Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बावनकुळेंच्या वक्तव्याने फसवणुकीची जाणीव, भाजप नेत्याचा संताप, मातोश्रीवर शिवबंधन बांधलं

10

म. टा. विशेष प्रतिनिधी : गेली सहा वर्ष भाजपची साथसोबत केलेले गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी शुक्रवारी भाजपला रामराम करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत घरवापसी केली. उद्धव ठाकरे यांनी यावेळी कुथे यांच्या हातावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. कुथे यांच्या प्रवेशाने पूर्व विदर्भात ठाकरे गटाला मजबुती मिळाली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका राजकीय पक्षातून दुसऱ्या राजकीय पक्षात उड्या मारण्याचे अर्थात पक्ष प्रवेशाचे सोहळे पार पडू लागले आहेत. त्यानुसार शुक्रवारी विदर्भ तसेच मराठवाड्यातील कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे गटात प्रवेश केला. रमेश कुथे हे मूळ शिवसेनेत होते. ते १९९५ आणि १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. मात्र, त्यानंतर २०१८ मध्ये कुथे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
Dilip Mohite Patil : मोहिते पाटलांना शह देण्याचा चंग, ठाकरेंच्या शिलेदाराने कंबर कसली; पुरंदर, खेड, जुन्नरला मोठी ताकद
दरम्यान, ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर कुथे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर नाराजी व्यक्त केली. बावनकुळे यांच्या एका वक्तव्यामुळे आमची पक्षात फसवणूक झाल्याची जाणीव झाली. ते एका बैठकीत आम्हाला म्हणाले की, आपल्या पक्षात येण्यासाठी नेत्यांची मोठी रांग लागली आहे. जे येतात त्यांना होकार द्या आणि काहीजण जात असतील तर त्यांना जाऊ द्या. कारण आपण प्रत्येकालाच आनंदी ठेवू शकत नाही. येणाऱ्यांना येऊ द्या. आपल्या पक्षात १०० लोक येतील, त्यावेळी पाच जण पक्ष सोडून जातील. याचा अर्थ आपला पक्ष ९५ टक्के नफ्यात आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांचे ते विधान ऐकून असे वाटले की आपली फसवणूक झाली आहे. त्यामुळे मी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आज मी मातोश्रीवर आलो, उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आणि अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला आहे, असेही त्यांनी सांगितले. कुथे यांच्या प्रवेशामुळे साहजिकच ते आगामी विधानसभा निवडणूक ठाकरे गटाच्या चिन्हावर लढणार आहेत.
Babajani Durrani : शब्दात अडकलेल्या अजितदादांनी तिकीट नाकारलं, दुर्रानी नाराज, शरद पवारांकडे घरवापसीचे संकेत
दरम्यान, रमेश कुथे यांच्यासह इतर स्थानिक भाजप नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसेनेचे जालना जिल्ह्यातील बदनापूरचे माजी आमदार संतोष सांबरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या डॉ. सुरेशकुमार कासर, मुस्लिम समाजाचे अभ्यासक प्रा. डॉ. शफी शेख, बदनापूरचे सरपंच राजेंद्र भैय्या जैस्वाल, विष्णू मदन, भाजप पदाधिकारी रामेश्वर फंड आदींनी शिवसेनेचा झेंडा हातात घेतला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.