रो प्रकल्पाला मंजुरी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=102444 0
दादांच्या जनसन्मान यात्रेआधीच महायुतीत पडला मोठा बॉम्ब; जागा आमच्यासाठी सोडा…RPIची मागणी https://tejpolicetimes.com/?p=102368 https://tejpolicetimes.com/?p=102368#respond Fri, 16 Aug 2024 10:19:23 +0000 https://tejpolicetimes.com/?p=102368 दादांच्या जनसन्मान यात्रेआधीच महायुतीत पडला मोठा बॉम्ब; जागा आमच्यासाठी सोडा…RPIची मागणी

पिंपरी : अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्येच त्यांना मोठा धक्का बसण्याचा शक्यता आहे. आज अजित पवार यांची जनसन्मान यात्रा पिंपरी विधानसभा मतदारसंघात येणार आहे. त्याआधीच अजित पवार यांचे विश्वासू आणि पिंपरी विधासभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या विरोधात महायुतीतच रान पेटलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहराचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. […]

The post दादांच्या जनसन्मान यात्रेआधीच महायुतीत पडला मोठा बॉम्ब; जागा आमच्यासाठी सोडा…RPIची मागणी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
दादांच्या जनसन्मान यात्रेआधीच महायुतीत पडला मोठा बॉम्ब; जागा आमच्यासाठी सोडा…RPIची मागणी

पिंपरी : अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्येच त्यांना मोठा धक्का बसण्याचा शक्यता आहे. आज अजित पवार यांची जनसन्मान यात्रा पिंपरी विधानसभा मतदारसंघात येणार आहे. त्याआधीच अजित पवार यांचे विश्वासू आणि पिंपरी विधासभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या विरोधात महायुतीतच रान पेटलं आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहराचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. त्यांची ओळखच विकासाचा दादा अशी आहे. परंतु त्यांच्या पक्षातील विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांनी पिंपरी मतदारसंघात मागील पाच वर्षात कोणतंही काम केले नाही. एका बाजूला अजितदादांचं काम तर दुसऱ्या बाजूला या आमदाराचं काम आहे. अजितदादांना तसेच त्यांच्या पक्षाला सुध्दा हे शोभत नाहीत. त्यामुळे पिंपरीची जागा महायुतीत आरपीआयला ( आठवले गट ) सोडावी अशी मागणी आरपीआयच्या महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे यांनी महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनशी बोलताना केली आहे. तसेच वेळ पडल्यास मी घड्याळाच्या चिन्हावर देखील लढायला तयार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांता सोनकांबळे म्हणाल्या…

पिंपरी मतदारसंघात एकूण ३५ ते ४० झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्यांत विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय, समाज मंदिर, एखादा रूग्णालय, खेळाचे मैदान असणं महत्वाचं आहे. परंतु अण्णा बनसोडे यांनी यापैकी कोणतेही काम केले नाही. मागील पाच वर्षात त्यांनी कोणतं काम केलं आहे. त्याची कुणालाच कल्पना नाही, त्यांचं मतदारसंघात कुठेही काम दिसत नाही. फक्त मंडळांना वर्गणी देणे हे एकच काम त्यांनी आतापर्यंत केले असून त्यावरच ते आमदार होऊ शकतात. असा आत्मविश्वास त्यांना आहे. परंतु हे लोकांना आता कळून चुकलं आहे. त्यांच्यात कुठलंही काम करण्याची धमक नाही. येणाऱ्या निवडणुकीत लोकांची मते घ्यायची असतील तर अजितदादांसारखा माणूस हवा आहे. तिथे अण्णा बनसोडे सारखा माणूस देऊन चालणार नाही. त्यांना निवडणुकीत उतरवलं तर महायुतीचा पराभव निश्चित आहे, असं चंद्रकांता सोनकांबळे म्हणाल्या.

उद्धव ठाकरे आमदार नसताना CM, पृथ्वीराजबाबा केंद्रातून राज्यात आले, मुख्यमंत्रिपदाला नशीब लागते : अजित पवार
अजितदादांसोबत आम्ही जवळपास सात ते आठ वर्षे काम केलं आहे. स्वत: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत काम करत असतांना अजितदादा पालकमंत्री होते. यातच २००२ ला राष्ट्रवादीसोबत रिपब्लिकन पक्षाची युतीही होती. अजितदादांसोबत माझी चांगली ओळख असून त्यांनी जर मला उमेदवारी दिली तर मी तयारच आहे. असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपसह रिपब्लिकन पार्टीने चांगलं काम केलं आहे. लोकांचा देखील विश्वास आता आमच्यावर बसला आहे. असंही त्यांनी सांगितलं आहे.

Source link

The post दादांच्या जनसन्मान यात्रेआधीच महायुतीत पडला मोठा बॉम्ब; जागा आमच्यासाठी सोडा…RPIची मागणी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=102368 0
येरवड्यात नवे ‘आयटीआय’; जिल्हा नियोजन समितीतून सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी https://tejpolicetimes.com/?p=79711 https://tejpolicetimes.com/?p=79711#respond Mon, 22 Jan 2024 08:02:10 +0000 https://tejpolicetimes.com/?p=79711 येरवड्यात नवे ‘आयटीआय’; जिल्हा नियोजन समितीतून सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी

पुणे : दहावी- बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी आता येरवड्यातही औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र इमारत बांधण्यात येणार आहे. वाघोली येथील जागेतही ‘आयटीआय’ची स्वतंत्र इमारत बांधली जाणार असून, दोन्ही ठिकाणी आठ ते नऊ प्रकारचे अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहेत. सुमारे पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांना ‘आयटीआय’चे शिक्षण मिळणार आहे. पुणे शहरात आता […]

The post येरवड्यात नवे ‘आयटीआय’; जिल्हा नियोजन समितीतून सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
येरवड्यात नवे ‘आयटीआय’; जिल्हा नियोजन समितीतून सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी

पुणे : दहावी- बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी आता येरवड्यातही औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र इमारत बांधण्यात येणार आहे. वाघोली येथील जागेतही ‘आयटीआय’ची स्वतंत्र इमारत बांधली जाणार असून, दोन्ही ठिकाणी आठ ते नऊ प्रकारचे अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहेत. सुमारे पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांना ‘आयटीआय’चे शिक्षण मिळणार आहे. पुणे शहरात आता सुमारे पाच ‘आय़टीआय’ संस्था कार्यरत होणार आहेत.

पुण्यात पाच ‘आयटीआय’

सध्या पुण्यात औंध येथे दोन, पिंपरी-चिंचवड अशा तीन ‘आयटीआय’ संस्था कार्यरत आहेत. त्याशिवाय पेरणे फाटा (ता. हवेली) येथे असलेल्या ‘आयटीआय’ची संस्था सध्या भाड्याच्या जागेत गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. पुण्यात आणखी एक ‘आयआटीआय’ संस्था असावी, असा प्रस्ताव चर्चेतून पुढे आला होता. त्यामुळे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या प्रस्तावाला मान्यता देण्याचे ठरविले. भाड्याच्या जागेतील पेरणे फाटा (ता. हवेली) येथील संस्थेसाठी स्वतंत्र जागा देण्याचे निश्चित केले. पुढील शैक्षणिक वर्षात दोन ‘आयटीआय’ संस्था सुरू होणार असून, पुण्यात आता पाच ‘आयटीआय’ संस्था असतील.

येरवड्यातही नवे ‘आयटीआय’

येरवडा येथील लोहगाव-वडगाव शिंदे रस्त्यावर सुमारे पाच एकर सरकारी जागेत येरवड्यातील नवे ‘आयटीआय’चे केंद्र सुरू करण्याची आमदार सुनील टिंगरे यांची मागणी होती. त्यानुसार अजित पवार यांनी त्याला मान्यता देऊन जिल्हा नियोजन समितीच्या २०२३-२४ या वर्षाच्या निधीतून सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ‘आयटीआय’च्या इमारतीसाठी बांधकाम सुरू होणार आहे. या संस्थेत इलेक्ट्रिशियन, वेल्डर, कम्प्युटर प्रोग्रामर आणि ऑपरेटिंग अॅनालिसिस (कोपा), मेकॅनिक मोटार, मेकॅनिक ऑटो बॉडी पेंटिंग, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स, फिटर, टीडीएम हे अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत. त्यासाठी सुमारे १८ बॅचेस घेण्यात येणार आहेत. संस्थेत सुमारे तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांना पुढील वर्षी प्रवेश देण्यात येणार आहे.

वाघोलीत तीन एकर जागेत संस्था

पेरणे फाटा येथे २००८मध्ये ‘आयटीआय’ सुरू करण्यात आले होते. सध्या भाड्याच्या जागेत संस्था आहे. संस्थेला स्वतःची स्वतंत्र जागा असावी, अशी मागणी आमदार अशोक पवार यांनी केल्याने वाघोली येथील वाघजाई मंदिराच्या परिसरात सुमारे तीन एकर जागा दिली आहे. ही संस्था ‘हवेली आयटीआय’ संस्था म्हणून ओळखली जाते. येथे मोटर मेकॅनिक, मशिनिस्ट, पेंटर, इन्फर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अँड सिस्टीम मॅनेजमेंट (आयसीटीएसएम), कम्प्युटर प्रोग्रामर आणि ऑपरेटिंग अॅनालिसिस (कोपा), फॅशन टेक्नॉलॉजी, कॉस्मोटोलॉजी, इलेक्ट्रिशियन असे आठ विषय शिकविले जाणार आहेत. जिल्हा नियोजन समितीतून सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याच्या इमारतीचे काम लवकरच सुरू होईल, असे सांगण्यात आले.

अभियांत्रिकीच्या धर्तीवर इमारत

वाघोली, येरवडा येथील ‘आयटीआय’ संस्थांच्या कार्यशाळांच्या इमारती आता अभियांत्रिकी संस्थांच्या इमारतीच्या धर्तीवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधण्यात येणार आहे. वास्तुविशारदामार्फत त्याची रचनाही निश्चित केली आहे. या ठिकाणी प्राचार्यांची कार्यालये, कार्यशाळांची इमारत, स्वच्छतागृहे आदींची सुविधा येथे आहे, अशी माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली.

जिल्हा नियोजन समितीच्या २०२३-२४ या वर्षाच्या निधीतून वाघोली आणि येरवडा येथील ‘आयटीआय’च्या प्रशिक्षण व कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत बांधण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी निधी देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या ‘आय़टीआय’ला प्रत्येकी सुमारे १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. -डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

पेरणे फाट्यातील संस्थेला आता वाघोली येथे जागा मिळाली आहे. निधी मंजूर झाल्याने लवकरच या संस्थेच्या इमारतीचे काम सुरू होईल. येरवड्यातही नव्याने ‘आयटीआय’ संस्था सुरू होणार असून, त्यामुळे आता पुणे शहरात पाच संस्था सुरू होणार आहेत.- संतोष गोसावी, प्राचार्य, आयटीआय, वाघोली

Source link

The post येरवड्यात नवे ‘आयटीआय’; जिल्हा नियोजन समितीतून सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=79711 0
RTE Admission: पिंपरी-चिंचवड आरटीई अंतर्गत बाराशे प्रवेश पूर्ण https://tejpolicetimes.com/?p=64347 https://tejpolicetimes.com/?p=64347#respond Sat, 06 May 2023 10:00:00 +0000 https://tejpolicetimes.com/rte-admission-%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%b5%e0%a4%a1-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%88-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4/ RTE Admission: पिंपरी-चिंचवड आरटीई अंतर्गत बाराशे प्रवेश पूर्ण

म. टा. प्रतिनिधी,पिंपरीपिंपरी-चिंचवड शहरात मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी ‘आरटीई’ अंतर्गत १२१८ विद्यार्थी पात्र ठरले असून, त्यांच्या प्रवेश अर्जांची पडताळणी सुरू आहे. ही पडताळणी आठ मेपर्यंत सुरू राहणार आहे. अशी माहिती शिक्षण विभागाने दिली. ‘शिक्षण हक्क कायद्यां’तर्गत (आरटीई) शहरातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया २३ जानेवारीला सुरू झाली. […]

The post RTE Admission: पिंपरी-चिंचवड आरटीई अंतर्गत बाराशे प्रवेश पूर्ण first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
RTE Admission: पिंपरी-चिंचवड आरटीई अंतर्गत बाराशे प्रवेश पूर्ण

म. टा. प्रतिनिधी,पिंपरी

पिंपरी-चिंचवड शहरात मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी ‘आरटीई’ अंतर्गत १२१८ विद्यार्थी पात्र ठरले असून, त्यांच्या प्रवेश अर्जांची पडताळणी सुरू आहे. ही पडताळणी आठ मेपर्यंत सुरू राहणार आहे. अशी माहिती शिक्षण विभागाने दिली.

‘शिक्षण हक्क कायद्यां’तर्गत (आरटीई) शहरातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया २३ जानेवारीला सुरू झाली. सध्या आकुर्डी आणि पिंपरी विभाग मिळून १२१८ विद्यार्थी पात्र झाले असून, एकूण ३,२८१ जागा आहेत. पिंपरी केंद्रातून ३३ प्रवेश नाकारण्यात आले. आकुर्डी केंद्रातून १३९८ आणि पिंपरी केंद्रातून ६१५ जागा शिल्लक आहेत. अर्ज भरल्यानंतर छाननीला १३ एप्रिल ते ८ मेपर्यंत मुदतवाढ मिळाली. ‘आरटीई’ प्रवेशासाठी १२ एप्रिलपासून पालकांना मेसेज गेले.

संपर्क साधण्याचे आवाहन

‘आरटीई अर्जां’संबंधी कोणतीही अडचण असल्यास थेट आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी केले आहे. त्यामुळे पालकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, असा शिक्षण विभागाचा हेतू आहे.

आकुर्डी केंद्र

एकूण जागा

२,१८५

झालेले प्रवेश

७७०

पिंपरी केंद्र

एकूण जागा

१०९६

झालेले प्रवेश

४४८

Source link

The post RTE Admission: पिंपरी-चिंचवड आरटीई अंतर्गत बाराशे प्रवेश पूर्ण first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=64347 0
अजितदादांना मुख्यमंत्री झालेलं पाहायचंय: अमोल कोल्हे https://tejpolicetimes.com/?p=9198 https://tejpolicetimes.com/?p=9198#respond Sat, 02 Oct 2021 05:18:05 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%85%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80/ अजितदादांना मुख्यमंत्री झालेलं पाहायचंय: अमोल कोल्हे

हायलाइट्स: राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेला डिवचलं! अमोल कोल्हे यांनी केलं अजित पवारांचं कौतुक अजितदादांना मुख्यमंत्री झालेलं पाहायचंय – कोल्हे पुणे: पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं सर्वच प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून कार्यकर्त्यांमध्ये जोष निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी विरोधकांबरोबरच मित्र पक्षांनाही सूचक इशारे दिले जात आहेत. मागील आठवड्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी […]

The post अजितदादांना मुख्यमंत्री झालेलं पाहायचंय: अमोल कोल्हे first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
अजितदादांना मुख्यमंत्री झालेलं पाहायचंय: अमोल कोल्हे

हायलाइट्स:

  • राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेला डिवचलं!
  • अमोल कोल्हे यांनी केलं अजित पवारांचं कौतुक
  • अजितदादांना मुख्यमंत्री झालेलं पाहायचंय – कोल्हे

पुणे: पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं सर्वच प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून कार्यकर्त्यांमध्ये जोष निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी विरोधकांबरोबरच मित्र पक्षांनाही सूचक इशारे दिले जात आहेत. मागील आठवड्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यातील सभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला इशारे दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ‘अजित पवार (Ajit Pawar) यांना मुख्यमंत्रिपदी पाहण्याची इच्छा आहे, असं जाहीर वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केलं आहे.

पिंपरी चिंचवडमधील भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत ते कार्यकर्त्यांसमोर बोलत होते. ‘मला अजित दादांना राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसलेलं बघायचंय. त्यासाठी त्यांच्या पाठीशी ताकद उभी करणं हे प्रत्येक कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे. पिंपरी चिंचवडसाठी अजित दादांनी अनेक गोष्टी केल्या आहेत. त्यांनी या शहराला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली. त्यांच्याकडून आता अपेक्षा करण्याऐवजी त्यांच्यासाठी काही तरी करण्याची वेळ आली आहे. त्यांचं ऋण फेडण्याची वेळ आली आहे. त्यांच्या नेतृत्वाला बळ दिलं पाहिजे, असं कोल्हे म्हणाले.

वाचा: …म्हणून माझ्या मागे ईडीचा ससेमिरा; एकनाथ खडसे अखेर मनातलं बोलले!

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलही अमोल कोल्हे यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. ‘पवार साहेब हे पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालत आहेत. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळतंय ही भाग्याची गोष्ट आहे. पण त्यांना जर देशाच्या पंतप्रधान पदी पाहायचं असेल तर त्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालायला लागू नये, असं काम आपण करायला हवं. त्यासाठी कार्यकर्त्यांची फळी, नेत्यांची मोट बांधून झुंजार अन् लढाऊ वृत्ती आपण साहेबांना दाखवून दिली पाहिजे, असं आवाहन कोल्हे यांनी केलं.

शिवसेनेला उत्तर?

अमोल कोल्हे यांचं हे वक्तव्य म्हणजे शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिलेलं उत्तर असल्याचं बोललं जात आहे. मागील काही दिवसांत पुण्यात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यांमध्ये खासदार संजय राऊत यांनी तुफान फटकेबाजी केली होती. मित्र पक्षांनाही इशारे दिले होते. ‘राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. शिवसेना सर्वांच्या वर आहे. अजित पवारांना शिवसैनिकांचं ऐकावंच लागेल,’ अशी वक्तव्य राऊत यांनी केली होती. त्यामुळं उलटसुलट चर्चा सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर कोल्हे यांनी केलेलं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे.

वाचा: ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्यात लवकरच नवी योजना; काय आहेत वैशिष्ट्ये?

Source link

The post अजितदादांना मुख्यमंत्री झालेलं पाहायचंय: अमोल कोल्हे first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=9198 0
शिवसेनेचं ‘मिशन महापौर’; भाजपसह राष्ट्रवादीलाही आव्हान देत राऊत यांनी थोपटले दंड! https://tejpolicetimes.com/?p=8962 https://tejpolicetimes.com/?p=8962#respond Sun, 26 Sep 2021 15:44:22 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a4%82-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%8c%e0%a4%b0-%e0%a4%ad%e0%a4%be/ शिवसेनेचं ‘मिशन महापौर’; भाजपसह राष्ट्रवादीलाही आव्हान देत राऊत यांनी थोपटले दंड!

हायलाइट्स: शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा संजय राऊत यांची जोरदार फटकेबाजी शिवसैनिकांना नेमकं काय आवाहन केलं? पिंपरी : शिरुर लोकसभा आणि पिंपरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे, असं म्हणत संजय राऊत यांनी शिवसैनिकांना निवडणुकीच्या तयारीला […]

The post शिवसेनेचं ‘मिशन महापौर’; भाजपसह राष्ट्रवादीलाही आव्हान देत राऊत यांनी थोपटले दंड! first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
शिवसेनेचं ‘मिशन महापौर’; भाजपसह राष्ट्रवादीलाही आव्हान देत राऊत यांनी थोपटले दंड!

हायलाइट्स:

  • शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा
  • संजय राऊत यांची जोरदार फटकेबाजी
  • शिवसैनिकांना नेमकं काय आवाहन केलं?

पिंपरी : शिरुर लोकसभा आणि पिंपरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे, असं म्हणत संजय राऊत यांनी शिवसैनिकांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.

‘मुंबई-ठाण्याचा महापौर शिवसेनेचा असल्याचा अभिमान आहे. मात्र, पुणे, पिंपरी – चिंचवडमध्ये अस्तित्वासाठी संघर्ष करायला लागतोय, हे चित्र चांगलं नाही. पक्ष कमी पडला, पक्ष बांधणी झाली नाही, असं म्हणणे योग्य नाही. येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे. त्यासाठी तयारीला लागा. प्रभाग दोनचा होणार की तीनचा याचा विचार करत बसू नका, घासून नव्हे तर ठासून निवडून येईल, असा आत्मविश्वास बाळगा,’ असं खासदार संजय राऊत यांनी या मेळाव्यात संबोधित करताना म्हटलं आहे.

pm modi meeting : PM मोदींची अमित शहा, राजनाथ सिंहांसोबत अडीच तास बैठक; नड्डाही होते उपस्थित

अजित पवारांवर मिश्किल शेरेबाजी

उपमुख्यमंत्री अजित पवार शहरातील शिवसैनिकांचे ऐकून घेत नसल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. ‘दादा आमचं ऐकलं तर बर होईल. नाहीतर गडबड होईल. तसे मुख्यमंत्री आज दिल्लीला गेलेच आहेत,’ अशा मिश्किल शैलीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत भाष्य केलं आहे.

up cabinet expansion : यूपीत ७ मंत्र्यांचा शपथविधी, राहुल गांधींचे मित्र जितीन प्रसाद योगींच्या टीममध्ये

मुख्यमंत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले आहेत. कारण उद्या आम्हाला दिल्लीवर देखील राज्य करायचं आहे, अशी सारवासारवही राऊत यांनी केली.

दरम्यान, शिवसेनेच्या या मेळाव्याला माजी आमदार रवींद्र मिर्लेकर, जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक, राज्य संघटक गोविंद घोळवे, माजी आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, शरद सोनवणे, सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, जिल्हाप्रमुख विजय देशमुख, शहरप्रमुख अ‍ॅड. सचिन भोसले, महिला आघाडीच्या जिल्हासंघटक सुलभा उबाळे आदी या वेळी उपस्थित होते.

Source link

The post शिवसेनेचं ‘मिशन महापौर’; भाजपसह राष्ट्रवादीलाही आव्हान देत राऊत यांनी थोपटले दंड! first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=8962 0