Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
maha vikas aghadi - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Wed, 27 Nov 2024 11:39:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg maha vikas aghadi - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 महाविकास आघाडीत फूट? स्वबळाचा सूर टिपेला, नेत्यांचा दबाव वाढला; कोणता पक्ष बाहेर पडणार? https://tejpolicetimes.com/?p=110412 https://tejpolicetimes.com/?p=110412#respond Wed, 27 Nov 2024 11:39:02 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110412 महाविकास आघाडीत फूट? स्वबळाचा सूर टिपेला, नेत्यांचा दबाव वाढला; कोणता पक्ष बाहेर पडणार?

Uddhav Thackeray: विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रिपदावरुन भांडणाऱ्या महाविकास आघाडीचं निकालात अक्षरश: पानीपत झालं. विधानसभेला मविआतील तिन्ही पक्षांना मिळून ५० देखील जागा मिळाल्या नाहीत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रिपदावरुन भांडणाऱ्या महाविकास आघाडीचं निकालात अक्षरश: पानीपत झालं. विधानसभेला मविआतील तिन्ही पक्षांना मिळून ५० देखील जागा मिळाल्या नाहीत. या पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मातोश्री […]

The post महाविकास आघाडीत फूट? स्वबळाचा सूर टिपेला, नेत्यांचा दबाव वाढला; कोणता पक्ष बाहेर पडणार? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
महाविकास आघाडीत फूट? स्वबळाचा सूर टिपेला, नेत्यांचा दबाव वाढला; कोणता पक्ष बाहेर पडणार?

Uddhav Thackeray: विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रिपदावरुन भांडणाऱ्या महाविकास आघाडीचं निकालात अक्षरश: पानीपत झालं. विधानसभेला मविआतील तिन्ही पक्षांना मिळून ५० देखील जागा मिळाल्या नाहीत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रिपदावरुन भांडणाऱ्या महाविकास आघाडीचं निकालात अक्षरश: पानीपत झालं. विधानसभेला मविआतील तिन्ही पक्षांना मिळून ५० देखील जागा मिळाल्या नाहीत. या पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मातोश्री निवासस्थानी पराभूत उमेदवारांची बैठक घेतली. त्यात बहुतांश जणांनी स्वबळाचा सूर आळवला. त्यामुळे उद्धव ठाकरे येत्या काळात महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

आगामी निवडणुका पक्षानं महाविकास आघाडीतून न लढता स्वबळावर लढवाव्यात, असा सूर शिवसेना उबाठामध्ये आहे. उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीत बहुतांश पराभूत उमेदवारांनी, नेत्यांनी एकला चलो रेचा सूर आळवला. ठाकरेंकडे अनेकांनी तशी इच्छा व्यक्त केल्याची कबुली शिवसेना उबाठाचे नेते, विधान परिषदेतील उपनेते अंबादान दानवे यांनीदेखील या सगळ्याला दुजोरा दिला.
मी काहीही ताणून धरलेलं नाही! अखेर शिंदेंनी मौन सोडले; मुख्यमंत्रिपदावरही स्पष्टच बोलले
‘पक्षात अनेकांचा स्वबळाचा सूर आहे आणि आम्ही ते अजिबात नाकारत नाही. शिवसेनेनं स्वतंत्रपणे लढलं पाहिजे, असं बऱ्याच जणांना वाटतं. शिवसेना काही सत्तेसाठी जन्माला आलेली नाही. सत्ता शिवसेनेला कधी ना कधी मिळेलच. शिवसेना एका विचारानं काम करणारी संघटना आहे. बऱ्याच जणांनी तो विचार मांडला. शिवसेनेनं सगळ्या निवडणुकांमध्ये आपलं स्वतंत्र संघटन उभं करुन निवडणूक लढली पाहिजे,’ असं दानवेंनी सांगितलं.

शिवसेना उबाठामध्ये स्वबळाचा सूर लावला जात असताना आता यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘जशी त्यांची स्वबळाची इच्छा आहे, तशी आमचीही इच्छा होती. हा इच्छेचा विषय नाही. आम्ही आघाडी म्हणून लढलो आणि निकालानंतर त्यांनी काय करायचं तो त्यांचा निर्णय आहे. त्यांनी त्यांची भूमिका मांडली. आमची भूमिका आमचे प्रदेशाध्यक्ष मांडतील, आम्हीही मांडू. पण आम्ही काही इतक्या घाईनं भूमिका मांडणार नाही. हायकमांडशी चर्चा करु. त्यानंतर भूमिका घेतली जाईल,’ असं वडेट्टीवार म्हणाले.
Eknath Shinde: भाजपनं ‘तेव्हा’च शिंदेंना पुन्हा CM करण्याचा शब्द दिलेला! सेना नेत्याचा खळबळजनक दावा
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. मविआला केवळ ४६ जागा मिळाल्या. शिवसेना उबाठानं २०, काँग्रेसनं १६, राष्ट्रवादी शपनं १० जागा जिंकल्या. महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळावं, इतक्याही जागा मिळालेल्या नाहीत. विरोधी पक्षासाठी विधानसभेत किमान २९ सदस्य असावे लागतात. त्यापासून तिन्ही पक्ष दूर आहेत.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post महाविकास आघाडीत फूट? स्वबळाचा सूर टिपेला, नेत्यांचा दबाव वाढला; कोणता पक्ष बाहेर पडणार? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110412 0
विरोधी पक्षनेतेपदाबद्दल प्रश्न, आदित्य ठाकरे म्हणाले, ४८ तास झाले कोण CM होतंय हे पाहूयात…! https://tejpolicetimes.com/?p=110120 https://tejpolicetimes.com/?p=110120#respond Mon, 25 Nov 2024 16:08:40 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110120 विरोधी पक्षनेतेपदाबद्दल प्रश्न, आदित्य ठाकरे म्हणाले, ४८ तास झाले कोण CM होतंय हे पाहूयात…!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Nov 2024, 9:38 pm महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जबरदस्त धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे गटनेते पदाची जबाबदारी दिली आहे. यानंतर आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.थोडी तरी पातळी ठेवावी, थोडी तरी लाज बाळगावी. प्रत्येक वेळी बोलायचं आहे म्हणून बोलू नये. जो […]

The post विरोधी पक्षनेतेपदाबद्दल प्रश्न, आदित्य ठाकरे म्हणाले, ४८ तास झाले कोण CM होतंय हे पाहूयात…! first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
विरोधी पक्षनेतेपदाबद्दल प्रश्न, आदित्य ठाकरे म्हणाले, ४८ तास झाले कोण CM होतंय हे पाहूयात…!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Nov 2024, 9:38 pm

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जबरदस्त धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे गटनेते पदाची जबाबदारी दिली आहे. यानंतर आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.थोडी तरी पातळी ठेवावी, थोडी तरी लाज बाळगावी. प्रत्येक वेळी बोलायचं आहे म्हणून बोलू नये. जो काही घोळ घातला आहे त्याची मजा घ्या, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच विरोधी पक्षनेतेपदाबद्दल विचारले असता सगळ्या गोष्टी बोलणं योग्य नाही. काही गोष्टींवर विचार सुरु आहे. योग्य वेळी आम्ही त्यावर बोलू, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

Source link

The post विरोधी पक्षनेतेपदाबद्दल प्रश्न, आदित्य ठाकरे म्हणाले, ४८ तास झाले कोण CM होतंय हे पाहूयात…! first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110120 0
मविआचा दारुण पराभव कशामुळे? शरद पवारांचं २ प्रमुख मुद्द्यांवर बोट, बारामतीवरुन प्रतिप्रश्न https://tejpolicetimes.com/?p=109956 https://tejpolicetimes.com/?p=109956#respond Sun, 24 Nov 2024 13:28:17 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109956 मविआचा दारुण पराभव कशामुळे? शरद पवारांचं २ प्रमुख मुद्द्यांवर बोट, बारामतीवरुन प्रतिप्रश्न

Maharashtra Election Result: आम्ही विधानसभा निवडणुकीसाठी मेहनत घेतली. पण आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही, अधिकृत आकडेवारी आल्यावर त्याचं विश्लेषण करु आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहानं लोकांपर्यंत जाऊ, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात व्यक्त केला. महाराष्ट्र टाइम्स.कॉम सातारा: आम्ही विधानसभा निवडणुकीसाठी मेहनत घेतली. पण आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही, अधिकृत आकडेवारी […]

The post मविआचा दारुण पराभव कशामुळे? शरद पवारांचं २ प्रमुख मुद्द्यांवर बोट, बारामतीवरुन प्रतिप्रश्न first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मविआचा दारुण पराभव कशामुळे? शरद पवारांचं २ प्रमुख मुद्द्यांवर बोट, बारामतीवरुन प्रतिप्रश्न

Maharashtra Election Result: आम्ही विधानसभा निवडणुकीसाठी मेहनत घेतली. पण आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही, अधिकृत आकडेवारी आल्यावर त्याचं विश्लेषण करु आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहानं लोकांपर्यंत जाऊ, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात व्यक्त केला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सातारा: आम्ही विधानसभा निवडणुकीसाठी मेहनत घेतली. पण आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही, अधिकृत आकडेवारी आल्यावर त्याचं विश्लेषण करु आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहानं लोकांपर्यंत जाऊ, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात व्यक्त केला. ते पत्रकारांशी बोलत होते. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. पवारांच्या पक्षाला केवळ १० जागा मिळाल्या. त्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधत होते.

लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला पुन्हा सत्ता मिळाली का, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. त्यावर महिलांचं मतदान यंदा चांगलं झालं. आम्ही सत्तेत पुन्हा आलो नाही, तर योजना बंद होईल, असा प्रचार सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला होता, याकडे शरद पवारांनी लक्ष वेधलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा दिली होती. त्यावरही पवारांनी मोजक्या शब्दांत भाष्य केलं. योगींच्या प्रचारात, घोषणेत ध्रुवीकरणाचा भाव होता, असं पवार म्हणाले.
Sharad Pawar: शरद पवारांचे आमदार संपर्कात! निकालानंतर दादांच्या शिलेदारानं बॉम्ब टाकला; दाव्यानं खळबळ
ईव्हीएमबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नांनादेखील पवारांनी उत्तरं दिली. ईव्हीएममध्ये गडबड झाल्याचा कोणताही पुरावा माझ्याकडे पुरावा नाही. त्याबद्दल माझ्याकडे कोणतीही अधिकृत माहिती नाही. त्यामुळे यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही, असं पवारांनी म्हटलं. विधानसभेचा निकाल पाहता आम्हाला अधिक काम करण्याची गरज आहे. महायुतीनं त्यांचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला, अशी माहिती मला अनेक कार्यकर्त्यांनी दिली, असं पवारांनी सांगितलं.
लोकसभेत मविआसमोर आपटलेली महायुती एकतर्फी कशी जिंकली?; निकाल फिरला कसा? नंबरगेम समजून घ्या
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगिरीवरही पवार सविस्तर बोलले. त्यांच्या जागा अधिक निवडून आल्या हे मान्य करण्यात काहीच गैर नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसचा संस्थापक कोण आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. बारामतीत युगेंद्र पवारांचा पराभव झाला. त्या मतदारसंघात अजित पवारांचं काम आहे. अजित पवार आणि युगेंद्र पवारांची तुलना होऊ शकत नाही. बारामतीत अजित पवारांनी केलेल्या विकासकामांची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे तिथे काय घडेल याचीही आम्हाला कल्पना होती. बारामतीमधून कोणीतरी लढणं गरजेचंच होतं. युगेंद्र पवारांना लवकर लॉन्च तेलं असं म्हणण्यात अर्थ नाही. बारामतीत आम्ही उमेदवारच दिला नसता, तर राज्यात काय मेसेज गेला असता, असा प्रश्न पवारांनी केला.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post मविआचा दारुण पराभव कशामुळे? शरद पवारांचं २ प्रमुख मुद्द्यांवर बोट, बारामतीवरुन प्रतिप्रश्न first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109956 0
जळगाव जिल्ह्यात ६०.३७ टक्के मतदान; दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये, रावेरला सर्वाधिक मतदान https://tejpolicetimes.com/?p=109641 https://tejpolicetimes.com/?p=109641#respond Thu, 21 Nov 2024 09:08:20 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109641 जळगाव जिल्ह्यात ६०.३७ टक्के मतदान; दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये, रावेरला सर्वाधिक मतदान

Maharashtra Assembly Election 2024: शनिवारी (दि. २३) मतमोजणीनंतर त्यांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. जिल्ह्यात ११ मतदारसंघांमध्ये महाविकास आघाड़ी विरुद्ध महायुतीच्या उमेदवारांमध्ये प्रमुख लढती आहेत. महाराष्ट्र टाइम्सjalgaon vote म. टा. प्रतिनिधी, जळगाव : जळगाव जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी अकरा मतदारसंघांत सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ६०.३७ टक्के मतदान झाले. यात सर्वाधिक मतदान रावेर मतदारसंघात ६२.५०, तर सर्वात कमी […]

The post जळगाव जिल्ह्यात ६०.३७ टक्के मतदान; दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये, रावेरला सर्वाधिक मतदान first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
जळगाव जिल्ह्यात ६०.३७ टक्के मतदान; दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये, रावेरला सर्वाधिक मतदान

Maharashtra Assembly Election 2024: शनिवारी (दि. २३) मतमोजणीनंतर त्यांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. जिल्ह्यात ११ मतदारसंघांमध्ये महाविकास आघाड़ी विरुद्ध महायुतीच्या उमेदवारांमध्ये प्रमुख लढती आहेत.

महाराष्ट्र टाइम्स
jalgaon vote

म. टा. प्रतिनिधी, जळगाव : जळगाव जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी अकरा मतदारसंघांत सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ६०.३७ टक्के मतदान झाले. यात सर्वाधिक मतदान रावेर मतदारसंघात ६२.५०, तर सर्वात कमी मतदान जळगाव शहर मतदारसंघात ४५.११ टक्के मतदान झाले.

दरम्यान, रात्री उशिरापर्यंत शेवटची मतदान टक्केवारी मोजली जात होती. सायंकाळी काही केंद्रांवर मतदान सुरू होते. जळगाव जिल्ह्यातील ११ मतदारसंघांतील १३९ उमेदवारांचे भाग्य बुधवारी मतदान यंत्रात बंद झाले आहे. शनिवारी (दि. २३) मतमोजणीनंतर त्यांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. जिल्ह्यात ११ मतदारसंघांमध्ये महाविकास आघाड़ी विरुद्ध महायुतीच्या उमेदवारांमध्ये प्रमुख लढती आहेत.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात मतदान कर्तव्यावर असलेले लक्ष्मीकांत वासुदेव पाटील उपशिक्षक अनवर्देबुधगांव (वय ४९) हे मतदान (बीएलओ) कर्तव्यावरून त्यांच्या बभळाज ता. शिरपूर मूळगावी परत जात असताना मोटारसायकलचा अपघात झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. दृष्टिक्षेपात निवडणूक…. • मतदारसंघ – ११ ■ उमेदवार – १३९ पक्षीय उमेदवार- ३६ • मतदार ३६,७८,११२ मतदान कट – ३,६८३
महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ६३ टक्के मतदान; वेळ संपल्यानंतरही मतदारांच्या रांगा
नंदुरबार जिल्ह्यात सरासरी ७५ टक्के मतदान
धुळे :
नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांतील एकूण १४३४ मतदान केंद्रांवर बुधवारी, सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी ७५ टक्के मतदान झाले. नवापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ७४.६५, तर नंदुरबार विधानसभा मतदारसंघात सर्वांत कमी ५६ टक्के मतदान झाले आहे. चार विधानसभा मतदारसंघांत ३१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात नंदुरबार व शहादामध्ये दुहेरी, नवापूरमध्ये तिरंगी, तर अक्कलकुवामध्ये चौरंगी लढत होत आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून त्यांचे भवितव्य मतदार पेटीत बंद झाले आहे.
आधी मतदान, मग लग्न! मतदान केल्यानंतरच नवरी चढली बोहल्यावर, नागपूरच्या नेहाचं सर्वत्र कौतुक
धुळे जिल्ह्यात मतदारांचा उत्साह
धुळे :
धुळे लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाकडून दाखवलेला मतदानाचा उत्साह यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही दिसून आला. शहरातील ८० फुटी रोडवरील ऍग्लो ऊर्दू हायस्कूल, शंभर फुटी रोडवरील हाजी साजदा बानो हायस्कूल, देवपूर परिसरातील एलएम सरदार उर्दू हायस्कूल, महापालिका शाळा क्र. चार, आठ, नऊ, पंचवीस यासह श्रीजी इंग्लिश मीडियम स्कूल, गरुड इंग्रजी स्कूल, कनोसा हायस्कूल, गिदोडिया हायस्कूल या ठिकाणी मुस्लिम महिला व पुरुषांची मतदानासाठी मोठी रांग सकाळपासूनच लागलेली दिसून आली.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post जळगाव जिल्ह्यात ६०.३७ टक्के मतदान; दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये, रावेरला सर्वाधिक मतदान first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109641 0
बटेंगे तो कटेंगे महायुतीला जड जाणार; मराठा, दलित, ओबीसींचं मतदान कोणाला? काय सांगतो सर्व्हे? https://tejpolicetimes.com/?p=108660 https://tejpolicetimes.com/?p=108660#respond Thu, 14 Nov 2024 14:01:18 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108660 बटेंगे तो कटेंगे महायुतीला जड जाणार; मराठा, दलित, ओबीसींचं मतदान कोणाला? काय सांगतो सर्व्हे?

Maharashtra Election Survey: राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना लोकपोलचा सर्व्हे समोर आला आहे. त्यानुसार महायुतीला राज्यात ११५ ते १२८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. विरोधात असलेल्या महाविकास आघाडीला १५१ ते १६२ जागा मिळू शकतात. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना लोकपोलचा सर्व्हे समोर आला आहे. त्यानुसार महायुतीला राज्यात ११५ ते १२८ जागा […]

The post बटेंगे तो कटेंगे महायुतीला जड जाणार; मराठा, दलित, ओबीसींचं मतदान कोणाला? काय सांगतो सर्व्हे? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
बटेंगे तो कटेंगे महायुतीला जड जाणार; मराठा, दलित, ओबीसींचं मतदान कोणाला? काय सांगतो सर्व्हे?

Maharashtra Election Survey: राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना लोकपोलचा सर्व्हे समोर आला आहे. त्यानुसार महायुतीला राज्यात ११५ ते १२८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. विरोधात असलेल्या महाविकास आघाडीला १५१ ते १६२ जागा मिळू शकतात.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना लोकपोलचा सर्व्हे समोर आला आहे. त्यानुसार महायुतीला राज्यात ११५ ते १२८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. विरोधात असलेल्या महाविकास आघाडीला १५१ ते १६२ जागा मिळू शकतात. त्यामुळे मविआला स्पष्ट बहुमत मिळेल असं लोकपोलचा सर्व्हे सांगतो. मतदानाला केवळ ५ दिवस राहिलेले असताना लोकपोलचा सर्व्हे आलेला आहे.

लोकसभा निवडणुकीत मविआनं ४३.७१ टक्के मतदान घेत ३० जागांवर बाजी मारली होती. तर महायुतीनं ४३.५५ टक्के मतांसह १७ जागांवर विजय मिळवला. त्यामुळे मतांची टक्केवारी पाहता काँटे की टक्कर पाहायला मिळाली होती. पण विधानसभेला मतांच्या टक्केवारीत मविआ बरीच पुढे जाण्याची शक्यता आहे. महायुतीला ३७ ते ४० टक्के, तर मविआला ४३ ते ४६ टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे.
Maharashtra Election Survey: महायुतीला धक्का, विधानसभेला लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज; सर्व्हेतून आकडे समोर
लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठा समाजाच्या आंदोलनाचा फटका बसला. आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात अपयश आल्यानं मराठा समाजाची मतं मविआकडे वळली. आता विधानसभेलाही मराठा मतदार महाविकास आघाडीला साथ देईल, असं लोकपोलचा सर्व्हे सांगतो. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला ओबीसी समाज महायुतीच्या अधिक जवळ जाईल. पण त्यांचं एकगठ्ठा मतदान महायुतीला होणार नाही. तर अनुसूचित जाती मविआच्या पाठिशी उभ्या राहतील, असं सर्व्हे सांगतो.
Radhakrishna Vikhe Patil: राहुल गांधींचा ‘तो’ सल्ला न् मी भाजपमध्ये गेलो; शरद पवारांचं नाव घेत विखेंचा मोठा गौप्यस्फोट
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यात आलेल्या योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक रहेंगे सेफ रहेंगे अशी घोषणा दिली. मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न भाजपच्या विरोधात जाईल, असं लोकपोलचा सर्व्हे सांगतो. शेती, रोजगार, महिला सुरक्षा, महागाई या विषयांचा विचार करुन नागरिक मतदान करतील, असा सर्व्हेचा अंदाज आहे.

Maharashtra Election Survey: बटेंगे तो कटेंगे महायुतीला जड जाणार; मराठा, दलित, ओबीसींचं मतदान कोणाला? काय सांगतो सर्व्हे?

राज्यात भाजपविरोधात वातावरण आहे. मतदार अनेक समस्यांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार मानतात. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीमधील सगळ्यात लोकप्रिय नेते आहेत, अशी माहिती सर्व्हेतून समोर आली आहे. महाराष्ट्र विरुद्ध गुजरात हा विषय मतदारांना भावनिकदृष्ट्या जवळचा वाटतो, असं निरिक्षण नोंदवण्यात आलेलं आहे.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post बटेंगे तो कटेंगे महायुतीला जड जाणार; मराठा, दलित, ओबीसींचं मतदान कोणाला? काय सांगतो सर्व्हे? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108660 0
‘महाआघाडी म्हणजे महाअनाडी, राज्याला लव्ह जिहाद, लँड जिहाद मध्ये अडकवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न- योगी आदित्यनाथांचा हल्ला https://tejpolicetimes.com/?p=108374 https://tejpolicetimes.com/?p=108374#respond Tue, 12 Nov 2024 19:07:05 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108374 ‘महाआघाडी म्हणजे महाअनाडी, राज्याला लव्ह जिहाद, लँड जिहाद मध्ये अडकवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न- योगी आदित्यनाथांचा हल्ला

Maharashtra Assembly Election 2024: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी नागपूर येथे झालेल्या सभेत काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला केला. Lipi नागपूर (जितेंद्र खापरे) : महाआघाडी गठबंधन “महाअनाडी गठबंधन” आहे. तसेच काँग्रेस पुन्हा जुन्या मुद्द्यांवर जोर देत आहे आणि समाजात जातिवाद फैलावण्याचे काम करत आहे, काँग्रेस महाराष्ट्राला “लव्ह जिहाद” आणि “लँड जिहाद” मध्ये […]

The post ‘महाआघाडी म्हणजे महाअनाडी, राज्याला लव्ह जिहाद, लँड जिहाद मध्ये अडकवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न- योगी आदित्यनाथांचा हल्ला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘महाआघाडी म्हणजे महाअनाडी, राज्याला लव्ह जिहाद, लँड जिहाद मध्ये अडकवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न- योगी आदित्यनाथांचा हल्ला

Maharashtra Assembly Election 2024: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी नागपूर येथे झालेल्या सभेत काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला केला.

Lipi

नागपूर (जितेंद्र खापरे) : महाआघाडी गठबंधन “महाअनाडी गठबंधन” आहे. तसेच काँग्रेस पुन्हा जुन्या मुद्द्यांवर जोर देत आहे आणि समाजात जातिवाद फैलावण्याचे काम करत आहे, काँग्रेस महाराष्ट्राला “लव्ह जिहाद” आणि “लँड जिहाद” मध्ये अडकवू इच्छित आहे, अशी कडव्या शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर हल्ला केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सोमवारी नागपूरमध्ये भाजप उमेदवार प्रविण दटके आणि मोहन मते यांचा प्रचारसभेत बोलत होते.

योगी आदित्यनाथ म्हणाले, महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक होत आहे. एकीकडे महायुती महागठबंधन आहे ज्याचे नेतृत्व जगातील सर्वात मोठे आणि लोकप्रिय नेते नरेंद्र मोदीं करत आहे. तर दुसरीकडे महाआघाडीच्या नावावर “महाअनाडी” आहे. त्यांच्याकडे ना कुठला नेता आहे आणि ना कुठली नीती आहे. महाराष्ट्रात महायुतीची डबल इंजिन सरकार हीच महाराष्ट्राच्या हिताचे आहे आणि देशाच्या हिताचे आहे हे आवाहन करण्यासाठी मी नागपूरला आलो आहे.

यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या ऐतिहासिक योगदानाचे कौतुक करत म्हणाले, “महाराष्ट्र ने देशाला स्वराज्य, समता आणि समानता दिली आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा आदर्श दाखविला, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समानतेचा संदेश दिला,” असे नमूद केले. पुढे बोलताना ते म्हणाले, काँग्रेस पुन्हा जुन्या मुद्द्यांवर जोर देत आहे आणि समाजात जातीच्या नावावर फूट पाडायला आले आहे. योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर आरोप केला की, ती महाराष्ट्राला “लव्ह जिहाद” आणि “लँड जिहाद” मध्ये अडकवू इच्छित आहे.
निवडणूक शिगेला अन् समोर आला महत्त्वाचा अहवाल; आता प्रचाराची दिशाच बदलणार! जाणून घ्या रिपोर्टमध्ये असे काय आहे

योगी आदित्यनाथ म्हणाले, काँग्रेसचे तुष्टीकरण धोरण तुमच्यासाठी पहिले आहे, त्यामुळेच तुम्हाला खरे बोलता येत नाही. “जेव्हा हैद्राबादच्या निझामच्या रझाकार अत्याचार करत होते, हिंदूंना मारत होती. गावोगावी जाळत होता. यावेळी मल्लिकार्जून खरगे यांचे गावही जाळण्यात आले, त्यात त्यांची आई, मावशी आणि बहीण यांचाही मृत्यू झाला. तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांसाठी आणि हिंदूंसाठी पत्र लिहिले होते ज्या हिंदू आणि दलितांवर तिथे अत्याचार होत आहे त्यांनी महाराष्ट्रात त यावे. पण खरगे यांना हे सत्य बोलायचे नाही, कारण त्यांना वाटते की मी निजामावर आरोप केले तर मुस्लिमांचे मत मिळणार नाही.
जगातील एकही व्यक्ती सांगू शकत नाही की शरद पवार…; इतके स्पष्ट अन् थेट अजित पवार कधीच बोलले नाहीत
हिंदूंच्या गणेशोत्सव, रामनवमी मिरवणुकीवर दगडफेक का होते, तेव्हा रझाकार याची हिम्मत कशी झाली, एवढ्या हिंदूंची हत्या कशी झाली होती, 1947 ला लाखो हिंदू का कापले गेले. कारण तेव्हा “बटे थे इसलीये कटे थे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे” मग दहा वर्षात मोदींच्या नेतृत्वात बदलत्या भारत त्याला पाहिला असेल, देशाच्या सीमा मोदींनी सुरक्षित केल्या, 2014 च्या आधी पाकिस्तान भारतात येऊन आतंकवादी घटना घडवत होता. मात्र आता हा नवीन भारत आहे हा कोणाला छेडत नाही पण कोणी छेडलं तर त्याला सोडत ही नाही.
संजय राऊतांना मनसेकडून आग्रहाचे निमंत्रण! राज ठाकरेंच्या सभेत व्यासपीठावर एक खुर्ची उद्धव ठाकरेंच्या खासदारासाठी; पाहा नेमके काय प्रकरण
योगी आदित्यनाथ यांनी लव्ह जिहाद आणि लँड जिहादच्या विरोधात कायदा करण्याची गरजही व्यक्त केली. “काँग्रेसच्या नेतृत्वाखाली हे कधीच होणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.शेवटी, त्यांनी महाराष्ट्र आणि झारखंडमधील आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला मत द्यावे अशी विनंती केली आणि उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये भाजपाच्या विजयावर आनंद व्यक्त केला.

जयकृष्ण नायर

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

The post ‘महाआघाडी म्हणजे महाअनाडी, राज्याला लव्ह जिहाद, लँड जिहाद मध्ये अडकवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न- योगी आदित्यनाथांचा हल्ला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108374 0
नवे सरकार कोणाचे? राज्यातील या ३७ जागा ठरवणार महाविकास आघाडी अन् महायुतीचा फैसला, विजयाचे अंतर फक्त… https://tejpolicetimes.com/?p=108206 https://tejpolicetimes.com/?p=108206#respond Mon, 11 Nov 2024 12:49:53 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108206 नवे सरकार कोणाचे? राज्यातील या ३७ जागा ठरवणार महाविकास आघाडी अन् महायुतीचा फैसला, विजयाचे अंतर फक्त…

Maharashtra Election 2024: राज्यात नवे सरकार कोणाचे येणार याचा निर्णय २३ तारखेला होणार असला तरी २०१९च्या विधानसभा निवडणुकीतील ३७ अशा जागा आहे येथे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील चुरस वाढेल. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक जागेवर जोरदार चुरस सुरू आहे. विजयासाठी प्रत्येक उमेदवार सर्व काही करण्याचा प्रयत्न करतोय. निवडणुकीतच्या प्रचारातील भाषा हा काळजीचा […]

The post नवे सरकार कोणाचे? राज्यातील या ३७ जागा ठरवणार महाविकास आघाडी अन् महायुतीचा फैसला, विजयाचे अंतर फक्त… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
नवे सरकार कोणाचे? राज्यातील या ३७ जागा ठरवणार महाविकास आघाडी अन् महायुतीचा फैसला, विजयाचे अंतर फक्त…

Maharashtra Election 2024: राज्यात नवे सरकार कोणाचे येणार याचा निर्णय २३ तारखेला होणार असला तरी २०१९च्या विधानसभा निवडणुकीतील ३७ अशा जागा आहे येथे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील चुरस वाढेल.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक जागेवर जोरदार चुरस सुरू आहे. विजयासाठी प्रत्येक उमेदवार सर्व काही करण्याचा प्रयत्न करतोय. निवडणुकीतच्या प्रचारातील भाषा हा काळजीचा विषय ठरत चालला आहे. अशात ‘बंटेंगे तो कटेंगे’ सारखे वक्तव्य होत आहेत. राज्यातील निवडणुकीत ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी होत आहे. या दोघांशिवाय अन्य काही पक्ष देखील रिंगणात आहेत. राज्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत ३७ जागा अशा होत्या येथे जय-पराजयाचे अंतर ५ हजारपेक्षा कमी होते.

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांपैकी पाच जागा अशा होत्या ज्यात विजयाचे अंतर १ हजार पेक्षा कमी मतांचे होते. एक जागा तर अशी होती येथे विजयाचे अंतर ५०० पेक्षा कमी होते. हा विजय शिवसेनेच्या भाऊसाहेब लांडे यांनी मिळवला होता. चांदीवली मतदारसंघातून त्यांनी फक्त ४०९ मतांनी विजय मिळवला होता.

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोगरा मतदारसंघातून चंद्रिकापुरे गोवर्धन यांनी ७१८ मतांनी विजय मिळवला होता. तर पुण्यातील दौंडमधून राहुल कुल यांनी ७४६ मतांनी बाजी मारली होती. असाच विजय सांगोलामधून शाहजी बापू पाटील यांनी मिळवला होता, त्यांनी ७६८ मतांनी विजय मिळवला. नगरमधील कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशितोष काळे यांनी ८२२ मतांनी बाजी मारली होती.
राज्यातील भाजपच्या राष्ट्रीय नेत्याने सांगितला निवडणुकीचा निकाल; अजित पवारांना फक्त २५ जागा, मविआमध्ये ठाकरे गटाचा स्ट्राइक रेट सर्वात…
या शिवाय एक दो दोन हजार मतांच्या फरकाने भिवंडी पूर्व, मूर्तिजापूर, मुक्ताईनगर आणि बीड येथील निकाल लागले होते. या मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी, सपा आणि अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. २०१९ साली २८ जागा अशा होत्या येथे विजयाचे अंतर २ ते ५ हजार इतके होते. यातील १२ जागांवर भाजपने, ६ जागांवर राष्ट्रवादी, ४ जागा काँग्रेस, २ जागा शिवसेना तर एआयएमआयएम, बहुजन विकास आघाडी, भाकप यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली होती. एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळाली होती.

निवडणुकीत ३१ जागा अशा होत्या येथे विजयाचे अंतर ५ हजार पेक्षा कमी होते. या ३१ पैकी १६ मतदारसंघात माहविकास आघाडीने लीड घेतले होते तर १५ जागांवर महायुतीला आघाडी मिळाली होती. या निकालाकडे पाहिले तर ३७ जागांवर कोण बाजी मारणार यावर सत्ता कोणाला मिळेल याचा फैसला होऊ शकतो.

जयकृष्ण नायर

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

The post नवे सरकार कोणाचे? राज्यातील या ३७ जागा ठरवणार महाविकास आघाडी अन् महायुतीचा फैसला, विजयाचे अंतर फक्त… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108206 0
महिलांना ३००० रुपये, बेरोजगार भत्ता, २.५ लाख नोकरभरती; मविआच्या जाहीरनाम्यात काय काय? https://tejpolicetimes.com/?p=108112 https://tejpolicetimes.com/?p=108112#respond Sun, 10 Nov 2024 09:23:29 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108112 महिलांना ३००० रुपये, बेरोजगार भत्ता, २.५ लाख नोकरभरती; मविआच्या जाहीरनाम्यात काय काय?

MVA Manifesto for Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं संकल्पपत्र प्रसिद्ध केल्यानंतर आता महाविकास आघाडीनं घोषणापत्र प्रसिद्ध केलं आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं संकल्पपत्र प्रसिद्ध केल्यानंतर आता महाविकास आघाडीनं घोषणापत्र प्रसिद्ध केलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शपच्या खासदार सुप्रिया […]

The post महिलांना ३००० रुपये, बेरोजगार भत्ता, २.५ लाख नोकरभरती; मविआच्या जाहीरनाम्यात काय काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
महिलांना ३००० रुपये, बेरोजगार भत्ता, २.५ लाख नोकरभरती; मविआच्या जाहीरनाम्यात काय काय?

MVA Manifesto for Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं संकल्पपत्र प्रसिद्ध केल्यानंतर आता महाविकास आघाडीनं घोषणापत्र प्रसिद्ध केलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं संकल्पपत्र प्रसिद्ध केल्यानंतर आता महाविकास आघाडीनं घोषणापत्र प्रसिद्ध केलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शपच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस निवडणूक प्रभारी रमेश चेन्निथला, काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल उपस्थित होते. महिलांना मोफत बस प्रवास, तरुणांना बेरोजगारी भत्ता देण्याचं आश्वासन मविआकडून देण्यात आलं आहे.

महायुतीचा पराभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. राज्यात स्थिरता आणि सुशासन आणण्यासाठी मविआला मतदान करण्याचं आवाहन खरगेंनी केलं. ‘राज्याच्या प्रगती आणि विकासासाठी आमच्याकडे पंचसुत्री आहे. शेती, ग्रामविकास, उद्योग, रोजगार, शहर विकास, पर्यावरण, जनकल्याणावर आमचा भर आहे,’ असं खरगे म्हणाले.

आम्ही देत असलेल्या पाच गॅरंटी कुटुंबाच्या प्रगतीत महत्त्वाच्या ठरतील. यामुळे एका कुटुंबाला दरवर्षाला ३.५ लाख रुपयांचा लाभ होईल, असं खरगेंनी सांगितलं. महायुतीच्या लाडकी बहिण योजनेला महाविकास आघाडीनं महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. सध्या लाडकी बहीण योजनेतून गरजू महिलांना दीड हजार रुपये दिले जातात. तीच रक्कम २१०० रुपये करण्याचं आश्वासन भाजपकडून दिलं जात असताना मविआनं ३ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. तर बेरोजगार तरुणांनादेखील आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीच्या घोषणापत्रात काय काय?
१. महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत महिलांना ३ हजार रुपये प्रति महिना देणार.
२. जातीवर आधारित जनगणना करण्याचा निर्णय
३. तमिळनाडूच्या धर्तीवर आरक्षणाची ५० टक्के मर्यादा हटवणार
४. महिलांना मोफत बस प्रवास सेवा
५. बेरोजगार तरुणांना महिन्याला ४ हजार रुपये देणार
६. कर्जाचं व्याज वेळेवर भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देणार
७. २५ लाखांची आरोग्य विमा योजना सुरु करणार
८. मोफत औषधं उपलब्ध करुन देणार
९. २.५ लाख नोकरभरती करणार
१०. ३०० युनिट वीज वापरणाऱ्यांना १०० युनिट वीज मोफत देणार

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post महिलांना ३००० रुपये, बेरोजगार भत्ता, २.५ लाख नोकरभरती; मविआच्या जाहीरनाम्यात काय काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108112 0
Balasaheb Thorat: बंडखोरांच्या मागे महायुती? काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून शंका उपस्थित https://tejpolicetimes.com/?p=107915 https://tejpolicetimes.com/?p=107915#respond Sat, 09 Nov 2024 06:01:43 +0000 https://tejpolicetimes.com/?p=107915 Balasaheb Thorat: बंडखोरांच्या मागे महायुती? काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून शंका उपस्थित

Balasaheb Thorat : काँग्रेस आणि महाविकास आघाडीला बंडखोरांना भाजप आणि महायुतीचे पाठबळ आहे का, याचा शोध घेतला जाईल,’ असे थोरात यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र टाइम्सbalasaheb thorat1 म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘अनेक उमेदवार उभे करून मतविभाजन करणे, ही भाजपच्या राजकारणाची पद्धत आहे. महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याने अनेक जण निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. महाविकास आघाडीतील […]

The post Balasaheb Thorat: बंडखोरांच्या मागे महायुती? काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून शंका उपस्थित first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Balasaheb Thorat: बंडखोरांच्या मागे महायुती? काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून शंका उपस्थित

Balasaheb Thorat : काँग्रेस आणि महाविकास आघाडीला बंडखोरांना भाजप आणि महायुतीचे पाठबळ आहे का, याचा शोध घेतला जाईल,’ असे थोरात यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र टाइम्स
balasaheb thorat1

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘अनेक उमेदवार उभे करून मतविभाजन करणे, ही भाजपच्या राजकारणाची पद्धत आहे. महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याने अनेक जण निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. महाविकास आघाडीतील बंडखोरांना भाजप आणि महायुतीचा पाठिंबा आहे का, याबाबत संशोधन करू,’ असे वक्तव्य विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी केले.

काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत थोरात यांनी काँग्रेसच्या बंडखोरांबाबत भाष्य केले. काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे या वेळी उपस्थित होते. ‘बंडखोरांचे आव्हान केवळ महाविकास आघाडीपुढे नाही. महायुतीमध्येही अनेक बंडखोर उमेदवार आहेत. महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याने आमच्याकडे इच्छुकांची संख्या जास्त होती. अनेक अपक्ष उभे करून मतविभाजन करणे, ही भाजपची नेहमीची पद्धत आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीला बंडखोरांना भाजप आणि महायुतीचे पाठबळ आहे का, याचा शोध घेतला जाईल,’ असे थोरात यांनी स्पष्ट केले.

शहरातील कमल व्यवहारे, आबा बागूल, मनीष आनंद या बंडखोरांवर कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘जात आणि धर्मावरून ध्रुवीकरण करणे भाजपच्या राजकारणाचा भाग आहे. जनता या प्रकाराला कंटाळली असून, १८० पेक्षा जास्त उमेदवार निवडून देऊन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार आहे. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण हा दुय्यम भाग आहे. भ्रष्ट सरकार घालवणे, हे आमचे उद्दिष्ट आहे,’ असे थोरात यांनी सांगितले.
‘आपण कोणामुळे मोठे झालो याचे ऋण व्यक्त करायचे असते. मला सोनियाजींमुळे मोठी संधी मिळाली,’ अशा शब्दांत थोरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चिमटा काढला. निवडणुकीत काँग्रेस किती जागांवर विजयी होईल; तसेच निवडणुकीनंतर मोठा पक्ष कोणता असेल, या प्रश्नावर त्यांनी भाष्य करणे टाळले.
आमच्या योजना बंद होणार नाहीत; Ladki Bahin Yojanaवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मोठं विधान
‘महायुतीमुळे अर्थ खात्याचा बोजवारा’

‘दोन पक्ष फोडून सत्तेत आलेल्या बेकायदेशीर सरकारने अडचणीत सत्तर हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप केलेल्या नेत्याला दोन दिवसांत उपमुख्यमंत्री केले. या सरकारने पक्षांतरबंदी कायद्याची मोडतोड केली आहे. एका आमदाराला पाच-दहा कोटी तर दुसऱ्याला काही निधी नाही, असा दुजाभाव करणाऱ्या वा सरकारने अर्थ खात्याचा बोजवारा उडवला आहे. गरिबांना मदत करण्याच्या योजना काँग्रेसने पूर्वीपासून राबविल्या आहेत. मात्र, या सरकारने लाडक्या बहिणीऐवजी जाहिराती आणि शासन आपल्या दारी कार्यक्रमांवर अवाढव्य खर्च करून राज्याला दिवाळखोरीत नेले आहे,’ अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.
चाळीस दरोडेखोरांनी पक्ष लुटला; बुलढाण्यात उद्धव ठाकरे यांची शिंदे गटावर टीका
राज्यघटनेच्या लाल रंगाच्या पुस्तिकेवरून टीका करणाऱ्यांना राज्यघटना मान्य नाही. घरातील महिला लाल कुंकू लावतात. त्या नक्षलवादी आहेत का? भाजपच्या नेत्यांनी टीका करण्याची पातळी सोडली आहे. त्यांचे वर्तन राज्यघटनेला अनुसरून नाही. ‘बटेंगे तो कटेंगे’ म्हणणारा भाजप हाच लोकांना बाटवणारा आणि कापणारा आहे. -बाळासाहेब थोरात

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post Balasaheb Thorat: बंडखोरांच्या मागे महायुती? काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून शंका उपस्थित first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=107915 0
माझे मित्र देवेंद्र फडणवीस, मोदींची मराठीत सुरुवात; मविआ विकास ठप्प करणारी आघाडी असल्याची टीका https://tejpolicetimes.com/?p=107802 https://tejpolicetimes.com/?p=107802#respond Fri, 08 Nov 2024 07:25:44 +0000 https://tejpolicetimes.com/?p=107802 माझे मित्र देवेंद्र फडणवीस, मोदींची मराठीत सुरुवात; मविआ विकास ठप्प करणारी आघाडी असल्याची टीका

Narendra Modi Dhule Sabha Highlights for Vidhan Sabha Election :आचारसंहिता संपून जसे महायुतीचे सरकार स्थापन होईल, तसे मी वाढवण बंदरासह विमानतळाबाबत देवेंद्र फडणवीस यांची इच्छा कशी पूर्ण होते, त्यावर एकत्र बसून निर्णय घेऊ, असंही नरेंद्र मोदी म्हणाले महाराष्ट्र टाइम्स.कॉमनरेंद्र मोदी धुळे भाषण अजय गद्रे, धुळे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांतील महायुतीच्या […]

The post माझे मित्र देवेंद्र फडणवीस, मोदींची मराठीत सुरुवात; मविआ विकास ठप्प करणारी आघाडी असल्याची टीका first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
माझे मित्र देवेंद्र फडणवीस, मोदींची मराठीत सुरुवात; मविआ विकास ठप्प करणारी आघाडी असल्याची टीका

Narendra Modi Dhule Sabha Highlights for Vidhan Sabha Election :आचारसंहिता संपून जसे महायुतीचे सरकार स्थापन होईल, तसे मी वाढवण बंदरासह विमानतळाबाबत देवेंद्र फडणवीस यांची इच्छा कशी पूर्ण होते, त्यावर एकत्र बसून निर्णय घेऊ, असंही नरेंद्र मोदी म्हणाले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
नरेंद्र मोदी धुळे भाषण

अजय गद्रे, धुळे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धुळ्यात जाहीर सभा होत आहे. यावेळी मोदींनी मराठीत भाषणाला सुरुवात केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख माझे मित्र असा केला. आचारसंहिता संपून जसे महायुतीचे सरकार स्थापन होईल, तसे मी वाढवण बंदरासह विमानतळाबाबत देवेंद्र फडणवीस यांची इच्छा कशी पूर्ण होते, त्यावर एकत्र बसून निर्णय घेऊ, असंही नरेंद्र मोदी म्हणाले. लाडकी बहीण योजनेची चर्चा देशभरात असून विरोधक मात्र तिच्याविरुद्ध कोर्टात गेल्याचं मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

– लोकांना लुटणारे महाविकास आघाडीचे लोक, धोक्याने बनलेल्या सरकारची अडीच वर्ष पाहिली आहेत, आधी सरकार लुटले आणि शेवटी लोकांना लुटायला लागले होते.
– आघाडी सत्तेत आल्यावर मेट्रो, महामार्गांसारख्या विकास कामांना खीळ बसली, त्या सर्व योजना थांबावल्या ज्याने राज्याचे भविष्यात उज्ज्वल होणार होते
– युतीने विकासाचे नवे आयाम उभे केले, विकासाचा भरोसा मिळवला आहे.
– लक्षात ठेवा, भाजप, महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे.
– महिलांना केंद्रस्थानी ठेवून महायुतीचे अनेक निर्णय
– महाविकास आघाडीने महिला विकासाच्या अनेक संधी रोखल्या
– महायुतीच्या १० संकल्पांची सर्वत्र चर्चा सुरु आहे
– महाराष्ट्र पोलिसात २५ हजार मुलींची भरती
– युतीच्या वचननाम्याची चर्चा होत आहे, शानदार वचन नामा, विकासाची वाढेल गती, महाराष्ट्राची होणार हमाखास प्रगती.
– प्रत्येक वर्गाच्या प्रगतीची योजना आहे, सुरक्षेचा एहसास आहे, सर्वाना सोबत घेऊन चालण्याचा विश्वास आहे.
– युतीचा वचन नामा विकसित भारताचा आधार बनेल.
– महिला पुढे जातात तेव्हा संपूर्ण समाज गतीने विकास करतो
– केंद्र सरकारने महिलांसाठी मोठे निर्णय घेतले.
– जास्तीत जास्त क्षेत्रात महिलांना रोजगारच्या संधी दिली.
– केंद्राच्या प्रत्येक योजनेच्या केंद्रस्थानी महिला आहेत.
– युती सरकार केंद्राप्रमाणे महिला सशक्तीकरणाचे काम करीत आहे.
– महाराष्ट्र पोलीसमध्ये 25 हजार महिला भरतीमुळे महिला सामर्थ्य वाढेल, सुरक्षा वाढेल, रोजगार मिळेल.
– महिलांसाठी युतीची कामं आघाडीला सहन होत नाहीत
– लाडकी बहीण योजनेची चर्चा संपूर्ण देशात आहे. पण काँग्रेस ही योजना बंद करण्यासाठी षडयंत्र रचत आहेत, या योजनेच्या विरोधात कोर्टात गेले. ही योजना बंद करण्याचा डाव.
– आघाडीपासुन सतर्क राहण्याचे आवाहन, ते महिला सशक्तीकरण पाहू शकत नाहीत.
– महिलांबाबत चुकीच्या भाषेचा वापर केला जात आहे, याला जनता माफ करणार नाही
– मातृभाषा आई असते, गर्व आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
– या निर्णयानंतर संपूर्ण जगातून मराठी लोकांचे संदेश येत आहेत.
– लोक या निर्णयामुळे खुश आहेत, हे स्वप्न भाजपाने पूर्ण केले आहे
– भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा आनंद, काँग्रेसने देशात राज्यात केंद्रत सरकार होते पण मराठीला अभिजात भाषाला केली नाही, मराठीकडे दुर्लक्ष केले, आता विरोधकांना पुन्हा जळफळाट होत आहे, मोदींनी हे काम केलं?

मालेगाव रोडवरील खान्देश गोशाळेच्या मैदानावर दुपारी बारा वाजता मोदींची सभा झाली. राज्यातील विधानसभेच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची धुळ्यातील पहिलीच सभा होती. या सभेसाठी ७० हजार नागरिकांची बैठक व्यवस्था असलेल्या भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, डॉ. सुभाष भामरे, अमरिश पटेल, राजवर्धन कदमबांडे, धुळे ग्रामीणमधील भाजप उमेदवार राम भदाणे, गजेंद्र अंपळकर, चंद्रकांत सोनार, अरविंद जाधव, हिरामण गवळी, शीतलकुमार नवले आदी उपस्थित राहणार आहेत. भाजपचे धुळ्याचे उमेदवार अनुप अग्रवाल यांनी ही माहिती दिली.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

The post माझे मित्र देवेंद्र फडणवीस, मोदींची मराठीत सुरुवात; मविआ विकास ठप्प करणारी आघाडी असल्याची टीका first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=107802 0