Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
मुंबई बातम्या - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Thu, 05 Dec 2024 07:43:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg मुंबई बातम्या - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 शपथविधी सोहळ्यासाठी मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त, ५०००हून अधिक फौजफाटा सज्ज, असे आहे नियोजन https://tejpolicetimes.com/?p=111301 https://tejpolicetimes.com/?p=111301#respond Thu, 05 Dec 2024 07:43:55 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111301 शपथविधी सोहळ्यासाठी मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त, ५०००हून अधिक फौजफाटा सज्ज, असे आहे नियोजन

Maharashtra Chief Minister Oath Ceremony: शपथविधी समारंभादरम्यान घातपात तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. हायलाइट्स: पाच हजारहून अधिक पोलिस तैनात एसआरपीएफ, जलद कृतीदल, दंगलनियंत्रण पथकाची कुमक सूचनांचे पालन करण्याचे पोलिसांचे आवाहन महाराष्ट्र टाइम्सpolice bandobast2 मुंबई : राज्याच्या नव्या सरकारच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार […]

The post शपथविधी सोहळ्यासाठी मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त, ५०००हून अधिक फौजफाटा सज्ज, असे आहे नियोजन first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
शपथविधी सोहळ्यासाठी मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त, ५०००हून अधिक फौजफाटा सज्ज, असे आहे नियोजन

Maharashtra Chief Minister Oath Ceremony: शपथविधी समारंभादरम्यान घातपात तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.

हायलाइट्स:

  • पाच हजारहून अधिक पोलिस तैनात
  • एसआरपीएफ, जलद कृतीदल, दंगलनियंत्रण पथकाची कुमक
  • सूचनांचे पालन करण्याचे पोलिसांचे आवाहन
महाराष्ट्र टाइम्स
police bandobast2

मुंबई : राज्याच्या नव्या सरकारच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याने मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. सुमारे पाच हजारपेक्षा जास्त पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, दक्षिण मुंबईला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.पोलिसांबरोबर एसआरपीएफ, जलद कृतीदल, दंगलनियंत्रण पथकाची कुमक असेल. वाहतूककोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी नियमन केले असून, पार्किंगसाठी जागा नसल्याने शपथविधीसाठी येणाऱ्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

शपथविधी समारंभादरम्यान घातपात तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. सोहळा सुरक्षितपणे पार पाडण्याकरीता कार्यक्रमादरम्यान पाच अतिरिक्त पोलिस आयुक्त, १५ उपायुक्त, २९ सहायक पोलिस आयुक्त यांच्यासह ५२० अधिकारी आणि साडेतीन हजार कर्मचारी असा मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात येणार आहे. त्याबरोबरच महत्त्वाच्या ठिकाणी ‘एसआरपीएफ’च्या प्लाटून, जलद प्रतिसाद पथक (क्यूआरटी), दंगलनियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट, बॉम्बशोधक व नाशक पथक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईच्या सर्व रस्त्यांवर बुधवारपासूनच पोलिस दिसत होते.
नव्या मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्रातून कुणाला संधी? भुजबळ, भुसे, महाजन, पाटील यांच्या नावांची चर्चा
कोणताही गडबड गोंधळ होऊ नये, यासाठी शपथविधी सोहळयासाठी ठिकाणी येणाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. संशयास्पद व्यक्ती, बेवारस वस्तू आढळल्यास त्याबाबत तत्काळ माहिती द्यावी, तसेच आवश्यक प्रसंगी नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी पोलिस हेल्पलाइन क्रमांक १००, ११२ येथे संपर्क साधावा, असेही पोलिसांनी म्हटले आहे.
फडणवीसच मुख्यमंत्री! मुंबईत आझाद मैदानावर आज महायुतीचा शपथविधी सोहळा, मंत्रिमंडळात संधी कोणाला?
सार्वजनिक वाहतुकीच्या वापराचे आवाहन
आझाद मैदान परिसरात पार्किंगची व्यवस्था नसल्याने शपथविधी कार्यक्रमाकरिता येणाऱ्या जनसमुदायाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा, विशेषतः रेल्वेचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. आझाद मैदान तसेच आजूबाजूच्या परिसरात वाहतूककोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिस विभागातील अतिरिक्त पोलिस आयुक्त, तीन उपायुक्त, ३० अधिकारी आणि २५० कर्मचारी वाहतूक नियमनासाठी तैनात असतील. या परिसरातील काही मार्ग आवश्यकतेनुसार वाहतुकीसाठी बंद करणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post शपथविधी सोहळ्यासाठी मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त, ५०००हून अधिक फौजफाटा सज्ज, असे आहे नियोजन first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111301 0
Mumbai Tempreture: मुंबईचा पारा ३७ अंशांवर! सांताक्रूझमध्ये डिसेंबरमधील १६ वर्षांतील विक्रमी कमाल तापमान https://tejpolicetimes.com/?p=111287 https://tejpolicetimes.com/?p=111287#respond Thu, 05 Dec 2024 05:23:42 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111287 Mumbai Tempreture: मुंबईचा पारा ३७ अंशांवर! सांताक्रूझमध्ये डिसेंबरमधील १६ वर्षांतील विक्रमी कमाल तापमान

Mumbai Weather Update: सांताक्रूझ येथील कमाल तापमान डिसेंबरमधील गेल्या १६ वर्षांमधील सर्वाधिक कमाल तापमान होते तर कुलाबा येथील कमाल तापमान गेल्या १० वर्षांतील चौथ्या क्रमांकाचे कमाल तापमान होते. हायलाइट्स: आजही उन्हाचा तडाखा कायम राहण्याचा अंदाज रत्नागिरी, सिंधुदुर्गात पावसाची शक्यता शनिवारनंतर पुन्हा थंडीचा अंदाज महाराष्ट्र टाइम्सTemperatures मुंबई : डिसेंबरमध्ये थंडीची जाणीव होता-होता मुंबईकरांना उन्हाचा ताप जाणवू […]

The post Mumbai Tempreture: मुंबईचा पारा ३७ अंशांवर! सांताक्रूझमध्ये डिसेंबरमधील १६ वर्षांतील विक्रमी कमाल तापमान first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Mumbai Tempreture: मुंबईचा पारा ३७ अंशांवर! सांताक्रूझमध्ये डिसेंबरमधील १६ वर्षांतील विक्रमी कमाल तापमान

Mumbai Weather Update: सांताक्रूझ येथील कमाल तापमान डिसेंबरमधील गेल्या १६ वर्षांमधील सर्वाधिक कमाल तापमान होते तर कुलाबा येथील कमाल तापमान गेल्या १० वर्षांतील चौथ्या क्रमांकाचे कमाल तापमान होते.

हायलाइट्स:

  • आजही उन्हाचा तडाखा कायम राहण्याचा अंदाज
  • रत्नागिरी, सिंधुदुर्गात पावसाची शक्यता
  • शनिवारनंतर पुन्हा थंडीचा अंदाज
महाराष्ट्र टाइम्स
Temperatures

मुंबई : डिसेंबरमध्ये थंडीची जाणीव होता-होता मुंबईकरांना उन्हाचा ताप जाणवू लागला आहे. बुधवारी मुंबईमध्ये कमाल तापमानाचा पारा ३७ अंश पार गेला असून आज, गुरुवारीही तापमान चढे असण्याचा अंदाज आहे.मुंबईमध्ये बुधवारी सांताक्रूझ येथे ३७.३ अंश सेल्सिअस, तर कुलाबा येथे ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथील कमाल तापमान डिसेंबरमधील गेल्या १६ वर्षांमधील सर्वाधिक कमाल तापमान होते तर कुलाबा येथील कमाल तापमान गेल्या १० वर्षांतील चौथ्या क्रमांकाचे कमाल तापमान होते. सांताक्रूझ येथे बुधवारी सरासरीपेक्षा ३.९ अंशांनी, तर कुलाबा येथे १.८ अंशांनी कमाल तापमान अधिक असल्याचे नोंदले गेले. सांताक्रूझ येथे याआधी सन २००८मध्ये ३७.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले होते. तर, डिसेंबरमधील सर्वाधिक कमाल तापमान १९८७मध्ये ३९.८ अंश सेल्सिअस होते. कुलाबा येथे याआधी सन २०१६मध्ये ३५.८, सन २०१५मध्ये ३५.५, तर सन २०२०मध्ये ३५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले होते.
फडणवीसच मुख्यमंत्री! मुंबईत आझाद मैदानावर आज महायुतीचा शपथविधी सोहळा, मंत्रिमंडळात संधी कोणाला?
मुंबईमध्ये येणाऱ्या वाऱ्यांची दिशा पूर्वेकडून असल्याने तापमानाचा पारा चढा आहे. पुढील दोन ते तीन दिवस मुंबईकरांना तापमानाचा ताप सहन करावा लागू शकतो, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी दिली. आज, गुरुवारी आझाद मैदानावर शपथविधीसाठी दाखल होणाऱ्या मुंबईकरांनीही उन्हामध्ये काळजी घ्यावी याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
नव्या मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्रातून कुणाला संधी? भुजबळ, भुसे, महाजन, पाटील यांच्या नावांची चर्चा
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र कायम असल्याने राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्येही बुधवारी सकाळच्या सुमारास तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात तसेच पुणे जिल्हा, पुणे घाट परिसर, कोल्हापूर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा, साताऱ्याचा घाट परिसर, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशीव येथे मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दोन विरुद्ध दिशांकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मेघगर्जनांची शक्यता निर्माण होऊ शकते. उद्या, शुक्रवारी कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. त्यानंतर शनिवारपासून पुन्हा एकदा थंडीचीही जाणीव होऊ शकेल, अशी माहिती निवृत्त हवामान विभाग अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली.
किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post Mumbai Tempreture: मुंबईचा पारा ३७ अंशांवर! सांताक्रूझमध्ये डिसेंबरमधील १६ वर्षांतील विक्रमी कमाल तापमान first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111287 0
लाडक्या बहिणी साक्षीला! महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा, पंतप्रधानांसह २२ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती https://tejpolicetimes.com/?p=111273 https://tejpolicetimes.com/?p=111273#respond Thu, 05 Dec 2024 01:55:21 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111273 लाडक्या बहिणी साक्षीला! महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा, पंतप्रधानांसह २२ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

New CM Oath Taking Ceremony: राज्यातील सर्व शासकीय एलईडीवर या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. हायलाइट्स: पंतप्रधानांसह २२ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती कलाकार, साधू, संत, नेते, कार्यकर्ते हजर राहणार १०० फुटी मंच आकर्षणाचा केंद्रबिंदू महाराष्ट्र टाइम्सladki bahin yojana3 मुंबई : […]

The post लाडक्या बहिणी साक्षीला! महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा, पंतप्रधानांसह २२ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
लाडक्या बहिणी साक्षीला! महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा, पंतप्रधानांसह २२ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

New CM Oath Taking Ceremony: राज्यातील सर्व शासकीय एलईडीवर या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

हायलाइट्स:

  • पंतप्रधानांसह २२ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
  • कलाकार, साधू, संत, नेते, कार्यकर्ते हजर राहणार
  • १०० फुटी मंच आकर्षणाचा केंद्रबिंदू
महाराष्ट्र टाइम्स
ladki bahin yojana3

मुंबई : महायुतीच्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदान सज्ज झाले असून उद्याच्या शपथविधी सोहळ्याची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रंगणाऱ्या या शपथविधी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण राज्यातील लाडक्या बहिणी असणार आहेत. याशिवाय, १०० फुटी मुख्य स्टेज आणि इतर दोन स्टेजही बांधण्यात येणार असून देशभरातील एकूण २२ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यातील सर्व शासकीय एलईडीवर या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. महायुतीच्या या नव्या महाशपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती असणार असून त्यांच्याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह २२ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे. साधारण २० हजारांहून अधिक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचा अंदाज आहे.
लाडक्या बहिणींना आस २१०० रुपयांची, काही अर्ज अद्याप प्रलंबित, कधी मिळणार वाढीव हप्ता?
आझाद मैदानातील या शपथविधी सोहळ्यासाठी भव्यदिव्य मंचाची उभारणी करण्यात आली आहे. यात तीन मंच उभारण्यात आले असून १०० फुटी लांबीचा भव्य प्रमुख मंच असणार आहे. त्याशिवाय दुसरा मंच ही १० फुटांचा आहे. तिसरा मंच हा संगीत संयोजनासाठी उभारण्यात आला आहे. प्रमुख मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, इतर राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर वरिष्ठ नेत्यांची बैठक व्यवस्था केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी देशातील उद्योगपती, लाडक्या बहिणी, साधूसंत, कलाकार आदी उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय, कलाकर, साधूसंत, लाडक्या बहिणी, तिन्ही पक्षाचे नेते कार्यकर्ते अशा सुमारे ४० हजार जणांसाठी आसन व्यवस्था आहे.
तुम्हीही हाच एटीएम पिन ठेवलात का? सावधान, पाकीटमारांची नवी शक्कल, झटक्यात बॅंक खातं होईल रिकामं
दोन हजार व्हीव्हीआयपी प्रवेशिका
शपथविधी सोहळ्याला ४० हजारांची आसन क्षमता आहे. यात लाडक्या बहिणींसाठी राखीव आसन व्यवस्था आहे. तर दोन हजार व्हीव्हीआयपी पासचे वाटप करण्यात आले आहे.
किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post लाडक्या बहिणी साक्षीला! महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा, पंतप्रधानांसह २२ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111273 0
फडणवीसच मुख्यमंत्री! मुंबईत आझाद मैदानावर आज महायुतीचा शपथविधी सोहळा, मंत्रिमंडळात संधी कोणाला? https://tejpolicetimes.com/?p=111269 https://tejpolicetimes.com/?p=111269#respond Thu, 05 Dec 2024 00:48:06 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111269 फडणवीसच मुख्यमंत्री! मुंबईत आझाद मैदानावर आज महायुतीचा शपथविधी सोहळा, मंत्रिमंडळात संधी कोणाला?

Maharashtra CM Devendra Fadnavis: फडणवीस आज, गुरुवारी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदानात हा भव्य शपथविधी सोहळा होईल. हायलाइट्स: पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री, अनेक मुख्यमंत्री उपस्थित राहणार महायुतीच्या सत्तास्थापनेच्या दाव्यानंतर राज्यपालांचे फडणवीस यांना निमंत्रण भाजपसह महायुतीच्या कार्यकत्यांमध्ये उत्साह; आज शक्तिप्रदर्शनाची तयारी महाराष्ट्र टाइम्सdevendra fadnavis (7). […]

The post फडणवीसच मुख्यमंत्री! मुंबईत आझाद मैदानावर आज महायुतीचा शपथविधी सोहळा, मंत्रिमंडळात संधी कोणाला? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
फडणवीसच मुख्यमंत्री! मुंबईत आझाद मैदानावर आज महायुतीचा शपथविधी सोहळा, मंत्रिमंडळात संधी कोणाला?

Maharashtra CM Devendra Fadnavis: फडणवीस आज, गुरुवारी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदानात हा भव्य शपथविधी सोहळा होईल.

हायलाइट्स:

  • पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री, अनेक मुख्यमंत्री उपस्थित राहणार
  • महायुतीच्या सत्तास्थापनेच्या दाव्यानंतर राज्यपालांचे फडणवीस यांना निमंत्रण
  • भाजपसह महायुतीच्या कार्यकत्यांमध्ये उत्साह; आज शक्तिप्रदर्शनाची तयारी
महाराष्ट्र टाइम्स
devendra fadnavis (7).

मुंबई : राज्यात २०१९मध्ये तेराव्या विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनात ‘मी पुन्हा येईन’ असा निर्धार व्यक्त केल्यानंतर विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य ठरलेले भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अखेर हा संकल्प पूर्णत्वाला नेला. भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते, अर्थात मुख्यमंत्री म्हणून बुधवारी फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. फडणवीस आज, गुरुवारी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदानात हा भव्य शपथविधी सोहळा होईल. विधानसभा निवडणुकीत भाजप १३२ जागा मिळवून सर्वांत मोठा पक्ष ठरला. मात्र, शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तावाटपाची चर्चा लांबल्याने महायुतीच्या सत्तास्थापनेला विलंब झाला. दिल्लीतील भाजपश्रेष्ठींनी महाराष्ट्र भाजप विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची नियुक्ती करून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग दिला. बुधवारी सकाळी ११ वाजता विधानभवनात भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीपूर्वी भाजप कोअर समितीच्या नेत्यांची सीतारामन आणि रुपाणी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
ऑनलाइन हिरे विक्री व्यापाऱ्याला पडली महागात; एक कोटीचा चुना लावून ग्राहक पसार, पायधुनीतील घटना
भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीनंतर महायुतीच्या नेत्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. राज्यपालांनी फडणवीस यांची विनंती मान्य करून त्यांना सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले. या वेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आपापल्या पक्षांच्या वतीने फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी, अशी शिफारस करणारे पत्र राज्यपालांना सादर केले. त्यामुळे फडणवीस यांना भाजपचे १३२, शिंदे यांच्या शिवसेनेचे ५७, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ४१ आणि इतर मित्र पक्ष असे एकूण २३७ आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. आज, गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजता आझाद मैदानात फडणवीस राज्याचे २१वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असल्याने भाजप कार्यकत्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
सोनेतार काढण्याची मशिन पडून एका कारागिराचा मृत्यू; तर एक जखमी, झवेरी बाजारातील कारखाने पुन्हा चर्चेत
निवडणुकीत महायुतीला मोठा जनादेश मिळाल्याने आता जबाबदारीही वाढली आहे. चार गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील, तर चार गोष्टी मनाविरुद्धही होतील. मात्र, आपण एकत्रित काम करून आपली शक्ती दाखवून देऊ. महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आमचे सरकार कटिबद्ध असेल. – देवेंद्र फडणवीस

अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून माझ्या नावाची शिफारस केली होती. आज मला त्यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून शिफारस करताना आनंद होत आहे. गेल्या अडीच वर्षांत आम्ही तिघांनी टीम म्हणून काम केले. आताही तसेच काम करू. – एकनाथ शिंदे

पाच वर्षांपूर्वी आम्ही (फडणवीस यांच्यासह) शपथ घेतली; पण ते राहून गेले. आता मात्र सलग पाच वर्षे एकत्र काम करणार आहोत. निवडणुकीतील आश्वासने पूर्ण करतानाच देशातील आघाडीचे राज्य म्हणून महाराष्ट्राचा नावलौकिक कायम राखण्यासाठी प्रयत्नशील राहू. -अजित पवार
तुम्हीही हाच एटीएम पिन ठेवलात का? सावधान, पाकीटमारांची नवी शक्कल, झटक्यात बॅंक खातं होईल रिकामं
मंत्रिमंडळात संधी कोणाला ?
पुणे : पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात किती मंत्र्यांना स्थान द्यायचे, याबाबत ठोस निर्णय होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या व्यतिरिक्त पुण्यातून किती जणांना स्थान मिळणार, यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. एकनाथ शिंदे मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत की नाहीत, याबाबत रात्री उशिरापर्यंत स्पष्टता नव्हती. आज, गुरुवारी होणाऱ्या शपथविधीच्या कार्यक्रमात फडणवीस, शिंदे आणि पवार या तिघांनाच शपथ दिली जाईल, अशी चर्चा आहे. दरम्यान, भाजपचे पाच, शिवसेनेचे तीन तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मंत्री अशा दहा जणांना तरी शपथ द्यावी, अशीही मागणी आमदारांकडून जोर धरत असल्याची रात्री उशिरापर्यंत चर्चा झडत होती.
लाडक्या बहिणींना आस २१०० रुपयांची, काही अर्ज अद्याप प्रलंबित, कधी मिळणार वाढीव हप्ता?
पुण्यातून चंद्रकांत पाटील यांचा ‘हेविवेट’ मंत्रिपदावर दावा आहे. चौथ्यांदा आमदार झालेल्या माधुरी मिसाळ यांचे नावही मंत्रिपदाच्या चर्चेत आहे. भाजपचे महेश लांडगे, सुनील कांबळे, अमित गोरखे, राहुल कुल इच्छुक आहेत. ‘राष्ट्रवादी’ मधून दिलीप वळसे पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव मंत्रिपद नाकारल्याची चर्चा आहे. वरिष्ठ नेत्यांकडून त्यांनी मंत्रिपद स्वीकारावे, अशी सूचना करण्यात आल्याचे समजते. याशिवाय दत्ता भरणे, सुनील शेळके, अण्णा बनसोडे यांच्याकडूनही प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचे पुणे जिल्ह्यातील एकमवे आमदार माजी मंत्री विजय शिवतारे हेदेखील इच्छुक आहेत.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post फडणवीसच मुख्यमंत्री! मुंबईत आझाद मैदानावर आज महायुतीचा शपथविधी सोहळा, मंत्रिमंडळात संधी कोणाला? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111269 0
प्रदूषण रोखा, अन्यथा कारवाई; मुंबईत हवेची गुणवत्ता राखण्यासाठी MPCBच्या नवीन मार्गदर्शन सूचना https://tejpolicetimes.com/?p=111255 https://tejpolicetimes.com/?p=111255#respond Wed, 04 Dec 2024 09:34:50 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111255 प्रदूषण रोखा, अन्यथा कारवाई; मुंबईत हवेची गुणवत्ता राखण्यासाठी MPCBच्या नवीन मार्गदर्शन सूचना

MPCB Guidelines: मुंबईत सध्या सुरू असलेल्या बांधकामांमुळे प्रदूषणात वाढ होऊ नये यासाठी बांधकामाशी संबंधित नवीन मार्गदर्शक सूचना प्रसृत करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र टाइम्सair pollution AI मुंबई : मुंबईतील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने काही उपाययोजना केल्या आहेत. रेडीमिक्स प्लांट, स्टोन क्रशर, बेकरी किंवा अन्य तत्सम उद्योगातून प्रदूषण झाले तर त्यांच्यावर कडक […]

The post प्रदूषण रोखा, अन्यथा कारवाई; मुंबईत हवेची गुणवत्ता राखण्यासाठी MPCBच्या नवीन मार्गदर्शन सूचना first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
प्रदूषण रोखा, अन्यथा कारवाई; मुंबईत हवेची गुणवत्ता राखण्यासाठी MPCBच्या नवीन मार्गदर्शन सूचना

MPCB Guidelines: मुंबईत सध्या सुरू असलेल्या बांधकामांमुळे प्रदूषणात वाढ होऊ नये यासाठी बांधकामाशी संबंधित नवीन मार्गदर्शक सूचना प्रसृत करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र टाइम्स
air pollution AI

मुंबई : मुंबईतील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने काही उपाययोजना केल्या आहेत. रेडीमिक्स प्लांट, स्टोन क्रशर, बेकरी किंवा अन्य तत्सम उद्योगातून प्रदूषण झाले तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिला आहे. मुंबईत सध्या सुरू असलेल्या बांधकामांमुळे प्रदूषणात वाढ होऊ नये यासाठी बांधकामाशी संबंधित नवीन मार्गदर्शक सूचना प्रसृत करण्यात आल्या आहेत.

सध्या मुंबईत ठिकठिकाणी बांधकामे सुरू असून या माध्यमातून हवा प्रदूषणात वाढ होऊ नये, असा प्रयत्न करण्यात येत आहे. या संदर्भात मुंबई महानगर परिसरातील रेडिमिक्स कारखानदारांची तातडीची बैठक घेऊन या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील पायाभूत सुविधांची व इमारत बांधकामक्षेत्रातील इतर कामे सुरू आहेत. या सर्व प्रकल्पांसाठी लागणारे रेडीमिक्स सिमेंट हे रेडीमिक्स सिमेंट कारखान्यांतून उपलब्ध होत असते. यासोबतच शहरातील विविध भागात वाहतूकही मोठ्या प्रमाणात सुरू असते. रेडीमिक्स सिमेंट कारखान्यांमुळे निर्माण होणारी हवा प्रदूषणाची समस्या नियंत्रित करण्यासाठी २०१६मध्ये मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. तरीही बांधकामांमुळे प्रदूषणात भर पडत असल्याने मुंबईमध्ये ही विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.

सिद्धेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली आणि मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांच्या उपस्थितीत मुंबई महानगर परिसरातील स्टोन क्रशर, हॉट मिक्स प्रकल्प व आरएमसी प्रकल्पधारक यांची बैठक पार पडली. यामध्ये नियोजित असलेल्या कमीत-कमी वीस हजार चौरस मीटर बांधकाम प्रकल्प क्षेत्रामधील जागेत कॅप्टिव्ह-रेडी मिक्स काँक्रीट प्रकल्पासाठी दोन हजार वर्ग मीटर राखीव जागेची तरतूद करणे आवश्यक आहे, अशी सूचना प्रसृत करण्यात आली.

तसेच कॅप्टिव्ह-रेडीमिक्स काँक्रीट अस्तित्वात असलेल्या प्रकल्पांना पुढील तीन महिन्यांच्या काळात पूर्णत: बॉक्स आच्छादन करून घेणे आवश्यक असून, त्यासाठी १० लाखांची बँक हमी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा करणे आवश्यक आहे. एखाद्या बांधकाम प्रकल्पाचे काम ७० टक्के पूर्ण झाले असेल तर, तेथील कॅप्टिव्ह-रेडीमिक्स काँक्रीट कारखाना एक महिन्याच्या कालावधीत प्रकल्प स्थलांतरित करणे आवश्यक आहे, या सूचनेचाही समावेश करण्यात आला आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post प्रदूषण रोखा, अन्यथा कारवाई; मुंबईत हवेची गुणवत्ता राखण्यासाठी MPCBच्या नवीन मार्गदर्शन सूचना first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111255 0
सोनेतार काढण्याची मशिन पडून एका कारागिराचा मृत्यू; तर एक जखमी, झवेरी बाजारातील कारखाने पुन्हा चर्चेत https://tejpolicetimes.com/?p=111152 https://tejpolicetimes.com/?p=111152#respond Wed, 04 Dec 2024 01:57:22 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111152 सोनेतार काढण्याची मशिन पडून एका कारागिराचा मृत्यू; तर एक जखमी, झवेरी बाजारातील कारखाने पुन्हा चर्चेत

Mumbai News: एका कारखान्यात सोन्याची तार काढण्याची सुमारे अडीचशे किलो वजनाची मशिन दोन कारागिरांच्या अंगावर कोसळल्याची घटना घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा कामगार जखमी झाला आहे. महाराष्ट्र टाइम्सgold machine AI मुंबई : काळबादेवी, झवेरी बाजारातील चिंचोळ्या गल्ल्यांतील दागिने घडणावळीचा जीवघेणा बाजार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रविवारी मध्यरात्री येथील एका कारखान्यात सोन्याची तार […]

The post सोनेतार काढण्याची मशिन पडून एका कारागिराचा मृत्यू; तर एक जखमी, झवेरी बाजारातील कारखाने पुन्हा चर्चेत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
सोनेतार काढण्याची मशिन पडून एका कारागिराचा मृत्यू; तर एक जखमी, झवेरी बाजारातील कारखाने पुन्हा चर्चेत

Mumbai News: एका कारखान्यात सोन्याची तार काढण्याची सुमारे अडीचशे किलो वजनाची मशिन दोन कारागिरांच्या अंगावर कोसळल्याची घटना घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा कामगार जखमी झाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स
gold machine AI

मुंबई : काळबादेवी, झवेरी बाजारातील चिंचोळ्या गल्ल्यांतील दागिने घडणावळीचा जीवघेणा बाजार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रविवारी मध्यरात्री येथील एका कारखान्यात सोन्याची तार काढण्याची सुमारे अडीचशे किलो वजनाची मशिन दोन कारागिरांच्या अंगावर कोसळल्याची घटना घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा कामगार जखमी झाला आहे. कारगिरांसाठी कोणतीही सुरक्षा न पुरविल्याबद्दल कारखानामालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झवेरी बाजारातील तेलगल्लीमध्ये मन्सूर शेख यांचा तारपट्ट्याचा कारखाना आहे. या कारखान्यात आठ कारागीर काम करतात. हे सर्व कामगार याच ठिकाणी राहतात. रविवारी रात्री काही कारागीर अंथरुणावर पडून गप्पा मारत होते. मध्यभागी असलेल्या सुमारे अडीचशे किलो वजनाच्या मशिनच्या एका बाजूला दोघे, तर दुसऱ्या बाजूला सहा कारागीर होते. मोबाइल पाहत असताना काही जण मस्ती करू लागले. यादरम्यान त्यांचा धक्का लागल्याने मशिन दुसऱ्या बाजूला झोपलेल्या सौम्य रॉय आणि अनुपम घोष यांच्या अंगावर पडली. इतर कारागिरांनी या दोघांना बाहेर काढले. त्यांना तत्काळ जी. टी. रुग्णालयात नेले. परंतु डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अनुपम याचा मृत्यू झाला, तर सौम्य याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
फेंगल चक्रीवादळाचा परिणाम; पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, कारागिरांना राहण्यासाठी किंवा काम करताना कोणतीही सुरक्षेची काळजी घेण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले. अनुपम याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी कारखानामालक मन्सूर शेख, कारागीर मंगल मंडल, स्वरूप घोष, तसेच या जागेचे मालक उत्तम माझी आणि अजित छेडा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दिलासादायक बातमी! भारतात HIV संसर्गात ४४ टक्क्यांनी घट; मृत्यूचेही प्रमाण घटले, काय सांगते आकडेवारी?
अनेकदा कारवाई
काळबादेवी, भुलेश्वर, विठ्ठलवाडी, नारायणवाडी, तेलगल्ली, सट्टागल्ली, झवेरी बाजार, पो‍फळीवाडी क्रमांक एक ते तीन, खंडेराव वाडी, सी. पी. चाळ, फणसवाडीतील सुमारे १०० वर्षे जुन्या चाळींमधील घराघरांमध्ये सुवर्णउद्योग सुरू असला, तरी सुरुवातीला या व्यवसायात गॅस सिलिंडरचा वापर केला जात नव्हता. मेणाचा वापर करत रॉकेलच्या चिमणीवर पारंपरिक पद्धतीच्या फुंकणीने दागिन्यांच्या घडणावळीचे काम सुरू असे. आता चिमणीचा वापर करून काम केले जात असल्याने प्रदूषणाच्या अनेक तक्रारी असतात. पालिकेकडून या कारखान्यांवर अनेकदा कारवाई करण्यात येते, मात्र काही दिवस बंद ठेवल्यानंतर पुन्हा कारखाने सुरू केले जातात.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post सोनेतार काढण्याची मशिन पडून एका कारागिराचा मृत्यू; तर एक जखमी, झवेरी बाजारातील कारखाने पुन्हा चर्चेत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111152 0
फेंगल चक्रीवादळाचा परिणाम; पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती? https://tejpolicetimes.com/?p=111156 https://tejpolicetimes.com/?p=111156#respond Wed, 04 Dec 2024 01:38:49 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111156 फेंगल चक्रीवादळाचा परिणाम; पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

Maharashtra Weather Updates: पुढील तीन दिवस पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह विजा चमकून जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. जोरदार पाऊस पडल्यास साखर हंगामावर मोठा परिणाम होणार आहे. महाराष्ट्र टाइम्सrain alerta मुंबई : फेंगल चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानंतरही अरबी समुद्रात कमी दाबाचा प्रभाव कायम आहे. या प्रभावाखाली मुंबईमध्ये मंगळवारी ढगाळ वातावरण होते. बुधवारीही मुंबईत […]

The post फेंगल चक्रीवादळाचा परिणाम; पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
फेंगल चक्रीवादळाचा परिणाम; पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

Maharashtra Weather Updates: पुढील तीन दिवस पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह विजा चमकून जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. जोरदार पाऊस पडल्यास साखर हंगामावर मोठा परिणाम होणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स
rain alerta

मुंबई : फेंगल चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानंतरही अरबी समुद्रात कमी दाबाचा प्रभाव कायम आहे. या प्रभावाखाली मुंबईमध्ये मंगळवारी ढगाळ वातावरण होते. बुधवारीही मुंबईत ढगाळ वातावरणाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानंतर गुरुवारपासून आभाळ निरभ्र होण्यास सुरुवात होईल.

मुंबईमध्ये गारठा जाणवू लागलेला असताना फेंगलनंतर पुन्हा एकदा वातावरणाचा ताप मंगळवारी जाणवला. अरबी समुद्रामध्ये असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता अधिक असल्याने मुंबईत ढगाळ वातावरण निर्माण झाले. तसेच यामुळे आर्द्रतेतही वाढ झाली. कुलाबा येथे ७० टक्क्यांहून अधिक तर सांताक्रूझ येथे ६० टक्क्यांहून अधिक आर्द्रतेची नोंद झाली. सध्या वाऱ्यांची दिशा पूर्वेकडून असल्याने तापमान चढे आहे. मुंबईमध्ये सांताक्रूझ येथे ३४.५ आणि कुलाबा येथे ३३.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

पुढील चार ते पाच दिवसांमध्ये कमाल तापमानामध्ये फारसा फरक पडण्याची शक्यता नसल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने म्हटले आहे. सर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरी येथे ३५.२ अंश सेल्सिअस होते. त्या खालोखाल अलिबाग आणि सांताक्रूझ येथे तापमान नोंदले गेले. शनिवारपर्यंत मुंबईत चढे तापमान राहील, अशी शक्यता असून रविवारी किमान आणि कमाल तापमानामध्ये किंचित घट अपेक्षित आहे.
दिल्लीत ‘आप’ स्वबळावर; विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा ‘हात’ सोडण्याचा केजरीवालांचा निर्णय
काही ठिकाणी हवा समाधानकारक
मंगळवारी प्रदूषण पुन्हा आटोक्यात आल्याचे निदर्शनास आले. मुंबईतील हवेच्या प्रदूषणाच्या गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीत होता. मुंबईतील अनेक केंद्रांवर मध्यम श्रेणीतील हवा असल्याचे नोंदले गेले. बोरिवली पूर्व, भायखळा, भांडुप पश्चिम, शिवडी, शीव येथे हवा समाधानकारक असल्याचेही समोर आले.
दिलासादायक बातमी! भारतात HIV संसर्गात ४४ टक्क्यांनी घट; मृत्यूचेही प्रमाण घटले, काय सांगते आकडेवारी?
पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा
कोल्हापूर :
पुढील तीन दिवस पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह विजा चमकून जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. जोरदार पाऊस पडल्यास साखर हंगामावर मोठा परिणाम होणार आहे. तमिळनाडू राज्यात फेंगल वादळामुळे दक्षिणेकडील राज्यावर परिणाम झाला असून, कोल्हापूर जिल्ह्यातही ढगाळ वातावरण झाले आहे. मंगळवारी पहाटे पावसाच्या हलक्या सरीचा शिडकावा झाला. त्याचा फटका गुऱ्हाळघरे, साखर कारखाने आणि ऊस तोडणीवर होणार आहे.
लेकाच्या जॉबसाठी बापाने मोजली मोठी किंमत, तहसील कार्यालयात नोकरीचे आमिष, बागलाणमधील प्रकार
बुधवारी चार डिसेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. गुरुवारी पाच डिसेंबर रोजी वादळी वाऱ्यासह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाटमाथा आणि सांगली, सोलापूर जिल्ह्यात पाऊस पडण्याचा इशारा आहे. सहा डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापुरात हीच स्थिती असेल.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post फेंगल चक्रीवादळाचा परिणाम; पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111156 0
सहा हजार पालिका कर्मचारी अद्याप निवडणूक कामांतच; मुक्तता करण्याची BMCची निवडणूक आयोगाला विनंती https://tejpolicetimes.com/?p=110904 https://tejpolicetimes.com/?p=110904#respond Mon, 02 Dec 2024 03:48:26 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110904 सहा हजार पालिका कर्मचारी अद्याप निवडणूक कामांतच; मुक्तता करण्याची BMCची निवडणूक आयोगाला विनंती

Mumbai News: विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका क्षेत्रासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. महाराष्ट्र टाइम्सbmc new मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या कामांसाठी मुंबई महापालिकेच्या तब्बल ६० हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यादरम्यान महापालिकेची विभागस्तरावरील अनेक कामे खोळंबली. आता निवडणुकीचा निकाल जाहीर होऊनही आठ दिवस उलटले, तरी […]

The post सहा हजार पालिका कर्मचारी अद्याप निवडणूक कामांतच; मुक्तता करण्याची BMCची निवडणूक आयोगाला विनंती first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
सहा हजार पालिका कर्मचारी अद्याप निवडणूक कामांतच; मुक्तता करण्याची BMCची निवडणूक आयोगाला विनंती

Mumbai News: विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका क्षेत्रासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यावर जबाबदारी सोपवली होती.

महाराष्ट्र टाइम्स
bmc new

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या कामांसाठी मुंबई महापालिकेच्या तब्बल ६० हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यादरम्यान महापालिकेची विभागस्तरावरील अनेक कामे खोळंबली. आता निवडणुकीचा निकाल जाहीर होऊनही आठ दिवस उलटले, तरी अद्याप सहा हजार कर्मचाऱ्यांची या कामांतून मुक्तता करण्यात आलेली नाही. परिणामी निवृत्ती वेतनासह अन्य कामांचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून मुक्त करावे, अशी मागणी महापालिकेने निवडणूक आयोगाला पत्राद्वारे केली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका क्षेत्रासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. त्यांच्या मदतीला एकूण सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले. यामध्ये मुंबई महापालिकेतील चार अतिरिक्त महापालिका आयुक्त, तसेच मुंबई शहर जिल्हाधिकारी आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी अशा सहा जणांचा समावेश होता. निवडणूकविषयक कामासाठी सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्याची मतदारसंघनिहाय जबाबदारी या अधिकाऱ्यांकडे देण्यात आली होती.
गृहखात्यासाठी मोर्चेबांधणी; शिवसेनेची अपेक्षा, सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग येणार
याशिवाय महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही निवडणूक कामात समाविष्ट करण्यात आले होते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून १२ हजार ५०० अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामात गुंतले. त्यांना गटविकास अधिकारी आणि समन्वय अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर हळूहळू आणखी ५० हजार कर्मचारी या कामात व्यग्र झाले. त्यांना बूथस्तरीय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी आदी जबाबदाऱ्यादेण्यात आल्या होत्या. यामुळे महापालिकेच्या कामांचाही बोजवारा उडाला होता.
Aditya Thackeray: हा तर ‘लाडक्या’ आयोगाचा अपमान; सत्तास्थापनेचा दावा न केल्याने आदित्य ठाकरेंचा टोला
आता निकालानंतर कर्मचारी टप्प्याटप्प्याने कामावर परतत असतानाच, निवडणूक आयोगाने सगळ्या महापालिका कर्मचाऱ्यांची अद्याप निवडणूक कामांतून मुक्तता केलेली नाही. त्यामुळे महापालिकेकडून आयोगाला वारंवार विनंती केली जात आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post सहा हजार पालिका कर्मचारी अद्याप निवडणूक कामांतच; मुक्तता करण्याची BMCची निवडणूक आयोगाला विनंती first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110904 0
गृहखात्यासाठी मोर्चेबांधणी; शिवसेनेची अपेक्षा, सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग येणार https://tejpolicetimes.com/?p=110894 https://tejpolicetimes.com/?p=110894#respond Mon, 02 Dec 2024 01:00:34 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110894 गृहखात्यासाठी मोर्चेबांधणी; शिवसेनेची अपेक्षा, सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग येणार

Maharashtra Govt Formation: महायुतीमध्ये खातेवाटपाचा पेच अद्याप सुटलेला नाही. घटक पक्षांना नेमकी किती खाती मिळणार, यावर खल सुरू आहे. यामध्ये महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गृहखात्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी केली असून नैसर्गिक न्यायाने हे खाते मिळण्याची अपेक्षा पक्षाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र टाइम्सshinde fadnvis pawar मुंबई : ‘राज्य सरकार स्थापनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री […]

The post गृहखात्यासाठी मोर्चेबांधणी; शिवसेनेची अपेक्षा, सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग येणार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
गृहखात्यासाठी मोर्चेबांधणी; शिवसेनेची अपेक्षा, सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग येणार

Maharashtra Govt Formation: महायुतीमध्ये खातेवाटपाचा पेच अद्याप सुटलेला नाही. घटक पक्षांना नेमकी किती खाती मिळणार, यावर खल सुरू आहे. यामध्ये महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गृहखात्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी केली असून नैसर्गिक न्यायाने हे खाते मिळण्याची अपेक्षा पक्षाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र टाइम्स
shinde fadnvis pawar

मुंबई : ‘राज्य सरकार स्थापनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील त्याला माझा व शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा राहणार आहे,’ असा पुनरुच्चार काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केला. मात्र महायुतीमध्ये खातेवाटपाचा पेच अद्याप सुटलेला नाही. घटक पक्षांना नेमकी किती खाती मिळणार, यावर खल सुरू आहे. यामध्ये महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गृहखात्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी केली असून नैसर्गिक न्यायाने हे खाते मिळण्याची अपेक्षा पक्षाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी व्यक्त केली.

विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाल्यानंतर गेल्या आठवडाभर मुख्यमंत्रिपदावरून खल सुरू होता, मात्र आता मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटला आहे. तूर्तास खातेवाटपावरून चर्चा सुरू असल्याचे कळते. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीतही खातेवाटपाबाबत चर्चा झाली होती, मात्र त्याला अंतिम स्वरूप आलेले नाही. त्यात शुक्रवारी शिंदे प्रकृतीच्या कारणास्तव त्यांच्या दरे या गावी निघून गेल्याने महायुतीच्या बैठका लांबल्या. मात्र ते रविवारी ठाण्यात परतले आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग मिळणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेने गृहमंत्रिपदाची मागणी कायम ठेवल्याचे संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावरून समोर आले आहे. ‘आम्ही गृहखात्याची मागणी केलेली आहे. नैसर्गिक न्यायाने आम्हाला हे खाते मिळायलाच हवे. ते गरजेचेच आहे,’ असे शिरसाट यांनी ठामपणे सांगितले.

‘एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत संयुक्त बैठक घेण्याची शक्यता आहे. खातेवाटपाबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू असली, तरी या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचे काम शिंदे करतील,’ असा विश्वासही शिरसाट यांनी व्यक्त केला. ‘आम्ही मागणी केली आणि त्यांनी लगेच खाते दिले, असे होत नाही. त्यासाठी (पान ८वर)

‘राज्य सरकार स्थापनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील त्याला माझा व शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा राहणार आहे,’ असा पुनरुच्चार काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केला. मात्र महायुतीमध्ये खातेवाटपाचा पेच अद्याप सुटलेला नाही. घटक पक्षांना नेमकी किती खाती मिळणार, यावर खल सुरू आहे. यामध्ये महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गृहखात्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी केली असून नैसर्गिक न्यायाने हे खाते मिळण्याची अपेक्षा पक्षाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी व्यक्त केली.
फडणवीसच मुख्यमंत्री? भाजप पक्षश्रेष्ठींकडून नावावर शिक्कामोर्तब, अखेर अनिश्चितता दूर
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाल्यानंतर गेल्या आठवडाभर मुख्यमंत्रिपदावरून खल सुरू होता, मात्र आता मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटला आहे. तूर्तास खातेवाटपावरून चर्चा सुरू असल्याचे कळते. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीतही खातेवाटपाबाबत चर्चा झाली होती, मात्र त्याला अंतिम स्वरूप आलेले नाही. त्यात शुक्रवारी शिंदे प्रकृतीच्या कारणास्तव त्यांच्या दरे या गावी निघून गेल्याने महायुतीच्या बैठका लांबल्या. मात्र ते रविवारी ठाण्यात परतले आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग मिळणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेने गृहमंत्रिपदाची मागणी कायम ठेवल्याचे संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावरून समोर आले आहे. ‘आम्ही गृहखात्याची मागणी केलेली आहे. नैसर्गिक न्यायाने आम्हाला हे खाते मिळायलाच हवे. ते गरजेचेच आहे,’ असे शिरसाट यांनी ठामपणे सांगितले.
तुम्हाला निलंबित का करु नये? बंटी शेळकेंना कॉंग्रेसची नोटीस, नाना पटोले यांच्यावरील टीका भोवली
‘एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत संयुक्त बैठक घेण्याची शक्यता आहे. खातेवाटपाबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू असली, तरी या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचे काम शिंदे करतील,’ असा विश्वासही शिरसाट यांनी व्यक्त केला. ‘आम्ही मागणी केली आणि त्यांनी लगेच खाते दिले, असे होत नाही. त्यासाठी बैठक, चर्चा व्हावी लागते,’ असेही ते म्हणाले. ‘जनतेच्या मनातील सरकार स्थापन करणार’ सातारा : ‘कल्याणकारी योजना राबविण्यात हे सरकार यशस्वी झाल्यामुळे नागरिकांच्या मनातील सरकार स्थापन करण्यात येणार आहे,’ असे एकनाथ शिंदे यांनी रविवारी अधोरेखित केले आहे. दरे येथून मुंबईला रवाना होण्यापूर्वी ते स्थानिक पत्रकारांशी बोलत होते.
Sanjay Shirsat: गृहखाते दिल्यास आम्ही उत्तम सांभाळू! संजय शिरसाट यांच्या विधानाने चर्चेला उधाण
‘मी सामान्य लोकांच्या अडचणी, त्यांची दुःखे समजून घेऊन काम केले आहे. सहाजिक त्यांच्या त्याच पद्धतीच्या भावना आहेत. त्यामुळे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून ते माझ्याकडे पाहत आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले हे यश हे सर्वाधिक आहे. यामध्ये कोणाचाही संभ्रम नको,’ असेही ते म्हणाले.

गृहखात्यापासून शिवसेना कायम लांबच
राज्यात १९९५मध्ये शिवसेना, भाजप युतीचे सरकार आले, तेव्हा त्यात मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे होते. तर उपमुख्यमंत्रिपद भाजपकडे होते. त्यावेळी गृहमंत्री भाजपचे गोपीनाथ मुंडे होते. २०१४ ते १०१९ या कालावधीत राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते. फडणवीस स्वतःच मुख्यमंत्री होते. या सरकारमध्ये शिवसेना होती. मात्र त्यावेळेही लहान भाऊ असलेल्या शिवसेनेला गृहमंत्रिपद देण्यात आले नव्हते.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post गृहखात्यासाठी मोर्चेबांधणी; शिवसेनेची अपेक्षा, सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग येणार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110894 0
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्या ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद, कोणत्या परिसराला फटका? वाचा लिस्ट https://tejpolicetimes.com/?p=110314 https://tejpolicetimes.com/?p=110314#respond Wed, 27 Nov 2024 04:08:33 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110314 मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्या ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद, कोणत्या परिसराला फटका? वाचा लिस्ट

Mumbai Water Supply Cut: लोअर परळ येथील सेनापती बापट मार्गावरील गावडे चौकात असलेल्या १,४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम जल अभियंता विभागाकडून हाती घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र टाइम्सwater supply21 मुंबई : तानसा धरणातून मुंबईत येणाऱ्या १,४५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मुंबई महापालिका उद्या, गुरुवारी रात्रीपासून हाती घेत आहे. लोअर परळ येथील या […]

The post मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्या ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद, कोणत्या परिसराला फटका? वाचा लिस्ट first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्या ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद, कोणत्या परिसराला फटका? वाचा लिस्ट

Mumbai Water Supply Cut: लोअर परळ येथील सेनापती बापट मार्गावरील गावडे चौकात असलेल्या १,४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम जल अभियंता विभागाकडून हाती घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स
water supply21

मुंबई : तानसा धरणातून मुंबईत येणाऱ्या १,४५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मुंबई महापालिका उद्या, गुरुवारी रात्रीपासून हाती घेत आहे. लोअर परळ येथील या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम २२ तास चालणार असून त्यामुळे लोअर परळ, प्रभादेवी, दादर भागातील पाणीपुरवठा पूर्णतः किंवा अंशतः खंडित होणार आहे.

रहिवाशांना गुरुवारी आणि शुक्रवारी या कामाचा फटका बसणार आहे. लोअर परळ येथील सेनापती बापट मार्गावरील गावडे चौकात असलेल्या १,४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम जल अभियंता विभागाकडून हाती घेण्यात येणार आहे. हे काम महापालिका गुरुवार, २८ नोव्हेंबरला रात्री दहा वाजल्यापासून सुरू करणार असून शुक्रवारी रात्री आठ वाजता पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.
पश्चिम रेल्वेवरील प्रवास आणखी गारेगार; आजपासून नव्या १३ एसी लोकल फेऱ्या, असे आहे नियोजन
या कामासाठी संपूर्ण जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे. त्यामुळे जी-दक्षिण आणि जी-उत्तर विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद असेल. यात करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ, लोअर परळ परिसर, ना. म. जोशी मार्ग, संपूर्ण प्रभादेवी परिसर, पी. बाळू मार्ग, हातिसकर मार्ग, आदर्श नगर, जनता वसाहत, अप्पासाहेब मराठे मार्ग, वीर सावरकर मार्ग, ना. म. जोशी मार्ग, सेनापती बापट मार्ग,
महामुंबईत थंडीची चाहूल! किमान तापमान २० अंशाच्या खाली; कर्जत-बदलापूर परिसरात अधिक हुडहुडी
पांडुरंग बुधकर मार्ग, गणपतराव कदम मार्ग, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, काकासाहेब गाडगीळ मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग या भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्ण वेळ बंद राहणार आहे. एल. जे. मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, अरूणकुमार वैद्य मार्ग या भागांमध्ये पाणीपुरवठा अंशतः सुरू राहील.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्या ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद, कोणत्या परिसराला फटका? वाचा लिस्ट first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110314 0