Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
२. आपल्या पक्षात येण्यासाठी नेत्यांची मोठी रांग, जे येतात त्यांना होकार द्या, काहीजण जात असतील तर त्यांना जाऊ द्या, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याने फसवणुकीची जाणीव, भाजप नेते रमेश कुथे यांचा संताप, मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधलं, ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश
३. मला भ्रष्टाचाऱ्यांचा सुभेदार म्हणता, पण स्वतः कोणे एके काळी गुजरातमधून तडीपार झाले होते, त्यांच्याच हाती आता देशाची सुरक्षा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे बाण, छत्रपती संभाजीनगर येथे पुस्तक प्रकाशनावेळी पवारांचे भाषण
४. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप, विरोधकांच्या टीकेनंतर राज्य सरकार अतिरिक्त निधी खेचून आणण्याच्या तयारीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांची नीती आयोगाच्या बैठकीला हजेरी, राज्य सरकारची गोटात हालचाली
५. शिवसेना आमदार भरत गोगावले पुन्हा हायकोर्टात; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान, तातडीने सुनावणीची मागणी
६. पुरानंतर आरोपांची ‘चिखलफेक’; पुण्यातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीवरुन जलसंपदा विभाग आणि पुणे महापालिकेची एकमेकांवर ढकलाढकली
७. लोकल ट्रेनच्या दारात लटकून केलेली स्टंटबाजी अंगलट, सोशल मीडियावर फेमस व्हायच्या नादात तरुणाने गमावले हातपाय, मार्च महिन्यातील शिवडी स्टेशनवरील घटनेचा व्हिडिओ झालेला व्हायरल, कारवाईसाठी पोलीस तरुणाला शोधत घरापर्यंत पोहोचले असता उघड झाली घटना
८. ठरलं तर मग मालिकेत सायलीने अखेर कमाल करुन दाखवली, सुभेदारांची लाडकी प्रतिमा पुन्हा घरी परतली; लेकीला जिवंत पाहून पूर्णा आजीच्या आनंदाला पारावर नाही, कल्पना-प्रतापलाही आनंदाचा धक्का, अर्जुनचं मन बायकोने जिंकलं, मात्र प्रतिमा ओळखत नसल्याने सगळेच चिंतेत
९. नवी मुंबईतील बेलापूरमध्ये ‘इंदिरा निवास’ ही चार मजली इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली, पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास दुर्घटना, रिक्षावाल्याच्या प्रसंगावधनामुळे मोठी जीवितहानी टळली, अडकलेल्या दोघांची सुटका
१०. खेळाचे महाकुंभ गाजवण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज; पॅरिस ऑलिम्पिकचा दिमाखदार ओपनिंग सोहळा, पहिल्या दिवशीचे सविस्तर वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा