Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
शिल्पकार राम सुतार - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Tue, 03 Sep 2024 16:55:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg शिल्पकार राम सुतार - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 Sculptor Anil Sutar : पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला तडे? शिल्पकार अनिल सुतारांनी सगळंच सांगितलं https://tejpolicetimes.com/?p=104238 https://tejpolicetimes.com/?p=104238#respond Tue, 03 Sep 2024 16:55:13 +0000 https://tejpolicetimes.com/?p=104238 Sculptor Anil Sutar : पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या  पुतळ्याला तडे? शिल्पकार अनिल सुतारांनी सगळंच सांगितलं

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 3 Sept 2024, 10:25 pm sambhaji maharaj statue : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला चिरा पडल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. महाविकास आघाडीने पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेऊन पुतळ्याच्या काही भागाला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. हे आरोप पुतळा बनवणारे प्रसिद्ध शिल्पकार […]

The post Sculptor Anil Sutar : पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला तडे? शिल्पकार अनिल सुतारांनी सगळंच सांगितलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Sculptor Anil Sutar : पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या  पुतळ्याला तडे? शिल्पकार अनिल सुतारांनी सगळंच सांगितलं

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 3 Sept 2024, 10:25 pm

sambhaji maharaj statue : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला चिरा पडल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. महाविकास आघाडीने पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेऊन पुतळ्याच्या काही भागाला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. हे आरोप पुतळा बनवणारे प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे पुत्र अनिल सुतार यांनी फेटाळून लावले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
अभिजीत दराडे, पुणे : मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटना घडल्यामुळे राज्यभरात संतापाचे वातावरण आहे. अशातच आता पिंपरी चिंचवडमधील भोसरी गावात उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला चिरा पडल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या संदर्भात महाविकास आघाडीने पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेऊन पुतळ्याच्या काही भागाला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. हेच आरोप पुतळा बनवणारे प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे पुत्र अनिल सुतार यांनी फेटाळून लावले आहेत. महाराष्ट्र टाईम ऑनलाइनशी बोलताना अनिल सुतार यांनी पुतळ्यासंदर्भात सर्व टेक्निकल गोष्टी समजून सांगितल्या आहेत.

आरोप चुकीचे आहेत

अनिल सुतार म्हणाले की, पिंपरी चिंचवड येथे उभारण्यात येणारा छत्रपती संभाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळ्याचे काम अजूनही पुर्ण झालेले नाही आहे. जे आरोप करण्यात आले आहेत. ते एकदम चुकीचे आहेत. कारण एखाद्या पुतळ्यांचं काम सुरू होतं. त्यावेळी पहिल्यांदा त्या पुतळ्याचं पूर्ण स्ट्रक्चर डिझाईन केलं जातं. या पुतळ्यासंदर्भातही सर्व स्ट्रक्चर झिझाईन करण्यात आलं आहे. त्यात आयडीएने दिलेल्या मार्गदर्शनामुळे ब्रॉंझ हा धातू वापरण्यात आला असून सरदार वल्लभ पटेल यांच्या पुतळ्यात देखील C903 हा धातू वापरण्यात आला आहे.

पुतळा एकाच वेळी ट्रकमधून नेणे शक्य नाही

अनिल सुतार पुढे म्हणाले की, ”छत्रपती संभाजी महाराज यांचा १०० मीटरचा पुतळा एकाच वेळी ट्रकमधून नेता येत नाही. या प्रवासादरम्यान ट्रकमध्ये नेत असताना पुतळ्याचे काही भाग डॅमेज होतात. परंतु हे डॅमेज झालेले भाग तेथे नेऊन पुन्हा त्याला फिनिशिंग लाईन दिली जाते. त्यामुळे आपण त्याचे काही एक एक भाग जवळपास दीड हजार किलोमीटरचा रस्ता कापून घेऊन जात आहोत. त्यात काही भागांना क्रॅक आले आहेत. परंतु त्या पुतळ्याचं पुर्ण काम अजूनही झालेले नाही. पुतळ्याचे सर्व भाग आपण त्याठिकाणी नेऊन तो जोडून त्याला पुन्हा वेल्डिंग करतो आणि त्यावर फिनिशिंग करतो. असेही त्यांनी सांगितले.
Jayant Patil : मी सांगत होतो पवारांना डावलून जाऊ नका मोठं लफड होईल, जयंत पाटलांची फटकेबाजी

पुतळ्यातील फरक कळत नसेल तर त्याला आम्ही काही करू शकत नाही

पुतळ्याला दोन वर्षेही झाले नाही तरी गंज लागला आहे असा आरोपही होत आहे. त्यावर अनिल सुतार म्हणाले की, ज्यांना लोखंड आणि ब्रॉंझमधील फरक समजत नसेल तर त्यावर आम्ही काहीही करू शकत नाही. हा पुतळा पुर्णपणे ब्रॉंझ या धातूचा बनविण्यात येणार आहे. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या सर्व ऋतुंचा विचार करून पुतळा बनवितांना त्याची संपूर्ण काळजी घेतली जाते. त्यानुसार आयडीएने दिलेल्या मार्गदर्शनामुळे ब्रॉंझमधील C903 हा धातू वापरण्यात आला आहे. सरदार वल्लभ पटेल यांच्या पुतळ्यात देखील C903 हा धातू वापरण्यात आला आहे. यात ज्यांना वाटतयं त्यांनी पुण्यातील स्पेक्ट्रो कंपनीला घेऊन जाऊन त्याची टेस्ट करू शकता. असे आवाहनही त्यांनी केले आहे.

राम सुतार यांच्या नावाने या पुतळ्याचं कंत्राट दिले नसून धनेश्वरच्या माध्यामातून ऑर्डर देण्यात आली असल्याचाही आरोप होत आहे. त्यावर बोलतांना अनिल सुतार यांनी सांगितले आहे की, माझे वडिल राम सुतार यांनी १९४७ पासून पुतळे बनवित आहेत. आतापर्यंत आमचे संसदेत चार तर साडेचारशे शहरात पुतळे लागले आहेत. जगभरासह संपुर्ण भारताचा विचार केल्यास प्रत्येक प्रांतात किमान दोन तरी पुतळे आम्ही तयार केलेले बसवण्यात आले आहेत. हैदराबाद, बंगलोर, लखनऊ या शहारांसाठीही पुतळ्यांचं काम सुरू आहे. पुतळ्याचं कामासंदर्भात ऑर्डरही एका माणसालाच दिली जाते. त्याची संपूर्ण जबाबदारी त्या माणसाची असते. आम्ही आतापर्यंत अशाच पद्धतीने काम केले आहे. अनेक कंत्राटदारांच्या माध्यमातून आम्हाला तसं काम करावं लागतं. असेही ते म्हणाले.

दुर्घटना घडली तर आम्ही जबाबदार राहणार

अनिल सुतार पुढे म्हणाले की, ”पुतळ्यासंदर्भात काहीही घटना घडली तर त्याला आम्ही जबाबदार राहणार आहोत. परंतु काही वेळेस नैसर्गिक आपत्ती आल्यास किंवा इतर आपत्ती आल्यास त्यावेळेस आपल्याला जबाबदार धरता येत नाही. यातर माझ्या वडिलांनी कधीच दुसऱ्याकडे काम मागण्यासाठी गेले नाहीत. स्वत: व्यक्तीच आमच्याकडे येऊन तुमच्याकडून आम्हाला पुतळा बनवायचा असल्याचे सांगतात. आता जे काही राजकारण सुरू आहे. त्यावर आम्हाला काहीही बोलायचं नाही. परंतु जरी कुणाला काही वाटत असेल तर त्यांनी ग्राऊंडवर जाऊन टेक केले पाहिजे. त्यानंतर त्यांनी बोललं पाहिजे. मालवण पुतळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत एक व्हि़डीओ बैठक पार पडली. त्यावेळी सर्व नेव्हीचे अधिकारीही होते. त्यांनी आम्हाला पुतळ्यासंदर्भात काही बाबी विचारल्या आहेत. तो पुतळा कसा काय पडला किंवा पुढचा पुतळा उभारतांना काय केले पाहिजे? त्यासंदर्भातही सांगितले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अजित भाबड

लेखकाबद्दलअजित भाबडअजित भाबड, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. अजित यांनी आबासाहेब गरवारे कॉलेजमधून पत्रकारितेची मास्टर्स पदवी मिळवली आहे. त्यांना राजकीय, सामाजिक, अंतरराष्ट्रीय तसेच कृषी क्षेत्रातील विश्लेषणात्मक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

The post Sculptor Anil Sutar : पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला तडे? शिल्पकार अनिल सुतारांनी सगळंच सांगितलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=104238 0