ISRO Recruitment 2023: नुकतेच भारताच्या चांद्रयानाने यशस्वी गगनभरारी घेतल्याने ‘इस्रो’ हे नाव सर्वांच्या ओठांवर आहे. अंतराळातील संशोधन आणि यान बनवणाऱ्या इस्रोकडे भारतासह अवघ्या जगाचे लक्ष लागलेले असते. अशा इस्रो मध्ये जर काम करण्याची संधी मिळाली तर..
आता तुम्हाला वाटेल इथे काम करायचं म्हणजे आपल्याला संशोधक व्हावे लागेल की काय? पण तसे नाही. इस्रोमध्ये चक्क दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भरती सुरु आहे. जर तुम्ही दहावी पास असाल आणि आयटीआय केलं असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी असेल.
इस्रोच्या ‘सॅक’ मध्ये म्हणजे ‘स्पेस अॅप्लिकेशन सेंटर’मध्ये आता विविध पदांची भरती सुरु आहे. यासंदर्भात इस्रोकडून नुकतीच एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एकूण ३५ जागांसाठी ही भरती असून त्यापैकी ३४ जागा ता तंत्रज्ञ पदासाठी आहेत तर १ जागा ही ड्राफ्टमन पदासाठी आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागले. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२३ आहे.
वयाची अट
– २१ ते ३५ वर्ष (२१ ऑगस्ट २०२३ पर्यंत)
SC/ST उमेदवारांसाठी ५ वर्षे तर OBC उमेदवारांसाठी ३ वर्षे सूट
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
१) तंत्रज्ञ – ३४ (Technician ‘B’)
शैक्षणिक पात्रता – मॅट्रिक (एसएससी/SSLC/इयत्ता १० वी पास) + संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय/NTC/NAC.
२) ड्राफ्ट्समन – ०१ (Draughtsman ‘B’)
शैक्षणिक पात्रता – मॅट्रिक (एसएससी/SSLC/इयत्ता १० वी पास) + संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय/NTC/NAC.
(वाचा: Mumbai-Thane Vertical University: मुंबई-ठाणे व्हर्टिकल विद्यापीठाला शासनाची मान्यता.. पण ‘हे’ निकष महत्वाचे..)
परीक्षा शुल्क
– ५०० रुपये (SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही)
पगार
– २१,७००/- रुपये ते ६९,१००/- रुपये
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रियेमध्ये लेखी चाचणी / कौशल्य चाचणी समाविष्ट असते.
लेखी चाचणी
८० बहुपर्यायी प्रश्नांसह लेखी परीक्षा घेतली जाईल
प्रत्येक बरोबर उत्तरासाठी एक गुण असेल.
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.३३ गुणांचे निगेटिव्ह मार्किंग असेल.
परीक्षाच कालावधी ९० मिनिटांचा असेल.
लेखी परीक्षा अभ्यासक्रमावर आधारीत असेल आणि परीक्षा अशा प्रकारे घेतली जाईल की, उमेदवाराच्या सैद्धांतिक आणि व्यवहारिक ज्ञानाची चाचणी विहित अभ्यासक्रमाची रुंदी आणि खोली अशा सर्वांगाने तपासली जाईल.
कौशल्य चाचणी
लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे, उमेदवारांना किमान १० उमेदवारांसह कौशल्य चाचणीसाठी निवडले जाईल.
कौशल्य चाचणी पूर्णपणे गो-नो-गो या तत्वावर असेल आणि कौशल्य चाचणीत मिळालेले गुण निवडीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.
अंतिम निवड केवळ लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल, पण त्यांना कौशल्य चाचणीत पात्र असणेही गरजेचे आहे.
लेखी आणि कौशल्य चाचणी उत्तीर्ण निकष
अनारक्षित उमेदवारांसाठी
लेखी चाचणी : ८० पैकी किमान ३२ गुण
कौशल्य चाचणी : १०० पैकी किमान ५० गुण
राखीव उमेदवारांसाठी
लेखी चाचणी : ८० पैकी किमान २४ गुण
कौशल्य चाचणी : १०० पैकी किमान ४० गुण
नोकरीचे ठिकाण : अहमदाबाद
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अधिकृत संकेतस्थळ : www.isro.gov.in
(वाचा: Career Guidance: करिअर निवडण्यापूर्वी या सहा गोष्टी आवर्जून करा! कधीही पश्चाताप होणार नाही..)