Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Pune Floods: पुरामुळे पुण्याला फटका, तरुण कात्रजमधून पाण्यात वाहून गेला, आज अखेर…

10

पुणे : पुणे शहरात बुधवारी झालेला मुसळधार पाऊस आणि आलेले पाणी यामुळे त्यादिवशी सायंकाळी काञज लेकटाऊन येथून एक युवक (अक्षय साळुंखे, वय २६) वाहून गेल्याची नोंद अग्निशमन दल नियंत्रण कक्षात सायंकाळी सहाच्या सुमारास झाली होती.अग्निशमन दलाकडून प्रथम गंगाधाम अग्निशमन केंद्र येथून वाहन पाठवत शोध घेण्यात आला होता. परंतू, धरण क्षेञातून वाढता विसर्ग आणि पाण्याचा प्रवाह पाहता अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यादिवशी शोध घेऊनही युवक सापडला नाही. दुसऱ्या दिवशी दलाने घटनेचे गांभीर्य ओळखून गंगाधाम आणि काञज अग्निशमन वाहन लेकटाऊन व जनता अग्निशमन वाहन शंकर महाराज मठाजवळ, स्वामी विवेकानंद पुतळा आणि आज कसबा येथील वाहन मनपा जवळील नदीपाञ येथे रश्शी, गळ, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग याचा वापर करत युध्दपातळीवर शोधकार्य करत होते.
Mumbai Crime News: तुमच्या नावाचेही टॅटू काढेन! ‘तो’ पोलिसांना द्यायचा धमकी; मुंबई स्पा हत्याकांडात नवी माहिती

आज सकाळी १० वाजता मनपा भवनालगत असलेल्या डेंगळे पुलाखाली एक मृतदेह पाण्यात आढळून येताच अग्निशमन दलाचे जवान यांनी जीवरक्षक राजू काची यांच्या मदतीने सदर युवकाचा मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. सदर घटनेत अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकारी सुभाष जाधव, प्रदिप खेडेकर, सुनिल नाईकनवरे, कमलेश चौधरी आणि सुमारे वीसच्या आसपास जवान यांनी सहभाग घेतला. तसेच या घटनेत पोलिस विभाग, जीवरक्षक, ड्रेनेज विभाग यांचे ही सहकार्य लाभले.

पुरानंतर आरोपांची ‘चिखलफेक’

खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सोडलेल्या पाण्यावरून पुण्यात गुरुवारी उद्भवलेल्या पूरस्थितीबाबत जलसंपदा विभाग आणि महापालिका यांच्यात आरोपांची ‘चिखलफेक’ झाली. या पुराची पूर्वकल्पना महापालिकेला दिल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला, तर सांगितल्यापेक्षा अधिक विसर्ग केल्यामुळे पूर आल्याचा पवित्रा महापालिका प्रशासनाने घेतला. दरम्यान, केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत जलंसपदा विभागाला धारेवर धरले.

मोहोळ यांनी शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीत हा सारा प्रकार घडला. पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने धरणातून पाणी सोडणे आवश्यक होते. जलसंपदा विभागाने पाणी सोडण्याची सूचना २२ जुलैपासून पुणे महापालिका नियंत्रण कक्ष आणि जिल्हा आपत्ती निवारण कक्ष यांना दिली होती, असे स्पष्टीकरण जलसंपदा विभागाने दिले. धरणातील पाण्याचा विसर्ग बुधवारी मध्यरात्री अचानक ४० हजार क्युसेकपर्यंत वाढवल्याने अनेक घरांत पाणी घुसले होते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.