काय आहे नक्की प्रकरण
वर्गात कोणीही नसताना एका व्यक्तीने गैरप्रकार केल्याची माहिती पीडित मुलीने दिली आहे. पिडीत मुलीसोबत हा प्रकार झाल्यानंतर तिने आरडाओरड केला. त्यानंतर तो व्यक्ती तेथून निघून जात होता. मुलीचा आरडाओरड ऐकून शाळेतील शिक्षिका तिथे आल्या होत्या. त्यांनी त्या व्यक्तीला विचारणा केली. परंतु त्याने मुलीला शाळेत सोडायला आल्याचे सांगत पळ काढला. पिडीत मुलीला शाळेच्या कार्यालयात आणल्यानंतर तिने प्राध्यापिकेला घडलेला प्रकार सांगितला. परंतु त्यांनी या प्रकाराबाबत घरी कोणालाही सांगू नको असे बजावले.नव्या मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्रातून कुणाला संधी? भुजबळ, भुसे, महाजन, पाटील यांच्या नावांची चर्चा
पिडीत मुलीसोबत घडलेला प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. पिडीत मुलीने पालकांना माहिती दिल्यानंतर त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र संस्थाचालकांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली नव्हती. त्यामुळे दिव्यातील मनसे पदाधिकारी शहर सचिव प्रशांत गावडे, कुशाल पाटील, परेश पाटील, सागर निकम, नम्रता खराडे आणि इतर कार्यकर्त्यानी पोलिसांना जाब विचारला मग पोलिसांनी संस्थाचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे…
पोलिसांनी प्राध्यापिकेला केली अटक
या घटनेची माहिती पिडीत मुलीने प्राध्यापकांना दिली असतानाही त्यांनी मुलीला कोणासही सांगू नको असे धमकाविल्याने पोलिसांनी प्राध्यापिकेला अटक केली आहे. तर मुख्य आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली आहे.