Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बाळासाहेब ठाकरे यांचे २७ हजार हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट उद्धव ठाकरेंना गिफ्ट

7

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे २७ हजार हिऱ्यांनी साकारलेले एक अनोखे पोर्ट्रेट आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री निवासस्थानी महाराष्ट्रातील तमाम निष्ठावान शिवसैनिकांकडून सप्रेम भेट म्हणून देण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख अॅड. हर्षल प्रधान यांच्या संकल्पनेतून साकारलेले आणि ख्यातनाम आर्टीष्ट शैलेश आचरेकर यांची कलापूर्तीने सजलेले हे हिऱ्यांनी नटलेले बाळासाहेब ठाकरे यांचे पोर्ट्रेट अतिशय आकर्षक झाले आहे.शैलेश आचरेकर यांनी यापूर्वी आपल्या कलेमुळे अनेक पुरस्कार मिळवले आहेत. ख्यातनाम कलावंत म्हणून ते सर्वश्रुत आहेत. शैलेशने हिऱ्यांनी साकारलेले बाळासाहेब खरोखर मनमोहक आहेत आणि बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात नक्कीच ते एक प्रमुख आकर्षण ठरेल, अशी प्रतिक्रिया पोर्ट्रेट स्नेहपूर्वक स्वीकारताना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
Uddhav Thackeray : भाजपला हादरा, गडकरींच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणारा बडा नेता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत

पोर्ट्रेट बनवायला सहा महिन्यांचा कालावधी

२७ हजार डायमंडनी साकारलेले हे पोर्ट्रेट बनवायला सहा महिन्यांचा कालावधी लागला. शैलेश आचरेकर यांनी अतिशय बारकाईने यावर काम केले आहे. यापूर्वी त्यांनी असेच रतन टाटा यांचे पोर्ट्रेट तयार केले होते.

पोर्ट्रेट बघताक्षणी उद्धव म्हणाले, ‘अरे वा सुंदर….’

उद्धव ठाकरे यांना पोर्ट्रेट देताना त्यांनी पाहता क्षणीच पहिली प्रतिक्रिया ‘अरे वा सुंदर….’ अशी प्रतिक्रिया दिली. याप्रसंगी शिवसेना नेते सर्वश्री संजय राऊत, विनायक राऊत, शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर, हिंगोली-नांदेड संपर्कप्रमुख बबन थोरात, बाळासाहेब आणि आता उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक रवी म्हात्रे, आर्टिस्ट शैलेश आचरेकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख अॅड. हर्षल प्रधान आदी उपस्थित होते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.