Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 85

Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 87

Deprecated: Creation of dynamic property TwitterFeed\Builder\CTF_Feed_Builder::$ctf_sb_analytics is deprecated in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/custom-twitter-feeds/inc/Builder/CTF_Feed_Builder.php on line 23

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
shiv sena ubt - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Mon, 02 Dec 2024 11:41:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg shiv sena ubt - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 पराभव स्वीकारला, निलेश राणेंना शुभेच्छा; कार्यकर्त्यांसमोर वैभव नाईक भावुक https://tejpolicetimes.com/?p=110951 https://tejpolicetimes.com/?p=110951#respond Mon, 02 Dec 2024 11:41:56 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110951 पराभव स्वीकारला, निलेश राणेंना शुभेच्छा; कार्यकर्त्यांसमोर वैभव नाईक भावुक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Dec 2024, 5:11 pm कुडाळ मालवण मतदान संघाचे माजी आमदार वैभव नाईक कार्यकर्त्यांना संबोधित केलं.यावेळी माजी आमदार वैभव नाईक भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. मी आमदार म्हणून कधी वागलोच नाही, मी माझी आमदारकी तुमच्यासाठी वापरली असं वैभव नाईक म्हणाले.मी इतरांप्रमाणे फेर मतमोजणीची मागणी करणार नाही, माझा झालेला पराभव मला मान्य आहे असं नाईक […]

The post पराभव स्वीकारला, निलेश राणेंना शुभेच्छा; कार्यकर्त्यांसमोर वैभव नाईक भावुक first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पराभव स्वीकारला, निलेश राणेंना शुभेच्छा; कार्यकर्त्यांसमोर वैभव नाईक भावुक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Dec 2024, 5:11 pm

कुडाळ मालवण मतदान संघाचे माजी आमदार वैभव नाईक कार्यकर्त्यांना संबोधित केलं.यावेळी माजी आमदार वैभव नाईक भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. मी आमदार म्हणून कधी वागलोच नाही, मी माझी आमदारकी तुमच्यासाठी वापरली असं वैभव नाईक म्हणाले.मी इतरांप्रमाणे फेर मतमोजणीची मागणी करणार नाही, माझा झालेला पराभव मला मान्य आहे असं नाईक म्हणाले.राज्य शासनाने लाडक्या बहिणीला देऊ केलेले २१०० रुपये बंद केल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरू असं नाईक म्हणाले.जोमाने कामाला लागा असे आवाहन वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांना केले.

Source link

The post पराभव स्वीकारला, निलेश राणेंना शुभेच्छा; कार्यकर्त्यांसमोर वैभव नाईक भावुक first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110951 0
महाविकास आघाडीत फूट? स्वबळाचा सूर टिपेला, नेत्यांचा दबाव वाढला; कोणता पक्ष बाहेर पडणार? https://tejpolicetimes.com/?p=110412 https://tejpolicetimes.com/?p=110412#respond Wed, 27 Nov 2024 11:39:02 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110412 महाविकास आघाडीत फूट? स्वबळाचा सूर टिपेला, नेत्यांचा दबाव वाढला; कोणता पक्ष बाहेर पडणार?

Uddhav Thackeray: विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रिपदावरुन भांडणाऱ्या महाविकास आघाडीचं निकालात अक्षरश: पानीपत झालं. विधानसभेला मविआतील तिन्ही पक्षांना मिळून ५० देखील जागा मिळाल्या नाहीत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रिपदावरुन भांडणाऱ्या महाविकास आघाडीचं निकालात अक्षरश: पानीपत झालं. विधानसभेला मविआतील तिन्ही पक्षांना मिळून ५० देखील जागा मिळाल्या नाहीत. या पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मातोश्री […]

The post महाविकास आघाडीत फूट? स्वबळाचा सूर टिपेला, नेत्यांचा दबाव वाढला; कोणता पक्ष बाहेर पडणार? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
महाविकास आघाडीत फूट? स्वबळाचा सूर टिपेला, नेत्यांचा दबाव वाढला; कोणता पक्ष बाहेर पडणार?

Uddhav Thackeray: विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रिपदावरुन भांडणाऱ्या महाविकास आघाडीचं निकालात अक्षरश: पानीपत झालं. विधानसभेला मविआतील तिन्ही पक्षांना मिळून ५० देखील जागा मिळाल्या नाहीत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रिपदावरुन भांडणाऱ्या महाविकास आघाडीचं निकालात अक्षरश: पानीपत झालं. विधानसभेला मविआतील तिन्ही पक्षांना मिळून ५० देखील जागा मिळाल्या नाहीत. या पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मातोश्री निवासस्थानी पराभूत उमेदवारांची बैठक घेतली. त्यात बहुतांश जणांनी स्वबळाचा सूर आळवला. त्यामुळे उद्धव ठाकरे येत्या काळात महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

आगामी निवडणुका पक्षानं महाविकास आघाडीतून न लढता स्वबळावर लढवाव्यात, असा सूर शिवसेना उबाठामध्ये आहे. उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीत बहुतांश पराभूत उमेदवारांनी, नेत्यांनी एकला चलो रेचा सूर आळवला. ठाकरेंकडे अनेकांनी तशी इच्छा व्यक्त केल्याची कबुली शिवसेना उबाठाचे नेते, विधान परिषदेतील उपनेते अंबादान दानवे यांनीदेखील या सगळ्याला दुजोरा दिला.
मी काहीही ताणून धरलेलं नाही! अखेर शिंदेंनी मौन सोडले; मुख्यमंत्रिपदावरही स्पष्टच बोलले
‘पक्षात अनेकांचा स्वबळाचा सूर आहे आणि आम्ही ते अजिबात नाकारत नाही. शिवसेनेनं स्वतंत्रपणे लढलं पाहिजे, असं बऱ्याच जणांना वाटतं. शिवसेना काही सत्तेसाठी जन्माला आलेली नाही. सत्ता शिवसेनेला कधी ना कधी मिळेलच. शिवसेना एका विचारानं काम करणारी संघटना आहे. बऱ्याच जणांनी तो विचार मांडला. शिवसेनेनं सगळ्या निवडणुकांमध्ये आपलं स्वतंत्र संघटन उभं करुन निवडणूक लढली पाहिजे,’ असं दानवेंनी सांगितलं.

शिवसेना उबाठामध्ये स्वबळाचा सूर लावला जात असताना आता यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘जशी त्यांची स्वबळाची इच्छा आहे, तशी आमचीही इच्छा होती. हा इच्छेचा विषय नाही. आम्ही आघाडी म्हणून लढलो आणि निकालानंतर त्यांनी काय करायचं तो त्यांचा निर्णय आहे. त्यांनी त्यांची भूमिका मांडली. आमची भूमिका आमचे प्रदेशाध्यक्ष मांडतील, आम्हीही मांडू. पण आम्ही काही इतक्या घाईनं भूमिका मांडणार नाही. हायकमांडशी चर्चा करु. त्यानंतर भूमिका घेतली जाईल,’ असं वडेट्टीवार म्हणाले.
Eknath Shinde: भाजपनं ‘तेव्हा’च शिंदेंना पुन्हा CM करण्याचा शब्द दिलेला! सेना नेत्याचा खळबळजनक दावा
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. मविआला केवळ ४६ जागा मिळाल्या. शिवसेना उबाठानं २०, काँग्रेसनं १६, राष्ट्रवादी शपनं १० जागा जिंकल्या. महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळावं, इतक्याही जागा मिळालेल्या नाहीत. विरोधी पक्षासाठी विधानसभेत किमान २९ सदस्य असावे लागतात. त्यापासून तिन्ही पक्ष दूर आहेत.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post महाविकास आघाडीत फूट? स्वबळाचा सूर टिपेला, नेत्यांचा दबाव वाढला; कोणता पक्ष बाहेर पडणार? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110412 0
निकालाआधी धमाका, सर्वात हॉट मतदारसंघात ठाकरेंचा भाजपला धक्का; महत्त्वाचा नेता शिवबंधनात https://tejpolicetimes.com/?p=109744 https://tejpolicetimes.com/?p=109744#respond Fri, 22 Nov 2024 12:26:41 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109744 निकालाआधी धमाका, सर्वात हॉट मतदारसंघात ठाकरेंचा भाजपला धक्का; महत्त्वाचा नेता शिवबंधनात

Uddhav Thackeray: विधानसभा निवडणूक निकालाला अवघे काही तास राहिलेले असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: विधानसभा निवडणूक निकालाला अवघे काही तास राहिलेले असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिला आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या, राज्यभरात चर्चेत राहिलेल्या माहीममध्ये ठाकरेंनी […]

The post निकालाआधी धमाका, सर्वात हॉट मतदारसंघात ठाकरेंचा भाजपला धक्का; महत्त्वाचा नेता शिवबंधनात first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
निकालाआधी धमाका, सर्वात हॉट मतदारसंघात ठाकरेंचा भाजपला धक्का; महत्त्वाचा नेता शिवबंधनात

Uddhav Thackeray: विधानसभा निवडणूक निकालाला अवघे काही तास राहिलेले असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: विधानसभा निवडणूक निकालाला अवघे काही तास राहिलेले असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिला आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या, राज्यभरात चर्चेत राहिलेल्या माहीममध्ये ठाकरेंनी भाजपला झटका दिला आहे. मुंबई भाजपचे सचिव आणि माहीममधील महत्त्वाचे नेते सचिन शिंदेंनी ठाकरेसेनेचा भगवा हाती घेतला आहे.

सचिन शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी मातोश्रीवर जात ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या निकालास काही तासांचा अवधी राहिलेला असताना शिंदेंचा ठाकरेसेनेतील प्रवेश भाजपसाठी धक्का मानला जात आहे. शिंदे यांच्या हाती ठाकरेंनी शिवबंधन बांधलं. यावेळी माहीमचे ठाकरेसेनेचे उमेदवार महेश सावंत आणि सिनेट सदस्य प्रदीप सावंत उपस्थित होते. शिवसेना भवन, छत्रपती शिवाजी महाराज पार्क याच मतदारसंघात येत असल्यानं माहीमची जागा दोन्ही शिवसेनेसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे इथे दोन्ही शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
भाजप, काँग्रेसचा पराभव व्हावा ही तर त्यांच्याच मित्रपक्षांची इच्छा; मोठा गेम करण्याची तयारी
माहीममध्ये तिरंगी लढत

माहीममध्ये यंदा तिरंगी लढत होत आहे. विद्यमान आमदार आणि शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर, शिवसेना उबाठाचे महेश सावंत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित ठाकरे यांच्यात लढत होत आहे. माहीममधील राजकारण, इथल्या घडामोडी राज्यभरात चर्चेत राहिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी इथून सदा सरवणकर यांना तिकीट दिलं. राज ठाकरेंचे पुत्र रिंगणात असल्यानं, राज यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानं सरवणकरांनी उमेदवारी मागे घ्यावी, असा आग्रह भाजपच्या बड्या नेत्यांनी घेतला. त्यासाठी बैठकादेखील झाल्या.
बंडखोर, अपक्षांवर नजर; फडणवीसांचे ६ शिलेदार सक्रिय; सूरत प्लान यशस्वी केलेले तिघे मोहिमेवर
सदा सरवणकर विद्यमान आमदार असल्यानं शिंदे त्यांची उमेदवारी मागे घेण्यास फारसे उत्सुक नव्हते. त्यातच राज ठाकरेंनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात पुढचा मुख्यमंत्री भाजपचा होईल. मला माझ्या पक्षाचं चिन्ह मतदारांमुळे मिळालं आहे. ते मी कोणाकडून ढापलेलं नाही. मला ते कोर्टानं दिलेलं नाही, अशी विधानं केली. ही विधानं शिंदेंनी खटकली. त्यामुळे त्यांनी माहीमचा विषय संपवला आणि सरवणकर यांना ग्रीन सिग्नल दिला, असं सेनेतील सुत्रांनी सांगितलं.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post निकालाआधी धमाका, सर्वात हॉट मतदारसंघात ठाकरेंचा भाजपला धक्का; महत्त्वाचा नेता शिवबंधनात first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109744 0
मतदानासाठी आलेल्या चाकरमान्याचे भास्कर जाधवांनी मानले आभार https://tejpolicetimes.com/?p=109656 https://tejpolicetimes.com/?p=109656#respond Thu, 21 Nov 2024 06:57:32 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109656 मतदानासाठी आलेल्या चाकरमान्याचे भास्कर जाधवांनी मानले आभार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Nov 2024, 12:27 pm २० नोव्हेंबर रोजी राज्यभरात विधानसभा निवडणुका पार पडल्या.गुहागर विधानसभा मतदारसंघात अनेक चाकरमानी मतदान करण्यासाठी पोहोचले.शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार भास्कर जाधव यांनी मतदारांचे आभार मानले.मुंबईला निघालेल्या चाकरमान्यांना भास्कर जाधवांनी प्रत्येक गाडीमध्ये जाऊन सुखरूप प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. Source link

The post मतदानासाठी आलेल्या चाकरमान्याचे भास्कर जाधवांनी मानले आभार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मतदानासाठी आलेल्या चाकरमान्याचे भास्कर जाधवांनी मानले आभार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Nov 2024, 12:27 pm

२० नोव्हेंबर रोजी राज्यभरात विधानसभा निवडणुका पार पडल्या.गुहागर विधानसभा मतदारसंघात अनेक चाकरमानी मतदान करण्यासाठी पोहोचले.शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार भास्कर जाधव यांनी मतदारांचे आभार मानले.मुंबईला निघालेल्या चाकरमान्यांना भास्कर जाधवांनी प्रत्येक गाडीमध्ये जाऊन सुखरूप प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

Source link

The post मतदानासाठी आलेल्या चाकरमान्याचे भास्कर जाधवांनी मानले आभार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109656 0
मोकाट पैसे वाटतायत, निवडणूक आयोगाच्या डोळ्यात कचरा गेलाय का? शरद कोळींचा सवाल https://tejpolicetimes.com/?p=109341 https://tejpolicetimes.com/?p=109341#respond Tue, 19 Nov 2024 12:47:05 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109341 मोकाट पैसे वाटतायत, निवडणूक आयोगाच्या डोळ्यात कचरा गेलाय का? शरद कोळींचा सवाल

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Nov 2024, 6:17 pm भाजपचे विनोद तावडे यांचा विरार मधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे.महायुतीचा पराभव होणार आहे,म्हणून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे असं शरद कोळी म्हणाले.निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण करत शरद कोळींनी हल्लाबोल केला. […]

The post मोकाट पैसे वाटतायत, निवडणूक आयोगाच्या डोळ्यात कचरा गेलाय का? शरद कोळींचा सवाल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मोकाट पैसे वाटतायत, निवडणूक आयोगाच्या डोळ्यात कचरा गेलाय का? शरद कोळींचा सवाल

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Nov 2024, 6:17 pm

भाजपचे विनोद तावडे यांचा विरार मधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे.महायुतीचा पराभव होणार आहे,म्हणून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे असं शरद कोळी म्हणाले.निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण करत शरद कोळींनी हल्लाबोल केला.

Source link

The post मोकाट पैसे वाटतायत, निवडणूक आयोगाच्या डोळ्यात कचरा गेलाय का? शरद कोळींचा सवाल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109341 0
तू राज्याच्या डोळ्यांवरील पट्टी काढलीस! ठाकरेंकडून भरसभेत पंकजा मुंडेंचे आभार, कारण काय? https://tejpolicetimes.com/?p=109072 https://tejpolicetimes.com/?p=109072#respond Sun, 17 Nov 2024 15:57:04 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109072 तू राज्याच्या डोळ्यांवरील पट्टी काढलीस! ठाकरेंकडून भरसभेत पंकजा मुंडेंचे आभार, कारण काय?

Uddhav Thackeray: यंदाची निवडणूक राज्याच्या भविष्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे. कारण महाराष्ट्रद्रोही विरुद्ध महाराष्ट्रप्रेमी अशी ही निवडणूक आहे, अशा शब्दांत शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईतील बीकेसीत भाषण करताना महायुती सरकारला पराभूत करण्याचं आवाहन केलं. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: यंदाची निवडणूक राज्याच्या भविष्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे. कारण महाराष्ट्रद्रोही विरुद्ध महाराष्ट्रप्रेमी अशी ही निवडणूक आहे, अशा […]

The post तू राज्याच्या डोळ्यांवरील पट्टी काढलीस! ठाकरेंकडून भरसभेत पंकजा मुंडेंचे आभार, कारण काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
तू राज्याच्या डोळ्यांवरील पट्टी काढलीस! ठाकरेंकडून भरसभेत पंकजा मुंडेंचे आभार, कारण काय?

Uddhav Thackeray: यंदाची निवडणूक राज्याच्या भविष्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे. कारण महाराष्ट्रद्रोही विरुद्ध महाराष्ट्रप्रेमी अशी ही निवडणूक आहे, अशा शब्दांत शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईतील बीकेसीत भाषण करताना महायुती सरकारला पराभूत करण्याचं आवाहन केलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: यंदाची निवडणूक राज्याच्या भविष्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे. कारण महाराष्ट्रद्रोही विरुद्ध महाराष्ट्रप्रेमी अशी ही निवडणूक आहे, अशा शब्दांत शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईतील बीकेसीत भाषण करताना महायुती सरकारला पराभूत करण्याचं आवाहन केलं. भाजपकडून राज्यात नेमकं काय केलं जातंय, हे सांगताना उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्या पंकजा मुंडेंचे आभार मानले.

‘मला पंकजा मुंडेंना धन्यवाद द्यायचे आहेत. कारण आमच्या महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी तू काढलीस. पंकजा मुंडेंनी काय सांगितलंय, भाजपचं काम म्हणजे लय भारी असतं बघा. आपल्याकडे बूथ किती आहेत महाराष्ट्रभर? ९० हजार. प्रत्येक बूथवर एक दक्षता पथक आहे. ९० हजार बूथवर दक्षता पथकं म्हणजे एकापेक्षा अधिक माणसं असणार. एक माणूस जरी धरला तरी ९० हजार बूथवर ९० हजार माणसं. दोन धरली तर १ लाख ८० हजार. तीन धरली तर त्याच्या पटीत आणि सगळी माणसं गुजरातमधून भाजपनं इकडे आणली आहेत आपल्यावर नजर ठेवायला. आज नजर ठेवायला आणली आहेत. उद्या मुंबई बळकावण्याचा यांचा डाव आहे. हे काही फेक नरेटिव्ह नाही ना? हे उद्धव ठाकरे पंकजा मुंडे बोलल्यानंतर बोलतोय,’ असं ठाकरे महाविकास आघाडीच्या सभेत म्हणाले.
शहांकडून महाराष्ट्र दौरा रद्द, पण उपयोग शून्य; मित्रपक्षानं पाठिंबा काढला; सरकारला धोका?
‘राज्यातील भाजप हरलेली आहे. इथल्या भाजपमध्ये लोक राहिलेले नाहीत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्या भाजप प्रेमींवर भाजप नेतृत्त्वाचाच विश्वास आहे. त्यांचा कोणावरच विश्वास नाही. त्यामुळे परराज्यातून माणसं आणली जात आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जातेय. हा सगळा प्रकार सांगितल्याबद्दल मी पंकजा ताईंचा आभारी आहे,’ असं ठाकरेंनी म्हटलं.
Pratibha Pawar: एवढ्या प्रतिभावंत व्यक्तीला अडवण्याएवढा..; मिसेस शरद पवारांना अडवल्यानंतर BTPकडून स्पष्टीकरण
‘आतापर्यंत मी अनेक निवडणुका पाहिल्या. शिवसेनेचा स्टार प्रचारक म्हणून निवडणुकीत फिरलेलो आहे. यंदा निवडणूक काळात तीन ते चार वेळा माझ्या बॅगांची तपासणी झाली. खरं तर त्या बॅग कंपनीला मी एक पत्रच लिहिणार आहे. तुमचा ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून माझी नियुक्ती करा. माझ्या बॅगा तपासल्या, हरकत नाही. पण या सगळ्या पथकांचा खर्च कोण करतंय? ते नेमकं काय करताहेत? कारण यांच्या रात्रीच्या बैठका चालल्या आहेत. सगळ्यांकडून आढावा घेत आहेत. अशा पद्धतीनं बाहेरच्या राज्यातून माणसं आणून, इथल्या माणसांवर नजर ठेवली गेली, अशी कोणतीही निवडणूक आतापर्यंत कधीही झालेली नव्हती,’ अशा शब्दांत ठाकरे भाजपवर बरसले.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post तू राज्याच्या डोळ्यांवरील पट्टी काढलीस! ठाकरेंकडून भरसभेत पंकजा मुंडेंचे आभार, कारण काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109072 0
मंत्रिपदासाठी कैलास पटलांना देवेंद्र फडणवीसांचे फोन; ओमराजेंनी सभेत सगळं सांगून टाकलं https://tejpolicetimes.com/?p=109104 https://tejpolicetimes.com/?p=109104#respond Sun, 17 Nov 2024 09:50:06 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109104 मंत्रिपदासाठी कैलास पटलांना देवेंद्र फडणवीसांचे फोन; ओमराजेंनी सभेत सगळं सांगून टाकलं

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Nov 2024, 3:20 pm Embed Press CTRL+C to copyX <iframe src=”https://tvid.in/1xvs77m96u/lang?autoplay=false” style=”height: 100%; width: 100%; max-height: 100%; max-width: 100%; visibility: visible;” border=”0″ frameBorder=”0″ seamless=”” scrolling=”no” allowfullscreen=”true” mozallowfullscreen=”true” allowtransparency=”true”></iframe> खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कैलास पाटलांसाठी धाराशिवमध्ये सभा घेतली.खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सभेत मोठा गौप्यस्फोट केला.पक्षफुटीवेळी कैलास पाटील यांना सोबत घेण्यासाठीदेवेंद्र फडणवीस यांनी फोन […]

The post मंत्रिपदासाठी कैलास पटलांना देवेंद्र फडणवीसांचे फोन; ओमराजेंनी सभेत सगळं सांगून टाकलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मंत्रिपदासाठी कैलास पटलांना देवेंद्र फडणवीसांचे फोन; ओमराजेंनी सभेत सगळं सांगून टाकलं

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Nov 2024, 3:20 pm

Embed

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कैलास पाटलांसाठी धाराशिवमध्ये सभा घेतली.खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सभेत मोठा गौप्यस्फोट केला.पक्षफुटीवेळी कैलास पाटील यांना सोबत घेण्यासाठीदेवेंद्र फडणवीस यांनी फोन केला होता असं ओमराजे म्हणाले.कैलास पाटलांना राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती असं ओमराजे निंबाळकर म्हणाले.

Source link

The post मंत्रिपदासाठी कैलास पटलांना देवेंद्र फडणवीसांचे फोन; ओमराजेंनी सभेत सगळं सांगून टाकलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109104 0
‘ओबीसी’ पंतप्रधान सहन होईना; PM मोदींचा छत्रपती संभाजीनगरच्या सभेत काँग्रेसवर जोरदार आरोप https://tejpolicetimes.com/?p=108688 https://tejpolicetimes.com/?p=108688#respond Fri, 15 Nov 2024 00:55:22 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108688 ‘ओबीसी’ पंतप्रधान सहन होईना; PM मोदींचा छत्रपती संभाजीनगरच्या सभेत काँग्रेसवर जोरदार आरोप

Maharashtra Assembly Election 2024: छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील ग्रम फर्थ मैदानावर आयोजित प्रचार सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: ‘काँग्रेस आरक्षणविरोधी आहे. ओबीसी समाजाचा व्यक्ती पंतप्रधान झालेला काँग्रेसला सहन होत नाही,’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे केला. या शहराचे नाव छत्रपती […]

The post ‘ओबीसी’ पंतप्रधान सहन होईना; PM मोदींचा छत्रपती संभाजीनगरच्या सभेत काँग्रेसवर जोरदार आरोप first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘ओबीसी’ पंतप्रधान सहन होईना; PM मोदींचा छत्रपती संभाजीनगरच्या सभेत काँग्रेसवर जोरदार आरोप

Maharashtra Assembly Election 2024: छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील ग्रम फर्थ मैदानावर आयोजित प्रचार सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते.

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: ‘काँग्रेस आरक्षणविरोधी आहे. ओबीसी समाजाचा व्यक्ती पंतप्रधान झालेला काँग्रेसला सहन होत नाही,’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे केला. या शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असावे अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. ‘महायुती राज्यात सत्तेत येताच आम्ही औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केले आणि बाळासाहेब ठाकरे व जनतेची इच्छा पूर्ण केली,’ असे मोदी यांनी नमूद केले.

छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील ग्रम फर्थ मैदानावर आयोजित प्रचार सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विजया रहाटकर, माजी खासदार डॉ. भागवत कराड, संदीपान भुमरे, संजय केणेकर आदींसह महायुतीचे उमेदवार अतुल सावे, अब्दुल सत्तार, प्रशांत बंब, अनुराधा चव्हाण, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, रमेश बोरनारे, विलास भुमरे, संजना जाधव, अर्जुन खोतकर, बबनराव लोणीकर, संतोष दानवे, नारायण कुचे, डॉ. हिकमत उढाण आदी उपस्थित होते. ‘महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षे सत्तेत होते; पण काँग्रेसच्या दबावामुळे त्यांनी शहराचे नामांतर केले नाही,’ असा आरोप उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला.
६२ लाख शेतकऱ्यांना मिळणार ‘भावांतर’चा लाभ; भाजपचा दावा, संकल्पपत्र पोहचविण्याचे कार्यकर्त्यांना टार्गेट
शहरातील पाणीपुरवठा योजनेला ब्रेक लावण्याचे काम आघाडी सरकारने केले होते, मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी महायुतीला साथ द्या, अशी साद त्यांनी घातली. मोदी म्हणाले, ‘ही निवडणूक केवळ सत्ता स्थापनेसाठी नाही. एकीकडे छत्रपती संभाजी महाराज यांना मानणारे देशभक्त आहेत, तर दुसरीकडे औरंगजेब यांचे गुणगान गाणारे आहेत. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर व्हावे, हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. महाविकास आघाडी सरकार मध्यंतरी अडीच वर्षे सत्तेत होते; परंतु काँग्रेसच्या दबावामुळे त्यांची शहराचे नामांतर करण्याची हिंमत झाली नाही.’ देशात गेल्या दहा वर्षांपासून ओबीसी पंतप्रधान झालेला काँग्रेसला सहन होत नाही, असा आरोप करत पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘विकासावर नव्हे, तर भेद निर्माण करण्यावर काँग्रेसचा विश्वास आहे. काँग्रेसने नेहमीच आरक्षणाच्या विरोधातच भूमिका घेतली, व आजही तीच त्यांची भूमिका आहे.

त्यामुळेच काँग्रेसचा नेता विदेशात जाऊन आरक्षण रद्द करण्याची घोषणा करतात, असा आरोप त्यांनी राहूल गांधी यांचे थेट नाव न घेता केला. तसेच त्यांचा हा अजेंडा राबविण्यासाठी काँग्रेस व आघाडीवाले एससी, एसटी व अन्य लहान समुदायांत संघर्ष रुजवत ‘ओबीसी जातीजातीमध्ये विभागला जाईल तेव्हा त्यांची ताकद कमी होईल व त्याचा फायदा उपटता येईल, अशी काँग्रेसची भावना असून त्यासाठीच ते सत्तेत येण्याचा विचार करीत आहेत. सत्ता मिळताच ते एससी, एसटी ओबीसींचे आरक्षण रद्द करतील,’ भीती मोदींनी व्यक्त करून सावध राहा, जागरूक होऊन एकतेचा मंत्र जपायचा आहे. ‘एक है, तो सेफ है’ चा नारा दिला.
उद्धव ठाकरेंना धडा शिकवा! मुंबईतील प्रचारसभेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे आवाहन
राज्यात केंद्र व महायुतीने केलेल्या कामांचा संदर्भ देऊन मोदी म्हणाले, ‘भविष्यात महाराष्ट्राला विकसित भारताचे नेतृत्व करायचे आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध होत आहेत. समृद्धी महामार्ग, धुळे-सोलापूर हायवेसह रस्त्याचे जाळे विणले जात आहे. रेल्वे आधुनिक होत असून, महायुतीच्या सरकारमुळे परदेशी गुंतवणूक सर्वात जास्त महाराष्ट्रात झाली आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या नवीन संधी उपलब्ध होतील. मराठी भाषेला अभिजात भाषेला दर्जा दिला. पालखी महामार्ग, यासह अन्य विकासकामांचा त्यांनी पाढा वाचला. छत्रपती संभाजीनगर शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेला १६०० कोटींचा निधी दिला; परंतु महाविकास आघाडी सरकार सत्तेच यातच त्यांनी या योजनेला ब्रेक लावला, असा आरोप पंतप्रधानांनी केला. महायुतीचे सरकार सत्तेत या योजनेला गती देण्याचे काम हाती घेण्यात आले.
Amit Shah: मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही; अमित शहा यांची भूमिका, ‘मविआ’वर तुष्टीकरणाचा आरोप
केंद्र सरकारने पाणी पुरवठा योजनेसाठी ७०० कोटींचा निधी दिला. हा महायुती व महाविकास आघाडीत फरक आहे, असे सांगत त्यांनी राज्यात पाणीटंचाईला दूर करणारे, दुष्काळमुक्त करणारे सरकार हवे की योजना ठप्प करणारे सरकार हवे, असा सवाल केला. कापूस उत्पादकांना साह्यभूत ठरेल असे ‘टेक्स्टाइल पार्क’ महाराष्ट्रात होईल, सोयाबीनला अधिक भाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यांसह शेतकऱ्यांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा त्यांनी उल्लेख केला. काश्मीरमधील ३७० कलम हटवले तेव्हा सभागृहात काँग्रेस व मित्रपक्षांनी विरोध केला. काँग्रेस व साथीदारांनी आता काश्मिरात पुन्हा ३७० लागू करण्याचा प्रस्ताव आणला.

Source link

The post ‘ओबीसी’ पंतप्रधान सहन होईना; PM मोदींचा छत्रपती संभाजीनगरच्या सभेत काँग्रेसवर जोरदार आरोप first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108688 0
शिंदेंच्या निकटवर्तीयाचा गेम? ठाकरेंच्या तगड्या उमेदवारामुळे वाट बिकट, विशेष यंत्रणा कामाला https://tejpolicetimes.com/?p=108668 https://tejpolicetimes.com/?p=108668#respond Thu, 14 Nov 2024 11:31:57 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108668 शिंदेंच्या निकटवर्तीयाचा गेम? ठाकरेंच्या तगड्या उमेदवारामुळे वाट बिकट, विशेष यंत्रणा कामाला

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय मानले जाणारे अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांच्यासोबत विधानसभा निवडणुकीत दगाफटका होण्याची भीती आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय मानले जाणारे अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांच्यासोबत विधानसभा निवडणुकीत दगाफटका होण्याची भीती आहे. त्यामुळे किणीकर मैदानात असले, तरीही प्रतिष्ठा मात्र शिंदेंची पणाला लागली आहे. दगाफटकाचा धोका असल्यानं शिंदेंची खास […]

The post शिंदेंच्या निकटवर्तीयाचा गेम? ठाकरेंच्या तगड्या उमेदवारामुळे वाट बिकट, विशेष यंत्रणा कामाला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
शिंदेंच्या निकटवर्तीयाचा गेम? ठाकरेंच्या तगड्या उमेदवारामुळे वाट बिकट, विशेष यंत्रणा कामाला

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय मानले जाणारे अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांच्यासोबत विधानसभा निवडणुकीत दगाफटका होण्याची भीती आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय मानले जाणारे अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांच्यासोबत विधानसभा निवडणुकीत दगाफटका होण्याची भीती आहे. त्यामुळे किणीकर मैदानात असले, तरीही प्रतिष्ठा मात्र शिंदेंची पणाला लागली आहे. दगाफटकाचा धोका असल्यानं शिंदेंची खास यंत्रणा अंबरनाथमध्ये कामाला लागली आहे.

लोकसभा निवडणुकीत ठाणे, कल्याणची जागा जिंकत शिंदेंनी जिल्ह्यातलं त्यांचं वर्चस्व दाखवून दिलं. कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपचं वर्चस्व आहे. तिथे केवळ एकच आमदार शिंदेसेनेचा आहे. अंबरनाथ मतदारसंघातून सलग तीनवेळा बालाजी किणीकर यांनी बाजी मारली आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे.
काल सोमय्या भेटीला, आज थेट ईडीचं पथक चौकशीला; वोट जिहाद प्रकरणात झाडाझडती, धाड पडताच खळबळ
मागील विधानसभा निवडणुकीत बालाजी किणीकर सहज निवडून आले आहेत. त्यावेळी त्यांच्यासमोर फारसं आव्हान नव्हतं. पण यंदा वातावरण संघर्षपूर्ण आहे. किणीकर आणि शहरप्रमुख यांच्यातील वाद मतदारसंघाला परिचित आहे. किणीकरांचं नाव पक्षाच्या पहिल्या उमेदवार यादीत नव्हतं. त्यामुळे किणीकरांची धाकधूक वाढली होती. अखेर पक्षानं त्यांना तिकीट दिलं. अंबरनाथ सेनेचा बालेकिल्ला मानला जातो. १९९५ पासून इथं शिवसेनेचाच उमेदवार विजय होत आला आहे. केवळ २००४ ची निवडणूक याला अपवाद राहिली आहे.

अंबरनाथ शिवसेनेचे माजी प्रमुख अरविंद वाळेकर आणि बालाजी किणीकर यांचे संबंध ताणलेले राहिले आहेत. त्यांच्यातील कटुता मिटवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांना बैठक घ्यायला लागली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर किणीकर यांच्यासाठी लढत सोपी नाही. त्यामुळेच त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत:ची यंत्रणा कामाला लावली आहे. किणीकर यांचा पराभव झाल्यास ती शिंदेंसाठी नामुष्की ठरु शकते.
नाशकात राडा! मविआ, महायुतीचे कार्यकर्ते भिडले, वाहनं फोडली; सुप्रिया सुळे पोलीस ठाण्यात दाखल
२०१९ मध्ये जवळपास ३० हजार मतांनी निवडून आलेले किणीकर २०१४ मध्ये अतिशय कमी फरकानं विजयी झाले होते. त्यावेळी युती तुटली असल्यानं भाजपनंही अंबरनाथमध्ये उमेदवार दिला. राजेश वानखेडेंनी जवळपास ४५ हजार मतं घेतली. त्यांनी किणीकर यांना अक्षरश: घाम फोडला होता. किणीकर अवघ्या २ हजार मतांनी विजयी झाले होते. आता तेच वानखेडे ठाकरेसेनेकडून रिंगणात आहेत. त्या निवडणुकीतील त्रुटी दूर करत वानखेडेंनी किणीकर यांच्यासमोर यंदा कडवं आव्हान उभं केलं आहे.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post शिंदेंच्या निकटवर्तीयाचा गेम? ठाकरेंच्या तगड्या उमेदवारामुळे वाट बिकट, विशेष यंत्रणा कामाला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108668 0
आधी बॅगांची तपासणी, आता थेट विमान उड्डाणास परवानगी नाकारली; ठाकरेंसोबत नेमकं चाललंय काय? https://tejpolicetimes.com/?p=108330 https://tejpolicetimes.com/?p=108330#respond Tue, 12 Nov 2024 11:15:30 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108330 आधी बॅगांची तपासणी, आता थेट विमान उड्डाणास परवानगी नाकारली; ठाकरेंसोबत नेमकं चाललंय काय?

Uddhav Thackeray: शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी सलग दुसऱ्या दिवशी करण्यात आली आहे. ठाकरेंनी बॅगांची तपासणी सुरु असतानाचा व्हिडीओ पुन्हा शेअर केला आहे. यानंतर आता लातूरमधून ठाकरेंच्या हेलिकॉप्टर उड्डाणास परवानगी नाकारली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम लातूर: शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी सलग दुसऱ्या दिवशी करण्यात आली आहे. ठाकरेंनी बॅगांची तपासणी सुरु असतानाचा […]

The post आधी बॅगांची तपासणी, आता थेट विमान उड्डाणास परवानगी नाकारली; ठाकरेंसोबत नेमकं चाललंय काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आधी बॅगांची तपासणी, आता थेट विमान उड्डाणास परवानगी नाकारली; ठाकरेंसोबत नेमकं चाललंय काय?

Uddhav Thackeray: शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी सलग दुसऱ्या दिवशी करण्यात आली आहे. ठाकरेंनी बॅगांची तपासणी सुरु असतानाचा व्हिडीओ पुन्हा शेअर केला आहे. यानंतर आता लातूरमधून ठाकरेंच्या हेलिकॉप्टर उड्डाणास परवानगी नाकारली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

लातूर: शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी सलग दुसऱ्या दिवशी करण्यात आली आहे. ठाकरेंनी बॅगांची तपासणी सुरु असतानाचा व्हिडीओ पुन्हा शेअर केला आहे. यानंतर आता लातूरमधून ठाकरेंच्या हेलिकॉप्टर उड्डाणास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे पुढील सभेसाठी निघालेले ठाकरे खोळंबले आहेत.

शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज लातूर दौऱ्यावर आहेत. औसामधील हेलिपॅडवरुन ठाकरेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. काल यवतमाळच्या वणीतही ठाकरेंच्या बॅगा तपासण्यात आल्या होत्या. सलग दुसऱ्या दिवशी बॅगांची तपासणी करण्यात आल्यानंतर ठाकरेंचा संताप पाहायला मिळाला. यावेळी ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. तुमची नियुक्तीपत्रं दाखवा, अशा सूचनाच ठाकरेंनी केल्या.
Ajit Pawar: शरद पवारांनी स्वत:च EDकडे जायचं! आयडिया कोणाची? निवडणुकीच्या रणधुमाळीत दादांचा गौप्यस्फोट
हेलिपॅडवर बॅगांची तपासणी झाल्यानंतर आता ठाकरेंच्या हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली आहे. ठाकरे लातूरमध्ये आहेत. तिथून त्यांना धाराशिवमधील उमरग्याला पुढील सभेसाठी जायचं आहे. पण त्यांच्या हेलिकॉप्टरला अद्याप उड्डाणास परवानगीच देण्यात आलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात थोड्याच वेळात येणार आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हवाई वाहतुकीवर निर्बंध आणण्यात आले आहेत.
Eknath Shinde: हेच शिकवता का कार्यकर्त्यांना? ‘तो’ शब्द ऐकताच शिंदेंचा संताप; ताफा थांबवला, कारमधून उतरले
पंतप्रधान मोदींचं विमान लँड होईपर्यंत बाकीची उड्डाणं रोखण्यात आलेली आहेत. त्याचा फटका उद्धव ठाकरेंना बसला आहे. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षानं परवानगी ठाकरेंच्या हेलिकॉप्टरच्या टेक ऑफला अद्याप परवानगी दिलेली नाही. टेक ऑफ रखडल्यानं ठाकरेंचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील सभेला उशीर होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज राज्यात तीन सभा होत आहेत. विदर्भातील चिमूरमध्ये दुपारी १ वाजता मोदींची सभा झाली. त्यानंतर आता सोलापुरात मोदींची सभा सुरु झालेली आहे. संध्याकाळी साडे सहा वाजता मोदी पुण्यात असणार आहेत. लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात भाजपचं मोठं नुकसान झालं. सातारा, पुण्याची जागा वगळता अन्य जागांवर भाजपचा पराभव झाला. त्यामुळे यंदा भाजपनं पश्चिम महाराष्ट्राकडे विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. सोलापूर, पुण्यात सभा घेत मोदी पश्चिम महाराष्ट्रात महायुतीचा झंझावाती प्रचार करताना दिसत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेच्या ७० जागा आहेत.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post आधी बॅगांची तपासणी, आता थेट विमान उड्डाणास परवानगी नाकारली; ठाकरेंसोबत नेमकं चाललंय काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108330 0