Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मृतदेह विच्छिन्न अवस्थेत आढळला
उरण कोटनाका पेट्रोल पंपाजवळ अज्ञात स्थळी तिचे हात, इतर अवयव कापून, चेहरा आणि गुप्तांगावर जखमा केलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या मुलीचा विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेऊन इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनसाठी नेण्यात आला. तसंच या घटनेबाबत अधिक तपास उरण पोलीस करत आहेत. तरुणीचा मृतदेह पाहून पोलीसही हादरले होते.
उरण शहरातील एन.आय स्कूलच्या जवळ एका राहाणाऱ्या यशश्री शिंदे या २२ वर्षांच्या मुलीची कोटनाका पेट्रोल पंपाजवळ नेऊन तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. २७ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास उरण पोलीसांना मुलीच्या हत्येची माहिती मिळाल्यानंतर मुलीचा विच्छिन्न अवस्थेतील मुत्यदेह ताब्यात घेऊन इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेत नंतर मुलीच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली. या घटनेनंतर पोलीसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. प्राथमिक माहितीमध्ये आरोपी मुस्लिम असल्याचं समोर आलं असून तो हत्येनंतर उत्तर प्रदेशमध्ये गेला असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.
तरुणीच्या हत्येनंतर परिसरातून निषेध व्यक्त, आरोपीला फाशी देण्याची मागणी
उरण शहरातील यशश्री शिंदेची हत्या उघडकीस आल्यानंतर या घटनेबाबत सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच उरणचे आमदार महेश बादली, भाजपचे तालुकाध्यक्ष रवि शेठ भोईर, महिला संघटनांच्या प्रतिनिधींनी हेमलता पाटील, सिमाताई घरत, कामगार नेते भूषण पाटील, जितेंद्र घरत, विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन यशश्री शिंदेंला न्याय मिळवून देण्यासाठी तिच्या नातेवाईक मंडळी सोबत राहण्याचा निर्णय घेतला.
तसंच उरणचे आमदार महेश बालदी, महिला संघटनांच्या प्रतिनिधींनी सिमाताई घरत, मुलीच्या नातेवाईकांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला फाशीची शिक्षा करण्याची मागणी लावून धरली आहे. तसंच आरोपीला लवकरच लवकर ताब्यात घेण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.