Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
Beed police - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Sat, 16 Nov 2024 14:15:54 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg Beed police - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 तरुणाची निर्घृण हत्या, चेहऱ्यावरुन ओळख पटेना तरी पोलिसांनी ४८ तासात असा लावला छडा https://tejpolicetimes.com/?p=108952 https://tejpolicetimes.com/?p=108952#respond Sat, 16 Nov 2024 14:15:54 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108952 तरुणाची निर्घृण हत्या, चेहऱ्यावरुन ओळख पटेना तरी पोलिसांनी ४८ तासात असा लावला छडा

Beed Murder News : बीड शहर पोलिसांची यशस्वी कामगिरी करत हत्येचा ४८ तासात छडा लावला आहे. मुख्य आरोपी पुण्यावरून अटक करण्यात आला असून सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम दीपक जाधव, बीड : दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री मोंढा रोडने नदीच्या कडेला तांदळवाडी हवेली येथील तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला मृत तरुणाची […]

The post तरुणाची निर्घृण हत्या, चेहऱ्यावरुन ओळख पटेना तरी पोलिसांनी ४८ तासात असा लावला छडा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
तरुणाची निर्घृण हत्या, चेहऱ्यावरुन ओळख पटेना तरी पोलिसांनी ४८ तासात असा लावला छडा

Beed Murder News : बीड शहर पोलिसांची यशस्वी कामगिरी करत हत्येचा ४८ तासात छडा लावला आहे. मुख्य आरोपी पुण्यावरून अटक करण्यात आला असून सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दीपक जाधव, बीड : दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री मोंढा रोडने नदीच्या कडेला तांदळवाडी हवेली येथील तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला मृत तरुणाची ओळख सुद्धा पटत नव्हती, परंतु बीड शहर पोलिसांनी अतिशय बारकाईने तपास करून मृताची ओळख तर पटवली. इतकंच नाही तर पोलिसांनी या हत्येतील सर्व चारही मारेकऱ्यांना ४८ तासाच्या आत अटक केली आहे. यातील मुख्य दोन आरोपी हे हत्येनंतर पुणे येथे फरार झाले होते. माहितीच्या आधारे इतर दोन आरोपींना पुणे येथून अटक करण्यास बीड शहर पोलिसांना यश आले आहे.
Jhansi Hospital Fire : भीषण आगीतून ५ बाळांना वाचवलं, पण माझं बाळ अजून मिळालं नाही… हतबल वडिलांनी सांगितली सुन्न करणारी घटना
आता आरोपींना अटक झाल्यानंतर हत्या कशी आणि का करण्यात आली याची संपूर्ण माहिती समोर आली आहे. ज्या ठिकाणी हत्या झाली ते ठिकाण निर्जन ठिकाण आहे. त्या ठिकाणी यातील महिला आरोपी अनिता नरसिंह आदमाने (रा. माळीवेस बीड) तिने तात्पुरते राहण्याची निवास व्यवस्था केली आहे. त्या महिलेकडे सैयद मजहर याचे जाणे येणे असायचे. परंतु तिच्याकडे इतर कोणी आलेले त्याला आवडायचे नाही. पुणे इथून अटक केलेले आरोपी रामू बंडू चित्रे (रा. यादवाचा मळा माळीवेस) आणि गणेश वसंत माने (रा. माळीवेस चौक) हे दोघे यांचे तेथे येणे जाणे वाढले होते.
सॉफ्टवेअर इंजिनिअरने एकाच कुटुंबातील ५ जणांना संपवलं, पोलीस तपासात हत्याकांडबाबत धक्कादायक माहिती उघड
घटनेच्या दिवशी रामू आणि गणेश हे दोघेजण तेथे दारू पीत बसले होते. खरं तर एका गुन्ह्यामुळे रामूच्या मागावर पेठ बीडची पोलीस होती, म्हणून तो तिथे लपण्यासाठी आला होता. परंतु यातील मृत सय्यद मजहर हा रात्री बारा वाजताच्या सुमारास तेथे येऊन रामू आणि गणेशला काठीने मारहाण करू लागला. त्यामुळे तिथून ते निघून जाऊ लागले. ते नदीच्या कडेने जात असता सय्यदने परत पाठीमागून रामूला आणि गणेशला दगड मारायला सुरुवात केली. तो ऐकत नाही हे पाहून रामू आणि गणेश यांनी दोघांनी त्याला दगडाने ठेचून आणि काठीचे घाव डोक्यात घालून जागीच ठार केले.

Crime News : तरुणाची निर्घृण हत्या, चेहऱ्यावरुन ओळख पटेना तरी पोलिसांनी ४८ तासात असा लावला छडा

दुसऱ्या दिवशी सकाळी यातील सर्व आरोपी चार ठिकाणी जाऊन बसले. आपल्याला काहीच माहिती नाही असा बनाव त्यांनी केला. परंतु पोलिसांनी सर्व प्रकरणाची माहिती समोर आणली आणि आरोपींना ४८ तासाच्या आत अटक केली. पुणे येथून रामू आणि बंडू याला अटक करण्यासाठी डीबी पथकाने मेहनत केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, बाबा राठोड, उमेश निकम, रियाज शेख, पोलीस अंमलदार सुशेन पवार, विकी सुरवसे, आयटीसीएल पोलीस नाईक जयसिंग वायकर, अश्फाक सय्यद आणि मनोज परजने यांनी केली आहे.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

The post तरुणाची निर्घृण हत्या, चेहऱ्यावरुन ओळख पटेना तरी पोलिसांनी ४८ तासात असा लावला छडा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108952 0
क्लासवरुन घरी येताना रस्त्यात अडवलं, अल्पवयीन मुलीवर नराधमाने केला अत्याचार; बीड हादरलं https://tejpolicetimes.com/?p=104502 https://tejpolicetimes.com/?p=104502#respond Fri, 06 Sep 2024 03:38:19 +0000 https://tejpolicetimes.com/?p=104502 क्लासवरुन घरी येताना रस्त्यात अडवलं, अल्पवयीन मुलीवर नराधमाने केला अत्याचार; बीड हादरलं

Beed Minor Girl Assault: पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीतील मोमीनपुरा भागात एका धार्मिक शिक्षण संस्थेत शिक्षण घेण्यासाठी ही ११ वर्षीय विद्यार्थिनी जात होती. हायलाइट्स: ११ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार नराधमाला पोलिसांनी केली अटक बीडमध्ये धक्कादायक घटना Lipiक्लासवरुन येताना अल्पवयीन मुलीवर अत्याचार दिपक जाधव, बीड : बीड पोलीस ठाणे हद्दीत काही दिवसापूर्वी भोळसर अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची […]

The post क्लासवरुन घरी येताना रस्त्यात अडवलं, अल्पवयीन मुलीवर नराधमाने केला अत्याचार; बीड हादरलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
क्लासवरुन घरी येताना रस्त्यात अडवलं, अल्पवयीन मुलीवर नराधमाने केला अत्याचार; बीड हादरलं

Beed Minor Girl Assault: पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीतील मोमीनपुरा भागात एका धार्मिक शिक्षण संस्थेत शिक्षण घेण्यासाठी ही ११ वर्षीय विद्यार्थिनी जात होती.

हायलाइट्स:

  • ११ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार
  • नराधमाला पोलिसांनी केली अटक
  • बीडमध्ये धक्कादायक घटना
Lipi
क्लासवरुन येताना अल्पवयीन मुलीवर अत्याचार
दिपक जाधव, बीड : बीड पोलीस ठाणे हद्दीत काही दिवसापूर्वी भोळसर अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा एका ११ वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना समोर आल्याने पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. क्लासवरुन घरी येणाऱ्या एका ११ वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षण देणाऱ्या एका नराधमाने सतत तीन महिने बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अखेर मुलीने हा प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी तात्काळ पेठ बीड पोलीस ठाणे गाठले. अत्याचार करणाऱ्या त्या नराधमाला पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले असून या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सदरील व्यक्ती हा एका उर्दू शाळेवर शिक्षक असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीतील मोमीनपुरा भागात एका धार्मिक शिक्षण संस्थेत शिक्षण घेण्यासाठी ही ११ वर्षीय विद्यार्थिनी जात होती. त्याठिकाणी या सदरील विद्यार्थिनीवर सतत तीन महिने अत्याचार केला. तीन महिन्यापासून विद्यार्थिनीने कोणालाही काही याबाबत सांगितले नाही. अखेर या अत्याचाराला कंटाळून अखेर त्या मुलीने आपल्या आई वडिलांना याबाबत सांगितल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तात्काळ पेठ बीड पोलीस ठाणे गाठून याबाबत पोलिसांना माहिती दिली. पेठ बीड पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पेठ बीड पोलीस ठाण्यात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. ही घटना निंदनीय असून समाजाला काळीमा फासणारी आहे.
Ajit Pawar on CM Face : पुढचा मुख्यमंत्री कुणाचा हे ठरलंय, अजितदादा स्पष्टच बोलले, चेहरा ठरवणं ही आमची…

माजी आमदाराच्या गाडीवर बीडमध्ये दगडफेक

दरम्यान, काही दिवसांपूर्वी केज विधानसभेच्या माजी आमदार प्रा. संगीताताई ठोंबरे या केज तालुक्यातील दहिफळ वड माऊली येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दहिफळ वडगाव येथे आल्या होत्या. अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून सायंकाळी ६:०० वाजता त्या ऋषी गदळे यांच्याकडे घरी चहापाण्यासाठी जात असताना विजय उत्तमराव गदळे यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात गाडीचा ड्रायव्हरच्या बाजूचा काच फुटून तो दगड गाडीचा चालक किशोर बबन मोरे याला लागला. त्या नंतर तोच दगड गाडीमध्ये बसलेल्या माजी आमदार संगीता ताई ठोंबरे यांना लागून त्याही जखमी झाल्या. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचार करण्यात आला.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

The post क्लासवरुन घरी येताना रस्त्यात अडवलं, अल्पवयीन मुलीवर नराधमाने केला अत्याचार; बीड हादरलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=104502 0
प्रसुतीसाठी दवाखान्यात, पण त्याआधीच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गायब, बीडमधला प्रकार https://tejpolicetimes.com/?p=60480 https://tejpolicetimes.com/?p=60480#respond Sun, 12 Feb 2023 12:39:00 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4/ प्रसुतीसाठी दवाखान्यात, पण त्याआधीच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गायब, बीडमधला प्रकार

बीड : लग्न होत नसल्याने लग्नाळू तरुण मोर्चे काढत आहेत. बेरोजगारी, गरिबी, शिक्षण, मुलींच्या वाढत्या अपेक्षा, मुलींचा घटता जन्मदर अशा कारणामुळे तरुणांची लग्न जमत नाहीयेत. अशा सगळ्या गंभीर वातावरणात बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाळू तरुणांची बनावट लग्न लावून फसवणूक करणाऱ्या टोळीची मास्टरमाईंड पूजा कचरू निलपत्रेवार पोलिसांना चकवा देऊन रुग्णालयातून गायब झाली […]

The post प्रसुतीसाठी दवाखान्यात, पण त्याआधीच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गायब, बीडमधला प्रकार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
प्रसुतीसाठी दवाखान्यात, पण त्याआधीच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गायब, बीडमधला प्रकार

बीड : लग्न होत नसल्याने लग्नाळू तरुण मोर्चे काढत आहेत. बेरोजगारी, गरिबी, शिक्षण, मुलींच्या वाढत्या अपेक्षा, मुलींचा घटता जन्मदर अशा कारणामुळे तरुणांची लग्न जमत नाहीयेत. अशा सगळ्या गंभीर वातावरणात बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाळू तरुणांची बनावट लग्न लावून फसवणूक करणाऱ्या टोळीची मास्टरमाईंड पूजा कचरू निलपत्रेवार पोलिसांना चकवा देऊन रुग्णालयातून गायब झाली आहे. प्रसुतीसाठी तिला बीड जिल्हा रुग्णालयात आणली होती. मात्र, त्याआधीच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महिला अंमलदाराला चकवा देऊन आरोपी पूजा पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी बीडमध्ये मोठ्या हौसेने आणलेली नवरी करवलीसह पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना नवरदेवाने पकडून शहर पोलिसांच्या स्वाधीन केली होती. बनावट लग्न करुन पळून जाणारी टोळी यानिमित्ताने समोर आली होती. पोलिसांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतलं होतं. यानिमित्ताने बनावट लग्न करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला होता. तब्बल ११ आरोपींचा यात सहभाग होता. या केसमध्ये सध्या रुग्णालयातून पळून गेलेली पूजा हीच मुख्य आरोपी आहे.

याच केसमध्ये पूजा पोलिसांच्या ताब्यात होती. परंतु ९ महिन्यांची गर्भवती असल्याने तिला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेली २ दिवस पोलिसांच्या तावडीतून निसटण्याचा प्लॅन तिच्या डोक्यात सुरु होता. जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्याचा डोळा चुकवून तिने तेथून पळ काढला.

पूजा बीड जिल्हा रुग्णालयातून कशी पळाली?

पोलिसांच्या ताब्यात असलेली पूजा गर्भवती असल्याने तिला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लघुशंकेला जाण्याचा बहाणा करून ती वॉशरुमकडे गेली. पोलिसांचं लक्ष चुकवून तिने तिथूनच पोबारा केला. अर्धा तास झालं तरी पूजा आली नसल्याने महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी वॉशरुमकडे धाव घेतली. नंतर पूजाने पलायन केल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

पोलिसांच्या हातावर तुरी देणारी पूजा लग्नाळू तरुणांच्या फसवणुकीचे गुन्हे करणारी सराईत आरोपी आहे. बीड शहर, नेकनूर, बैठाणा ठाण्यातील विविध गुन्ह्यात तिला पोलिसांनी बेड्याही ठोकल्या होत्या. औरंगाबादच्या पैठण पोलीस स्टेशनमध्ये तिच्यासह तिचा पती कचरूलाल तुळशीराम निलपत्रेवार याच्यावर गुन्हा नोंद आहे.

Source link

The post प्रसुतीसाठी दवाखान्यात, पण त्याआधीच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गायब, बीडमधला प्रकार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=60480 0
बायको हरवल्याची तक्रार घेऊन गेला अन् अडकला; पोलिसांनी पतीलाच ठोकल्या बेड्या https://tejpolicetimes.com/?p=58759 https://tejpolicetimes.com/?p=58759#respond Tue, 31 Jan 2023 05:00:17 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8b-%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%98/ बायको हरवल्याची तक्रार घेऊन गेला अन् अडकला; पोलिसांनी पतीलाच ठोकल्या बेड्या

बीड: आतापर्यंत आपण एखाद्या व्यक्तीने आपल्या कुटुंबातील व्यक्ती हरवल्याची तक्रार दिली तर त्यांना ती व्यक्तींचा तपास पोलिस करत असल्याचं आपण पाहतो. मात्र एका व्यक्तीला आपली बायको हरवल्याची तक्रार देणं चांगलचं महागात पडलंय. तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पतीला आणि सासरच्यानाच तपासाअंती हातात बेड्या पडल्या आहेत. बीडच्या धारूर पोलीस ठाण्यात शहरातील कृष्णा शेटे वय ३४ वर्ष या विवाहित […]

The post बायको हरवल्याची तक्रार घेऊन गेला अन् अडकला; पोलिसांनी पतीलाच ठोकल्या बेड्या first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
बायको हरवल्याची तक्रार घेऊन गेला अन् अडकला; पोलिसांनी पतीलाच ठोकल्या बेड्या

बीड: आतापर्यंत आपण एखाद्या व्यक्तीने आपल्या कुटुंबातील व्यक्ती हरवल्याची तक्रार दिली तर त्यांना ती व्यक्तींचा तपास पोलिस करत असल्याचं आपण पाहतो. मात्र एका व्यक्तीला आपली बायको हरवल्याची तक्रार देणं चांगलचं महागात पडलंय. तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पतीला आणि सासरच्यानाच तपासाअंती हातात बेड्या पडल्या आहेत.

बीडच्या धारूर पोलीस ठाण्यात शहरातील कृष्णा शेटे वय ३४ वर्ष या विवाहित तरुणाने तक्रार दिली, की माझी १९ वर्षीय पत्नी हरवली आहे. तीचा आम्ही शोध घेतला, मात्र आम्हाला ती सापडली नाही. त्यामुळं तिचा तपास करावा, अशी फिर्याद पती असणाऱ्या कृष्णाने दिली होती.
त्यानंतर धारूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, विजय आटोळे यांनी तपासाला गती देत शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान ती अहमदनगर जिल्ह्यातील निर्मळ पिंपरी येथे परळीच्या रोहित लांबूटे या तरुणासोबत सापडली.

त्यानंतर पोलिसांनी विवाहितेसह तिच्यासोबत असणाऱ्या रोहित लांबूटेला धारूर पोलिस ठाण्यात आणल्यानंतर चौकशी केली असता ती स्वतःहून रोहित लांबूटे याच्यासोबत गेल्याचं तिने सांगितलं. मात्र, या दरम्यान पोलिसांना संबंधित विवाहितेचे वय कमी असल्याचा संशय आल्याने, तिच्या आधार कार्डची तपासणी करण्यात आली. यावेळी त्या आधार कार्डवर तिची जन्मतारीख २४ एप्रिल २००८ असून ती अल्पवयीन असल्याचं समोर आलं. तर याविषयी पोलिसांनी विवाहितेच्या शाळेत जाऊन चौकशी केली, असता ती केवळ १४ वर्ष ९ महिन्याची असल्याचं समोर आलंय.

वाचाः आता औरंगाबाद ते पुणे गाठता येणार अवघ्या दोन तासांत; गडकरींनी सांगितला फ्यूचर प्लान

दरम्यान, ही माहिती समोर येतात धारूर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचारी, दीक्षा चक्रे यांच्या फिर्यादीवरून, बीडच्या युसुफ वडगाव पोलीस ठाण्यामध्ये, ३४ वर्षीय पती कृष्णा शेटे याच्यासह, बालविवाह लावून देणारे अल्पवयीन विवाहितेच्या मामा-मामी, आई-वडील, भाऊ तर पती असणाऱ्या कृष्णा शेटे याच्या आईसह नातेवाईकांवर, बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बायको हरवल्याची तक्रार द्यायला गेला आणि बालविवाहाच्या गुन्ह्यात अडकला असा प्रकार कृष्णा शेटे यांच्या बाबतीत घडला आहे. कृष्णा शेटे याने बायको हरवल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र माहिती असूनही अल्पवयीन मुलीसोबत विवाह केल्याचे त्याने लपवून ठेवले. यामुळे तक्रार द्यायला गेले आणि आरोपी बनले, अशी गत कृष्णा शेटे यांची झाली आहे. तर विवाहितेसोबत सापडलेल्या रोहित लांबूटे याच्या विरोधात तक्रार नसल्याने तो सुटला आहे. दरम्यान या सर्व आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी चाइल्डलाईनचे सदस्य तत्वशील कांबळे यांनी केलीय.

वाचाः पठ्ठ्यानं करुन दाखवलं! शेतकरी कुटुंबातील मुलगा झाला RTO इन्स्पेक्टर

बायको हरवल्याची तक्रार देणं पती असणाऱ्या कृष्णा शेटेला चांगलंच महागात पडलंय. अल्पवयात मुलीचे हात पिवळे करणाऱ्या १० व्यक्तींच्या हातात पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यामुळे या बालविवाहाची अनोखी चर्चा बीड जिल्ह्यात सुरू आहे.

Source link

The post बायको हरवल्याची तक्रार घेऊन गेला अन् अडकला; पोलिसांनी पतीलाच ठोकल्या बेड्या first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=58759 0
‘इस्लाम से गुस्ताखी की एक ही सजा, सर तन से जुदा’; भिंतीवर धमकीचं पत्र, बीडमध्ये खळबळ https://tejpolicetimes.com/?p=55130 https://tejpolicetimes.com/?p=55130#respond Thu, 05 Jan 2023 07:27:00 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%87%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%b8%e0%a5%87-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%96%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%b9/ ‘इस्लाम से गुस्ताखी की एक ही सजा, सर तन से जुदा’; भिंतीवर धमकीचं पत्र, बीडमध्ये खळबळ

बीड : बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील सिरसाळा गावात एका घरावर कागद चिटकवून त्यावरून धमकी देण्यात आली. ‘इस्लाम से गुस्ताखी की एक ही सजा, सर तन से जुदा, जल्द ही तेरा सर तन से जुदा किया जायेगा’, असा मजकूर लिहिलेलं पत्र घराला चिटकवल्याने परळी तालुक्यात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध […]

The post ‘इस्लाम से गुस्ताखी की एक ही सजा, सर तन से जुदा’; भिंतीवर धमकीचं पत्र, बीडमध्ये खळबळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘इस्लाम से गुस्ताखी की एक ही सजा, सर तन से जुदा’; भिंतीवर धमकीचं पत्र, बीडमध्ये खळबळ

बीड : बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील सिरसाळा गावात एका घरावर कागद चिटकवून त्यावरून धमकी देण्यात आली. ‘इस्लाम से गुस्ताखी की एक ही सजा, सर तन से जुदा, जल्द ही तेरा सर तन से जुदा किया जायेगा’, असा मजकूर लिहिलेलं पत्र घराला चिटकवल्याने परळी तालुक्यात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, सिरसाळा येथे राहणारे तक्रारदार उमेश रंगनाथ पवार यांच्या घरावर धमकीचे हिंदी भाषेतील एक पत्र चिटकवण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही. त्यामुळे त्यांनी पत्रातील धमकीच्या मजकुराचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी सिरसाळा पोलिसांनी घटनेची सविस्तर शहानिशा केली व घटनास्थळी जाऊन निरीक्षण केले. त्यानंतर पोलिसांनी सिरसाळा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सिरसाळा पोलीस ठाण्याचे स.पो.नि. व्ही. एस. जोनवाल हे करत आहेत.

ठाण्यात मेट्रोच्या बांधकामावेळी गर्डरची लोखंडी प्लेट कोसळली; पादचारी महिलेचा चिरडून मृत्यू

असे आहे धमकीचे पत्र

उमेश रंगनाथ पवार यांच्या घरावर चिटकवलेल्या धमकीच्या पत्रात म्हटलं आहे की, ‘आरएसएस के गुंडे तू सिरसालेमे आरएसएस चलता है… तुझे पता नही है क्या इस्लाम से गुस्ताखी की एक ही सजा, सर तन से जुदा, सर तन से जुदा, बहुत जल्दी तेरा सर तन से जुदा किया जायेगा, तू आरएसएस का लीडर है ना रे, तकदीर अल्लाहू अकबर.’

दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास सिरसाळा पोलीस करत आहेत. मात्र अशा प्रकारचे धमकीचे पत्र मिळाल्याने दोन धर्मात तेढ निर्माण होण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

Source link

The post ‘इस्लाम से गुस्ताखी की एक ही सजा, सर तन से जुदा’; भिंतीवर धमकीचं पत्र, बीडमध्ये खळबळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=55130 0
लग्नाच्या रात्री नवरी बाथरूमला गेली, बराच वेळ बाहेर न आल्याने पतीने दरवाजा उघडला तर धक्काच बसला! https://tejpolicetimes.com/?p=52505 https://tejpolicetimes.com/?p=52505#respond Sun, 11 Dec 2022 09:30:23 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%b2%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%be/ लग्नाच्या रात्री नवरी बाथरूमला गेली, बराच वेळ बाहेर न आल्याने पतीने दरवाजा उघडला तर धक्काच बसला!

बीड : मोठ्या हौसेने अडीच लाख देऊन लग्न करून आणलेली नवरी पळून जाण्याच्या तयारीत असताना मैत्रिणीसह पकडल्याचा प्रकार बीड शहरात घडला होता. ही घटना ताजी असतानाच नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही एका तरुणाकडून लग्नासाठी दोन लाख रुपये उकळले आणि त्यानंतर लग्न लावून आणलेली नवरी रात्रीतून अंगावरील एक लाख रुपये किंमतीच्या दागिन्यासह पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस […]

The post लग्नाच्या रात्री नवरी बाथरूमला गेली, बराच वेळ बाहेर न आल्याने पतीने दरवाजा उघडला तर धक्काच बसला! first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
लग्नाच्या रात्री नवरी बाथरूमला गेली, बराच वेळ बाहेर न आल्याने पतीने दरवाजा उघडला तर धक्काच बसला!

बीड : मोठ्या हौसेने अडीच लाख देऊन लग्न करून आणलेली नवरी पळून जाण्याच्या तयारीत असताना मैत्रिणीसह पकडल्याचा प्रकार बीड शहरात घडला होता. ही घटना ताजी असतानाच नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही एका तरुणाकडून लग्नासाठी दोन लाख रुपये उकळले आणि त्यानंतर लग्न लावून आणलेली नवरी रात्रीतून अंगावरील एक लाख रुपये किंमतीच्या दागिन्यासह पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लुटारू नवरीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील २८ वर्षीय राजेश (काल्पनिक नाव) शेती व्यवसाय करतो. राजेशच्या मोठ्या भावाचं लग्न झालं आहे, मात्र उपवर होऊनही राजेशसाठी स्थळ येत नव्हते. त्यामुळे त्याने गावातील मित्रांना वधू शोधण्यास सांगितले. गावातील मित्र असणाऱ्या, लक्ष्मण युवराज ढास याची पत्नी प्रिया हिने १० नोव्हेंबरला राजेशला फोन करून तुझ्यासाठी मुलगी पाहिली असल्याचे सांगून व्हॉटसअॅपवर तिचा बायोडेटा पाठवला. फोटो पाहून राजेशला मुलगी आवडली. बायोडेटामध्ये तिचे नाव शीतल भीमराव धुमाळ (रा. पिंप्रीराजा, जि. औरंगाबाद) असे होते. घरच्यांनीही या लग्नास होकार दिला.

स्कूल बस – एसटी बसची समोरासमोर धडक; भीषण अपघातात २० जण जखमी, चार जण गंभीर

त्यानंतर लक्ष्मण ढास याने लग्नासाठी २ लाख रुपये द्यावे लागतील, अशी अट घातली. राजेशसह कुटुंबीयांनी तेवढी रक्कम देण्याची तयारी दर्शवली. त्यापैकी १० हजार रुपये १९ नोव्हेंबरला लक्ष्मण ढास याने फोन-पेवर घेतले. त्यानंतर २० नोव्हेंबरला माजलगावच्या गंगामसला येथे लग्न निश्चित झाले. घरातील सदस्यांसह मोजक्या मंडळींना घेऊन राजेश गंगामसला येथे पोहोचला. तेथे उर्वरित १ लाख ९० हजार रुपये लक्ष्मण ढास याच्याकडे दिले. त्यानंतर दुपारी राजेश व शीतलकडील मोजक्या वऱ्हाडींच्या उपस्थितीत लग्नसमारंभ पार पडला. राजेशने मुलीला १ लाख ५ हजार रुपये किंमतीचे झुंबर व गंठण असे दागिने दिले. रात्री राजेश मुलीला घेऊन गावी पोहोचले. मात्र घरी आल्यावर त्याच रात्री १० वाजता गावात राहणारे ढास दाम्पत्य आपल्या घरी गेले. त्यानंतर शीतलने बाथरूमला जाण्याचा बहाणा करत पळ काढला.

बराचवेळ ती बाथरुमबाहेर येत नसल्याने कुटुंबीयांनी डोकावून पाहिले असता आतून दरवाजा लावलेला व छतावरून ती गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर राजेशने मित्र लक्ष्मण ढासला संपर्क केला. त्यावर आपण काही काळजी करू नका, उद्या सकाळी मुलीला घेऊन येतो, असे सांगितले. तर शीतलच्या माहेरच्या मंडळींनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर, लग्नाचे नाटक करून ३ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार राजेशने नेकनूर पोलीस ठण्यात दिली आहे. त्यावरून लक्ष्मण युवराज ढास, प्रिया लक्ष्मण ढास, शीतल भीमराव धुमाळ आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Source link

The post लग्नाच्या रात्री नवरी बाथरूमला गेली, बराच वेळ बाहेर न आल्याने पतीने दरवाजा उघडला तर धक्काच बसला! first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=52505 0