Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Pune News: अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती मैदानाचे आयोजन, गीता फोगटची उपस्थिती, राजकारणावर म्हणाली…

7

दीपक पडकर, बारामती: मनू भाकरने खूप मोठे काम देशासाठी केले आहे. तिला खूप खूप शुभेच्छा. बारामतीच्या कुस्ती मैदानातील सर्व कुस्तीगीरांचा मला कौतुक वाटते. तुम्ही रात्रंदिवस मेहनत करत रहा. मातीवरील कुस्तीला ऑलिम्पिकमध्ये स्थान नसते. त्यामुळे माती बरोबर मॅटवर, गादीवरही सराव करत रहा, असा सल्ला गीता फोगटने कुस्तीगीरांना दिला आहे. गीता फोगट आज बारामतीमध्ये आली होती. यावेळी तिने माध्यमांशी संवाद साधला.
महाराष्ट्र द्वेषी अबू आजमी, बाळासाहेबांच्या फोटोसमोर त्यांना बुके देताय, लाज वाटली पाहिजे, मनसे आमदार भडकले
बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जय पवार यांच्या पुढाकारातून बारामती कुस्तीगीर संघाच्या वतीने या ठिकाणी भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. या मैदानासाठी गीता फोगट हिच्यासह पवनकुमार योगेश्व, दत्ता नरसिंग यादव, विजय चौधरी, आदित दिग्गज मल्ल उपस्थित राहिले होते. क्रीडामंत्री संजय बनसोडे हे या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी बोलताना गीता फोगट म्हणाली, इथे कुस्तीकरांना खूप प्रोत्साहन मिळत आहे. सरकार सुद्धा त्यांच्या पाठीशी आहे, याचा खूप समाधान आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारला माझा धन्यवाद, असं म्हणत गीताने महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले आहे.यानंतर पत्रकारांनी गीता फोगटला क्रिडा राजकारणाविषयी विचारले. गीता फोगटला राजकीय क्षेत्राचा क्रीडा क्षेत्रात होणाऱ्या अति सहभागाबद्दल विचारले असता आज कुस्तीसाठी चांगला दिवस आहे. त्यामुळे आज चांगलंच बोलू, असे म्हणत तिने या विषयावर बोलणे टाळले. मी पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणावरच आयोजन पाहिलं, असे तिने बारामतीच्या कुस्ती मैदानाबद्दल सांगितले.

दरम्यान स्टार नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये इतिहास रचला आहे. मनूने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे. कारकिर्दीतील दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात मनूला यश आले. तिने २२१.७ गुणांसह कांस्यपदकावर कब्जा केला. मनू भाकर १० मीटर एअर पिस्तुलमध्ये कांस्य पदक मिळवून ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. या पदकासोबतच भारताचा ऑलिम्पिकमधील नेमबाजीतील १२ वर्षांचा पदकांचा दुष्काळही संपुष्टात आला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.