Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अजित पवार यांनी विधानसभा निहाय २८८ जागांवर आढावा घेण्याची आधीच सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे काका शरद पवार यांनी सुद्धा राज्यभरात विधानसभेसाठी दौरा करण्याचे ठरवले आहे. येत्या ऑगस्टपासून शरद पवार राज्यात विधानसभेसाठी दौरा करणार आहेत. पक्षांतर्गत झालेल्या बंडखोरीनंतर शरद पवार आता पक्षाची एकहाती धुरा सांभाळत आहेत. मागील काही महिन्यात शरद पवार गटातील अनेकजण अजित पवार गटात सामील झाले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवारांना थेट ग्राउंडवर जावून पुन्हा एकदा पक्षाला बळकटी द्याचे काम करावे लागणार आहे असे चित्र दिसते.
तर दुसरीकडे लोकसभेच्या निकालात अजित पवार गटाला सुद्धा फार चांगली कामगिरी करता आली नाही. राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत बंडखोरीनंतर सहानुभूती शरद पवारांना अधिक मिळाली असे निकालात राजकीय जाणकारांनी बोलून दाखवले आहे. त्यामुळे आता विधानसभेला चित्र बदलण्यासाठी अजित पवार गटाला सुद्धा ग्राउंड पातळीवर जावून कार्यकर्त्यांची मन जिंकावी लागणार आहेत. यासाठीच अजितदादा पवार जनसंवाद यात्रा काढणार आहेत. सुरुवात यात्रेची नाशिकमधून होणार आहे. सर्व विधानसभा मतदारसंघात अजितदादा पवार सर्व ज्येष्ठ नेत्यांसमावेत जाणार आहे. यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, खासदार प्रफुल पटेल सुद्धा अजित पवारांसोबत फिरणार आहेत.
शरद पवार यांच्याकडे सुद्धा ऐन निवडणुकीत एक मोठे आव्हान असणार आहे ते म्हणजे पक्षाच्या चिन्हाचे. अजित पवार गटाने घड्याळ चिन्ह आणि पक्षावर दावा ठोकला आहे. त्यामुळेच शरद पवार यांना ‘तुतारी’ हे चिन्ह घेवून राज्यात मतदारापर्यंत पोहचावे लागेल. कारण लोकसभेच्या निवडणुकीत तुतारी चिन्हामुळे काही जागांवर शरद पवार गटाला थोडे नुकसान सहन करावे लागले आहे. अशातच आता काका पुतणे दोघेही विधानसभेच्या रिंगणात उतरल्याने कोण बाजी मारेल आणि कोणाला धोबीपछाड मिळेल हे सुद्धा पाहणे उत्सुकतेचे असेल.