Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Uddhav Thackeray : ‘#रावणबाळ, #काळादिवस’ म्हणत शिंदे गटाने वाढदिवशीच उद्धव ठाकरेंना डिवचले

12

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज सकाळपासून राज्यात विविध ठिकाणी उद्धव ठाकरेच्या वाढदिवसाचे फलक लावण्यात आले आहेत. काही ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत. राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण अशातच शिंदे गटातील नेत्यांनी मात्र ठाकरेंच्या वाढदिवसी काळा दिवस अशा हॅशटॅग ट्रेंड केला आहे. ट्वीटर म्हणजेच एक्स या सोशल मिडिया साइटवर शिवसेना शिंदे गटाचे नेते यांनी ठाकरेंवर वाढदिवशी निशाणा साधला आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ट्वीट केले पुढीलप्रमाणे, “२७ जुलै २००५ हा दिवस शिवसैनिकांसाठी काळा दिवस! नुसत्या ‘नावा’चा आणि ‘प्रॉपर्टी’चा वारसा सांगणारे मौजमजेसाठी अंथरुणात खिळलेल्या बापाला पुरात ‘एकटं’ सोडून पळून गेले, तो हाच दिवस! हो, आमचे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या दिवशी मातोश्रीवर एकटे पडले होते. ज्यांनी महाराष्ट्र, हिंदुत्व, मराठी माणूस सांभाळला… पण त्यांच्याच पुत्राने ‘नीतिमत्ता’ सोडून, मातोश्रीवर बाळासाहेबांना ‘एकटं’ टाकून, कुटुंबीयांसोबत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पलायन केले.आणि तेच आता आपल्या चेल्यांसह, ‘माझा बाप चोरल्या’ची आवई उठवतात…लाज वाटते का लाज … जनाची ना मनाची तरी…? #काळादिवस”

Uddhav Thackeray : बावनकुळेंच्या वक्तव्याने फसवणुकीची जाणीव, भाजप नेत्याचा संताप, मातोश्रीवर शिवबंधन बांधलं

तर पुढे ज्योती वाघमारे शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या यांनी काय ट्वीट केले पाहा, “जन्मदात्याला भोवला त्याला लेक म्हणू नये हिंदूहदयसम्राटाना पूरस्थितीत एकटे टाकून नटसम्राट फाईवस्टार हॉटेल मध्ये वाढदिवस साजरा करत होते त्याला आज 19 वर्षे पूर्ण होतील. आईवडिलांना सांभाळणारा श्रावणबाळ पण वडिलांच्या जीवाशी खेळणारा हा तर महाराष्ट्राचा #रावणबाळ” असा ट्वीटरवर उल्लेख केला आहे.

तर संजय शिरसाट यांनी बोलताना उद्धव ठाकरेंना राजकरणात यायचं नव्हते पण त्यांनी नको ते निर्णय घेतले आणि पक्षाची वाट लागली असे शिरसाट म्हणाले. तर उद्धव ठाकरेंनी कधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवू नये अन्यथा महाराष्ट्राची पिछेहाट होईल अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांचा आज ६४ वा वाढदिवस आहे, रश्मी ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे आणि शिवसैनिकांनी आज मध्यरात्री सुद्धा उत्साहात ठाकरेंच्या वाढदिवसाचे सेलीब्रेशन केले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.