reviews-feed
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121feeds-for-youtube
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121instagram-feed
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121publisher
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मिशन चांद्रयान-४ बद्दल मोठी अपडेट दिली आहे. बुधवारी त्यांनी सांगितले की, चांद्रयान ४ ची रचना चंद्रावरून मातीचे नमुने आणण्यासाठी करण्यात आली आहे. आणि हे काम एकाचवेळी नाही तर दोन स्वतंत्र रॉकेट प्रक्षेपित करून अवकाश कक्षेत पाठवले जाणार आहे. अवकाशातच या […]
The post Chandrayaan-4: मिशन चांद्रयान-४ बद्दल मोठी अपडेट; भारत चंद्रावरून पृथ्वीवर आणणार ‘ही’ मौल्यवान गोष्ट first appeared on TEJPOLICETIMES.
]]>चांद्रयान-४ दोन भागांमध्ये प्रक्षेपित केले जाणार आहे. कारण ते इतके वजनदार आहे की त्याला सध्या इस्रोकडे उपलब्ध असलेल्या कोणत्याही रॉकेटमध्ये एकत्र वाहून नेले जाऊ शकत नाही. अंतराळ स्थानके आणि इतर तत्सम गोष्टी याआधीच अवकाशात वेगवेगळे भाग एकत्र करून तयार करण्यात आल्या आहेत. परंतु असे मानले जाते की. चांद्रयान-४ हे जगातील पहिले असे अंतराळयान असेल, जे अनेक भागांमध्ये सोडले जाईल आणि नंतर अवकाशात एकत्र जोडले जाईल. भारताची चौथी चंद्र मोहीम २०२८ मध्ये प्रक्षेपित होण्याची शक्यता आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, इस्रोचे प्रमुख दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले, ‘आम्ही चांद्रयान-४ ची रूपरेषा तयार केली आहे. म्हणजेच चंद्रावरील मातीचे नमुने पृथ्वीवर कसे आणायचे. आमच्याकडे एकाच वेळी सर्वकाही वाहून नेण्याइतके शक्तिशाली रॉकेट नसल्यामुळे, आम्ही ते अनेक भागांत लॉन्च करण्याचा विचार करत आहोत. ते पुढे म्हणाले, ‘यासाठी आपल्याला अंतराळातच वाहनाचे वेगवेगळे भाग (डॉकिंग) जोडण्याची क्षमता विकसित करावी लागणार आहे. ही जी जोडण्याची क्षमता आहे ती पृथ्वीच्या कक्षेत तसेच चंद्राच्या कक्षेतही काम करेल. ही क्षमता आम्ही विकसित करत आहोत. या वर्षाच्या शेवटी Spacex नावाचे एक मिशन आम्ही लाँच करणार आहोत. ज्याचा उद्देश हीच डॉकिंग क्षमता प्रदर्शित करणे आहे.
एस. डॉकिंगचे वर्णन करताना सोमनाथ म्हणाले, ‘चंद्रावरून परतीच्या वेळी अंतराळ यानाचे विविध भाग जोडणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. वाहनाचा एक भाग मुख्य वाहनापासून वेगळा होऊन चंद्रावर उतरतो, तर दुसरा भाग चंद्राच्या कक्षेत राहतो. जेव्हा लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर परत येतो तेव्हा हे दोन भाग पुन्हा जोडतात आणि एक होतात. मात्र, चंद्राच्या प्रवासासाठी पृथ्वीच्या कक्षेतील अंतराळयानाचे वेगवेगळे भाग जोडण्याचे काम अद्याप झालेले नाही. इस्रोचे प्रमुख म्हणाले, ‘आम्ही हे पहिल्यांदाच केले, असा आमचा दावा नाही. पण हो, अजून कोणीही असे केल्याची माझ्या माहितीत तरी अद्याप नाही.’
अंतराळातील यानाचे वेगवेगळे भाग जोडण्याचे काम इस्रोला अजूनतरी करावे लागले नाही. स्पेसएक्स (स्पेस डॉकिंग प्रयोग) मिशन ही त्यांची क्षमता प्रदर्शित करण्याची पहिली संधी असेल. सोमनाथ म्हणाले की, चांद्रयान-४ मोहिमेचा तपशीलवार अभ्यास, अंतर्गत आढावा आणि खर्चाचे मूल्यांकन पूर्ण झाले असून ते लवकरच सरकारकडे मंजुरीसाठी पाठवले जाणार आहे. हे चार प्रकल्प त्या प्रस्तावांपैकी एक आहे ज्यासाठी अंतराळ विभागाला त्याच्या व्हिजन २०४७ अंतर्गत मंजुरी मिळवायची आहे. या व्हिजन अंतर्गत, भारताने २०३५ पर्यंत स्वतःचे स्पेस स्टेशन तयार करण्याचे आणि २०४० पर्यंत चंद्रावर माणूस पाठवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
भारताच्या स्वतःच्या स्पेस स्टेशनला इंडियन स्पेस स्टेशन (BAS) असे नाव दिले जाईल. ते अनेक वेळा अवकाशातही सोडले जाईल. इस्रोचे प्रमुख सोमनाथ म्हणाले, ‘आमच्याकडे सध्या फक्त LVM3 रॉकेट असल्याने BAS चा पहिला भाग या रॉकेटमधून लॉन्च केला जाऊ शकतो. २०२८ पर्यंत BAS चे पहिले प्रक्षेपण करण्याचे आमचे ध्येय ठेवले आहे. यासाठी आम्ही सरकारला आणखी एक प्रस्ताव देणार आहोत, ज्यामध्ये आम्हाला ते कसे बांधायचे आहे, कोणत्या तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे, संपूर्ण काम कधी पूर्ण होईल आणि त्यासाठी किती खर्च येईल हे लवकरच सांगू आणि बीएएसच्या इतर भागांचा तपशील नंतर ठरवला जाणार आहे, असे ते म्हणाले. ‘आमच्याकडे ५ भागांची ब्लू प्रिंट आहे, ती बनवण्यासाठी अनेक समित्या काम करत आहेत.’ असेही त्यांनी नमूद केले.
एस. सोमनाथ चांद्रयान-४ च्या आव्हानाबद्दल म्हणाले की, चांद्रयान-४ मोहीम केवळ इस्रो आणि भारतीय वैज्ञानिक समुदायासाठी फारच आव्हानात्मक असणार आहे. पण ती प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी असेल. गेल्यावर्षी, भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश म्हणून इतिहास रचला. चांद्रयान-३ मोहिमेच्या यशामुळे चांद्रयान-२ चे मुख्य कार्य पूर्ण झाले आहे.
The post Chandrayaan-4: मिशन चांद्रयान-४ बद्दल मोठी अपडेट; भारत चंद्रावरून पृथ्वीवर आणणार ‘ही’ मौल्यवान गोष्ट first appeared on TEJPOLICETIMES.
]]>