Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सायबरच्या पाठीशी ‘एआय’! राज्य सायबर सेलच्या मदतीला १००हून अधिक सॉफ्टवेअर, असा होणार फायदा

9

मुंबई : लोहा लोहे को काटता है अशी हिंदीत म्हण आहे. सायबर चोरांकडून गुन्ह्यांसाठी मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वापर केला जातो. या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी महाराष्ट्र सायबरही एआयने अद्ययावत होणार आहे. केवळ एआय नाही तर १०० अत्याधुनिक सॉफ्टवेअरचे राज्य सायबर सेलला पाठबळ मिळणार आहे. यामुळे सायबर पोलिसांची १९३० ही हेल्पलाइनही अद्ययावत होणार असल्याची माहिती महाराष्ट्र सायबर पोलिसांनी दिली.सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने महाराष्ट्र सायबर पोलिसांना अद्ययावत करण्यात येत आहे. नवीन तंत्रज्ञान असलेल्या एआयबरोबरच जगभरात वापरल्या जाणाऱ्या शंभरपेक्षा अधिक अद्ययावत सॉफ्टवेअरचा वापर सायबर पोलिस करणार आहेत. विशेष म्हणजे दीडशेहून अधिक सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलिस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी दिली. १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर देशभरातून ५ हजारांहून अधिक कॉल आम्हाला येतात आणि तत्परतेने आम्ही हे कॉल आम्ही स्वीकारतो. अद्ययावत सॉफ्टवेअरमुळे ही हेल्पलाइनही अत्याधुनिक होणार आहे. २०२१ पासून आतापर्यंत या हेल्पलाइनच्या माध्यमातून आम्ही साडेतीनशे कोटींपेक्षा अधिक रक्कम वाचवल्याचे त्यांनी सांगितले.

बँकेवर सायबर दरोडा

इंडिसइंड बँकेमध्ये ४० कोटींची अपहार झाल्याची घटना झाली होती. याबाबत तक्रार येताच सायबर पोलिसांनी ३२ कोटी रुपये वाचविले आणि हा बँक दरोडा होण्यापासून रोखला. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून बँकेचे कर्मचारी आणि अधिकारी यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

पटेल यांची बदनामी करणारा अटकेत

जुहूमधील राहुल नावाच्या इसमाने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांचा नंबर एका पेड अॅप्लिकेशनच्या माध्यमातून मिळवला आणि कतारमधील काही नागरिकांशी संपर्क करून पैसे मागितले. पटेल यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तक्रार केली आणि सायबर पोलिसांनी तपास करून राहुल कांत याला अटक केली.

Courier Scam Alert: ऑनलाइन शॉपिंग करताय? सावधान, एक चूक अन् अशी फसवणूक तुमच्यासोबतही होऊ शकते
अंजली बिर्ला यांचीही बदनामी

लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीच्या नावाने सोशल मीडियावर बदनामीच्या अनेक पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. ध्रुव राठी यांच्या नावाने बनावट अकाऊंट चालवणाऱ्या व्यक्तीने या पोस्ट केल्या होत्या. याबाबत आणखी ७ ते ८ लोकांना समन्स देण्यात आले आहे. आम्ही यासंदर्भात योग्य ती कारवाई करत असल्याची यादव यांनी सांगितले.

ऑपरेशन ब्लॅक फेस

बाल लैंगिक छळाच्या राज्यात आतापर्यंत ६ लाख तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यातील जवळपास ४ लाख तक्रारींच निवारण झाले आहे. राज्यभरात ४१७ गुन्हे दाखल करून १७४ जणांना अटक केली आहे. अल्पवयीन मुलांचा छळ करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी हाती घेतलेले ऑपरेशन ब्लॅक फेस यापुढेही चालू राहणार असल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.