Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शाहांच्या भेटीसाठी दादांचा ‘झोल’, बिग बॉसमध्ये शिरताच स्पर्धक ट्रोल, सकाळच्या दहा हेडलाईन्स

8

१. महायुतीत सहभाग घेण्याआधी अमित शाह यांच्यासोबत दहा वेळा बैठका, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किस्से सांगितले, पत्रकारांशी बोलताना दादांचं दिलखुलास उत्तर, मास्क आणि टोपी घालून दिल्लीला जायचो, अजित दादांनी सांगितल्या गमती जमती

२. पुण्याचा वाढता विस्तार आणि नवीन गावांच्या समावेशामुळे पुणे शहरात स्वतंत्र महापालिकेची तातडीने गरज, शरद पवार यांची भूमिका, हडपसर-हवेली ही स्वतंत्र महापालिका करण्याची आवश्यकता व्यक्त

३. मुंबईकरांसाठी मोठी बातमी! शीव रेल्वे उड्डाणपूल १ ऑगस्टपासून सर्व वाहनांसाठी बंद, धोकादायक असल्याने पुनर्बांधणीसाठी वाहतूक पोलिसांकडून पूल बंद करण्याच्या सूचना

४. मुंबईतील वरळीतच हिट अँड रन दुर्घटनेची पुनरावृत्ती, यावेळीही आलिशान बीएमडब्ल्यू कारचीच धडक, २० जुलै रोजी वांद्रे वरळी सी लिंक जवळ भीषण अपघात, अपघातात गंभीर जखमी झालेल्या २६ वर्षीय बाईकस्वार तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, आठ दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी, विनोद लाडच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ, इथे क्लिक करुन वाचा सविस्तर

५. दिल्लीतील कोचिंग क्लासच्या तळघरात कसं शिरलं पाणी? ‘त्या’ एसयूव्ही कारमुळे तीन विद्यार्थी बुडाल्याची चर्चा, इथे क्लिक करुन पाहा व्हिडिओ आणि बातमी

६. गुजरातहून पर्यटनासाठी नंदुरबारला आले, गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे थार गाडी थेट दरीत कोसळली, अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील होराफळी गावाजवळ घटना, सुदैवाने भीषण अपघातात कुठलीही जीवितहानी नाही, जखमी प्रवाशावर रुग्णालयात उपचार सुरु

७. ठरलं तर मग मालिकेत अखेर प्रतिमा आणि रविराज समोरासमोर, २५ वर्षांनी घडली नवरा बायकोची भेट, पूर्णा आजीसह संपूर्ण सुभेदार कुटुंबात आनंदीआनंद, मात्र प्रियाच्या नाटकाचा वाजला पुरता बॅण्ड, वहिनीला जिवंत समोर पाहून नागराजचीही बोलती बंद

८. बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वात १६ महारथी घरात दाखल, रितेश देशमुखवर सूत्रसंचालनाची धुरा, वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, पंढरीनाथ कांबळेसारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटींपासून छोटा पुढारी घनश्याम दरोडे, अंकिता प्रभू वालावलकर या सोशल मीडिया स्टारमध्ये रंगणार तगडी स्पर्धा

९. मनू भाकरनंतर आता नेमबाजीत रमिता जिंदाल आणि अर्जुन बबुता यांच्याकडून पदक मिळण्याची आशा, मनूने रविवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकून इतिहास रचल्यानंतर भारतीयांच्या अपेक्षा उंचावल्या

१०. अर्थमंत्र्यांसमोर दिग्गज शेअर मार्केट गुंतवणूकदाराने खास शैलीत मांडला प्रश्न, इथे क्लिक करुन वाचा सविस्तर

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.