Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

डोंगराला मोठमोठ्या भेगा, लोकांचा जीव मुठीत, शासन प्रशासनाने लक्ष देण्याची गावकऱ्यांची मागणी

9

संतोष शिराळे, सातारा : जावळी तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर वसलेल्या घोटेघर- सुलेवाडी येथील डोंगराला मोठ्या भेगा पडल्या आहेत. यात पावसाचे पाणी जात असल्याने जमीन निसरडी होऊन भूस्खलन होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या रांजणी गावावर भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी माळीणसारखी स्थिती झाल्याने रांजणी व सुलेवाडीचे लोक जीव मुठीत घेऊन मुसळधार पावसात जीवन कंठीत आहेत.

यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत असून, सद्यस्थितीत जावळी तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पाचगणी-भिलारपासून जवळच असलेल्या सुलेवाडीत सुमारे २५०-३०० लोकांची वस्ती आहे. या वस्तीच्या खालच्या बाजूला डोंगरमाथ्यावर असणाऱ्या २५ ते ३० एकर क्षेत्रात शेतजमीन व डोंगर उताराला दीड ते दोन किलोमीटर लांब व दीड ते दोन फूट रुंद भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या या भागात पावसाची संततधार सुरू असून, या पडलेल्या भेगांमध्ये पावसाचे पाणी जाऊन त्या आणखी रुंद होऊ लागल्या आहेत. त्यामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे.
Belapur Building Collapse: बेलापूर इमारत दुर्घटना; नवीन अपडेट समोर, दोन जणांचा मृत्यू, शोधकार्य सुरु

जर ही अघटित घटना घडली, तर हा अख्खा डोंगर पायथ्याशी असणाऱ्या रांजणी गावावर ढासळणार असून, गावच या मातीच्या ढिगार्‍याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रांजणीचे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत, तर सुलेवाडी लोकवस्तीतील लोक भेदरलेल्या अवस्थेत आहेत.
Rain Alert: मुंबईत धुव्वाधार पाऊस, विदर्भाला पावसाचा रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा, वाचा Weather Report

या डोंगरात जमिनीवर मोठमोठ्या भेगा पडून त्याच्यात वाढत होत असल्याने सुलेवाडी येथील आत्माराम लक्ष्मण पडसरे, सीताराम लक्ष्मण पडसरे, बाळू रामचंद्र पडसरे, तुकाराम लक्ष्मण पडसरे, दत्तू लक्ष्मण पडसरे, हरिभाऊ लक्ष्मण पडसरे, प्रकाश हरिभाऊ पडसरे, हरिभाऊ पडसरे, वसंत महादेव सावंत, सहदेव नाना पडसरे, बाळू भागूजी पडसरे, सुरेश दगडू पडसरे, बाळू दगडू पडसरे, महादेव रघु झाडे, संतोष महादेव झाडे, बाबुराव रामचंद्र पडसरे यांच्या घरांना भूस्खलनाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. याच डोंगर परिसरात मध्यंतरीच्या काळात शेतीसाठी उत्खनन करण्यात आले आहे. त्यामुळे आता हा धोका जास्तच सांभावत आहे.
Rain Alert: मुंबईत तुफान पाऊस, पुढील ४८ तास मुसळधार, पाहा कुठे रेड, कुठे ऑरेंज अलर्ट?

सुलेवाडी येथे २०१९ मध्ये याच ठिकाणी डोंगराला अशाच मोठमोठ्या भेगा पडल्या होत्या. या वेळी सुलेवाडी गावातील काही लोकांना आपत्कालीन व्यवस्थापनाने काळजी घेत तात्पुरते स्थलांतरित केले होते, तर रांजणी येथील ६० लोकांसाठी निवारा शेड उभारले होते. मात्र, ती अद्यापही आपतग्रस्तांना देण्यात आली नसल्याचे संभाव्य पीडित लोकांनी सांगितले. तसेच निवारा शेडची कामेही थोड्याफार प्रमाणात अपूर्ण असल्याने ती संभाव्य आपतग्रस्तांना दिली नाहीत.

सध्या पावसाची संततधार कायम असून जमीन घसरण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. जसजसे पावसाचे प्रमाण वाढत आहे, तसतसे पावसाचे पाणी या भेगांमध्ये जाऊन या भेगा रुंदावत चालल्या आहेत. डोंगरात रुंदावत चाललेल्या या भेगांमुळे २५ ते ३० एकराचा डोंगरच रांजणी गावाच्या दिशेने घसरत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोंगरावर असलेल्या सुलेवाडी लोकवस्तीतील लोक भीतीच्या छायेखाली वास्तव्य करीत आहेत. पाचगणी- भिलारजवळ असलेल्या या भागात पावसाचा जोर वाढत असल्याने ग्रामस्थ भयभीत होऊन जीवन जगत आहेत. एकंदरीत सुलेवाडी व रांजणी गाव धोक्याच्या छायाखालीच जीवन कंठीत आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.