Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गावाला पुराचा वेढा, नदी – नाले तुडुंब; गर्भवती महिलेला प्रसूतीकळांदरम्यान गावातून बाहेर काढण्यासाठी जीवाची बाजी

12

गडचिरोली : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अजूनही अनेक खेड्यापाड्यातील गावांचा संपर्क तुटलेलाच आहे. गावालगत असलेले नदी नाले तुडुंब भरून वाहत असल्याने गावाला पाण्याचा वेढा होता. अक्षरशा गावाला बेटाचे स्वरूप आले होते. अशा परिस्थितीत एका गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी दिलेली अपेक्षित तारीख जवळ आल्याने आरोग्य विभाग तसेच एसडीआरएफ टीमने जीवाची बाजी लावून तुडुंब भरलेल्या नाल्यातून बोटीच्या साहाय्याने गर्भवती महिलेला बाहेर काढून रुग्णालयात भरती केले आहे. सोनी संतोष आत्राम (२६) रा. कर्जेली तालुका सिरोंचा असे त्या गर्भवती महिलेचे नाव आहे.

गावाला पुराचा वेढा असताना गर्भवती महिलेला सुरक्षित रुग्णालयात दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, सौ सोनी संतोष आत्राम या गर्भवती मातेला आरोग्य विभागाने दिलेली प्रसुतीची तारीख २७ जुलै होती. मात्र, कर्जेली गावाला पुराचा वेढा असल्याने पूरपरिस्थितीत तिच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून गावातील आशा वर्कर आणि आरोग्य सेविका सेविकेने वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्या गरोदर मातेला गावातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. मात्र, गावाला नदी नाल्यांनी वेढलेला असल्यामुळे आणि नदी नाले तुडुंब भरून असल्यामुळे प्रशासनाने तात्काळ एसडीआरएफ जमुना पाचारण करून कर्जेली नाल्यातून रेस्क्यू करत बाहेर काढले.
Rajasthan kid Needs 8.5 Crore Injection : दोन वर्षांच्या चिमुकल्यासाठी ८.५ कोटींच्या इंजेक्शनची गरज, दुर्धर आजाराने ग्रस्त अर्जुनला आणखी ८४ लाखांची गरज
कर्जेली हे गाव सिरोंचा तालुका मुख्यालयापासून तब्बल ६४ किलोमीटर अंतरावर असून झिंगानुर प्राथमिक आरोग्य केंद्रात समाविष्ट आहे. सिरोंचा तालुक्यातील आणि छत्तीसगड सीमेवर वसलेला व्यापारी सर गणदाट जंगलांनी व्यापला असून या नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. विशेष म्हणजे कर्जेली हे गाव छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असून हा गाव नदी-नाल्यांनी वेढला आहे. दरवर्षी पावसाळ्यात या गावाचा संपर्क तुटत असतो. गावाचा पूर्व दिशेला इंद्रावती नदी, दक्षिण आणि उत्तरेस दोन्ही बाजूला मोठा नाला वाहतो, तर पश्चिमेस घनदाट जंगल.

गावालगत वाहणाऱ्या नाल्यावर पूल नसल्याने आणि पावसाळ्यात नाला तुडुंब भरून वाहत असल्याने येथील नागरिकांना दरवर्षी नाल्याच्या पाण्यातून बोटीने जीवघेणा जलप्रवास करावा लागतो. या गावाची लोकसंख्या जवळपास २५० ते ३०० इतकी आहे. आठवडी बाजार, किराणा सामान, जीवनावश्यक वस्तू, शेतीसाठी खते, अवजार घेण्यासाठी आणि रुग्णांच्या उपचारासाठी १२ किलोमीटर अंतरावरील झिंगानुर किंवा १५ किलोमीटर वरील अहेरी तालुक्यातील देचलीपेठा गेल्याशिवाय पर्याय नाही.
Atal Setu News : अटल सेतूवर कार थांबवली, गाडीतून उतरला, आजूबाजूला कुठेही न पाहता थेट समुद्रात उडी; तरुणाने आयुष्य संपवलं
सोनी संतोष आत्राम हिला गुरुवार (२५ जुलै) रोजी प्रसूतीकळाच्या वेदना जाणवत असल्याने झिंगानुर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना ही माहिती देण्यात आली. त्यांनी रुग्णवाहिका घेऊन आपल्या आरोग्य विभागाच्या चमूसोबत कर्जेली गाठले. मात्र,नाला तुडुंब भरून असल्याने त्यांनी प्रशासनाला कळवताच आपत्ती व्यवस्थापनचे एसडीआरएफ टीम आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने दोन लाकडी बोटी एकत्र बांधून तुडुंब भरलेल्या नाल्यातून रेस्क्यू करत त्या गर्भवती महिलेला बाहेर काढले.

सोनी संतोष आत्राम हिची ही दुसरी खेप असून झिंगानुर येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी कुठलीही रिस्क न घेता तिला रमेशगुडम, कोपेली, सोमणपल्ली, असरअली मार्गे सिरोंचा मुख्यालयातील ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असून आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज तिची प्रसूती अपेक्षित तारिख आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.