Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
इथे घातला धुमाकूळ..
नागभीड तालुक्यात येणाऱ्या तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रात या वाघाने धुमाकूळ घातला होता. मृत दोडकू शेंदरे आणि मृत जनाबाई जनार्दन बागडे या दोघांचा या वाघाने बळी घेतला होता. दोन दिवसात दोघांच्या बळी गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या वाघाला जेरबंद करण्याची मागणी पुढे आली.
वीस महिन्याचा बछडा..
टी ११५ या वाघिणीचा हा वीस महिन्याचा नर बछडा आहे. तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १३२ मध्ये याचा वावर होता. याला पकडण्यासाठी ३० वन कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले होते. वनपरिक्षेत्रात पिंजरे लावण्यात आलेत. आठ ट्रॅप कॅमेऱ्यातून बछड्याच्या हालचालीवर वन विभाग लक्ष ठेवून होते. मात्र हा बछडा पिंजऱ्यात अडकला नाही वनविभागाला हुलकावणी देवून त्याचा मुक्तसंचार सुरुच होता.
अखेर बेशुद्ध केले…
या बछडाला पिंजऱ्यात अडकविण्याचा प्रयत्न कालपासून वन विभागाकडून करण्यात येत होता, मात्र प्रत्येक वेळी वाघाने हुलकावणी दिली. अखेर या वाघाला जेरबंद करण्यासाठी शूटर मागवण्यात आले. इतकेच नव्हे तर शूटरला सुद्धा वाघाला पकडणे आवाहानत्मक होते, पण बेशुद्धीकरणाचे इंजेक्शन देताना शूटरने अचूक निशाणा साधला. वाघाची जंगलातील हालाचाल ओळखून शूटरने वेळीच नेम एकदम करेक्ट धरला. शूटरच्या बंदूकीतून बेशुध्दीचे इंजेक्शन वाघाला अगदी बरोबर लागले, आणि वाघ जमिनीवर कोसळला. वनविभागाने मग वाघाची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला प्राणी बचाव केंद्रात सोडून दिले.