Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 85

Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 87

Deprecated: Creation of dynamic property TwitterFeed\Builder\CTF_Feed_Builder::$ctf_sb_analytics is deprecated in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/custom-twitter-feeds/inc/Builder/CTF_Feed_Builder.php on line 23

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
central govt - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Tue, 26 Nov 2024 09:22:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg central govt - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 नाशिकपेक्षा चेन्नई, अहमदाबाद, बेंगळुरुची हवा शुद्ध! AQI पोहोचला ११३ वर, इतर शहरांची काय स्थिती? https://tejpolicetimes.com/?p=110211 https://tejpolicetimes.com/?p=110211#respond Tue, 26 Nov 2024 09:22:50 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110211 नाशिकपेक्षा चेन्नई, अहमदाबाद, बेंगळुरुची हवा शुद्ध!  AQI पोहोचला ११३ वर, इतर शहरांची काय स्थिती?

Nashik Air Pollution : शहरातील खड्डेमय रस्ते आणि त्यामुळे हवेत वाढलेले धुळीचे प्रमाण, वाहनांमधून होणारे प्रदूषण वायु गुणवत्ता निर्देशांक वाढीस कारणीभूत ठरले आहे. त्यामुळे नाशिकच्या हवा शुद्धतेसाठी पालिकेला नव्याने आराखडा आखावा लागणार आहे. महाराष्ट्र टाइम्सAQI AI नाशिक : केंद्र सरकारच्या ‘एन कॅप’ योजनेअंतर्गत नाशिकच्या हवा शुद्धतेसाठी कोट्यवधी खर्चुनही शहरातील हवेची गुणवत्ता कमालीची खालावल्याचे समोर आले […]

The post नाशिकपेक्षा चेन्नई, अहमदाबाद, बेंगळुरुची हवा शुद्ध! AQI पोहोचला ११३ वर, इतर शहरांची काय स्थिती? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
नाशिकपेक्षा चेन्नई, अहमदाबाद, बेंगळुरुची हवा शुद्ध!  AQI पोहोचला ११३ वर, इतर शहरांची काय स्थिती?

Nashik Air Pollution : शहरातील खड्डेमय रस्ते आणि त्यामुळे हवेत वाढलेले धुळीचे प्रमाण, वाहनांमधून होणारे प्रदूषण वायु गुणवत्ता निर्देशांक वाढीस कारणीभूत ठरले आहे. त्यामुळे नाशिकच्या हवा शुद्धतेसाठी पालिकेला नव्याने आराखडा आखावा लागणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स
AQI AI

नाशिक : केंद्र सरकारच्या ‘एन कॅप’ योजनेअंतर्गत नाशिकच्या हवा शुद्धतेसाठी कोट्यवधी खर्चुनही शहरातील हवेची गुणवत्ता कमालीची खालावल्याचे समोर आले आहे. नाशिकपेक्षा हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, बेंगळुरू या शहरांची हवा अधिक शुद्ध असल्याने शहर ‘स्वच्छ सुंदर हरित नाशिक’ची विरुदावली गमावण्याच्या मार्गावर आहे. नाशिक शहरातील वायू गुणवत्ता निर्देशांक अर्थात, एक्यूआय ११३ वर पोहोचला असून, जगभरातील वायू प्रदूषित शहरांमध्ये नाशिकचा क्रमांक २७४ झाला आहे. शहरातील खड्डेमय रस्ते आणि त्यामुळे हवेत वाढलेले धुळीचे प्रमाण, वाहनांमधून होणारे प्रदूषण वायु गुणवत्ता निर्देशांक वाढीस कारणीभूत ठरले आहे. त्यामुळे नाशिकच्या हवा शुद्धतेसाठी पालिकेला नव्याने आराखडा आखावा लागणार आहे.

वाढते शहरीकरण, औद्योगीकरणामुळे दिवसागणिक रस्त्यांवर वाढणारी वाहनांची संख्या अन् त्यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या समस्या हे एक दुष्टचक्र बनले आहे. या नागरिकांच्या दुष्टचक्रामुळे आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ होत असल्यामुळे हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा निर्णय घेत केंद्राने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.

ठेकेदारांचंच चांगभलं…
हवेतील प्रदूषणाची पातळी कमी करून शुद्ध हवानिर्मिती करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक मदत देऊ केली असून, पालिकेलाही ८७ कोटींचा निधी दिला आहे. त्यापैकी महापालिकेने आतापर्यंत ४५ कोटींचा निधी खर्चही केला आहे. परंतु, केंद्रीय व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे हवेच्या गुणवत्तेच्या दैनंदिन मोजणीत या निधीतून शहराची हवा शुद्ध होण्याऐवजी ठेकेदारांचंच चांगभलं झाल्याचे समोर आले आहे.
विधान परिषदेतील ४ सदस्य विधानसभेत; निवडणुकीच्या आखाड्यामध्ये ठरले यशस्वी, चारही उमेदवार महायुतीचे
प्रमुख शहरांतील एक्यूआय
शुद्ध हवेसाठी शहराचा एक्यूआय ५० च्या आत असावा लागतो. मात्र, नाशिकचा एक्यूआय ११३ वर पोहोचला असून, तो वाईट मानला जातो. मुंबई- १२१ एक्यूआय, – कोलकाता १२६, हैदराबाद १०३, चेन्नई- ११२, अहमदाबाद- १०९, – बेंगळुरू ९१ असा देशातील प्रमुख शहरांचा एक्यूआय असून, नाशिकची – हवा मुंबईच्या खालोखाल घसरल्याचे समोर आले आहे.

आरोग्यावर विपरित परिणाम
नाशिकमध्ये केटीएचएम कॉलेज येथे जुलै २००५ पासून हवेची गुणवत्ता मापन यंत्र कार्यरत असून, खासगी संस्थांचीदेखील गुणवत्ता मापक यंत्रे आहेत. त्यातून हाती आलेली आकडेवारी ‘स्वच्छ सुंदर हरित नाशिक’च्या ब्रीदवाक्यास हरताळ फासणारी ठरली आहे. हवेची गुणवत्ता घसरल्याने दम्याचा आजार असलेल्या रुग्णांसह संवेदनशील लोकांच्या आरोग्यावर त्वरित परिणाम जाणवू शकतात. प्रदीर्घ काळ संपर्कात राहिल्यास निरोगी लोकांना किरकोळ ते मध्यम लक्षणे अनुभवायला येऊ शकतात. हे टाळायचे असल्यास घराबाहेरील कामे मर्यादित ठेवा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
विदर्भात २३ आमदार मंत्रिपदाच्या स्पर्धेत; भाजपकडून १६, शिवसेनेतून तीन तर राष्ट्रवादीकडून चौघे दावेदार
हवा शुद्धता मापक ‘एक्यूआय’ स्थिती
■० ते ५० चांगला
■ ५१ ते १०० मध्यम
■ १०१ ते २०० वाईट
■ २०१ ते ३०० आरोग्यास अपायकारक
■३०१ ते ४०० अत्यंत धोकादायक

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रमांतर्गत शहराच्या हवा शुद्धतेसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. लवकरच त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. – अजित निकत, उपायुक्त (पर्यावरण), महापालिका

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post नाशिकपेक्षा चेन्नई, अहमदाबाद, बेंगळुरुची हवा शुद्ध! AQI पोहोचला ११३ वर, इतर शहरांची काय स्थिती? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110211 0
Devendra Fadnavis: Waqf बोर्डाच्या जमिनी कॉंग्रेसने लाटल्या; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप, म्हणाले… https://tejpolicetimes.com/?p=101800 https://tejpolicetimes.com/?p=101800#respond Sat, 10 Aug 2024 02:31:45 +0000 https://tejpolicetimes.com/?p=101800 Devendra Fadnavis: Waqf बोर्डाच्या जमिनी कॉंग्रेसने लाटल्या; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप, म्हणाले…

म. टा. प्रतिनिधी, पुणे : महाराष्ट्रात ‘वक्फ’च्या जमिनी कोणी लाटल्या, त्यामध्ये काँग्रेसचे कोणते नेते होते, याचा अहवाल सरकारला सादर झाला आहे. विरोधकांना ‘वक्फ’शी देणे-घेणे नसून, त्यांच्या जमिनी कशा लाटल्या जातील, यासाठी विरोध होत आहे. या विधेयकामुळे बोर्डाच्या कारभारात पारदर्शकता येऊन जमिनी लाटणाऱ्यांवर टाच पडणार होती, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केली. केंद्र सरकारने […]

The post Devendra Fadnavis: Waqf बोर्डाच्या जमिनी कॉंग्रेसने लाटल्या; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप, म्हणाले… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Devendra Fadnavis: Waqf बोर्डाच्या जमिनी कॉंग्रेसने लाटल्या; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप, म्हणाले…

म. टा. प्रतिनिधी, पुणे : महाराष्ट्रात ‘वक्फ’च्या जमिनी कोणी लाटल्या, त्यामध्ये काँग्रेसचे कोणते नेते होते, याचा अहवाल सरकारला सादर झाला आहे. विरोधकांना ‘वक्फ’शी देणे-घेणे नसून, त्यांच्या जमिनी कशा लाटल्या जातील, यासाठी विरोध होत आहे. या विधेयकामुळे बोर्डाच्या कारभारात पारदर्शकता येऊन जमिनी लाटणाऱ्यांवर टाच पडणार होती, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केली.

केंद्र सरकारने आणलेले ‘संयुक्त वक्फ व्यवस्थापन, सक्षमीकरण, कार्यक्षमता आणि विकास कायदा’ हे दुरुस्ती विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दुरुस्ती विधेयकावरून विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. राज्यघटनेतील समानतेची तरतूद व संघराज्य रचनेसह अल्पसंख्याकांवरील हा हल्ला असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

फडणवीस म्हणाले, ‘केंद्र सरकारने आणलेले दुरुस्ती विधेयक ‘वक्फ’ बोर्डाच्या कारभारात पारदर्शकता आणणारे होते. महाराष्ट्रात गेल्या काही काळात ‘वक्फ’च्या जमिनी कोणी लाटल्या, त्यामध्ये कोण कोण काँग्रेसचे नेते होते. याचा अहवाल सरकारला सादर झाला आहे. विरोधकांना ‘वक्फ’शी काही देणे घेणे नाही. त्यांना केवळ जमिनींशी देणेघेणे आहे. विधेयकामुळे जमिनी लाटणाऱ्यांवर टाच पडणार होती. त्यामुळे याला विरोध करण्यात आला. सध्या विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्यात आले असून, त्यावर योग्य तो निर्णय होईल,’ असे फडणवीस म्हणाले.

Waqf Ammendment Bill: वक्फ दुरुस्ती ‘जेपीसी’कडे; जे तुम्ही करु शकला नाहीत ते… रिजिजूंचा विरोधकांना टोला
वक्फ विधेयक ‘जेपीसी’कडे

नवी दिल्ली : देशभरातील वक्फ मंडळांचे व्यवस्थापन योग्य रितीने व्हावे या उद्देशाने आणलेले विधेयक संसदेत मंजूर करून घेण्याच्या सरकारच्या इराद्याला याच अधिवेशनात धक्का बसला. विधेयक सादर करताना लोकसभेत वादळी चर्चा झाली तीत चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाने हे विधेयक थेट मंजूर करण्याआधी संसदीय समितीकडे पाठविण्याची सूचना केल्यावर सरकारला आपला इरादा बदलावा वागला. राज्यसभेतून शुक्रवारी वक्फ विधेयक मागे घेण्याची औपारिकता पार पडली. आता हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्येष्ठ भाजप खासदार जगदंबिका पाल यांच्या नेतृत्वाखालील ही जेपीसी आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत अहवाल सादर करण्याची अपेक्षा आहे.

Source link

The post Devendra Fadnavis: Waqf बोर्डाच्या जमिनी कॉंग्रेसने लाटल्या; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप, म्हणाले… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=101800 0
Hajj Yatra: हज यात्रेच्या नियमांमध्ये मोठे बदल; आता ६५ वर्षांवरील हाजींना मिळणार थेट यात्रेची संधी https://tejpolicetimes.com/?p=101503 https://tejpolicetimes.com/?p=101503#respond Thu, 08 Aug 2024 09:16:01 +0000 https://tejpolicetimes.com/?p=101503 Hajj Yatra: हज यात्रेच्या नियमांमध्ये मोठे बदल; आता ६५ वर्षांवरील हाजींना मिळणार थेट यात्रेची संधी

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : गेल्या वर्षी हज यात्रेदरम्यान सौदी अरेबिया येथील हवामानात बदल होऊन तापमान वाढ झाल्याने अनेक हाजींचा हज यात्रेदरम्यान मृत्यू झाला होता. हवामानात होणाऱ्या या बदलांचा विचार करून केंद्र सरकारने वयोवृद्धांसाठीच्या हज यात्रेच्या नियमांमध्येमध्ये महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हज पॉलिसी २०२५ मध्ये आता ६५ वर्षांवरील हज यात्रेकरूंना थेट हज […]

The post Hajj Yatra: हज यात्रेच्या नियमांमध्ये मोठे बदल; आता ६५ वर्षांवरील हाजींना मिळणार थेट यात्रेची संधी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Hajj Yatra: हज यात्रेच्या नियमांमध्ये मोठे बदल; आता ६५ वर्षांवरील हाजींना मिळणार थेट यात्रेची संधी

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : गेल्या वर्षी हज यात्रेदरम्यान सौदी अरेबिया येथील हवामानात बदल होऊन तापमान वाढ झाल्याने अनेक हाजींचा हज यात्रेदरम्यान मृत्यू झाला होता. हवामानात होणाऱ्या या बदलांचा विचार करून केंद्र सरकारने वयोवृद्धांसाठीच्या हज यात्रेच्या नियमांमध्येमध्ये महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हज पॉलिसी २०२५ मध्ये आता ६५ वर्षांवरील हज यात्रेकरूंना थेट हज यात्रेला जाता येणार आहे. याशिवाय हज कमिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून हज यात्रेला जाणाऱ्यांच्या कोटा कमी करण्यात आला आहे.

देशभरातून जाणाऱ्या एकूण हाजींच्या संख्येपैकी ३० टक्के यात्रेकरूंना खासगी टूर ऑपरेटरच्या माध्यमातून थेट हज यात्रेला जाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दर वर्षी हज यात्रेबाबत हज पॉलिसी जाहीर करण्यात येते. आगामी वर्षासाठी हज पॉलिसी २०२५ जाहीर करण्यात आली आहे. या हज पॉलिसीमध्ये वर्ष २०२४ पर्यंत लागू असलेले काही नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. पूर्वीच्या हज यात्रेदरम्यान आलेल्या अनुभवावरून नवीन पॉलिसी तयार करण्यात आली आहे. दर वर्षी हज यात्रेला जाणाऱ्या हाजींचा कोटा जाहीर करण्यात येतो. या हाजींच्या कोट्यामध्ये आतापर्यंत ९० टक्के हज कमिटीच्या माध्यमातून हज यात्रेला प्रवासी वर्ष २०२४ पर्यंत जात होते. फक्त १० टक्के प्रवाशांना खासगी टूर ऑपरेटरच्या माध्यमातून जाण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र यंदा या कोटामध्ये बदल करण्यात आला आहे. आगामी २०२५ ला हज कमिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातुन ७० टक्के हज यात्रेकरून हज यात्रेला जातील. तर ३० टक्के हज यात्रेकरून खासगी टूर ऑपरेटरच्या माध्यमातून हज यात्रेला जाणार आहे. खासगी टूर ऑपरेटरच्या माध्यमातून जाणाऱ्या हाजींसाठी टूर ऑपरेटरच्या माध्यमातून सुविधा देण्यात येते. या सुविधांमध्ये जास्तीचे पैसे भरून हाजींना जास्त सुविधा मिळणार आहे.

गेल्या वर्षी सौदी अरेबीया या देशात तापमानाने उच्चांक गाठला होता. अचानक तपामान वाढल्याने, हज यात्रेसाठी आलेल्या हाजींची तब्येत बिघडली होती. हज यात्रेदरम्यान २५ किमीचे अंतर हज यात्रेकरूंना पायी जावे लागते. हज यात्रा पॉलिसी २०२४ मध्ये; तसेच त्याच्या पूर्वी ७० वर्षांवरील प्रवाशांची थेट हज यात्रेसाठी निवड करण्यात येत होती. मात्र, तापमानात होत असलेल्या बदलांचा विचार करून आता हज यात्रेसाठी इच्छुक असलेल्या ६५ वर्षांवरील प्रवाशांना यंदाच्या वर्षी थेट हज यात्रेला जाता येणार आहे. हा नियम बदलल्यामुळे अनेक इच्छुकांना हज यात्रेला जाण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
Chhatrapati Sambhajinagar: पत्नी हट्टाला पेटली, सासरचे ऐकेना; रोजचीच किटकिट, वैतागून पतीचं धक्कादायक पाऊल, काय घडलं?
आता हुज्जाज नाही तर हज इन्स्पेक्टर

हज यात्रेकरूंना हज यात्रेची माहिती व्हावी. त्यांना मदत व्हावी. यासाठी केंद्र किंवा राज्य शासनाच्या विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांची नेमणुक खादीमुल हुज्जाज म्हणून करण्यात येत होती. सदर खादीमुल हुज्जाज हे हज यात्रेपूर्वी; तसेच हज यात्रेच्या दरम्यान देशातून हज यात्रेला जाणाऱ्या हाजींच्या मदतीसाठी उपलब्ध करून देण्यात होते. सदर खादीमुल हुज्जाज यांच्या पदनामात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्ष २०२५ च्या हज यात्रेमध्ये खादीमुल हुज्जाज ऐवजी हज इन्स्पेक्टर असे पदनाम या मदतीसाठी नेमलेल्या कर्मचारी अधिकारी यांना दिले जाणार आहे. सदर पद हे हज यात्रेदरम्यान किंवा हज यात्रेपर्यंतच ठेवण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगरचा एम्बार्केशन पॉइंटमध्ये समावेश

आगामी २०२५ च्या हज पॉलिसीमध्ये देशभरात २० विमानतळांवरून हज यात्रेला हज यात्रेकरूंना जाण्यासाठी इन्बारकेशन पॉईट देण्यात आलेले आहे. आगामी २०२५ साठी २० एम्बार्केशन पॉइंटच्या यादीत छत्रपती संभाजीनगर विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे. मराठवाड्यातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या इच्छुकांना छत्रपती संभाजीनगर एम्बार्केशन पॉइंटची निवड करता येणार आहे.

Source link

The post Hajj Yatra: हज यात्रेच्या नियमांमध्ये मोठे बदल; आता ६५ वर्षांवरील हाजींना मिळणार थेट यात्रेची संधी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=101503 0
आणीबाणीच्या निषेधार्थ २५ जून ‘संविधान हत्या दिवस’; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा https://tejpolicetimes.com/?p=99234 https://tejpolicetimes.com/?p=99234#respond Sat, 13 Jul 2024 00:48:39 +0000 https://tejpolicetimes.com/?p=99234 आणीबाणीच्या निषेधार्थ २५ जून ‘संविधान हत्या दिवस’; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : सन १९७५मध्ये ज्या दिवशी देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली, तो २५ जूनचा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून पाळण्यात येईल, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या काळात ज्यांनी अमानुष वेदना सहन केल्या, त्यांच्या ‘अमूल्य योगदानाचे’ स्मरण म्हणून हा दिवस पाळण्यात येईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी जाहीर केले. केंद्रीय […]

The post आणीबाणीच्या निषेधार्थ २५ जून ‘संविधान हत्या दिवस’; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आणीबाणीच्या निषेधार्थ २५ जून ‘संविधान हत्या दिवस’; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : सन १९७५मध्ये ज्या दिवशी देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली, तो २५ जूनचा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून पाळण्यात येईल, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या काळात ज्यांनी अमानुष वेदना सहन केल्या, त्यांच्या ‘अमूल्य योगदानाचे’ स्मरण म्हणून हा दिवस पाळण्यात येईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी जाहीर केले.

केंद्रीय गृह मंत्रालयाने शुक्रवारी याबाबत अधिसूचना जारी केली. ‘आणीबाणीच्या काळात सत्तेच्या गंभीर दुरुपयोगाला बळी पडलेल्या आणि त्याविरोधात लढा देणाऱ्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, तसेच सत्तेच्या गैरवापराला कोणत्याही प्रकारे समर्थन न देण्याची विनंती भारतातील जनतेला करण्यासाठी केंद्र सरकार २५ जून हा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून घोषित करत आहे,’ असे या अधिसूचनेत म्हटले आहे.

‘निर्णय प्रसिद्धीसाठीच’

भाजपप्रणित सरकारने केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे, अशी टीका काँग्रेसने केली. ४ जून २०२४ हा दिवस इतिहासात ‘मोदीमुक्ती दिवस’ म्हणून नोंदवला जाईल, तसेच देशाचे नागरिक ८ नोव्हेंबर हा ‘उपजीविका हत्या दिवस’ म्हणून पाळतील. सन २००८मध्ये या तारखेला नोटाबंदीची घोषणा करण्यात आली होती, असे पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले.
MLC Rajesh Vitekar: सहा महिन्यात आमदार करतो… अजितदादांनी शब्द पाळला, राजेश विटेकरांनी गुलाल उधळला
राज्यघटना पायदळी तुडविण्यात आली होती तेव्हा नेमके काय घडले, याचे स्मरण ‘संविधान हत्या दिवसा’च्या निमित्ताने होईल. भारतीय इतिहासातील काळा अध्याय ठरलेल्या आणीबाणीत यातना भोगलेल्या सर्वांबद्दल आदर व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. – पंतप्रधान नरेंद मोदी

येणारे शतक भारताचे-धनखड

भारताच्या एकूण लोकसंख्येत तरुणांचे असणारे ६५ टक्के प्रमाण ही भारताची सुप्त शक्ती आहे. ही ताकद उच्चशिक्षित असल्यास येणारे शतक भारताचेच असेल, याबाबत मला काहीच शंका वाटत नाही, असा विश्वास देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केला. गेल्या दशकात भारताने केलेल्या घोडदौडीने येणाऱ्या पाच वर्षांचा पाया रचला आहे. या पाच वर्षांत आपण रॉकेटसारखी भरारी मारू, असेही ते म्हणाले.

Source link

The post आणीबाणीच्या निषेधार्थ २५ जून ‘संविधान हत्या दिवस’; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=99234 0
देशात आजपासून तीन नवे फौजदारी कायदे; नव्या कलमांनुसार गुन्हे दाखल होणार, जाणून घ्या सविस्तर… https://tejpolicetimes.com/?p=98082 https://tejpolicetimes.com/?p=98082#respond Mon, 01 Jul 2024 01:22:22 +0000 https://tejpolicetimes.com/?p=98082 देशात आजपासून तीन नवे फौजदारी कायदे; नव्या कलमांनुसार गुन्हे दाखल होणार, जाणून घ्या सविस्तर…

नवी दिल्ली: केंद्र सरकारने ब्रिटिशकालीन भारतीय दंड संहितेत बदल करून, मंजूर केलेले तीन नवे कायदे आज, सोमवारपासून (१ जुलै) लागू होत आहेत. भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि भारतीय साक्ष अधिनियम २०२३ अशी या नव्या फौजदारी कायद्यांची नावे आहेत. त्यातील ठळक तरतुदींचा घेतलेला आढावा. भारतीय न्याय संहिता, २०२३(एकूण कलमे : ३५६) […]

The post देशात आजपासून तीन नवे फौजदारी कायदे; नव्या कलमांनुसार गुन्हे दाखल होणार, जाणून घ्या सविस्तर… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
देशात आजपासून तीन नवे फौजदारी कायदे; नव्या कलमांनुसार गुन्हे दाखल होणार, जाणून घ्या सविस्तर…

नवी दिल्ली: केंद्र सरकारने ब्रिटिशकालीन भारतीय दंड संहितेत बदल करून, मंजूर केलेले तीन नवे कायदे आज, सोमवारपासून (१ जुलै) लागू होत आहेत. भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि भारतीय साक्ष अधिनियम २०२३ अशी या नव्या फौजदारी कायद्यांची नावे आहेत. त्यातील ठळक तरतुदींचा घेतलेला आढावा.

भारतीय न्याय संहिता, २०२३
(एकूण कलमे : ३५६)

प्रमुख बदल
– बाल या शब्दांची नेमकी व्याख्या समाविष्ट
– लिंग या संकल्पनेत पारलिंगीचा समावेश
– कागदपत्रे या संकल्पनेत इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल नोंदींचाही समावेश
– महिला आणि बालकांविरोधातील गुन्ह्यांमध्ये नवे परिशिष्ट समाविष्ट
– खोट्या बातम्या प्रसृत करणे याचा गुन्ह्यांमध्ये समावेश
– आत्महत्येचा प्रयत्न हे कलम रद्द
– एखाद्या मुलग्याचा लैंगिक छळ करणे ही संकल्पना नव्याने समाविष्ट
– भीक मागण्यासाठी मुले पळवणे हा मानवी तस्करीचा एक भाग मानणार
– पाच हजार रुपयांपेक्षा कमी मूल्याच्या चोरीच्या घटनांसाठी समाजसेवा ही शिक्षा
– लग्नाच्या आमिषाने, बढतीच्या आमिषाने किंवा ओळख लपवून लैंगिक संबंध प्रस्थापित करणे गुन्हा ठरणार

२० – नवे गुन्हे समाविष्ट
१९ – जुने गुन्हे रद्द
३३ – गुन्ह्यांसाठीच्या शिक्षेच्या कालावधीत वाढ
८३ – गुन्ह्यांसाठीच्या दंडाच्या रकमेत वाढ
२३ – गुन्ह्यांसाठी किमान शिक्षेची नव्याने तरतूद
नव्या कायद्याची घोकंपट्टी; पोलिसांच्या सवयीच्या कलमांमध्ये झाले बदल, जाणून घ्या नवीन कलम
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३
(एकूण कलमे : ५३३)


प्रमुख बदल

– महानगर आणि महानगर न्यायदंडाधिकारी हे प्रवर्ग रद्द
– सहायक सत्र न्यायाधीश हे पद रद्द
– घोषित गुन्हेगार या संकल्पनेच्या व्याप्तीत वाढ (दहा वर्षे वा त्याहून अधिक शिक्षा झालेल्या सर्वांचा या संकल्पनेत समावेश)
– स्थानबद्धतेच्या पहिल्या ४० ते ६० दिवसांच्या काळात १५ दिवस पोलिस कोठडीची मुभा आणि या कारणाने जामीन नामंजूर करता येणार नाही
– जिल्हापातळीवर विशिष्ट पोलिस अधिकारी असणार आणि प्रत्येक पोलिस ठाण्याला अटकेसाठी नोटीस द्यावी लागणार
– तपासाचा आढावा ९० दिवसांत आरोपीला मिळण्याचा अधिकार
– आरोपपत्र दाखल झाल्यानंतर तपासासाठी ९० दिवसांची मुदत.
– युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर ३० दिवसांत निकाल देणे बंधनकारक. काही विशिष्ट कारणांसाठी ही मुदत ६० दिवसांपर्यंत.
– परोक्ष सुनावणीची तरतूद समाविष्ट. निकाल लागेपर्यंत परोक्ष सुनावणी शक्य
– झिरो एफआयआर देशभरात लागू
– इलेक्ट्रॉनिक एफआयआर नोंदवण्याची तरतूद
– नृशंस गुन्ह्यांसाठीही बेड्या घालण्याची तरतूद वगळली

९ – नवी कलमे समाविष्ट
३९ – उपकलमे समाविष्ट
१४ – तरतुदी वगळल्या
११७ – तरतुदींमध्ये सुधारणा
३५ – ठिकाणी जलद न्यायदानासाठी प्रक्रिया निश्चित

भारतीय साक्ष अधिनियम, २०२३
(एकूण कलमे : १७०)

– कागदपत्रांच्या व्याख्येत इलेक्ट्रॉनिक नोंदींचाही समावेश
– पुराव्यांच्या व्याख्येत इलेक्ट्रॉनिक जबाबही समाविष्ट
– इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल दस्तावेजांचे योग्य सादरीकरण, जतन, वैधता आदींबाबत तरतूद
– पती वा पत्नींविरोधातील खटल्यात वैवाहिक जोडीदाराला सक्षम साक्षीदार मानले जाणार
– गुन्ह्यातील साथीदाराच्या साक्षीच्या आधारे दोषसिद्धी वैध मानली जाणार

२ – नवी कलमे समाविष्ट
६ – नवी उपकलमे समाविष्ट
२४ – तरतुदींमध्ये सुधारणा
६ – कलमे रद्द

गुन्ह्यांबाबत महत्त्वाची जुनी व नवी कलमे
गुन्हा जुने कलम नवीन कलम

हत्या ३०२ १०३ (१)
हत्येचा प्रयत्न ३०७ १०९
गंभीर दुखापत ३२६ ११८ (२)
मारहाण ३२३ ११५
धमकी ५०६ ३५१ (२)
विनयभंग ३५४ ७४
बलात्कार ३७६ (१) ६४ (१)
विवाहितेचा छळ ४९८ (अ) ८५
अपहरण ३६३ १३७(२)
चोरी ३८० ३०५ (ए)
दरोडा ३९५ ३१० (२)
फसवणूक ४२० ३१८ (४)
सरकारी कामात
अडथळा ३५३ १३२

Source link

The post देशात आजपासून तीन नवे फौजदारी कायदे; नव्या कलमांनुसार गुन्हे दाखल होणार, जाणून घ्या सविस्तर… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=98082 0
प्रचाराच्या यात्रेत सेल्फीचा थांबा; मध्य रेल्वेच्या २० रेल्वेस्थानकांत 3D सेल्फी बूथ, खर्च वाचून चक्रवाल https://tejpolicetimes.com/?p=75378 https://tejpolicetimes.com/?p=75378#respond Tue, 02 Jan 2024 09:08:07 +0000 https://tejpolicetimes.com/?p=75378 प्रचाराच्या यात्रेत सेल्फीचा थांबा; मध्य रेल्वेच्या २० रेल्वेस्थानकांत 3D सेल्फी बूथ, खर्च वाचून चक्रवाल

मुंबई : नवे वर्ष आगामी निवडणुकांचे असल्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सर्वसामान्यांना पाहायला मिळणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांमध्ये यासाठी खलबते सुरू असून भारतीय जनता पक्षाने यात आघाडी घेतली आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना आणि उपक्रम यांची माहिती देणारे सेल्फी बूथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कटआऊटसह मध्य रेल्वेच्या २० स्थानकांवर उभारण्यात आले […]

The post प्रचाराच्या यात्रेत सेल्फीचा थांबा; मध्य रेल्वेच्या २० रेल्वेस्थानकांत 3D सेल्फी बूथ, खर्च वाचून चक्रवाल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
प्रचाराच्या यात्रेत सेल्फीचा थांबा; मध्य रेल्वेच्या २० रेल्वेस्थानकांत 3D सेल्फी बूथ, खर्च वाचून चक्रवाल

मुंबई : नवे वर्ष आगामी निवडणुकांचे असल्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सर्वसामान्यांना पाहायला मिळणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांमध्ये यासाठी खलबते सुरू असून भारतीय जनता पक्षाने यात आघाडी घेतली आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना आणि उपक्रम यांची माहिती देणारे सेल्फी बूथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कटआऊटसह मध्य रेल्वेच्या २० स्थानकांवर उभारण्यात आले आहेत. यामुळे योजनांची माहिती देणाऱ्या बूथवर सेल्फी घेऊन प्रवाशांचा नव्या वर्षातील रेल्वेप्रवास सुरू होणार आहे.

मुंबई शहर-उपनगरांना जोडणाऱ्या लोकल ट्रेन या मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जातात. शहरातील जवळपास प्रत्येक व्यक्ती कामानिमित्त रोज किमान एकदा तरी लोकलने प्रवास करते. शिवाय, बाहेरगावी जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांमधूनही प्रवाशांचा प्रवास होतो. यामुळे योजनांची माहिती, नवे विक्रम याबाबत जागृती करण्यासाठी अधिक वर्दळीच्या ठिकाणांवर प्रचार करण्यावर राजकीय पक्षांचा भर आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर अंतराळातील भारतीय शक्ती, ठाणे स्थानकात ‘स्किल इंडिया’, कल्याणमध्ये ‘स्टार्ट अप इंडिया’, घाटकोपरमध्ये ‘न्यू इंडिया मेडिसीन’ आणि कुर्ला येथे ‘डिजिटल इंडिया’ असे सेल्फी बूथ उभारण्यात आले आहेत. रेल्वेस्थानकांवर उभारण्यात आलेल्या योजनांच्या सेल्फी बूथबाबत रेल्वेप्रवाशांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. सीएसएमटीमध्ये अंतराळ शक्तीच्या बूथमध्ये चांद्रयानाची प्रतिकृती उभारली आहे. चांद्रयानाच्या यशामुळे जगभरातून भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक झाले आहे. प्रवाशांचा वावर असलेल्या जागेत हे बूथ नसल्याने त्याची अडचण होत नाही. लहान मुले कुतूहलाने सेल्फी बूथवर फोटो काढतात व त्याबाबत माहिती विचारत आहेत, अशी प्रतिक्रिया खासगी बँकेत अधिकारी म्हणून काम करणाऱ्या नलिनी देशमुख यांनी दिली. तर, रेल्वे फलाटावर अनधिकृत फेरीवाले, खाद्यपदार्थांचे स्टॉल, प्रचंड गर्दी अशा अडचणी असताना यात आता सेल्फी बूथची भर पडली आहे. यामुळे वर्दळीच्या ठिकाणी असे उपक्रम राबवण्यास सर्वच राजकीय पक्षांना मनाई करायला हवी, असे एक प्रवासी प्रसाद पांडे यांनी सांगितले.
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खाद्यतेलाचे दर घसरले, शेंगदाणा तेलही स्वस्त, जाणून घ्या नव्या किंमती
मुंबईबाहेर पुणे आणि नाशिक रेल्वेस्थानकांत देशाचे लष्करी सामर्थ्य, कोल्हापूर आणि अकोला येथे गॅस (उज्वला योजना), जळगावमध्ये नवभारत (जल), मनमाडमध्ये शेतीविषयक, नागपूरमध्ये ‘नवभारत’, शिवाजी नगर येथे ‘डिजिटल इंडिया’ आणि पंढरपूर रेल्वेस्थानकात स्वच्छताविषयक माहिती देणारे बूथ उभारण्यात आले आहेत.

सेल्फी बूथचा खर्च किती?

मध्य रेल्वेवर उभारण्यात आलेल्या सेल्फी बूथच्या खर्चाबाबत माहिती अधिकाराअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, वर्दळीच्या रेल्वेस्थानकात तात्पुरते आणि कमी प्रवासी असलेल्या ठिकाणी कायमस्वरुपी स्वरुपाचे ३ डी सेल्फी बूथ (पॉईंट) उभारण्यात आले आहे. अ दर्जा असलेल्या रेल्वेस्थानकात तात्पुरत्या सेल्फी बूथसाठी प्रत्येकी सव्वा लाख रुपये आणि क दर्जाच्या रेल्वेस्थानकात कायमस्वरूपी सेल्फीसाठी प्रत्येकी सव्वासहा लाख रुपये खर्च आला आहे.

Source link

The post प्रचाराच्या यात्रेत सेल्फीचा थांबा; मध्य रेल्वेच्या २० रेल्वेस्थानकांत 3D सेल्फी बूथ, खर्च वाचून चक्रवाल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=75378 0
शेतकरी चिंतेत! धानाचे दर कोसळले ६०० रुपयांनी, सध्या खुल्या बाजारात प्रती क्विंटलचा भाव काय? https://tejpolicetimes.com/?p=74604 https://tejpolicetimes.com/?p=74604#respond Fri, 29 Dec 2023 02:32:38 +0000 https://tejpolicetimes.com/?p=74604 शेतकरी चिंतेत! धानाचे दर कोसळले ६०० रुपयांनी, सध्या खुल्या बाजारात प्रती क्विंटलचा भाव काय?

राजू मस्के, भंडारा : केंद्र सरकारने तांदळाच्या वाढत्या किंमतीवरून व्यापारी संघटनांना इशारा देत साठेबाजी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला. नंतर वाढत्या महागाईवर उतारा म्हणून २५ रुपये किलो दराने तांदूळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीर केला. याचा एकत्रित परिणाम म्हणून खुल्या बाजारात धानाचे दर प्रती क्विंटल ६०० रुपयांची कोसळले आहेत. काही दिवसांपूर्वी ३ हजार ३०० रुपये […]

The post शेतकरी चिंतेत! धानाचे दर कोसळले ६०० रुपयांनी, सध्या खुल्या बाजारात प्रती क्विंटलचा भाव काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
शेतकरी चिंतेत! धानाचे दर कोसळले ६०० रुपयांनी, सध्या खुल्या बाजारात प्रती क्विंटलचा भाव काय?

राजू मस्के, भंडारा : केंद्र सरकारने तांदळाच्या वाढत्या किंमतीवरून व्यापारी संघटनांना इशारा देत साठेबाजी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला. नंतर वाढत्या महागाईवर उतारा म्हणून २५ रुपये किलो दराने तांदूळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीर केला. याचा एकत्रित परिणाम म्हणून खुल्या बाजारात धानाचे दर प्रती क्विंटल ६०० रुपयांची कोसळले आहेत. काही दिवसांपूर्वी ३ हजार ३०० रुपये प्रती क्विंटल दराने धानाची विक्री होत होती. हे दर आता २ हजार ७०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. या कोसळलेल्या दरामुळे धान उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर आणि कोकणात धानाचे उत्पादन होते. मागील काही वर्षांत धान लागवडीचा खर्च दुप्पट झाला आहे. हा खर्च भरून काढण्यासाठी धानाला योग्य भाव मिळणे अपेक्षित होते. यावर्षी केंद्र सरकारने अ दर्जाच्या धानाला २ हजार २०३ रुपये तर ब दर्जाच्या धानाला २ हजार १८३ रुपयांचा दर घोषित केला. दिवाळीनंतर धानाची कापणी सुरू असताना अवकाळी पावसाचा फटका बसला. अनेकांचे कापून ठेवलेले धान भिजले तर काही ठिकाणी कडपा पाण्यावर तरंगल्या. अनेक शेतांमधील धानाला अंकुर फुटले. नेमक्या याच कालावधीत धानाचे दर कधी नव्हे इतके वाढले. बारीक धानाचे दर ३ हजार ३०० रुपये प्रती क्विंटलपर्यंत पोहोचले होते. तर ठोकळ धानाला २ हजार ३०० ते २ हजार ४०० रुपयांचा दर मिळाला. ही दरवाढ धानविक्रीच्या व्यवहारात ऐतिहासिक मानली गेली. या कालावधी धानविक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात लाभ झाला. परंतु, अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची मळणी दोन ते तीन आठवडे लांबणीवर पडली. तोपर्यंत धानाचे दर हळूहळू कमी होत गेले. सध्याच्या दरातून शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. अनेक व्यापारी अवकाळी पावसात कडपा सापडल्यामुळे धानाची मिलिंग करताना तुकडा अधिक प्रमाणात पडत असल्याचे कारण सांगूनही कमी दराने धान खरेदी करीत असल्याचे शेतकरी सांगतात.

नेमके काय घडले?

– नोव्हेंबर महिन्यात लगतच्या छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूक झाल्या.
– या निवडणुकीत भाजपने धानाला ३ हजार १०० रुपये क्विंटलचा भाव देण्याची घोषणा झाली.
– भाजपने दोन्ही राज्यात बाजी मारल्यानंतर पूर्व विदर्भातही धानाचे भाव वाढले.
– वाढलेल्या धानाच्या दरापाठोपाठ तांदळाचे दरही वाढले.
– बिगर बासमती तांदळाची किंमत ५० रुपये किलोपर्यंत पोहोचली.
– केंद्र सरकारने तांदळाच्या वाढत्या किंमतीवरून व्यापारी संघटनांना इशारा दिला.
– साठेबाजी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला.
– आता २५ रुपये प्रती किलो दराने सरकार तांदूळ उपलब्ध करणार.
– या निर्णयाचा फटका धानाच्या दरावर पडला आहे.
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खाद्यतेलासह डाळींचेही भाव उतरणीला, जाणून घ्या नवे दर…
छोट्या व्यापाऱ्यांकडून व्यवहार ठप्प

धानाच्या दरातील तफावत वाढू लागली आहे. चढ्या दराने धानाची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांमुळे संकट निर्माण झाले आहे. अनेकांनी गोदामांमध्ये धान साठवून ठेवला आहे. येत्या १५ दिवसांत दर वाढणार ही आशा त्यांना होती. पण, सरकारने २५ रुपये किलोने तांदूळ देण्याची घोषणा केल्याने या लहान व्यापाऱ्यांमध्ये धास्ती वाढली आहे. सहाशे रुपये प्रती क्विंटलची तफावत कशी भरून काढावी, हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाने धानाचे भाव पडले. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत दोन रुपये किलो किंवा काहींना मोफत धान्य मिळत असल्याने खुल्या बाजारपेठेत मागणी कमी होत आहे. महागाई वाढू नये म्हणून शासनाने तांदळाचे दर कमी केले. परिणामी धानाचे दर कमी झाले आहेत.-कृष्णा पराते, धान उत्पादक

दरपत्रक…
(प्रती क्विंटल)
आधारभूत…
ए ग्रेड : २,२०३ रुपये
बी ग्रेड : २,१८३ रुपये

पूर्वी खुल्या बाजारात…
ए ग्रेड : ३,३०० रुपये
बी ग्रेड २,३०० रुपये

सध्या खुल्या बाजारात…
ए ग्रेड : २,७०० रुपये
बी ग्रेड : २,००० रुपये

Source link

The post शेतकरी चिंतेत! धानाचे दर कोसळले ६०० रुपयांनी, सध्या खुल्या बाजारात प्रती क्विंटलचा भाव काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=74604 0