Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पूर्व विदर्भात शिवसेनेचा चेहरा
पूर्व विदर्भात शिवसेनेला पाहिजे तसा चेहरा मिळत नव्हता. मात्र १९९५ मध्ये रमेश कुथे यांनी तत्कालीन आमदार तसेच मातब्बर नेते हरिहर भाई पटेल यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव केला होता. तेव्हापासून रमेश कुथे हे प्रसिद्धीच्या झोतात आलेले होते. रमेश कुथे यांनी दोनदा आमदार पदी निवडून येत गोंदिया जिल्ह्यात शिवसेनेला बळकटी आणली होती.
गोंदिया विधानसभा मतदारसंघातून लढण्याचे संकेत
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात भाजपला सपाटून पराभव पत्करावा लागला होता. त्या पार्श्वभूमीवर रमेश कुथे मातोश्रीवर शिवबंधन बांधून घेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपली उमेदवारी पक्की करतील असं म्हटलं जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत गोंदिया विधानसभा मतदारसंघातून रमेश कुथे हे निवडणुकीला सामोरे जातील, असं पण म्हटलं जात आहे.
विदर्भात भाजपला दुसरा धक्का
गेल्या काही काळात भाजपला विशेषतः विदर्भात बसलेला हा दुसरा धक्का मानला जात आहे. कारण नुकतंच भाजपमध्ये कार्यरत असलेले माजी खासदार शिशुपाल पटले यांनी पक्षाला रामराम केला आहे. त्यांनी आपला राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवला होता. राज्य सरकार शेतकरी, बेरोजगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचं सांगत आपण अनेकदा या समस्यांबाबत संबंधित मंत्र्यांना भेटूनही कामे होत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता.
शिशुपाल पटले यांनी भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यांनी २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांचाही पराभव केला होता. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पटले आणि आता कुथे यांनी दिलेला राजीनामा विदर्भात भाजपसाठी एकामागून एक मोठे धक्के मानले जात आहेत.