Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Jayant Patil : ‘त्या’ कामातून भाजपाला मिळाले 8 हजार कोटी रुपये! जयंत पाटलांच्या आरोपानंतर उडाली एकच खळबळ

8

परभणी, डॉ.धनाजी चव्हाण : लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीकडून विशेषतः भाजपकडून राज्यामध्ये सहा रस्ते कॉरिडॉर चे टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली. या कॉरिडॉरची निविदा चार कंपन्यांना देण्यात आली विशेष म्हणजे ज्या कंपन्यांना ही कामे मिळाली याच कंपन्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी इलेक्ट्रॉल बॉण्डच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला आठ हजार कोटी रुपयांची देणगी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आम्हाला शंका आहे की याच आठ हजार कोटी रुपये च्या माध्यमातून भाजपने लोकसभा निवडणुकीत पैशाचा धुमाकूळ घातला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर भाजपकडे जो पैसा आला आहे तो हाच पैसा असल्याची शंका जयंत पाटील यांनी वर्तवली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे परभणी जिल्हा दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांच्या उपस्थितीत परभणीच्या राष्ट्रवादी भवन येथे निष्ठावंतांचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला या निष्ठावतांच्या कार्यकर्ता मेळाव्याला जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजय गव्हाणे माजी आमदार विजय भांबळे माजी आमदार सिताराम घनदाट युवकचे जिल्हाध्यक्ष रितेश काळे अतिश गरड यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जयंत पाटीलांनी खळबळजनक खुलासा केला.
Jayant Patil: रिंग रोडच्या कामात ‘रिंग’; ठेकेदार अन् सरकारची मिलीभगत असल्याचा जयंत पाटलांचा आरोप

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारने सहा एक्सप्रेस कॉरिडॉर जाहीर केले या कॉरिडोर साठी तब्बल ९० हजार कोटी रुपयांची कामे काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या सहा कॉरिडोर पैकी मराठवाड्यात ला जालना ते नांदेड हा कॉरिडॉर आहे. १८४ किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे याचा टेंडर होतं ११४४१ कोटी रुपये पण हे टेंडर गेलं तब्बल ४००० कोटी रुपये वाढवून १५,४६४ कोटी रुपयांना. हे काम ज्या कंपनीला गेलो त्या कंपनीचं नाव रोडवेज असून ती मुळात ब्लॅकलिस्टमध्ये आहे. टेंडर प्रमाणे नुसार या रस्त्याच्या एक किलोमीटर कामासाठी तब्बल ८३ कोटी रुपये खर्च येणार आहे. भारताने चंद्रयान योजना राबवली चंद्रावर जाण्यासाठी केवळ ५०० कोटी रुपये लागले पण एक किलोमीटरचा रस्ता बनण्यासाठी ८३ कोटी रुपये सरकार करत खर्च करत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

हा पैसा कोणाचा आहे? तर हा पैसा सर्वसामान्यांच्या खिशातला आहे. कारण राज्य सरकारने या रस्त्याच्या कॉरिडोरची जी कामे काढली आहेत ती टोल प्रणाली द्वारे हा पैसा वसूल केला जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता टोलच्या रूपाने शासनाला पैसा जमा करून देते आणि याच टोलवर हे सरकार धाड घालण्याचे काम करत आहे. आपलाच पैसा घेऊन निवडणुकीच्या काळामध्ये तोच पैसा आपल्याला परत देऊन मतदान मागण्याचे घाणेरडे काम हे भाजप सरकार करत आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अशा जनतेच्या पैशावर धाड घालणाऱ्या पक्षाला धडा शिकवण्याची गरज असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.
Jayant Patil : ज्यांच्याकडे पाहून भ्रष्ट्राचाराची टीका केली ते तुमच्यासोबत, जयंत पाटलांचे अमित शाहांना प्रत्युत्तर

राज्य सरकारने ही जी कामे काढली आहेत या कामाची डायरेक्ट टेंडर प्रक्रिया पूर्ण केली आहे. पण या कामांना टेक्निकल मंजुरी नाही एडमिनिस्टर अप्रुव्हल नाही भूसंपादनाची प्रक्रिया देखील पूर्ण झाली नाही. ही कामे ज्यांना देण्यात आली त्या केवळ चार कंपन्या आहेत ज्यामध्ये मेघा इंजीनियरिंग रोडवेज नवयुगा जीआर इन्फ्रा अशी नावे आहेत. भारतीय जनता पक्षाला या चारही कंपन्यांनी इलेक्ट्रॉल बोंड माध्यमातून तब्बल आठ हजार कोटी रुपयांची देणगी दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अशा भ्रष्ट भाजपला सत्तेतून खाली खेचण्याचे काम करावे असेही जयंत पाटील म्हणाले.

राज्य सरकारला आता सर्वजण लाडके वाटू लागले

सध्या महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार वेगवेगळ्या लोकप्रिय योजनांची घोषणा करत आहे नुकतीच लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्रा पत्करावा लागल्यानंतर भाजपसह महायुतीचे नेत्यांना आता सर्वजण लाडके वाटू लागले आहेत त्यामुळे जनतेला लोकप्रिय वाटणाऱ्या अशा नवीन नवीन योजना ते जाहीर करत आहेत पण या योजना दोन ते तीन महिनेच चालतील अशी परिस्थिती आहे निवडणुकीमध्ये या योजना सुरू ठेवायच्या असतील तर आम्हाला मतदान करा असे आम्ही शही हे लोक दाखवू शकतात असे जयंत पाटील म्हणाले

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.