आज ७ फेब्रुवारी शुक्रवार आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी असून चंद्र वृषभ राशीत आहे. तसेच रोहिणी नक्षत्र, ऐंद्र योग आणि तैतिल करणाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे वृश्चिकसह ५राशी सुखी असतील. आर्थिक स्थिती सुधारेल. विनाकारण लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. कामासाठी वेळ काढाल. कौटुंबिक जीवन चांगले राहिल. कुटुंबात सुख-समृद्धी राहिल. कायमस्वरुपी वापराच्या वस्तू खरेदी कराव्यात. ज्यामध्ये पैसे खर्च केले जातील. तुमच्या घरी खास पाहुणे येण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत आनंदी असाल. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य
वृषभ – पैसे खर्च होतील.

आज तुमच्या कुटुंबात काही शुभ कार्याचे आयोजन केले जाईल. कुटुंबात सुख-समृद्धी राहिल. कायमस्वरुपी वापराच्या वस्तू खरेदी कराव्यात. ज्यामध्ये पैसे खर्च केले जातील. तुमच्या घरी खास पाहुणे येण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत आनंदी असाल.
आज भाग्य ८० टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला चपाती खाऊ घाला.
मिथुन – नशिबाची साथ मिळेल

आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमची प्रगती पाहून तुमचे सहकारी कर्मचारी आश्चर्यचकित होतील. कुणाच्याही नजरेत येणार नाही याची काळजी घ्या. अनावश्यक कृत्यापासून दूर राहा. प्रगतीचा वेग वाढेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. मुले आनंदी असतील.
आज भाग्य ७१ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिव चालीसाचे पठण करा
कर्क – चिंता सतावेल

आजचा दिवस दानधर्मात खर्च होईल. भावंडांची चिंता सतावेल. तुमचे मन अस्वस्थ राहिल. कुटुंबातील सर्व सदस्यांसह कुठेतरी प्रवासाची योजना आखाल. तुमची आर्थिक परिस्थिती पाहून पैसे खर्च करा. अडचणींना सामोरे जावे लागेल.
आज भाग्य ८३ टक्के तुमच्या बाजूने असेल. तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा.
सिंह – आळशीपणा वाढेल

आज तुम्ही कामाच्या ओझ्यामुळे चिंतेत असाल. तुमचा आळशीपणा आणि उत्स्फूर्तता पाहायला मिळेल. तुम्ही पुढे जाण्यास सक्षम व्हाल. कुटुंबात काही कलह चालू असेल तो संपेल. आज मन थोडे प्रसन्न राहिल. लाइफ पार्टनरसोबत कुठेतरी फिरायला जाल.
आज भाग्य ९६ टक्के तुमच्या बाजूने असेल. वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या
कन्या – फायदा होईल

आजचा बराचसा वेळ धावपळीत जाणार आहे. तुम्हाला आज बराच फायदा होणार आहे. आज तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. येणाऱ्या काळात तुम्हाला खूप लाभ मिळेल. मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचे मन प्रसन्न राहिल. वैवाहिक जीवनात आनंदी असाल. वडिलांचा आशीर्वाद मिळेल.
आज भाग्य ७८ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी सरस्वतीची पूजा करा.
तुळ – चिंतेत राहाल.

आज कुटुंबातील प्रिय व्यक्तीबाबत चिंतेत राहाल. ज्यामुळे मन उदास राहिल. तुम्हाला तणाव जाणवेल. सामाजिक आणि व्यावसायाकि क्षेत्रात शत्रू काम करु देणार नाही. तुमच्या धैर्याने आणि बुद्धिमत्तेने लोकांना पराभूत कराल. जीवनसाथीचा सल्ला घ्या. कामात यशस्वी व्हाल.
आज भाग्य ८६ टक्के तुमच्या बाजूने असेल. पिवळी वस्तू दान करा
वृश्चिक – ताण वाढेल

आज तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळेल. तुमचे मन प्रसन्न राहिल. कुटुंबातील सदस्य तुमच्या सोबत राहातील. प्रत्येक वळणावर तुम्हाला साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी व्यवसायाचा ताण तुमच्यावर पडू देऊ नका. नवीन योजनांचा विचार करा. त्यात तुम्हाला यश मिळेल.
आज भाग्य ६४ टक्के तुमच्या बाजूने असेल. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या
धनु – निष्काळजी राहू नका

आज तुमच्यासोबत काहीतरी विशेष घडेल. आज नशिबाची पूर्ण साथ मिळेल. काही नवीन संपर्क फायदेशीर राहातील. अडकलेले पैसे मिळणे कठीण होईल. दैनंदिन कामात निष्काळजी राहू नका. तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबासोबत पार्टीला जाल.
आज भाग्य ७९ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी लक्ष्मीची पूजा करा
मकर – सहकार्य मिळेल

आज तुमच्या कार्यकाळाचा पुरेपूर लाभ मिळेल. दिवसभर चांगली बातमी मिळत राहिल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्या. मातृपक्षाकडून पाठिंबा मिळेल. सामाजिक आणि धार्मिक कार्यात भाग घ्याल. तुमचा आदर आणि सन्मान वाढेल. तुमच्या मनात आनंदाची लहर राहिल.
आज भाग्य ८४ टक्के तुमच्या बाजूने राहिल. माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला.
कुंभ – वेळेचा उपयोग करा

आज कोणत्याही आयात- निर्यात व्यवसायाचा विचार करत असाल तर दिवस शुभ आहे. अध्यात्म आणि धर्मात तुमची रुची वाढेल. नशिबाची तुम्हाला पुरेपूर साथ मिळेल. प्रवास आनंददायी होईल. वेळेचा सदुपयोग करा.
आज भाग्य ६३ टक्के तुमच्या बाजूने राहिल. विष्णुसहस्त्र नामाचे पठण करा
मीन – सावध राहा

आज तुम्हाला गुप्त शत्रूंपासून सावध राहावे लागेल. नुकसान सहन करावे लागू शकते. कोणालाही पैसे उधार देऊ नका. आई-वडिलांचे लक्ष विचलित करु नका. प्रगतीचे मार्ग खुले होतील. अभ्यासात रस वाढेल.
आज भाग्य ९४ टक्के तुमच्या बाजूने राहिल. गरजू लोकांना मदत करा