Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
crime news - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Thu, 05 Dec 2024 03:56:59 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg crime news - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 ठाण्यात मुलीवर शाळेत विनयभंग; आरोपी फरार तर प्राध्यापिकेला केली अटक, कारण… https://tejpolicetimes.com/?p=111281 https://tejpolicetimes.com/?p=111281#respond Thu, 05 Dec 2024 03:56:59 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111281 ठाण्यात मुलीवर शाळेत विनयभंग; आरोपी फरार तर प्राध्यापिकेला केली अटक, कारण…

Thane Diva Molestation school : दिवा शहरात एका अल्पवयीन मुलीचा भरदिवसा शाळेत विनयभंग झाला आणि मुख्य आरोपी फरार आहे. तर शाळेच्या प्राध्यापिकेला अटक करण्यात आली आहे. हायलाइट्स: दिव्यात भरदिवसा शाळेत एका अल्पवयीन मुलीवर विनयभंग मुख्य आरोपी फरार आहे, तर शाळेच्या प्राध्यापिकेला अटक दिव्यातील घटनेनं महाराष्ट्रात खळबळ Lipiदिवा शाळेत मुलीचा विनयभंग प्रदिप भणगे, ठाणे : दिवा […]

The post ठाण्यात मुलीवर शाळेत विनयभंग; आरोपी फरार तर प्राध्यापिकेला केली अटक, कारण… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
ठाण्यात मुलीवर शाळेत विनयभंग; आरोपी फरार तर प्राध्यापिकेला केली अटक, कारण…

Thane Diva Molestation school : दिवा शहरात एका अल्पवयीन मुलीचा भरदिवसा शाळेत विनयभंग झाला आणि मुख्य आरोपी फरार आहे. तर शाळेच्या प्राध्यापिकेला अटक करण्यात आली आहे.

हायलाइट्स:

  • दिव्यात भरदिवसा शाळेत एका अल्पवयीन मुलीवर विनयभंग
  • मुख्य आरोपी फरार आहे, तर शाळेच्या प्राध्यापिकेला अटक
  • दिव्यातील घटनेनं महाराष्ट्रात खळबळ
Lipi
दिवा शाळेत मुलीचा विनयभंग

प्रदिप भणगे, ठाणे : दिवा शहरातील एका शाळेत थेट वर्गात शिरुन १० वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील दुसरी संतापजनक बाब म्हणजे हे कृत्य करणारा नराधम पसार झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, संस्थाचालकांच्या विरोधात कारवाई केली नव्हती. मनसे कार्यकर्त्याने पोलिसांना जाब विचारल्यावर पोलिसांनी संस्थाचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपीच अद्याप फरार आहे, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

काय आहे नक्की प्रकरण

वर्गात कोणीही नसताना एका व्यक्तीने गैरप्रकार केल्याची माहिती पीडित मुलीने दिली आहे. पिडीत मुलीसोबत हा प्रकार झाल्यानंतर तिने आरडाओरड केला. त्यानंतर तो व्यक्ती तेथून निघून जात होता. मुलीचा आरडाओरड ऐकून शाळेतील शिक्षिका तिथे आल्या होत्या. त्यांनी त्या व्यक्तीला विचारणा केली. परंतु त्याने मुलीला शाळेत सोडायला आल्याचे सांगत पळ काढला. पिडीत मुलीला शाळेच्या कार्यालयात आणल्यानंतर तिने प्राध्यापिकेला घडलेला प्रकार सांगितला. परंतु त्यांनी या प्रकाराबाबत घरी कोणालाही सांगू नको असे बजावले.
नव्या मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्रातून कुणाला संधी? भुजबळ, भुसे, महाजन, पाटील यांच्या नावांची चर्चा

पिडीत मुलीसोबत घडलेला प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. पिडीत मुलीने पालकांना माहिती दिल्यानंतर त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र संस्थाचालकांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली नव्हती. त्यामुळे दिव्यातील मनसे पदाधिकारी शहर सचिव प्रशांत गावडे, कुशाल पाटील, परेश पाटील, सागर निकम, नम्रता खराडे आणि इतर कार्यकर्त्यानी पोलिसांना जाब विचारला मग पोलिसांनी संस्थाचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे…

पोलिसांनी प्राध्यापिकेला केली अटक

या घटनेची माहिती पिडीत मुलीने प्राध्यापकांना दिली असतानाही त्यांनी मुलीला कोणासही सांगू नको असे धमकाविल्याने पोलिसांनी प्राध्यापिकेला अटक केली आहे. तर मुख्य आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

The post ठाण्यात मुलीवर शाळेत विनयभंग; आरोपी फरार तर प्राध्यापिकेला केली अटक, कारण… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111281 0
गळ्यात हात टाकताच पोटात चाकू भोसकला, संभाजीनगरमधील ‘त्या’ हत्येचं आरोपींनी सांगितलं कारण https://tejpolicetimes.com/?p=111043 https://tejpolicetimes.com/?p=111043#respond Tue, 03 Dec 2024 05:47:05 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111043 गळ्यात हात टाकताच पोटात चाकू भोसकला, संभाजीनगरमधील ‘त्या’ हत्येचं आरोपींनी सांगितलं कारण

Chhatrapati Sambhajinagar Murder News: दिनेशचा खून झाल्यानंतर बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही माहिती मिळताच खून करून आरोपींनी पसार होण्याचा प्लॅन केला. हायलाइट्स: वाद मिटवायचा सांगून मैदानात भेटायला बोलावलं गळ्यात हात टाकताच दोघांनी पोटात चाकू भोसकला छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ Lipiसंभाजीनगर हर्सुल जेल तरुणाची हत्या सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : हर्सूल जेल समोरील मैदानावर […]

The post गळ्यात हात टाकताच पोटात चाकू भोसकला, संभाजीनगरमधील ‘त्या’ हत्येचं आरोपींनी सांगितलं कारण first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
गळ्यात हात टाकताच पोटात चाकू भोसकला, संभाजीनगरमधील ‘त्या’ हत्येचं आरोपींनी सांगितलं कारण

Chhatrapati Sambhajinagar Murder News: दिनेशचा खून झाल्यानंतर बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही माहिती मिळताच खून करून आरोपींनी पसार होण्याचा प्लॅन केला.

हायलाइट्स:

  • वाद मिटवायचा सांगून मैदानात भेटायला बोलावलं
  • गळ्यात हात टाकताच दोघांनी पोटात चाकू भोसकला
  • छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ
Lipi
संभाजीनगर हर्सुल जेल तरुणाची हत्या

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : हर्सूल जेल समोरील मैदानावर २६ वर्षीय तरुणाच्या खुनामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. या खुनाचं कारण अखेर समोर आलं आहे. ६ महिन्यापूर्वी झालेल्या जुन्या वादामुळे मयताने आरोपीला मारहाण केली होती. हा राग मनात धरून आरोपींनी मयताला मैदानात बोलावून त्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी १२ तासाच्या आत गुन्हे शाखेने २ आरोपींना चिकलठाणा येथून अटक करण्यात आले असल्याची माहिती बेगमपुरा पोलिसांनी दिली आहे.गणेश विनोद सोनवणे (वय २७, रा. अंबर हील जटवाडा रोड) आणि अनिकेत उर्फ विक्की रमेश गायकवाड (वय २४, रा. एच.पी गल्ली, एकता नगर) असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर दिनेश (ऊर्फ बबलू) परमानंद मोरे (वय २६, रा.चेतना नगर हर्सूल) असं मयत तरुणाचं नाव आहे. दरम्यान, जुना वाद मिटवायचा आहे, असं सांगून दिनेश (ऊर्फ बबलू) याला गणेश सोनवणे आणि अनिकेत गायकवाड यांनी सोमवार दि.२ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास हर्सूल जेल समोरील एन १३ मैदानावर बोलावले. दिनेश तिथे जाताच आरोपींनी गळ्यात हात टाकत गप्पा सुरू केल्या. तेवढ्यात दोघांनी दिनेश याच्या पोटात चाकूने भोसकले. इतर आरोपींनी बॅट, रॉडने बेदम मारहाण केली. यात दिनेश गंभीर जखमी झाला. त्याच्यासोबत असलेला सुमित चव्हाण याने मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्याला देखील चाकूने भोसकले. यात सुमित गंभीर जखमी झाला. नागरिकांनी दिनेश याला रिक्षात टाकून घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
Today Top 10 Headlines in Marathi: बुलेट खाऊ पण मतदान बॅलेटवरच करु, मारकडवाडीत जानकर समर्थक आक्रमक, शेतकऱ्यासाठी राबलेल्या ‘धर्मराज’चं निधन; परिवारासह अख्खं गाव हळहळलं; सकाळच्या दहा हेडलाईन्स

दिनेशचा खून झाल्यानंतर बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही माहिती मिळताच खून करून आरोपींनी पसार होण्याचा प्लॅन केला. गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक काशिनाथ महांडुळे, पोलीस उप निरीक्षक प्रवीण वाघ यांच्या पथकाला गुप्त बातमीदाराने माहिती दिली. आरोपी हे चिकलठाणा येथील बाजारात असल्याचं गुप्त बातमीदाराने सांगितलं. त्यानंतर पथकाने आरोपींना अटक केली आणि आरोपींना बेगपुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

The post गळ्यात हात टाकताच पोटात चाकू भोसकला, संभाजीनगरमधील ‘त्या’ हत्येचं आरोपींनी सांगितलं कारण first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111043 0
रस्त्यावर शौच केल्याने दाम्पत्यासह नऊ महिन्यांच्या लेकरावर प्राणघातक हल्ला, बाळ रक्ताने माखलं https://tejpolicetimes.com/?p=110808 https://tejpolicetimes.com/?p=110808#respond Sun, 01 Dec 2024 07:12:53 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110808 रस्त्यावर शौच केल्याने दाम्पत्यासह नऊ महिन्यांच्या लेकरावर प्राणघातक हल्ला, बाळ रक्ताने माखलं

Navi Mumbai Crime: या घटनेत जखमी झालेल्यांमध्ये अंजली नितीन खंदारे उर्फ अंजली उस्मान मोह शेख (३७), तिचा पती उस्मान शेख (४०) आणि नऊ महिन्यांचा त्यांचा मुलगा अफान या तिघांचा समावेश आहे. हायलाइट्स: बेलापूरमध्ये किरकोळ कारणावरून दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला नऊ महिन्याच्या बळावर प्राणघातक हल्ला पोलिसांनी हल्लेखोराला घेतलं ताब्यात महाराष्ट्र टाइम्स.कॉम नवी मुंबई बेलापूर दाम्पत्यासह मुलावर हल्ला […]

The post रस्त्यावर शौच केल्याने दाम्पत्यासह नऊ महिन्यांच्या लेकरावर प्राणघातक हल्ला, बाळ रक्ताने माखलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
रस्त्यावर शौच केल्याने दाम्पत्यासह नऊ महिन्यांच्या लेकरावर प्राणघातक हल्ला, बाळ रक्ताने माखलं

Navi Mumbai Crime: या घटनेत जखमी झालेल्यांमध्ये अंजली नितीन खंदारे उर्फ अंजली उस्मान मोह शेख (३७), तिचा पती उस्मान शेख (४०) आणि नऊ महिन्यांचा त्यांचा मुलगा अफान या तिघांचा समावेश आहे.

हायलाइट्स:

  • बेलापूरमध्ये किरकोळ कारणावरून दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला
  • नऊ महिन्याच्या बळावर प्राणघातक हल्ला
  • पोलिसांनी हल्लेखोराला घेतलं ताब्यात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
नवी मुंबई बेलापूर दाम्पत्यासह मुलावर हल्ला

नवी मुंबई : लहान मुलाने रस्त्यावर शौच केल्याच्या किरकोळ कारणावरून एका व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या दाम्पत्यावर तसेच त्यांच्या नऊ महिन्याच्या बळावर लोखंडी सळई आणि कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी बेलापूर गावातील स्मशानभूमी लगतच्या पंचशिल नगर झोपडपट्टीत घडली. या हल्ल्यात नऊ महिन्याच्या बाळासह त्याचे आई वडील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नेरुळमधील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर एन. आर. आय पोलिसांनी हल्लेखोर व्यक्ती राजू सट्टा याच्याविरोधात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं आहे.या घटनेत जखमी झालेल्यांमध्ये अंजली नितीन खंदारे उर्फ अंजली उस्मान मोह शेख (३७), पती उस्मान शेख (४०) आणि नऊ महिन्यांचा त्यांचा मुलगा अफान या तिघांचा समावेश आहे. सदरचे शेख दाम्पत्य आपल्या दोन मुलांसह बेलापूर गावातील स्मशानभूमी लगतच्या पंचशिल नगर झोपडपट्टीत राहण्यास आहेत. शेख दाम्पत्याचा दोन वर्षीय मुलगा अयान याने गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर शौच केले होते. यामुळे त्यांच्या शेजारी राहणारा आरोपी राजू सट्टा याला राग आल्याने त्याने शेजारी राहणाऱ्या शेख दाम्पत्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने लोखंडी सळई व कुऱ्हाड घेऊन शेख दाम्पत्याच्या घरात घुसून अंजलीवर सळईने हल्ला केला. त्यात ती जखमी झाल्यानंतर आरोपी राजू याने अंजलीच्या हातामध्ये असलेला तिचा नऊ महिन्याचा लहान मुलगा अफान याच्या डोक्यात सुद्धा कुऱ्हाडीने हल्ला केला.
Ajit Pawar: लोकसभा निवडणुकीत फटका, सत्तेत येण्यासाठी ‘लाडकी बहीण’ योजना आणली, अजित पवारांची कबुली

त्यामुळे मुलाच्या कपाळाला कुऱ्हाड लागून तो सुद्धा गंभीर जखमी झाला. या प्रकारानंतर अंजली आपल्या मुलाला वाचविण्यासाठी त्याला घेऊन बाहेर पळली असता आरोपी राजू हा कुऱ्हाड घेऊन तिच्या मागे धावून गेला. त्यामुळे अंजलीचा पती उस्मान याने त्याच्या मागे धावत जात राजूला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी राजूने उस्मानला चावा घेऊन त्याच्या पायावर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात तिघेही जखमी झाल्यानंतर आरोपी राजू सट्टा याने पलायन केले. या घटनेत जखमी झालेल्या तिघांना नेरुळमधील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर एन. आर. आय पोलिसांनी राजू सट्टा याच्या विरोधात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

The post रस्त्यावर शौच केल्याने दाम्पत्यासह नऊ महिन्यांच्या लेकरावर प्राणघातक हल्ला, बाळ रक्ताने माखलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110808 0
बंद दुकानात संशयास्पद मृत्यू, छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेल्या मृतहेदाचा अखेर उलगडा; कारण फक्त… https://tejpolicetimes.com/?p=110721 https://tejpolicetimes.com/?p=110721#respond Sat, 30 Nov 2024 11:42:48 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110721 बंद दुकानात संशयास्पद मृत्यू, छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेल्या मृतहेदाचा अखेर उलगडा; कारण फक्त…

Nandurbar Crime: अंकलेश्वर महामार्गावरील कॉलेज चौफुली ते चिनोदा चौफुलीदरम्यान असलेल्या हर्षल फॅब्रिकेशन वर्कशॉपमध्ये २९ नोव्हेंबर शुक्रवारी सकाळी एक तरुण मृतावस्थेत परिसरातील नागरिकांना दिसला. हायलाइट्स: तळोदा शहरातील संशयास्पद मृत्यू संशयास्पद मृत्यूचा झाला खुलासा नंदुरबारमधील धक्कादायक घटना Lipiनंदुरबार क्राइम बातम्या महेश पाटील, नंदुरबार : नंदुरबारमधील अंकलेश्वर महामार्गावरील तळोदा येथील कॉलेज चौफुली ते चिनोदा चौफुलीदरम्यान असलेल्या एका वर्कशॉपच्या […]

The post बंद दुकानात संशयास्पद मृत्यू, छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेल्या मृतहेदाचा अखेर उलगडा; कारण फक्त… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
बंद दुकानात संशयास्पद मृत्यू, छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेल्या मृतहेदाचा अखेर उलगडा; कारण फक्त…

Nandurbar Crime: अंकलेश्वर महामार्गावरील कॉलेज चौफुली ते चिनोदा चौफुलीदरम्यान असलेल्या हर्षल फॅब्रिकेशन वर्कशॉपमध्ये २९ नोव्हेंबर शुक्रवारी सकाळी एक तरुण मृतावस्थेत परिसरातील नागरिकांना दिसला.

हायलाइट्स:

  • तळोदा शहरातील संशयास्पद मृत्यू
  • संशयास्पद मृत्यूचा झाला खुलासा
  • नंदुरबारमधील धक्कादायक घटना
Lipi
नंदुरबार क्राइम बातम्या

महेश पाटील, नंदुरबार : नंदुरबारमधील अंकलेश्वर महामार्गावरील तळोदा येथील कॉलेज चौफुली ते चिनोदा चौफुलीदरम्यान असलेल्या एका वर्कशॉपच्या दुकानात २९ नोव्हेंबर रोजी संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. शहरातील आणि आसपासच्या भागातील रहिवाशांमध्ये खळबळ उडवणाऱ्या संशयास्पद मृत्यूंचे कारण अखेर उलगडले आहे. पोलिसांच्या तपासात जातपडताळणीच्या वादातून युवकाची हत्या झाल्याचे उघडकीस आलं आहे.अंकलेश्वर महामार्गावरील कॉलेज चौफुली ते चिनोदा चौफुलीदरम्यान असलेल्या हर्षल फॅब्रिकेशन वर्कशॉपमध्ये २९ नोव्हेंबर शुक्रवारी सकाळी एक तरुण मृतावस्थेत परिसरातील नागरिकांना दिसला. सायंकाळी सहा वाजता वर्कशॉप बंद करून मालक व कर्मचारी घरी गेले होते. दुकान बंद असताना मृत तरुण हा आत कसा आला? असा प्रश्न नागरिकांना पडला होता. याबाबत घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक राजू लोखंडे, पोलिस उपनिरीक्षक महेश निकम, वनसिंग पाडवी यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याचा तपास पोलिसांकडून सुरू होता. परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले.
Nagar News: माझ्या कुटुंबातील चार मतं कुठे गेली? EVMवर शंका व्यक्त करत अपक्ष उमेदवाराचा सवाल

तळोदा येथील वेल्डिंग वर्कशॉपमध्ये आढळलेल्या चंद्रकांत जुगार पावरा (वय ४०) यांच्या मृत्यूमागील कारण समोर आले आहे. प्राथमिक तपासानुसार, जातपडताळणीच्या कागदपत्रांच्या वादातून झालेल्या वादाचा परिणाम म्हणून ही हत्या घडली असल्याचे समोर आलं आहे. संशयित आरोपी बंटी गुलाब राहसे (रा.अलवान, ता. तळोदा) आणि मृत चंद्रकांत जुगार यांच्यात जातपडताळणीच्या कागदपत्रांवरून वाद झाला होता. वाद विकोपाला जाऊन आरोपीने लोखंडी पाईपने चंद्रकांत यांच्या डोक्यावर प्राणघातक हल्ला केला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी प्रताप जूजाऱ्या पावरा (रा.बिजरी, ता.धडगाव) यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात बंटी गुलाब राहसे याच्याविरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम १०३(१) आणि ११५(२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजू लोखंडे करत आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

The post बंद दुकानात संशयास्पद मृत्यू, छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेल्या मृतहेदाचा अखेर उलगडा; कारण फक्त… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110721 0
पत्नी, मुलीसह शिक्षकाने जीव दिला, काही सेकंदात त्रिकोणी कुटुंबाचा अंत; महाराष्ट्र हादरला https://tejpolicetimes.com/?p=110546 https://tejpolicetimes.com/?p=110546#respond Fri, 29 Nov 2024 03:02:34 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110546 पत्नी, मुलीसह शिक्षकाने जीव दिला, काही सेकंदात त्रिकोणी कुटुंबाचा अंत; महाराष्ट्र हादरला

Teacher Commits Suicide with his Daughter and Wife: शिक्षक मसनाजी सुभाषराव तुडमे (वय ४७), पत्नी कान्होपात्रा ऊर्फ रंजना मसनाजी तुडमे (वय ४२), मुलगी अंजली मसनाजी तुडमे (वय २०) अशी मृतांची नावे आहेत. हायलाइट्स: पत्नी, मुलीसह शिक्षकाची आत्महत्या गंगाखेडमध्ये रेल्वे रुळावर आढळले मृतदेह परभणीमधील हृदयद्रावक घटना महाराष्ट्र टाइम्सParbhani Crime News: रेल्वे ट्रॅकवर पत्नी, मुलीसह शिक्षकाने जीव […]

The post पत्नी, मुलीसह शिक्षकाने जीव दिला, काही सेकंदात त्रिकोणी कुटुंबाचा अंत; महाराष्ट्र हादरला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पत्नी, मुलीसह शिक्षकाने जीव दिला, काही सेकंदात त्रिकोणी कुटुंबाचा अंत; महाराष्ट्र हादरला

Teacher Commits Suicide with his Daughter and Wife: शिक्षक मसनाजी सुभाषराव तुडमे (वय ४७), पत्नी कान्होपात्रा ऊर्फ रंजना मसनाजी तुडमे (वय ४२), मुलगी अंजली मसनाजी तुडमे (वय २०) अशी मृतांची नावे आहेत.

हायलाइट्स:

  • पत्नी, मुलीसह शिक्षकाची आत्महत्या
  • गंगाखेडमध्ये रेल्वे रुळावर आढळले मृतदेह
  • परभणीमधील हृदयद्रावक घटना
महाराष्ट्र टाइम्स
Parbhani Crime News: रेल्वे ट्रॅकवर पत्नी, मुलीसह शिक्षकाने जीव दिला, काही सेकंदात त्रिकोणी कुटुंबाचा अंत; महाराष्ट्र हादरला

परभणी : गंगाखेड येथील एका विद्यालयातील मसनाजी सुभाषराव तुडमे (वय ४५) या शिक्षकाने पत्नी व मुलीसह गुरुवारी (२८ नोव्हेंबर) दुपारी तीन वाजेच्या सुमारास एका मालगाडीसमोर झोपून आत्महत्या केली. हृदय पिळवटून टाकणार्‍या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या धारखेड शिवारात रेल्वे पुलावर या शिक्षकासह पत्नी व मुलीने रेल्वे मार्गावर झोपून जीवनयात्रा संपवली.शिक्षक मसनाजी सुभाषराव तुडमे (वय ४७), पत्नी कान्होपात्रा ऊर्फ रंजना मसनाजी तुडमे (वय ४२), मुलगी अंजली मसनाजी तुडमे (वय २०) अशी मृतांची नावे आहेत. त्या तिघांचे मृतदेह घटनास्थळी छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले. उपविभागीय अधिकारी दिलीप टिप्परसे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आसेफ शेख, जमादार दिपक वावळे यांच्यासह अन्य कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. शिक्षक अहमदपूर तालुक्यातील किनीकद्दु या गावचे मूळ रहिवासी असून, गंगाखेड येथील ममता विद्यालयातील माध्यमिक विभागात ते मराठी विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत होते.

आई-वडिलांसह मुलाचा अंत

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शहरात अशाच एका कुटुंबाचा अपघातात अंत झाला होता. आपल्या मुलाला परभणी येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन आलेल्या आई वडिलांसह मुलाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. परभणी शहरातून वसमतकडे जाणार्‍या महामार्गावर आसोला पाटीजवळ ट्रॅक्टर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना ११ नोव्हेंबर रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून तिन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात विनानंबरच्या ट्रॅक्टर चालवत असलेल्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

परभणी-वसमत रोडने प्रवास करणारे प्रवासी आणि शेतकर्‍यांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मरे आणि स.पोनि बंदखडके तसेच ताडकळस पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, पोलिस उपनिरीक्षक शिवकांत नागरगोजे, अप्पाराव वराडे, रामकिशन काळे, महामार्ग पोलीस पथकाच्या सहायक पोलीस निरीक्षक मीना करपुडे, पोलीस उपनिरीक्षक नाटकर, टाकरस,पोना विजय मुरकुटे, अनिल भराडे व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. तसेच तिन्ही मृतदेह रूग्णवाहिकेतून जिल्हा सामान्य रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविण्यात आले. पोलिस प्रशासनास मदत करण्यासाठी पोलिस पाटील पंढरीनाथ रिक्षे, बाळासाहेब जावळे, ग्रा.पं.सदस्य अरुण डहाळे आदींनी पुढाकार घेतला.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

The post पत्नी, मुलीसह शिक्षकाने जीव दिला, काही सेकंदात त्रिकोणी कुटुंबाचा अंत; महाराष्ट्र हादरला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110546 0
लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या महिलेची हातोड्याने हत्या, १२ तासात खुनाचा उलगडा, कारण समोर… https://tejpolicetimes.com/?p=110542 https://tejpolicetimes.com/?p=110542#respond Fri, 29 Nov 2024 01:35:11 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110542 लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या महिलेची हातोड्याने हत्या, १२ तासात खुनाचा उलगडा, कारण समोर…

Authored byप्रशांत पाटील | Contributed by संतोष शिराळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 29 Nov 2024, 7:05 am Satara Crime News: वाकड येथे सोमवारी दि. २५ रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली होती. जयश्री विनय मोरे (वय २७, रा. मारुंजी, हिंजवडी) असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे हायलाइट्स: खंबाटकी घाटातील अज्ञात महिलेच्या खुनाचे गूढ उकलले […]

The post लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या महिलेची हातोड्याने हत्या, १२ तासात खुनाचा उलगडा, कारण समोर… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या महिलेची हातोड्याने हत्या, १२ तासात खुनाचा उलगडा, कारण समोर…

Authored byप्रशांत पाटील | Contributed by संतोष शिराळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 29 Nov 2024, 7:05 am

Satara Crime News: वाकड येथे सोमवारी दि. २५ रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली होती. जयश्री विनय मोरे (वय २७, रा. मारुंजी, हिंजवडी) असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे

हायलाइट्स:

  • खंबाटकी घाटातील अज्ञात महिलेच्या खुनाचे गूढ उकलले
  • अवघ्या १२ तासांच्या आत खुनाचा गुन्हा उघडकीस
  • साताराऱ्यातील अतिशय धक्कादायक घटना
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
सातारा खंबाटकी घाट महिला हत्या

संतोष शिराळे, सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंडाळ्याजवळील खंबाटकी घाटात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. हा मृतदेह वाकड (पुणे) पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असलेल्या बेपत्ता महिला जयश्री मोरे हिचा असल्याचे खंडाळा पोलिसांना समजले. त्यामुळे हा गुन्हा खंडाळा पोलिसांनी अधिक तपासासाठी वाकड पोलिसांकडे वर्ग केला. त्यानंतर अवघ्या १२ तासांच्या आत खुनाचा गुन्हा उघडकीस आणून एकास अटक केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथे सोमवारी दि. २५ रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली होती. जयश्री विनय मोरे (वय २७, रा. मारुंजी, हिंजवडी) असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. दिनेश पोपट ठोंबरे (वय ३२, रा. बहुर, पो. करुंज, ता. मावळ) असं अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पिंपरी चिंचवड पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर मृत जयश्री मोरे पतीपासून विभक्त राहत होती. दिनेश ठोंबरे हा हिंजवडी येथील एका कंपनीत सुपरवायझर आहे. त्याचे पहिले लग्न झाले असून त्याला दोन मुले आहेत. दिनेश हा सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असायचा. दरम्यान, पाच वर्षांपूर्वी दिनेश आणि जयश्री यांची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. गेल्या चार वर्षांपासून जयश्री आणि दिनेश हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
https://marathi.indiatimes.com/maharashtra/palghar/vasai-road-station-to-become-terminus-railway-minister-gives-green-light/articleshow/115787577.cms

लिव्ह इन रिलेशनमध्ये असताना त्यांना तीन वर्षांचा मुलगा असल्याचे सांगण्यात आले. जयश्री व दिनेश यांचे काही दिवसांपासून विविध कारणांवरून पटत नव्हते. जयश्री नेहमी दिनेशकडे पैशांची मागणी करत वेगळे राहायचं म्हणत होती. रविवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी दोघेही पुणे येथील भूमकर चौक येथे गाडीत असताना दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर दिनेशने गाडीत ठेवलेल्या हातोड्याने जयश्रीच्या डोक्यात वर्मी घाव घातले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जयश्रीचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दिनेश हा सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंबाटकी घाटात गाडी घेऊन गेला. तेथे घाटात जयश्रीचा मृतदेह फेकला. त्यानंतर दिनेश पिंपरी- चिंचवडमध्ये परत गेला. सोमवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी दिनेश ठोंबरे याने जयश्री बेपत्ता असल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात दिली.

दरम्यान, खंबाटकी घाटात अज्ञात महिलेचा मृतदेह दिसून येत असल्याबाबत एका प्रवाशाने पोलीस कंट्रोलला ११२ नंबरला कॉल करून सांगितले. त्यानंतर खंडाळा पोलिसांनी खंबाटकी घाटात धाव घेत पोलीस कर्मचारी व खंडाळा तालुका रेस्क्यू टीमच्या साह्याने मृतदेह दरीतून वर काढण्यात आला. त्यानंतर जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या आदेशान्वये पोलीस उपअधीक्षक राहुल धस, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अरुण देवकर, खंडाळा पोलीस निरीक्षक सुनील शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष म्हस्के, पोलीस हवालदार संजय जाधव, संजय पोळ, शरद तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार नितीन महांगरे, अमित चव्हाण यांनी दूरदृष्टी दाखवत मिसींग व्यक्तींबद्दल ऑनलाईन तपासणी केली असता मिळतेजुळते वर्णनाची महिला वाकड येथून बेपत्ता असल्याबाबत माहिती मिळाली.
https://marathi.indiatimes.com/india-news/ajit-pawar-says-he-will-get-the-finance-ministry-of-maharashtra-make-the-record-of-presenting-budget/articleshow/115787235.cms

जयश्रीचे वर्णन असलेल्या महिलेचा मृतदेह मिळाल्याची माहिती वाकड पोलिसांना दिली असता खंडाळा पोलीस व पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली असता यामागे दिनेश ठोंबरेच असल्याचं पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर समोर आले. बनाव करण्यासाठी दिनेश याने जयश्रीच्या तीन वर्षीय मुलाला आळंदीत बेवारस सोडून दिल्याचे निदर्शनास आले. याबाबतची पोलिसांनी सोशल मीडियावर पोस्टदेखील व्हायरल केली होती. ज्यानंतर लहान मुलगा आळंदी पोलिसांना मिळून आला होता. खंडाळा पोलिसांचे सहकार्याने वाकड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून अवघ्या १२ तासांत गुन्हा उघडकीस आणून दिनेश याला अटक केली.

सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, सहायक निरीक्षक सुभाष चव्हाण, उपनिरीक्षक अनिरुध्द सावर्डे, भारत माने, श्रेणी उपनिरीक्षक बिभीषण कन्हेरकर, पोलिस अंमलदार वंदु गिरे, नामदेव वडेकर, रामचंद्र तळपे, तात्यासाहेब शिंदे, सौदागर लामतुरे, कौंतेय खराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

The post लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या महिलेची हातोड्याने हत्या, १२ तासात खुनाचा उलगडा, कारण समोर… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110542 0
Raigad : इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला! फी भरायला पैसे नाही म्हणून…. एक निर्णय चुकला आणि थेट जेलमध्ये गेला; काय घडलं? https://tejpolicetimes.com/?p=110357 https://tejpolicetimes.com/?p=110357#respond Wed, 27 Nov 2024 11:29:01 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110357 Raigad : इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला! फी भरायला पैसे नाही म्हणून…. एक निर्णय चुकला आणि थेट जेलमध्ये गेला; काय घडलं?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 27 Nov 2024, 4:59 pm Raigad : उरण नाका परिसरात असलेल्या कोळेश्‍वर चौक येथील पुजारा टेलिकॉम दुकानात दरोडा टाकून लाखों रुपयांच्या मोबाईल फोनवर डल्ला मारला. ही चोरी का केली याची विचारणा केली असता अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तिसऱ्या वर्षाची फी भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नसल्याची माहिती आकाशने पोलिसांना दिली. अमुलकुमार जैन, रायगड : अभियांत्रिकी […]

The post Raigad : इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला! फी भरायला पैसे नाही म्हणून…. एक निर्णय चुकला आणि थेट जेलमध्ये गेला; काय घडलं? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Raigad : इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला! फी भरायला पैसे नाही म्हणून…. एक निर्णय चुकला आणि थेट जेलमध्ये गेला; काय घडलं?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 27 Nov 2024, 4:59 pm

Raigad : उरण नाका परिसरात असलेल्या कोळेश्‍वर चौक येथील पुजारा टेलिकॉम दुकानात दरोडा टाकून लाखों रुपयांच्या मोबाईल फोनवर डल्ला मारला. ही चोरी का केली याची विचारणा केली असता अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तिसऱ्या वर्षाची फी भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नसल्याची माहिती आकाशने पोलिसांना दिली.

अमुलकुमार जैन, रायगड : अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तिसऱ्या वर्षाची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने आकाश राजाराम वळकुंडे (राहणार – प्रदिप म्हात्रे यांचे चाळीत, घर नंबर १६२, मु.पो. पुंडे, ता. उरण, जि. रायगड. मुळ राहणार – मु.पो. घेरडी, ता. सांगोळा, जि. सोलापूर ) याने रायगड जिल्ह्यातील पनवेल शहरातील उरण नाका परिसरात असलेल्या कोळेश्‍वर चौक येथील पुजारा टेलिकॉम दुकानात दरोडा टाकून लाखों रुपयांच्या मोबाईल फोनवर डल्ला मारला. मात्र, तो आता नवी मुंबई येथील सीबीडी बेलापुर रेल्वे स्थानक पार्किंग परिसरातून पोलिसांच्या जाळ्यात सापडला असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष २ पनवेल यांच्याकडून मिळाली आहे.

पुजारा टेलीकॉम शॉपचे शटर कोणीतरी अज्ञात चोरट्याने कडी कोयंडा कापून दुकानामधील विक्रीस ठेवलेले नवीन आणि जुने असे २३ लाख ९५ हजार रूपये किंमतीचे एकूण ५५ मोबाईल फोन चोरी करून आरोपी फरार झाला होता. चोरीची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून अज्ञात आरोपीविरोधात चोरीचा गुन्हा नोंद केला होता.पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आरोपी येण्याजाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली असता गुन्ह्यातील आरोपी घटनेच्या रात्री मोटरसायकलवरून घटनास्थळ परिसरात वावरत असल्याचे दिसून आले. आरोपी हा उरण परिसरातील असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आरोपीला पनवेल गुन्हे शाखा कक्ष २च्या पथकाने २१ नोव्हेंबर रोजी पहाटे बेलापूर येथून अटक केली. आरोपीची तपासणी केली असता आरोपीकडून पोलिसांनी आतापर्यंत ४१ मोबाईल ज्यांची किंमत १९ लाख २२ हजार ७७१ रुपये इतकी आहे ते हस्तगत केले आहेत. हे मोबाईल कोणाचे आहेत, याची चौकशी केल्यानंतर हे मोबाईल चोरीचे असल्याची कबूली आरोपी आकाशने दिली.

आकाश उरणमध्ये आपल्या आई आणि बहिणीसोबत राहत राहतो. सध्या आकाश इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात नवी मुंबई परिसरातील एका नामांकित महाविद्यालयात अभियांत्रिकीचे धडे गिरवत होता. मात्र हे धडे गिरवताना आकाशचा निर्णय चुकला आणि आकाश पोलिसांच्या जाळ्यात अडकला. ही चोरी का केली याची विचारणा केली असता अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तिसऱ्या वर्षाची फी भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नसल्याची माहिती आकाशने पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपीकडून लाखो रुपयाचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध पोलीस आयुक्त, नवी मुंबई मिलिंद भारंबे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे दिपक साकोरे, पोलीस उप.आयुक्त गुन्हे, अमित काळे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच सपोआ, गुन्हे शाखा अजयकुमार लांडगे यांच्या पर्यवेक्षणाखाली गुन्हे शाखा कक्ष २ नेमणूकीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उमेश गवळी, सपो.नि. प्रविण फडतरे, अजित कानगुडे, पोउपनि प्रताप देसाई, मानसिंग पाटील, माधव इंगळे, अभयसिंह शिंदे, पोलीस हवालदार रमेश शिंदे, अनिल पाटील, प्रशांत काटकर, मधुकर गडगे, तुकाराम सुर्यवंशी, रणजित पाटील, निलेश पाटील, इंद्रजित कानु, रूपेश पाटील, सागर रसाळ, दिपक डोंगरे, अजित पाटील, पोलीस नाईक अजिनाथ फुंदे, पोलीस शिपाई लवंकुश शिंगाडे, विकांत माळी यांनी केली आहे.

Source link

The post Raigad : इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला! फी भरायला पैसे नाही म्हणून…. एक निर्णय चुकला आणि थेट जेलमध्ये गेला; काय घडलं? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110357 0
नातेवाईकाच्या अंत्यविधीवरुन परतले, घराचं दार उघडताच समोर पत्नी अन् लेक… जळगाव हादरलं https://tejpolicetimes.com/?p=110067 https://tejpolicetimes.com/?p=110067#respond Mon, 25 Nov 2024 07:49:09 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110067 नातेवाईकाच्या अंत्यविधीवरुन परतले, घराचं दार उघडताच समोर पत्नी अन् लेक… जळगाव हादरलं

Jalgaon Woman And Daughter Suicide: घरी कोणी नसताना एका ३६ वर्षीय विवाहित महिलेने आठ वर्षीय मुलीसोबत गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जळगाव शहरातील व्यंकटेशनगरमध्ये ही घटना घडली. Lipi निलेश पाटील, जळगाव: घरी कोणीही नसताना सोनाली दीपक दाभाडे (वय ३६) या विवाहित महिलेने पोटच्या मुलीसह गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी […]

The post नातेवाईकाच्या अंत्यविधीवरुन परतले, घराचं दार उघडताच समोर पत्नी अन् लेक… जळगाव हादरलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
नातेवाईकाच्या अंत्यविधीवरुन परतले, घराचं दार उघडताच समोर पत्नी अन् लेक… जळगाव हादरलं

Jalgaon Woman And Daughter Suicide: घरी कोणी नसताना एका ३६ वर्षीय विवाहित महिलेने आठ वर्षीय मुलीसोबत गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जळगाव शहरातील व्यंकटेशनगरमध्ये ही घटना घडली.

Lipi

निलेश पाटील, जळगाव: घरी कोणीही नसताना सोनाली दीपक दाभाडे (वय ३६) या विवाहित महिलेने पोटच्या मुलीसह गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडली. महिलेचा पती दिपक दाभाडे हे नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी गेले असताना ही घटना घडली. पती घरी परतल्यानंतर दरवाजा उघडताच त्याला समोर पत्नी आणि मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. हे पाहताच त्यांनी एकच आक्रोश केला.

हरीविठ्ठल नगर परिसरातील व्यंकटेशनगरमध्ये दीपक दाभाडे हे तिसऱ्या मजल्यावर राहतात भुसावळ येथे त्यांच्या नातेवाईकांचे निधन झाल्याने ते रविवारी सकाळी ते आपल्या दोन भावांसह अंत्यसंस्कारासाठी गेले होते. त्यावेळी घरी दीपक यांच्या पत्नी सोनाली आणि मुलगी तेजस्विनी होते. घरात कोणीही नसताना सोनाली यांनी आठ वर्षीय मुलीला छताच्या पंख्याला दोरीने गळफास दिला आणि स्वतः देखील दुसऱ्या दोरीने गळफास घेतला या प्रकरणी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लग्नानंतर काही वर्ष आपत्य होत नसल्याने दीपक यांनी मोठे भाऊ जितेंद्र यांची मुलगी काव्याला दत्तक घेतले होते. त्यानंतर दीपक आणि सोनाली या दाम्पत्याला मुलगी झाली. रविवारी ही घटना घडली त्यावेळी काव्या खालच्या मजल्यावर खेळत होती. पत्नी आणि मुलीने गळफास घेतल्याचा मोठा धक्का दीपक यांना बसला आणि त्यांचा रक्तदाब कमी झाला होता.

दाभाडे दाम्पत्यामध्ये कोणताही वादविवाद नव्हता, असे त्यांच्या नातेविकांसह मित्रपरिवाराने सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच ते खुलताबाद वेरूळ शनिशिंगणापूर या ठिकाणी देवदर्शन करून परतले होते. त्यानंतरही दैनंदिन कामे नित्य नियमाने सुरू होते. कोणताही वाद नसताना या महिलेने पोटच्या गोळ्यासह आत्महत्या का केली याविषयी सर्वांना प्रश्न पडला आहे. सोनाली यांना मानेचा आणि छाती दुखीचा त्रास होता असे त्यांचे दीर संदीप दाभाडे यांनी सांगितले.

सोनाली यांचे मालेगाव येथील माहेर आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या माहेरचे मंडळी संध्याकाळी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पोहोचले यावेळी त्यांनी सोनालीचा मृतदेह बघताच मोठा आक्रोश केला.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

The post नातेवाईकाच्या अंत्यविधीवरुन परतले, घराचं दार उघडताच समोर पत्नी अन् लेक… जळगाव हादरलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110067 0
Beed Crime: ऐन निवडणुकीच्या काळात बीडमध्ये मध्यरात्री गोळीबार, दोन जखमी, नेमकं काय घडलं? https://tejpolicetimes.com/?p=109108 https://tejpolicetimes.com/?p=109108#respond Sun, 17 Nov 2024 08:09:18 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109108 Beed Crime: ऐन निवडणुकीच्या काळात बीडमध्ये मध्यरात्री गोळीबार, दोन जखमी, नेमकं काय घडलं?

Beed Firing: संदीप तांदळे आणि अभय पंडित असं जखमी झालेल्या तरुणांचे नाव आहे. हा गोळीबार नेमका कोणत्या कारणाने झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. हायलाइट्स: ऐन निवडणुकीच्या काळात बीडमध्ये मध्यरात्री गोळीबार बीडमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं? धक्कादायक घटनेत दोन युवक जखमी Lipi बीड मध्यरात्री गोळीबार दिपक जाधव, बीड : बीडच्या अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्थानकाच्या […]

The post Beed Crime: ऐन निवडणुकीच्या काळात बीडमध्ये मध्यरात्री गोळीबार, दोन जखमी, नेमकं काय घडलं? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Beed Crime: ऐन निवडणुकीच्या काळात बीडमध्ये मध्यरात्री गोळीबार, दोन जखमी, नेमकं काय घडलं?

Beed Firing: संदीप तांदळे आणि अभय पंडित असं जखमी झालेल्या तरुणांचे नाव आहे. हा गोळीबार नेमका कोणत्या कारणाने झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

हायलाइट्स:

  • ऐन निवडणुकीच्या काळात बीडमध्ये मध्यरात्री गोळीबार
  • बीडमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
  • धक्कादायक घटनेत दोन युवक जखमी
Lipi
बीड मध्यरात्री गोळीबार

दिपक जाधव, बीड : बीडच्या अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बीडमध्ये झालेल्या या गोळीबाराने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा पोलीस सध्या अधिक तपास करतायत. बीड लातूर रोडवरील सेलू आंबा टोल नाक्यावर ही घटना घडली. या घटनेमध्ये दोन युवक जखमी झालेत. संदीप तांदळे आणि अभय पंडित असं जखमी झालेल्या तरुणांचे नाव आहे. हा गोळीबार नेमका कोणत्या कारणाने झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण निवडणुकीच्या काळात ही घटना घडल्याने पोलीसही सतर्क झाले आहेत. सध्य पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास केला जातोय.
Ajit Pawar : ‘जोर का झटका धीरे से लगा’! ‘तो राग माझ्यावर काढू नका’; अजित पवारांची बारामतीकरांना कळकळीची विनंती

दरम्यान, दुसरीकडे बीडच्या परळी तालुक्यातील शिरसाळा येथे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची संयुक्त सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने त्यांना या सभेला येता आलं नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी मोबाईलहून उपस्थितांना वर्चुअल मार्गदर्शन केले. पंकजा मुंडे शुक्रवारी नाशिकच्या दौऱ्यावर होत्या. या दरम्यान नाशिक मधील सभा आटोपून त्यांना धनंजय मुंडे यांच्या प्रचारासाठी शिरसाळा येथे पोहोचायचे होते. मात्र त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने त्यांना पोहोचता आलं नाही.

लोकसभा निवडणुकीत बहिणीच्या विजयासाठी धनंजय मुंडे यांनी जिल्हा पिंजून काढला होता. आता संपूर्ण महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा पंकजा मुंडे सांभाळत आहेत. दरम्यान सध्या पंकजा मुंडेंचा या वर्चुअर मार्गदर्शनाचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांनी त्यांच्या सभेसाठी जमलेल्यांना फोनवरुन मार्गदर्शन केलं.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

The post Beed Crime: ऐन निवडणुकीच्या काळात बीडमध्ये मध्यरात्री गोळीबार, दोन जखमी, नेमकं काय घडलं? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109108 0
पोलिसांना पाहून नजर चुकवली, संशय बळावला दोघांची तपासणी केल्यावर अधिकारी चक्रावले, काय घडलं? https://tejpolicetimes.com/?p=108586 https://tejpolicetimes.com/?p=108586#respond Thu, 14 Nov 2024 07:30:04 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108586 पोलिसांना पाहून नजर चुकवली, संशय बळावला दोघांची तपासणी केल्यावर अधिकारी चक्रावले, काय घडलं?

Nagpur 1.35 Crores Seized : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसील पोलीस बंदोबस्तात सातत्याने वाहनांची तपासणी करण्यात येत होती. दरम्यान, दुचाकीवरून येणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांना संशय आला. त्याआधारे त्यांची गाडी थांबवून तपासणी करण्यात आली. हायलाइट्स: दुचाकीवरुन जाताना पोलिसांना संशय बाईकला थांबवताच कोट्यवधीची रोकड जप्त पोलिसांना वेगळाच संशय Lipiनागपूर करोडोंची रोकड जप्त जितेंद्र खापरे ,नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पैसे […]

The post पोलिसांना पाहून नजर चुकवली, संशय बळावला दोघांची तपासणी केल्यावर अधिकारी चक्रावले, काय घडलं? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पोलिसांना पाहून नजर चुकवली, संशय बळावला दोघांची तपासणी केल्यावर अधिकारी चक्रावले, काय घडलं?

Nagpur 1.35 Crores Seized : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसील पोलीस बंदोबस्तात सातत्याने वाहनांची तपासणी करण्यात येत होती. दरम्यान, दुचाकीवरून येणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांना संशय आला. त्याआधारे त्यांची गाडी थांबवून तपासणी करण्यात आली.

हायलाइट्स:

  • दुचाकीवरुन जाताना पोलिसांना संशय
  • बाईकला थांबवताच कोट्यवधीची रोकड जप्त
  • पोलिसांना वेगळाच संशय
Lipi
नागपूर करोडोंची रोकड जप्त

जितेंद्र खापरे ,नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पैसे जप्त करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. दरम्यान, काल बुधवारी मोठी कारवाई करत पोलिसांनी एका दुचाकीवरून तब्बल १ कोटी ३५ लाख रुपये जप्त केले. पोलिसांनी दुचाकी चालकाला ताब्यात घेतलं आहे. साकीर खान हाजी नसीर खान (वय ४२, रा. यशोधरा नगर) असं आरोपीचं नाव आहे. चौकशीदरम्यान ही रक्कम कोणाची होती, याबाबत आरोपीला माहिती देता आली नाही. प्राथमिक तपासात हवालाचा पैसा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात मिळालेल्या पैशांबाबत एकच चर्चा सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसील पोलीस बंदोबस्तात सातत्याने वाहनांची तपासणी करण्यात येत होती. दरम्यान, दुचाकीवरून येणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांना संशय आला. त्याआधारे त्यांची गाडी थांबवून तपासणी करण्यात आली. जिथे पोलिसांना १ कोटी ३५ लाख कोटी रुपये रोख सापडले. पैसे सापडताच पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. ही रक्कम कोणाची आहे? अशी विचारणा केली असता तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. तसेच पैशाचे कोणतेही कागदपत्रही सादर करू शकला नाही. निवडणुकीच्यावेळी मिळालेली रक्कम पाहता पोलिसांनी पैसे आणि दुचाकी असा एकूण १ कोटी ५० कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Ambulance Cylinder Explosion: दुपारी शाहांच्या ताफ्यात, संध्याकाळी बाळंतीणीला नेताना रुग्णवाहिकेत स्फोट, १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या

आरोपी साकीर खान हाजी नसीर खान हा बिन्नी नावाच्या व्यक्तीकडे ड्रायव्हर म्हणून काम करतो. या अगोदरही त्याने बिन्नी याच्याकडे पैसे सुपूर्द केले होते. त्याने इकडून तिकडे बदली करून सोडण्याचे काम केले होते. आजही आरोपी साकीर खान हा कोणालातरी मोठी रक्कम घेऊन सोडणार असल्याची गुप्त माहिती तहसील पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. अशी माहिती मिळताच तहसील पोलिसांनी सापळा रचून रक्कम जप्त करून आरोपीला ताब्यात घेतलं.

पोलिसांकडून अशा कारवायांवर करडी नजर असताना निवडणुकीच्या वातावरणात ही कारवाई करण्यात आली आहे. मोठ्या रकमेचा व्यवहार होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानंतर त्यांनी ही कारवाई केली. आता हा पैसा कुठे वापरला जाणार होता किंवा हा पैसा कोणाकडे पोहोचवणार होता. प्राथमिक तपासात ही रक्कम हवालाची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

The post पोलिसांना पाहून नजर चुकवली, संशय बळावला दोघांची तपासणी केल्यावर अधिकारी चक्रावले, काय घडलं? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108586 0