Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

घोडबंदर ते भाईंदरपर्यंतची वाहतूक कोंडी सुटणार; एलिवेटेड रोड सुरू होणार? कसा असेल मार्ग?

8

मुंबई : मुंबईतील वाहतूककोंडी टाळण्यासाठी घोडबंदर रोड येथील फाउंटन हॉटेल ते भाईंदर दरम्यान एलिवेटेड रोड तयार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मुंबईतील या अतिशय महत्त्वाच्या प्रकल्पाचं काम लवकरच सुरु करण्यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यासाठी शनिवारी निविदा मागवण्यात आल्या आहेत. निविदेतील अटींनुसार प्रकल्पासाठी निवडलेल्या कंत्राटदाराला ५४ महिन्यांत काम पूर्ण करावं लागणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर २४ महिन्यांच्या आत एलिवेटेड रोडमध्ये काही दोष असल्यास दुरुस्ती करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असेल. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अर्थात MMRDA च्या प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यासाठी ८ ऑगस्ट रोजी प्री बीड मिटिंगचं आयोजन करण्यात आलं आहे. १९ सप्टेंबरपर्यंत कंपन्या निविदा भरू शकतात.

कधीपासून सुरू होणार मार्गाचं काम?

एलिवेटेड रोड तयार झाल्यानंतर २०२९ पासून गुजरात, राजस्थान किंवा दिल्ली येथून येणाऱ्या वाहनांना मुंबईच्या प्रवेशद्वारावर वाहतुकीचा सामना करावा लागणार नाही. वाहनचालकांची वाहतूककोंडीपासून सुटका करण्यासाठी डिसेंबर २०२४ पासून नवा एलिवेटेड रोड तयार करण्याचं काम सुरू होणार आहे. घोडबंदर रोडवरील फाउंटन हॉटेल ते भाईंदर दरम्यान हा एलिव्हेटेड रोड असणार आहे.
Thane News : ‘सॅटीस’ पुलाखाली अवतरली समुद्री दुनिया, निळ्याशार सागराच्या अंतरंगातील जलचरांचे मनोहरी दृष्य
घोडबंदर रोडवरुन येणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या फाउंटन हॉटेलवरुनच मुंबईच्या दिशेने वळतात. मात्र वाहनांची संख्या अधिक असल्याने फाउंटन हॉटेलवरुन पुढे घरापर्यंत पोहोचताना प्रवाशांना वाहतुकीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. गर्दीच्या वेळी ही समस्या अतिशय गंभीर होते. मात्र आता फाउंटन हॉटेल ते भाईंदरपर्यंतच्या १० किमी लांबीच्या एलिवेटेड रोडमुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूककोंडीचा कमी त्रास होणार असून मोठा दिलासा मिळणार आहे.
Mumbai News : घोडबंदरची कोंडी सुटणार, गायमुख ते भाईंदरपर्यंत सुस्साट, MMRDA च्या योजनेला मंजुरी; जाणून घ्या कसा असेल मार्ग?

कसा असेल एलिवेटेड रोड?

घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी गायमुखपासून फाउंटन हॉटेलपर्यंत नवा रस्ता तयार करण्याचं काम डिसेंबरपासून सुरू होईल. या साडेपाच किमी लांबीच्या रस्त्यासाठी कंत्राटदाराचा शोध सुरू झाला आहे. या प्रकल्पाचं कामही २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.

साडेपाच किमी लांबीच्या मार्गापैकी साडेतीन अर्थात ३.५ किमी मार्ग हा भूमिगत अर्थात अंडरग्राऊंड असेल, तर २ किमीचा रस्ता सामन्य असेल. गायमुखजवळ संजय गांधी नॅशनल पार्क असल्याने साडेतीन किमीचा भुयारी मार्ग तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या दोन प्रकल्पांसाठी MMRDA जवळपास २० हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. फाऊंटन हॉटेल ते भाईंदर दरम्यान ४ लेनचा एलिवेटेड रोड असेल. तसंच गायमुख ते फाऊंटन हॉटेलपर्यंतचा मार्गही ४ लेनचा असणार आहे. केवळ भुयारी मार्गामध्ये ३ लेन असतील.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.