Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
deputy cm - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Wed, 04 Dec 2024 11:27:01 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg deputy cm - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 तुम्ही दादांसोबत DCMपदाची शपथ घेणार का? शिंदेंना प्रश्न, दादांंकडून उत्तर; एकच हास्यकल्लोळ https://tejpolicetimes.com/?p=111193 https://tejpolicetimes.com/?p=111193#respond Wed, 04 Dec 2024 11:27:01 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111193 तुम्ही दादांसोबत DCMपदाची शपथ घेणार का? शिंदेंना प्रश्न, दादांंकडून उत्तर; एकच हास्यकल्लोळ

Eknath Shinde: भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्रिपदासाठी करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी आज राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्रिपदासाठी करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी आज राज्यपालांची […]

The post तुम्ही दादांसोबत DCMपदाची शपथ घेणार का? शिंदेंना प्रश्न, दादांंकडून उत्तर; एकच हास्यकल्लोळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
तुम्ही दादांसोबत DCMपदाची शपथ घेणार का? शिंदेंना प्रश्न, दादांंकडून उत्तर; एकच हास्यकल्लोळ

Eknath Shinde: भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्रिपदासाठी करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी आज राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्रिपदासाठी करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी आज राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर तिघांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली. नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे असणार का, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला. शिंदेंनी याबद्दलचा सस्पेन्स आजही कायम ठेवला.

‘एकनाथ शिंदेंनी सरकारमध्ये राहावं, राज्याच्या हितासाठी काम करावं अशी आमची इच्छा आहे. शिवसेनेचे आमदारदेखील त्यासाठी आग्रही आहेत. त्यांना याबद्दल मी विनंती केली आहे. याविषयीचा निर्णय ते संध्याकाळपर्यंत घेतील. ते सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे,’ असं फडणवीस म्हणाले. त्यामुळे नव्या सरकारमध्ये शिंदे असणार की नाही हा प्रश्न कायम राहिला.
ते आधी डोक्यातून काढून टाका! अजितदादांनी वाचली दिल्ली भेटीच्या कारणांची लांबलचक यादी
देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. मग एकनाथ शिंदे बोलू लागले. तेव्हा त्यांनाही शपथविधीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही दादांसोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का, असा थेट सवाल पत्रकारांकडून विचारला गेला. त्यावर आताच देवेंद्रजींना याबद्दल सांगितलंय. मी पण सांगतोय, थांबा थोडं. संध्याकाळपर्यंत थांबा. शपथविधी उद्या आहे, असं उत्तर शिंदेंनी दिलं.

शिंदे उत्तर देत असताना अजित पवार यांनी त्यांचं मध्येच तोडलं. ‘संध्याकाळपर्यंत त्यांच्या शपथविधीचं समजेल. पण मी तर शपथ घेणार आहे,’ असं अजित पवार म्हणाले. त्यानंतर एकच हास्यकल्लोळ उडाला. अजित पवारांचं मिश्किल विधान ऐकून सारेच हसले. फडणवीस, शिंदेंनाही त्यांचं हसू आवरता आलं नाही.
Devendra Fadnavis: राज्यात MP, राजस्थान पॅटर्न नाही! देवाभाऊंच्या निवडीमागे १० कारणं; तिसरं दादा, भाईंसाठी सूचक
अजित पवारांच्या विधानावर सारेच हसत असताना एकनाथ शिंदेंनी संधी साधत चौकार मारला. ‘दादांना संध्याकाळी शपथ घ्यायचाही अनुभव आहे आणि सकाळी शपथ घेण्याचाही अनुभव आहे,’ असं शिंदे म्हणाले. त्यानंतर पुन्हा हशा पिकला. शिंदेंच्या टोल्यानंतर पुन्हा एकदा दादा बोलले. ‘आम्ही दोघांनी सकाळी शपथ घेतली होती. ते राहून गेलं होतं. आता पुढे ५ वर्षे राहणार आहोत,’ असं अजित पवार म्हणाले.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post तुम्ही दादांसोबत DCMपदाची शपथ घेणार का? शिंदेंना प्रश्न, दादांंकडून उत्तर; एकच हास्यकल्लोळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111193 0
शिंदे उप होणार नाहीत, पण ते…; मोदींच्या मंत्र्यांचं विधान, भाईंना मोठं पद मिळणार? https://tejpolicetimes.com/?p=111003 https://tejpolicetimes.com/?p=111003#respond Mon, 02 Dec 2024 13:57:28 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111003 शिंदे उप होणार नाहीत, पण ते…; मोदींच्या मंत्र्यांचं विधान, भाईंना मोठं पद मिळणार?

Ramdas Athawale: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापन झालेली नसताना काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापन झालेली नसताना काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. सत्ता स्थापनेत माझा अडसर नाही. भाजप नेतृत्त्वाचा निर्णय मान्य असेल असं शिंदेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यानंतर ते […]

The post शिंदे उप होणार नाहीत, पण ते…; मोदींच्या मंत्र्यांचं विधान, भाईंना मोठं पद मिळणार? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
शिंदे उप होणार नाहीत, पण ते…; मोदींच्या मंत्र्यांचं विधान, भाईंना मोठं पद मिळणार?

Ramdas Athawale: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापन झालेली नसताना काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापन झालेली नसताना काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. सत्ता स्थापनेत माझा अडसर नाही. भाजप नेतृत्त्वाचा निर्णय मान्य असेल असं शिंदेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यानंतर ते दिल्लीला जाऊन अमित शहांना भेटले. तिथून परतल्यावर ते थेट गावी गेले. तिथे शिंदेंनी मुक्काम केल्यामुळे महायुतीच्या बैठका रद्द झाल्या. आता शिंदे ठाण्यात परतले असले तरीही त्यांना बैठका रद्द केल्या आहेत. त्यामुळे शिंदेंचं नेमकं चाललंय काय, असा प्रश्न विचारला जात आहे. शिंदेंची नाराजी स्वाभाविक असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.

‘सत्ता स्थापनेसाठी मोदी, शहा जो निर्णय घेतील तो मंजूर असेल असं शिंदेंनी आधीच सांगितलं आहे. त्यांची थोडी नाराजी समजू शकतो. भाजपच्या जागा खूप जास्त आल्या आहेत. शिंदेंना अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळालं आहे. त्यात त्यांनी खूप चांगलं काम केलं. ते माणूस म्हणूनही चांगले आहेत. मुख्यमंत्रिपदाबद्दल मोदी, शहा जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल. शिंदे यांचं नाव जाहीर झालं तर स्वागत करु. फडणवीसांचं नाव निश्चित झाल्यास तेही चांगलंच असेल. भाजपचं नेतृत्त्व निर्णय घेईल, तो निर्णय शिंदे, फडणवीस मान्य करतील,’ असं आठवले म्हणाले.
Eknath Shinde: गावावरुन येताच बैठका रद्द; शिंदे काय करणार? ३ शक्यता; तिसरी प्रत्यक्षात आल्यास भाजपला फटका
शिंदे खरोखर नाराज आहेत का, असा प्रश्न आठवलेंना विचारण्यात आला. त्यावर थोडी नाराजी असणं साहजिक आहे. अडीच वर्षे त्यांना मुख्यमंत्रिपद मिळालं. यानंतर भविष्यात पुन्हा अशी संधी मिळणार की नाही याबद्दल त्यांना शंका आहे. थोडी नाराजी आपण समजू शकतो. ते नाराज जरुर आहेत. पण महायुतीचं सरकार स्थापन व्हायला हवं. विकासाच्या अजेंड्यावर आम्हाला काम करायचं आहे. ते स्वत: उपमुख्यमंत्री होणार नाहीत. पण ते महायुतीचे अध्यक्ष होऊ शकतात. आमच्या युतीचं अध्यक्षपद त्यांना दिलं जाऊ शकतं. सरकारवर कमांड ठेवण्याचं काम ते करु शकतात. त्यामुळे त्यांना महायुतीचं अध्यक्षपद द्यायला हवं असं मला वाटतं,’ असं आठवलेंनी म्हटलं.
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणांना १५००चे २१०० रुपये कधी मिळणार? मुनगंटीवारांनी सांगितल्या ३ शक्यता
शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही शब्द देण्यात आलेला नव्हता, याचा पुनरुच्चार आठवलेंनी केला. ‘त्यांना मुख्यमंत्रिपदासाठी शब्द दिला गेला नव्हता. निवडणूक त्यांच्याच नेतृत्त्वात लढली गेली. पण सरकार पुन्हा आल्यावर तुम्हालाच मुख्यमंत्री करु, असं आश्वासन त्यांना दिलेलं नव्हतं. भाजपला मिळालेल्या जागा पाहता त्यांचाच मुख्यमंत्री होईल. पण नेतृत्त्वानं अद्याप निर्णय घेतलेला नाही. नेतृत्त्वानं कोणाचंही नाव निश्चित केलं तरीही आम्ही त्यांचं स्वागत करु, असं आठवले शेवटी म्हणाले.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post शिंदे उप होणार नाहीत, पण ते…; मोदींच्या मंत्र्यांचं विधान, भाईंना मोठं पद मिळणार? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111003 0
गावावरुन येताच बैठका रद्द; शिंदे काय करणार? ३ शक्यता; तिसरी प्रत्यक्षात आल्यास भाजपला फटका https://tejpolicetimes.com/?p=110960 https://tejpolicetimes.com/?p=110960#respond Mon, 02 Dec 2024 12:52:24 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110960 गावावरुन येताच बैठका रद्द; शिंदे काय करणार? ३ शक्यता; तिसरी प्रत्यक्षात आल्यास भाजपला फटका

Eknath Shinde: निकाल लागून आठवडा उलटला असला तरीही महायुतीनं राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या सगळ्या बैठका रद्द केल्या आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या महायुतीला अद्याप सत्ता स्थापन करता आलेली नाही. निकाल लागून आठवडा उलटला असला तरीही महायुतीनं राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री […]

The post गावावरुन येताच बैठका रद्द; शिंदे काय करणार? ३ शक्यता; तिसरी प्रत्यक्षात आल्यास भाजपला फटका first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
गावावरुन येताच बैठका रद्द; शिंदे काय करणार? ३ शक्यता; तिसरी प्रत्यक्षात आल्यास भाजपला फटका

Eknath Shinde: निकाल लागून आठवडा उलटला असला तरीही महायुतीनं राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या सगळ्या बैठका रद्द केल्या आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या महायुतीला अद्याप सत्ता स्थापन करता आलेली नाही. निकाल लागून आठवडा उलटला असला तरीही महायुतीनं राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या सगळ्या बैठका रद्द केल्या आहेत. ते ठाण्यातील घरी आराम करत आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी दोन दिवस मौन बाळगलं. त्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेत सत्ता स्थापनाचे सर्वाधिक भाजप नेतृत्त्वाला दिले. मग दिल्लीवारी करुन परतताच शिंदे थेट गावाला गेले. तिकडे मुक्काम करुन परतल्यावर शिंदेंनी सगळ्या गाठीभेटी रद्द केल्या आहेत. त्यामुळे शिंदेंचं नेमकं चाललंय काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणांना १५००चे २१०० रुपये कधी मिळणार? मुनगंटीवारांनी सांगितल्या ३ शक्यता
शिंदे नेमकं काय करणार? ३ शक्यता कोणत्या?

१. उपमुख्यमंत्रिपदासह महत्त्वाची खाती- भाजपकडे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे, अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद अशी रचना पुढील सरकारमध्ये असू शकते. भाजपकडून शिंदेंना तशीच ऑफर आहे. उपमुख्यमंत्रिपद मिळणार असेल तर मग गृह मंत्रालय मिळावं, अशी शिंदेंची मागणी आहे. गृह विभाग महत्त्वाचा असल्यानं या मंत्रालयासह उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यास शिंदेंना अडचण नसेल. फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृह विभाग होता. त्याच प्रकारे शिंदेंना गृह मंत्रालय मिळावं, असा शिवसेनेचा युक्तिवाद आहे.

२. स्वत:च्या जागी अन्य नेत्याकडे उपमुख्यमंत्रिपद- भाजपनं गृह मंत्रालय सोडण्यास नकार दिल्यास शिंदे स्वत:च्या जागी अन्य नेत्याकडे उपमुख्यमंत्रिपद देऊ शकतात. शिंदेंचे पुत्र श्रीकांत यांच्या नावाची चर्चा या पदासाठी सुरु होती. खुद्द एकनाथ शिंदेंनी काल साधकबाधक चर्चा सुरु असल्याचं विधान केलं होतं. पण श्रीकांत शिंदेंनी आपल्याला कोणत्याही पदाची लालसा नसल्याचं म्हणत उपमुख्यमंत्रिपदाच्या बातम्या तथ्यहीन असल्याचं म्हटलं. सेनेकडून दीपक केसरकर यांचं नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. याशिवाय उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे यांची नावंही चर्चेत आहेत.
५ डिसेंबरला आझाद मैदानात नेमका कोणाचा शपथविधी? भाजपच्या गोटातून महत्त्वाची माहिती
३. सरकारला बाहेरुन पाठिंबा- शिंदेंनी शहांना त्यांच्या मागण्यांसंदर्भात तीन प्रस्ताव दिले. त्यातील तिसऱ्या पर्यायात बाहेरुन पाठिंब्याचा उल्लेख आहे. खात्यांबद्दलच्या मागण्या पूर्ण न झाल्यास शिंदे हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन सरकारला पाठिंबा देऊ शकतात. तसा प्रस्तावच त्यांनी शहांना दिला आहे. यामध्ये थेट दबावाचं राजकारण आहे. शिंदे सरकारबाहेर राहिल्यास त्यांची उपमुख्यमंत्रिपदी पदानवती होणार नाही. पण यामुळे शिंदे भाजपला अडचणीत आणू शकतात. सहकारी पक्षाला भाजपनं सोबत घेतलं नाही, हिंदुत्त्वावादी पक्षासोबत सरकार स्थापन न करता भाजपला राष्ट्रवादी काँग्रेस जवळची वाटली, असा संदेश यातून जाऊ शकतो. त्यामुळे जनमानसात भाजपची प्रतिमा खराब होऊ शकते. आपल्यावर अन्याय झाल्याचं पर्सेप्शन निर्माण करण्याचा प्रयत्न शिंदेंकडून केला जाऊ शकतो.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post गावावरुन येताच बैठका रद्द; शिंदे काय करणार? ३ शक्यता; तिसरी प्रत्यक्षात आल्यास भाजपला फटका first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110960 0