Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 85

Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 87

Deprecated: Creation of dynamic property TwitterFeed\Builder\CTF_Feed_Builder::$ctf_sb_analytics is deprecated in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/custom-twitter-feeds/inc/Builder/CTF_Feed_Builder.php on line 23

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
marathi news - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Tue, 22 Apr 2025 10:14:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg marathi news - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 बॉक्स ऑफिसवरही ‘जुनं तेच सोनं’; रीरीलीज झालेल्या सिनेमांना जास्त गर्दी, तुंबाडची कमाई वाचाच https://tejpolicetimes.com/?p=115564 https://tejpolicetimes.com/?p=115564#respond Tue, 22 Apr 2025 10:14:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=115564 बॉक्स ऑफिसवरही ‘जुनं तेच सोनं’; रीरीलीज झालेल्या सिनेमांना जास्त गर्दी,  तुंबाडची कमाई वाचाच

Box office collection re released indian films:बॉलिवूडमध्ये सध्या जुन्या क्लासिक, हिट आणि गाजलेले चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे, पूर्वी बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलेले काही चित्रपट आता पुनःप्रदर्शनाच्या माध्यमातून चांगली कमाई करत आहेत. त्यामुळे कमाईच्या दृष्टीनं निर्मात्यांनाही हा ट्रेंड हवाहवासा वाटतोय. रीरीलीजमुळे बॉक्स ऑफिसवर हिट ‘सनम तेरी कसम’ हा चित्रपट पहिल्या […]

The post बॉक्स ऑफिसवरही ‘जुनं तेच सोनं’; रीरीलीज झालेल्या सिनेमांना जास्त गर्दी, तुंबाडची कमाई वाचाच first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
बॉक्स ऑफिसवरही ‘जुनं तेच सोनं’; रीरीलीज झालेल्या सिनेमांना जास्त गर्दी,  तुंबाडची कमाई वाचाच

Box office collection re released indian films:बॉलिवूडमध्ये सध्या जुन्या क्लासिक, हिट आणि गाजलेले चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे, पूर्वी बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलेले काही चित्रपट आता पुनःप्रदर्शनाच्या माध्यमातून चांगली कमाई करत आहेत. त्यामुळे कमाईच्या दृष्टीनं निर्मात्यांनाही हा ट्रेंड हवाहवासा वाटतोय.

रीरीलीजमुळे बॉक्स ऑफिसवर हिट
‘सनम तेरी कसम’ हा चित्रपट पहिल्या प्रदर्शनावेळी केवळ ९ कोटी ११ लाख रुपयांची कमाई करू शकला होता. मात्र, रीरीलीजमुळे या चित्रपटानं तब्बल ५१ कोटींहून अधिक कमाई करत सर्वांना आश्चर्यचकित केलं. त्याचप्रमाणे, ‘लैला मजनू’ या चित्रपटानं सुरुवातीला केवळ २ कोटी ८९ लाख रुपये कमावले होते, तर आता रीरीलीजदरम्यान केवळ चार दिवसांत ११ कोटी २० लाख रुपयांची कमाई केली. ‘तुम्बाड’ या चित्रपटानंही १३ कोटी ५७ लाख इतकी कमाई केली होती, पण आता त्यानं तब्बल ३२ कोटी ६५ लाख कोटींची कमाई करत यश मिळवलं.
पूर्वी अपयश, आता यश… असं का ?
पूर्वी अपयश मिळालेल्या सिनेमांना आता यश मिळतंय, याबाबत अभिनेता-निर्माता सोहम शाह म्हणाला, ‘नव्या चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना हवा तसा कन्टेंट मिळत नाही, त्यामुळे रीरीलीज झालेल्या जुन्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळतो. प्रत्येक चित्रपटाचा स्वतःचा एक ठरावीक प्रेक्षकवर्ग असतो. उदाहरणार्थ, ‘तुंबाड’च्या चाहत्यांची आवड वेगळी आहे, तसंच ‘सनम तेरी कसम’चा वेगळा प्रेक्षक आहे.’ ‘सनम तेरी कसम’चे दिग्दर्शक राधिका राव आणि विनय सप्रू याविषयी म्हणाले, ‘२०१६मध्ये आमच्या चित्रपटाचं योग्य प्रमोशन झालं नव्हतं. त्यामुळे अनेकांना तो माहीतही नव्हता. तो सिनेमागृहात फार दिवस न टिकल्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकला नाही. आता मात्र लोक त्याच्याशी भावनिकरित्या जोडले गेले आहेत, म्हणून तो यशस्वी ठरत आहे.’

बडे सिनेमे पुन्हा भेटीला…
अलीकडच्या काळात बॉलिवूडमध्ये नव्या चित्रपटांना अपेक्षित यश मिळत नसल्यामुळे निर्माते आणि वितरक जुन्या यशस्वी आणि क्लासिक चित्रपटांचं पुनः प्रदर्शन करत आहेत. ‘शोले’, ‘रॉकस्टार’, ‘हम आपके हैं कौन’, ‘वीर जारा’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘कल हो ना हो’, ‘करण अर्जुन’, ‘जब वी मेट’ यांसारखे अनेक चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाले. तसंच लोकप्रिय कलाकारांच्या वाढदिवसानिमित्तही त्यांच्या चित्रपटांचे विशेष शो ठेवले जात आहेत. राज कपूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे गाजलेले सिनेमे, अमिताभ बच्चन यांच्या ८०व्या वाढदिवशी ‘दीवार’ आणि ‘अमर अकबर अँथनी’ आणि आमिर खानच्या वाढदिवशी ‘दिल चाहता है’, ‘पीके’, ‘श्री इडियट्स’ आणि ‘धूम ३’ हे सिनेमे चित्रपटगृहात दाखवले गेले.

मर्यादा विसरलो, यानंतर कधीही ब्राह्मण समाजाबद्दल…अनुराग कश्यपचा जाहीर माफीनामा
दुसरी संधी
अनेक दिग्दर्शक आणि निर्माते त्यांच्या जुन्या दुर्लक्षित चित्रपटांना दुसरी संधी देण्याचा विचार करत आहेत.दिग्दर्शक हंसल मेहता ‘अलीगढ’ हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहेत, तर अभिनेता विनीत कुमार सिंह ‘मुक्काबाज’ या चित्रपटाच्या रीरिलीजबाबत विचार करत आहेत. जॉन अब्राहमनं अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘नो स्मोकिंग’ पुनःप्रसारित करण्यास उत्सुकता दाखवली आहे. ‘पिकू’ हा सिनेमाही पुढच्या महिन्यात पुन्हा प्रदर्शित होणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतही रीरिलीजचे वारे
मराठी चित्रपटसृष्टीतही काही दर्जेदार चित्रपटांचं पुनर्प्रदर्शन होत आहे. ‘सैराट’ या सिनेमानं आता २०२५मध्येही उत्तम प्रतिसाद मिळवला. ‘नटरंग’, ‘दुनियादारी’, ‘कट्यार काळजात घुसली’ हे चित्रपटही पुन्हा सिनेमागृहात झळकण्याची शक्यता आहे. तसंच ‘टाइमपास’, ‘बालगंधर्व’, ‘फँड्री’ आणि ‘वळू’ हे चित्रपटही भविष्यात पुनर्प्रदर्शित होऊ शकतात.
Oops Moment चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे पापाराझीवर भडकली टीव्ही अभिनेत्री

सिनेमे आणि कमाई
(निर्माते आणि चित्रपट वितरक यांनी जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार)
सनम तेरी कसम (२०१६) :
रीलीज (नेट कलेक्शन) ९ कोटी ११ लाख, रीरीलीज (इंडिया कलेक्शन) ५१ कोटी ४ लाख
तुंबाड (२०१८) :
रीलीज (नेट कलेक्शन) १३ कोटी ५७ लाख, रीरीलीज (इंडिया कलेक्शन) ३२ कोटी ६५ लाख
लैला मजनू (२०१८):
रीलीज (नेट कलेक्शन) ३ कोटी ८९ लाख, रीरीलीज (इंडिया कलेक्शन) ११ कोटी २० लाख

संकलन: अदिती पवार, जे.पी. लॉ कॉलेज

Source link

The post बॉक्स ऑफिसवरही ‘जुनं तेच सोनं’; रीरीलीज झालेल्या सिनेमांना जास्त गर्दी, तुंबाडची कमाई वाचाच first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=115564 0
महाराष्ट्र दिनी मराठी चित्रपटांना करावा लागणार संघर्ष, एकाच दिवशी प्रदर्शित होणार तब्बल इतके सिनेमे https://tejpolicetimes.com/?p=115558 https://tejpolicetimes.com/?p=115558#respond Mon, 21 Apr 2025 04:29:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=115558 महाराष्ट्र दिनी मराठी चित्रपटांना करावा लागणार संघर्ष, एकाच दिवशी प्रदर्शित होणार तब्बल इतके सिनेमे

Box Office Clash on 1st May :महाराष्ट्र दिनाच्या सुट्टीचं औचित्य साधून अनेक सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. सिनेप्रेमींसाठी ही पर्वणी असली, तरी निर्माते, वितरक आणि थिएटर मालकांसाठी हा ‘स्क्रीन संग्राम’ ठरणार आहे. सिनेमागृहांच्या स्क्रीनवर कोणता सिनेमा टिकेल, कोणाला खाली उतरावं लागेल, कोण प्रेक्षकांची मनं जिंकेल आणि कोण केवळ पोस्टरपुरता उरेल; हे पाहणं रंजक ठरणार […]

The post महाराष्ट्र दिनी मराठी चित्रपटांना करावा लागणार संघर्ष, एकाच दिवशी प्रदर्शित होणार तब्बल इतके सिनेमे first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
महाराष्ट्र दिनी मराठी चित्रपटांना करावा लागणार संघर्ष, एकाच दिवशी प्रदर्शित होणार तब्बल इतके सिनेमे

Box Office Clash on 1st May :महाराष्ट्र दिनाच्या सुट्टीचं औचित्य साधून अनेक सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. सिनेप्रेमींसाठी ही पर्वणी असली, तरी निर्माते, वितरक आणि थिएटर मालकांसाठी हा ‘स्क्रीन संग्राम’ ठरणार आहे. सिनेमागृहांच्या स्क्रीनवर कोणता सिनेमा टिकेल, कोणाला खाली उतरावं लागेल, कोण प्रेक्षकांची मनं जिंकेल आणि कोण केवळ पोस्टरपुरता उरेल; हे पाहणं रंजक ठरणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सुट्टीच्या दिवशी मराठीसह हिंदी, दाक्षिणात्य आणि इंग्रजी सिनेमेसुद्धा प्रदर्शित होत आहेत. चित्रपटांचे विषय, धाटणी वेगवेगळी असली आणि प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे अनेक पर्याय असले, तरी सिनेमागृहांमध्ये मिळणाऱ्या स्क्रीन्सवरून सामना रंगणार असल्याचं दिसून येतंय. एकाच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांमध्ये वेगळीच स्पर्धा होणार आहे.

‘आयपीएल’ सारखी सिनेमांची खेळपट्टी
केवळ १ मे हा दिवसच नव्हे, तर अलीकडे प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमा आणि येत्या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांची रणधुमाळीसुद्धा सिनेमगृहात पाहायला मिळणार आहे. प्रत्येक शुक्रवारी किमान दोन बहुचर्चित आणि लोकप्रिय कलाकारांचे सिनेमे प्रदर्शित होत आहेत. अगदी आयपीएलच्या टीम्सप्रमाणे सिनेमांच्याही टीम्स आहेत. त्यात मराठीसह हिंदी आणि हॉलिवूड सिनेमांचे पर्यायसुद्धा प्रेक्षकांसमोर आहेत. माव्र्व्हेलच्या ‘थंडरबोल्ट्स’नं तरुणवर्गाला अक्षरशः वेड लावलंय. अँटी-हिरोंच्या मिशनवर आधारित हा सिनेमा तंत्रज्ञान, स्टंट्स आणि स्टोरीलाइनमुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी सज्ज आहे. मुंबईतल्या एका थिएटर मालकानं सांगितलं, ‘सिनेमा प्रदर्शित होण्यास दोन आठवडे शिल्लक असूनही ‘थंडरबोल्ट्स’ सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगची विचारणा होतेय. त्यात पहाटेचा पहिला शो हाऊसफुल्ल गेलाय. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पुढचे दोन दिवस हाऊसफुल्ल बुकिंग राहील यात शंका नाही.

स्पर्धा की संघर्ष ?

आमच्याकडे अवघ्या चार स्क्रीन्स आहेत आणि सात सिनेमे लागायचे आहेत. कोणता सिनेमा ठेवायचा आणि कोणाला वळवायचं याचं गणित बसवणं कठीण आहे.

वितरण संस्था म्हणतात…

हॉलिवूड आणि हिंदी सिनेमे जास्त स्क्रीन्स घेत आहेत. त्यात सोशल मीडियावर मार्व्हलचा ‘थंडरबोल्ट्स’ आधीच ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटांची अवस्था बरी नाही.

सिनेमाकर्त्यांचं म्हणणं आहे…

एकाच दिवशी इतके सिनेमे प्रदर्शित करणं म्हणजे आर्थिक आत्महत्या. मोठ्या सिनेमांचा फायदा होत असला, तरी छोट्या बजेटच्या सिनेमांवर अन्याय होतो.

महाराष्ट्र दिनी मराठी चित्रपटांना करावा लागणार संघर्ष, एकाच दिवशी प्रदर्शित होणार तब्बल इतके सिनेमे

मराठी आणि हिंदीत चुरस
अजय देवगणचा ‘रेड २’ आणि हॉरर कॉमेडी असलेला ‘द भूतनी’ सुद्धा प्रेक्षकांना आकर्षित करण्यात मागे पडला नाही. या दोन हिंदी सिनेमांसमोर ‘गुलकंद’ हा नात्यांवर बेतलेला आणि ‘आता थांबायचं नाय’ सारखा वास्तविक सिनेमा आहे. त्यात ‘हिट द थर्ड केस’ने आणि ‘रेट्रो’ या दाक्षिणात्य सिनेमांचीही भर पडली आहे. एकाच मल्टिप्लेक्समध्ये चार स्क्रीन, पण सात सिनेमे. कोणाला किती शो मिळणार? दरम्यान मराठी सिनेमांचा ‘प्राइम टाइम शो’ मिळण्याचा मुद्दा पुन्हा चिघळला जाण्याची शक्यता आहे. ‘ही सगळी स्पर्धा प्रेक्षकांच्या वेळेसाठी आहे. सध्या सुट्टीचे दिवस आहेत. प्रत्येक सिनेनिर्मत्याला त्याचा सिनेमा सुट्टीत प्रदर्शित करायचा आहे. इतके सिनेमे एकाच दिवशी आले, की प्रेक्षकही गोंधळतात. परिणामतः काही सिनेमे सुरुवातीच्या तीन दिवसांतच थिएटरमधून हटवले जातात’, असं सिनेमा वितरक सांगत आहेत.

आश्रमातल्या भूतकाळाने मधुभाऊंची अवस्था बिकट; प्रियाची हेरगिरी, समजणार सायली-अर्जुनचा नवा प्लॅन?
तीन जिवलग मित्रांचे सलग तीन सिनेमे !

दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेता भरत जाधव आणि अभिनेता अंकुश चौधरी यांची मैत्री सर्वश्रुत आहे. करिअरच्या सुरुवातीपासून हे तीन कलंदर कलाकार एकत्र आहेत. एकापेक्षा एक भन्नाट सिनेमे, नाटकांमधून त्या तिघांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. या तिघांचे तीन वेगवेगळे सिनेमे लागोपाठ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. २५ एप्रिलला केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’, त्यांनतर १ मेला भरत जाधवचा ‘आता थांबायचं नाय’ आणि त्यानंतरच्या आठवड्यात ९ मेला अंकुश चौधरीचा ‘पीएसआय अर्जुन’ प्रदर्शित होतोय.

आमनेसामने
‘सुशीला सुजीत’ आणि ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’
‘देवमाणूस’ आणि ‘झापुक झुपूक’
‘आता थांबायचं नाय’ आणि ‘गुलकंद’
‘माझी प्रारतना’ आणि ‘पीएसआय अर्जुन’
‘एप्रिल मे ९९’ आणि ‘बंजारा’

Gloomy Sunday : जगातलं एकदम अपशकूनी गाणं! तब्बल १०० हून अधिक जणांनी दिला जीव, ६२ वर्ष घातलेली बंदी
१ मे रोजी प्रदर्शित होणारे सिनेमे !
मराठी :
‘आता थांबायचं नाय’,
‘गुलकंद’
हिंदी :
‘रेड २’, ‘द भूतनी’
दाक्षिणात्य सिनेमे :
‘रेट्रो’, ‘हिट – द थर्ड
केस’
हॉलिवूड :
‘थंडरबोल्ट्स’

कल्पेशराज कुबल

लेखकाबद्दलकल्पेशराज कुबलकल्पेशराज कुबल हे ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये सिनिअर डिजिटल कंटेंन्ट क्रिएटर (सिनिअर एंटरटेनमेंट जर्नलिस्ट) म्हणून कार्यरत आहेत. गेल्या ११ वर्षांपासून ते पत्रकारिता, कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. पत्रकारितेच्या आजअखेरच्या प्रवासात सांस्कृतिक सण-उत्सव, शिक्षण, फॅशन आदी विविध क्षेत्रे, विषयांची हाताळणी त्यांनी केली. विशेषत: गेल्या सहा वर्षांपासून मनोरंजन क्षेत्राचे वृत्तांकन (मराठी सिनेसृष्टी, बॉलिवूड आणि नाट्यसृष्टी विषयी लिखाण.) ते करत आहेत. दैनिकाच्या ‘थ्रीडी’ या चित्रपट समिक्षणाच्या सदरासाठी ते गेल्या पाच वर्षांपासून लिखाण करत आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’मधील ‘माझी पहिली भूमिका’ हे त्यांचे सदर विशेष गाजले. कलाकारांच्या व्यावसायिक प्रवासाविषयी, विविधांगी भूमिकांविषयी या सदरात लिखाण त्यांनी केले आहे. ‘सिनेमा’ या विषयावर नियतकालिके, डिजिटल माध्यमात त्यांनी लिखाण केले आहे. कल्पेशराज हे तरुण पत्रकार असण्यासोबत ते ‘फोटोग्राफर’ आणि ‘आर्टिस्ट’ देखील आहे. तसेच त्याच्या नावावर भारतीय माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे ‘लार्जेस्ट पेपर पोर्ट्रेट’ बनवण्याचा ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’ आहे.आणखी वाचा

Source link

The post महाराष्ट्र दिनी मराठी चित्रपटांना करावा लागणार संघर्ष, एकाच दिवशी प्रदर्शित होणार तब्बल इतके सिनेमे first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=115558 0
बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारचे खणखणीत नाणे! Kesari 2 ने पहिल्याच रविवारी केली जबरदस्त कमाई https://tejpolicetimes.com/?p=115560 https://tejpolicetimes.com/?p=115560#respond Mon, 21 Apr 2025 04:14:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=115560 बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारचे खणखणीत नाणे! Kesari 2 ने पहिल्याच रविवारी केली जबरदस्त कमाई

Akshay Kumar Kesari 2 Box Office Collection Day 3: अक्षय कुमारच्या ‘केसरी 2’ या चित्रपटाने अवघ्या 3 दिवसात 30 कोटींच्या आसपास कमाई केली आहे. हायलाइट्स: ‘केसरी 2’ची चांगली कमाई अक्षय कुमारचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर करतोय कमाल ‘जाट’लाही टाकले मागे महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: अक्षय कुमारचा ‘Kesari: Chapter 2’ बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसतो आहे. अक्षयसह […]

The post बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारचे खणखणीत नाणे! Kesari 2 ने पहिल्याच रविवारी केली जबरदस्त कमाई first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारचे खणखणीत नाणे! Kesari 2 ने पहिल्याच रविवारी केली जबरदस्त कमाई

Akshay Kumar Kesari 2 Box Office Collection Day 3: अक्षय कुमारच्या ‘केसरी 2’ या चित्रपटाने अवघ्या 3 दिवसात 30 कोटींच्या आसपास कमाई केली आहे.

हायलाइट्स:

  • ‘केसरी 2’ची चांगली कमाई
  • अक्षय कुमारचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर करतोय कमाल
  • ‘जाट’लाही टाकले मागे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: अक्षय कुमारचा ‘Kesari: Chapter 2’ बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसतो आहे. अक्षयसह आर माधवन, अनन्या पांडे, सायमन पॅस्ले यांची या चित्रपटात मुख्य भूमिका असून, 18 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटात Akshay Kumar याने सी. शंकरन नायर यांची भूमिका साकारत आहे. ही एका अशा धाडसी भारतीय वकीलाची भूमिका त्याने साकारली आहे, ज्यांनी ब्रिटिश साम्राज्याला न्यायालयात आव्हान दिले. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने पहिल्या दिवशी 7.75 कोटी रुपयांची चांगली ओपनिंग केली असून, पहिल्या रविवारी या कमाईमध्येही चांगली वाढ झाली आहे.

रविवारी झाली जबरदस्त कमाई

पहिल्या दिवशी चित्रपटाने 7.75 कोटी रुपये कमावले आणि या सिनेमाविषयी सोशल मीडिया आणि इतर माध्यमांमध्ये चांगला रीव्ह्यू दिसून आला. त्यामुळे वीकेंडला या कमाईत वाढ होईल असे अपेक्षित होते. त्यानुसार शनिवारी दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 09.75 कोटी रुपये कमावले, म्हणजेच पहिल्या दिवसापेक्षा सुमारे 25 टक्के वाढ पाहायला मिळाली. Sacnilk ने याविषयी वृत्त दिले आहे. ‘केसरी 2’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये रविवारी आणखी वाढ असून रविवारी ही कमाई 12.25 कोटी रुपयांवर पोहोतली आहे. अशाप्रकारे, पहिल्या तीन दिवसांचे एकूण कलेक्शन आता 29.75 कोटी रुपये झाले आहे.

अक्षयचा हा सिनेमा ‘सिकंदर’ किवा ‘छावा’प्रमाणे ‘मास अपील’ असणारा चित्रपट नाही, परिणामी देशभरात केवळ 1700 स्क्रीन्सवर तो रीलिज करण्यात आला आहे. असे असले तरीही देशभक्तीपर थीममुळे सिनेमा देशभरातील विविध भागांमध्ये चांगली कमाई करतो आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर ‘केसरी 2’ची स्पर्धा सनी देओलच्या ‘जाट’सोबत आहे. या चित्रपटाच्या कमाईमध्येही रविवारी काही वाढ झाली. असे असले तरी, अक्षयने सनीला रविवारच्या कमाईमध्ये पछाडले आहे. ‘जाट’ने रविवारी सुमारे ५.१५ कोटी रुपये कमावले.

Ground Zero: सई ताम्हणकरच्या बॉलिवूड सिनेमाचा रीलिजआधी मोठा विक्रम! 38 वर्षात पहिल्यांदा घडतंय असं काही

‘केसरी 2’चे तीन दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

दिवस 1 (पहिला शुक्रवार)- 7.75 कोटी रुपये
दिवस 2 (पहिला शनिवार)- 9.75 कोटी रुपये
दिवस 3 (पहिला रविवार)- 12.25 कोटी रुपये
एकूण- 29.75 कोटी रुपये

दरम्यान हा चित्रपट सी. शंकरन नायर यांचे नातू रघु पलात आणि पुष्पा पलात यांनी लिहिलेल्या ‘द केस दॅट शूक द एम्पायर’ या पुस्तकापासून प्रेरित आहे आणि तो करण सिंग त्यागी आणि अमृतपाल बिंद्रा यांनी लिहिला आहे.

जान्हवी भाटकर

लेखकाबद्दलजान्हवी भाटकरजान्हवी भाटकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. डिजिटल आणि टेलिव्हिजन मीडियामध्ये ५ वर्षांचा अनुभव. ‘न्यूज १८ लोकमत’मधून डिजिटल मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात. ऑनलाइन माध्यमांमध्ये ३ वर्ष कार्यरत. मनोरंजन, लाइफस्टाइल आणि अर्थ विषयात आवड.आणखी वाचा

Source link

The post बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारचे खणखणीत नाणे! Kesari 2 ने पहिल्याच रविवारी केली जबरदस्त कमाई first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=115560 0
सलमान खानवर भारी पडला 'ढाई किलो का हात', सनी देओलच्या 'जाट'ची 'सिकंदर'पेक्षा तगडी कमाई https://tejpolicetimes.com/?p=115554 https://tejpolicetimes.com/?p=115554#respond Sun, 13 Apr 2025 05:55:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=115554 सलमान खानवर भारी पडला 'ढाई किलो का हात', सनी देओलच्या 'जाट'ची 'सिकंदर'पेक्षा तगडी कमाई

Sunny Deol Jaat Vs Salman Khans Sikandar: सनी देओलच्या ‘जाट’ सिनेमाने सलमान खानच्या ‘सिकंदर’ला स्पष्टपणे धूळ चारल्याचे चित्र बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळाले. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: बॉक्स ऑफिसवर सध्या दोन सुपरस्टारचे चित्रपट एकमेकांना टक्कर देत असल्याने चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी दिसून येत आहे. सलमान खानचा ‘सिकंदर’ आणि सनी देओलचा ‘जाट’ हे चित्रपट मैदानात आमनेसामने आहेत. या सिनेमांची […]

The post सलमान खानवर भारी पडला 'ढाई किलो का हात', सनी देओलच्या 'जाट'ची 'सिकंदर'पेक्षा तगडी कमाई first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
सलमान खानवर भारी पडला 'ढाई किलो का हात', सनी देओलच्या 'जाट'ची 'सिकंदर'पेक्षा तगडी कमाई

Sunny Deol Jaat Vs Salman Khans Sikandar: सनी देओलच्या ‘जाट’ सिनेमाने सलमान खानच्या ‘सिकंदर’ला स्पष्टपणे धूळ चारल्याचे चित्र बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळाले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: बॉक्स ऑफिसवर सध्या दोन सुपरस्टारचे चित्रपट एकमेकांना टक्कर देत असल्याने चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी दिसून येत आहे. सलमान खानचा ‘सिकंदर’ आणि सनी देओलचा ‘जाट’ हे चित्रपट मैदानात आमनेसामने आहेत. या सिनेमांची एकमेकांसोबत स्पर्धा सुरू असताना, भाईजानचा सिनेमा मागे पडतो आहे. तिसऱ्या दिवशी सनी देओलने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ज्यामुळे ए.आर. मुरुगादोस यांच्या ‘सिंकदर’ची अवस्था पार बिकट झाली आहे. रविवार १२ एप्रिल रोजी दोन्ही चित्रपटांनी किती कमाई केली हे घ्या जाणून…

३० मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सिकंदर’ने १३ व्या दिवशी म्हणजे दुसऱ्या शुक्रवारी फक्त ३० लाख रुपये कमावले. तर, १० एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या ‘जाट’ने दुसऱ्या दिवशी ११ एप्रिल रोजी शुक्रवारी ७ कोटी रुपये कमावले. अशा परिस्थितीत कोणाचे पारडे जड आहे, हे स्पष्टपणे दिसून आले. सलमान खानच्या चित्रपटाची सुरुवात दमदार झाली असली तरी, त्यानंतर सिनेमाची कमाई ढेपाळत गेली. त्या तुलनेत, सनी देओलच्या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई काहीच नव्हती. कारण ‘जाट’ने तीन दिवसांत मिळून २६ कोटीचा आकडा गाठला, तर ‘सिकंदर’ने पहिल्याच दिवशी ही कमाई केली होती.

Krrish 4 साठी प्रियांका चोप्राने किती कोटींची केली मागणी? अभिनेत्रीचे मानधन ऐकूनच चक्रावाल

‘जाट’ आणि ‘सिकंदर’ने किती केली कमाई?

‘जाट’ सिनेमाने तिसऱ्या दिवशी म्हणजेच पहिल्या शनिवारी सुमारे १० कोटी रुपये कमावल्याचे सांगितले जाते आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्यामुळे या चित्रपटाने तीन दिवसात एकूण २६.५० कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तर रीलिनंतर दुसऱ्या शनिवारी सिकंदरचे कलेक्शन जवळपास ४० लाख रुपये आहे. आतापर्यंत ‘सिकंदर’ने १०८.४७ कोटींची कमाई केली आहे. Sacnilk ने याविषयी वृत्त दिले आहे.

या दोन्ही सिनेमांना आगामी काळात अक्षय कुमारच्या ‘केसरी २’चे आव्हान आहे. १८ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची आधीपासूनच चर्चा आहे. जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. त्यामुळे ‘जाट’ला सलमानपासून धोका नसला तरी, अक्षयचा सिनेमा धोकादायक ठरू शकतो.

जान्हवी भाटकर

लेखकाबद्दलजान्हवी भाटकरजान्हवी भाटकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. डिजिटल आणि टेलिव्हिजन मीडियामध्ये ५ वर्षांचा अनुभव. ‘न्यूज १८ लोकमत’मधून डिजिटल मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात. ऑनलाइन माध्यमांमध्ये ३ वर्ष कार्यरत. मनोरंजन, लाइफस्टाइल आणि अर्थ विषयात आवड.आणखी वाचा

Source link

The post सलमान खानवर भारी पडला 'ढाई किलो का हात', सनी देओलच्या 'जाट'ची 'सिकंदर'पेक्षा तगडी कमाई first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=115554 0
सलमान खानला मोठा धक्का! सिकंदरचे तब्बल ११०० शो रद्द, चौथ्या दिवशी फक्त एवढीच कमाई https://tejpolicetimes.com/?p=115540 https://tejpolicetimes.com/?p=115540#respond Thu, 03 Apr 2025 03:09:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=115540 सलमान खानला मोठा धक्का! सिकंदरचे तब्बल ११०० शो रद्द, चौथ्या दिवशी फक्त एवढीच कमाई

Sikandar Box Office : सलमान खानचा ‘सिकंदर’ ईदला प्रदर्शित झाला. त्यादिवशी सिनेमाने भरभरुन कमाई केली पण त्यानंतर त्याचा जोर ओसरु लागला. हायलाइट्स: सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाच्या कमाईत चौथ्या दिवशी घट झाली आहे. ईदचा प्रभाव कमी झाल्यामुळे ‘सिकंदर’चे कलेक्शनही कमी झाले आहे. आठवड्याच्या शेवटी सिनेमा जादू करेल अशी अपेक्षा. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई– सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाकडून […]

The post सलमान खानला मोठा धक्का! सिकंदरचे तब्बल ११०० शो रद्द, चौथ्या दिवशी फक्त एवढीच कमाई first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
सलमान खानला मोठा धक्का! सिकंदरचे तब्बल ११०० शो रद्द, चौथ्या दिवशी फक्त एवढीच कमाई

Sikandar Box Office : सलमान खानचा ‘सिकंदर’ ईदला प्रदर्शित झाला. त्यादिवशी सिनेमाने भरभरुन कमाई केली पण त्यानंतर त्याचा जोर ओसरु लागला.

हायलाइट्स:

  • सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाच्या कमाईत चौथ्या दिवशी घट झाली आहे.
  • ईदचा प्रभाव कमी झाल्यामुळे ‘सिकंदर’चे कलेक्शनही कमी झाले आहे.
  • आठवड्याच्या शेवटी सिनेमा जादू करेल अशी अपेक्षा.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई– सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाकडून चाहते, प्रेक्षक आणि समीक्षकांना खूप अपेक्षा होत्या. सर्वांना वाटले होते की हे ‘बजरंगी भाईजान’ किंवा ‘सुलतान’ सारखाच हाही सिनेमा दमदार कमाई करत इतिहासाची पुनरावृत्ती करेल. पण ए.आर. मुरुगदासचा हा चित्रपट अपेक्षांप्रमाणे चालला नाही. त्याला नकारात्मक पुनरावलोकने मिळाली आहेत. तरीही, भाईजानची ही जादू आहे की, फक्त तीन दिवसांत त्याने देशभरात ७४ कोटींहून अधिक कमाई केली तर जगभरात १२३.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. पण ईदचा प्रभाव संपताच ‘सिकंदर’ डळमळीत होऊ लागला आहे. प्रेक्षकांच्या कमतरतेमुळे ११०० शो रद्द करण्यात आले आणि दुसरीकडे, सिनेमाच्या कमाईत -५०% घट झाली आहे. तरीसुद्धा, आठवड्याच्या शेवटी त्याचे कलेक्शन झपाट्याने वाढण्याची अपेक्षा आहे. १२ जणींशी अफेअर, काहींशी लग्न तर काहींशी live in, बॉलिवूडच्या या खलनायकाचा मृत्यू फारच भयंकर, अंगावर येईल काटा
सलमान खानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट ईदच्या निमित्ताने रविवारी, ३० मार्च रोजी प्रदर्शित झाला. सण आणि जॉइन सुट्टीमुळे, पहिल्या दिवशी त्याने २६ कोटी रुपयांचे खाते उघडले. दुसऱ्या दिवशी कलेक्शनमध्ये ११.५४% वाढ झाली, सोमवारी त्याने २९ कोटी रुपयांची कमाई केली. ईदचे सेलिब्रेशन साधारण तीन-चार दिवस चालत असल्याने तिसऱ्या दिवशी चांगली कमाई झाली. पण त्यात थोडीशी घट देखील दिसून आली. मंगळवारी सिनेमाने १९.५ कोटी रुपये जमा केले होते. एकूणच, चित्रपटाने तीन दिवसांत ७४.५ कोटी रुपये कमावले. जरी आता त्याचा वेग मंदावला असला तरी, तो देशात १०० कोटी आणि जगभरात २०० कोटींच्या जवळपास तो पोहोचत आहे.

‘सिकंदर’चा चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवरचा कलेक्शन

ईदचा प्रभाव आता कमी झाला आहे आणि त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवरही दिसून येतोय. ‘सिकंदर’ ने देशात चौथ्या दिवशी ९.७५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये -५०.००% घट झाली आहे. चित्रपटाचा एकूण कलेक्शन आता ८४.२५ कोटी इतके झाले आहे.

पत्नीला धोका, अभिनेत्रीसोबत लिव्ह इन, स्वत:च्याच भाचीशी अफेयर, पन्नाशीत चौथं मूल अन्… वाद विवादांनी भरलंय या डान्सरचं आयुष्य
‘सिकंदर’ चित्रपटाचा ट्रेलर

प्रेक्षकांच्या कमतरतेमुळे ११०० शो रद्द

चौथ्या दिवशी, थिएटरमधील सकाळच्या शोला खूपच कमी गर्दी होती ती म्हणजे ५.२९%. दुपारी त्यात ११.६७% आणि संध्याकाळी १५.३५% वाढ झाली. रात्रीच्या शोमध्येही कोणतीही फारशी सुधारणा झाली नाही. फक्त १६.०१% गर्दी चित्रपटगृहात होती. यामुळेच मल्टीप्लेक्समध्ये प्रेक्षकांच्या कमतरतेमुळे ‘सिकंदर’चे ११०० शो रद्द करण्यात आले आहेत. पण अजूनही ६९०० शो बाकी आहेत. सर्वाधिक उत्पन्न सिंगल स्क्रीन थिएटरमधून मिळत आहे. मोठ्या शहरांमधील मल्टिप्लेक्समध्ये प्रेक्षक नसले तरी, लहान शहरांमधील सिंगल स्क्रीन थिएटर आणि शो अजूनही हाऊसफुल्ल आहेत.

सलमान खानला मोठा धक्का! सिकंदरचे तब्बल ११०० शो रद्द, चौथ्या दिवशी फक्त एवढीच कमाई

आठवड्याच्या शेवटी पुन्हा कमाई होण्याची शक्यता

ईदनंतर कमाईत घट झाली असली तरी, शुक्रवारी ‘सिकंदर’ची जादू पुन्हा दिसून येईल, असा विश्लेषकांचा दावा आहे. आठवड्याच्या शेवटी त्याची कमाई पुन्हा वाढेल. साजिद नाडियाडवाला निर्मित हा चित्रपट २०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. रविवारपर्यंत देशभरातून १५० कोटी रुपये जमा होऊ शकतात आणि जगभरात २५०-३०० कोटी रुपयांचा आकडा गाठू शकतो. या बाबतीत हा चित्रपट नफ्यात चालला आहे.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे.तसेच माझी सहेली मॅगझिन मध्ये १ वर्षाचा अनुभव
आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. मनोरंजनसोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.
आणखी वाचा

Source link

The post सलमान खानला मोठा धक्का! सिकंदरचे तब्बल ११०० शो रद्द, चौथ्या दिवशी फक्त एवढीच कमाई first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=115540 0
अटक करायला आलेले पोलीस, दारु पिऊन पार्टी करुन गेले! बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा गौप्यस्फोट https://tejpolicetimes.com/?p=115536 https://tejpolicetimes.com/?p=115536#respond Tue, 01 Apr 2025 03:34:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=115536 अटक करायला आलेले पोलीस, दारु पिऊन पार्टी करुन गेले! बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा गौप्यस्फोट

Ram Gopal Verma Statement: राम गोपाल वर्मा यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. एकदा एका वादग्रस्त ट्विट प्रकरणात पोलिस त्यांना अटक करण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचले होते. पण नंतर असे काहीतरी घडले की अधिकारी एकत्र बसले, दारू प्यायले आणि निघून गेले. हायलाइट्स: राम गोपाल वर्मांनी ४-५ वर्षे जुनी गोष्ट सांगितली वादग्रस्त ट्विट प्रकरणात राम गोपाल वर्मांच्या […]

The post अटक करायला आलेले पोलीस, दारु पिऊन पार्टी करुन गेले! बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा गौप्यस्फोट first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
अटक करायला आलेले पोलीस, दारु पिऊन पार्टी करुन गेले! बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा गौप्यस्फोट

Ram Gopal Verma Statement: राम गोपाल वर्मा यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. एकदा एका वादग्रस्त ट्विट प्रकरणात पोलिस त्यांना अटक करण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचले होते. पण नंतर असे काहीतरी घडले की अधिकारी एकत्र बसले, दारू प्यायले आणि निघून गेले.

हायलाइट्स:

  • राम गोपाल वर्मांनी ४-५ वर्षे जुनी गोष्ट सांगितली
  • वादग्रस्त ट्विट प्रकरणात राम गोपाल वर्मांच्या ऑफिसमध्ये पोहोचले होते पोलिस अधिकारी
  • पोलिसांनी सोबत केले मद्यपान

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई– प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हल्ली चित्रपटांपेक्षा त्यांच्या स्पष्ट विचारांमुळे जास्त चर्चेत असतात. ट्विटरवर (आता X) ते अनेकदा अशा गोष्टी पोस्ट करतात ज्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे त्यांच्यावर अनेक वेळा गुन्हे दाखल झाले आहेत. ‘रंगीला’, ‘सत्या’ आणि ‘कंपनी’ सारखे सुपरहिट चित्रपट बनवणाऱ्या राम गोपाल वर्मा यांनी आता एका मुलाखतीत एक नवीन आणि खळबळजनक दावा केला आहे. दिग्दर्शकाने सांगितले की, वादग्रस्त ट्विट्सच्या संदर्भात पोलिस एकदा त्यांना अटक करण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये आले होते. पण अधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत दारू प्यायली आणि मग निघून गेले. राम गोपाल वर्मा यांनी ‘गेम चेंजर्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘४-५ वर्षांपूर्वी मी काही ट्विट केले होते. मी त्याबद्दल जास्त विचार केला नाही, मला जे वाटले ते मी लिहून टाकले. काही तासांनंतर, महेश भट्ट सरांनी मला फोन केला आणि म्हणाले, रामू, तुझ्या ट्विटवरून गोंधळ उडाला आहे, पण हे समजून घे की ईशनिंदा करणे कायद्याच्या विरोधात नाही. खरे सांगायचे तर, ते कशाबद्दल बोलत आहेत हे मला कळाले नाही कारण मी काय केले होते ते मी विसरून गेलो होतो.

या अभिनेत्रीला हवी होती ४/५ मुलं, पण नवरा नव्हता तयार, मग वयाच्या ३६ व्या वर्षी घेतला मोठा निर्णय
राम गोपाल वर्मा यांनी त्या दिवशी काय घडले ते सांगितले

दिग्दर्शकाने पुढे सांगितले की, या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध सुमारे ६-७ गुन्हे दाखल आहेत. ‘आम्ही सर्व ६-७ प्रकरणे एकाच ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करत होतो, पण तोपर्यंत पोलीस माझ्या ऑफिसमध्ये पोहोचले.’ दरम्यान, न्यायालयाने तो कायदा रद्द केला होता. आता पोलिसांना काय करावे हे समजत नव्हते, म्हणून ते सर्व माझ्यासोबत बसले, दारू प्यायले आणि मग निघून गेले.

आवाज चांगला ठेवायला स्पर्मचे कॉकटेल पिते ही गायिका! रेसिपी ऐकून अंगावर येईल काटा
‘ मी कधीकधी लोकांना चिडवण्यासाठी ट्विट करतो’

हैदराबादचे रहिवासी असलेले राम गोपाल वर्मा यांनी एका मुलाखतीत कबूल केले की ते त्यांच्या बहुतेक ट्विटकडे फारसे लक्ष देत नाहीत. ‘मी जे काही ट्विट करतो ते बहुतेक अज्ञानामुळे असते. पण कधीकधी मी हे एखाद्याला चिडवण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी देखील करतो.’

अटक करायला आलेले पोलीस, दारु पिऊन पार्टी करुन गेले! बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा गौप्यस्फोट

राम गोपाल वर्मा म्हणाले – मी कमेंट वाचत नाही

राम गोपाल वर्मा यांनी यापूर्वी सोशल मीडियावर ट्रोलिंगबद्दल म्हटले होते की ते या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. ‘मी एकदा काहीतरी पोस्ट केले की, लोक त्याबद्दल काय म्हणत आहेत हे पाहण्यासाठी मी क्वचितच ते तपासतो. मी कधीच कमेंट वाचल्या नाहीत. मला जे काही म्हणायचे आहे ते मी सांगितले आहे.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे.तसेच माझी सहेली मॅगझिन मध्ये १ वर्षाचा अनुभव
आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. मनोरंजनसोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.
आणखी वाचा

Source link

The post अटक करायला आलेले पोलीस, दारु पिऊन पार्टी करुन गेले! बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा गौप्यस्फोट first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=115536 0
'सिकंदर'ची पहिल्याच दिवशी जबरदस्त ओपनिंग, पण 'छावा'च्या तुलनेत पडला मागे! एकूण किती कमावले माहितीये? https://tejpolicetimes.com/?p=115532 https://tejpolicetimes.com/?p=115532#respond Mon, 31 Mar 2025 01:54:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=115532 'सिकंदर'ची पहिल्याच दिवशी जबरदस्त ओपनिंग, पण 'छावा'च्या तुलनेत पडला मागे! एकूण किती कमावले माहितीये?

Sikandar Box Office Report : सलमानखानचा सिकंदर हा सिनेमा काल थिएटरमध्ये दाखल झाला असून या सिनेमाने चांगली ओपनिंग केली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई– सिकंदर बॉक्स ऑफिस कलेक्शनचा पहिला दिवस: ईदच्या एक दिवस आधी, रविवारी सलमान खानचा चित्रपट रुपेरी पडद्यावर दाखल झाला असून त्याने चाहत्यांना चित्रपटगृहात खेचले आहे. ज्यामुळे सिकंदर २०२५ मधील सर्वात मोठ्या ओपनिंग चित्रपटांपैकी […]

The post 'सिकंदर'ची पहिल्याच दिवशी जबरदस्त ओपनिंग, पण 'छावा'च्या तुलनेत पडला मागे! एकूण किती कमावले माहितीये? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
'सिकंदर'ची पहिल्याच दिवशी जबरदस्त ओपनिंग, पण 'छावा'च्या तुलनेत पडला मागे! एकूण किती कमावले माहितीये?

Sikandar Box Office Report : सलमानखानचा सिकंदर हा सिनेमा काल थिएटरमध्ये दाखल झाला असून या सिनेमाने चांगली ओपनिंग केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई– सिकंदर बॉक्स ऑफिस कलेक्शनचा पहिला दिवस: ईदच्या एक दिवस आधी, रविवारी सलमान खानचा चित्रपट रुपेरी पडद्यावर दाखल झाला असून त्याने चाहत्यांना चित्रपटगृहात खेचले आहे. ज्यामुळे सिकंदर २०२५ मधील सर्वात मोठ्या ओपनिंग चित्रपटांपैकी एक बनला आहे

ट्रेड इंडस्ट्री ट्रॅकर Sacnilk.com नुसार, सिकंदरने सर्व भाषांमध्ये बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी २६ कोटी रुपये कमावले आहेत.

रविवारी, 2D मध्ये ‘सिकंदर’ची हिंदी ऑक्युपन्सी २०.९५ टक्के होती आणि IMAX 2D मध्ये ती २२.९६ टक्के होती. SACNILC च्या मते, सिकंदरची चेन्नईमध्ये सर्वाधिक ४६.६७ टक्के, बंगळुरूमध्ये २८ टक्के, जयपूर आणि कोलकातामध्ये २४.६७ टक्के, हैदराबादमध्ये २२ टक्के, एनसीआरमध्ये २१ टक्के आणि मुंबईत २०.६७ टक्के प्रेक्षकांची गर्दी नोंदवण्यात आली.

अखेर सायलीने सुभेदारांसमोरच प्रियाचं विकृत कारस्थान आणलं उघडकीस, सासवांची बोलती बंद, मिळाला गरीबांचा आशीर्वाद
आयमॅक्स-२डी मध्ये सिकंदरची ऑक्युपन्सी चेन्नईमध्ये सर्वाधिक (६८%) होती, त्यानंतर बेंगळुरू (५३.३३%), अहमदाबाद (४२.५०%), लखनौ (२९.५०%), कोलकाता (२६%) आणि दिल्ली (२३%) अशी होती.

सिकंदर बॉक्स ऑफिस कलेक्शनचे अंदाज:

रविवारी हा आकडा २५-३० कोटी रुपयांपर्यंत पोहचली असे बोलले जाते, तर ईदच्या दिवशी तो ४०-५० कोटी रुपयांपर्यंत हा आकडा पोहोचू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. तरण आदर्शच्या मते, सिकंदरवर टायगर ३ च्या ४३ कोटी रुपयांच्या ओपनिंगपेक्षा चांगली कामगिरी करण्याचे दबाव असेल.

बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी स्टार्सपैकी एक असलेल्या सलमान खानने अद्याप ५०० कोटी रुपयांची कमाई करणारा एकही चित्रपट केलेला नाही. त्यामुळे या सिनेमाकडून त्याला भरपूर आशा आहेत.

भूतनी स्पेशल ते टप्पूचा बालविवाह या एपिसोड्सनी तारक मेहतामध्ये उडवलेली धमाल, तुमचा आवडता भाग कोणता?
सिकंदर ऑनलाइन लीक झाला:

अहवालांनुसार, टेलिग्राम ग्रुपसह अनेक बेकायदेशीर प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट ऑनलाइन लीक झाल्याचा आरोप आहे, ज्यामध्ये बेकायदेशीर डाउनलोड आणि स्ट्रीमिंग लिंक्स देण्यात आल्या आहेत. या लीकमुळे चित्रपटाच्या एकूण कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सिकंदर बद्दल:

ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित, हा चित्रपट सर्व प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. २ तास २० मिनिटे या सिनेमा प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई आणि हैदराबादसह अनेक ठिकाणी झाले आहे. २०१४ च्या ब्लॉकबस्टर ‘किक’ नंतर सलमानने पुन्हा त्याच निर्मात्यांसह काम केले.

‘सिकंदर’ची पहिल्याच दिवशी जबरदस्त ओपनिंग, पण ‘छावा’च्या तुलनेत पडला मागे! एकूण किती कमावले माहितीये?

साजिद नाडियाडवाला यांनी त्यांच्या नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली याची निर्मिती केली आहे. या चित्रपटात मुख्य कलाकारांसह रश्मिका मंदान्ना, काजल अग्रवाल, सत्यराज, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर, अंजिनी धवन आणि जतिन सरना हे प्रमुख भूमिकेत आहेत.

सिकंदर रिव्ह्यू

सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाच्या लाईव्हमिंट रिव्ह्यूमध्ये असे म्हटले आहे की, सलमान खानमध्ये आता त्याचे चित्रपट मोठे हिट करण्याची क्षमता राहिलेली नाही. त्यामुळे येत्या काळात हा अंदाज खरा ठरेल की खोटा हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे.तसेच माझी सहेली मॅगझिन मध्ये १ वर्षाचा अनुभव
आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. मनोरंजनसोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.
आणखी वाचा

Source link

The post 'सिकंदर'ची पहिल्याच दिवशी जबरदस्त ओपनिंग, पण 'छावा'च्या तुलनेत पडला मागे! एकूण किती कमावले माहितीये? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=115532 0
गोंदियात शिवशाही बसचा भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती https://tejpolicetimes.com/?p=110579 https://tejpolicetimes.com/?p=110579#respond Fri, 29 Nov 2024 08:56:12 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110579 गोंदियात शिवशाही बसचा भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

शिवशाही बस उलटून ८ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे. सडक अर्जुनीमधील खजरी गावाजवळ एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला अपघात झाला. महाराष्ट्र टाइम्स.कॉम गोंदिया: शिवशाही बस उलटून ८ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे. सडक अर्जुनीमधील खजरी गावाजवळ एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला अपघात झाला. बसमधील ७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. […]

The post गोंदियात शिवशाही बसचा भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
गोंदियात शिवशाही बसचा भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

शिवशाही बस उलटून ८ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे. सडक अर्जुनीमधील खजरी गावाजवळ एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला अपघात झाला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

गोंदिया: शिवशाही बस उलटून ८ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे. सडक अर्जुनीमधील खजरी गावाजवळ एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला अपघात झाला. बसमधील ७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना साकोली उपजिल्हा रुग्णालयात आणि गोंदियाच्या सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आलेलं आहे. दुपारी एकच्या सुमारास शिवशाहीला अपघात झाला आहे. अनेक जण गंभीर जखमी असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

गोंदियातील सडक अर्जुनीत शिवशाही बसला भीषण अपघात झाला. पूर्ण क्षमतेनं भरलेली बस प्रवास सुरु असताना उलटली. अपघातानंतर ती ५० फुटांपर्यंत घासत गेली. या अपघातात १५ ते १७ प्रवासी जखमी झाले आहेत. गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी परिवहन प्रशासनाला दिले आहेत.
Uddhav Thackeray: अस्तित्त्व संकटात, ठाकरे मविआतून बाहेर पडणार? शेवटचा बालेकिल्ला राखण्यासाठी समोर ३ पर्याय
एकनाथ शिंदे यांच्याकडेच परिवहन मंत्रालयाची जबाबदारी आहे. अपघाताची माहिती मिळताच त्यांनी परिवहन विभागाला मृतांच्या कुटुंबियांना तातडीनं आर्थिक मदत देण्याचे आदेश दिले. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या वैद्यकीय उपचारांचा खर्चदेखील शासन करणार आहे. मृतांचा आकडा वाढू नये यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना शिंदे यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत.

शिवशाही बसला झालेल्या अपघातानंतर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं आहे. ‘गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जुनीनजीक शिवशाही बसचा दुर्दैवी अपघात होऊन काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत,’ असं फडणवीसांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

‘या घटनेत जे लोक जखमी झाले, त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्या, असे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास त्यांना नागपूरला हलविण्याची व्यवस्था करा, असेही मी गोंदियाच्या जिल्हाधिकार्‍यांना सांगितले आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, ते मदतकार्यासाठी समन्वय करीत आहेत. या घटनेतील जखमींना लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो,’ असं ट्विट फडणवीसांनी केलं आहे.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post गोंदियात शिवशाही बसचा भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110579 0
निवडणुकीपूर्वी मुंबईत खळबळ, कॅश व्हॅनमध्ये ‘साडेसहा’ टन चांदीच्या विटा, किंमत तब्बल… https://tejpolicetimes.com/?p=108073 https://tejpolicetimes.com/?p=108073#respond Sun, 10 Nov 2024 12:00:40 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108073 निवडणुकीपूर्वी मुंबईत खळबळ, कॅश व्हॅनमध्ये ‘साडेसहा’ टन चांदीच्या विटा, किंमत तब्बल…

Mumbai Vikroli Silver Bricks: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भरारी पथके व पोलिसांकडून नाकाबंदीत वाहनांची तपासणी केली जात आहेत. विशेष म्हणजे आचारसंहिता लागल्यापासून २८० कोटींची रोकड आणि मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत. हायलाइट्स: निवडणुकीपूर्वी मुंबईत खळबळ कॅश व्हॅनमध्ये ६५०० किलो चांदीच्या विटा वीटांची किंमत तब्बल करोडोंच्या घरात महाराष्ट्र टाइम्स.कॉममुंबई विक्रोळी साडेसहा टन चांदीच्या वीटा मुंबई : विधानसभा […]

The post निवडणुकीपूर्वी मुंबईत खळबळ, कॅश व्हॅनमध्ये ‘साडेसहा’ टन चांदीच्या विटा, किंमत तब्बल… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
निवडणुकीपूर्वी मुंबईत खळबळ, कॅश व्हॅनमध्ये ‘साडेसहा’ टन चांदीच्या विटा, किंमत तब्बल…

Mumbai Vikroli Silver Bricks: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भरारी पथके व पोलिसांकडून नाकाबंदीत वाहनांची तपासणी केली जात आहेत. विशेष म्हणजे आचारसंहिता लागल्यापासून २८० कोटींची रोकड आणि मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत.

हायलाइट्स:

  • निवडणुकीपूर्वी मुंबईत खळबळ
  • कॅश व्हॅनमध्ये ६५०० किलो चांदीच्या विटा
  • वीटांची किंमत तब्बल करोडोंच्या घरात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुंबई विक्रोळी साडेसहा टन चांदीच्या वीटा

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भरारी पथके व पोलिसांकडून नाकाबंदीत वाहनांची तपासणी केली जात आहेत. विशेष म्हणजे आचारसंहिता लागल्यापासून ८ नोव्हेंबरपर्यंत तब्बल २८० कोटींची रोकड आणि मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात, मतदारसंघात पोलिसांकडून वाहनांची तपासणी करुन मौल्यवान वस्तू व रोकड जप्त करण्यात आली आहे.पुणे शहरात काही दिवसांपूर्वी एक व्हॅन पोलिसांनी पकडले होते, त्यामध्ये दागिने व मौल्यवान वस्तू होत्या. त्यानंतर, आता मुंबईत चांदीच्या वीटांनी भरलेली व्हॅन पोलिसांनी पकडली आहे. विक्रोळी पोलिस व निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पकडलेल्या कॅश व्हॅनमध्ये चांदीच्या विटा सापडल्या आहेत. विशेष म्हणजे या वीटा एकूण साडेसहा टन इतक्या आहेत.
शरद पवारांनी पुन्हा काढला लोकसभेतील तो निर्णायक मुद्दा, अहिल्यानगरमधून भाजपवर निशाणा

व्हॅनमधील या चांदींच्या विटांची किंमत करोडोंच्या घरात आहे, या वीटा ब्रिंक्स या कंपनीच्या गाडीतून मुलुंडमधील एका गोदाममध्ये ठेवण्यासाठी नेण्यात येत असल्याची माहिती आहे. पोलिसांना आढळलेल्या या वीटा अधिकृत असल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. मात्र, निवडणूक आयोग, इन्कम टॅक्स आणि पोलिसांकडून याचा अधिक तपास केला जात आहे. दरम्यान, पोलिसांकडून सर्वच मतदारसंघात वाहनांवर व अवैध वाहतुकीवर करडी नजर असून अनाधिकृतपणे पैशांची वाहतूक करण्यात येत असल्यास कारवाई केली जात आहे.

पालघरमध्ये तीन कोटींची रोकड जप्त

दरम्यान, काल देखील पालघरमध्ये पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. पालघरमधील एका वाहनातून तीन कोटींहून अधिक रोकड जप्त करून आरोपीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघरच्या वाडा पाली मार्गावरून विक्रमगडच्या दिशेने जाणाऱ्या एका कारवर पोलिसांना संशय आला. यानंतर कार थांबवून चालकाची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान संशय वाढल्याने कार वाडा पोलिस ठाण्यात आणून तपास करण्यात आला. तपासादरम्यान कारमधून सुमारे 3 कोटी 70 लाख रुपये जप्त करण्यात आले. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Batoge To Katoge: लग्नपत्रिकेत छापली ‘बटोगे तो कटोगे’ घोषणा; मोदी, योगींसह राम मंदिराचा फोटो; जिल्ह्यात चर्चा

मुंबईत 2 कोटी 30 लाख रुपये सापडले

मुंबईतही 2 कोटींहून अधिक रोख रकमेसह 12 जणांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक अवैधरित्या मोठ्या प्रमाणात रोकड घेऊन जात असल्याची गुप्त माहिती एलटी मार्ग पोलिस स्टेशनला मिळाली. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शहरातील भुलेश्वर मार्केट, काळबादेवी येथून 12 जणांना संशयावरून ताब्यात घेतले.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

The post निवडणुकीपूर्वी मुंबईत खळबळ, कॅश व्हॅनमध्ये ‘साडेसहा’ टन चांदीच्या विटा, किंमत तब्बल… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108073 0
रोजगारात नाशिक अव्वल! तिरुवनंतपुरम, कोइम्बतूरला मागे टाकल्याचे सर्वेक्षणात उघड, काय सांगते आकडेवारी? https://tejpolicetimes.com/?p=108118 https://tejpolicetimes.com/?p=108118#respond Sun, 10 Nov 2024 09:14:53 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108118 रोजगारात नाशिक अव्वल! तिरुवनंतपुरम, कोइम्बतूरला मागे टाकल्याचे सर्वेक्षणात उघड, काय सांगते आकडेवारी?

Nashik News: सन २०२३ मध्ये नाशिकमधील रोजगारात तब्बल १८६ टक्क्यांनी वाढ झाल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, नाशिकने तिरुवअनंतपुरम, कोइम्बतूर या शहरांना मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे. महाराष्ट्र टाइम्सemployement nashik AI सुदीप गुजराथी, नाशिक : गेल्या काही वर्षांत झपाट्याने विकसित होत असलेले नाशिक रोजगार वाढीत देशातील द्वितीय श्रेणीतील शहरांमध्ये अव्वल ठरले आहे. सन […]

The post रोजगारात नाशिक अव्वल! तिरुवनंतपुरम, कोइम्बतूरला मागे टाकल्याचे सर्वेक्षणात उघड, काय सांगते आकडेवारी? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
रोजगारात नाशिक अव्वल! तिरुवनंतपुरम, कोइम्बतूरला मागे टाकल्याचे सर्वेक्षणात उघड, काय सांगते आकडेवारी?

Nashik News: सन २०२३ मध्ये नाशिकमधील रोजगारात तब्बल १८६ टक्क्यांनी वाढ झाल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, नाशिकने तिरुवअनंतपुरम, कोइम्बतूर या शहरांना मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे.

महाराष्ट्र टाइम्स
employement nashik AI

सुदीप गुजराथी, नाशिक : गेल्या काही वर्षांत झपाट्याने विकसित होत असलेले नाशिक रोजगार वाढीत देशातील द्वितीय श्रेणीतील शहरांमध्ये अव्वल ठरले आहे. सन २०२३ मध्ये नाशिकमधील रोजगारात तब्बल १८६ टक्क्यांनी वाढ झाल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, नाशिकने तिरुवअनंतपुरम, कोइम्बतूर या शहरांना मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे.

रोजगारासंदर्भातील जागतिक स्तरावरील महत्त्वाची संस्था असलेल्या ‘फाउण्डइट’ने सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात देशातील द्वितीय श्रेणीतील (टिअर टू) शहरांतील रोजगारवाढीचा आढावा घेण्यात आला असून, काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत. हा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून, त्यातून रोजगारवाढीत नाशिकची भरारी समोर आली आहे. या अहवालानुसार, नाशिक, नागपूर व कोइम्बतूर या शहरांत माहिती तंत्रज्ञान (आयटी), सॉफ्टवेअर सेवा, बँकिंग, आर्थिक सेवा, विमा या क्षेत्रांतील रोजगार झपाट्याने वाढत आहे. देशातील महानगरांप्रमाणे ‘टिअर टू’ शहरांचाही प्रचंड वेगाने विकास होत असून, विशेषत: नाशिक, तिरुवनंतपुरम, कोइम्बतूर, ठाणे, कोची व नागपूर या सहा शहरांनी रोजगारवाढीत मोठी झेप घेतली आहे. नाशिक शहरात २०२३ मध्ये रोजगारात तब्बल १८६ टक्के वाढ झाली असून, २०२४ मध्ये बारा टक्के वाढ अंदाजित आहे. नाशिकमध्ये रोजगारात सन २०२१ मध्ये ७६ टक्के, तर २०२२ मध्ये ९१ टक्के वाढ झाली होती. मात्र, २०२३ मध्ये हा आकडा थेट १८६ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. नाशिक शहरात बांधकाम, अभियांत्रिकी, सीमेंट, धातू, सॉफ्टवेअर आदी क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात रोजगार वाढत असल्याचे निरीक्षण ‘फाउण्डइट’च्या अहवालात नोंदवण्यात आले आहे.
शरद पवारांचं मिशन नाशिक; १२ नोव्हेंबरला जिल्ह्यात सहा जाहीर सभा, असा असेल दौरा…
रोजगारातील वाढ (टक्क्यांमध्ये)
शहर- २०२१-२०२२-२०२३-२०२४ (अंदाजित)

नाशिक- ७६-९१-१८६-१२
तिरुवनंतपुरम- ७७-११-४-२४
कोइम्बतूर- ५५-१९-८-२१
ठाणे-६७-३१-७-२५
कोची-६३-११-९-२१
नागपूर-२४-२७-७-१७
Pune Crime: २४ वर्षीय महिलेचा बेडमध्ये सापडला मृतदेह, पुण्यातील घटनेनं खळबळ
नाशिकमधील उद्योग क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. ‘फाउण्डइट’च्या अहवालातून त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. नाशिकमधील रोजगारवाढीचा दर असाच कायम राहण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.- मनीष रावल, उद्योजक

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post रोजगारात नाशिक अव्वल! तिरुवनंतपुरम, कोइम्बतूरला मागे टाकल्याचे सर्वेक्षणात उघड, काय सांगते आकडेवारी? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108118 0