Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
ladki bahin yojana - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Mon, 02 Dec 2024 11:17:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg ladki bahin yojana - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 लाडक्या बहिणांना १५००चे २१०० रुपये कधी मिळणार? मुनगंटीवारांनी सांगितल्या ३ शक्यता https://tejpolicetimes.com/?p=110949 https://tejpolicetimes.com/?p=110949#respond Mon, 02 Dec 2024 11:17:19 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110949 लाडक्या बहिणांना १५००चे २१०० रुपये कधी मिळणार? मुनगंटीवारांनी सांगितल्या ३ शक्यता

Sudhir Mungantiwar: महायुतीच्या विजयात लाडकी बहीण योजना महत्त्वाची ठरली. सरकार पुन्हा सत्तेत आल्यास १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देऊ, असं आश्वासन देण्यात आलं होतं. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: विधानसभा निवडणुकीत महिलांनी महायुतीला भरभरुन मतदान केलं. लोकसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांच्या बँक खात्यात महिन्याला […]

The post लाडक्या बहिणांना १५००चे २१०० रुपये कधी मिळणार? मुनगंटीवारांनी सांगितल्या ३ शक्यता first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
लाडक्या बहिणांना १५००चे २१०० रुपये कधी मिळणार? मुनगंटीवारांनी सांगितल्या ३ शक्यता

Sudhir Mungantiwar: महायुतीच्या विजयात लाडकी बहीण योजना महत्त्वाची ठरली. सरकार पुन्हा सत्तेत आल्यास १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देऊ, असं आश्वासन देण्यात आलं होतं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: विधानसभा निवडणुकीत महिलांनी महायुतीला भरभरुन मतदान केलं. लोकसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांच्या बँक खात्यात महिन्याला १५०० रुपये जमा होऊ लागले. महायुतीच्या विजयात लाडकी बहीण योजना महत्त्वाची ठरली. सरकार पुन्हा सत्तेत आल्यास १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देऊ, असं आश्वासन देण्यात आलं होतं. यावर आता भाजपचे नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहे.

लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना मिळणारे पैसे १०० टक्के वाढणार असल्याचं मुनगंटीवार यांनी द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. ‘आम्ही १५०० चे २१०० रुपये केले नाहीत तर देशभरात होणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये याचं उदाहरण दिलं जाईल. आम्ही शब्द पाळला नाही, असं देशभरात सांगण्यात येईल. मी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. आपण आपल्या शब्दावर ठाम राहून तो खरा करुन दाखवायला हवा. जाहीरनामा समितीचा चेअरमन मीच होतो. त्यामुळे संकल्पपत्रातील घोषणा आम्ही नक्कीच पूर्ण करु,’ असं मुनगंटीवार यांनी मुलाखतीत म्हटलं.
भाजपकडून मुख्यमंत्री कोण? निवडीसाठी २ निरीक्षक ठरले; एका नेत्याचं स्ट्राँग गुजरात कनेक्शन
लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक महिलेला २१०० रुपये देण्याची राज्याची क्षमता आहे. आता ही वाढीव रक्कम नेमकी कधी द्यायची त्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल. जानेवारीपासून रक्कम वाढवायची की जुलैपासून याचा निर्णय घेण्यात येईल. आम्ही योजनेची सुरुवात भाऊबीजेपासून केली होती. त्यामुळे आम्ही २१०० रुपये पुढील भाऊबीजेपासून देऊ शकतो, अशा शक्यता मुनगंटीवारांनी सांगितल्या.
५ डिसेंबरला आझाद मैदानात नेमका कोणाचा शपथविधी? भाजपच्या गोटातून महत्त्वाची माहिती
लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ४५ हजार कोटी रुपयांचा बोजा पडत आहे. आता १५०० रुपयांचे २१०० रुपये केल्यास सरकारी तिजोरीवर आणखी किती भार पडेल, असा प्रश्न मुनगंटीवारांना विचारण्यात आला. त्यावर आपण जे व्याज भरतो, त्यापेक्षा ही रक्कम कमीच असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. दरवर्षी सातव्या वेतन आयोगावर आपण जितका खर्च करतो, त्यापेक्षाही लाडकी बहिणवरील खर्च कमीच आहे. महिलांना पैसे दिले जात असतानाच लोक असे प्रश्न का विचारतात, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post लाडक्या बहिणांना १५००चे २१०० रुपये कधी मिळणार? मुनगंटीवारांनी सांगितल्या ३ शक्यता first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110949 0
लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार अजितदादाच! त्यांना मुख्यमंत्री करा, सत्तास्थापनेच्या पेचात राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी https://tejpolicetimes.com/?p=110741 https://tejpolicetimes.com/?p=110741#respond Sat, 30 Nov 2024 15:56:44 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110741 लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार अजितदादाच! त्यांना मुख्यमंत्री करा, सत्तास्थापनेच्या पेचात राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी

Ajit Pawar : अजितदादांना मुख्यमंत्री करा, त्यांना दांडगा अनुभव आहे, त्यांच्यामुळेच लाडकी बहीण योजना यशस्वी झाली, असं म्हणत त्यांच्या शिलेदाराने मुख्यमंत्रिपदासाठी दादांच्या नावाची मागणी केली आहे. Lipi इरफान शेख, सोलापूर : महाराष्ट्र राज्यात महायुती सरकारला घवघवीत यश आल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आनंदाचा वातावरण आहे. महायुतीमधील घटक पक्षांत मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या […]

The post लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार अजितदादाच! त्यांना मुख्यमंत्री करा, सत्तास्थापनेच्या पेचात राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार अजितदादाच! त्यांना मुख्यमंत्री करा, सत्तास्थापनेच्या पेचात राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी

Ajit Pawar : अजितदादांना मुख्यमंत्री करा, त्यांना दांडगा अनुभव आहे, त्यांच्यामुळेच लाडकी बहीण योजना यशस्वी झाली, असं म्हणत त्यांच्या शिलेदाराने मुख्यमंत्रिपदासाठी दादांच्या नावाची मागणी केली आहे.

Lipi

इरफान शेख, सोलापूर : महाराष्ट्र राज्यात महायुती सरकारला घवघवीत यश आल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आनंदाचा वातावरण आहे. महायुतीमधील घटक पक्षांत मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर अधिकृतरित्या अजूनही शिक्कामोर्तब झाले नाही. सोलापुरातील अजित दादांच्या शिलेदाराने जाहीरपणे सांगितले आहे, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणण्यात अजित पवारांची भूमिका महत्वाची आहे. अर्थमंत्री अजित पवार होते, म्हणूनच लाडकी बहीण योजना यशस्वी झाली. अन्यथा हे काम कुणालाही जमले नसते. राज्यातील कोणत्याही विकास कामांवर कसलाही परिणाम होऊ दिला नाही. लाडक्या बहिणीचे खरे शिल्पकार अजित दादा आहेत, त्यांना मुख्यमंत्री करा. पाहिले अडीच वर्षे अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी पक्षातील अल्पसंख्याक पदाधिकारी वसीम बुऱ्हाण यांनी केली आहे.
Maharashtra CM : महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच ‘Boss’! दिल्ली हाय कमांड पुन्हा एकदा वापरणार धक्का तंत्र?

मुस्लिम लाडक्या बहिणींचा महायुतीला पाठिंबा –

अजित पवारांनी सर्वच समाजातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली होती. मुस्लिम महिलांना मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ झाला. राज्यातील मुस्लिम महिलांनी महायुतीला मोठ्या संख्येने पाठिंबा दिला. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल पहिला असता, महिला मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मतदानादिवशीचं चित्र आठवलं तर, मुस्लिम महिलांच्या रांगा मोठ्या होत्या. अल्पसंख्याक समाजातील लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान केले असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते वसीम बुऱ्हाण यांनी दिली आहे.
Crime News : शेजाऱ्यांमध्ये वाद टोकाला, घरात घुसून थेट ९ महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने वार; घटनेने खळबळ

लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार अजितदादाच! त्यांना मुख्यमंत्री करा, सत्तास्थापनेच्या पेचात राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी

बबनदादा शिंदे आणि संजयमामा शिंदेंदेखील निवडून आले असते –

माढा विधानसभा मतदारसंघात मागील सहा टर्मपासून आमदार असलेल्या बबनदादा शिंदेंनी ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीकडून लढणार नाही, असे जाहीर केले होते. त्यावर राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक वसीम बुऱ्हाण यांनी टोला लगावला. बबनदादा शिंदे आणि करमाळा येथील संजयमामा शिंदे अपक्ष लढण्याऐवजी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढले असते, तर तेही कदाचित निवडून आले असते. महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणींच्या लाटेत माढा आणि करमाळा येथे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार आले असते. बबन दादा शिंदेंनी मोठी चूक केली, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी नेते वसीम बुऱ्हाण यांनी दिली आहे.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

The post लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार अजितदादाच! त्यांना मुख्यमंत्री करा, सत्तास्थापनेच्या पेचात राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110741 0
महायुतीचा महाविजय, लाडक्या बहिणींकडून सत्कार, एकनाथ शिंदेंनी मानले आभार https://tejpolicetimes.com/?p=110033 https://tejpolicetimes.com/?p=110033#respond Mon, 25 Nov 2024 03:20:47 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110033 महायुतीचा महाविजय, लाडक्या बहिणींकडून सत्कार, एकनाथ शिंदेंनी मानले आभार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Nov 2024, 8:50 am महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीचा महाविजय झाला. या विजयानंतर महायुतीकडून सर्वत्र जल्लोष करण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेचा परिणाम मतदानाच्या रूपातून दिसून आला. अशातच लाडक्या बहिणींनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. यावेळी महिलांनी एकनाथ शिंदेंचं औक्षण आणि सत्कार केला. लाडक्या बहिणींचा आशीर्वाद असणार, शिंदेच मुख्यमंत्री होणार अशा […]

The post महायुतीचा महाविजय, लाडक्या बहिणींकडून सत्कार, एकनाथ शिंदेंनी मानले आभार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
महायुतीचा महाविजय, लाडक्या बहिणींकडून सत्कार, एकनाथ शिंदेंनी मानले आभार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Nov 2024, 8:50 am

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीचा महाविजय झाला. या विजयानंतर महायुतीकडून सर्वत्र जल्लोष करण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेचा परिणाम मतदानाच्या रूपातून दिसून आला. अशातच लाडक्या बहिणींनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. यावेळी महिलांनी एकनाथ शिंदेंचं औक्षण आणि सत्कार केला. लाडक्या बहिणींचा आशीर्वाद असणार, शिंदेच मुख्यमंत्री होणार अशा घोषणा महिलांनी दिल्या. तर शिंदेंनी देखील महायुतीला साथ दिल्याबद्दल सगळ्या बहीणींचे आभार मानले.

Source link

The post महायुतीचा महाविजय, लाडक्या बहिणींकडून सत्कार, एकनाथ शिंदेंनी मानले आभार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110033 0
Maharashtra Election: अखेरच्या तासांतील मते निर्णायक; लोकसभेच्या तुलनेत विधानसभेत किंचित थंड प्रतिसाद https://tejpolicetimes.com/?p=109538 https://tejpolicetimes.com/?p=109538#respond Thu, 21 Nov 2024 01:41:44 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109538 Maharashtra Election: अखेरच्या तासांतील मते निर्णायक; लोकसभेच्या तुलनेत विधानसभेत किंचित थंड प्रतिसाद

Maharashtra Assembly Election 2024: ​​मुंबईतील शहर आणि उपनगर या जिल्ह्यांचा मतटक्का मात्र काहीसा समाधानकारक असल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीत मुंबई शहरात ५१.३६ टक्के मतदान झाले होते. तेच बुधवारी शहरात पाच वाजेपर्यंत ४९.०७ टक्के मतदान नोंदविण्यात आले. महाराष्ट्र टाइम्सvoting maharashtra मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणु‌कीचे मतदान काहीसे कमी झाल्याचे समोर आले आहे. निवडणूक आयोगाने […]

The post Maharashtra Election: अखेरच्या तासांतील मते निर्णायक; लोकसभेच्या तुलनेत विधानसभेत किंचित थंड प्रतिसाद first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Maharashtra Election: अखेरच्या तासांतील मते निर्णायक; लोकसभेच्या तुलनेत विधानसभेत किंचित थंड प्रतिसाद

Maharashtra Assembly Election 2024: ​​मुंबईतील शहर आणि उपनगर या जिल्ह्यांचा मतटक्का मात्र काहीसा समाधानकारक असल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीत मुंबई शहरात ५१.३६ टक्के मतदान झाले होते. तेच बुधवारी शहरात पाच वाजेपर्यंत ४९.०७ टक्के मतदान नोंदविण्यात आले.

महाराष्ट्र टाइम्स
voting maharashtra

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणु‌कीचे मतदान काहीसे कमी झाल्याचे समोर आले आहे. निवडणूक आयोगाने सायंकाळी पाच वाजेपर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात ५८.२२ टक्के मतदान झाले. मुंबई शहर आणि उपनगर भागात ही टक्केवारी अनुक्रमे ४९.०७ आणि ५१.७६ इतकी नोंदवण्यात आली. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत शहरात ५१.३६ टक्के, तर उपनगरात ५४.९६ टक्के मतदान झाले होते. दरम्यान, अखेरच्या तासांत झालेल्या मतदानाचा कुणाला फायदा होईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसमोर (एनडीए) इंडिया आघाडीने आव्हान उभे केले होते. निकालानंतर देशात एनडीएने पुन्हा एकदा सरकार बनविण्यापुरते संख्याबळ जमवले, परंतु महाराष्ट्रात इंडिया आघाडीने बाजी मारली होती. राज्यातील ४८ जागांपैकी ३१ जागा इंडिया आघाडीने पटकावल्या होत्या. संविधान बदलाचा प्रचार झाल्याने मतदानावेळी मतटक्का वाढून राज्यातील ६६ टक्के मतदारांनी या निवडणुकीत मतदान केले होते.

लोकसभा निवडणुकीत वाढलेल्या मतटक्क्याचा धसका घेत राज्यातील महायुती सरकारने नवनवीन योजना आखल्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणत सर्व जातीधर्मातील महिलांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. तसेच महायुती सरकारने लोकांसाठी जाहीर केलेल्या योजनांची आक्रमक प्रसिद्धीही केली होती. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ग्रामीण भागात शेतमालाचा भाव या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत केले. मुंबईत धारावी पुनर्विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीसाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान झाले. लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात ६६ टक्के मतदान झाले होते. विधानसभा निवडणुकीत अखेरच्या तासात किती मतदान होते, यावर राज्याचे भवितव्य ठरणार आहे.
राज्यात मतटक्का वधारला! विधानसभेसाठी सरासरी ६२ टक्के मतदान, दिग्गजांचे भवितव्य मतदानपेटीत बंद
मुंबईतील शहर आणि उपनगर या जिल्ह्यांचा मतटक्का मात्र काहीसा समाधानकारक असल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीत मुंबई शहरात ५१.३६ टक्के मतदान झाले होते. तेच बुधवारी शहरात पाच वाजेपर्यंत ४९.०७ टक्के मतदान नोंदविण्यात आले. उपनगरात लोकसभेदरम्यान ५४.९६ टक्के मतदान झाले होते, तर बुधवारी सायंकाळी पाच वाजपर्यंत ५१.७६ टक्के मतदान झाले. मतदानाच्या उरलेल्या एका तासात मुंबई शहर आणि उपनगर लोकसभेची मतदानाची टक्केवारी ओलांडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या वाढलेल्या मतटक्क्याचा लाभ महायुतीला होणार की महाविकास आघाडीला, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ६३ टक्के मतदान; वेळ संपल्यानंतरही मतदारांच्या रांगा
मागील काही वर्षांचा मतटक्का
लोकसभा निवडणूक २०१९

महाराष्ट्र ५९ टक्के
विधानसभा निवडणूक २०१९
महाराष्ट्र ६१.४४ टक्के
मुंबई शहर ४८.६३ टक्के
मुंबई उपनगर ५१.१७ टक्के
————–
लोकसभा २०२४
महाराष्ट्र ६६ टक्के
मुंबई शहर ५१.३६ टक्के
मुंबई उपनगर ५४.९६ टक्के
विधानसभा निवडणूक २०२४ (रात्री ११ वाजेपर्यंत)
महाराष्ट्र ६४.६३ टक्के
मुंबई शहर ५२.०७ टक्के
मुंबई उपनगर ५५.७७ टक्के

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post Maharashtra Election: अखेरच्या तासांतील मते निर्णायक; लोकसभेच्या तुलनेत विधानसभेत किंचित थंड प्रतिसाद first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109538 0
Pankaja Munde: भिंती उभ्या करण्याऐवजी एकी गरजेची; ‘बटेंगे तो कटेंगे’ विवादानंतर पंकजा मुंडेंचे वक्तव्य https://tejpolicetimes.com/?p=108819 https://tejpolicetimes.com/?p=108819#respond Sat, 16 Nov 2024 00:54:48 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108819 Pankaja Munde: भिंती उभ्या करण्याऐवजी एकी गरजेची; ‘बटेंगे तो कटेंगे’ विवादानंतर पंकजा मुंडेंचे वक्तव्य

Maharashtra Assembly Election 2024: सायखेडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीचे उमेदवार दिलीप बनकर यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. महाराष्ट्र टाइम्सpankaja1 म. टा. वृत्तसेवा, निफाड : लोकांमध्ये भिंती उभ्या करणे वाईट आहे. पण त्या सर्वांना एक करणे, एकीची वज्रमूठ प्रगती साधणे, हे वाईट नसून गरजेचे आहे, अशी भूमिका भाजप नेत्या तथा […]

The post Pankaja Munde: भिंती उभ्या करण्याऐवजी एकी गरजेची; ‘बटेंगे तो कटेंगे’ विवादानंतर पंकजा मुंडेंचे वक्तव्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Pankaja Munde: भिंती उभ्या करण्याऐवजी एकी गरजेची; ‘बटेंगे तो कटेंगे’ विवादानंतर पंकजा मुंडेंचे वक्तव्य

Maharashtra Assembly Election 2024: सायखेडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीचे उमेदवार दिलीप बनकर यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या.

महाराष्ट्र टाइम्स
pankaja1

म. टा. वृत्तसेवा, निफाड : लोकांमध्ये भिंती उभ्या करणे वाईट आहे. पण त्या सर्वांना एक करणे, एकीची वज्रमूठ प्रगती साधणे, हे वाईट नसून गरजेचे आहे, अशी भूमिका भाजप नेत्या तथा आमदार पंकजा मुंडे यांनी मांडली. भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेला पंकजा यांनी विरोध केल्यानंतर झालेल्या विवादावर त्यांनी निफाड येथे भूमिका मांडली. आम्ही फक्त विकासावर बोलतो, असेही त्या म्हणाल्या.

तालुक्यातील सायखेडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीचे उमेदवार दिलीप बनकर यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी मुंडे म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनंती केल्याने महायुतीचा धर्म म्हणून मी ही सभा घेतली आहे. लोकसभेत आमच्या उमेदवाराला पराभूत केले, पण आता आपल्याला मोदींच्या नेतृत्वात देशाचा विकास करायचा आहे, म्हणून महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा. दिवंगत गोपिनाथ मुंडे हे अनेक खासदार-आमदार निवडून आणायचे.
Nashik : बिग फाइट, तिथेच वातावरण टाइट! मंत्री महाजन, भुसे, भुजबळ, पाटील अडकले मतदारसंघात
तुमच्यात कुवत असेल तर युतीच्या उमेदवाराला माझ्यासाठी मतदान करा. आमच्या सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेत महिलांना १५०० आणि शेतकऱ्यांना वर्षभरात १८ हजार रुपये देणाऱ्या योजना दिल्या आहेत. यापुढेही या योजनांच्या निधीत वाढ होईल. त्यासाठी आमचे उमेदवार निवडून द्या, असे आवाहन मुंडे यांनी केले. यावेळी उमेदवार बनकर यांनी गोदाकाठ भागात केलेली विकासकामाची माहिती दिली. राजेंद्र डोखळे, यतीन कदम, बाळासाहेब क्षीरसागर, शंकरराव वाघ, जगन कुटे, वैकुंठ पाटील, शिवनाथ कडभाने आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप व शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणुकीच्या रिंगणात सर्वाधिक अपक्ष; राज्यात २,०८६ उमेदवार नशीब आजमविणार, कुणाचे किती उमेदवार?
सिडकोत कार्यकर्ते तीन तास ताटकळले
सिडको :
सिडकोतील स्वामी विवेकानंदनगर येथील मैदानात महायुतीच्या नाशिक पश्चिमच्या उमेदवार सीमा हिरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या सभेचे शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता आयोजन करण्यात आले होते. सकाळी अकरा वाजेपासून कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. राजे संभाजी स्टेडियमवर मुंडेंचे हेलिकॉप्टर उतरणार होते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे सायखेडा येथे त्यांचे हेलिकॉप्टर लँड झाल्याने सभेला तब्बल तीन तास विलंब झाला. अखेर कार्यकत्यांनी सभास्थळावरून काढता पाय घेतला. दुपारी तीननंतर भोळे मंगल कार्यालयात सभेऐवजी मेळावा झाला. त्यामुळे पदाधिकारी-कार्यकत्यांचा हिरमोड झाला.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post Pankaja Munde: भिंती उभ्या करण्याऐवजी एकी गरजेची; ‘बटेंगे तो कटेंगे’ विवादानंतर पंकजा मुंडेंचे वक्तव्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108819 0
‘लाडक्या बहिणी’ला तिकीट देताना हात आखडता; मुंबईत सर्वाधिक, चार महिला उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेच्या https://tejpolicetimes.com/?p=108106 https://tejpolicetimes.com/?p=108106#respond Sun, 10 Nov 2024 09:25:05 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108106 ‘लाडक्या बहिणी’ला तिकीट देताना हात आखडता; मुंबईत सर्वाधिक, चार महिला उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेच्या

Maharashtra Assembly Election 2024: मुंबईतील ३६ जागांवर महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हींकडून मिळून १२ महिलांना तिकीट मिळाले आहे. पक्षनिहाय आकडेवारी पाहता, शिवसेनेने सर्वाधिक चार महिलांना, तर काँग्रेसने केवळ एकाच महिलेला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. महाराष्ट्र टाइम्सwoman politician AI मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत ‘लाडक्या बहिणी’ला सध्या महत्त्व आले असून महिलांच्या प्रश्नी सजग असल्याचे दाखविण्यासाठी […]

The post ‘लाडक्या बहिणी’ला तिकीट देताना हात आखडता; मुंबईत सर्वाधिक, चार महिला उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेच्या first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘लाडक्या बहिणी’ला तिकीट देताना हात आखडता; मुंबईत सर्वाधिक, चार महिला उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेच्या

Maharashtra Assembly Election 2024: मुंबईतील ३६ जागांवर महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हींकडून मिळून १२ महिलांना तिकीट मिळाले आहे. पक्षनिहाय आकडेवारी पाहता, शिवसेनेने सर्वाधिक चार महिलांना, तर काँग्रेसने केवळ एकाच महिलेला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

महाराष्ट्र टाइम्स
woman politician AI

मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत ‘लाडक्या बहिणी’ला सध्या महत्त्व आले असून महिलांच्या प्रश्नी सजग असल्याचे दाखविण्यासाठी सर्वच पक्षांत अहमहमिका लागली आहे. परंतु, महिलांना विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी देताना मात्र राजकीय पक्षांनी हात आखडता घेतल्याचे दिसत आहे. मुंबईतील ३६ जागांवर महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हींकडून मिळून १२ महिलांना तिकीट मिळाले आहे. पक्षनिहाय आकडेवारी पाहता, शिवसेनेने सर्वाधिक चार महिलांना, तर काँग्रेसने केवळ एकाच महिलेला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

महिलांना राजकारणात अधिकाधिक प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी सातत्याने होत असते. राजकीय पक्षही आपण महिलांच्या प्रश्नांवर सजग असल्याचे सातत्याने ठसवण्याचा प्रयत्न करतात. त्यातच महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना आणल्यापासून महिलांना राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. त्यामुळेच, महिला मतांना आपल्याकडे वळवण्यासाठी महाविकास आघाडीनेही ‘महालक्ष्मी योजने’चा समावेश जाहीरनाम्यात केला आहे.

मुंबईतील ३६ जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार उभे करण्यात आले असून त्यातील सर्वाधिक २२ जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष लढवत आहे. परंतु, पक्षाकडून केवळ तीन महिलांना उमेदवारी दिली आहे. त्याखालोखाल भाजपने १७ जागांवर उमेदवार उभे केले असून त्यांनीही केवळ तीनच महिलांना उमेदवारी दिली आहे.
शरद पवारांचं मिशन नाशिक; १२ नोव्हेंबरला जिल्ह्यात सहा जाहीर सभा, असा असेल दौरा…
मात्र, उमेदवारी देण्याबाबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने इतरांपेक्षा एक पाऊल पुढे टाकले आहे. शिंदेंना जागावाटपात मुंबईत थोडे नमते घ्यावे लागले आणि केवळ ११ जागाच पदरात पाडून घेता आल्या. तरीही पक्षाने इतरांच्या तुलनेत सर्वाधिक, चार महिलांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसलाही तितक्याच जागा मिळाल्या असूनही केवळ एकाच जागेवर त्यांनी महिला उमेदवाराला उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जागांमधून एका जागेवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस-शप पक्षाला मिळालेल्या दोन जागांपैकी एकावर महिला उमेदवाराला संधी मिळाली आहे. यंदा स्वतंत्रपणे निवडणूक लढविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत २६ जागांवर उमेदवार उभे केले असून त्यात तीन महिलांना उमेदवारी दिली आहे.
Pune Crime: २४ वर्षीय महिलेचा बेडमध्ये सापडला मृतदेह, पुण्यातील घटनेनं खळबळ
विविध राजकीय पक्षांच्या महिला उमेदवार
शिवसेना
सुवर्णा करंजे – विक्रोळी
मनिषा वायकर – जोगेश्वरी पूर्व
यामिनी जाधव – भायखळा
शायना एनसी – मुंबादेवी

भाजप
मनीषा चौधरी – दहिसर
विद्या ठाकूर – गोरेगाव
भारती लव्हेकर – वर्सोवा

शिवसेना उबाठा
ऋतुजा लटके – अंधेरी पूर्व
प्रविणा मोरजकर – कुर्ला
श्रध्दा जाधव – वडाळा

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post ‘लाडक्या बहिणी’ला तिकीट देताना हात आखडता; मुंबईत सर्वाधिक, चार महिला उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेच्या first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108106 0
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना १५०० नाही तर २१०० रुपये देणार, भाजपच्या जाहीरनाम्यात काय-काय? https://tejpolicetimes.com/?p=108050 https://tejpolicetimes.com/?p=108050#respond Sun, 10 Nov 2024 06:08:52 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108050 मोठी बातमी! लाडक्या बहिणींना १५०० नाही तर २१०० रुपये देणार, भाजपच्या जाहीरनाम्यात काय-काय?

Ladki Bahin Yojana: भाजपने आपला जाहीरनामा घोषित केला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहिणींना १५०० नाही तर आता २१०० रुपये दिले जातील अशी घोषणा केली आहे. हायलाइट्स: अमित शाहांचा उपस्थितीत भाजपचा जाहीरनाम्याची घोषणाभाजपच्या जाहीरनाम्यात अनेक मोठ्या घोषणांचा पाऊसलाडक्या बहिणींना आता १५०० नाही तर २१०० रुपये देणार महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरु […]

The post मोठी बातमी! लाडक्या बहिणींना १५०० नाही तर २१०० रुपये देणार, भाजपच्या जाहीरनाम्यात काय-काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना १५०० नाही तर २१०० रुपये देणार, भाजपच्या जाहीरनाम्यात काय-काय?

Ladki Bahin Yojana: भाजपने आपला जाहीरनामा घोषित केला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहिणींना १५०० नाही तर आता २१०० रुपये दिले जातील अशी घोषणा केली आहे.

हायलाइट्स:

अमित शाहांचा उपस्थितीत भाजपचा जाहीरनाम्याची घोषणा
भाजपच्या जाहीरनाम्यात अनेक मोठ्या घोषणांचा पाऊस
लाडक्या बहिणींना आता १५०० नाही तर २१०० रुपये देणार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरु आहे. त्यात आज भाजपकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यात महायुतीची महत्त्वाकांशी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबाबत एक मोठी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. आता लाडक्या बहिणींना १५०० नाही तर २१०० रुपये देणार, असं फडणवीस म्हणाले.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे संकल्पपत्र म्हणजे विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र तयार करण्याचा रोडमॅप आहे, २०१४ मध्ये जे संकल्पपत्र जाहीर केलं होतं, २०१९ च्या निवडणुकांना सामोरे जाताना त्या संकल्पपत्रातील कोणत्या गोष्टी पूर्ण केला याचा रिपोर्ट दिला होता. त्यामुळे भाजपाकरिता किंवा महबायुतीसाठी संकल्पपत्र म्हणजे फक्त कागदी डॉक्युमेंट नाही, तर त्या दिशेने काम करण्यासाठी एक अतिशय पवित्र अशा प्रकारचं डॉक्युमेंट आहे. राज्यातील जनतेचा विश्वास महायुतीवर आहे, असंही ते म्हणाले. तसेच, या संकल्पपत्रातील पहिले १० मुद्दे हे जो महायुतीचा १० कलमी कार्यक्रम घोषित केला, तेच दहा मुद्दे आहेत, असंही फडणवीस म्हणाले.

भाजपच्या संकल्पपत्रात काय-काय?

  • लाडक्या बहिणींना पुढील काळात १५०० ऐवजी २१०० रुपये देणार
  • शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, शेतकऱ्यांना मोफत वीज दिलेली आहे
  • भावांतर योजना आणणार, म्हणजे हमीभावापेक्षा जर कमी भावात मार्केटमध्ये खरेदी सुरु झाली तर हमीभावाने खरेदी तर करुच, पण ज्या ठिकाणी हमीभावाने खरेदी होणार नाही त्या ठिकाणी भावांतर योजना राबवून जो काही मधला फरक असेल तो थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात येईल असा निर्णय घेतला आहे, हे गेल्या वर्षीही केलं होतं
  • आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले तेव्हा लोकसभेपूर्वी निर्णय घेतला होता की भावांतर योजनेअंतर्गत पैसे देऊ, आचारसंहिता संपल्यानंतर ते पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात दिले
  • प्रत्येक गरिबाला अन्न -निवाऱ्याचा हक्क देण्याचा निर्णय
  • वृद्ध पेन्शन योजनेअंतर्गत जे १५०० रुपये देतो ते वाढवून २१०० रुपये करणार
  • जीवनावश्यक वस्तुंचे भाव स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करणार
  • येत्या काळाात राज्यात २५ लाख रोजगाराची निर्मिती करण्याचं लक्ष्य
  • १० लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतनाच्या माध्यमातून नोकऱ्या देणार
नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

The post मोठी बातमी! लाडक्या बहिणींना १५०० नाही तर २१०० रुपये देणार, भाजपच्या जाहीरनाम्यात काय-काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108050 0
लाडकी बहीण योजनेवरुन खासदार धनंजय महाडिक यांचं वादग्रस्त वक्तव्य, लाडक्या बहिणी जर… https://tejpolicetimes.com/?p=108136 https://tejpolicetimes.com/?p=108136#respond Sun, 10 Nov 2024 02:48:23 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108136 लाडकी बहीण योजनेवरुन खासदार धनंजय महाडिक यांचं वादग्रस्त वक्तव्य, लाडक्या बहिणी जर…

Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana: राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि सत्ताधारी व विरोधक यांच्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. हायलाइट्स: लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिलांचे फोटो आम्हाला पाठवा त्या लाडक्या बहिणींची आम्ही व्यवस्था करू खासदार धनंजय महाडिक यांचं वादग्रस्त वक्तव्य Lipiधनंजय महाडिक लाडकी बहीण योजना नयन […]

The post लाडकी बहीण योजनेवरुन खासदार धनंजय महाडिक यांचं वादग्रस्त वक्तव्य, लाडक्या बहिणी जर… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
लाडकी बहीण योजनेवरुन खासदार धनंजय महाडिक यांचं वादग्रस्त वक्तव्य, लाडक्या बहिणी जर…

Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana: राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि सत्ताधारी व विरोधक यांच्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत.

हायलाइट्स:

  • लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिलांचे फोटो आम्हाला पाठवा
  • त्या लाडक्या बहिणींची आम्ही व्यवस्था करू
  • खासदार धनंजय महाडिक यांचं वादग्रस्त वक्तव्य
Lipi
धनंजय महाडिक लाडकी बहीण योजना

नयन यादवाड, कोल्हापूर : ”लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत, सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून आम्हाला पाठवा, आम्ही त्यांची व्यवस्था करू, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केलं आहे. या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळला असून या वक्तव्याविरोधात काँग्रेससह महाविकास आघाडीतील नेतेमंडळींनी जोरदार हल्लाबोल करत निषेध व्यक्त केला आहे.राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि सत्ताधारी व विरोधक यांच्यात मुख्यमंत्री माझीलाडकी बहीण योजनेवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. महायुतीने महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देत आहे. तर आताच्या जाहीरनाम्यात महायुतीचं सरकार आलं तर २१०० रुपये देणार असल्याचं म्हटलं आहे. तर महाविकास आघाडी सरकारने देखील त्यांचं सरकार आलं तर दर महिन्याला ३००० रुपये देण्यार असल्याचं जाहीरनाम्यात म्हटलं आहे. या योजनाना घेऊन महायुतीतील प्रत्येक उमेदवार आणि नेते मंडळी जोरदार प्रचार करत आहेत. अशातच आता कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी चक्क ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेवरुन महिलांना जाहीर सभेत स्टेजवरुन दम भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर आता राज्यातील काँग्रेस नेत्यांनी याबाबत ट्वीट (एक्स) केले असून धनंजय महाडिक यांच्या वक्तव्यावरुन तीव्र पडसाद उमटत आहेत.
शरद पवारांचं मिशन नाशिक; १२ नोव्हेंबरला जिल्ह्यात सहा जाहीर सभा, असा असेल दौरा…

घ्यायचं शासनाचं आणि गायचं त्यांचं…

खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेसवर टीका करताना महायुतीने देखील काय केलं हे सांगत असताना, ”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या सभेत आणि रॅलीत दिसले. तर त्यांचे फोटो काढा आणि आम्हाला पाठवा, आम्ही त्यांची व्यवस्था करतो”, अशा शब्दात लाडक्या बहिणींना एकप्रकारे दमच भरला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ”या ठिकाणी काँग्रेसची रॅली निघाली, तर त्या रॅलीमधील महिलांचे फोटो काढा. लाडकी बहीण योजनेतून ज्या महिला १५०० रुपये घेतात, त्यांचे फोटो काढून आम्हाला द्या. घ्यायचं शासनाचं आणि गायचं त्यांचं असं अजिबात चालणार नाही. अनेक ताई आहेत ज्या छात्या बडवून सांगत आहेत की, आम्हाला या योजनेचे पैसे नकोत. जर पैसे नको असतील, तर राजकारण का करताय? असा सवालही त्यांनी केला. ज्यांना या योजनेचे पैसे नकोत, त्यांना म्हणायचं या फॉर्मवर सही कर, उद्यापासून लाडक्या बहीण योजनेचे पैसे बंद”, असंही धनंजय महाडिक यांनी महिलांना म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यासह विजय वडेट्टीवार आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

महाडिकांचा कोल्हापूरशी काहीही संबंध नाही

काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी या वक्तव्याचा निषेध करताना, ”या राज्यात विरोधकांच्या सुनेला देखील साडीचोळी देऊन पाठवण्याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिला आहे. या महाराष्ट्राला एक वेगळा इतिहास आहे. धनंजय महाडिक यांनी गेल्या वेळेस देखील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांचा अपमान केला होता. आता पुन्हा एकदा महिलांचा बंदोबस्त करू व्यवस्था करू असे म्हणत अपमान करत आहेत. महाडिक यांची पार्श्वभूमी कोल्हापूरकरांना माहिती आहे. गुंडगिरीची भाषा आणि या भाषेतून दहशत पसरवणे हा एकमेव अजेंडा महाडिक कंपनीचा राहिला आहे. मात्र, कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे असल्या धमकीला कोल्हापूरची माता-भगिनी घाबरणार नाही. ते १५०० रूपये घरातले पैसे दिल्यासारखे बोलत आहेत. १५०० रुपये दिले आहेत आमच्या सोबत या, छाती बडवून घेत म्हणत आहे. आमची सुरक्षा द्या म्हणत आहेत. त्यांना महिलांना कोणतीही सुरक्षा देण्याचं मनामध्ये नाही. मुळात महाडिक हे कोल्हापूरचे नाही, कोल्हापूरशी त्यांचा काहीही संबंध नाही. ते पर जिल्ह्यातले आहेत. त्यामुळे शाहू, फुले, आंबेडकर, ताराराणी यांचा वारसा ते सांगू शकत नाही. या मातीचा गुण काय आहे त्यांना माहिती नाही. त्यांच्या या वक्तव्याचा मी आणि काँग्रेस जाहीर निषेध करतो” असे सतेज पाटील म्हणाले आहेत.

स्पष्टीकरण देत माता भगिनींची माफी

तर खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेसकडून विरोध होऊ लागल्यानंतर स्पष्टीकरण देत माता भगिनींची माफी मागितली आहे. ”माझे हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनींचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हते. तर निवडणूक काळात राजकीय प्रचार करताना, विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला बळी पडणाऱ्या महिलांना, लाडकी बहीण योजना ही फक्त महायुती सरकारमुळेच यशस्वी झाली असल्याचे ठाम पणे नमूद करताना चुकून आलेली प्रतिक्रिया आहे. नेहमीप्रमाणे काँग्रेसने माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या निवडणुकीत गेमचेंजर आणि अतिशय पॉप्युलर योजना आहे. महाराष्ट्रात दोन करोड तीस लाख महिलांना याचा लाभ झाला आहे. कोल्हापुरात साडेदहा लाख महिलांना लाभ मिळाला आहे. काँग्रेसचे यापूर्वी त्यांच्या सत्ता असलेल्या राज्यात ज्या योजना जाहीर केल्या त्या आता सुरू नाहीत. यामुळे आजच्या भाषणात माझ्याकडून काँग्रेस फेक नरेटिव्ह सेट करण्याच प्रयत्न करत आहे” असं खासदार धनंजय महाडिक म्हणाले.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

The post लाडकी बहीण योजनेवरुन खासदार धनंजय महाडिक यांचं वादग्रस्त वक्तव्य, लाडक्या बहिणी जर… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108136 0
Ladki Bahin Yojana : आमचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 2000 रुपये देणार, मल्लिकार्जुन खर्गेंची घोषणा https://tejpolicetimes.com/?p=104449 https://tejpolicetimes.com/?p=104449#respond Thu, 05 Sep 2024 14:13:01 +0000 https://tejpolicetimes.com/?p=104449 Ladki Bahin Yojana : आमचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 2000 रुपये देणार, मल्लिकार्जुन खर्गेंची घोषणा

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 5 Sept 2024, 7:43 pm mallikarjun kharge on ladki bahin yojana : राज्यात आमचं सरकार आल्यावर आम्ही तुम्हाला लाडकी बहीण योजनेंतर्गत 2000 हजार रुपये देणार. तुम्ही तुमचा सन्मान मोदींसमोर गहाण ठेवणार का? असं खर्गे म्हणाले आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम सांगली : राज्य सरकारने यंदाच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे अंतरिम […]

The post Ladki Bahin Yojana : आमचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 2000 रुपये देणार, मल्लिकार्जुन खर्गेंची घोषणा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Ladki Bahin Yojana : आमचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 2000 रुपये देणार, मल्लिकार्जुन खर्गेंची घोषणा

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 5 Sept 2024, 7:43 pm

mallikarjun kharge on ladki bahin yojana : राज्यात आमचं सरकार आल्यावर आम्ही तुम्हाला लाडकी बहीण योजनेंतर्गत 2000 हजार रुपये देणार. तुम्ही तुमचा सन्मान मोदींसमोर गहाण ठेवणार का? असं खर्गे म्हणाले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
सांगली : राज्य सरकारने यंदाच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे अंतरिम बजेट मांडले आहे. या बजेटमध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच रक्षाबंधनाच्या निमित्ताने राज्य सरकारने लाभार्थी महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा केले आहेत. विरोधकांनी या योजनेवरून राज्य सरकारला अक्षरशः धारेवर धरलं आहे. परंतु आता याच योजनेसंदर्भात कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठी घोषणा केली आहे. सांगली येथील आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली .

लाडक्या बहिणींना 2000 रुपये देणार

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, ”राज्यात आमचं सरकार आल्यावर आम्ही तुम्हाला लाडकी बहीण योजनेंतर्गत 2000 हजार रुपये देणार. तुम्ही तुमचा सन्मान मोदींसमोर गहाण ठेवणार का? सरकारे फोडण्या तोडण्यापेक्षा तुम्ही काय वेगळं केलं आहे ते आम्हाला सांगा. महाराष्ट्र जिंकला तर सारा देश जिंकणार आहे. लवकरच भाजपची सत्ता जाणार आहे”. असं खर्गे म्हणाले आहेत.
Ravindra Dhangekar: कसब्यात ‘धंगेकर पॅटर्न’ला जाणार तडा? स्वपक्षातील अंतर्गत वादामुळे विधानसभेची वाट बिकट

शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेवरून खर्गे आणि राहुल गांधी यांची मोदींवर टीका

राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेवरून खर्गे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ”मोदींनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावला तो पडला. राम मंदिराला हात लावला ते गळत आहे. गुजरातमध्ये पुलाचे उद्घाटन केलं तो पडला”. असं म्हणत खर्गे यांनी निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी म्हणाले की, ”काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले आणि माफी मागून गेले. आपल्या हातून चूक होते, तेव्हाच माफी मागितली जाते. म्हणजे मोदींना चूक झाल्याचं मान्य आहे का?, असा सवाल काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी विचारला. मोदींनी माफी नेमकी कशाबद्दल मागितली? संघाच्या माणसाला अनुभव नसतानाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम दिलं त्याबद्दल मोदींनी माफी मागितली की पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाला, त्याबद्दल मोदींनी क्षमा मागितली. अशा प्रश्नांचा भडिमार राहुल गांधी यांनी केला होता.

अजित भाबड

लेखकाबद्दलअजित भाबडअजित भाबड, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. अजित यांनी आबासाहेब गरवारे कॉलेजमधून पत्रकारितेची मास्टर्स पदवी मिळवली आहे. त्यांना राजकीय, सामाजिक, अंतरराष्ट्रीय तसेच कृषी क्षेत्रातील विश्लेषणात्मक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

The post Ladki Bahin Yojana : आमचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 2000 रुपये देणार, मल्लिकार्जुन खर्गेंची घोषणा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=104449 0
डोळ्यात तेल घालून होणार अर्जतपासणी; ‘लाडकी बहीण’ योजनेचा बोगस अर्जांद्वारे लाभ लाटल्याने सरकारचा निर्णय https://tejpolicetimes.com/?p=104486 https://tejpolicetimes.com/?p=104486#respond Thu, 05 Sep 2024 03:56:09 +0000 https://tejpolicetimes.com/?p=104486 डोळ्यात तेल घालून होणार अर्जतपासणी; ‘लाडकी बहीण’ योजनेचा बोगस अर्जांद्वारे लाभ लाटल्याने सरकारचा निर्णय

Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या पोर्टलवर सातारा जिल्ह्यातील प्रतीक्षा पोपट जाधव या महिलेच्या नावाने विविध आधार क्रमांकाद्वारे सुमारे ३० अर्ज केल्याचे समोर आले. महाराष्ट्र टाइम्सladki bahin yojana AI म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे लाटण्याचा पहिला प्रकार उघडकीस आल्यानंतर, महिला आणि बालविकास विभाग खडबडून जागा झाला […]

The post डोळ्यात तेल घालून होणार अर्जतपासणी; ‘लाडकी बहीण’ योजनेचा बोगस अर्जांद्वारे लाभ लाटल्याने सरकारचा निर्णय first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
डोळ्यात तेल घालून होणार अर्जतपासणी; ‘लाडकी बहीण’ योजनेचा बोगस अर्जांद्वारे लाभ लाटल्याने सरकारचा निर्णय

Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या पोर्टलवर सातारा जिल्ह्यातील प्रतीक्षा पोपट जाधव या महिलेच्या नावाने विविध आधार क्रमांकाद्वारे सुमारे ३० अर्ज केल्याचे समोर आले.

महाराष्ट्र टाइम्स
ladki bahin yojana AI
म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे लाटण्याचा पहिला प्रकार उघडकीस आल्यानंतर, महिला आणि बालविकास विभाग खडबडून जागा झाला आहे. चालू महिन्यात योजनेसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जांची कडक तपासणी करण्याचा बुधवारी निर्णय घेण्यात आला. बोगस अर्ज आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या पोर्टलवर सातारा जिल्ह्यातील प्रतीक्षा पोपट जाधव या महिलेच्या नावाने विविध आधार क्रमांकाद्वारे सुमारे ३० अर्ज केल्याचे समोर आले. प्रतीक्षाने सर्व अर्जांवर एकाच बँक खात्याची माहिती भरलेली होती, मात्र या खात्यात २९ ऑगस्ट रोजी एकदाच तीन हजार रुपये जमा झाले आहेत. तिने ‘गुगल’वरून वेगवेगळ्या आधार क्रमांकाची माहिती मिळवून त्यांचा वापर केला. महिला व तिचा पती यांच्याविरुद्ध वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी; सरकार लवकरच घेणार महत्वाचा निर्णय, लाखो महिला ठरणार लाभार्थी
महिला बाल व विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिवसभर या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर बोगस अर्ज भरून पैसे लाटल्याचा प्रकार उघडकीस आला. महिला आणि बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या आदेशानुसार, संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘साताऱ्यातील महिलेने अनेक बोगस अर्ज दाखल करून सरकारची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. अर्ज तपासण्याच्या सॉफ्टवेअरमध्ये आणखी काही बदल करता येईल का याचाही आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत. प्रत्येक अर्जाची छाननी केली जाईल. आधार क्रमांक कोणत्या बँकेशी जोडला आहे, याचीही चौकशी होणार आहे. तालुका, जिल्हा; तसेच जिल्हा प्रशासनाकडून पुनर्तपासणी करण्याशिवाय आणखी काही निकषांद्वारे अर्जांची तपासणी करण्यात येणार आहे’, असेही डॉ. नारनवरे यांनी स्पष्ट केले.

राज्यात जुलैपासून ही योजना सुरू आहे. योजनेंतर्गत दोन कोटी ४० लाखांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी सुमारे दीड कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली. राज्य सरकारने योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत महिन्याने वाढविली आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात अर्ज येण्याची शक्यता आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post डोळ्यात तेल घालून होणार अर्जतपासणी; ‘लाडकी बहीण’ योजनेचा बोगस अर्जांद्वारे लाभ लाटल्याने सरकारचा निर्णय first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=104486 0