Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
पुष्पा २ - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Fri, 17 Jan 2025 09:37:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg पुष्पा २ - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 चित्रपट हिट करायचा असेल तर… साऊथ इंडस्ट्रीच्या निर्मात्यांना सापडलाय भन्नाट फॉर्म्युला, मराठीत होणार का प्रयोग? https://tejpolicetimes.com/?p=113191 https://tejpolicetimes.com/?p=113191#respond Fri, 17 Jan 2025 09:37:25 +0000 https://tejpolicetimes.com/?p=113191 चित्रपट हिट करायचा असेल तर… साऊथ इंडस्ट्रीच्या निर्मात्यांना सापडलाय भन्नाट फॉर्म्युला, मराठीत होणार का प्रयोग?

south indian dubbed movies in hindi :जगभरात हिंदी भाषेची लोकप्रियता सध्या वाढताना दिसतेय. यात बॉलिवूडचं मोठं योगदान आहे हे विसरून चालणार नाही. गेल्या काही वर्षात हिंदी डब झालेल्या दाक्षिणात्य सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमवला आहे. म्हणूनच दाक्षिणात्य चित्रपट निर्मातेसुद्धा कमाई वाढवण्यासाठी हिंदीत चित्रपट डब करण्याच्या मागे आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई गेल्या वर्षी प्रदर्शित […]

The post चित्रपट हिट करायचा असेल तर… साऊथ इंडस्ट्रीच्या निर्मात्यांना सापडलाय भन्नाट फॉर्म्युला, मराठीत होणार का प्रयोग? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
चित्रपट हिट करायचा असेल तर… साऊथ इंडस्ट्रीच्या निर्मात्यांना सापडलाय भन्नाट फॉर्म्युला, मराठीत होणार का प्रयोग?

south indian dubbed movies in hindi :जगभरात हिंदी भाषेची लोकप्रियता सध्या वाढताना दिसतेय. यात बॉलिवूडचं मोठं योगदान आहे हे विसरून चालणार नाही. गेल्या काही वर्षात हिंदी डब झालेल्या दाक्षिणात्य सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमवला आहे. म्हणूनच दाक्षिणात्य चित्रपट निर्मातेसुद्धा कमाई वाढवण्यासाठी हिंदीत चित्रपट डब करण्याच्या मागे आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा २’ या चित्रपटानं जगभरात १८०० कोटींहून अधिक कमाई करत एक नवा विक्रम रचला. गंमतीची गोष्ट अशी, की मूळ तेलुगू चित्रपटापेक्षा हिंदीत डब केलेल्या चित्रपटानं जास्त कमाई केलीय. अल्लू अर्जुनची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटानं तेलुगूमध्ये पाच आठवड्यात जवळपास ३०० कोटींची कमाई केली, तर हिंदी चित्रपटानं ८५० कोटींपेक्षा जास्त गल्ला जमा केला असं अभ्यासक सांगतात.

गेल्या वर्षात ‘स्त्री २’ या चित्रपटानं सगळ्यात जास्त, म्हणजे जवळपास ६२७ कोटींची कमाई केली. या चित्रपटाला ‘पुष्पा २’नं मागे टाकलंय. याआधी प्रभासच्या ‘बाहुबली २’ या चित्रपटानंही हिंदीत ५११ कोटींची कमाई केली होती. या दोन चित्रपटांव्यतिरिक्त ‘केजीएफ २’ या चित्रपटानंही हिंदीत ४३५ कोटींची कमाई केली. ‘कल्की’, ‘आरआरआर’ या चित्रपटांनाही हिंदीत उत्तम प्रतिसाद मिळाला. कमाईच्या या आकडेवारीवरून हिंदी भाषेची ताकद समजल्यानंतर दाक्षिणात्य सिनेनिर्मात्यांमध्ये हिंदीत चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी चढाओढ सुरू आहे.

चित्रपट हिट करायचा असेल तर… साऊथ इंडस्ट्रीच्या निर्मात्यांना सापडलाय भन्नाट फॉर्म्युला, मराठीत होणार का प्रयोग?

परदेशात हिंदी चित्रपट लोकप्रिय
जगभरात हिंदी चित्रपटांची लोकप्रियता वाढतेय, हे कमाईचे आकडे बघून लक्षात येतं. परदेशात शाहरुखच्या चित्रपटांसाठी प्रेक्षक वेडे आहेत, केवळ हे चित्रपट बघता यावेत, यासाठी परदेशी लोक हिंदी शिकतात. आमिर खानचा ‘दंगल’ (१४३० कोटी) आणि ‘सिक्रेट सुपरस्टार’ (७९४ कोटी) हे दोन चित्रपट परदेशात सर्वाधिक कमाई करणारे हिंदी चित्रपट आहेत. सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटानंही ४७३ कोटींची कमाई केली. करोनानंतर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये शाहरुखच्या ‘पठाण’ (३९६ कोटी) आणि ‘जवान’ (३८६ कोटी) तर रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ (२५५ कोटी) या चित्रपटांनी उत्तम कमाई केली होती. आयुषमान खुरानाच्या ‘अंदाधुन’ चित्रपटानं ३६१ तर आमिर खानच्या ‘पीके’ नं २९६ कोटींची कमाई केली. अमेरिका, ब्रिटन, युरोप वगळता इतरही देशांमध्ये आता हिंदी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. ‘पठाण’ आणि ‘जवान’ हे दोन्ही चित्रपट जपानमध्येही प्रदर्शित झाले आहेत.

हिंदी चित्रपटांना वाढती मागणी !
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदी चित्रपट हे आपल्या देशाची ताकद आहेत असं म्हटलं. गेल्या काही वर्षांत जगभरातील विविध देशांमध्ये भारतीयांचं प्रमाण वाढलं असून त्यामुळे आपोआपच बाहेरील देशांमध्ये हिंदी चित्रपट बघण्याचं प्रमाण वाढलं आहे. निर्मात आणि चित्रपट अभ्यासक गिरीश जोहर यांनी सांगितलं, ‘हिंदी चित्रपटांमुळे जगभरात हिंदी भाषेची लोकप्रियता वाढली आहे यात दुमत नाही. सोशल मीडियामुळे हिंदी भाषा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. शाहरुख खानच्या चित्रपटांना भारताबाहेरही खूप मोठा प्रेक्षकवर्ग आहे. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांनाही परदेशात पसंती मिळते. शाहरुखच्या ‘जवान’ आणि ‘पठाण’ या सिनेमांबरोबरच परदेशात रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ नंही चांगली कमाई केली.

हिंदी चित्रपटांमुळे हिंदी भाषेची लोकप्रियता जगभरात वाढलीय. सोशल मीडियाचंही हिंदी भाषेच्या प्रसारात महत्त्वाचं योगदान आहे.
– गिरीश जोहर, निर्माते आणि चित्रपट अभ्यासक

हिंदीत सुपरहिट झालेले दाक्षिणात्य चित्रपट
पुष्पा २ – ८२० कोटी
बाहुबली २ – ५११ कोटी
केजीएफ २- ४३५ कोटी
कल्की – २९४ कोटी
आरआरआर २७४ कोटी
शब्दांकन : देविका जोशी-गोखले

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ” महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हाताळण्याचा सहा वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांच्या लिखाणाची आवड.”आणखी वाचा

Source link

The post चित्रपट हिट करायचा असेल तर… साऊथ इंडस्ट्रीच्या निर्मात्यांना सापडलाय भन्नाट फॉर्म्युला, मराठीत होणार का प्रयोग? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=113191 0
कशी नशिबानं थट्टा… एका महिन्यानंतरही ‘पुष्पा २’ची कोट्यवधींची कमाई; ‘बेबी जॉन’ला १ कोटी कमावणंही कठीण https://tejpolicetimes.com/?p=112649 https://tejpolicetimes.com/?p=112649#respond Sun, 05 Jan 2025 06:24:02 +0000 https://tejpolicetimes.com/?p=112649 कशी नशिबानं थट्टा… एका महिन्यानंतरही ‘पुष्पा २’ची कोट्यवधींची कमाई; ‘बेबी जॉन’ला १ कोटी कमावणंही कठीण

Pushpa 2 Vs Baby John Box Office Collection: ‘पुष्पा २’ आणि ‘बेबी जॉन’मध्ये ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. वरुण धवनच्या या सिनेमाने मात्र बॉक्स ऑफिसची सपशेल निराशा केली आहे. हायलाइट्स: ‘पुष्पा २’ची कमाई थांबता थांबेना ‘बेबी जॉन’ला मात्र दिवसाला १ कोटी कमावणंही कठीण बॉक्स ऑफिसवर अल्लू अर्जुन अव्वल महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: बॉक्स […]

The post कशी नशिबानं थट्टा… एका महिन्यानंतरही ‘पुष्पा २’ची कोट्यवधींची कमाई; ‘बेबी जॉन’ला १ कोटी कमावणंही कठीण first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
कशी नशिबानं थट्टा… एका महिन्यानंतरही ‘पुष्पा २’ची कोट्यवधींची कमाई; ‘बेबी जॉन’ला १ कोटी कमावणंही कठीण

Pushpa 2 Vs Baby John Box Office Collection: ‘पुष्पा २’ आणि ‘बेबी जॉन’मध्ये ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. वरुण धवनच्या या सिनेमाने मात्र बॉक्स ऑफिसची सपशेल निराशा केली आहे.

हायलाइट्स:

  • ‘पुष्पा २’ची कमाई थांबता थांबेना
  • ‘बेबी जॉन’ला मात्र दिवसाला १ कोटी कमावणंही कठीण
  • बॉक्स ऑफिसवर अल्लू अर्जुन अव्वल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: बॉक्स ऑफिसवर ‘पुष्पा २’ नावाची वाइल्डफायर थांबायचे नाव घेत नाही आहे. रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनच्या या सिनेमाने अलीकडेट बॉक्स ऑफिसवर एक महिना पूर्ण केला, तरीही प्रत्येक दिवशी कोट्यवधींची कमाई होते आहे. ४ जानेवारी रोजी सिनेमाचा ३१वा दिवस होता. या पाचव्या शनिवारी ‘पुष्पा २’ ने भारतात ५.५ कोटी रुपयांची कमाई केली. शुक्रवारी ही कमाई ३.७५ कोटी होती, म्हणजेच अजूनही वीकेंडला ‘पुष्पा २’च्या कमाईत वाढ होतेय.Sacnilk ने दिलेल्या आकडेवारीनुसार ‘पुष्पा २’च्या हिंदी व्हर्जनने सर्वाधिक ४.३५ कोटींची कमाई केली, तर तेलुगू आवृत्तीने १ कोटी रुपये कमावले आहेत. आतापर्यंत या सिनेमाने ११९९ कोटी रुपयांची कमाई केली असून, हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम आवृत्तीने अनुक्रमे ७८५ कोटी, ३३३.५१ कोटी, ५७.९८ कोटी, ७.७१ कोटी आणि १४.१५ कोटी अशी कमाई केली आहे. या कमाईमध्ये दिवसेंदिवस वाढ होतेय.

Pushpa 2 रीलिज होऊन ३१ दिवस झाले, तरी अवघ्या काहीच दिवसांपूर्वी रीलिज झालेल्या ‘बेबी जॉन’ला या सिनेमाने धूळ चारली आहे. वरुण धवनचा ‘बेबी जॉन’ गेल्यावर्षी ख्रिसमसला प्रदर्शित झाला. ‘थेरी’ या दाक्षिणात्य सिनेमाचा रीमेक असणारा ‘बेबी जॉन’ बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवण्यात सपशेल नापास ठरला आहे. एकीकडे पाचव्या शनिवारी ‘पुष्पा २’ने ५.५ कोटी रुपयांची कमाई केली, तर दुसरीकडे रीलिजनंतरच्या दुसऱ्या शनिवारी ‘बेबी जॉन’ने १ कोटी रुपयेदेखील कमावले नाहीत. त्यामुळे हा मल्टिस्टारर सिनेमा ४० कोटींचा आकडा गाठेल की नाही, अशी शंका आहे.

लग्नाआधी बायकोला डेट करताना घाबरलेले गोविंदा; सुनीता यांचे वय अवघे १५ आणि अभिनेत्याचे…
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या शनिवारी ‘बेबी जॉन’ने केवळ ८० लाख रुपयांची कमाई केली आहे. ओपनिंग डेला या चित्रपटाने ११.२५ कोटी कमावले होते, तेव्हा या चित्रपटाडून अपेक्षा होत्या. मात्र आता व्यवसाय वाढेल याची शक्यता कमीच आहे. एकूण ११ दिवसात या चित्रपटाने केवळ ३७.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘पुष्पा २’च्या कमाईसमोर हे आकडे जवळपासही नाहीत, असे चित्र आहे.

जान्हवी भाटकर

लेखकाबद्दलजान्हवी भाटकरजान्हवी भाटकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. डिजिटल आणि टेलिव्हिजन मीडियामध्ये ५ वर्षांचा अनुभव. ‘न्यूज १८ लोकमत’मधून डिजिटल मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात. ऑनलाइन माध्यमांमध्ये ३ वर्ष कार्यरत. मनोरंजन, लाइफस्टाइल आणि अर्थ विषयात आवड.आणखी वाचा

Source link

The post कशी नशिबानं थट्टा… एका महिन्यानंतरही ‘पुष्पा २’ची कोट्यवधींची कमाई; ‘बेबी जॉन’ला १ कोटी कमावणंही कठीण first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=112649 0
वर्षाच्या शेवटच्या रविवारीही पुष्पा 2चा डंका; २५ व्या दिवशी केली १६ कोटींची बंपर कमाई https://tejpolicetimes.com/?p=112355 https://tejpolicetimes.com/?p=112355#respond Mon, 30 Dec 2024 03:46:45 +0000 https://tejpolicetimes.com/?p=112355 वर्षाच्या शेवटच्या रविवारीही पुष्पा 2चा डंका; २५ व्या दिवशी केली १६ कोटींची बंपर कमाई

Pushpa 2 Box Office Collection : पुष्पा 2ने २५व्या दिवशीही बक्कळ कमाई केलीये. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई – अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. या सिनेमाने बक्कळ कमाई केलीये. आजपर्यंत भारतातील कोणत्याही चित्रपटाने २५ व्या दिवसात एवढी कमाई केलेली नाही जितकी ‘पुष्पा 2’ ने केली आहे. सुकुमारच्या या सिनेमावर शेवटच्या रविवारी प्रचंड नोटांचा […]

The post वर्षाच्या शेवटच्या रविवारीही पुष्पा 2चा डंका; २५ व्या दिवशी केली १६ कोटींची बंपर कमाई first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
वर्षाच्या शेवटच्या रविवारीही पुष्पा 2चा डंका; २५ व्या दिवशी केली १६ कोटींची बंपर कमाई

Pushpa 2 Box Office Collection : पुष्पा 2ने २५व्या दिवशीही बक्कळ कमाई केलीये.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई – अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. या सिनेमाने बक्कळ कमाई केलीये. आजपर्यंत भारतातील कोणत्याही चित्रपटाने २५ व्या दिवसात एवढी कमाई केलेली नाही जितकी ‘पुष्पा 2’ ने केली आहे. सुकुमारच्या या सिनेमावर शेवटच्या रविवारी प्रचंड नोटांचा वर्षाव झालाय.

रश्मिका मंदान्ना आणि अल्लू अर्जुन यांचा ‘पुष्पा 2’ हा चित्रपट केवळ या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट नाही तर भारतातील सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. तीन आकड्यांनंतरही या चित्रपटाची कमाई दोन आकड्यांमध्येच आहे. मात्र, शुक्रवारी प्रथमच कलेक्शन सिंगल डिजिटवर पोहोचलं. मात्र दुसऱ्या दिवशी शनिवारी पुन्हा सिनेमाची कमाई पूर्वपदावर आली.

वर्षाच्या शेवटच्या रविवारीही पुष्पा 2चा डंका; २५ व्या दिवशी केली १६ कोटींची बंपर कमाई

रविवारी ‘पुष्पा 2’ ने १६ कोटींची बंपर कमाई केली

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने शनिवारी १२ कोटी ५ लाख रुपयांची कमाई केली होती, तर रविवारी १६ कोटी रुपयांची बंपर कमाई केलीये. या चित्रपटाने हिंदीत जवळपास १२ कोटी ७५ लाख रुपयांची कमाई केली आहे. एकूणच, चित्रपटाने केवळ देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ११५७ कोटी ३५ लाखांची कमाई केली आहे. सिनेमाच्या फक्त हिंदी भाषेच्या कमाईबद्दल सांगायचं तर या सिनेमाने ७५३ कोटी ९ लाख रुपये कमावले आहेत.

‘पुष्पा २’च्या जगभरातील कलेक्शनचा विचार केला तर या चित्रपटाने जवळपास १६३७ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने २४ दिवसांत जगभरात १६१८ कोटींची कमाई केली होती. तर परदेशात या चित्रपटाने जवळपास २६० कोटींची कमाई केली आहे. त्याचबरोबर इंडिया ग्रॉस कलेक्शनबद्दल सांगायचं तर ‘पुष्पा 2’ने १३८० कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘दंगल’ नंतर हा चित्रपट ‘बाहुबली 2’ च्या अगदी जवळ आला आहे आणि जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. मात्र, ‘बाहुबली 2’ला मागे टाकण्यासाठी ‘पुष्पा 2’ला १५० कोटींपेक्षा जास्त कमाई करावी लागणार आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्न म्हणून कार्यरत आहे. मराठी साहित्यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. मनोरंजनविषयक बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड.आणखी वाचा

Source link

The post वर्षाच्या शेवटच्या रविवारीही पुष्पा 2चा डंका; २५ व्या दिवशी केली १६ कोटींची बंपर कमाई first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=112355 0
पुष्पा २ ने हिंदीत मोडले सारे रेकॉर्ड, ७०० कोटींची कमाई! या दोन सिनेमांनी आणलेत नाकीनऊ https://tejpolicetimes.com/?p=112158 https://tejpolicetimes.com/?p=112158#respond Wed, 25 Dec 2024 03:59:10 +0000 https://tejpolicetimes.com/?p=112158 पुष्पा २ ने हिंदीत मोडले सारे रेकॉर्ड, ७०० कोटींची कमाई! या दोन सिनेमांनी आणलेत नाकीनऊ

Pushpa 2 Box Office: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘पुष्पा २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांना मागे टाकत हिंदीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रम केला आहे. हायलाइट्स: ‘पुष्पा २’ ने २०व्या दिवशी खळबळ उडवून दिली अल्लू अर्जुनचा हा चित्रपट हिंदीत ७०० कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट […]

The post पुष्पा २ ने हिंदीत मोडले सारे रेकॉर्ड, ७०० कोटींची कमाई! या दोन सिनेमांनी आणलेत नाकीनऊ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पुष्पा २ ने हिंदीत मोडले सारे रेकॉर्ड, ७०० कोटींची कमाई! या दोन सिनेमांनी आणलेत नाकीनऊ

Pushpa 2 Box Office: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘पुष्पा २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांना मागे टाकत हिंदीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रम केला आहे.

हायलाइट्स:

  • ‘पुष्पा २’ ने २०व्या दिवशी खळबळ उडवून दिली
  • अल्लू अर्जुनचा हा चित्रपट हिंदीत ७०० कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला आहे.
  • दोन सिनेमांमुळे अडतय बाहुबलीचं गणित

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई– अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या ‘पुष्पा २’ ने सलग २० व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाने बॉलिवूड आणि साऊथच्या सर्व चित्रपटांना मागे टाकले असून हिंदीत ७०० कोटींची कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. पुष्पा २ रोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. विशेष म्हणजे तेलुगू भाषेत बनलेला हा चित्रपट हिंदीत सर्वाधिक कमाई करत आहे. २० व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या मंगळवारी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. अल्लू अर्जुन त्याच्या चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात कायद्याच्या कचाट्यात अडकला असताना, अभिनेत्याचा चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर बुलेट ट्रेनच्या वेगाने कमाई करत आहे. चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहता, त्याची गती लवकरच थांबेल असे वाटत नाही.

तीन विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडलेली अभिनेत्री, सौरव गांगुलींशीही जोडलेले नाव! आता सिंगल राहून सांभाळतेय राजकारण
‘पुष्पा २’ ने १०८९.८५ कोटींची कमाई केली आहे

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, तिसऱ्या मंगळवारीही या चित्रपटाच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली आहे. मंगळवारी या चित्रपटाने १४.२५ कोटींची बंपर कमाई केली आहे. पुष्पा २ ने केवळ हिंदीत ११.५ कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत सिनेमाने एकूण १०८९.८५ कोटींची कमाई केली आहे. एकट्या हिंदीत चित्रपटाची कमाई ७०१.६५ कोटींवर पोहोचली आहे.

जगभरात १५५० कोटींचे केलक्शन

जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने जवळपास १५५० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने परदेशात १९ दिवसांत १५२६.९५ कोटींची कमाई केली. तेथील एकूण कमाई २५० कोटींच्या पुढे गेली आहे. जगभरातील कमाईच्या बाबतीत हा चित्रपट अजूनही या दोन चित्रपटांच्या तुलनेत मागे आहे.

पोटापाण्यासाठी मुंबईत रिक्षाचालकाचे केले काम, ५० रुपयांत स्टेज करणारे कॉमेडियन बनले कोट्यवधींचे मालक
‘पुष्पा २’ या दोन चित्रपटांच्या मागे आहे

‘बाहुबली २’ ने १७८८.०६ कोटी रुपयांच्या कलेक्शनचा रेकॉर्ड केला होता, जो ‘पुष्पा २’ सहज गाठू शकतो. तर ‘दंगल’ने जगभरात सर्वाधिक म्हणजेच २०७०.३ कोटी रुपयांची कमाई करण्याचा विक्रम केला होता. मात्र, अल्लू अर्जुनला आमिर खानच्या चित्रपटाचा विक्रम मोडणे कठीण होणार असे वाटते.

पुष्पा २ ने हिंदीत मोडले सारे रेकॉर्ड, ७०० कोटींची कमाई! या दोन सिनेमांनी आणलेत नाकीनऊ

अल्लू अर्जुनने ३०० कोटी रुपयांची तगडी फी घेतली

रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुनने या चित्रपटासाठी ३०० कोटी रुपये इतकी मोठी रक्कम घेतली आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांनी जवळपास ५०० कोटी रुपये खर्च केले आहेत.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे.तसेच माझी सहेली मॅगझिन मध्ये १ वर्षाचा अनुभव
आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. मनोरंजनसोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.
आणखी वाचा

Source link

The post पुष्पा २ ने हिंदीत मोडले सारे रेकॉर्ड, ७०० कोटींची कमाई! या दोन सिनेमांनी आणलेत नाकीनऊ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=112158 0
अखेर तो दिवस आलाच, ७ वर्ष जुना रेकॉर्ड मोडून पुष्पा २ ने भारतात रचला इतिहास https://tejpolicetimes.com/?p=112057 https://tejpolicetimes.com/?p=112057#respond Mon, 23 Dec 2024 08:18:38 +0000 https://tejpolicetimes.com/?p=112057 अखेर तो दिवस आलाच, ७ वर्ष जुना रेकॉर्ड मोडून  पुष्पा २ ने भारतात रचला इतिहास

Pushpa 2 Box Office Collection: अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ ने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. हा चित्रपट १८ व्या दिवशीच देशातील नंबर वन चित्रपट ठरला आहे. ‘पुष्पा २’ ने रविवारी बंपर कमाई करत ‘बाहुबली २’ला मागे टाकले आहे. हायलाइट्स: ‘पुष्पा २’ ने १८व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर देशातील सर्व चित्रपटांना मागे टाकले. ‘पुष्पा २: द रुल’ […]

The post अखेर तो दिवस आलाच, ७ वर्ष जुना रेकॉर्ड मोडून पुष्पा २ ने भारतात रचला इतिहास first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
अखेर तो दिवस आलाच, ७ वर्ष जुना रेकॉर्ड मोडून  पुष्पा २ ने भारतात रचला इतिहास

Pushpa 2 Box Office Collection: अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ ने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. हा चित्रपट १८ व्या दिवशीच देशातील नंबर वन चित्रपट ठरला आहे. ‘पुष्पा २’ ने रविवारी बंपर कमाई करत ‘बाहुबली २’ला मागे टाकले आहे.

हायलाइट्स:

  • ‘पुष्पा २’ ने १८व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर देशातील सर्व चित्रपटांना मागे टाकले.
  • ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाने भारतात सर्वात कमी वेळेत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रम केला आहे.
  • इंडिया नेट कलेक्शनच्या बाबतीत सगळ्यांना मागे टाकणारा हा चित्रपट देशातील नंबर १ चित्रपट ठरला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई– सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २’ ने गेल्या ७ वर्षांनंतर भारतातील सर्वोच्च कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड निर्माण केली होती. जी १८ व्या दिवशीही कायम आहे. अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाने अवघ्या १८ दिवसांत सर्वात कमी वेळेत सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनण्याचा विक्रम केला आहे. ‘पुष्पा २: द रुल’ या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या चित्रपटाने एडव्हान्स बुकिंगमध्ये इतर सिनेमांचे रेकॉर्ड मोडायला सुरुवात केली होती. पहिल्या दिवशीही या चित्रपटाने एकाच वेळी अनेक विक्रम मोडले. रविवारी म्हणजेच १८ व्या दिवशी हा चित्रपट इंडियन नेट कलेक्शनच्या बाबतीत देशातील पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे.

प्रत्येक जन्मी मला तुझा बाबा होऊ दे किंवा मग तुझा मुलगा तरी… लेकीसाठी सलील कुलकर्णींची हृदयस्पर्शी पोस्ट
‘पुष्पा २’ १८ दिवसांत देशातील नंबर १ चित्रपट ठरला आहे

‘पुष्पा २’ चित्रपटाने १८ व्या दिवशी ९ व्या दिवशीही तेवढीच मोठी कमाई केली आहे. चित्रपटाने १७ व्या दिवशी शनिवारी २४.७५ कोटी रुपयांची कमाई केली होती, तर १८ व्या दिवशी ३३.२५ कोटींची कमाई केली. रविवारी या चित्रपटाने हिंदीत शनिवारच्या एकूण कमाईपेक्षा जास्त कमाई केली आहे, जी जवळपास २६.७५ कोटी रुपये होती. sacnilk च्या अहवालानुसार, साऊथमधील या सुपरहिट चित्रपटाने १८ व्या दिवशी ३३.२५ कोटी रुपये कमवले आहेत आणि एकूणच चित्रपटाने १०६२.९ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘ते भारताचे नव्हे पाकिस्तानचे राष्ट्रपिता आहेत’, महात्मा गांधीजींबद्दल बॉलिवूड गायकाचे वादग्रस्त विधान
जगभरातील कमाईच्या बाबतीत दोन चित्रपट अजूनही ‘पुष्पा २’ च्या पुढे आहेत.

‘पुष्पा २’ आता भारतीय नेट कलेक्शनच्या बाबतीत देशातील नंबर १ चित्रपट बनला आहे. त्याने बाहुबली २ ची जागा घेतली आहे. बाहुबली २ चे एकूण भारतातील एकूण कलेक्शन सुमारे १०३०.४२ कोटी रुपये होते. त्याला मागे टाकून ‘पुष्पा २’ ने पहिला क्रमांक पटकावला आहे., ‘पुष्पा २’ अजूनही जगभरातील कलेक्शनच्या बाबतीत दोन चित्रपटांपेक्षा मागे दिसत आहे. २०१७ मध्ये रिलीज झालेल्या ‘बाहुबली २’ ने जगभरात १७८८.०६ कोटी रुपयांचे संपुर्ण कलेक्शन केले होते, तर ‘दंगल’चे अजूनही २०७०.३ कोटी रुपयांचे कलेक्शन आहे. अल्लू अर्जुनचा चित्रपट लवकरच येथेही यश मिळवेल असे दिसते.

अखेर तो दिवस आलाच, ७ वर्ष जुना रेकॉर्ड मोडून पुष्पा २ ने भारतात रचला इतिहास

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ ने १५०० कोटींचा टप्पा पार केला आहे

‘पुष्पा २’च्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने १७ दिवसांत १४६७.८० कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर आता या चित्रपटाने १८ दिवसांत सुमारे १५१० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने परदेशात १८ दिवसांत २५० कोटींची कमाई केली असण्याची शक्यता आहे.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे.तसेच माझी सहेली मॅगझिन मध्ये १ वर्षाचा अनुभव
आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. मनोरंजनसोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.
आणखी वाचा

Source link

The post अखेर तो दिवस आलाच, ७ वर्ष जुना रेकॉर्ड मोडून पुष्पा २ ने भारतात रचला इतिहास first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=112057 0
पुष्पा २ मोडणार ७ वर्ष जुना मेगा रेकॉर्ड ! १००० कोटी क्लबमध्ये एण्ट्री करणारा दुसरा सिनेमा तर पहिला आहे…. https://tejpolicetimes.com/?p=111977 https://tejpolicetimes.com/?p=111977#respond Sat, 21 Dec 2024 08:29:06 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111977 पुष्पा २ मोडणार ७ वर्ष जुना मेगा रेकॉर्ड ! १००० कोटी क्लबमध्ये एण्ट्री करणारा दुसरा सिनेमा तर पहिला आहे….

Pushpa 2 Box Office Collection: सुकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘पुष्पा २- द रुल’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील दुसरा चित्रपट ठरला आहे, ज्याने १००० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. अवघ्या १६ दिवसांत ही कामगिरी केली आहे. हायलाइट्स: ‘पुष्पा २’ हा देशातील १००० कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा दुसरा चित्रपट रविवारी दोन दिवसांनंतर ‘पुष्पा २’ नवा इतिहास रचणार ख्रिसमसला […]

The post पुष्पा २ मोडणार ७ वर्ष जुना मेगा रेकॉर्ड ! १००० कोटी क्लबमध्ये एण्ट्री करणारा दुसरा सिनेमा तर पहिला आहे…. first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पुष्पा २ मोडणार ७ वर्ष जुना मेगा रेकॉर्ड ! १००० कोटी क्लबमध्ये एण्ट्री करणारा दुसरा सिनेमा तर पहिला आहे….

Pushpa 2 Box Office Collection: सुकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘पुष्पा २- द रुल’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील दुसरा चित्रपट ठरला आहे, ज्याने १००० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. अवघ्या १६ दिवसांत ही कामगिरी केली आहे.

हायलाइट्स:

  • ‘पुष्पा २’ हा देशातील १००० कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा दुसरा चित्रपट
  • रविवारी दोन दिवसांनंतर ‘पुष्पा २’ नवा इतिहास रचणार
  • ख्रिसमसला ‘बेबी जॉन’ येतोय, ‘पुष्पा २’ला अडथळा?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबईः अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिलच्या ‘पुष्पा २- द रुल’ने तिसऱ्या आठवड्यात धमाकेदार कमाई केली आहे. शुक्रवारी, २० डिसेंबर रोजी या सिनेमाने देशातील १००० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. ‘बाहुबली २’ नंतर ही कामगिरी करणारा हा दुसरा चित्रपट ठरला आहे. चित्रपटाने देशातील बजेटपेक्षा दुप्पट कमाई केली आहे. एवढेच नाही तर दोन दिवसांत हा ॲक्शन ड्रामा ७ वर्ष जुना मेगा रेकॉर्ड मोडणार आहे. रविवारी ‘पुष्पा २’ इतिहास रचणार आणि देशातील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरणार हे निश्चित झाले आहे. ‘पुष्पा २’चे बजेट जवळपास ५०० कोटी रुपये होते. १६ दिवसांत देशातील पाचही भाषांमध्ये या सिनेमाने १००४.३५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. याआधी, ‘बाहुबली २’ हा एकमेव सिनेमा होता, ज्याने २०१७ मध्ये १००० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला होता. मात्र, यासाठी प्रभासच्या चित्रपटाला तब्बल ५ आठवडे लागले होते.

हे जरा अती झालं! TRP साठी लहान मुलांसोबत तसले सीन नको, ‘अप्पी आमची…’ च्या चालू ट्रॅकवर प्रेक्षकांचा राग
‘पुष्पा २’ इतिहास रचण्यापासून फक्त २६ कोटी दूर

विशेष बाब म्हणजे ‘पुष्पा २’ आता देशातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सिनेमाच्या रेकॉर्डपेक्षा केवळ २६.०७ कोटी रुपये दूर आहे. सात वर्षांपूर्वी ‘बाहुबली २’ ने १०३०.४२ कोटींची संपुर्ण कमाई करून हा विक्रम केला होता. अल्लू अर्जुनचा चित्रपट रविवारी हा विक्रम सहज पार करेल आणि भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवा इतिहासही रचेल हे निश्चित झाले आहे.

‘पुष्पा २’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन

sacnilk च्या अहवालानुसार, पहिल्या आठवड्यात ७२५.८० कोटी रुपये आणि दुसऱ्या आठवड्यात २६४.८० कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर, तिसऱ्या शुक्रवारी ‘पुष्पा २’ ने देशात १३.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. गुरुवारी सिनेमाने १७.६५ कोटी रुपयांची कमाई केली होती. कमाईत -२२% ची घट झाली आहे. मात्र आता शनिवार आणि रविवारी पुन्हा कमाई वाढण्याची चिन्हे आहेत. शुक्रवारी या चित्रपटाने हिंदीत ११ कोटी रुपये, तेलुगूमधून २.४० कोटी रुपये, तामिळमध्ये ३० लाख रुपये, कन्नडमधून ३ लाख रुपये आणि मल्याळममधून २ लाख रुपयांचा सर्वाधिक व्यवसाय केला आहे.

कट्टा म्हणजे माहित आहे का? लग्नापूर्वी गौरी खानच्या भावाने शाहरुखला दिलेली धमकी, हे होते अभिनेत्याचे उत्तर
देशात १६ दिवसात ‘पुष्पा २’ चे नेट कलेक्शन- १००४.३५ कोटी रु

हिंदीमध्ये नेट कलेक्शन – ६३२.६० कोटी

तेलगू नेट कलेक्शन- २९७.८० कोटी रु

तामिळमध्ये नेट कलेक्शन – रु ५२.८० कोटी*

मल्याळममध्ये नेट कलेक्शन – रु. १३.९९ कोटी*

कन्नडमधून नेट कलेक्शन – ७.१६ कोटी*

देशात १६ दिवसात ‘पुष्पा २’ चे एकूण कलेक्शन – १२०८.०० कोटी रु

‘पुष्पा २’ चे परदेशात एकूण कलेक्शन – २३७.०० कोटी रु

‘पुष्पा २’ चे जागतिक एकूण कलेक्शन – १४४५.०० कोटी

पुष्पा २ मोडणार ७ वर्ष जुना मेगा रेकॉर्ड ! १००० कोटी क्लबमध्ये एण्ट्री करणारा दुसरा सिनेमा तर पहिला आहे….

‘पुष्पा २’ जगभरातील कलेक्शन

जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर १६ दिवसांत सुमारे १४४५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. सध्या जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल ‘बाहुबली २’ १७८८.०६ कोटी रुपयांवर नंबर आहे, तर सर्वात वर आमिर खानचा ‘दंगल’ आहे, ज्याने २०७०.३० कोटी रुपयांची कमाई केली होती.

‘बेबी जॉन’ मुळे ‘पुष्पा २’ धोका?

बॉक्स ऑफिसवर राज्य करणाऱ्या ‘पुष्पा २’साठी ‘बेबी जॉन’ ४ दिवसांनंतर अडचणी निर्माण करु शकतो. वरुण धवनचा हा ॲक्शन चित्रपट २५ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. ॲटलीच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाबाबत बरीच चर्चा निर्माण झाली आहे. ‘पुष्पा २’ याला बळी पडतो की त्याची जादू कायम राहते हे पाहणे नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे.तसेच माझी सहेली मॅगझिन मध्ये १ वर्षाचा अनुभव
आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. मनोरंजनसोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.
आणखी वाचा

Source link

The post पुष्पा २ मोडणार ७ वर्ष जुना मेगा रेकॉर्ड ! १००० कोटी क्लबमध्ये एण्ट्री करणारा दुसरा सिनेमा तर पहिला आहे…. first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111977 0
‘इंटरनॅशनल खिलाडी’ म्हणत पुष्पा राजने केली छप्परफाड कमाई; जगभरात कमावले १५०८ कोटी रुपये https://tejpolicetimes.com/?p=111920 https://tejpolicetimes.com/?p=111920#respond Fri, 20 Dec 2024 02:36:31 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111920 ‘इंटरनॅशनल खिलाडी’ म्हणत पुष्पा राजने केली छप्परफाड कमाई; जगभरात कमावले १५०८ कोटी रुपये

Pushpa 2 Box Office Collection Day 15 : अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ सिनेमाचं जगभरातील कलेक्शन. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई – अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिलचा पुष्पा 2 दररोज नवीन रेकॉर्ड बनवताना दिसत आहे. तिसऱ्या वीकेंडपूर्वी या चित्रपटाने जगभरात १५०८ कोटींची कमाई केली असली तरी हा चित्रपट अजूनही १००० कोटींच्या कमाईपासून दूर आहे. पुष्पा 2 […]

The post ‘इंटरनॅशनल खिलाडी’ म्हणत पुष्पा राजने केली छप्परफाड कमाई; जगभरात कमावले १५०८ कोटी रुपये first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘इंटरनॅशनल खिलाडी’ म्हणत पुष्पा राजने केली छप्परफाड कमाई; जगभरात कमावले १५०८ कोटी रुपये

Pushpa 2 Box Office Collection Day 15 : अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ सिनेमाचं जगभरातील कलेक्शन.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई – अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिलचा पुष्पा 2 दररोज नवीन रेकॉर्ड बनवताना दिसत आहे. तिसऱ्या वीकेंडपूर्वी या चित्रपटाने जगभरात १५०८ कोटींची कमाई केली असली तरी हा चित्रपट अजूनही १००० कोटींच्या कमाईपासून दूर आहे. पुष्पा 2 ने याआधीच 2024 च्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. पण तिसऱ्या वीकेंडला हा सिनेमा आणखीन कमाई करणार आहे.
शो बंद होताच कोट्यवधींच्या कर्जात बुडालेली लोकप्रिय अभिनेत्री; रस्त्यावर काढलेली रात्र अन्…

पुष्पा २चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

Sacnilkच्या रिपोर्टनुसार, पुष्पा 2 ने १५ व्या दिवशी १७.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ज्यामध्ये तेलुगूमध्ये २.७५ कोटी रुपये, हिंदीमध्ये १४ कोटी रुपये, तामिळमध्ये ८ लाख रुपये, कन्नडमध्ये १३ लाख रुपये आणि ७ लाख रुपये मल्याळम मध्ये मिळवले आहे. यानंतर या सिनेमाचं भारतातील कलेक्शन ९९० कोटी ७ लाख रुपये झालं आहे. तर जगभरातील कलेक्शन १५०८ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.
जगभरातील कलेक्शन शेअर करताना ‘पुष्पा 2: द रुल’च्या प्रोडक्शन हाऊसने लिहिले – ‘व्यावसायिक सिनेमा पुन्हा परिभाषित केलं गेलं आणि बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. #Pushpa2TheRule ने जगभरात १५०८ कोटी रुपयांची कमाई केली असून हा आकडा गाठणारा सर्वात वेगवान भारतीय चित्रपट ठरला आहे.

‘इंटरनॅशनल खिलाडी’ म्हणत पुष्पा राजने केली छप्परफाड कमाई; जगभरात कमावले १५०८ कोटी रुपये

पुष्पा २च्या १४ दिवसांच्या दिवसांच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर या सिनेमाने पहिल्या दिवशी १६४.२५ कोटी, दुसऱ्या दिवशी ९३.८ कोटी, तिसऱ्या दिवशी ११९.२५ कोटी, चौथ्या दिवशी १४१.०५ कोटी, पाचव्या दिवशी ६४.४५ कोटी, सहाव्या दिवशी ५१.५५ कोटी कमावले होते. सातव्या दिवशी ४३.३५ कोटी आणि आठव्या दिवशी ३७.४५ कोटींची कमाई केली. तर या चित्रपटाने एका आठवड्यात ७२५.८ कोटींचा व्यवसाय केला. अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ने नवव्या दिवशी ३६.३ कोटी रुपये, १२व्या दिवशी २४.३५ कोटी रुपये कमावले आहेत. १४ व्या दिवशी २० कोटी ५५ लाख रुपये कमावले असून त्यानंतर दुसऱ्या आठवड्याचं कलेक्शन २६४ कोटी ९लाख रुपये आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्न म्हणून कार्यरत आहे. मराठी साहित्यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. मनोरंजनविषयक बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड…. आणखी वाचा

Source link

The post ‘इंटरनॅशनल खिलाडी’ म्हणत पुष्पा राजने केली छप्परफाड कमाई; जगभरात कमावले १५०८ कोटी रुपये first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111920 0
‘फायर नहीं, वाईल्ड फायर…’ पुष्पा २ची जगभरात तगडी कमाई, अल्लू अर्जुनने मोडला RRRचा रेकॉर्ड https://tejpolicetimes.com/?p=111777 https://tejpolicetimes.com/?p=111777#respond Tue, 17 Dec 2024 03:50:05 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111777 ‘फायर नहीं, वाईल्ड फायर…’ पुष्पा २ची जगभरात तगडी कमाई, अल्लू अर्जुनने मोडला RRRचा रेकॉर्ड

Pushpa 2 Box Office Collection : अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ सिनेमाचं जगभरातील कलेक्शन. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई – अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ सिनेमाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. वीकेंड असो किंवा इतर दिवस, चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. पुष्पा २ सिनेमा भारतात १००० कोटी रुपये कमावणार आहे. या सिनेमाने जगभरात रेकॉर्ड मोडले आहेत. पुष्पा 2 ने याआधीच […]

The post ‘फायर नहीं, वाईल्ड फायर…’ पुष्पा २ची जगभरात तगडी कमाई, अल्लू अर्जुनने मोडला RRRचा रेकॉर्ड first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘फायर नहीं, वाईल्ड फायर…’ पुष्पा २ची जगभरात तगडी कमाई, अल्लू अर्जुनने मोडला RRRचा रेकॉर्ड

Pushpa 2 Box Office Collection : अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ सिनेमाचं जगभरातील कलेक्शन.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई – अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ सिनेमाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. वीकेंड असो किंवा इतर दिवस, चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. पुष्पा २ सिनेमा भारतात १००० कोटी रुपये कमावणार आहे. या सिनेमाने जगभरात रेकॉर्ड मोडले आहेत. पुष्पा 2 ने याआधीच अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले असून आता एसएस राजामौली यांच्या आरआरआरचाही या यादीत समावेश झाला आहे. तसंच हा जगभरात सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट ज्या पद्धतीने कमाई करत आहे, त्यामुळे पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर येण्यास फारसा वेळ लागणार नाही.

पुष्पा २ सिनेमाचं जगभरातील कलेक्शनबद्दल सांगायचं झाल्यास, या सिनेमाने KGF चॅप्टर 2 चा रेकॉर्ड देखील मोडला आहे. लोक हा चित्रपट एकदा नाही तर २-३ वेळा पाहत असल्याचं मीडिया रिपोर्टनुसार समजून आलंय.

‘फायर नहीं, वाईल्ड फायर…’ पुष्पा २ची जगभरात तगडी कमाई, अल्लू अर्जुनने मोडला RRRचा रेकॉर्ड

RRR चा रेकॉर्ड मोडला

Sacnilkच्या रिपोर्टनुसार, पुष्पा २ने जगभरात १३२२ कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाने RRR KGF Chapter 2 ला मागे टाकून तिसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला आहे. RRR सिनेमाचं कलेक्शन १२३० कोटी आहे आणि KGF चॅप्टर २चं कलेक्शन १२१५ कोटी आहे. त्याचबरोबर बाहुबली २ने १७९० कोटींची कमाई केली होती तर दंगलने २०७० कोटींची कमाई केलीये. त्यामुळे अल्लू अर्जुनचा पुष्पा २ सिनेमा लवकरच लांबचा पल्ला गाठण्याची शक्यता आहे.

पुष्पा २ने भारतात जवळपास ९२९ कोटींची कमाई केली असून या सिनेमाला १००० कोटींच्या क्लबमध्ये सामील व्हायला जास्त वेळ लागणार नाही.
CM चा लेक म्हणजे तो बिघडलेलाच! जिनिलियाचा पहिल्या भेटीत झालेला गैरसमज, असं फुललं रितेशसोबतचं नातं
दरम्यान, पुष्पा २ सिनेमात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहेत. चाहत्यांना या चित्रपटाचं वेड लागलं असून या सिनेमाला पहिल्या भागापासून ते दुसऱ्या भागापर्यंत प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांच्या मनात पुष्पाच्या तिसऱ्या भागाची उत्कंठा वाढली असून तिसरा भाग कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्न म्हणून कार्यरत आहे. मराठी साहित्यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. मनोरंजनविषयक बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड…. आणखी वाचा

Source link

The post ‘फायर नहीं, वाईल्ड फायर…’ पुष्पा २ची जगभरात तगडी कमाई, अल्लू अर्जुनने मोडला RRRचा रेकॉर्ड first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111777 0
झुकेगा नहीं साला! पुष्पा राजचं फ्याड जाईना; ठरला देशातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा https://tejpolicetimes.com/?p=111729 https://tejpolicetimes.com/?p=111729#respond Mon, 16 Dec 2024 03:44:25 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111729 झुकेगा नहीं साला! पुष्पा राजचं फ्याड जाईना; ठरला देशातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा

Pushpa 2 Box Office Collection : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ सिनेमाचं ११व्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई – अल्लू अर्जुन स्टारर बहुचर्चित सिनेमा ‘पुष्पा 2: द रुल’ बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच चांगला चालतोय आणि त्याच्या कमाईचा वेग अजिबात कमी झालेला नाही. या चित्रपटाने रिलीजच्या […]

The post झुकेगा नहीं साला! पुष्पा राजचं फ्याड जाईना; ठरला देशातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
झुकेगा नहीं साला! पुष्पा राजचं फ्याड जाईना; ठरला देशातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा

Pushpa 2 Box Office Collection : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ सिनेमाचं ११व्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई – अल्लू अर्जुन स्टारर बहुचर्चित सिनेमा ‘पुष्पा 2: द रुल’ बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच चांगला चालतोय आणि त्याच्या कमाईचा वेग अजिबात कमी झालेला नाही. या चित्रपटाने रिलीजच्या पाचव्या दिवशी त्याची किंमत वसूल केली होती आणि आता तो प्रचंड नफा कमावत आहे. ‘पुष्पा 2: द रुल’ने रिलीजच्या ११व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या रविवारी किती कलेक्शन केलं आहे? ते जाणून घेऊया.

‘पुष्पा 2: द रुल’ ने ११व्या दिवशी किती कमाई केली?

‘पुष्पा 2: द रुल’ रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात आहे आणि त्याची क्रेझ अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहे. रिलीजच्या पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने प्रचंड कमाई केली नाही तर दुसऱ्या आठवड्यामध्येही या ॲक्शन थ्रिलरने धमाल केली. दुसऱ्या शनिवारीही हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या रांगा लागल्या होत्या. दुसऱ्या रविवारीही चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने आले होते. यासोबतच ‘पुष्पा 2: द रुल’नेही दुसऱ्या वीकेंडला धुमाकूळ घातलाय.
Ustad Zakir Hussain Passed Away : उस्ताद झाकीर हुसेन काळाच्या पडद्याआड, कुटुंबीयांनी दिलं निधनाचं वृत्त
चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचं झाल्यास, ‘पुष्पा 2: द रुल’ने पहिल्या आठवड्यात ७२५ कोटी ८ लाखांची कोटींची कमाई केली आहे. ९व्या दिवशी चित्रपटाने ३६ कोटी ४ लाखांची कमाई केली, तर १०व्या दिवशी ‘पुष्पा 2: द रुल’चं कलेक्शन ६३.३ कोटी रुपये होतं. आता चित्रपटाच्या ११व्या दिवसाच्या कमाईचे प्रारंभिक आकडे आले आहेत.

झुकेगा नहीं साला! पुष्पा राजचं फ्याड जाईना; ठरला देशातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा

Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘पुष्पा 2: द रुल’ ने रिलीजच्या ११व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या रविवारी ७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यांसह, ‘पुष्पा 2: द रुल’चे ११ दिवसांचं एकूण कलेक्शन आता ९०० कोटींवर पोहोचलं आहे. रिलीजच्या ११ दिवसांत, चित्रपटाने तेलगूमध्ये २७९.३५ कोटी रुपये, हिंदीमध्ये ५५३.१ कोटी रुपये, तामिळमध्ये ४८.१ कोटी रुपये, कन्नडमध्ये ६.५५ कोटी रुपये आणि मल्याळममध्ये १३.४ कोटी रुपये कमावले आहेत.
हे सुंदर क्षण…. झाकीर हुसेन यांची ती पोस्ट ठरली अखेरची, भारताने हिरा गमवल्याचे चाहत्यांचे म्हणणे

‘पुष्पा 2: द रुल’ ने यशच्या KGF 2 चा रेकॉर्ड मोडला

‘पुष्पा 2: द रुल’ने दुसऱ्या वीकेंडलाही बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. या चित्रपटाने रिलीजच्या ११ दिवसांत विक्रमी ९००.५ कोटींची कमाई करून इतिहास रचला आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाने यशच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘KGF चॅप्टर 2’ च्या कलेक्शनचा विक्रम मोडीत काढला आहे. ‘पुष्पा 2: द रुल’ हा देशातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्न म्हणून कार्यरत आहे. मराठी साहित्यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. मनोरंजनविषयक बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड…. आणखी वाचा

Source link

The post झुकेगा नहीं साला! पुष्पा राजचं फ्याड जाईना; ठरला देशातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111729 0
एकीकडे अल्लू अर्जुन तुरुंगाबाहेर, दुसरीकडे ‘पुष्पा २’ची कमाई दुप्पट! १००० कोटी क्लबमध्ये होणार एन्ट्री https://tejpolicetimes.com/?p=111698 https://tejpolicetimes.com/?p=111698#respond Sun, 15 Dec 2024 03:58:30 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111698 एकीकडे अल्लू अर्जुन तुरुंगाबाहेर, दुसरीकडे ‘पुष्पा २’ची कमाई दुप्पट! १००० कोटी क्लबमध्ये होणार एन्ट्री

Allu Arjun Pushpa 2 Box Office Collection: अभिनेता अल्लू अर्जुन ‘पुष्पा २’मुळे विशेष चर्चेत आहे. या सिनेमासंबंधीत एका प्रकरणात अलीकडेच अभिनेत्याला अटक झाली आणि लगेचच त्याची सुटकाही झाली. या प्रकरणानंतर बॉक्स ऑफिस कलेक्शनवर नेमका काय परिणाम झाला? महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना यांचा अलीकडेच प्रदर्शित झालेला सिनेमा ‘पुष्पा २’ बॉक्स ऑफिसवर इतिहास रचतो […]

The post एकीकडे अल्लू अर्जुन तुरुंगाबाहेर, दुसरीकडे ‘पुष्पा २’ची कमाई दुप्पट! १००० कोटी क्लबमध्ये होणार एन्ट्री first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
एकीकडे अल्लू अर्जुन तुरुंगाबाहेर, दुसरीकडे ‘पुष्पा २’ची कमाई दुप्पट! १००० कोटी क्लबमध्ये होणार एन्ट्री

Allu Arjun Pushpa 2 Box Office Collection: अभिनेता अल्लू अर्जुन ‘पुष्पा २’मुळे विशेष चर्चेत आहे. या सिनेमासंबंधीत एका प्रकरणात अलीकडेच अभिनेत्याला अटक झाली आणि लगेचच त्याची सुटकाही झाली. या प्रकरणानंतर बॉक्स ऑफिस कलेक्शनवर नेमका काय परिणाम झाला?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना यांचा अलीकडेच प्रदर्शित झालेला सिनेमा ‘पुष्पा २’ बॉक्स ऑफिसवर इतिहास रचतो आहे. रिलीज झाल्यापासून ‘पुष्पा २’ची बॉक्स ऑफिसवर धमाल सुरू आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार सिनेमाच्या कमाईत रीलिजनंतर १०व्या दिवशी, म्हणजेच दुसऱ्या शनिवारी ७१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. अल्लू अर्जुन तुरुंगातून परत आल्यानंतर ही वाढ पाहायला मिळाली. पोलिसांनी अभिनेत्याला शुक्रवारी अटक केली आणि शनिवारी सकाळी त्याची सुटका करण्यात आली.

४ डिसेंबर रोजी झालेल्या या चित्रपटाच्या प्रीमियर शो दरम्यान हैदराबाद याठिकाणी असणाऱ्या संध्या थिएटरमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचंगरीत एका ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा मुलगा जखमी झाला होता. त्या महिलेच्या पतीने एफआयआर दाखल केला, ज्यानंतर पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली. या घटनाक्रमाचा चित्रपटाच्या व्यवसायावर उलट परिणाम झाला आणि कमाईत मोठी वाढ झाली आहे.

‘पुष्पा २’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन

दुसऱ्या शनिवारी १४ डिसेंबर रोजी ‘पुष्पा २’ने ६२.३ कोटी रुपयांची कमाई केली, त्यापैकी ४६ कोटी रुपये हिंदीतून आणि १३ कोटी रुपये तेलुगूमधून आले. शुक्रवारी एकूण कलेक्शन केवळ ३६.५ कोटी रुपये होते. त्यामुळे चित्रपटाची कमाई थेट दुप्पट झाली आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, भारतातील सर्व भाषांमध्ये चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता ८२४.५ कोटी रुपये झाले आहे.

दाक्षिणात्य भाषांपेक्षा हिंदीतून सर्वाधिक कमाई

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या एकूण कलेक्शनपैकी ४९८ कोटी रुपये हिंदीतून आले आहेत, जे तेलगू व्हर्जनच्या कमाईपेक्षा कितीतरी जास्त आहे. या चित्रपटाने सर्व भाषांमधील ‘जवान’ आणि ‘आरआरआर’च्या लाइफटाइम कलेक्शनला मागे टाकले आहे. ‘KGF: Chapter 2’ ला मागे टाकून ‘पुष्पा २’ सध्या सर्वाधिक कमाई करणारा सहावा हिंदी चित्रपट आहे, केजीएफ २ ने ४३४.६२ कोटी रुपयांची कमाई केली होती. रविवारीही असेच कलेक्शन राहिल्यास अल्लू अर्जुनचा हा सिनेमा ‘बाहुबली २’ आणि ‘गदर २’च्या हिंदी कलेक्शनलाही मागे टाकू शकतो.

जान्हवी भाटकर

लेखकाबद्दलजान्हवी भाटकरजान्हवी भाटकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. डिजिटल आणि टेलिव्हिजन मीडियामध्ये ५ वर्षांचा अनुभव. ‘न्यूज १८ लोकमत’मधून डिजिटल मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात. ऑनलाइन माध्यमांमध्ये ३ वर्ष कार्यरत. मनोरंजन, लाइफस्टाइल आणि अर्थ विषयात आवड…. आणखी वाचा

Source link

The post एकीकडे अल्लू अर्जुन तुरुंगाबाहेर, दुसरीकडे ‘पुष्पा २’ची कमाई दुप्पट! १००० कोटी क्लबमध्ये होणार एन्ट्री first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111698 0