Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Boy Jump From Building: टास्क पूर्ण करण्यासाठी १५ वर्षीय मुलाची १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; पिंपरीतील धक्कादायक घटना

9

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

मोबाईल गेमचा नाद एका १५ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतला आहे. मोबाईल गेम मधील टास्क पूर्ण करण्यासाठी या मुलाने इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून त्याने उडी मारून आत्महत्या केली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील किवळे येथे ही धक्कादायक घटना घडली.

आर्य उमेश श्रीराव (वय १५, रा. रुणाल गेटवे, किवळे) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.किवळे येथील उच्चभ्रू अशा रुणाल गेटवे हाउसिंग सोसायटीतील इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर श्रीराव कुटुंब राहते. मुलाचे वडील नोकरीनिमित्त परदेशात असतात. तर आई गृहिणी आहे. इयत्ता नववीमध्ये शाळेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेला मुलगा अभ्यासात अत्यंत हुशार होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून तो एका मोबाइल गेमच्या नादाला लागला.
Sharad Pawar: शरद पवारांच्या वक्तव्याचा जो अर्थ घ्यायचा तो घेतला गेला; एका ज्येष्ठ नेत्याच्या तोंडून असे विचार…: शिरसाटांचा निशाणा
लॅपटाॅपवर तो गेम खेळत होता. त्यातून तो एकटाच राहत असल्याने वडील मायदेशी परतले. त्यावेळी तो पुन्हा सर्वांमध्ये मिसळून पूर्वीप्रमाणे वावरत होता. दरम्यान, वडील नोकरीनिमित्त पुन्हा परदेशात गेल्यानंतर तो पुन्हा गेमच्या आहारी गेला. त्यातून तो त्याच्या खोलीत स्वत:ला कोंडून घेत होता. खोलीत एकटाच बडबड करत असायचा. अतिवृष्टीमुळं २५ जुलैला शाळांना सुट्टी होती, तो दिवस त्याने गेम खेळण्यात घालवला. रात्री विनवण्या केल्यानंतर तो जेवणासाठी बाहेर पडला. मात्र, जेवण केल्यानंतर पुन्हा तो खोलीत गेला. लहान मुलाला ताप आल्याने त्याची आई चिंतेत होती. रात्रीचा एक वाजला तरी देखील मुलाचा ताप उतरेना, त्यामुळे आई जागीच होती. त्याचवेळी सोसायटीच्या व्हाट्सॲप ग्रुपवर एक मेसेज आला. एक मुलगा जखमी अवस्थेत खाली पडल्याचा उल्लेख मेसेजमध्ये होता. तो मेसेज मुलाच्या आईने वाचला. ती खोलीच्या दिशेने गेली, पण मुलगा खोलीत नव्हता. त्यानंतर धावाधाव करत ती जखमी अवस्थेत पडलेल्या मुलाजवळ पोहचली. जखमी अवस्थेत पडलेला मुलगा तिचाच होता.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पोटच्या मुलाला पाहून, आईची पायाखालची जमीन सरकली. मुलाला हॉस्पिटलमध्ये नेले. पण त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. घरात एका कागदावर गेममधील कोडिंगच्या भाषेत लिहिलेलं काहीतरी आढळलं. मात्र यातून त्याला काय नमूद करायचं होतं, याचा शोध पोलिस घेत आहेत. घटनेबाबत माहिती मिळताच मुलाचे वडील परदेशातून परतले.

किवळे येथे ही घटना घडली. मुलगा एकलकोंडी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हा प्रकार नेमका कशामुळे झाला याबाबत तपास सुरू आहे.- महेंद्र कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, रावेत

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.