Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

याला काय राज्य चालवणं म्हणतात काय…? पुणे पुरावरुन राज ठाकरेंकडून सरकारची खरडपट्टी

7

पुणे : गेली दोन तीन वर्ष केंद्र सरकार महानगर पालिकेच्या निवडणुका घेत नाहीये. इथे नगरसेवक नाही. नगरसेवक नसल्याने जबाबदारी घेणार कोण, प्रशासनाशी बोलायचे कुणी? असे सवाल उपस्थित करून खडकवासला धरणातून किती पाणी सोडण्याचे नियोजन आहे? लोकांना त्या पाण्याचा धोका आहे का? हे सांगण्याचे सरकारचे काम नाही काय? अशा पद्धतीने कामे होत असतील तर याला काय सरकार चालविणे म्हणतात काय? अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यात आलेल्या पुरावरुन राज्य सरकारची खरडपट्टी काढली.

शहर वेडेवाकडे वाढले असून, योग्य नगर नियोजन नसल्याने पूरपरिस्थिती ओढवते आहे. हा संपूर्णपणे संबंधित सरकारी खात्यांचा निष्काळजीपणा असून, नागरिकांचे झालेले नुकसान सरकारने भरून दिले पाहिजे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना शासन प्रशासनावर त्यांनी कठोर शब्दांत टीका केली.
MNS Assembly Elections: पक्ष स्वबळावर लढणार; विधानसभेत २०० ते २१५ जागांवर उमेदवार देणार; मनसे नेत्याच्या वक्तव्याची राज्यभरात चर्चा

मुंबई बकाल व्हायला वेळ लागला, पुणे बकाल व्हायला वेळ लागणार नाही

‘राज्य सरकार, प्रशासन व पुणे महापालिकेच्या चुकांमुळे पूर आला असून शहराचा विकास आराखडा तयार होतो परंतु नगर नियोजन (टाउन प्लॅनिंग) केले जात नाही. जमीन दिसली की विकण्याचा प्रकार सध्या जिकडे तिकडे सुरू आहे. मुंबईत ज्यावेळी लोखंडवाला कॉम्पेक्स झाले त्यावेळी आम्हाला वाटलं वेगळी मुंबई झाली पण पुणे कुठपर्यंत पसरतंय, याचा अंदाज लागत नाहीये. नगरपालिकेमधले अधिकारी आणि राज्य सरकारमधील नेते यांचे नेक्सस आहे. मुंबई बकाल व्हायला वेळ लागला, पुणे बकाल व्हायला वेळ लागणार नाही’ असे राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray : लाडके बहीण-लाडका भाऊ एकत्र आले असते, तर दोन्ही पक्ष टिकले असते, राज ठाकरेंचा टोला

याला काय सरकार चालविणे म्हणतात काय…?

गेली दोन तीन वर्ष केंद्र सरकार महानगरपालिकेच्या निवडणुका घेत नाहीये. इथे नगरसेवक नाही. नगरसेवक नसल्याने जबाबदारी घेणार कोण, प्रशासनाशी बोलयचे कुणी? हा प्रश्न आहे. महानगर पालिकांत प्रशासकीय कारभार चालू असताना, ही सगळी जबाबदारी त्यांनीत घेतली पाहिजे, असे सांगतानाच पुण्यात पूर आलेल्या काही ठिकाणी पुनर्विकासाचा प्रश्न आहे, असे सांगितले जात आहे. त्या लोकांशी शासनाने बोलायला हवे. बाहेरच्या राज्यातील लोक येऊन घरे मिळवतात, पण इथल्या लोकांचा घरांसाठीचा संघर्ष सुरू आहे. याला काय सरकार चालविणे म्हणतात का? असा संताप व्यक्त करत राज्य शासनाच्या कामावर राज यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.

जे राज्याचे मालक त्यांचा घरांसाठी संघर्ष

बाहेरच्या राज्यातील लोक येऊन घरे मिळवतात, पण इथल्या लोकांचा घरांसाठीचा संघर्ष सुरू आहे. मुंबईमध्ये झोपडपट्टी पुर्नविकास योजनेअंतर्गत बाहेरच्या राज्यातील लोक फुकट घरे घेऊन जातायेत आणि जे लोक या राज्याचे मालक आहे, त्यांना घरी मिळत नाहीत. हे चित्र बदलले पाहिजे, अशी अपेक्षाही राज यांनी व्यक्त केली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.