Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Rain News: मुसळधार पावसाचा राज्याला फटका; काबऱ्या धरणाला गळती, नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

12

अजय गद्रे, धुळे: जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील आमळी शिवारात असलेल्या काबऱ्या खडक धरणाला गळती लागली आहे. यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. साक्री तालुक्यातील काबऱ्या धरणाच्या क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. धरण पूर्ण भरलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून धरणाच्या सांडव्याची दुरुस्ती सुरू होती. धरणा जवळच्या पायथ्याचा काही भाग खचल्याने त्या ठिकाणाहून पाणी गळतीला सुरुवात झाली आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह धरणातून बाहेर पडत असून पाऊस सुरू राहिल्यास धरण फुटण्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
CM Shinde : कांदा खरेदीचे धोरण करा! सोयाबीन कापसाला हमीभाव द्या, सीएम शिंदेंची PM मोदींकडे थेट मागणी
लागलीच उपाययोजना न झाल्यास मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून धरणाचे काम संथगतीने सुरू असल्याने धरण फुटण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक गावकऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे धरणातून गळती सुरू असताना देखील सिंचन विभागाच्या वतीने अधिकारी घटनांसाठी दाखल गुन्हा झाल्याचा आरोप करत यावेळी तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. साक्री तालुक्यातील काबरा खडक धरणा संदर्भात वेळोवेळी पाटबंधारे विभागाला सुचित करण्यात आले होते. परंतु त्यांनी धीम्या गतीने काम सुरूच ठेवले. त्यामुळे आज धरण उठण्याची वेळ आली आहे.धरणाला लागलेल्या या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया देखील जात असल्याने धरण रिकामं होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. तात्काळ पाटबंधारे विभागाने दुरुस्ती करून पाणी थांबवावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. साक्री तालुक्या परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे परिसरातील जलयुक्त शिवारची बंधारे यासह धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शेतकरी चिंतामुक्त झाले आहेत. शेतात कपाशी मका पिकांना आता या पाण्याचा फायदा होईल. त्यामुळे शेतकरी आता चिंतामुक्त झाले आहेत. या परिसरातील गावांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

दरम्यान साक्री तालुक्यातील मालनगाव प्रकल्प १००% भरला आहे. तसेच साक्रीच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या पावसामुळे मालनगाव प्रकल्प १००% पूर्ण भरल्याचे पहायला मिळाले. जलसाठा वाढल्याने कान नदीच्या पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. यामुळे आता साक्री तालुक्यातील पाणीटंचाईवर काही अंशी दिलासा मिळाला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.