Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सुपारीच्या नावाखाली नको तो उद्योग, पोलिसांना कुणकुण, कारवाईत ६ जणांना अटक, काय घडलं?

9

जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूरात दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये तस्करी करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पहिल्या घटनेत सुपारीच्या नावाखाली लाल चंदनाची तस्करी करणारा वाहतूकदारांच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला, तर दुसरीकडे नागपूर कस्टम विभागाने पुणे कस्टम विभागासह मिळून वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या काळात वाघाच्या कातडीसह सहा आरोपींनाही अटक करण्यात आली.

सुपारीच्या नावाखाली अवैधरित्या लाल चंदनाची वाहतूक करणाऱ्या पूर्व नागपुरातील दोन बड्या वाहतूकदारांच्या कार्यालयावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) दिल्ली पथकाने छापे टाकले. अचानक छापा टाकल्यानंतर संपूर्ण शहरात भिती पसरली होती, याशिवाय या संदर्भात डीआरआयने कोणतीही माहिती दिलेली नाही. सूत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरात सुपारीचा व्यापार मोठ्या प्रमाणावर होतो. सुपारीची मोठी खेप बेंगळुरू आणि इतर शहरांमधून ट्रकमधून नागपूर येथे पोहोचते. पूर्व नागपुरातील वर्धमान नगर जवळील ट्रान्सपोर्ट नगरमधील दोन बड्या वाहतूकदारांकडून सुपारीच्या नावाखाली लाल चंदनाची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती डीआरआयला मिळाली होती. जुन्या आणि नव्या प्रकरणात डीआरआयच्या दिल्ली पथकाने शुक्रवारी अचानक या दोन वाहतूकदारांच्या कार्यालयांवर छापे टाकले. मात्र, ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पडली.

लाल चंदन नागपुरात आणले जाते आणि तेल आणि परफ्यूम बनवण्यासाठी उत्तर भारतात पाठवले जाते. या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात कमाई होत असल्याने वाहतूकदारांकडून अवैध मार्ग अवलंबला जातो. डीआरआयने शुक्रवारी छापा टाकलेल्या दोन वाहतूकदारांना अशाच एका प्रकरणात अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या वाहतूकदारांची नावं समोर आलेली नाहीत.
Tree Collapsed On Family : रस्त्यावरुन जाताना झाड अंगावर पडलं; माझ्या मुलाला वाचवा, आईचा आक्रोश मात्र….

वाघाच्या कातड्यासह सहा जणांना अटक

दुसरीकडे सर्व कायदे आणि निर्बंध असतानाही वन्य प्राण्यांच्या शिकारीत घट झालेली नाही. शनिवारी नागपूर कस्टम विभागाने पुणे कस्टम विभागासह मिळून वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या काळात वाघाच्या कातडीसह सहा आरोपींनाही अटक करण्यात आली. आरोपींना जळगाव येथून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी जळगावात करण्यात आली.
Bank Theft News : बँकेच्या लॉकरमधून दागिने आणि २० लाखांची एफडी गायब, पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक प्रकार उघड
नागपूर सीमाशुल्क विभागाच्या विशेष तपास आणि गुप्तचर विभागाला मिळाली होती. या मिळालेल्या माहितीच्या आधारे नागपूर कस्टम विभागाने ही माहिती पुणे कस्टम विभागाला दिली. त्यानंतर नागपूर सीमाशुल्क विभागा आणि पुणे कस्टम विभाग या दोन्ही पथकांनी संयुक्त कारवाई करुन जळगाव येथून सहा जणांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान आरोपींकडून वाघाचं कातडंही जप्त करण्यात आलं.

पोलिसांनी सर्व आरोपींवर वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सीमा शुल्क सहायक आयुक्त अंजुम तडवी, अधीक्षक प्रभाकर शर्मा, अधीक्षक शाम कोठावदे, अधीक्षक प्रसेनजीत सरकार, सीमा शुल्क निरीक्षक अनिकेत धोंडगे आणि पुणे कस्टमचे अधिकारी सहभागी होते. वाघाचे कातडे आणि सहा आरोपींना पुढील कारवाईसाठी महाराष्ट्र वनविभाग डीसीएफ, जळगावच्या अधिकाऱ्यांकडे हे प्रकरण सोपवण्यात आलं.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.