Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजवरचा सर्वात मोठा मोबदला; रस्ते अपघातातील मृत्यूनंतर कुटुंबाला मिळाला २.८५ कोटींचा चेक

14

ठाणे : रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या एका व्यक्तीच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई म्हणून सर्वाधिक किमतीचा चेक मिळाला आहे. त्यामुळे याची सध्या चर्चा होताना दिसते आहे. १९ जून २०२२ रोजी धीरेंद्रचंद्र ठाकूरदास रॉय यांचा मृत्यू झाला होता. पनवेल – सायन या मार्गावरुन आपल्या गाडीने जात होते. त्यावेळी त्यांच्या गाडीला एका ट्रनने धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या धडकेत धीरेंद्रचंद्र ठाकूरदास रॉय यांचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला होता. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि ८६ वर्षीय वृद्ध आई असं कुटुंब होतं. त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला होता.

धीरेंद्रचंद्र ठाकूरदास रॉय हे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात ओएनजीसीचे महाव्यवस्थापक होते. त्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी नुकसान भरपाईसाठी कोर्टात मोठी लढाई लढली. ही लढाई राष्ट्रीय लोक न्यायालयापर्यंत पोहोचली होती. संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जात, अनेक पडताळणींनंतर कोर्टाचे जिल्हा न्यायाधिश एसएस शिंदे आणि एसएन शाह यांनी धीरेंद्रचंद्र ठाकूरदास रॉय यांच्या कुटुंबियांना २.८५ कोटी रुपयांचा नुकसान भरपाईचा चेक दिला.
Rajasthan kid Needs 8.5 Crore Injection : दोन वर्षांच्या चिमुकल्यासाठी ८.५ कोटींच्या इंजेक्शनची गरज, दुर्धर आजाराने ग्रस्त अर्जुनला आणखी ८४ लाखांची गरज
ठाण्यात शनिवारी राष्ट्रीय लोक न्यायालयात रॉय यांच्या कुटुंबियांना २.८५ कोटींची नुकसान भरपाई देण्याचे आदेश देत त्यांच्या मृत्यूचा दावा निकाली काढला. मागील २५ वर्षांच्या इतिहासातील रस्ते अपघातात देण्यात आलेली ही सर्वोच्च नुकसान भरपाई आहे. रस्ते अपघातात ज्यावेळी रॉय यांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांचं मासिक वेतन ६ लाख रुपये होतं. त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबियांना दिलेल्या या नुकसान भरपाईची सर्वत्र एकच चर्चा आहे.
Microsoft Engineer Drives Auto Rickshaw : मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी, पण विकेंडला रिक्षा चालवतो तरुण; कारण ऐकून थक्क व्हाल

याआधी लोक न्यायालयाने मागील वर्षीच्या एका प्रकरणात आयटी कंपनीच्या एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना कोट्यवधी रुपयांची नुकसान भरपाई दिली होती. २३ फेब्रुवारी २०२३ मध्ये ठाण्यातील घोडबंदर रोडवर एका आयटी कर्मचाऱ्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. ३८ वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना १.१५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली होती.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.