Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
husband wife fight - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Wed, 31 Jan 2024 02:14:39 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg husband wife fight - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 आधी बीअर ऑफर, पतीला बोलण्यात गुंतवलं अन् मग सर्पदंश, पत्नीच्या प्लॅनने साऱ्यांना शॉक https://tejpolicetimes.com/?p=81322 https://tejpolicetimes.com/?p=81322#respond Wed, 31 Jan 2024 02:14:39 +0000 https://tejpolicetimes.com/?p=81322 आधी बीअर ऑफर, पतीला बोलण्यात गुंतवलं अन् मग सर्पदंश, पत्नीच्या प्लॅनने साऱ्यांना शॉक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: खर्चासाठी पैसे देत नाही, या क्षुल्लक कारणातून पतीचा ‘काटा’ काढण्याचा प्रयत्न करून पत्नीने साथीदारामार्फत पतीला थेट सर्पदंश घडवल्याची धक्कादायक घटना घडली. बोरगडच्या उज्ज्वल नगरातील साईप्रसाद बंगल्यात हा प्रकार घडला. हल्ल्यातून बचावलेल्या पतीच्या फिर्यादीवरून संशयित पत्नीसह साथीदाराविरुद्ध म्हसरूळ पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला आहे.म्हसरूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल पोपटराव पाटील (४१, रा. […]

The post आधी बीअर ऑफर, पतीला बोलण्यात गुंतवलं अन् मग सर्पदंश, पत्नीच्या प्लॅनने साऱ्यांना शॉक first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आधी बीअर ऑफर, पतीला बोलण्यात गुंतवलं अन् मग सर्पदंश, पत्नीच्या प्लॅनने साऱ्यांना शॉक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: खर्चासाठी पैसे देत नाही, या क्षुल्लक कारणातून पतीचा ‘काटा’ काढण्याचा प्रयत्न करून पत्नीने साथीदारामार्फत पतीला थेट सर्पदंश घडवल्याची धक्कादायक घटना घडली. बोरगडच्या उज्ज्वल नगरातील साईप्रसाद बंगल्यात हा प्रकार घडला. हल्ल्यातून बचावलेल्या पतीच्या फिर्यादीवरून संशयित पत्नीसह साथीदाराविरुद्ध म्हसरूळ पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला आहे.

म्हसरूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल पोपटराव पाटील (४१, रा. उज्ज्वलनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित पत्नी सोनी उर्फ एकता राजेंद्र जगताप हिच्यासह अज्ञाताविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. २७ जानेवारी रोजी सायंकाळी पत्नीने पती विशाल यांना बीअर पाजली. ते बीअरच्या नशेत असताना संशयिताने त्यांचा गळा दाबला, तर पत्नीने तोंड दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गळा दाबणाऱ्या संशयिताने विशाल यांच्या गळ्यावर विषारी साप धरून त्यांना गळ्यावर दंश करवला. यानंतर घाबरलेल्या विशाल यांनी मध्यरात्री कसेबसे घराबाहेर पडत मित्रांकडे मदत मागितली. मित्रांनी मध्यरात्री एक वाजता त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यानंतर तत्काळ उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय तक्रारीनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे यांचे पथक तपासासाठी पोहोचले. त्यांनी विशाल यांचा जबाब नोंदविल्यानंतर या क्रूर घटनेची उकल झाली. त्यानंतर संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

अतिखर्चावरून सतत खटके

विशाल यांची पत्नी एकता हिला ‘हायप्रोफाइल’ राहण्याची सवय होती. त्यासाठी तिला सातत्याने पैशांची निकड भासे. आर्थिक परिस्थिती साधारण असल्याने आवाक्यात खर्च करावा, असे पती विशाल वारंवार सांगत. त्यातून दोघांत खटके उडाल्याने काही महिन्यांपूर्वी एकता घर सोडून लातूरमध्ये मैत्रिणीकडे वास्तव्यास गेली. पतीने तिची समजूत काढून पुन्हा घरी आणल्यानंतर पाच-सहा महिने संसार सुरळीत सुरू होता. मात्र, अचानक पत्नीसह साथीदाराकडून विशाल यांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला.

पोलिसांसमोरही बनाव

पती घरातून बाहेर पडल्यावर एकता म्हसरूळ पोलिस ठाण्यात पोहोचली. तिने ‘आमच्या घरात कोणीतरी हल्ला केलाय’, असा दावा तिने केला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी गुन्हा नोंदवतो, एवढेच सांगितले. तितक्यात जिल्हा रुग्णालयातून एका व्यक्तीला बळजबरीने सर्पदंश केल्याचा ‘कॉल’ आला. पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. तितक्यात, संशयित महिलेने पोलिस ठाण्यातून पोबारा केला.

Source link

The post आधी बीअर ऑफर, पतीला बोलण्यात गुंतवलं अन् मग सर्पदंश, पत्नीच्या प्लॅनने साऱ्यांना शॉक first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=81322 0
उच्चशिक्षित पत्नीला ऑस्ट्रेलियात विकायला लावली भाजी, कारमध्येही कोंडले, नागपुरात तिघांवर गुन्हा https://tejpolicetimes.com/?p=80842 https://tejpolicetimes.com/?p=80842#respond Mon, 29 Jan 2024 05:16:58 +0000 https://tejpolicetimes.com/?p=80842 उच्चशिक्षित पत्नीला ऑस्ट्रेलियात विकायला लावली भाजी, कारमध्येही कोंडले, नागपुरात तिघांवर गुन्हा

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: लग्नानंतर उच्चशिक्षित पत्नीचा हुंड्यासाठी छळ करून चक्क तिला ऑस्ट्रेलियात फळभाजी विकायला लावली. ही खळबळजनक घटना नागपुरात उघडकीस आली. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी उच्चशिक्षित महिलेच्या तक्रारीवरून ऑस्ट्रेलियातील आयटी कंपनीत बड्या पदावर कार्यरत तिचा पती अभिलाश (बदलेले नाव) व त्याच्या आई-वडिलाविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी हुंडाबंदी अधिनियम, कौटुंबिक हिंसाचार अधिनियम, मारहाणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.ही ३०वर्षीय […]

The post उच्चशिक्षित पत्नीला ऑस्ट्रेलियात विकायला लावली भाजी, कारमध्येही कोंडले, नागपुरात तिघांवर गुन्हा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
उच्चशिक्षित पत्नीला ऑस्ट्रेलियात विकायला लावली भाजी, कारमध्येही कोंडले, नागपुरात तिघांवर गुन्हा

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: लग्नानंतर उच्चशिक्षित पत्नीचा हुंड्यासाठी छळ करून चक्क तिला ऑस्ट्रेलियात फळभाजी विकायला लावली. ही खळबळजनक घटना नागपुरात उघडकीस आली. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी उच्चशिक्षित महिलेच्या तक्रारीवरून ऑस्ट्रेलियातील आयटी कंपनीत बड्या पदावर कार्यरत तिचा पती अभिलाश (बदलेले नाव) व त्याच्या आई-वडिलाविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी हुंडाबंदी अधिनियम, कौटुंबिक हिंसाचार अधिनियम, मारहाणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

ही ३०वर्षीय विवाहिता करिष्मा (बदलेले नाव) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. करिष्मा उच्चशिक्षित असून, ती सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. मार्च २०२२मध्ये वर्धा येथे करिष्माचे अभिलाशसोबत साक्षगंध झाले. यावेळी करिष्माला मिळालेले दागिने अभिलाशच्या आईने परत घेतले. त्यानंतर अभिलाशच्या आई-वडिलांनी ‘डेस्टिनेशन वेडिंग’ची (बाहेरगावी लग्न) मागणी केली. करिष्माचे नागपुरातील पॉश सभागृहात लग्न झाले. त्यावेळी रेल्वेस्थानक ते सभागृह येण्याजाण्यासाठी वातानुकूलित बसची करण्यात आलेली मागणी करिष्माच्या नातेवाइकांनी पूर्ण केली.

लग्नानंतर २६ एप्रिलला करिष्मा, अभिलाश व त्याचे आई-वडील हॉटेलमध्ये जेवायला गेले. ‘तू आम्हाला पसंत नव्हती. परंतु अभिलाशच्या हट्टामुळे आम्ही झुकलो’, असे म्हटले. त्यानंतर अभिलाश हा करिष्माला घेऊन ऑस्ट्रेलियाला गेला. तेथे त्याने करिष्माला मारहाण सुरू केली. त्याने चक्क करिष्माला फळभाजी विकायला लावली. यासह वेटरचेही काम करण्यास तिला बाध्य केले. एक दिवस फिरण्याच्या बहाण्याने अभिलाश हा करिष्माला कारने घेऊन गेला. अभिलाशने रस्त्याच्या मधोमध कार थांबवली.

कार लॉक करून करिष्माला आतमध्येच ठेऊन तो फिरायला गेला. सुमारे १५ मिनिटांनंतर तो परतला. करिष्माने त्याला जाब विचारला. अभिलाशने शिवीगाळ करून तिला मारहाण केली, असे करिष्माचे म्हणणे आहे. कंटाळून करिष्मा माहेरी परतली व भरोसा सेलमध्ये तक्रार दिली. येथे समेट न झाल्याने अखेर करिष्माने सीताबर्डी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Source link

The post उच्चशिक्षित पत्नीला ऑस्ट्रेलियात विकायला लावली भाजी, कारमध्येही कोंडले, नागपुरात तिघांवर गुन्हा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=80842 0
पतीला संपवून आपण काहीच न केल्याचा बनाव, पण एक चूक अन् पत्नी-प्रियकर जाळ्यात अडकले https://tejpolicetimes.com/?p=80661 https://tejpolicetimes.com/?p=80661#respond Sat, 27 Jan 2024 08:16:15 +0000 https://tejpolicetimes.com/?p=80661 पतीला संपवून आपण काहीच न केल्याचा बनाव, पण एक चूक अन् पत्नी-प्रियकर जाळ्यात अडकले

रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील जयगड जवळ नांदिवडे येथे पत्नीने ६४ वर्षीय पतीची हत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नांदिवडे येथील सुरेश धोंडू पडवळ (वय वर्ष ६४ राहणारे नांदिवडे भंडारवाडी) यांचा शुक्रवारी सकाळी पत्नीने धारधार हत्याराने खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने अवघे रत्नागिरी हादरले आहे. सुरुवातीला आपण काही केले नाही, असा कावा करणाऱ्या पत्नीचा […]

The post पतीला संपवून आपण काहीच न केल्याचा बनाव, पण एक चूक अन् पत्नी-प्रियकर जाळ्यात अडकले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पतीला संपवून आपण काहीच न केल्याचा बनाव, पण एक चूक अन् पत्नी-प्रियकर जाळ्यात अडकले

रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील जयगड जवळ नांदिवडे येथे पत्नीने ६४ वर्षीय पतीची हत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नांदिवडे येथील सुरेश धोंडू पडवळ (वय वर्ष ६४ राहणारे नांदिवडे भंडारवाडी) यांचा शुक्रवारी सकाळी पत्नीने धारधार हत्याराने खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने अवघे रत्नागिरी हादरले आहे. सुरुवातीला आपण काही केले नाही, असा कावा करणाऱ्या पत्नीचा आणि संशयित प्रियकराचा हा सगळा बनाव ग्रामस्थांची समसूचकता आणि पोलिसांची तत्परता यामुळे उघड झाला आहे. पत्नीने धारदार सुरीच्या साह्याने हा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

२६ जानेवारी रोजी शुक्रवारी आपले पती घरात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. आपण त्यांना अंगणात आणलं. त्यांना दवाखान्यात घेऊन जायचं आहे असा कांगावा करत तिने गावात माहिती दिली. घराला बाहेरून कडी घालून घेतली आणि आपण काही केलेच नाही अशा अविर्भावात होती. या सगळ्या प्रकाराने ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांकडे संपर्क केला. काही वेळातच पोलिस यंत्रणा डॉगस्कॉड सहित घटनास्थळी दाखल झाली. जवळच झाडाखाली पडलेल्या रक्त लागलेल्या काठ्या दिसल्या याचा वास डॉगस्कॉडला देण्यात आला. यावेळी डॉगस्कॉड या ठिकाणी असलेली शितल पडवळ आणि मनराज दत्ताराम चव्हाण यांच्या अंगावरच दोन-तीन वेळा गेल्याने या दोघांनीच हा सगळा बनाव रचल्याचे उघड झाले.

तुरीचा दाणा ठरला काळ, ३ वर्षांच्या चिमुकल्याचा कुटुंबासमोरच तडफडून अंत, नेमकं काय घडलं?
याप्रकरणी संशयित पत्नी शितल पडवळ आणि पत्नीचा प्रियकर संशयित मनराज दत्ताराम चव्हाण यांना जयगड पोलिसांनी अटक केली आहे. जयगड येथे रहाणारे मयत सुरेश धोंडू पडवळ वय वर्ष ६४ राहणार नांदिवडे हे मोल मजुरीचे काम करायचे. पत्नी शितल पडवळ हिचा गावातच एक स्टॉल असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. यापूर्वीही असा जीवघेणा हल्ला पती सुरेश पडवळ यांच्यावर पत्नीने केला होता, अशी माहिती आता तपासात समोर आली आहे.

मात्र, त्याच वेळेला त्यांची पत्नी शितल सुरेश पडवळ आणि तिचा प्रियकर मनराज दत्ताराम चव्हाण यांचे प्रेम संबंध असल्याचा संशय त्यांच्या पतीला होता यावरून घरात सातत्याने भांडण सुरू होती. याच रागात शितल पडवळने निर्दयीपणे खून करत सुरेश पडवळ यांचा काटा काढल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

जयगड पोलिसांनी संशयित आरोपी शितल पडवळ आणि मनराज दत्ताराम चव्हाण (मु. नांदिवडे भंडारवाडा) यांना ताब्यात घेतले असून या दोन्ही नराधमांवर भा.द. वि. क ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. जयगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक क्रांती पाटील, जयगड पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी अधिक तपास करत आहेत.

पाच वर्षांच्या मुलाला वारंवार गंगेत बुडवून मारलं, घटनेने संपूर्ण हरिद्वार हादरलं, कारण वाचून संतापाल
Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

The post पतीला संपवून आपण काहीच न केल्याचा बनाव, पण एक चूक अन् पत्नी-प्रियकर जाळ्यात अडकले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=80661 0
पत्नी आणि मेहुणीकडून सततचा छळ, ॲनिमेशन कंपनीचं स्वप्न अर्ध्यावरच सोडून नारायणने आयुष्य संपवलं https://tejpolicetimes.com/?p=79910 https://tejpolicetimes.com/?p=79910#respond Tue, 23 Jan 2024 11:43:57 +0000 https://tejpolicetimes.com/?p=79910 पत्नी आणि मेहुणीकडून सततचा छळ, ॲनिमेशन कंपनीचं स्वप्न अर्ध्यावरच सोडून नारायणने आयुष्य संपवलं

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: पत्नीने दारू पिण्यासाठी पतीकडे वारंवार पैशांची मागणी केली. यात पत्नीच्या बहिणीनेही तिला साथ दिली. शेवटी पत्नी आणि मेव्हणीच्या छळाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी विवाहिता आणि तिच्या बहिणीला पोलिसांनी अटक केली.नारायण मधुकर निर्वळ (वय ३५), असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. ज्ञानेश्वर मधुकर निर्वळ (३९, […]

The post पत्नी आणि मेहुणीकडून सततचा छळ, ॲनिमेशन कंपनीचं स्वप्न अर्ध्यावरच सोडून नारायणने आयुष्य संपवलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पत्नी आणि मेहुणीकडून सततचा छळ, ॲनिमेशन कंपनीचं स्वप्न अर्ध्यावरच सोडून नारायणने आयुष्य संपवलं

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: पत्नीने दारू पिण्यासाठी पतीकडे वारंवार पैशांची मागणी केली. यात पत्नीच्या बहिणीनेही तिला साथ दिली. शेवटी पत्नी आणि मेव्हणीच्या छळाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी विवाहिता आणि तिच्या बहिणीला पोलिसांनी अटक केली.

नारायण मधुकर निर्वळ (वय ३५), असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. ज्ञानेश्वर मधुकर निर्वळ (३९, रा. सोमठाणा, ता. मानवत, जि. परभणी) यांनी शनिवारी (२० जानेवारी) देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी नारायण निर्वळ यांची पत्नी आणि तिची बहीण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून दोघींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण निर्वळ ॲनिमेशन क्षेत्रात कार्यरत होते. काही मित्रांसोबत मिळून ते ॲनिमेशनचा व्यवसाय करीत होते. त्यांच्या पत्नीला काही दिवसांपूर्वी ‘वर्क फ्रॉम होम’ मिळाले होते. दरम्यान, नारायण यांची पत्नी आणि तिच्या बहिणीने नारायण यांच्याकडे दारू पिण्यास पैशांची मागणी केली. त्यांनी नकार दिला असता भांडण करून मानसिक व शारीरिक त्रास दिला. या प्रकाराला कंटाळून नारायण यांनी १७ जानेवारीला राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात शनिवारी (२० जानेवारी) शवविच्छेदन झाले.

भावाला दिली होती कल्पना

नारायण निर्वळ यांनी मानसिक, शारीरिक त्रास होत असल्याबाबत भाऊ ज्ञानेश्वर निर्वळ यांना फोनवरून मेसेज केले होते. त्यावरून ज्ञानेश्वर यांनी पोलिसांकडे तक्रार केली. नारायण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नारायण यांची पत्नी आणि तिच्या बहिणीला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालायने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस उपनिरीक्षक सोहन धोत्रे तपास करीत आहेत.

कंपनी सुरू करण्याचे स्वप्न विरले

नारायण निर्वळ यांचा ॲनिमेशन क्षेत्रात हातखंडा होता. काही जणांसोबत ते भागीदारीमध्ये काम करीत होते. त्यासाठी एक छोटे कार्यालय थाटले होते. या कामाला मोठे स्वरूप देऊन स्वत:ची कंपनी सुरू करण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र, त्यांचे हे स्वप्न अर्धवटच राहिले.

Source link

The post पत्नी आणि मेहुणीकडून सततचा छळ, ॲनिमेशन कंपनीचं स्वप्न अर्ध्यावरच सोडून नारायणने आयुष्य संपवलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=79910 0
पत्नीच्या मृत्यूचा धक्का, अडीच तासात पतीनेही अखेरचा श्वास घेतला, दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार https://tejpolicetimes.com/?p=76164 https://tejpolicetimes.com/?p=76164#respond Thu, 04 Jan 2024 07:50:12 +0000 https://tejpolicetimes.com/?p=76164 पत्नीच्या मृत्यूचा धक्का, अडीच तासात पतीनेही अखेरचा श्वास घेतला, दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार

जळगाव: जळगाव शहरातील मेहरुण परिसरातील रामेश्वर कॉलनीत ८१ वर्षीय पत्नीच्या निधनानंतर अडीच तासांतच पतीनेही जगाचा निरोप घेतल्याची दुर्देवी घटना बुधवारी घडली. सकाळी साडेअकरा वाजता पत्नीचे वृध्दकाकाळाने निधन झाले. तर पत्नीच्या निधानाने धक्का बसल्याने अडीच तासानंतर ८६ वर्षीय पतीनेही जगाचा निरोप घेतला. प्रमिलाबाई ग्राम पाटील आणि ग्राम दामू पाटील असे निधन झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.मेहरुणमधील रामेश्वर […]

The post पत्नीच्या मृत्यूचा धक्का, अडीच तासात पतीनेही अखेरचा श्वास घेतला, दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पत्नीच्या मृत्यूचा धक्का, अडीच तासात पतीनेही अखेरचा श्वास घेतला, दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार

जळगाव: जळगाव शहरातील मेहरुण परिसरातील रामेश्वर कॉलनीत ८१ वर्षीय पत्नीच्या निधनानंतर अडीच तासांतच पतीनेही जगाचा निरोप घेतल्याची दुर्देवी घटना बुधवारी घडली. सकाळी साडेअकरा वाजता पत्नीचे वृध्दकाकाळाने निधन झाले. तर पत्नीच्या निधानाने धक्का बसल्याने अडीच तासानंतर ८६ वर्षीय पतीनेही जगाचा निरोप घेतला. प्रमिलाबाई ग्राम पाटील आणि ग्राम दामू पाटील असे निधन झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

मेहरुणमधील रामेश्वर कॉलनीतील रहिवासी ग्राम दामू पाटील हे पत्नी प्रमिलाबाई यांचा एक मुलगा आणि पाच मुली आणि नातवंड असा परिवार आहे. ग्राम पाटील आणि पत्नी प्रमिलाबाई या दोघांनी शेती करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह केला आणि मुलांना मोठं केलं, वाढवलं आणि शिकवलं. एवढंच नव्हे तर शेतकरी दाम्पत्याने त्यांच्या पाच मुलींचा विवाह सुध्दा धुमधडाक्यात पार पडला. पाच लेकींचा संसार गुण्यागोविंदाने सुरु आहे.

विना पॅराशूट १०,००० फुटांवरुन उडी, मग स्वत:च्याच मृत्यूचा व्हिडिओ रेकॉर्ड केला अन्…
तर, दुसरीकडे ग्राम पाटील यांचा मुलगा किशोर सराफ व्यवसाय करतो. या व्यवसायात मुलानेही चांगली प्रगती केली आहे. सर्व कसं सुरळीत सुरु असताना, पाटील कुटुंबियांसाठी बुधवार हा दु:खाचा वार ठरला. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता प्रमिलाबाई शालिग्राम पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. प्रमिलाबाई यांच्या निधनाने कुटुंबात शोकाचे वातावरण होते. तर, पत्नीच्या जाण्याने शालिग्राम पाटील यांनाही मोठा धक्का बसला होता. पत्नीच्या जाण्याचं दु:ख शालिग्राम हे पचवू शकले नाही आणि पत्नीच्या निधनानंतर अडीच तासानंतर शालिग्राम यांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचेही निधन झाले.

दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार, मेहरुणवासीय सुन्न

एकाचवेळी आई आणि वडिलांच्या जाण्याने पाटील कुटुंबियांवर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुलगा किशोर, सून, नातवंडांसह पाचही मुलींनी आई-वडिलांच्या निधनाचा आक्रोश केला. दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. एकाचवेळी दाम्पत्याच्या निघालेल्या अंत्ययात्रेने मेहरुण परिसरातील नागरिक सुन्न झाले होते. प्रमिलाबाई आणि शालिग्राम पाटील यांच्यावर गुरुवारी मेहरूण स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

लव्ह मॅरेज अन् दोन महिन्यांची मुलगी; हसतं-खेळतं कुटुंब एका रात्रीत संपलं, एक चूक ठरली जीवघेणी
Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

The post पत्नीच्या मृत्यूचा धक्का, अडीच तासात पतीनेही अखेरचा श्वास घेतला, दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=76164 0
आई-वडिलांसाठी जेवण का नाही केलं? पतीचा राग अनावर, पत्नीसोबत भयंकर घडलं, पुणे हादरलं https://tejpolicetimes.com/?p=73856 https://tejpolicetimes.com/?p=73856#respond Mon, 25 Dec 2023 05:22:10 +0000 https://tejpolicetimes.com/?p=73856 आई-वडिलांसाठी जेवण का नाही केलं? पतीचा राग अनावर, पत्नीसोबत भयंकर घडलं, पुणे हादरलं

पुणे: पती-पत्नीचे वाद झाल्याचे अनेक प्रकार आपण पाहत आले आहोत. सासू, सासऱ्याचं काही ऐकलं नाही की नवऱ्याकडून बायकोचा छळ होण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. मुळात सगळ्यांच्याच घरात काही ना काही वाद होत असतात. पण, एखाद्या गोष्टीवरुन बायकोचा छळ करणे हा गुन्हा आहे. अशाच एका शुल्लक कारणावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. […]

The post आई-वडिलांसाठी जेवण का नाही केलं? पतीचा राग अनावर, पत्नीसोबत भयंकर घडलं, पुणे हादरलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आई-वडिलांसाठी जेवण का नाही केलं? पतीचा राग अनावर, पत्नीसोबत भयंकर घडलं, पुणे हादरलं

पुणे: पती-पत्नीचे वाद झाल्याचे अनेक प्रकार आपण पाहत आले आहोत. सासू, सासऱ्याचं काही ऐकलं नाही की नवऱ्याकडून बायकोचा छळ होण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. मुळात सगळ्यांच्याच घरात काही ना काही वाद होत असतात. पण, एखाद्या गोष्टीवरुन बायकोचा छळ करणे हा गुन्हा आहे. अशाच एका शुल्लक कारणावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. पत्नीने आई-वडिलांसाठी जेवण बनवलं नाही म्हणून या पतीने तिची निर्घृणपणे हत्या केली.

आई-वडिलांसाठी या पतीने पत्नीचा जीव घेतला आहे. ही घटना पुण्यात घडली आहे. आई-वडिलांसाठी जेवण न बनवल्याने पतीने आपल्या पत्नीला बेदम मारहाण करून तिचा खून केला आहे. कात्रज भागातील दत्तनगर परिसरात राहत असलेल्या कांबळे कुटुंबात ही घटना घडली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

लव्ह मॅरेज अन् दोन महिन्यांची मुलगी; हसतं-खेळतं कुटुंब एका रात्रीत संपलं, एक चूक ठरली जीवघेणी
मधुरा तानाजी कांबळे (वय ४२, रा. स्वामी समर्थनगर, कात्रज) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पती तानाजी शिवाजी कांबळे (वय ४३) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मुलगा पीयूष तानाजी कांबळे (वय १९) याने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ही घटना २२ डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास दत्तनगर चौकात घडली आहे. तानाजी हा मजुरी करतो, तसेच त्याला दारू पिण्याचेही व्यसन आहे. पुण्यातील कात्रज येथे तो त्याची पत्नी, मुलगा, सासू-सासरे असा परिवार राहतो. रात्री दहाच्या सुमारास नेहमी प्रमाणे तानाजी कांबळे हा दारू पिऊन घरी आला. घरी बायकोने जेवण तयार न केल्याने कांबळे हा खूप चिडला.

आपल्या आई-वडिलांसाठी जेवण तयार नाही केलं म्हणून त्याने पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात पत्नी गंभीर जखमी झाली. बेशुद्धावस्थेत मधुरा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पत्नीचा खून केल्याप्रकरणी तानाजीला अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील पाटील करीत आहेत.

एलियन्स पृथ्वीवरच! अशा ठिकाणी लपलेत, जिथे आपण पोहोचणं अशक्य! नासाच्या माजी शास्त्रज्ञाचा दावा
Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

The post आई-वडिलांसाठी जेवण का नाही केलं? पतीचा राग अनावर, पत्नीसोबत भयंकर घडलं, पुणे हादरलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=73856 0
घरखर्चाच्या पैशावरुन वाद, पत्नीने बोचकारले पतीचे नाक, नंतर रागाच्या भरात भयंकर कृत्य, काय घडलं? https://tejpolicetimes.com/?p=73490 https://tejpolicetimes.com/?p=73490#respond Sat, 23 Dec 2023 06:25:03 +0000 https://tejpolicetimes.com/?p=73490 घरखर्चाच्या पैशावरुन वाद, पत्नीने बोचकारले पतीचे नाक, नंतर रागाच्या भरात भयंकर कृत्य, काय घडलं?

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : घरखर्चाला पैसे न दिल्याच्या कारणावरून पत्नीने मारहाण करून पतीचा खून केला. ही घटना १८ डिसेंबर रोजी मध्यरात्री भारतमाता नगर, दिघी येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.काय घडलं? रवींद्र बाबूलाल नागरे (वय ३९, रा. भारतमातानगर, दिघी; मूळ रा. चाळीसगाव, जि. जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या […]

The post घरखर्चाच्या पैशावरुन वाद, पत्नीने बोचकारले पतीचे नाक, नंतर रागाच्या भरात भयंकर कृत्य, काय घडलं? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
घरखर्चाच्या पैशावरुन वाद, पत्नीने बोचकारले पतीचे नाक, नंतर रागाच्या भरात भयंकर कृत्य, काय घडलं?

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : घरखर्चाला पैसे न दिल्याच्या कारणावरून पत्नीने मारहाण करून पतीचा खून केला. ही घटना १८ डिसेंबर रोजी मध्यरात्री भारतमाता नगर, दिघी येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.

काय घडलं?

रवींद्र बाबूलाल नागरे (वय ३९, रा. भारतमातानगर, दिघी; मूळ रा. चाळीसगाव, जि. जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी रवींद्र यांच्या बहिणीने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रवींद्र यांच्या पत्नीला अटक केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र नागरे पेट्रोल पंपावर काम करत होते. तर त्यांची पत्नी गृहिणी होती. दोघे जण भारतमातानगर येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. १७ डिसेंबर रोजी रवींद्र यांनी पत्नीला घरखर्चासाठी पैसे न दिल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर रवींद्र कामावर गेले. रात्री घरी आल्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद होऊन भांडण झाले. त्यानंतर पत्नीने रवींद्र यांना हाताने मारहाण करून चेहऱ्यावर नखाने ओरखडून जोरात सोफ्यावर ढकलून दिले. त्या वेळी रवींद्र यांच्या नाकाला, गळ्याला दुखापत झाली. त्याच वेळी पत्नीने रवींद्र यांचा शर्ट घेऊन तो रवींद्र यांच्या नाकावर दाबून धरत त्यांचा खून केला. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. दिघी पोलिस तपास करीत आहेत.

उभ्या ट्रकला धडकून काँग्रेस आमदाराच्या गाडीला अपघात, एका मजुराचा मृत्यू; व्हिडिओ समोर

स्कूलबसचा चालक
चाकाखाली चिरडला

पिंपरी : गिअर काढताना स्कूलबस अंगावरून गेल्यामुळे चालकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी आठ वाजता चाकण येथील गवते वस्ती येथे घडली.
सुनील वामन खिलारी (रा. राजगुरूनगर, ता. खेड) असे मृत चालकाचे नाव असून, त्यांचा मुलगा अक्षय (वय २७) या चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील खिलारी हे स्कूलबसवर चालक म्हणून काम करत होते. गवते वस्ती येथे रिव्हर्स गिअर अडकल्याने बस बंद पडली होती. तो गिअर काढण्यासाठी सुनील बसच्या खाली गेले. त्यांनी बसमधील महिलेला बस सुरू करण्यास सांगितली. त्यात बस मागे गेली आणि बसचे चाक सुनील यांच्या अंगावरून गेली. त्यात गंभीर जखमी होऊन ते मृत्युमुखी पडले. ही बस मागे जाऊन परिसरातील घरांवर आदळली. यात घरांचेही नुकसान झाले आहे. या प्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Source link

The post घरखर्चाच्या पैशावरुन वाद, पत्नीने बोचकारले पतीचे नाक, नंतर रागाच्या भरात भयंकर कृत्य, काय घडलं? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=73490 0
माझी बायको आलेय का? नवरा सासुरवाडीला पोहोचला, मात्र दारातच घडलं भयंकर https://tejpolicetimes.com/?p=52054 https://tejpolicetimes.com/?p=52054#respond Wed, 07 Dec 2022 05:04:55 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8b-%e0%a4%86%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%af-%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%be/ माझी बायको आलेय का? नवरा सासुरवाडीला पोहोचला, मात्र दारातच घडलं भयंकर

अकोला : जावयाची हत्या करुन आत्महत्येचा बनाव करणाऱ्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील मनारखेड येथे पाच तारखेला ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. जावई रवी राजगुरे याने स्वतःच्या डोक्यात वार करुन आत्महत्या केल्याचा कांगावा सासुरवाडीच्या माणसांनी केला होता. मात्र पोलीस तपासात त्यांचं बिंग उघड झालं.अकोला जिल्ह्यातल्या मनारखेड इथे ५ डिसेंबरला एका […]

The post माझी बायको आलेय का? नवरा सासुरवाडीला पोहोचला, मात्र दारातच घडलं भयंकर first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
माझी बायको आलेय का? नवरा सासुरवाडीला पोहोचला, मात्र दारातच घडलं भयंकर

अकोला : जावयाची हत्या करुन आत्महत्येचा बनाव करणाऱ्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील मनारखेड येथे पाच तारखेला ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. जावई रवी राजगुरे याने स्वतःच्या डोक्यात वार करुन आत्महत्या केल्याचा कांगावा सासुरवाडीच्या माणसांनी केला होता. मात्र पोलीस तपासात त्यांचं बिंग उघड झालं.

अकोला जिल्ह्यातल्या मनारखेड इथे ५ डिसेंबरला एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह बाळापुर शहरातल्या रवी राजगुरे व्यक्तीचा असल्याचा समजलं. त्याच्या सासरच्या घरासमोर हा मृतदेह पडून होता.

पोलिसांना या संदर्भात सासरच्यांनी माहिती दिली, अन सांगितले की रवीने स्वतः डोक्यात वार करून स्वतःला मारून घेतले. त्यानंतर या प्रकरणात आकस्मित मृत्यूची नोंद झाली. तपासा दरम्यान सासरच्या लोकांनी रवीची हत्या केली असल्याचं समोर आलंय. सद्यस्थितीत या प्रकरणात तीन लोकांवर गुन्हे दाखल झाले असून एकाला अटक करण्यात आली आहे.

नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण?

अकोला जिल्ह्यातील बाळापुर शहरातील नवानगर भागातील व्यक्ती सासरवाडी मनारखेड इथे मृतावस्थेत आढळला. या प्रकरणी बाळापूर तालुक्यात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या होत्या, ही आत्महत्या की खून, असा प्रश्न निर्माण झालाय.

रवी सुरेश राजगुरे (वय ४०) हा ५ डिसेंबर रोजी सासरवाडी मनारखेड इथे गेला होता. दरम्यान सायंकाळी तो मृतावस्थेत आढळून आला. तेव्हा या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला होता. याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असून, आत्महत्या की खून, हा प्रश्न कायम होता.

दरम्यान, शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात या प्रकरणाचा उलगडा झाला. त्यानंतर या प्रकरणात हत्येच्या दिशेने तपास सुरू झाला. रवी सुरेश राजगुरे (४०) याच्या मृत संदर्भात हत्याचा गुन्हा दाखल झाला. मृतकाचा चुलत भाऊ योगेश राजगुरे यांच्या फिर्यादीवरून मृतक रवीचा मेहुणा, मेहुणी, सासू आणि सासऱ्यांनी जड अवजारने डोक्यात वार करून खून केला. अशा फिर्यादीवरून व घटनास्थळाच्या पंचनाम्यावरून ही घटना हत्येचा संशय आल्याने पोलिसांनी आरोपी मृतकाची सासू रमाबाई सुरोशे, मृतकाचा मेहुणा जानराव वाहूरवाघ, मेहुणी शारदा जानराव वाहूरवाघ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून जानराव वाहूरवाघ याला ताब्यात घेतले.

हेही वाचा : लग्नासाठी दबाव, विवाहित बॉयफ्रेंडचं डोकं फिरलं, गर्लफ्रेंडला स्कूटीवर बसवलं अन् मग…

काय आहे हत्येचे कारण

मयत रवी आणि त्याच्या पत्नीत सतत वाद व्हायचा, या वादातून पत्नी रागाच्या भरात घर सोडून गेली. पत्नीच्या शोधात तो सासर मनारखेड इथे गेला. पत्नीच्या संदर्भात सासरच्यांना त्याने विचारणा केली. यावेळी सासरच्यांनी पत्नी संदर्भात माहिती द्यायला नकार दिला. आणि तुमच्या दोघात सतत भांडण व्हायचं अन् तू तिला का मारहाण करतो, असं विचारत वाद घातला. या वादातूनच सासरच्या लोकांनी जड अवजाराने डोक्यात वार करून त्याला गंभीर जखमी केले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा : शरीरसंबंधाच्या आमिषाने पुणेकराला ब्लॅकमेल, १९ वर्षीय तरुणीसह चौघं पोलिसांच्या जाळ्यात

Source link

The post माझी बायको आलेय का? नवरा सासुरवाडीला पोहोचला, मात्र दारातच घडलं भयंकर first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=52054 0