Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
ram temple inauguration - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Mon, 22 Jan 2024 04:58:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg ram temple inauguration - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 ‘कोट्यवधीं’ची प्राणप्रतिष्ठा; वस्त्रोद्योगाच्या हाती भरमसाठ काम, एकट्या मुंबईत ५ हजार कोटींची उलाढाल https://tejpolicetimes.com/?p=79676 https://tejpolicetimes.com/?p=79676#respond Mon, 22 Jan 2024 04:58:32 +0000 https://tejpolicetimes.com/?p=79676 ‘कोट्यवधीं’ची प्राणप्रतिष्ठा; वस्त्रोद्योगाच्या हाती भरमसाठ काम, एकट्या मुंबईत ५ हजार कोटींची उलाढाल

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: अयोध्येतील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी एकट्या मुंबईत पाच हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा आकडा समोर आला आहे. प्रामुख्याने भगवे झेंडे, पताकांसह पारंपरिक वेष, कुर्ते या माध्यमातून ही उलाढाल झाली. यामुळे मुंबईतील वस्त्रोद्योगाच्या हाती भरमसाठ काम आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.अयोध्येत सोमवार, २२ जानेवारीला श्रीराम मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होणार आहे. यासाठी संपूर्ण देशात उत्साह […]

The post ‘कोट्यवधीं’ची प्राणप्रतिष्ठा; वस्त्रोद्योगाच्या हाती भरमसाठ काम, एकट्या मुंबईत ५ हजार कोटींची उलाढाल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘कोट्यवधीं’ची प्राणप्रतिष्ठा; वस्त्रोद्योगाच्या हाती भरमसाठ काम, एकट्या मुंबईत ५ हजार कोटींची उलाढाल

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: अयोध्येतील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी एकट्या मुंबईत पाच हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा आकडा समोर आला आहे. प्रामुख्याने भगवे झेंडे, पताकांसह पारंपरिक वेष, कुर्ते या माध्यमातून ही उलाढाल झाली. यामुळे मुंबईतील वस्त्रोद्योगाच्या हाती भरमसाठ काम आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

अयोध्येत सोमवार, २२ जानेवारीला श्रीराम मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होणार आहे. यासाठी संपूर्ण देशात उत्साह असताना मुंबईनगरीदेखील सजली आहे. त्याअंतर्गत जागोजागी मंदिरे सजविण्यात आली आहेत, तर अनेक वस्त्यांमध्ये झेंडे, पताका, तोरण लावण्यात आली आहेत. यानिमित्ताने वेगवेगळ्या भागांत रथयात्रा, यज्ञ, होमहवन होत आहेत. यांत सहभागी होणाऱ्या भक्तांकडून पारंपरिक वेषभूषा खरेदी करण्यात आली. या सर्व माध्यमातून मोठी उलाढाल झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

‘सर्वाधिक मागणी कापडाचे तोरण, श्रीरामाचे चित्र असलेले भगवे तोरण व भगव्या पताकांना आहे. मागील तीन दिवसांत ती मोठ्या प्रमाणात वाढली. त्याआधी भगव्या आणि पिवळ्या रंगाचे कुर्ते, पारंपरिक कपडे खरेदी करून यासंबंधीच्या सोहळ्यांमध्ये नागरिक सहभागी होत होते. त्यामुळे त्यांचीदेखील मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. परिणामी मुंबईतील वस्त्रद्योगाकडे भरमसाठ काम आले. एकप्रकारे या वस्त्रोद्योगाला संजीवनी मिळाली’, असे याबाबत अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे (कॅट) महाराष्ट्र सरचिटणीस शंकर ठक्कर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले.

सर्वच क्षेत्रांत मोठी उलाढाल

या सोहळ्याच्या निमित्ताने सर्वच क्षेत्रांत उलाढाल झाली आहे. प्रभू श्रीरामाचे चित्र असलेल्या चांदीच्या नाण्यांना मागणी सध्या मोठी आहे. अनेकांनी २२ जानेवारीला चांदीच्या नाण्यांची खरेदी करण्यासाठी बुकिंग करून ठेवले आहे. त्या क्षेत्रातील उलाढाल १९ लाख रुपयांच्या घरात आहे. त्याखेरीज श्रीराम मंदिराच्या प्रतिकृती, शुभेच्छापत्र, मोठमोठे कटआऊट तयार करण्याच्या क्षेत्रातील उलाढाल वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

मुंबई-अयोध्या विमान, तिकीट १० हजारांपुढे

राम मंदिर उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विमानसेवा कंपन्यांनी अयोध्येसाठी उड्डाण सुरू केले आहे. मुंबईकरांनी यासाठी गर्दी केली आहे. त्यामुळे एरवी चार हजार रुपयांच्या घरात असलेले विमान तिकीट आता १० हजार रुपयांवर गेले आहे.

मुंबईहून सध्या केवळ इंडिगो एअरलाइन्सची सेवा सुरू आहे. ती १५ जानेवारीला सुरू झाली. शनिवारपर्यंतचे या सेवेचे तिकीट चार हजार रुपयांच्या घरात होते. सोमवारचे तिकीट मात्र ११ हजार ४९९ रुपयांपर्यंत पोहोचले. मंगळवारचे तिकीट आठ हजार ३५० रुपये आहे. मात्र त्यानंतर सलग हे तिकीट १० हजार रुपयांच्यापुढे आहे. २६ जानेवारीला सुट्टीच्या निमित्ताने अनेकांनी अयोध्येला जाण्याचे नियोजन केल्याने पर्यटकांची गर्दी वाढली आहे. परिणामी तिकीट दर वाढले आहेत. त्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचे तिकीट दरदेखील सहा हजार रुपयांहून अधिक आहेत.

Source link

The post ‘कोट्यवधीं’ची प्राणप्रतिष्ठा; वस्त्रोद्योगाच्या हाती भरमसाठ काम, एकट्या मुंबईत ५ हजार कोटींची उलाढाल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=79676 0
रामजन्मभूमी संघर्ष आणि कालीमाता, श्री श्री रविशंकर यांचा विशेष लेख https://tejpolicetimes.com/?p=79809 https://tejpolicetimes.com/?p=79809#respond Mon, 22 Jan 2024 03:52:52 +0000 https://tejpolicetimes.com/?p=79809 रामजन्मभूमी संघर्ष आणि कालीमाता, श्री श्री रविशंकर यांचा विशेष लेख

मुंबई: विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) तत्कालीन अध्यक्ष अशोक सिंघल सन २००२च्या उन्हाळ्यात बेंगळुरूतील आश्रमात मला भेटण्यासाठी कांचीपुरमहून आले होते. तिथे त्यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाच्या संदर्भात कांची कामकोटी पीठाचे तत्कालीन शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांची भेट घेतली होती. शंकराचार्य आणि प्रमुख मुस्लिम नेत्यांमधील चर्चा अयशस्वी झाल्यानंतर सिंघलजी मला भेटायला आले होते. रामजन्मभूमीचा प्रश्न सोडवण्यासाठी कायदा आणावा […]

The post रामजन्मभूमी संघर्ष आणि कालीमाता, श्री श्री रविशंकर यांचा विशेष लेख first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
रामजन्मभूमी संघर्ष आणि कालीमाता, श्री श्री रविशंकर यांचा विशेष लेख

मुंबई: विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) तत्कालीन अध्यक्ष अशोक सिंघल सन २००२च्या उन्हाळ्यात बेंगळुरूतील आश्रमात मला भेटण्यासाठी कांचीपुरमहून आले होते. तिथे त्यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाच्या संदर्भात कांची कामकोटी पीठाचे तत्कालीन शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांची भेट घेतली होती. शंकराचार्य आणि प्रमुख मुस्लिम नेत्यांमधील चर्चा अयशस्वी झाल्यानंतर सिंघलजी मला भेटायला आले होते. रामजन्मभूमीचा प्रश्न सोडवण्यासाठी कायदा आणावा आणि राममंदिर उभारणीचा मार्ग तातडीने मोकळा करावा, हे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीजींना मी पटवून द्यावे हे सांगण्यासाठी ते आश्रमात आले होते. ‘त्यासाठी वाजपेयीजी चालवत असलेले आघाडी सरकार कोसळले तरी चालेल. मला त्याची पर्वा नाही,’ असे ते मला म्हणाले होते. विशेष म्हणजे, राम मंदिरासाठी बेमुदत उपोषण करताना त्यांना जबरदस्तीने खाऊ घातल्याने त्या वेळी सिंघलजी वाजपेयींशी बोलत नव्हते.

त्या वेळी ७६ वर्षीय अशोकजींच्या डोळ्यांत एक उत्कट चैतन्य आणि एक चमक होती. ती चमक उत्कटता, धार्मिक संताप आणि निराशा दर्शवत होती. ‘राम मंदिर कधी बांधले जाईल का? माझ्या हयातीत मला ते पाहायला मिळेल का,’ असा प्रश्न त्यांनी मला विचारला. तेव्हा मला आतून असे वाटले, की आणखी किमान १४ वर्षे हे घडणार नाही. मी त्यांना म्हणालो, ‘तुम्ही प्रार्थना करा. तुमच्या वचनबद्धतेने सर्व शक्य आहे.’ माझ्या या बोलण्याने पूर्ण समाधान न झालेले अशोकजी आश्रमातून निघून गेले.

प्रभू श्रीरामांची कुलदेवता

दुसऱ्या दिवशी सकाळी ध्यान करताना, मला एका जीर्ण झालेल्या देवी मंदिराचे दर्शन झाले, ज्याचे पुनरुत्थान करणे आवश्यक होते. त्या वेळी मी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. काही दिवसांनी तमिळनाडूतील एक वयोवृद्ध नाडी सिद्धपुरुष आश्रमात आले आणि त्यांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. प्राचीन ताडपत्रे वाचत असताना ते हळूवारपणे म्हणाले, ‘गुरुदेव, रामजन्मभूमीचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला दोन्ही समुदायांना एकत्र आणण्याची भूमिका बजावावी लागेल असे यात लिहिले आहे. यात हेही दिसून येते, की देवकाली या प्रभू श्रीरामांच्या कुलदेवीचे मंदिर खूपच दुर्लक्षित आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याशिवाय अयोध्येतील राम मंदिराभोवतीचा हिंसाचार आणि संघर्ष संपणार नाही.’ हे करायलाच हवे, असे सांगताना त्यांच्या बोलण्यात निकड आणि दृढ विश्वासाची भावना होती.

अयोध्येत दोन काली मंदिरे

देवकाली देवीच्या अशा मंदिराच्या अस्तित्वाची माहिती त्या नाडी सिद्धपुरुषाला किंवा मलाही नव्हती. काही सूत्रांद्वारे आणि चौकशीअंती अयोध्येत दोन काली मंदिरे असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यातील एक मंदिर शहराच्या मध्यभागी होते, त्याला लहान देवकाली मंदिर असे म्हणतात आणि दुसरे मंदिर थोडेसे दूर होते. ते देवकाली मंदिर म्हणून ओळखले जात असे. या देवकाली मंदिराचे बांधकाम मोडकळीस आले होते. त्यातील मध्यवर्ती तलावात कचरा टाकून लोकांनी त्याचे डम्पिंग ग्राउंडच केले होते. मंदिराच्या नूतनीकरणाचे आणि तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सुरू करण्यासाठी मी नवी दिल्ली आणि लखनौ येथील आमच्या स्वयंसेवकांशी संपर्क साधला. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत त्यांनी हे काम यशस्वीपणे पूर्ण केले.

देवकाली मंदिरात १९ सप्टेंबर २००२ रोजी सकाळी पुन: प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आमच्या आश्रमातील पंडितांच्या गटाने माझ्या उपस्थितीत हा समारंभ पार पाडला. पवित्र अग्नीत पूर्णाहुती अर्पण करताना मला या मंदिराच्या वृद्ध पुजाऱ्याच्या डोळ्यांत आनंदाचे आणि कृतज्ञतेचे अश्रू दिसले. देवकाली देवी तिच्या संपूर्ण वैभवात चमकत होती. देवकाली मंदिरातील पूजेनंतर, शहरात जातीय हिंसाचारामुळे कोणताही रक्तपात किंवा दंगल झाली नाही. एक भविष्यवाणी पूर्ण झाली होती…अशोकजी सिंघलही त्या दिवशी उपस्थित होते. मात्र, राम मंदिराच्या मुद्द्यावर अंतिम निर्णय होण्यासाठी आणखी १४ वर्षे लागतील या पूर्वकल्पनेवर मी ठाम होतो. त्या संध्याकाळी देवकाली मंदिर परिसरात संत समागम झाला, ज्यामध्ये आम्ही हिंदू आणि सुफी संतांना निमंत्रित केले होते. एक हजारांहून अधिक लोक सत्संगात सहभागी झाले होते. रामजन्मभूमीचा वाद शांततेत सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रार्थना केली. मी मुस्लिम नेत्यांचा सन्मान करीत असताना त्यांनी मला तुलसी रामायणसोबत कुराणाची एक प्रत दिली आणि श्रीरामांवर त्यांची नितांत श्रद्धा असल्याचे सांगितले. त्यांच्या हावभावात बंधुत्वाचा निस्सीम भाव होता. याने माझा विश्वास दृढ केला, की केवळ निहित स्वार्थ असलेल्यांनाच दोन समाजांमध्ये फूट पडावी, असे वाटत असते.

शतकानुशतके चाललेल्या या संघर्षात पुरेसे रक्त सांडले होते. त्यामुळे आता काळाच्या कसोटीवर टिकणारा तोडगा हवा होता. हे लक्षात घेऊन सन २००३मध्ये मी न्यायालयाबाहेर परस्पर सामंजस्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार, मुस्लिम समाज सद्भावना म्हणून हिंदूंना रामजन्मभूमी भेट देईल आणि त्या बदल्यात हिंदू त्यांना मशिदीच्या बांधकामासाठी पाच एकर जमीन देतील. यातून दोन्ही समाजांतील येणाऱ्या पिढ्यांसाठी बंधुभावाचा स्पष्ट संदेश जाईल.

देवकालीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अशोकजींनी मला प्रयागराज (त्या वेळचे अलाहाबाद) येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरी बोलावले. सामूहिक ध्यानाचे मार्गदर्शन केल्यावर मी अशोकजींना सांगितले, की रामजन्मभूमीचा वाद सोडवण्यासाठी केवळ मानवी प्रयत्न पुरेसे नसून, ईश्वरी इच्छाही आवश्यक आहे. कोणत्याही कृतीच्या फलश्रुतीमध्ये मानवी प्रयत्नांसोबतच ईश्वरी इच्छाही महत्त्वाची भूमिका बजावते. त्यासाठी संयमाची गरज असते. मी त्यांना सुचवले, की त्यांनी या प्रकरणी घाई करू नये. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास ते अधिक निश्चिंत आणि आश्वस्त दिसले. वाजपेयी सरकारच्या विरोधातील आपली भूमिकाही त्यांनी मवाळ केली.

या घटनेनंतर काही कालावधी गेला. सन २०१७मध्ये दोन्ही समाजांच्या नेत्यांच्या आग्रहानुसार आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेमुळे मी रामजन्मभूमी प्रकरणात मध्यस्थी करण्याचे माझे प्रयत्न पुन्हा सुरू केले. सरतेशेवटी, सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. मंदिराच्या बांधकामासाठी रामजन्मभूमीची जमीन आणि मशीद बांधण्यासाठी पाच एकर जागा निश्चित केली. हा एक महत्त्वाचा प्रसंग होता, कारण ५०० वर्षे जुन्या संघर्षावर शांततापूर्ण तोडगा निघाला होता.

– गुरुदेव श्री श्री रविशंकर

Source link

The post रामजन्मभूमी संघर्ष आणि कालीमाता, श्री श्री रविशंकर यांचा विशेष लेख first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=79809 0
मुस्लीम युवती निघाली रामलल्लाच्या दर्शनाला, राम मंदिर उद्घाटन सोहळा अनुभवण्यासाठी पायी प्रवास https://tejpolicetimes.com/?p=74168 https://tejpolicetimes.com/?p=74168#respond Tue, 26 Dec 2023 06:13:39 +0000 https://tejpolicetimes.com/?p=74168 मुस्लीम युवती निघाली रामलल्लाच्या दर्शनाला, राम मंदिर उद्घाटन सोहळा अनुभवण्यासाठी पायी प्रवास

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: अयोध्येतील मंदिर वादावरून जेथे दोन समूहांमध्ये एकेकाळी टोकाचा तणाव होता त्याच मंदिराची प्राणप्रतिष्ठा येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये राहणारी मुस्लीम युवती शबनम शेख ही मुस्लीम युवती बिनीत पांडे आणि रमणराज शर्मा या आपल्या दोन मित्रांसमवेत मंदिर सोहळ्याचा क्षण अनुभवण्यासाठी अयोध्येला निघाली आहे. प्रवासाच्या पाचव्या दिवशी सोमवारी […]

The post मुस्लीम युवती निघाली रामलल्लाच्या दर्शनाला, राम मंदिर उद्घाटन सोहळा अनुभवण्यासाठी पायी प्रवास first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मुस्लीम युवती निघाली रामलल्लाच्या दर्शनाला, राम मंदिर उद्घाटन सोहळा अनुभवण्यासाठी पायी प्रवास

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: अयोध्येतील मंदिर वादावरून जेथे दोन समूहांमध्ये एकेकाळी टोकाचा तणाव होता त्याच मंदिराची प्राणप्रतिष्ठा येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये राहणारी मुस्लीम युवती शबनम शेख ही मुस्लीम युवती बिनीत पांडे आणि रमणराज शर्मा या आपल्या दोन मित्रांसमवेत मंदिर सोहळ्याचा क्षण अनुभवण्यासाठी अयोध्येला निघाली आहे. प्रवासाच्या पाचव्या दिवशी सोमवारी ती नाशिकमध्ये पोहोचली.

येत्या २२ जानेवारीला आयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यासाठी देशभरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. देशभरातील भाविक यासाठी आयोध्येकडे प्रस्थान करीत आहेत. शबनम दोन मित्रांसह मुंबई येथून पायी अयोध्येला निघाली आहे. त्यांच्या प्रवासाचा सोमवारी पाचवा दिवस होता. नाशिकमधून प्रस्थान करीत ते आता अयोध्येकडे पायी निघाले आहेत. भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून, याबाबत एका बाजूने विचार न करता दोन्हीहीबाजूंनी विचार केला जावा, अशी अपेक्षा शबनमने व्यक्त केली. लहानपणापासून रामायण कानावर पडले. त्यामुळे प्रभू श्रीरामचंद्रांबद्दल मनात आदरभाव व उत्सुकता आहे. प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आणखी जाणून घेताना रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्या वारी सुरू असल्याची प्रतिक्रिया तिने दिली. या तीनही युवकांनी आपल्यासोबत, ग्रीन इंडिया, क्लीन इंडियाचे बॅनर घेऊन स्वच्छतेचाही संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही?
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी देशविदेशातील अनेक प्रतिष्ठितांना निमंत्रित करण्यात आले आहे. पण या कार्यक्रमासाठी देशातील राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात येणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नाशिकच्या काळाराम मंदिराच्या पद्धतीनुसार अयोध्येच्या श्रीराम मंदिरातही पूजा होणार

Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

The post मुस्लीम युवती निघाली रामलल्लाच्या दर्शनाला, राम मंदिर उद्घाटन सोहळा अनुभवण्यासाठी पायी प्रवास first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=74168 0