Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
Ayodhya - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Thu, 06 Jun 2024 14:14:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg Ayodhya - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 Bjp In Ayodhya : प्रभू श्रीरामाने मोदींना अयोध्येत नाकारलं, भव्य मंदिर बांधूनही भाजपचा पराभव, विषय कुठं गंडला ? https://tejpolicetimes.com/?p=95584 https://tejpolicetimes.com/?p=95584#respond Thu, 06 Jun 2024 14:14:11 +0000 https://tejpolicetimes.com/?p=95584 Bjp In Ayodhya : प्रभू श्रीरामाने मोदींना अयोध्येत नाकारलं, भव्य मंदिर बांधूनही भाजपचा पराभव, विषय कुठं गंडला ?

नवी दिल्ली : जानेवारी २०२४ मध्ये अयोध्यानगरीत एकच जल्लोष पाहायला मिळाला तो म्हणजे राम मंदिर उद्घाटनाचा. २२ जानेवारी रोजी राममंदिराचे काम पूर्ण झाले अन् भाजपचे स्वप्न पूर्णत्वास आले. परंतु याच अयोध्येने भाजपला नाकारले आहे. (४ जून) रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये एनडीए सरकारला बहुमत मिळालं पण अयोध्येत मात्र भाजपचा पराभव झाला. समाजवादी पार्टीने मारली […]

The post Bjp In Ayodhya : प्रभू श्रीरामाने मोदींना अयोध्येत नाकारलं, भव्य मंदिर बांधूनही भाजपचा पराभव, विषय कुठं गंडला ? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Bjp In Ayodhya : प्रभू श्रीरामाने मोदींना अयोध्येत नाकारलं, भव्य मंदिर बांधूनही भाजपचा पराभव, विषय कुठं गंडला ?

नवी दिल्ली : जानेवारी २०२४ मध्ये अयोध्यानगरीत एकच जल्लोष पाहायला मिळाला तो म्हणजे राम मंदिर उद्घाटनाचा. २२ जानेवारी रोजी राममंदिराचे काम पूर्ण झाले अन् भाजपचे स्वप्न पूर्णत्वास आले. परंतु याच अयोध्येने भाजपला नाकारले आहे. (४ जून) रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये एनडीए सरकारला बहुमत मिळालं पण अयोध्येत मात्र भाजपचा पराभव झाला.

समाजवादी पार्टीने मारली बाजी

अयोध्या हा फैजाबाद मतदारसंघाचा एक भाग असून येथे भाजप विरुद्ध समाजवादी पार्टी अशी लढत होती. यामध्ये भाजपचे लल्लू सिंह यांना ४,९९,७२२ मते मिळाली. तर समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद (सपा) यांना ५,५४,२८९ मते मिळाली. आणि तब्बल ५४,५६७ इतक्या मतांची लीड घेऊन अवधेश प्रसाद यांचा विजय झाला .

भाजपच्या पराभवाची कारणे काय ?

अयोध्येत राममंदिर बांधणे हे भाजपचे स्वप्न होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत राममंदिर हा सर्वात मोठा आकर्षणाचा मुद्दा होता. ‘मंदिर वही बनाया है’, ‘जो राम को लाये है, हम उनको लाएंगे’ अशा घोषणा भाजपच्या रॅलीत वारंवार दिल्या जात होत्या. त्यामुळे भाजपचा पराभव होईल हे अनपेक्षितच होते. परंतु असे न होता भाजपचा पराभव झाला. १९८४ पासून तर आतापर्यंत सपा आणि काँग्रेसने फैजाबादची जागा प्रत्येकी दोनदा जिंकली आहे. त्यानंतर १९९१ च्या रथ यात्रेनंतर अयोध्येत भाजपचे वर्चस्व वाढले. आणि या जागेवर भाजपचे विनय कटियार ११९१, १९९६ आणि १९९९ या साली तीनदा विजयी झाले. कटियार हे कुर्मी जातीचे आणि हिंदुत्वाचा चेहरा असल्याने धर्म आणि जात या दोन्हींचा आदर केला जात असे. परंतु २००४ मध्ये भाजपने विनय कटियार यांचे तिकीट रद्द करून लल्लू सिंह यांना दिले. पण १९८९ मध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या तिकीटावर आणि १९९८ मध्ये सपाच्या तिकीटावर विजयी होऊन खासदार झालेल्या बसपच्या मित्रसेन यादव यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.
Nitish Kumar in NDA govt: नितीश कुमारांची शांतता वादळापूर्वीची तर नाही? मोदींकडून काय काय मागायचे याची यादी तयार, फक्त…

मंदिर झालं पण स्थानिक प्रश्नांवरून मतदार नाराज

अनेक दशके चाललेल्या वादानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राम मंदिर बांधले गेले. भाजपनेही जोरदार प्रचार केला, मात्र राम मंदिर हा मोठा मुद्दा होऊ शकला नाही, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. अयोध्या जरी राम मंदिराच्या भव्यतेने आकर्षित झाले असले. तरी तेथील गैरसोयीमुळे स्थानिक नाराज असल्याचं सांगण्यात आले आहे.

फैजापूर मतदारसंघात स्थानिक समस्यांबाबत चर्चा होत्या. मंदिर आणि विमानतळाच्या आजूबाजूला होत असलेल्या भूसंपादनामुळे अयोध्येतील अनेक गावांमध्ये संताप आहे. अयोध्येमध्ये विकासाची कामे करण्यात आली. शहरात १४ किलोमीटर लांबीचा रामपथ तयार करण्यात आला. त्याचबरोबर भक्तिमार्ग आणि रामजन्मभूमी मार्ग हे दोन मार्ग देखील तयार करण्यात आले. परंतु हे मार्ग होत असताना स्थानिक नागरिकांचे घरे पाडण्यात आली. त्यातील ज्या लोकांकडे कागदपत्रे होते. अशा लोकांनाच भरपाई मिळाली. इतर लोकांना भरपाई मिळाली नाही असं स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. रॉयटर्ससह अनेक माध्यमांच्या वृत्तांत याची उदाहरणे आढळतात. एका व्यक्तीचे २०० वर्षे जुने दुकान होते, परंतु त्याच्याकडे कोणतीही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे त्यांचे दुकान पाडण्यात आले. त्याला नुकसान भरपाई मिळाली नाही.

अयोध्येतील भाजपच्या पराभवाचे अनेक कारणे आहेत. जसे की, ओबीसी आणि दलितांना भाजपपासून वेगळे करणे, अखिलेश यादव यांचा पीडीए (मागास, दलित आणि अल्पसंख्याक) फॉर्म्युला, लल्लू सिंह यांच्या वागणुकीबद्दल स्थानिक लोकांमध्ये संताप. या कारणांमुळे भाजपला ही जागा जिंकता आली नाही.

Source link

The post Bjp In Ayodhya : प्रभू श्रीरामाने मोदींना अयोध्येत नाकारलं, भव्य मंदिर बांधूनही भाजपचा पराभव, विषय कुठं गंडला ? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=95584 0
रामजन्मभूमी संघर्ष आणि कालीमाता, श्री श्री रविशंकर यांचा विशेष लेख https://tejpolicetimes.com/?p=79809 https://tejpolicetimes.com/?p=79809#respond Mon, 22 Jan 2024 03:52:52 +0000 https://tejpolicetimes.com/?p=79809 रामजन्मभूमी संघर्ष आणि कालीमाता, श्री श्री रविशंकर यांचा विशेष लेख

मुंबई: विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) तत्कालीन अध्यक्ष अशोक सिंघल सन २००२च्या उन्हाळ्यात बेंगळुरूतील आश्रमात मला भेटण्यासाठी कांचीपुरमहून आले होते. तिथे त्यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाच्या संदर्भात कांची कामकोटी पीठाचे तत्कालीन शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांची भेट घेतली होती. शंकराचार्य आणि प्रमुख मुस्लिम नेत्यांमधील चर्चा अयशस्वी झाल्यानंतर सिंघलजी मला भेटायला आले होते. रामजन्मभूमीचा प्रश्न सोडवण्यासाठी कायदा आणावा […]

The post रामजन्मभूमी संघर्ष आणि कालीमाता, श्री श्री रविशंकर यांचा विशेष लेख first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
रामजन्मभूमी संघर्ष आणि कालीमाता, श्री श्री रविशंकर यांचा विशेष लेख

मुंबई: विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) तत्कालीन अध्यक्ष अशोक सिंघल सन २००२च्या उन्हाळ्यात बेंगळुरूतील आश्रमात मला भेटण्यासाठी कांचीपुरमहून आले होते. तिथे त्यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाच्या संदर्भात कांची कामकोटी पीठाचे तत्कालीन शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांची भेट घेतली होती. शंकराचार्य आणि प्रमुख मुस्लिम नेत्यांमधील चर्चा अयशस्वी झाल्यानंतर सिंघलजी मला भेटायला आले होते. रामजन्मभूमीचा प्रश्न सोडवण्यासाठी कायदा आणावा आणि राममंदिर उभारणीचा मार्ग तातडीने मोकळा करावा, हे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीजींना मी पटवून द्यावे हे सांगण्यासाठी ते आश्रमात आले होते. ‘त्यासाठी वाजपेयीजी चालवत असलेले आघाडी सरकार कोसळले तरी चालेल. मला त्याची पर्वा नाही,’ असे ते मला म्हणाले होते. विशेष म्हणजे, राम मंदिरासाठी बेमुदत उपोषण करताना त्यांना जबरदस्तीने खाऊ घातल्याने त्या वेळी सिंघलजी वाजपेयींशी बोलत नव्हते.

त्या वेळी ७६ वर्षीय अशोकजींच्या डोळ्यांत एक उत्कट चैतन्य आणि एक चमक होती. ती चमक उत्कटता, धार्मिक संताप आणि निराशा दर्शवत होती. ‘राम मंदिर कधी बांधले जाईल का? माझ्या हयातीत मला ते पाहायला मिळेल का,’ असा प्रश्न त्यांनी मला विचारला. तेव्हा मला आतून असे वाटले, की आणखी किमान १४ वर्षे हे घडणार नाही. मी त्यांना म्हणालो, ‘तुम्ही प्रार्थना करा. तुमच्या वचनबद्धतेने सर्व शक्य आहे.’ माझ्या या बोलण्याने पूर्ण समाधान न झालेले अशोकजी आश्रमातून निघून गेले.

प्रभू श्रीरामांची कुलदेवता

दुसऱ्या दिवशी सकाळी ध्यान करताना, मला एका जीर्ण झालेल्या देवी मंदिराचे दर्शन झाले, ज्याचे पुनरुत्थान करणे आवश्यक होते. त्या वेळी मी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. काही दिवसांनी तमिळनाडूतील एक वयोवृद्ध नाडी सिद्धपुरुष आश्रमात आले आणि त्यांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. प्राचीन ताडपत्रे वाचत असताना ते हळूवारपणे म्हणाले, ‘गुरुदेव, रामजन्मभूमीचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला दोन्ही समुदायांना एकत्र आणण्याची भूमिका बजावावी लागेल असे यात लिहिले आहे. यात हेही दिसून येते, की देवकाली या प्रभू श्रीरामांच्या कुलदेवीचे मंदिर खूपच दुर्लक्षित आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याशिवाय अयोध्येतील राम मंदिराभोवतीचा हिंसाचार आणि संघर्ष संपणार नाही.’ हे करायलाच हवे, असे सांगताना त्यांच्या बोलण्यात निकड आणि दृढ विश्वासाची भावना होती.

अयोध्येत दोन काली मंदिरे

देवकाली देवीच्या अशा मंदिराच्या अस्तित्वाची माहिती त्या नाडी सिद्धपुरुषाला किंवा मलाही नव्हती. काही सूत्रांद्वारे आणि चौकशीअंती अयोध्येत दोन काली मंदिरे असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यातील एक मंदिर शहराच्या मध्यभागी होते, त्याला लहान देवकाली मंदिर असे म्हणतात आणि दुसरे मंदिर थोडेसे दूर होते. ते देवकाली मंदिर म्हणून ओळखले जात असे. या देवकाली मंदिराचे बांधकाम मोडकळीस आले होते. त्यातील मध्यवर्ती तलावात कचरा टाकून लोकांनी त्याचे डम्पिंग ग्राउंडच केले होते. मंदिराच्या नूतनीकरणाचे आणि तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सुरू करण्यासाठी मी नवी दिल्ली आणि लखनौ येथील आमच्या स्वयंसेवकांशी संपर्क साधला. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत त्यांनी हे काम यशस्वीपणे पूर्ण केले.

देवकाली मंदिरात १९ सप्टेंबर २००२ रोजी सकाळी पुन: प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आमच्या आश्रमातील पंडितांच्या गटाने माझ्या उपस्थितीत हा समारंभ पार पाडला. पवित्र अग्नीत पूर्णाहुती अर्पण करताना मला या मंदिराच्या वृद्ध पुजाऱ्याच्या डोळ्यांत आनंदाचे आणि कृतज्ञतेचे अश्रू दिसले. देवकाली देवी तिच्या संपूर्ण वैभवात चमकत होती. देवकाली मंदिरातील पूजेनंतर, शहरात जातीय हिंसाचारामुळे कोणताही रक्तपात किंवा दंगल झाली नाही. एक भविष्यवाणी पूर्ण झाली होती…अशोकजी सिंघलही त्या दिवशी उपस्थित होते. मात्र, राम मंदिराच्या मुद्द्यावर अंतिम निर्णय होण्यासाठी आणखी १४ वर्षे लागतील या पूर्वकल्पनेवर मी ठाम होतो. त्या संध्याकाळी देवकाली मंदिर परिसरात संत समागम झाला, ज्यामध्ये आम्ही हिंदू आणि सुफी संतांना निमंत्रित केले होते. एक हजारांहून अधिक लोक सत्संगात सहभागी झाले होते. रामजन्मभूमीचा वाद शांततेत सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रार्थना केली. मी मुस्लिम नेत्यांचा सन्मान करीत असताना त्यांनी मला तुलसी रामायणसोबत कुराणाची एक प्रत दिली आणि श्रीरामांवर त्यांची नितांत श्रद्धा असल्याचे सांगितले. त्यांच्या हावभावात बंधुत्वाचा निस्सीम भाव होता. याने माझा विश्वास दृढ केला, की केवळ निहित स्वार्थ असलेल्यांनाच दोन समाजांमध्ये फूट पडावी, असे वाटत असते.

शतकानुशतके चाललेल्या या संघर्षात पुरेसे रक्त सांडले होते. त्यामुळे आता काळाच्या कसोटीवर टिकणारा तोडगा हवा होता. हे लक्षात घेऊन सन २००३मध्ये मी न्यायालयाबाहेर परस्पर सामंजस्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार, मुस्लिम समाज सद्भावना म्हणून हिंदूंना रामजन्मभूमी भेट देईल आणि त्या बदल्यात हिंदू त्यांना मशिदीच्या बांधकामासाठी पाच एकर जमीन देतील. यातून दोन्ही समाजांतील येणाऱ्या पिढ्यांसाठी बंधुभावाचा स्पष्ट संदेश जाईल.

देवकालीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अशोकजींनी मला प्रयागराज (त्या वेळचे अलाहाबाद) येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरी बोलावले. सामूहिक ध्यानाचे मार्गदर्शन केल्यावर मी अशोकजींना सांगितले, की रामजन्मभूमीचा वाद सोडवण्यासाठी केवळ मानवी प्रयत्न पुरेसे नसून, ईश्वरी इच्छाही आवश्यक आहे. कोणत्याही कृतीच्या फलश्रुतीमध्ये मानवी प्रयत्नांसोबतच ईश्वरी इच्छाही महत्त्वाची भूमिका बजावते. त्यासाठी संयमाची गरज असते. मी त्यांना सुचवले, की त्यांनी या प्रकरणी घाई करू नये. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास ते अधिक निश्चिंत आणि आश्वस्त दिसले. वाजपेयी सरकारच्या विरोधातील आपली भूमिकाही त्यांनी मवाळ केली.

या घटनेनंतर काही कालावधी गेला. सन २०१७मध्ये दोन्ही समाजांच्या नेत्यांच्या आग्रहानुसार आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेमुळे मी रामजन्मभूमी प्रकरणात मध्यस्थी करण्याचे माझे प्रयत्न पुन्हा सुरू केले. सरतेशेवटी, सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. मंदिराच्या बांधकामासाठी रामजन्मभूमीची जमीन आणि मशीद बांधण्यासाठी पाच एकर जागा निश्चित केली. हा एक महत्त्वाचा प्रसंग होता, कारण ५०० वर्षे जुन्या संघर्षावर शांततापूर्ण तोडगा निघाला होता.

– गुरुदेव श्री श्री रविशंकर

Source link

The post रामजन्मभूमी संघर्ष आणि कालीमाता, श्री श्री रविशंकर यांचा विशेष लेख first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=79809 0
रामायणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे वाद; भालचंद्र नेमाडेंविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी https://tejpolicetimes.com/?p=79637 https://tejpolicetimes.com/?p=79637#respond Sun, 21 Jan 2024 08:27:32 +0000 https://tejpolicetimes.com/?p=79637 रामायणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे वाद; भालचंद्र नेमाडेंविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिल्ली विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड प्रकाशनाने बंदी घातलेल्या ‘ ३०० रामायणे ‘ पुस्तकातील चुकीच्या माहितीच्या आधारे साहित्यिक भालचंद्र नेमाडे हे हिंदुंच्या भावनांशी खेळत आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने नेमाडे यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी ‘, अशी मागणी शिक्षा संस्कृती उत्थान न्यासाने केली आहे. नेमाडे यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्या […]

The post रामायणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे वाद; भालचंद्र नेमाडेंविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
रामायणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे वाद; भालचंद्र नेमाडेंविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिल्ली विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड प्रकाशनाने बंदी घातलेल्या ‘ ३०० रामायणे ‘ पुस्तकातील चुकीच्या माहितीच्या आधारे साहित्यिक भालचंद्र नेमाडे हे हिंदुंच्या भावनांशी खेळत आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने नेमाडे यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी ‘, अशी मागणी शिक्षा संस्कृती उत्थान न्यासाने केली आहे. नेमाडे यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचा इशारा न्यासाच्या वतीने धनंजय कुलकर्णी यांनी दिला आहे. शिक्षा संस्कृती उत्थान न्यासाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत न्यासाच्या प्रतिनिधी बोलत होते. यावेळी कुलकर्णी, न्यासाचे प्रांत संयोजक डॉ. चंद्रकांत गुळेद, प्रांत अध्यक्ष अनिल महाजन, डॉ. सुनील भंडगे, डॉ. डी. डी. कुंभार आदी उपस्थित होते.

भालचंद्र नेमाडे यांनी ३०० रामायणे या रामानुजन यांच्या निबंध ग्रंथाचा उल्लेख करीत, रामायणातील रामाची विविध रूपे विकृतीपूर्ण, रामाच्या हिंदू श्रद्धेला छेद देणारी आणि बदनामीकारक मांडण्याचा प्रयत्न केला आहे . रामानुजन यांचे हे पुस्तक २००८ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या कला विद्या शाखेच्या पदवी अभ्यासक्रमासाठी क्रमिक पुस्तक म्हणून समाविष्ट केले होते. शिक्षा बचाव आंदोलनाचे तत्कालीन राष्ट्रीय सचिव दीनानाथ बत्रा आणि सध्याचे राष्ट्रीय सचिव डॉ. अतुल कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आंदोलनानंतर; तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर दिल्ली विद्यापीठाच्या विद्या परिषदेने हे वादग्रस्त पुस्तक रद्द केले या निर्णयासाठी विद्यापीठाने ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञांची समिती नेमली होती. या अहवालाच्या आधारे विद्यापीठाने या क्रमिक पुस्तकाने हिंदूंच्या भावना दुखावतात; तसेच तांत्रिक कारण देत हे पुस्तक अभ्यासक्रमातून रद्द केले.

वाल्मिकी श्रृंग घराण्याचा कवी, त्यांना जसं आवडलं तसं वाल्मिकींनी रामायण लिहिलं, वाल्मिकींचा राम कशामुळे खरा? : नेमाडे

या पार्श्वभूमीवर ‘ ३०० रामायणे ‘ या पुस्तकाच्या माहितीच्या आधारे भालचंद्र नेमाडे यांनी मत व्यक्त करणे योग्य आहे ? नेमाडेंचा परिचय इतिहास संशोधक म्हणून अथवा रामायणाच्या अभ्यासक म्हणून नाही. ३०० रामायणे या पुस्तकाचे मूळ प्रकाशन ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रेस विभागाने केले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याबद्दल ऑक्सफर्ड विद्यापीठाने खेद व्यक्त केला होता; त्याचप्रमाणे ऑक्सफर्ड विद्यापीठाला जे कळतं ते भालचंद्र नेमाडे यांना कळत नाही का ? भालचंद्र नेमाडे जाणीवपूर्वक डाव्या विचारांवरील आपली निष्ठा आणि पुरोगामी तो सिद्ध करण्यासाठी ३०० रामायाने या ग्रंथाचा आधार घेत आहेत. हे पुस्तक दिल्ली विद्यापीठाने अभ्यासक्रमातून इतिहासतज्ञांच्या अहवालाच्या आधारे रद्द केला. त्याचप्रमाणे ऑक्सफर्ड विद्यापीठाने या ग्रंथाचे प्रकाशन वितरण आणि रद्द केली आहे असे असतानाही हिंदू धर्मियांच्या रामाबाबतच्या असलेल्या श्रद्धा दुखावल्याबद्दल भालचंद्र नेमाडे यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कुलकर्णी आणि डॉ. गुळेद यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

पोलिसात तक्रार करू

भालचंद्र नेमाडे यांच्याबाबत आदर आहे. ते साहित्यिक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी इतिहासकारांच्या भूमिकेत जाऊ नये. नेमाडे यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे वादग्रस्त विधाने तातडीने थांबवावीत. नेमाडे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्यात येईल, असा इशारा कुलकर्णी यांनी दिला.

Source link

The post रामायणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे वाद; भालचंद्र नेमाडेंविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=79637 0
फडणवीस कारसेवेसाठी खरंच अयोध्येला गेले होते का? कारसेवकांच्या घोळक्याचा तो फोटो व्हायरल https://tejpolicetimes.com/?p=79647 https://tejpolicetimes.com/?p=79647#respond Sun, 21 Jan 2024 04:42:43 +0000 https://tejpolicetimes.com/?p=79647 फडणवीस कारसेवेसाठी खरंच अयोध्येला गेले होते का? कारसेवकांच्या घोळक्याचा तो फोटो व्हायरल

मुंबई: देशाच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या बाबरी मशिदीच्या पतनावेळी आपण अयोध्येत कार सेवेसाठी गेलो होतो, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनेकदा करत असतात. मात्र, विरोधकांकडून त्यांच्या या दाव्याची वेळोवेळी खिल्ली उडवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सोशल मीडियावर एक फोटो ट्विट करुन आपण बाबरी पतनावेळी अयोध्येला गेल्याचा पुरावा सादर केला आहे. देवेंद्र […]

The post फडणवीस कारसेवेसाठी खरंच अयोध्येला गेले होते का? कारसेवकांच्या घोळक्याचा तो फोटो व्हायरल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
फडणवीस कारसेवेसाठी खरंच अयोध्येला गेले होते का? कारसेवकांच्या घोळक्याचा तो फोटो व्हायरल

मुंबई: देशाच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या बाबरी मशिदीच्या पतनावेळी आपण अयोध्येत कार सेवेसाठी गेलो होतो, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनेकदा करत असतात. मात्र, विरोधकांकडून त्यांच्या या दाव्याची वेळोवेळी खिल्ली उडवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सोशल मीडियावर एक फोटो ट्विट करुन आपण बाबरी पतनावेळी अयोध्येला गेल्याचा पुरावा सादर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. या फोटोत अयोध्येला जाण्यासाठी निघालेल्या कारसेवकांच्या जथ्थ्यात उभे असलेले देवेंद्र फडणवीस उभे असल्याचे दिसत आहे. हा फोटो नागपूर रेल्वे स्थानकावरील असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे.

अयोध्येत सोमवारी राममंदिराचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल. महाराष्ट्रातही भाजपकडून या सोहळ्यासाठी जोरदार वातावरणनिर्मिती केली जात आहे. त्यासाठी अयोध्येला गेलेल्या कार सेवकांच्या अनुभव कथनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांनीही मी तरुण वयात कार सेवेसाठी अयोध्येत गेलो होतो, असा दावा अनेकदा केला आहे. बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा मी त्याठिकाणीच होतो, असेही फडणवीस यांनी म्हटले होते. परंतु, विरोधक त्यांच्या या दाव्याची कायमच खिल्ली उडवत आले होते. मात्र, आता फडणवीसांनी कार सेवेसाठी जातानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत लिहलेल्या कॅप्शनमध्ये फडणवीसांनी म्हटले आहे की, ‘जुनी आठवण…नागपूरहून प्रकाशित होणार्‍या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्‍या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र. छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत प्रभूश्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे… नवभारत परिवाराचा मी अतिशय आभारी आहे’, असे फडणवीसांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हा फोटो शेअर केल्यानंतर आता विरोधक त्यावर काय प्रतिक्रिया देणार, याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे.

अयोध्येला चढला रामरंग

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघे दोन दिवस उरलेले असताना शनिवारी मंदिराला ताज्या टवटवीत फुलांनी आणि विशेष रोषणाईने सजविण्यास सुरुवात झाली. संपूर्ण अयोध्या सजली असून, शहराला धार्मिक रंग आला आहे. स्थानिकांच्या भाषेत ‘अयोध्या राममय हो रही है.’

‘राम मंदिराला नैसर्गिक फुलांनी सजविण्यात आले आहे. हिवाळ्यामुळे ती जास्त वेळ टवटवीत राहू शकतात. त्यामुळे प्राणप्रतिष्ठेच्या दिवसापर्यंत ती ताजी राहतील. फुलांचा दरवळ आणि सौंदर्यामुळे मंदिराच्या पावित्र्यात आणखी वाढ झाली आहे,’ अशी भावना मंदिराच्या विश्वस्तांनी व्यक्त केली. फुले आणि रोषणाईच्या सजावटीच्या दोन वेगळी पथके नेमण्यात आली आहेत. मंदिराच्या गर्भगृहात मात्र पारंपरिक दिवेच लावले जाणार आहेत.

अयोध्येत राम मंदिर उत्सव, कुंभार बांधवांची लगबग; लाखो मातीच्या पणत्यांची निर्मिती, प्रचंड मागणी

Source link

The post फडणवीस कारसेवेसाठी खरंच अयोध्येला गेले होते का? कारसेवकांच्या घोळक्याचा तो फोटो व्हायरल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=79647 0
Ramlala Pran Pratishtha Wishes: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त प्रियजनांना शुभेच्छा द्या , प्रभू रामलल्लाचे असे करा स्वागत https://tejpolicetimes.com/?p=79397 https://tejpolicetimes.com/?p=79397#respond Sat, 20 Jan 2024 11:54:55 +0000 https://tejpolicetimes.com/?p=79397 Ramlala Pran Pratishtha Wishes: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त प्रियजनांना शुभेच्छा द्या , प्रभू रामलल्लाचे असे करा स्वागत

आगामी पौष शुक्ल द्वादशी, विक्रम संवत २०८०, सोमवार २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथे रामजन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या बाल स्वरुपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. अनेक वर्षांची प्रतिक्षा संपलेली असून प्रभू राम खऱ्या अर्थाने अयोध्येत विराजमान होत आहेत. देशभरात आनंद आणि उत्साहाच्या लहरी पसरलेल्या असून संपूर्ण देश जणु काही पुन्हा एकदा […]

The post Ramlala Pran Pratishtha Wishes: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त प्रियजनांना शुभेच्छा द्या , प्रभू रामलल्लाचे असे करा स्वागत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Ramlala Pran Pratishtha Wishes: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त प्रियजनांना शुभेच्छा द्या , प्रभू रामलल्लाचे असे करा स्वागत
आगामी पौष शुक्ल द्वादशी, विक्रम संवत २०८०, सोमवार २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथे रामजन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या बाल स्वरुपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. अनेक वर्षांची प्रतिक्षा संपलेली असून प्रभू राम खऱ्या अर्थाने अयोध्येत विराजमान होत आहेत. देशभरात आनंद आणि उत्साहाच्या लहरी पसरलेल्या असून संपूर्ण देश जणु काही पुन्हा एकदा दिवाळी साजरी करत आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आपल्या मित्रमैत्रिणांना, आप्तेष्ठांना खास शुभेच्छा संदेश तुम्ही नक्की पाठवणार असाल. म्हणून आम्ही तुमच्यासाठी प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त खास शुभेच्छा घेऊन आलो आहोत.

छंद नाही रामाचा, तो देह काय कामाचा

राम मंदिर प्राणप्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

“रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्।

नरो न लिप्यते पापै: भुक्तिं मुक्तिं च विंदति

राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदसरथ अजिर बिहारी,

राम सिया राम.. सिया राम..जय जय राम !

दशरथ नंदन राम

दया सागर राम

सत्यधर्म पारायण राम

राम मंदिर प्राणप्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

दुर्जनांचा नाश करणारे

कुशल प्रशासनाचे आदर्श

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम

यांना त्रिवार वंदन

राम मंदिर प्राणप्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

रघुपति राघव राजा राम

पतित पावन सीता राम…

सुंदर विग्रह मेघश्याम

गंगा तुलसी शालिग्राम

भद्रगिरीश्वर सीताराम…

भगत जनप्रिय सीताराम

जानकीरामन सीताराम..

जय जय राघव सीताराम….

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे गाव आहे..

असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे….

राम मंदिर प्राणप्रतिष्ठापूजनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

दशरथ नंदन राम, दया सागर राम,

रघुकुल तिलक राम, सत्यधर्म पारायण राम,

राम मंदिर प्राण-प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

ज्याच्या नावाने जग पावन झाले,

ज्याने भक्तांचे कष्ट दूर केले.

त्या मर्यादा पुरुषोत्तमाला प्रणाम

राम मंदिर प्राण-प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी,

हे नाथ नारायण वासुदेव,

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

त्रेतायुगाचा मानबिंदू,

लोकादर्श आदर्श सिंधू,

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

श्री राम राम रामेति । रमे रामे मनोरमे

श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…!

राम नाम जपत राहा चांगले काम करत राहा,

श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…!

मुकुट शिरावर, कटी पीतांबर

वीर वेष तो श्याम मनोहर

सवे जानकी सेवातत्पर मेघःशामा हे श्रीरामा

श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…!

अखंड हिंदुस्थानातील तमाम हिंदुना प्रभु श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा, जय श्रीराम !

Source link

The post Ramlala Pran Pratishtha Wishes: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त प्रियजनांना शुभेच्छा द्या , प्रभू रामलल्लाचे असे करा स्वागत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=79397 0
Ram Mandir Pran Pratishtha Time 2024: अयोध्येत मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी ८४ सेकंदाची वेळ सर्वात खास, जाणून घ्या शुभ मुहूर्ताची वेळ https://tejpolicetimes.com/?p=79380 https://tejpolicetimes.com/?p=79380#respond Sat, 20 Jan 2024 10:24:22 +0000 https://tejpolicetimes.com/?p=79380 Ram Mandir Pran Pratishtha Time 2024: अयोध्येत मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी ८४ सेकंदाची वेळ सर्वात खास, जाणून घ्या शुभ मुहूर्ताची वेळ

अनिता किंदळेकर यांच्याविषयी अनिता किंदळेकर कन्सल्टंट अनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध […]

The post Ram Mandir Pran Pratishtha Time 2024: अयोध्येत मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी ८४ सेकंदाची वेळ सर्वात खास, जाणून घ्या शुभ मुहूर्ताची वेळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Ram Mandir Pran Pratishtha Time 2024: अयोध्येत मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी ८४ सेकंदाची वेळ सर्वात खास, जाणून घ्या शुभ मुहूर्ताची वेळ

अनिता किंदळेकर यांच्याविषयी

अनिता किंदळेकर कन्सल्टंट

अनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.Read More

Source link

The post Ram Mandir Pran Pratishtha Time 2024: अयोध्येत मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी ८४ सेकंदाची वेळ सर्वात खास, जाणून घ्या शुभ मुहूर्ताची वेळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=79380 0
पुण्यात २२ जानेवारीला मटण, चिकन विक्री बंद; खाटीक मटण व्यावसायिक महासंघाचा निर्णय https://tejpolicetimes.com/?p=79264 https://tejpolicetimes.com/?p=79264#respond Fri, 19 Jan 2024 14:10:26 +0000 https://tejpolicetimes.com/?p=79264 पुण्यात २२ जानेवारीला मटण, चिकन विक्री बंद; खाटीक मटण व्यावसायिक महासंघाचा निर्णय

पुणे: पुण्यात २२ जानेवारीला प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र हिंदूखाटीक मटण व्यावसायिक सर्व व्यवहार बंद करून ,प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मिठाई वाटप करुन या उत्सवात सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र हिंदूखाटीक मटण व्यवसाईक महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी जाहीर केले आहे . २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम त्यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळयाचा आनंद आणि […]

The post पुण्यात २२ जानेवारीला मटण, चिकन विक्री बंद; खाटीक मटण व्यावसायिक महासंघाचा निर्णय first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पुण्यात २२ जानेवारीला मटण, चिकन विक्री बंद; खाटीक मटण व्यावसायिक महासंघाचा निर्णय

पुणे: पुण्यात २२ जानेवारीला प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र हिंदूखाटीक मटण व्यावसायिक सर्व व्यवहार बंद करून ,प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मिठाई वाटप करुन या उत्सवात सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र हिंदूखाटीक मटण व्यवसाईक महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी जाहीर केले आहे . २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम त्यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळयाचा आनंद आणि उत्साह देशभर साजरा केला जात आहे. आपले सर्व मटण विक्री व्यवहार बंद करून या पवित्र कार्यक्रमात आनंद व उत्साहाने सहभागी होत असल्याची माहिती महाराष्ट्र हिंदूखाटीक मटण व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी दिली.

महाराष्ट्रात २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्रीराममललांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून, यादिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ४ जानेवारी २०२४ रोजी केली होती. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मागणीला यश आले असून, महाराष्ट्र सरकारद्वारे २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

बळे आगळा राम कोदंडधारी! अयोध्येच्या मंदिरातील रामलल्लाचं मोहक रुप पाहिलंत का?

श्रीराम हे अवघ्या भारत देशाचे आराध्य आहेत. अयोध्या येथील मंदिर, हे केवळ मंदिर नसून राष्ट्र मंदिर आहे. त्यामुळे २२ जानेवारी रोजी अयोध्या नगरीत रामललांची प्राणप्रतिष्ठापना होताना महाराष्ट्रात जाहीर सुट्टी असावी, ही सकल हिंदू समाजाची मागणी मान्य केल्याबबदल मंत्री लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

जमिनीवर निद्रा, केवळ नारळ पाण्याचे सेवन, रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी मोदींचे कठोर आचरण

दिवाळी साजरी करण्याचं एक कारण म्हणजे प्रभू श्रीराम रावणाचा वध करून पुन्हा अयोध्येस परतले होते. आज ५०० वर्षानंतर प्रभू श्रीराम पुन्हा अयोध्येत परतणार हा क्षण म्हणजेच दिवाळी आणि आपल्या राजाच्या स्वागतासाठी हि दिवाळी जल्लोषातच साजरी झाली पाहिजे. त्यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात सुट्टी जाहीर करण्याचे आवाहन करताना मंत्री लोढा म्हणाले होते.

Source link

The post पुण्यात २२ जानेवारीला मटण, चिकन विक्री बंद; खाटीक मटण व्यावसायिक महासंघाचा निर्णय first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=79264 0
अयोध्येत श्रीरामाला तुमची नावे कळविणार, खासदार विखेंची मिश्किल दमबाजी; जाहीर केली वेगळी स्पर्धाही https://tejpolicetimes.com/?p=77794 https://tejpolicetimes.com/?p=77794#respond Thu, 11 Jan 2024 15:39:49 +0000 https://tejpolicetimes.com/?p=77794 अयोध्येत श्रीरामाला तुमची नावे कळविणार, खासदार विखेंची मिश्किल दमबाजी; जाहीर केली वेगळी स्पर्धाही

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांना स्वखर्चाने दाळ व साखर वाटप केले आहे. यापासून २२ जानेवारीला लाडू तयार करावेत आणि अयोध्येत श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेनंतर आपल्या गावातील मंदिरात नैवद्य दाखवावा, असे आवाहन विखे पाटील यांनी केले आहे.आवाहन करून झाल्यानंतर विखे पाटील यांनी आता मिश्किलपणे नागरिकांना दमही भरला […]

The post अयोध्येत श्रीरामाला तुमची नावे कळविणार, खासदार विखेंची मिश्किल दमबाजी; जाहीर केली वेगळी स्पर्धाही first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
अयोध्येत श्रीरामाला तुमची नावे कळविणार, खासदार विखेंची मिश्किल दमबाजी; जाहीर केली वेगळी स्पर्धाही

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांना स्वखर्चाने दाळ व साखर वाटप केले आहे. यापासून २२ जानेवारीला लाडू तयार करावेत आणि अयोध्येत श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेनंतर आपल्या गावातील मंदिरात नैवद्य दाखवावा, असे आवाहन विखे पाटील यांनी केले आहे.

आवाहन करून झाल्यानंतर विखे पाटील यांनी आता मिश्किलपणे नागरिकांना दमही भरला आहे. या दाळीपासून लाडू केली की नाही, याची आमची यंत्रणा खात्री करणार आहे. जे नागरिक लाडू तयार करणार नाहीत, त्यांची यादी करून मी अयोध्येत श्रीराममाच्या चरणी ठेवून विनंती करणार की देवा आता तुम्हीच काय ते पहा. विखे पाटील यांच्या या मिश्किल टिपणीवर उपस्थितांमध्ये हशा पिकला. तर त्याच वेळी विखे पाटील यांनी स्पर्धाही जाहीर केली आहे. २२ जानेवारीला श्रीरामाच्या स्वागतासाठी उत्कृष्ट उपक्रम करणाऱ्या प्रत्येक वॉर्डातील एका विजेत्या नागरिकाना सहकुटुंब विमानाने अयोध्या दर्शन घडवून आणण्यात येणार आहे.

खासदार डॉ. विखे पाटील परिवाराकडून नगर जिल्ह्यात मोफत साखर आणि दाळ वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. नगर शहरातील एका प्रभागात हा कार्यक्रम होता. त्यावेळी विखे पाटील यांनी नगर शहरातील नागरिकांसाठी एक बक्षीस योजना जाहीर केली. ‘मेरे घर आए राम’ असे नाव स्पर्धेला देण्यात आले आहे. २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम मूर्तीची अयोध्येत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यानिमित्ताने ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्यांनी आपल्या घरात, प्रभागात आणि परिसरात प्रभू श्रीरामच्या स्वागतासाठी काय उपक्रम केला आहे, याची माहिती छायाचित्र किंवा व्हिडिओ काढून पाठवायची आहे. यासाठी व्हाॅट्सअप क्रमांक देण्यात येईल. यातून प्रत्येक प्रभागातून तीन क्रमांक काढले जातील. स्पर्धा जिंकणाऱ्यांच्या घरातील प्रत्येकी दोन सदस्यांना विखे कुटुंब स्वखर्चाने विमानाने अयोध्येला जाऊन श्रीरामाचे दर्शन घडविणार आहे.

स्पर्धेची घोषणा करतानाचा विखे पाटील यांनी वाटप केलेल्या दाळ आणि साखरेपासून लाडू तयार करण्याचा अग्रही लावून धरणा. त्यासाठी आपल्या खास शैलीत मिश्लिकलपणे दमही भरला. ते म्हणाले, आम्ही वाटलेल्या दाळ-साखरपासून लाडू तयार केले की नाही, हे तापसण्यासाठी आमची यंत्रणा येईल. सर्वांना माहितीच आहे की, देशात आणि नगर जिल्ह्यात विखे यंत्रणा कशी आहे ते. जो कोणी लाडूचा प्रसाद बनवणार नाही, त्याची यादी तयार केली जाईल. मी ती अयोध्याला घेऊन जाणार आहे. तेथे ती प्रभू श्रीरामाच्या चरणी ठेवणार आणि सांगणार की हे प्रभू श्रीरामा यांनी साखर अन् दाळ घेऊन देखील प्रसादाचा लाडू बनवला नाही, यांचा बंदोबस्त काय करायचा तो तूच कर, असे सांगणार आहे, विखे पाटील यांच्या या मिश्किल दमबाजीवर एकच हशा पिकला.

यावेळी भाजपचे शहर जिल्हा उपाध्यक्ष धनंजय जाधव, माजी उपमहापौर मालन ढोणे, ज्ञानेश्वर काळे उपस्थित होते.

Source link

The post अयोध्येत श्रीरामाला तुमची नावे कळविणार, खासदार विखेंची मिश्किल दमबाजी; जाहीर केली वेगळी स्पर्धाही first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=77794 0
मुंबईत ७५ ठिकाणी ‘श्रीराम फेऱ्या’, अयोध्येतील सोहळ्यासाठी व्यापाऱ्यांकडून आयोजन https://tejpolicetimes.com/?p=75607 https://tejpolicetimes.com/?p=75607#respond Wed, 03 Jan 2024 08:35:04 +0000 https://tejpolicetimes.com/?p=75607 मुंबईत ७५ ठिकाणी ‘श्रीराम फेऱ्या’, अयोध्येतील सोहळ्यासाठी व्यापाऱ्यांकडून आयोजन

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: अयोध्येत येत्या २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुंबईमध्ये ७५ ठिकाणी श्रीराम फेऱ्यांचे आयोजन व्यापारी वर्गाने केले आहे. देशभरातील व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) यासाठी पुढाकार घेतला आहे.अयोध्येत २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत […]

The post मुंबईत ७५ ठिकाणी ‘श्रीराम फेऱ्या’, अयोध्येतील सोहळ्यासाठी व्यापाऱ्यांकडून आयोजन first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मुंबईत ७५ ठिकाणी ‘श्रीराम फेऱ्या’, अयोध्येतील सोहळ्यासाठी व्यापाऱ्यांकडून आयोजन

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: अयोध्येत येत्या २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुंबईमध्ये ७५ ठिकाणी श्रीराम फेऱ्यांचे आयोजन व्यापारी वर्गाने केले आहे. देशभरातील व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) यासाठी पुढाकार घेतला आहे.

अयोध्येत २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने देशभर रामभक्तांकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामध्ये व्यापाऱ्यांनीही सहभाग घेतला आहे. याअंतर्गत त्यांनी देशभर राम फेऱ्यांचे आयोजन केले आहे. याबाबत ‘कॅट’चे महाराष्ट्र सरचिटणीस शंकर ठक्कर यांनी सांगितले की, ‘महामुंबई क्षेत्रातील बाजारपेठांमध्ये ७५ ठिकाणी अशा प्रकारे राम फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मुंबईभरातील साडेतीन ते चार लाख व्यापारी सहभागी होतील. प्रभू श्रीरामांबद्दलची भजने, गाणी यांच्या गायनासह श्रीरामांच्या तसबिरीची यात्रा, प्रवचने यांचा त्यात समावेश असेल.’

याखेरीज ‘कॅट’ने यानिमित्ताने ‘दुकान दुकान अयोध्या’ हे अभियानदेखील सुरू केले आहे. त्यामध्ये प्रत्येक दुकानात रामभक्तीमय वातावरण निर्माण केले जाणार आहे. श्रीराम झेंडा, पटका, स्टीकर, पोस्टर व राम मंदिराचे छायाचित्र दुकानांना भेट दिले जाईल. ते त्यांनी दर्शनी भागात लावावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हे अभियान ‘कॅट’कडून मुंबईसह देशभरातील विविध बाजारपेठेत २२ जानेवारीपर्यंत चालविले जाणार आहे.

‘रामराज्य दिन’ घोषित

‘कॅट’ने २२ जानेवारी हा दिवस रामराज्य दिन म्हणून घोषित केला आहे. देशभरातील २० हजारांहून अधिक व्यापारी संघटनांचे ५ कोटी व्यापारी ‘कॅट’शी संलग्न आहेत. हे सर्व व्यापारी त्या दिवशी हा दिवस साजरा करतील, असे ठक्कर यांनी सांगितले.

अयोध्येतील मंदिरात रामलल्लाच्या पाच मूर्तींपैकी कुठल्या मूर्तीची स्थापना करणार

Source link

The post मुंबईत ७५ ठिकाणी ‘श्रीराम फेऱ्या’, अयोध्येतील सोहळ्यासाठी व्यापाऱ्यांकडून आयोजन first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=75607 0
मुंबईत ७५ ठिकाणी ‘श्रीराम फेऱ्या’, अयोध्येतील सोहळ्यासाठी व्यापाऱ्यांकडून आयोजन https://tejpolicetimes.com/?p=75526 https://tejpolicetimes.com/?p=75526#respond Wed, 03 Jan 2024 02:52:25 +0000 https://tejpolicetimes.com/?p=75526 मुंबईत ७५ ठिकाणी ‘श्रीराम फेऱ्या’, अयोध्येतील सोहळ्यासाठी व्यापाऱ्यांकडून आयोजन

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: अयोध्येत येत्या २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुंबईमध्ये ७५ ठिकाणी श्रीराम फेऱ्यांचे आयोजन व्यापारी वर्गाने केले आहे. देशभरातील व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) यासाठी पुढाकार घेतला आहे.अयोध्येत २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत […]

The post मुंबईत ७५ ठिकाणी ‘श्रीराम फेऱ्या’, अयोध्येतील सोहळ्यासाठी व्यापाऱ्यांकडून आयोजन first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मुंबईत ७५ ठिकाणी ‘श्रीराम फेऱ्या’, अयोध्येतील सोहळ्यासाठी व्यापाऱ्यांकडून आयोजन

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: अयोध्येत येत्या २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुंबईमध्ये ७५ ठिकाणी श्रीराम फेऱ्यांचे आयोजन व्यापारी वर्गाने केले आहे. देशभरातील व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) यासाठी पुढाकार घेतला आहे.

अयोध्येत २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने देशभर रामभक्तांकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामध्ये व्यापाऱ्यांनीही सहभाग घेतला आहे. याअंतर्गत त्यांनी देशभर राम फेऱ्यांचे आयोजन केले आहे. याबाबत ‘कॅट’चे महाराष्ट्र सरचिटणीस शंकर ठक्कर यांनी सांगितले की, ‘महामुंबई क्षेत्रातील बाजारपेठांमध्ये ७५ ठिकाणी अशा प्रकारे राम फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मुंबईभरातील साडेतीन ते चार लाख व्यापारी सहभागी होतील. प्रभू श्रीरामांबद्दलची भजने, गाणी यांच्या गायनासह श्रीरामांच्या तसबिरीची यात्रा, प्रवचने यांचा त्यात समावेश असेल.’

याखेरीज ‘कॅट’ने यानिमित्ताने ‘दुकान दुकान अयोध्या’ हे अभियानदेखील सुरू केले आहे. त्यामध्ये प्रत्येक दुकानात रामभक्तीमय वातावरण निर्माण केले जाणार आहे. श्रीराम झेंडा, पटका, स्टीकर, पोस्टर व राम मंदिराचे छायाचित्र दुकानांना भेट दिले जाईल. ते त्यांनी दर्शनी भागात लावावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हे अभियान ‘कॅट’कडून मुंबईसह देशभरातील विविध बाजारपेठेत २२ जानेवारीपर्यंत चालविले जाणार आहे.

‘रामराज्य दिन’ घोषित

‘कॅट’ने २२ जानेवारी हा दिवस रामराज्य दिन म्हणून घोषित केला आहे. देशभरातील २० हजारांहून अधिक व्यापारी संघटनांचे ५ कोटी व्यापारी ‘कॅट’शी संलग्न आहेत. हे सर्व व्यापारी त्या दिवशी हा दिवस साजरा करतील, असे ठक्कर यांनी सांगितले.

अयोध्येतील मंदिरात रामलल्लाच्या पाच मूर्तींपैकी कुठल्या मूर्तीची स्थापना करणार
Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

The post मुंबईत ७५ ठिकाणी ‘श्रीराम फेऱ्या’, अयोध्येतील सोहळ्यासाठी व्यापाऱ्यांकडून आयोजन first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=75526 0